निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 11/08/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/08/2010 तक्रार निकाल दिनांकः- 02/08/2011 कालावधी 11 महिने 17 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. लक्ष्मीबाई नवनाथ उजेड. अर्जदार वय 25 वर्ष.धंदा.घरकाम. अड.सी.पी.कुलकर्णी.सुरपिंप्रीकर. रा.पत्ता.सुरेश मुंढे गंगाखेड,ता.गंगाखेड.जि.परभणी. विरुध्द डॉ.कविता @ शोभा प्रशांत काबरा. गैरअर्जदार. वय 35 वर्षे. धंदा.वैद्यकीय व्यवसाय. अड.जी.एच.दोडिया. रा.जोगेश्वर कॉलनी.कमल चित्र मंदिर रोड. गंगाखेड जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) वैद्यकीय उपचारादरम्यान झालेल्य निष्काळजीपणाबद्दल व मिळालेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही मजूर असून ती गर्भवती असल्यापासून गैरअर्जदाराकडून उपचार घेत होती.गैरअर्जदार ह्या सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी असून त्या खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुध्दा करतात.उपचारादरम्यान गैरअर्जदाराने अर्जदारास पोटातील बाळाची तब्येत उत्तम आहे व प्रसूती ही व्यवस्थित होईल असे सांगीतले दिनांक 17/01/2010 रोजी अर्जदार ही होणा-या प्रसूतीकळांमुळे गैरअर्जदाराकडे दवाखान्यात 12 वाजता दाखल झाली व 4 वाजून 45 मिनीटांनी तीने एका मृतबाळाला जन्म दिला.गैरअर्जदाराकडून सतत उपचार घेवून सुध्दा अर्जदारास खुपच प्रसुतीकळा आल्या व तीने बाळाला सुध्दा गमावले म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे तीच्या त्रुटीच्या सेवेबद्दल व निष्काळजीपणाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली,परंतु गैरअर्जदाराने ती मागणी फेटाळली म्ळणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व निष्काळजी सेवेबद्दल रु.1,00,000/- द.सा.द.शे.12 टक्के व्याजाने मिळावेत व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.20,000/- व खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत तिचे शपथपत्र,अर्जदाराने वकिला मार्फत दिलेल्या नोटीसीची प्रत, त्याचे उत्तर, औषधोपचारांची कागदपत्रे, सोनोग्राफीचा रिपोर्ट इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराच्या तक्रारीतील सर्व बाबी नाकारुन ही तक्रार खोटी व तथ्यहीन असल्यामुळे फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने गर्भवती असताना प्रत्येक महिन्यात तपासणीसाठी यावे असे सांगीतले होते,परंतु दिनांक 27/09/2009 रोजी अर्जदार ही गैरअर्जदाराकडे आली होती व गैरअर्जदाराने तीला तपासून डॉ.नागरगोजे यांच्याकडे सोनोग्राफीसाठी पाठवले,त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास प्रत्येक महिन्यात तपासणीसाठी यायला सांगीतले परंतु अर्जदार ही त्यानंतर दिनांक 24/01/2010 रोजीच गैरअर्जदाराकडे आली त्यावेळी तिला खुप प्रसुतीकळा येत होत्या गैरअर्जदाराने अर्जदाराच्या पतीला अर्जदाराच्या अवस्थेची माहिती दिली, परंतु तो नातेवाईकांच्या शोधात निघून गेला व दरम्यानच्या काळात गैरअर्जदाराने अर्जदाराची सर्वतोपरी काळजी घेतली कोणताही निष्काळजीपणा केला नाही.अर्जदाराना जर गैरअर्जदाराचा सेवेबद्दल शंका होती तर त्यानी जिल्हा शल्य अधिक्षकांकडे तक्रार करायला हवी होती. गैरअर्जदाराने प्रसुतीच्या वेळी पूर्ण काळजी घेतली होती.त्यावेळी डॉ.गोरक्ष नागरगोजे जे बालरोग तज्ञ आहेत त्यांना बोलावलेले हाते.तरीसुध्दा गैरअर्जदाराचे पती जे राजकारणी आहेत त्यांच्या विरुध्द बाजूंच्या लोकांच्या चिथावणीमुळे अर्जदाराने गैरअर्जदारास बदनाम करण्याच्या हेतुनेच खोटी तक्रार दाखल केलेली आहे. वरील सर्व बाजू लक्षात घेता सदरील तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत शपथपत्रे व मृत बाळाचे छायाचित्र दाखलकेले आहे. सदरील तक्रारीत मा.राज्य आयोग महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या परिपत्रकानुसार जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी यांच्याकडून वैद्यकीय तज्ञांचे मत मागविण्यात आले तो अहवालही सदरील तक्रारीत नि.25 वर दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकीलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदार ही गंगाखेड येथील रहीवासी आहे. अर्जदार ही गर्भवती होती व तीचे प्रसुती गैरअर्जदाराकडे झाली ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदार गर्भवती असताना तिची सोनोग्राफी दिनांक 27/09/2009 रोजी डॉ.नागरगोजे यांच्याकडे झाली होती हे नि.4/3 व नि.4/8 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते. अर्जदाराची प्रसुती दिनांक 17/01/2010 रोजी झाली व तिने एका मृत बालकास जन्म दिला त्यानंतर तिने गैरअर्जदाराकडे निष्काळजीपणाची सेवा दिल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली परंतु गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यामुळे अर्जदाराने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,परभणी येथे गैरअर्जदारांविरुध्द तक्रार दाखल केली.त्यानंतर दिनांक 16/08/2010 रोजी ग्राहक मंचातर्फे मा.राज्य आयोग महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक SC / Mah / Medical Opinion/DF/ 2010 / 370 दिनांक 04/02/2010 अन्वये मा.जिल्हा शल्यचिकीत्सक जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी यांच्याकडे तक्रारीत दाखल कागदपत्र वैद्कीय तज्ञाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्कीय अधिका-यांकडून एका त्रिसदस्यीय समितीचे दिनांक 07/01/2011 रोजी गठण करण्यात आले व त्यांच्याकडून अभिप्राय मागवण्यात आला. दिनांक 03/03/2011 रोजी सदरील त्रिसदस्य तज्ञ समितीने या तक्रारीतील पूर्ण कागदपत्र, केसपेपर्स, रिपोटर्स, फोटोग्राफ्स यांची सखोल तपासणी व शहानिशा करुन तज्ञांचा अहवाल सादर केला.(नि.25) तज्ञ समितीच्या मते व डॉ.गोरख. डी. नागरगोजे बालरोग तज्ञ, गंगाखेड यांच्या प्रत्यक्ष घटनादर्शी अहवालानुसार सदरील बाळांला (Hydrops Foetalis ) नावाचा आजार झालेला दिसून आले.ह्या गंभीर व्यंग आजाराने जन्मलेल्या बाळाचे वाचण्याचे प्रमाण फार कमी असते सदर बाळ वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसून आले व या घटने मध्ये डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत नाही असे तज्ञ समितीचे स्पष्ट मत आहे. तज्ञ समितीच्या अहवालानुसार गैरअर्जदाराने कोणताही निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत नाही,म्हणून सदरील तक्रारीत गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिली असे म्हणता येणार नाही. सदरील तक्रारीत खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 अर्जदार व गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च आपापला सोसावा. 5 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |