निकालपत्र (पारित दिनांक 28 डिसेंबर, 2010) व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा. 1. तक्रारकर्ता श्री.ओमप्रकाश श्रीवासयांनी विरुध्दपक्ष यांचे विरोधात वैद्यकिय निष्काळजीपणाबद्दल सदर ग्राहक तक्रार ही दाखल केली असून मागणी केली आहे की, त्यांना विरुध्दपक्ष यांचेकडून रुपये 7,00,000/- हे व्याजासह मिळावेत. 2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार ही खोटी व बनावटी आहे. त्यांच्या सेवेत कोणतीही न्युनता नसल्यामुळे सदर तक्रार ही खारीज करण्यात यावी. ..2.. ..2.. 3. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी निशानी क्रमांक 17 वर पुरसीस व्दारा विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दिलेला लेखी जबाब हा स्वतःचा जबाब म्हणून स्विकृत केला आहे. कारणे व निष्कर्ष 4. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता हे दिनांक 26/04/2010 ते दिनांक 10/05/2010 या कालावधीत विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्या रुग्णालयात Partial Pyloric Stenosis (वि.प.क्र. 1 यांच्या नुसार प्रचलनातील शब्द अल्सर) या पोटाच्या विकारावर उपचार करण्यासाठी भरती होते. दिनांक 26/04/2010 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी त्यांचेवर शस्त्रक्रिया केली. 5. शस्त्रक्रियेनंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे दिनांक 10/05/2010 ते दिनांक 27/05/2010 पर्यंत तक्रारकर्ता यांना नागपूर येथे डॉ. रहाटे यांचेकडे भरती रहावे लागले. दिनांक 11/05/2010 रोजी डॉ.रहाटे यांनी त्यांचेवर बिल रोट II गॅस्ट्रोनॉमी करीता शस्त्रक्रिया केली. दिनांक 02/06/2010 ते दिनांक 07/06/2010 पर्यंत तक्रारकर्ता यांना पुन्हा डॉ. रहाटे यांचेकडे भरती रहावे लागले. 6. तक्रारकर्ता त्यांच्या ग्राहक तक्रारीमध्ये असे म्हणतात की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे ऑपरेशनचे दुसरे दिवशी म्हणजेच दिनांक 27/04/2010 ला दिल्लीला निघून गेले मात्र शल्यचिकित्सक, के.टी.एस. गोंदिया यांनी दिनांक 15/11/2010 चे पत्रात असे म्हटले आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे एप्रिल 2010 चे दिनांक 26,27,28 व 29 रोजी गोंदिया येथे हजर होते. 7. शस्त्रक्रियेनंतर मोठया प्रमाणात तक्रारकर्ता यांना हिरवी उलटी येणे सुरु झाले असे विधान त्यांनी केले आहे. वि.प.क्रं. 1 यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या रॉब व स्मिथ यांच्या "ऑपरेटीव्ह सर्जरी" या पुस्तकातील पुढील उता-यात म्हटले आहे की, "This is always possible, even with the most severe duodenal ulcer and may certainly be employed in cases with pyloric stenosis in association with selective vagotomy. The disadvantage of gastrojejunostomy is the tendency for bilious vomiting to occure and iron deficient anaemia has been reported in nearly half the patients in the long term after operation". उपरोक्त उता-यावरुन असे निदर्शनास येते की, अशा शस्त्रक्रियेनंतर ब-याच कालावधीपर्यंत उलटी होणे हे शक्य असते. 8. तक्रारकर्ता यांनी ग्राहक तक्रारीच्या परीच्छेद क्रमांक 9 मध्ये असे म्हटले आहे की, डॉ. जैन यांनी सोनोग्राफीच्या आधारावर असे सांगीतले की, आतडयांना सुज आल्यामुळे तक्रारकर्ता यांना त्रास सुरु झाला तर तक्रारीच्या परीच्छेद क्रमांक 11 मध्ये तक्रारकर्ता असे म्हणतात की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी दिनांक 10/05/2010 रोजी दिलेल्या पत्रात त्रास हा Post Operated Gastro Jejunostomy नंतर झाला असे लिहिले आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी ..3.. ..3.. परीच्छेद क्रमांक 17 मध्ये शस्त्रक्रियेत विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचे कडून घट्ट शिवण(tight suturing) केली गेल्यामुळे त्रास निर्माण झाला असे म्हटले आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत कशामुळे निर्माण झाली याबद्दल तक्रारकर्ता यांचे तक्रारीमध्ये स्पष्टता असल्याचे दिसून येत नाही. 9. तक्रारकर्ता यांनी त्यांचे ग्राहक तक्रारीमध्ये विधान केले आहे की, लघवी बंद झाल्यामुळे संसर्गदोष निर्माण झाला व त्यामुळे आतडयांचा मोठा भाग डॉ. रहाटे यांना कापून काढावा लागला मात्र याबाबत कोणताही लेखी दस्ताऐवज तक्रारकर्ता यांनी रेकॉर्डवर दाखल केलेला नाही. 10. तक्रारकर्ता यांनी सदर ग्राहक तक्रारीत आरोप केलेला आहे की, के.टी.एस. या शासकीय रुग्णालयातील डॉ. बंग यांनी अल्सर च्या शस्त्रक्रियेची सुविधा नाही हे कारण सांगून विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडे शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले. मात्र तक्रारकर्ता यांनी डॉ. बंग यांना सदर ग्राहक तक्रारीमध्ये पार्टी केलेले नाही. 11. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 अथवा 2 यांच्याकडील कोणतेही वैद्यकिय देयक सदर प्रकरणात दाखल केलेले नाही ही तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीमधील मोठी उणीव आहे. ग्राहक सरंक्षण कायदा- 1986 मध्ये दिलेल्या ग्राहक या संज्ञेच्या व्याख्येत असे म्हटले आहे की, ग्राहकाने वस्तू अथवा सेवा या पैसे देवून विकत घ्यावयास पाहीजे. तक्रारकर्ता यांनी त्यांचे ग्राहक तक्रारीत विरुध्दपक्ष क्रमांक 1 अथवा 2 ला त्यांची सेवा विकत घेण्यासाठी काही पैसे दिले त्याचा उल्लेख केलेला नाही अथवा किती रक्कम दिली अथवा किती रक्कम दयावयाची बाकी होती याबद्दल सुध्दा काही उल्लेख केलेला नाही. विरुध्दपक्ष यानी तर त्यांच्या लेखी जबाबात तक्रारकर्ता यांनी त्यांना कोणतीही रक्कम दिल्याचा इन्कार केलेला आहे. 12. तक्रारकर्ता यांनी अ) 2009 (3) CPR 226 NC व ब) 2005 (3) CPR 70 SC हे केस लॉ रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत. 2009 (3) CPR 226 NC हा केस लॉ सदर प्रकरणास लागू होत नाही. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या जेकब मॅथ्यू विरुध्द पंजाब राज्य व इतर या 2005 (3) CPR 70 SC मध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने असे प्रतिपादन केले आहे की, फक्त रुग्ण हे उपचारास सकारात्मक प्रतिसाद देत नाही अथवा शस्त्रक्रिया ही निष्फळ झाली या कारणावरुन डॉक्टला जबाबदार धरता येवू शकत नाही. 13. विरुध्दपक्ष यांनी अ) 2010 ALLSCR 510 , ब) सुप्रिम कोर्ट व नॅशनल कमीशन कन्झुमर लॉ केसेस (1996-2005) पेज क्रमांक 785 , क) फर्स्ट अपिल क्रमांक 570/1993, आदेश दिनांक 26/06/1996 राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग व ड) सुप्रिम कोर्ट व ..4.. ..4.. नॅशनल कमीशन कन्झुमर लॉ केसेस (1996-2005) ओरीजनल पिटीशन क्रमांक 43/1993, पेज क्रमांक 688 हे केस लॉ रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत. 14. कुसूम शर्मा व इतर विरुध्द बत्रा हॉस्पीटल व मेडीकल रिसर्च सेंटर व इतर या 2010 ALLSCR 510 यामध्ये प्रकाशित झालेल्या न्याय निवाडयात आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, "प्रत्येक शस्त्रक्रियेत अगणित धोका हा असतो व फक्त गुंतागुंत निर्माण झाली म्हणून असे म्हणता येत नाही की, रुग्णालय अथवा डॉक्टर हे निष्काळजीपणासाठी दोषी आहेत" . 15. स्वाती प्रकाश पाटील विरुध्द डॉ. किरण राजाराम वनरासे व इतर या II (2007) CPJ 403 वर प्रकाशित झालेल्या निवाडयात आदरणीय महाराष्ट्र राज्य आयोगाने असे प्रतिपादन केले आहे की, वैद्यकिय निष्काळजीणा हा निष्णात व्यक्तीच्या पुराव्याव्दारे सिध्द करायला हवा. तक्रारकर्ता यांनी दिलेले शपथपत्र हे वैद्यकिय निष्काळजीणासाठी डॉक्टर जबाबदार आहे हे ठरविण्यास पुरेसे नाही". तक्रारकर्ता यांनी कोणत्याही निष्णात व्यक्तीचे शपथपत्र सदर ग्राहक तक्रारीत दाखल केलेले नाही. 16. विरुध्दपक्ष क्रमांक 1 अथवा 2 यांचे सेवेत दोष असल्याचे सिध्द करण्यास तक्रारकर्ता हे असमर्थ ठरले आहे. असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे. आदेश तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.
| [HONORABLE Shri. Ajitkumar Jain] Member[HONORABLE Smt. Potdukhe] PRESIDENT | |