Maharashtra

Ahmednagar

CC/13/426

Govind Ashok Pardeshi,C/o-Ashok Laxman Pardeshi - Complainant(s)

Versus

Dr.Arun Tarachand Bhise - Opp.Party(s)

Hendre-Joshi

28 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/13/426
( Date of Filing : 23 Dec 2013 )
 
1. Govind Ashok Pardeshi,C/o-Ashok Laxman Pardeshi
Kisan Nagar No.2,Road No.16,Sainathwadi,Behind Shyamsundar Niwas,Wagale Estate,Thane
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr.Arun Tarachand Bhise
Sitai Hospital,Late Dr.Mohanrao Kakade Complex,Lad Jalgaon Fata,Bodhegaon,Tal Shevgaon,
Ahmednagar
Maharashtra
2. Sitai Hospital,C/o-Director Dr.Deepali Arun Bhise
Sitai Hospital,Late Dr.Mohanrao Kakade Complex,Lad Jalgaon Fata,Bodhegaon,Tal Shevgaon,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Hendre-Joshi, Advocate
For the Opp. Party: Mundada S. B., Advocate
Dated : 28 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ता हे मुळचे बालमटाकळी ता.शेवगांव जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत.  अधिकारपत्र धारक श्री.अशोक लक्ष्‍मण परदेशी हे व्‍यवसायानिमित्‍त व तक्रारदाराच्‍या शिक्षणाकरीता ठाणे येथे राहत आहेत. सामनेवाला क्र.1 हे आयुर्वेद शाखेचे डॉक्‍टर असून ते बोधेगाव ता.शेवगांव येथे स्‍वानंद क्लिनिक या नावाने वैद्यकिय व्‍यवसाय करतात. सामनेवाले नं.1 हे व त्‍यांची पत्‍नी डॉ.दिपाली अरुण भिसे हे सामनेवाले नं.2 सिताई हॉस्पिटलचे संचालक आहे. ते दोघेही हॉस्पिटलचा संपुर्ण कारभार पाहतात. तक्रारकर्ता हे कुटूंबासह दिनांक 18.02.2013 रोजी घरातील धार्मिक कार्यक्रमानिमित्‍त श्रीरामपूर जि.अहमदनगर येथे नातेवाईकांकडे गेले होते. तेथील कार्यक्रम पार पाडून तक्रारकर्ता व घरातील इतर मंडळी दिनांक 20.02.2013 रोजी मौजे बालमटाकळी या त्‍यांच्‍या मुळ गांवी गेले. त्‍यानंतर दोन–तीन दिवस प्रवास झाल्‍यामुळे तक्रारकर्तास अंग दुखल्‍यासारखे व प्रवासाचा थकवा आल्‍यासारखे वाटत होते. म्‍हणून त्‍यांचे वडीलांनी तक्रारकर्तास दिनांक 21.02.2013 रोजी रात्री 9.00 ते 10.00 वाजेचे दरम्‍यान सामनेवाले नं.1 यांचे स्‍वानंद क्लिनिकमध्‍ये तपासणीसाठी गेले. सामनेवाले नं.1 ने तपासणी केल्‍यानंतर तक्रारकर्तास काही गोळया दिल्‍या व डाव्‍या पायाच्‍या कमरेला स्‍वतःचे दवाखान्यातील इंजेक्‍शन (डायक्‍लोफायनाक) दिले व तक्रारकर्तास लगेच बरे वाटेल असे सांगितले. तक्रारकर्ता हे परत त्‍यांचे घरी आले. दुस-या दिवशी दिनांक 22.02.2013 रोजी तक्रारकर्तास जास्‍त त्रास होऊ लागला. तक्रारकर्ताचे अंगावर व चेह-यावर लाल चट्टे पडले, त्‍यास ताप आला व पोट दुखू लागले व उलटया होऊ लागल्‍या. श्‍वास घेण्‍यास त्रास होऊ लागल्‍याने तक्रारकर्ता अत्‍यावस्‍थ झाला. त्‍यामुळे तक्ररीकर्ताचे वडीलांनी त्‍यास ताबडतोब सामनेवाला नं.1 यांचे स्‍वानंद क्लिनिकमध्‍ये नेले. त्‍यादिवशी देखील सामनेवाले नं.1 यांनी तक्रारकर्ताच्‍या डाव्‍या पायाच्‍या कमरेला इंजेक्‍शन