Maharashtra

Ahmednagar

CC/15/15

Ratilal Bansilal Bhandari - Complainant(s)

Versus

Dr.Prashant A.Patare - Opp.Party(s)

Hendre-Joshi

23 Sep 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/15/15
( Date of Filing : 01 Jan 2015 )
 
1. Ratilal Bansilal Bhandari
At Chanda,Tal Newasa
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr.Prashant A.Patare
Anand Rushi Hospital & Medical Research Centre,124,Anand Rushiji Marg,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Anand Rushi Hospital & Research Centre C/o-Chairman/President
Anand Rushi Hospital & Medical Research Centre,124,Anand Rushiji Marg,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
3. Manager,The United India Insurance Co.Ltd.
Branch Office-Zendigate,Behind Ashoka Hotel,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:Hendre-Joshi, Advocate for the Complainant 1
 P.K. Meher, Advocate for the Opp. Party 1
Dated : 23 Sep 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २३/०९/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, सामनेवाले क्र.१ हे सामनेवाले क्र.२ यांच्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये नोकरी करतात व सामनेवाले क्र.२ यांचेकरीता रूग्‍णसेवा करतात. तक्रारदार हे सामनेवाले क्र.२ यांच्‍याकडे अॅडमीत होते व सामनेवाले क्र.३ कडून तक्रारदाराने प्रोफेशनल इंडेम्निटी (मेडीकल इस्‍टॅब्‍लीशमेंट) पॉलिसी उतरविलेली होती. सदर पॉलिसीचा क्रमांक १६२५००/४६/१३/३२/०००००५५८ असा आहे. म्‍हणुन तक्रारदार सामनेवाले क्र.१ ते ३ यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांचा दिनांक ०२-०६-२०१४ रोजी घोडेगाव येथे  गाडी घसरून अपघात झाला व त्‍यावेळी रात्री १०.३० वाजता तक्रारदार यांना सामनेवाले क्र.२ आनंदऋषी हॉस्‍पीटल येथे अॅडमीट करण्‍यात आले व त्‍यांचा उपचार सामनेवाले क्र.१ यांचेकडे सोपविण्‍यात आला. तक्रारदाराचे एक्‍सरे मध्‍ये  तक्रारदार यांच्‍या डाव्‍या पायामध्‍ये किरकोळ फ्रॅक्‍चर असुन ऑपरेशन करावे लागले, असे सांगण्‍यात आले. त्‍यानंतर सदर ऑपरेशनंतर उपचार घरी द्यावा तक्रारदाराला असे कळविण्‍यात आले होते. तक्रारदार त्‍याचे मुलीचे लग्‍न दिनांक ०२-०७-२०१४ रोजी असल्‍याने तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ यांच्‍या शब्‍दावर विश्‍वास ठेवुन सामनेवाले क्र.२ येथे औषधोपचार करण्‍याचे ठरविले. सामनेवाले क्र.१ यांनी दिनांक ०३-०६-२०१४ रोजी त्‍या पायाचे ऑपरेशन करून त्‍यात लॅटरल टिबिया प्‍लेटिंग केली. त्‍यानंतर पायाला प्‍लॅस्‍टर केले. त्‍यानंतर काही दिवसांनी परत तक्रारदाराचे पायाला वेदना होऊन लागल्‍या. त्‍याविषयी हॉस्पिटलमधील नर्सला सांगितले असता, तिने तक्रारदारास इंजेक्‍शन दिले असता वेदना कमी झाल्‍या नाही त्‍यामुळे पुन्‍हा इंजेक्‍शन दिले तरीपण तक्रारदाराच्‍या वेदना थांबल्‍या  नाहीत. त्‍यानंतर हॉस्‍पीटलचे काउंटरवर कोणीही नव्‍हते. तक्रारदाराने संपुर्ण रात्र वेदनांनी तळमळत काढली व मरण यातना सहन केल्‍या. सकाळी ६.३० वा सामनेवाले क्र.१ आले असता त्‍यांना पायावी सूज व वेदनेबाबत सांगितले असता दिनांक ०६-०६-२०१४ रोजी सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदारस सांगितले की, तुमच्‍या पायाची नस दबली गेल्‍याने पुन्‍हा ऑपरेशन करावे लागे, त्‍यामुळे वेदना थांबतील. याप्रमाणे दिनांक ०६-०६-२०१४ रोजी सामनेवाले क्र.१ यांच्‍या  सल्‍ल्‍यानुसार तक्रारदाराच्‍या पायावर Fesloctermy (SA) ही शस्‍त्रक्रिया केली. त्‍यानंतर तक्रारदाराच्‍या पायाच्‍या पंजाची हालचाल बंद झाली व पाय वाकडा झाला. याबाब विचारले असता १५ ते २० दिवसात फरक पडेल असे, सांगितले.  सामनेवाले यांनी दिनांक ०८-०६-२०१४ रोजी तक्रारदाराचे पायाचे बॅंडेज काढले तेव्‍हा त्‍या ऑपरेशनच्‍या जागेवर टाक्‍यातुन पू (खराब रक्‍त) निघत असल्‍याचे लक्षात आले त्‍यामुळे १० तारखेला परत devridement of neerotice muscle ofanterior compartment of left leg हे ऑपरेशन करण्‍याचा सल्‍ला सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदारास दिला व त्‍यानुसार तक्रारदाराचे डाव्‍या पायावर सदरचे ऑपरेशन केले. परंतु तरीही तक्रारदारास होणारा त्रास कमी झाला नाही. याबाबत सामनेवाले यांना विचारले असता तक्रारदाराचे पायाचे काही स्‍नायू (मसल) खराब झाले होते, ते कट केले आहेत.  पाय थोडा बरा झाल्‍यानंतर आपण पुढचे मसल काढून मागच्‍या बाजुला जोडू, म्‍हणजे त्‍यांचा पाय पुर्वीसारखा होईल व त्‍यांना चालता येईल, अशी धक्‍कादायक माहिती दिली. तक्रारदारास दिनांक १७-०४-२०१४ रोजी सामनेवाले क्र.१ व २ यांनी डिस्‍चार्ज दिला व सदरचा त्रास लवकर बंद होईल, असे सांगितले. परंतु तसे झाले नाही, अशा रितीने सामनेवाले क्र.१ व २ यांनी दिनांक ०२-०६-२०१४ ते १७-०६-२०१४ पर्यंत औषधोपचार केले. त्‍यानंतर सामनेवाले क्र.१ यांची भेट घेतल्‍यानंतर त्‍यांनी तक्रारदाराच्‍या पायाची प्‍लेट काढून परत एक ऑपरेशन करून एक छोटी प्‍लेट टाकू, म्‍हणजे गुढगा सरळ होईल, असे सांगितले.

     तक्रारदार हे दिनांक १०-०७-२०१४ रोजी सिध्‍दार्थ हॉस्पिटल, पुणे येथे गेले असता, तेथे तक्रारदारास डॉक्‍टरांनी काही टेस्‍ट करण्‍यास सांगितले व त्‍या  टेस्‍टच्‍या रिपोर्टवरून सदर डॉक्‍टरांनी सांगितले की, तुमच्‍यावर झालेले तीनही ऑपरेशन चुकीचे झालेले आहेत. यापुढे तुम्‍हाला पूर्वीसारखे चालता येणार नाही. तुमचे ऑपरेशन हे तीन वेळेस झालेले असल्‍यामुळे आता जर आपण ऑपरेशन केले तर तुमचा पाय कामातून जाऊ शकतो. तेव्‍हा पायाची हाडे जुळणे महत्‍वाचे  आहे. हे ऐकून तक्रारदाराला आपली फसवणुक झाल्‍याचे लक्षात आले. याबाबत सामनेवाले क्र.१ यांना भेटले असता त्‍यांनी उडवा-उडवीची उत्‍तरे दिली.  सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदारावर योग्‍य प्रकारे व काळजीपूर्वक उपचार केलेले नाही. सामनेवाले क्र.१ याने तक्रारदारावर निष्‍काळजीपणे ऑपरेशन केले, हलगर्जीपणा करून प्‍लॅस्‍टर केले, शस्‍त्रक्रियेनंतर जखमांची व टाक्‍यांची काळजी न घेतल्‍याने त्‍या जागी जंतूसंसर्ग झाला व तिसरे ऑपरेशन करावे लागले. त्‍यामुळे तक्रारदाराचा पाय पूर्णतः निकामी झाला आहे, तक्रारदारास चालताही येत नाही. तसेच व्‍यवसाय करणेही अशक्‍य झाले आहे. नुकसान भरपाई मागण्‍यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यास अॅड.के.एस. ढेरे व एस.एस. सोनवणे यांचेमार्फत दिनांक ०९-०९-२०१४ रोजी नोटीस पाठविली असता, त्‍यास सामनेवाले क्र.१ यांनी दिनांक २३-०९-२०१४ रोजी खोटे लबाडीचे नोटीस उत्‍तर पाठविले. त्‍यामुळे ते तक्रारदारास मान्‍य व कबुल नाही. तक्रारदार हा घरातील एकमेव कर्ता असून त्‍याच्‍या उत्‍पन्‍नावरच त्‍याचे कुटुंब अवलंबून आहे. सध्‍या त्‍यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तक्रारदाराच्‍या अपंगत्‍वामुळे तक्रारदारास व त्‍याचे कुटुंबास मनस्‍ताप सोसावा लागत आहे. यापुढे तक्रारदारास पाय सरळ करण्‍यासाठी, तळपायाची हालचाल होऊन इतरांच्‍या आधाराशिवाय चालता यावे यासाठी औषधोपचार व शस्‍त्रक्रिया करून घेणे बंधनकारक झाले आहे, त्‍याचा अंदाजे खर्च रक्‍कम रूपये १०,००,०००/- इतका येणार आहे. तसेच तक्रारदाराला मोठ्या प्रमाणात शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. सबब सदर तक्रार दाखल करणे तक्रारदारस भाग पडले आहे.    

३.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदारास यापुढे त्‍याचा पाय सरळ करण्‍यासाठी, तळपायाची हालचाल होऊन इतरांच्‍या  आधाराशिवाय चालता यावे यासाठी औषधोपचार व शस्‍त्रक्रिया करून घेण्‍याबाबतचा खर्च रूपये १०,००,०००/- देण्‍याबाबत आदेश सामनेवाले क्र.१ व ३ यांचेविरूध्‍द व्‍हावा. तक्रारदारास अहमदनगर येथे हॉस्पिटलमध्‍ये अॅडमिट करावे लागल्‍यामुळे चांदा ते अहमदनगर असा प्रवास खर्च रूपये ५,०००/- सामनेवाले क्र.१ ते ३ यांचेकडून मिळावा, सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍या चुकीच्‍या  औषधोपचारामुळे तक्रारदार व त्‍याचे कुटुंबियास झालेल्‍या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई रक्‍कम रूपये ५,००,०००/- मिळावी, नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च रक्‍कम रूपये ५,०००/- मिळावा.

४.   तक्रारदार यांनी तक्रारीचे पुष्‍ट्यर्थ नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ६ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकूण ८ कागदपत्रांचे छायांकीत प्रती दाखल  केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये पोलीस इंटीमेशन, सामनेवालेचे पत्र, ऑपरेशन नोटस, डिस्‍चार्ज समरी दाखल आहे. निशाणी १८ वर पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी २९ वर तक्रारदाराने लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.

५.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाले क्र.१ ते ३ प्रकरणात हजर झाले व निशाणी १५ वर त्‍यांनी संयुक्‍तरित्‍या त्‍यांचा जबाब दाखल केला. सामनेवाले यांनी लेखी जबाबत असे कथन केले आहे की, तक्रारदाराचा अर्थ खरा नाही व कैफीयतीमध्‍ये स्‍पष्‍टपणे कबुल केलेला मजकुर सोडुन बाकीचा मजकूर खोटा व लबाडीचा असुन त्‍यांना नाकबुल आहे. सामनेवालेने वास्‍तविक परिस्थितीमध्‍ये असे नमूद केले आहे की, तक्रारदार दिनांक ०२-०६-२०१४ रोजी रात्री १०.१५ चे सुमारास सामनेवाले क्र.२ हास्‍पीटलमध्‍ये दाखल झाला. त्‍यावेळेस त्‍याने मोटार सायकलवरून घसरून पडल्‍यामुळे जखमा झाल्‍याची माहिती दिली. त्‍यावेळेस सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदाराला तपासले नव्‍हते, रात्रीचेवेळी असलेले डॉक्‍टरांनी तपासून जखमेला बॅंडेज करून योग्‍य औषध उपचार करून तक्रारदारास स्थिर केले व हॉस्‍पीटलमध्‍ये अॅडमिट करून घेतले. दुसरे दिवशी ता.०३-०६-२०१४ रोजी तक्रारदारास सामनेवाले क्र.१ यांनी तपासले व तक्रारदाराचे एक्‍सरे व इतर तपासण्‍या करण्‍याबाबत सूचना दिल्‍या. सामनेवाले क्र.१ हे M.S. Ortho असून Gold Medalist आहेत. M.S. झाल्‍यानंतर त्‍यांनी पदरेशातील ब-याच नामांकित संस्‍थामध्‍ये पुढील शिक्षण व अनुभव घेतलेला असुन Orthopedic Surgen म्‍हणुन सामनवाले क्र.२ हॉस्‍पीटलमध्‍ये सन २००९ पासून कार्यरत आहेत. एक्‍सरे रिपोर्टवरून तक्रारदारास Left Proximal tibia fracture असल्‍याचे दिसून आले. सदर जखम ही किरकोळ फ्रॅक्‍चर या सदरात मोडणारी नाही, त्‍यामुळे सामनेवालेने तक्रारदारास ऑपरेशन करून Plating करावे लागेल असे सांगितले. तक्रारदार व त्‍याचे पत्‍नीने संमतीपत्र लिहुन दिल्‍यावर सामनेवाले क्र.१ याने दिनांक ०३-०६-२०१४ रोजी तक्रारदारावर left tibia locking plate fixation under spianal (स्‍पाईनल) Anesthesia (अनस्‍थेसिया) चे ऑपरेशन केले व सदर ऑपरेशन यशस्‍वी झाले. त्‍याबाबत तक्रारदाराची दिनांक ०६-०६-२०१४ पर्यंत कोणतीही तक्रार नव्‍हती. दिनांक ०६-०६-२०१४ रोजी सामनेवाले क्र.१ हे रोजच्‍या  भेटी करीता तक्रारदारास पाहण्‍यास गेले असता त्‍यांना तक्रारदाराचे पायाचे पंजाची हालचाल योग्‍य प्रकारे होत नसल्‍याचे व पायाची सूज वाढलयाचे लक्षात आले. तक्रारदाराचे पायावर Compartment Syndrome चे लक्षणे दिसू लागली. सदर लक्षणे उद्भवण्‍यापूर्वी त्‍यांना रोखण्‍याची कोणतीही तरतूद नाही, त्‍यामुळे तक्रारदाराचे शरिरावर निर्माण झालेल्‍या Compartment Syndrome करिता त्‍याचेवर Fascio tomy करणे आवश्‍यक असल्‍याने सदर उपचार करण्‍याचा सल्‍ला सामनेवाले क्र.१ याने तक्रारदारास दिला. त्‍याप्रमाणे त्‍याच दिवशी दुपारी अडीच वाजता तातडीने Fasiotomy ची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. त्‍यानंतर तक्रारदाराचे शारीरिक परिस्थितीमुळे सुधारणा होत होती म्‍हणून दिनांक       ०८-०६-२०१४ रोजी तक्रारदाराचे केसपेपरवर सामनेवाले क्र.१ याने दुस-या दिवशी म्‍हणजे दिनांक ०९-०६-२०१४ रोजी तक्रारदारास हॉस्‍पीटलमधून डिस्‍चार्ज देता येऊ शकतो अशी नोंद घेतली.  दिनांक १०-०६-२०१४ रोजी तक्रारदाराची तपासणी केली असता त्‍याचे पायाची बॅंडेजवर डाग दिसल्‍यामुळे जखमेची तपासणी केली असता तक्रारदाराचे जखमेतून घाण येत असल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे सामनेवाले क्र.१ याने तातडीने सदर जखम स्‍वच्‍छ करण्‍याचा निर्णय घेतला व त्‍याप्रमाणे रात्री ८ वाजता तक्रारदाराची जखम स्‍वच्‍छ करण्‍याची प्रक्रिया केली. Compartment Syndrome च्‍या शस्‍त्रक्रियेनंतर जखमेमधून पू येणे ही known complication आहे. त्‍यामुळे सामनेवालेच्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारदारावर सदर शस्‍त्रक्रिया करावी लागली हे म्‍हणणे पुर्णपणे चुकीचे आहे. तक्रारदारावर दिनांक १०-०६-२०१४ रोजी जखम स्‍वच्‍छ करण्‍याची प्रक्रिया केल्‍यानंतर तक्रारदाराचे शारीरिक स्थितीमध्‍ये सुधारणा होत होती. तक्रारदाराने त्‍याचे मुलीचे लग्‍न असल्‍याचे सांगुन Physiotherapy ची प्रक्रिया घरी करून घेतो असे सांगून ता.११-०६-२०१४ रोजी सामनेवाले क्र.२ हॉस्‍पीटलमधुन डिस्‍चार्ज घेतला त्‍यावेळी तक्रारदाराची शारीरिक परिस्थिती उत्‍तम होती व त्‍याने त्‍याचेवर झालेल्‍या उपचाराबाबत कोणतीही तक्रार केली नव्‍हती. दिनांक ०२-०७-२०१४ रोजी तक्रारदाराचे मुलीचे लग्‍न झाल्‍यानंतर सुमारे ५ ते ६ दिवसानंतर सामनेवाले क्र.१ ची भेट घेतली असता तक्रारदाराची तपासणी केली त्‍यावेळी लग्‍न कार्यातील धावपळीमुळे तक्रारदाराचे पायावर ऑपरेशन करून टाकलेल्‍या Plate चे स्‍क्रू ढिले झाल्‍यामुळे Plate हालून तक्रारदारास आधून मधून दुखत असल्‍याचे सामनेवाले क्र.१ यांचे निदर्शनास आले. त्‍यामुळे सामनेवाले क्र.१ यांनी छोटी शस्‍त्रक्रिया करून पुर्वीची Plate चे जोडीला आणखी एक छोट्या Plate चा आधार देण्‍याची प्रक्रिया करण्‍याचे सुचविले. त्‍यावर तक्रारदाराने दोन दिवसांनी येतो असे सांगून पुन्‍हा कधीही या सामनेवालेची भेट घेतली नाही. तक्रारदाराने दिनांक १०-०७-२०१४ रोजी पुणे येथील सिध्‍दार्थ हॉस्‍पीटलमध्‍ये घेतलेल्‍या उपचाराबाबत या सामनेवालेस कोणतीही माहिती नाही. सिध्‍दार्थ हॉस्‍पीटलच्‍या डॉक्‍टरांनी तक्रारदारास सांगितलेली कथने खोटी व लबाडीची असून सामनेवाले यांना मान्‍य नाहीत व कबूल नाहीत. तक्रारदारास फसवणुक झालेले लक्षात आले, सामनेवाले क्र.१ यांनी उडवाउडवीची उत्‍तरे दिली व काळजीपुर्वक उपचार केले नाहीत, इत्‍यादी कथने खोटी व लबाडीची असुन सामनेवालेस मान्‍य व कबुल नाही. तक्रारदाराने पाय सरळ करणेसाठी व इतर केलेली मागणी खोटी, चुकीची व अवास्‍तव असुन सामनेवालेस मुळीच मान्‍य व कबुल नाही. तक्रारदाराने उपचारामध्‍ये सामनेवाले यांचा कोणताही निष्‍काळजीपणा नसल्‍यामुळे तक्रारदारानी मागणी केलेली कोणतीही रक्‍कम देण्‍यास सामनेवाले जबाबदार नाहीत. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.       

