Maharashtra

Nagpur

CC/08/259

Rajkamal Ramavtar Prasad - Complainant(s)

Versus

Dr.(Mrs.)Pramila H.Badki - Opp.Party(s)

Adv.Avinash Kalraiya

03 May 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/08/259
 
1. Rajkamal Ramavtar Prasad
R/o.Plot No.3, Harihar Nagar, Besa Road, near I.T.Park, Wardha Road, Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Dr.(Mrs.)Pramila H.Badki
Mamta Hospital, Laxmi Vihar, near Hotel Mansingh, Wardha Road, Somalwada, Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्री. अमोघ कलोती, अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 03/05/2013)
 
1.           विरुध्‍द पक्षांच्‍या वैद्यकीय सेवेतील कमतरतेबद्दल नुकसान भरपाई मिळणेसाठी तक्रारकर्त्‍यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
 
2.          तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे -
तक्रारकर्ता क्र. 1 व 2 पती-पत्‍नी आहेत. तक्रारकर्ता क्र. 1 व्‍यवसाय करीत असून, तक्रारकर्ता क्र. 2 शाळेत शिक्षिका आहे. विरुध्‍द पक्षाचा वैद्यकीय व्‍यवसाय (डॉक्‍टर) असून, त्‍या ‘ममता हॉस्पिटल’ नामक दवाखान चालवितात.
 
सन 2004 सालचे अखेरीस तक्रारकर्ती क्र. 2 गर्भवती राहिल्‍याने तिने विरुध्‍द पक्षांकडून वैद्यकीय सल्‍ला व उपचार घेणे सुरु केले. विरुध्‍द पक्षाचे सल्‍ल्‍यानुसार तक्रारकर्ती क्र. 2 ने सोनोग्राफी व अन्‍य चाचण्‍या केल्‍यात. तक्रारकर्ती क्र. 2 च्‍या गर्भातील बाळाची चौक्‍शी तक्रारकर्त्‍यांनी केली असता सर्व ठिकठाक असल्‍याचे व काळजी करण्‍यासारखे काहीही नसल्‍याचे सांगून विरुध्‍द पक्षांनी आश्‍वस्‍त केले.
 
तक्रारकर्ता क्र. 2 ला प्रसूती वेदना होऊ लागल्‍याने दि.31.08.2005 रोजी दुपारी 12:00 चे दरम्‍यान विरुध्‍द पक्षाच्‍या दवाखान्‍यात भरती करण्‍यात आले. तद्नंतर, तक्रारकर्ती क्र. 2 ला एका पलंगावर झोपवून ठेवण्‍यात आले. दरम्‍यान तक्रारकर्ती क्र. 2 च्‍या वेदना वाढल्‍या. परंतू बराच वेळपर्यंत कोणीही तिचेकडे लक्ष दिले नाही. तक्रारकर्ती क्र. 2 विरुध्‍द पक्षांचे दवाखान्‍यात भरती झाल्‍यानंतर तीन तासांनी, म्‍हणजे दुपारी 3 वाजता विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्ती क्र. 2 कडे लक्ष दिले आणि प्रसूतीसाठी शस्‍त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. तक्रारकर्ता क्र. 1 ने पर्याय नसल्‍याने विरुध्‍द पक्षांचे सांगण्‍यावरुन काही को-या कागदपत्रांवर स्‍वाक्षरी केली. शस्‍त्रक्रिये दरम्‍यान डॉ. मंडलीकसुध्‍दा हजर होते.
 
विरुध्‍द पक्षांनी अन्‍य डॉक्‍टरांच्‍या सहाय्याने तक्रारकर्ती क्र. 2 वर शस्‍त्रक्रिया केली आणि तिने ‘खुशी’ नामक मुलीला जन्‍म दिला. जन्‍मानंतर मुलगी रडली नाही. ती निस्‍तेज होती. मुलीला प्राणवायू व अन्‍य औषधे देण्‍यात आली. तिला लगेच डॉ. अमूल महाजन यांच्‍या बाल रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. नवजात अर्भकाच्‍या मानेच्‍या पाठीमागे ताजी जखम असल्‍याचे व त्‍यातून रक्‍त वाहत असल्‍याचे तक्रारकर्ता क्र. 1 चे लक्षात आले. डॉ. महाजन यांचे दवाखान्‍यात मुलगी 34 दिवस भरती होती. मुलीला मेंदूशी संबंधित समस्‍या (Neurogenic problems)  असल्‍याचे आणि मुलीच्‍या प्रसुतीमध्‍ये झालेल्‍या विलंबामुळे सदर समस्‍या उद्भवल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दि.03.09.2005 रोजी मुलीचा न्‍युरोसोनोग्राम (Neurosonogram) काढण्‍यात आला व मुलीला Extensive Subarachnoid hemorrhage with cerebral edema असल्‍याचे मत डॉक्‍टरांनी व्‍यक्‍त केले.
 
बालरोग तज्ञ डॉ. मंडलीक यांनी मुलीवर 5 महिनेपर्यंत उपचार केले. परंतु मुलीच्‍या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. नोव्‍हेंबर 2006 पासून गेटवेल रुग्‍णालयातील डॉक्‍टर प्रफुल शेंबाळकर मुलीवर उपचार करीत असून, अद्यापही उपचार सुरु आहेत. जन्‍मापासून मुलगी कोणताच प्रतिसाद देत नाही. ती हसत, रडत नाही अथवा कोणत्‍याच संवेदनेला प्रतिसाद देत नाही. मुलगी उभी राहू शकत नाही अथवा बसूही शकत नाही.
 
प्रसुतीला झालेला प्रचंड विलंब व दरम्‍यानचे काळातील घडामोडी हे मुलीच्‍या मेंदू/Nervous system यांना झालेल्‍या इजेचे प्रमुख कारण असल्‍याचे अनेक वैद्यकीय तज्ञांनी तक्रारकर्त्‍याला सांगितले. अशाप्रकारे मुलीच्‍या शारिरीक व मानसिक आजारासाठी केवळ विरुध्‍द पक्ष हेच जबाबदार असल्‍याचे नमूद करुन, तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्षांकडून रु.13,15,000/- नुकसान भरपाई मिळणेची मागणी केली आहे.
 
3.          मंचाने जारी केलेल्‍या नोटीसची बजावणी झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षांनी लेखी उत्‍तर व दस्‍तऐवज अभिलेखावर दाखल केले. प्रस्‍तुत तक्रार मुदतबाह्य असल्‍याचा आणि तक्रारीत आवश्‍यक पक्षकार जोडले नसल्‍याचा प्राथमिक आक्षेप विरुध्‍द पक्षांनी लेखी उत्‍तरात उपस्थित केला. तक्रारकर्त्‍यांना दिलेल्‍या वैद्यकीय सेवेत कोणतीही कमतरता असल्‍याचे, तसेच मुलीच्‍या आजारपणास जबाबदार असल्‍याचे विरुध्‍द पक्षांनी नाकारले. विरुध्‍द पक्षाचे कथनानुसार, दि.31.08.2005 रोजी तक्रारकर्ती क्र. 2 रुग्‍णालयात भरती झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने स्‍वतः तिचेकडे लक्ष दिले. तपासणीनंतर विरुध्‍द पक्षांनी दुपारी 1:30 वा. तक्रारकर्ती क्र. 2 ची शस्‍त्रक्रिया (Caesarean) करण्‍याचे ठरविले व त्‍यानुसार तक्रारकर्ता क्र. 1 ला कळविले. परंतू तक्रारकर्ता क्र. 1 Caesarean operation साठी तयार नव्‍हता, प्रसुती सामान्‍य (Normal) पध्‍दतीने व्‍हावी असा त्‍याचा आग्रह होता. त्‍याचेजवळ शस्‍त्रक्रियेसाठी पुरेसा पैसा नव्‍हता. Caesarean न केल्‍यास आई व बाळास धोका असल्‍याचे विरुध्‍द पक्षानी तक्रारकर्ता क्र. 1 ला सांगितले. सर्व डॉक्‍टरांनी मनधरणी केल्‍यामुळे तक्रारकर्ता क्र. 1 Caesarean operation साठी तयार झाला.
 
4.          विरुध्‍द पक्षाने लेखी उत्‍तरामध्‍ये पुढे नमूद केले की, त्‍यांनी भूलतज्ञ डॉ. आरती केतकर व बालरोग तज्ञ डॉ. मंडलीक व त्‍यांचे सहाय्यक डॉ. सोळंके यांना पूर्वीच दवाखान्‍यात बोलावून ठेवले होते व ते सर्व दवाखान्‍यात हजर होते. शस्‍त्रक्रियेपूर्वी, दुपारी 2-00 वाजता तक्रारकर्ता क्र. 2 ला आवश्‍यक औषधे देण्‍यात आली व तिला शस्‍त्रक्रियेसाठी तयार करण्‍यात आले. ही सर्व आवश्‍यक कारवाई पूर्ण करण्‍यात सुमारे 35 ते 40 मिनिटांचा अवधी लागला. तक्रारकर्ता क्र. 2 ला दुपारी 3-00 चे सुमारास शस्‍त्रक्रियेसाठी Operation Theatre मध्‍ये घेण्‍यात आले. नंतर डॉ. केतकर यांनी तिला Anesthesia दिला व दु.3-15 वा. शस्‍त्रक्रियेला सुरुवात करण्‍यात आली. दुपारी 3-25 वा. मुलीचा जन्‍म झाला. उपचारासाठी मुलीला अतिदक्षता विभागात ठेवणे गरजेचे असल्‍याचे डॉ. मंडलीक यांनी सांगितले. त्‍यानुसार मुलीला डॉ. अमूल महाजन यांच्‍या दवाखान्‍यात हलविण्‍यात आले. तक्रारकर्ता क्र. 1 डॉ. महाजन यांचे दवाखान्‍यातून रात्री परतल्‍यानंतर मुलीला मेंदूशी संबंधित आजार झाल्‍याचे विरुध्‍द पक्षांना समजले. मुलीला Cerebral palsy नामक आजार असून caesarean ऑपरेशन करण्‍यास विलंब झाल्‍याने सदरचा आजार होत नाही, असे कथन करुन विरुध्‍द पक्षाने तक्रार खारीज करणेची विनंती केली.
 
5.          विरुध्‍द पक्षांनी आपले कथनाचे पुष्‍टयर्थ डॉ. अमूल वसंतराव महाजन, डॉ. मिलींद आर. मंडलीक व डॉ. सौ. आरती अभय केतकर यांचे प्रतिज्ञापत्र अभिलेखावर दाखल केले.
 
6.          तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन मुलगी खुशीच्‍या प्रकृतीबद्दल जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांचेकडून तज्ञ अहवाल मागविण्‍यात आला. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, सामान्‍य रुग्‍णालय, नागपूर यांनी दिलेला ‘तज्ञ समितीचा अहवाल’ अभिलेखावर दाखल आहे.
 
7.          तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवादही ऐकण्‍यात आला. उभय पक्षांच्‍या वकिलांच्‍या साहाय्याने अभिलेखावरील दस्‍तऐवजांचे परिशिलन केले. प्रस्‍तुत प्रकरणी मंचाच्‍या निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले आहेत.
 
मुद्दे                                 निष्‍कर्ष
 
1) विरुध्‍द पक्षांचे सेवेतील कमतरता सिध्‍द होते काय ?      नाही.
2) आदेश ?                                      तक्रार खारिज करण्‍यात येते.
 
 
-कारणमिमांसा-
 
8.          विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्ता क्र. 2 चे caesarean operation करण्‍यास विलंब केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांची मुलगी ‘खुशी’ हिला मतिमंदत्‍व आल्‍याचा आरोप तक्रारकर्त्‍यांनी केला आहे. विरुध्‍द पक्षांनी सदरचा आरोप फेटाळला असून, तक्रारकर्ता क्र. 1 ने शस्‍त्रक्रियेसाठी संमती देण्‍यास उशिर केल्‍याचे लेखी उत्‍तरात कथन केले आहे. दि.31.08.2005 रोजी तक्रारकर्ता क्र. 2 प्रसूतीसाठी विरुध्‍द पक्षाचे दवाखान्‍यात भरती झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्ता क्र. 2 ची पाहणी व तपासणी करुन घेतलेल्‍या नोंदी विरुध्‍द पक्षांनी लेखी उत्‍तरासोबत अभिलेखावर दाखल केल्‍या आहेत. यापैकी दस्‍तऐवज क्र.3 (पृष्‍ठ क्र.138) वर खालीलप्रमाणे नोंदी आढळून येतात.
31/08/2005                  Mrs. Rekha Rajkamal Prasad admitted.
 12 Noon
 
 1:30 PM                     Husband informed need for Em (Emergency) crcs (caesarean),
                  not inclined.
 
 
2:05 PM                      Risk explained. Still not willing for crcs.
 
सदरच्‍या नोंदी खोट्या किंवा चुकीच्‍या असल्‍याबाबत तक्रारकर्त्‍यांनी कोणतेही प्रतिउत्‍तर दाखल केलेले नाही. तसेच विरुध्‍द पक्षांनी आपले कथनाचे पुष्‍ट्यर्थ डॉ. अमूल महाजन, डॉ. मिलींद मंडलीक व डॉ. सौ. आरती केतकर यांचे प्रतिज्ञापत्र अभिलेखावर दाखल केले आहे.
 
 
9.          मुलीच्‍या आजारपणाचे निश्चित कारण सांगता येत नसल्‍याचे आणि Cerebral palsy व मतिमंदत्‍व यांची 15 विविध कारणे असल्‍याचे डॉ. अमूल महाजन यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. डॉ. मिलिंद मंडलीक व डॉ. सौ. आरती केतकर यांच्‍या प्रतिज्ञापत्रातील खालील नमूद बाबी महत्‍वाच्‍या आहेत.
 
“I had attended Mrs. Rekha Rajkamal Prasad on 31.08.2005 and her baby on her caesarean operation performed at the hospital of Dr. Mrs. Pramila Badki. I was present in the hospital at about 2:00 PM itself to attend the call of operation. I personally saw the husband of the patient opposing Dr. Mrs. Badki for performance of said operation, I explained the situation to the husband of Mrs. Rekha Prasad but he was not willing to sign the consent form and allow the operation to be performed. When he was given ultimatum to shift his wife elsewhere, he unwillingly signed the consent form at 3:00 PM. The patient was constantly monitored by Dr. Badki during this time.”
 
तक्रारकर्त्‍यांनी सदर डॉक्‍टरांची उलट तपासणी घेतली नाही अथवा त्‍यांचे कथन विश्‍वसनीय नसल्‍याचे अन्‍य कोणत्‍याही पुराव्‍याद्वारे नमूद केलेले नाही.
 
10.         तक्रारकर्त्‍यांच्‍या विनंतीनुसार, प्रस्‍तुत प्रकरणी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा अहवाल, मागविण्‍यात आला. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, सामान्‍य रुग्‍णालय, नागपूर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तज्ञ समितीने दिलेला अहवाल मंचाच्‍या अभिलेखावर दाखल आहे. सदर अहवालात समितीने आपले मत खालीलप्रमाणे व्‍यक्‍त केले आहे.
 
 
 
 
OPINION
 
“The committee is of the opinion that the treating Gynecologist & Obstetrician took all care in treating to said patient and baby Khushi and such there seems to be no negligence on the part of treating Doctors.”
 
11.          उपरोक्‍त नमूद अहवाल मंचास प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍यांनी सदर अहवालावर कोणताही आक्षेप आजपावेतो घेतलेला नाही. सदरचा तज्ञ अहवाल तक्रारकर्त्‍यांच्‍या विनंतीवरुन बोलाविण्‍यात आला होता हे याठिकाणी नमूद करणे महत्‍वाचे आहे.
 
12.         प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये विरुध्‍द पक्षाचे सेवेतील कमतरता सिध्‍द होत नाही असे मंचाचे मत आहे. परिणामी, तक्रार खारीज करणे न्‍यायोचित ठरेल. करिता आदेश पुढीलप्रमाणे.
आदेश
1)                  तक्रारकर्त्‍यांची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2)                  उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
 
 
 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.