     सामनेवालेने कैफियतीचे पुष्‍ट्यर्थ नि.२४ वर डॉ.दिनेश महादेव पाटोळे यांचे साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. निशाणी ३१ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. निशाणी ३३ वर दस्‍तऐवज यादीसोबत एकुण ४ कागदपत्रांचे  छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये प्रोग्रेस रिपोर्ट दि.०३-०६-२०१४, तक्रारदाराचे पत्‍नीचे संमती पत्र दि.०३-०६-२०१४, ०६-०६-२०१४, १०-०६-२०१४ दाखल आहे. तसेच नि. ३५ वर दस्‍तऐवज यादीप्रमाणे मा. राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचे न्‍यायनिवाडे दाखल केले आहे.

६.   तक्रारदाराची तक्रार, सामनेवालेचा जबाब, शपथपत्र, तक्रारदाराचा शपथपत्र पुरावा, तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद, सामनेवालेचा लेखी युक्तिवाद पाहता आयोगासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

 

अ.क्र.

मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ चे  ग्राहक आहेत काय ?

होय

२.

तक्रारदार हे सामनेवाले क्र.३ चे ग्राहक आहेत काय ?

नाही

३.

सामनेवालेने तक्रारदारास न्‍युनतम सेवा दर्शवीली आहे काय ?

नाही

४.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

७.  मुद्दा क्र. (१) :  तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याकडे अॅडमीट झाले होते व दिनांक ०२-०६-२०१४ ते १७-०६-२०१४ पर्यंत उपचार घेतले होते. ही बाब उभयपक्षांना मान्‍य आहे. म्‍हणुन तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक आहेत, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (२) :  तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.३ यांच्‍याकडे मेडीकल पॉलिसी उतरविली होती, याविषयी तक्रारदाराने कोणतीही पॉलिसीची प्रत प्रकरणात दाखल केलेली नाही. म्‍हणुन तक्रारदार हे सामनेवाले क्र.३ चे ग्राहक नाहीत, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

९.  मुद्दा क्र. (३) :  तक्रारदाराने तक्रारीत असे नमुद केलेले आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याकडे तक्रारदाराने दिनांक ०२-०६-२०१४ ते १७-०६-२०१४ चे दरम्‍यान उपचार घेत असतांना तक्रारदाराचे पायाचे वेगवेगळे ऑपरेशन करण्‍यात आलेले होते. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याकडुन दिनांक १७-०६-२०१४ रोजी डिस्‍चार्ज घेतल्‍यानंतर दिनांक १०-०७-२०१४ रोजी  सिध्‍दार्थ हॉस्‍पीटल, पुणे येथे गेले असतांना तक्रारदारास डॉक्‍टरांनी टेस्‍ट करण्‍यास सांगितले व त्‍या टेस्‍टच्‍या रिपोर्टवरून सदर डॉक्‍टरांनी तक्रारदारांना सांगितले की, तुमच्‍यावर झालेले तीनही ऑपरेशन चुकीचे झालेले आहेत. ही बाब सिध्‍द करण्‍याकरीता तक्रारदाराने या तक्रारीत कोणताही दस्‍तऐवज, पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदाराने दिनांक १०-०७-२०१४ व त्‍यानंतर करण्‍यात आलेल्‍या टेस्‍टींगचे रिपोर्टही प्रकरणात दाखल केलेले नाही. याउलट सामनेवालेने बचाव पक्षात साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. त्‍यात असे नमुद करण्‍यात आलेले आहे की, `` तक्रारदाराचे पायाचा अस्तिभंग झालेला होता. त्‍याच्‍यावर दिनांक ०३-०६-२०१४ रोजी शस्‍त्रक्रिया झालेला भागात वेदना होत असल्‍याची तक्रार केल्‍याचे दिसते. डॉ.पठारे यांनी त्‍यास तपासले असता त्‍याच्‍या पायाची सुज वाढल्‍याचे व पंजाची हालचाल योग्‍य प्रकारे होत नसल्‍याचे आढळुन आले होते. सदर लक्षणास वैद्यकिय भाषेत Compartment syndrome असे निदान करण्‍यात आले. डॉक्‍टर पठारे यांनी तक्रारदाराची Faciotomy ची शस्‍त्रक्रिया केली व त्‍यानंतर दिनांक ०८-०६-२०१४ च्‍या केस पेपरवर उद्या पेशंटला उद्या डिस्‍चार्ज करू असे नमुद करण्‍यात आले होते. त्‍यानंतर तक्रारदाराचे बॅण्‍डेजवर डाग दिसल्‍यामुळे तक्रारदाराचे जखमेची तपासणी करत असतांना जखमेतुन घाण येत असल्‍याने डॉक्‍टर पठारे यांनी पेशंटची जखम स्‍वच्‍छ करण्‍याचा निर्णय घेतला. Compartment syndrome च्‍या  शस्‍त्रक्रियेनंतर जखमेमध्‍ये घाण होणे हे वैद्यकिय शास्‍त्रानुसार हे known complication समजले जाते. यात डॉक्‍टर पठारे यांची कोणतीही चुक नाही व कोणत्‍याही प्रकाराची वैद्यकीय शास्‍त्रानुसार त्‍यामध्‍ये कोणतेही चुकीचे उपचार किंवा निष्‍काळजीपणा करण्‍यात आलेला नाही. ’’

     मा. राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, दिल्‍ली यांचा 2019(2) CPR 22 NC – Satish Kumar & Ors. Vs. Dr. Rajendrao Sangwan आदेश दिनांक २८-०३-२०१९ या न्‍यायनिवाड्सानुसार डॉक्‍टरांनी केलेल्‍या चुकीचे उपचार सिध्‍द करण्‍याची जबाबदारी तक्रारदारावर असते, असे नमुद करण्‍यात आलेले आहे. सदर तक्रारीत तक्रारदार दस्‍तऐवज किंवा कोणतेही साक्षीदार अथवा साक्षी पुराव्‍याद्वारे हे सिध्‍द करू शकले नाही की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराचे योग्‍यपणे औषधपाणी व उपचार केले नाही. याउलट सामनेवाले क्र.१ व २ यांनी निशाणी क्रमांक ३२ व ३३ वर दस्‍तऐवज दाखल केलेले आहे. त्‍या  दस्‍ऐवजात तक्रारदाराचे नातेवाईकांचे शस्‍त्रक्रियेपुर्वी दिलेले संमती पत्र आहे व त्‍यानुसार तक्रारदाराला व त्‍याचे नातेवाईकांना शस्‍त्रक्रिया करण्‍याची सर्व माहिती व त्‍यात तक्रारदाराचे जिवीतास उद्भवणा-या संभाव्‍य धोक्‍याची पुर्ण कल्‍पना देण्‍यात आली होती. सबब सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी तक्रारदारास कोणतेही  चुकीचे औषधपाणी किंवा उपचार केलेले नाही व कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली दिलेली नाही, असे सिध्‍द होते. म्‍हणुन मुद्दा क्रमांक ३ चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

१०.  मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्र.१ ते ३ चे विवेचनावरून आम्‍ही  खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.    

 

आदेश

      १.  तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

      २.  उभय पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

      ३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 

      ४.  तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.