दिले, तसेच सलाईन दिले, गोळया दिल्‍या व काळजी करण्‍याचे कारण नाही, तुम्‍हास लवकरच बरे वाटेल असे सांगितले. तक्रारकर्ता व त्‍यांचे वडील सामनेवालावर विश्‍वास ठेवला. परंतू तक्रारकर्ताची तब्‍येतीत काहीही सुधार झाला नाही. तक्रारकर्ताचे डाव्‍या पायास प्रचंड वेदना होऊ लागल्‍या. सामनेवाले नं.1 यांनी दिलेल्‍या इंजेक्‍शनच्‍या ठिकाणी सुज आली होती. त्‍यामुळे तक्रारकर्तास चालणे, हालचाल करणे अशक्‍य झाले. ताप कमी झाला नाही. पोटदुखी, उलटया थांबल्‍या नाहीत. तक्रारकर्ता हा पुर्ण अस्‍वथ होता व त्‍यास श्‍वास घेण्‍यास त्रास होत होता. म्‍हणून तक्रारकर्ता यांचे वडीलांनी तक्रारकर्ता यास सामनेवाला नं.2 चे हॉस्पिटलमध्‍ये सामनेवाले नं.1 यांचे सांगणेवरुन नेले. त्‍यानुसार दिनांक 23.02.2013 रोजी पहाटेच तक्रारकर्ता यांना सामनेवाले नं.2 हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. तेव्‍हा सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदाराची प्राथमिक तपासणी केली, त्‍यावेळी सामनेवाले नं.1 यांनी तक्रारकर्तास कंबरेला इंजेक्‍शन दिलेल्‍या ठिकाणी मोठे बेंड झाले होते. सामनेवाला नं.1 यांनी चुकीचे इंजेक्‍शन दिले, ते चुकीच्‍या पध्‍दतीने दिले. त्‍यामुळे जंतू संसर्ग होऊन सामनेवाला नं.1 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारकर्ताचे पायास मोठे बेंड आले व त्‍याच्‍या जिवावर बेतले. सामनेवाले नं.1 यांच्‍या सांगण्‍यावरुन तक्रारकर्तास सामनेवाला नं.2 यांचे हॉस्पिटलमध्‍ये दाखल केल्‍यानंतर सामनेवाले नं.1 यांनी तक्रारकर्ताला गोळया देण्‍यात आल्‍या. पुन्‍हा डाव्‍या पायाच्‍या कमरेला इंजेक्‍शन दिले. परंतु, तक्रारकर्ताचे तब्‍येतीमध्‍ये फरक पडला नाही. अंगावरील रॅश कमी झाले नाहीत, ताप गेला नाही. या विषयी सामनेवाला नं.1 यांचेकडे तक्रार केली असता, तुम्‍ही काहीही काळजी करु नका, तक्रारकर्तास लवकरच बरे वाटेल असा दिलासा सामनेवाला नं.1 यांनी तक्रारकर्ता व त्‍यांचे वडीलांस दिला. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारकर्ताचे वडीलांस दिनांक 25.02.2013 रोजी सांगितले की, “ माझ्याकडून इंजेक्‍शन देताना फार मोठी चुक झाली आहे, त्‍याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण आता मी पुढील उपचार करु शकत नाही. त्‍यासाठी तुम्‍ही मोठया हॉस्पिटलमध्‍ये अॅडमिट व्‍हा.”  असे सांगितले. सामनेवाले नं.1 यांच्‍या अशा उदगारामुळे तक्रारकर्तास व त्‍यांचे कुटूंबियांस मोठा मानसिक धक्‍का बसला व ते प्रचंड घाबरले. तक्रारकर्ताचे वडीलांनी नातेवाईक व मित्रांकडे चांगल्या डॉक्‍टराबाबत चौकशी केली व पैशांची जमवाजमव केली व तक्रारकर्तास मुलूंड, मुंबई येथील हिरामुंगी नवनीत हॉस्पिटल येथे अॅडमिट केले. सामनेवाला नं.1 यांनी तक्रारकर्तास डिस्‍चार्ज कार्ड दिले नाही व काही औषधे लिहून दिली. तेथील डॉक्‍टरांनी तक्रारकर्ताच्‍या सर्व तपासण्‍या केल्‍या. त्‍यांनी तक्रारकर्तास सांगितले की, तुमच्‍या डाव्‍या पायाच्‍या कमरेला इंजेक्‍शन दिलेल्‍या ठिकाणी जंतू संसर्ग होऊन मोठे बेंड आले आहे. ते चिघळले आहे. त्‍या ठिकाणी पुर्वीच्‍या डॉक्‍टरांनी चुकीच्‍या पध्‍दतीने दिलेल्या इंजेक्‍शनमुळे व चुकीच्‍या औषधामुळे सेप्‍टीक झाले आहे. तुम्‍हाला ऑपरेशन करुन घ्‍यावे लागेल. डाव्‍या पायाला बेंड आलेल्‍या ठिकाणापासून ते खालपर्यंत ऑपरेशन करावे लागणार आहे. नाईलाजास्‍तव तक्रारकर्ताचे पायावर डॉक्‍टरांनी सांगितल्‍याप्रमाणे मोठी शस्‍त्रक्रिया करावी लागली. त्‍यासाठी तक्रारकर्तास दिनांक 27.02.2013 ते 04.04.2013 पावेतो हिरामुंगी नवनीत हॉस्पिटल, वालजी लढ्ढा रोड, मुलूंड (पश्चिम), मुबई  येथे अॅडमिट होऊन शस्‍त्रक्रिया व औषधोपचार घ्‍यावा लागले. त्‍यासाठी तक्रारकर्तास रक्‍कम रुपये 3,00,000/- इतका खर्च करावा लागला. तक्रारकर्ताने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाला नं.1 हे बीए.एम.एस. आहेत. तर सामनेवाले नं.2 चे संचालक हे बीएच.एम.एस आहेत. दोघेही सामनेवाले नं.2 हॉस्पिटलचे संचालक आहेत. मात्र, सामनेवाले नं.2 हॉस्पिटलमध्‍ये तक्रारकर्तावर कुठल्‍याही प्रकारे आयुर्वेदिक अथवा होमिओपॅथिक उपचार करण्‍यात आले नाहीत. तेथे कुठल्‍याही प्रकारे आयुर्वेदिक उपचारांची सोय देखील नाही. सामनेवाले नं.2  हॉस्पिटलमध्‍ये तक्रारकर्ताने पुर्णपणे अॅलोपॅथिक उपचार करण्‍यात आले. हॉस्पिटल टाकतांना अधिका-याची पुर्व परवानगी घेतलेली नाही. तसेच पदवी आयुर्वेद शास्‍त्रात असताना अॅलोपॅथीची ट्रिटमेंट कोणतीही परवागनी घेतलेली नाही. तसेच पदवी आयुर्वेद शास्‍त्रात असतांना अॅलोपॅथीची ट्रिटमेंट कोणतीही परवानगी नसतांना कायद्याचे उल्‍लंघन करुन दिली आहे. सामनेवाले नं.1 व 2 च्‍या अशा हलगर्जीपणामुळे व कृत्‍यामुळे तक्रारदारास ऐन तारुण्‍य अवस्‍थेत मानसिक त्रास भोगावा लागला. सामनेवाले नं.1 या संचालकांनी तक्रारकर्तावर पुर्णपणे चुकीचे औषधोपचार अनाधिकृतपणे केले आहेत. त्‍यामुळे तक्रारकर्ताला आर्थिक, मानसिक, शारीरीक नुकसान झालेला आहे. म्‍हणून तक्रारकर्ताने सामनेवाला नं.1 व 2 यांना दिनांक 03.07.2013 रोजी अॅड. सचिन जावळे अहमदनगर यांचेमार्फत नुकसान भरपाई करीता नोटीस पाठविली. सदर नोटीस सामनेवाला यांना 04.07.2013 रोजी मिळून देखील सामनेवाले यांनी तक्रारकर्तास नुकसान भरपाईची रक्‍कम दिली नाही. व नोटीस उत्‍तर दिले नाही. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी योग्‍य औषधोपचार केले नाही. व चुकीच्‍या पध्‍दतीने इंजेक्‍शन व औषधोपचार केले. म्‍हणून तक्रारकर्तास भेंड झाले व त्‍यासाठी शस्‍त्रक्रिया करणे भाग पडले. सबब सदर तक्रार तक्रारकर्ताने मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्तास झालेल्‍या औषधोपचार व शस्‍त्रक्रियेचा संपुर्ण खर्च तक्रारकर्तास देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच तक्रारकर्तास झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी व दोन वर्षे सलग त्‍यांचे डावे पायावर उपचार घ्‍यावे लागणार आहेत त्‍याचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच तक्रारकर्ताचे झालेली नुकसान भरपाई व या तक्रारीचा खर्च तसेच मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.

4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सदरहू नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर सामनेवाला प्रकरणात हजर झाले. व निशाणी क्र.15 वर कैफियत दाखल केली. सामनेवाला यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये असे कथन केलेले आहे आहे की, तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला नं.1 व 2 यांचे विरुध्‍द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवाला नं.1 व 2 यांना नाकबूल आहेत. सामनेवाला नं.1 व 2 यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ते हे दिनांक 21.02.2013 रोजी किरकोळ अंग दुखीसाठी सामनेवालाकडे आलेले होते. व त्‍यावेळी सामनेवाला यांनी त्‍यांची तपासणी करुन वेदनाशामक इंजेक्‍शन डॉयक्‍लोफनॅक 1.5 सीसी डाव्‍याबाजुच्‍या कंबरेत दिला. त्‍यासोबत वेदनाशामक गोळया दिल्‍या. त्‍यानंतर दुस-या दिवशी दिनांक 22.02.2013 रोजी रात्री 9.00 वाजता सदर रुग्‍ण स्‍वतः चालत पुन्‍हा सामनेवाले यांच्‍याकडे आले. त्‍यावेळी त्‍याला अंगाला खाज येणे व दम लागण्‍यास सुरुवात झाली. सामनेवाले याने त्‍यास विचारले असता त्‍याने घरी धार्मिक कार्यक्रम असल्‍यामुळे मांस भक्षन केल्‍याचे सांगितले. सदर त्रास हा मांसाहार केल्‍यामुळे झाल्‍याची खात्री झाली. त्‍यावेळी रुग्‍णाचा बीपी तपासला Avil  हे इंजेक्‍शन उजव्‍याबाजूच्‍या कंबरेला दिले व Dexa आणि Deriplylin हे इंजेक्‍शन उजव्‍या हाताच्‍या शिरेमध्‍ये सावकाश दिले. सदरच्‍या दिवशी रुग्‍णास कोणत्‍याही प्रकारचे सलाईन दिलेले नाही. थोडया वेळानंतर रुग्णास बरे वाटल्‍याने रुग्‍णाने घरी जाण्‍याची परवानगी मागितली. तेव्‍हा देखील बीपी व नाडी योग्‍य असल्‍याने त्‍याला जंतनाशक तसेच दम व अॅलर्जी यावरील गोळया देवून रुग्णास घरी पाठविले. त्‍यानंतर दिनांक 23.02.2013 रोजी पहाटे 5.00 वाजण्‍याच्‍या सुमारास पोट दुखी व उलटयाचा त्रासासाठी रुग्‍ण पुन्‍हा सामनेवाले यांच्‍याकडे आला असता त्‍याची तपासणी केली व त्‍याला मांसाहारातुन बाधा झाल्‍यामुळे अजीर्ण होऊन पोट दुखी व उलटयाचा त्रास सुरु झाला होता. त्‍यामुळे रुगणास कंबरेला कोणतेही इंजेक्‍शन न देता सलाईन व्‍दारे प्रतीजैवके दिली. त्‍यावेळी रुग्‍णाला डाव्‍या पायात किंवा कंबरेमध्‍ये कोणताही त्रास नव्‍हता. औषध उपचारानंतर रुग्‍णाला बरे वाटल्‍यामुळे त्‍याला  दुस-या दिवशी तपासणीसाठी येण्‍याचे सांगून 10.00 वाजण्‍याचे दरम्‍यान घरी सोडले. दिनांक 24.02.2013 रोजी सकाळी रुग्‍ण पुन्‍हा तपासणीसाठी आला असता त्‍याच्‍या डाव्‍यापायाच्‍या पोटरीला सुज आली होती व वेदना होत असल्‍यामुळे चालण्‍यास त्रास होत होता. अंगात ताप होता त्‍याच्‍या डाव्‍यापायाची संपुर्ण तापसणी केली असता कंबरेत कोणतीही सुज, वेदना किंवा बेंड आढळून आले नाही. त्‍यामुळे रक्‍त वाहीनीमध्‍ये रक्‍ताची गुठळी झाली असल्‍याची शक्‍यता लक्षात आली. त्‍यामुळे तत्‍काळ प्रतिजैविकेचा व रक्‍त गुठळीवरील उपचार केले. नंतर रुग्‍ण स्‍वतः हुन घरी गेला. त्‍याच दिवशी रुग्‍णाच्‍या नातेवाईकांनी रुग्‍णाच्‍या डाव्‍यापायाच्‍या पोटरीवरील सुज गुडघ्‍याच्‍या वर आली असल्‍याने तपासणीसाठी बोलावले म्‍हणून सामनेवाले यांनी रुग्‍णाच्‍या घरी जाऊन पुन्‍हा नातेवाईकांच्‍या समोर रुग्‍णाच्‍या डाव्‍या पायाची संपुर्ण तपासणी केली. कंबरेमध्‍ये कोणतीही सुज वेदना किंवा बेंड आढळले नाही. परंतू गुडग्‍याच्‍या वर सुज असल्‍याने सदर प्रकार हा डीव्‍हीटी चा असू शकतो व त्यासाठी कलर डॉपलरची तपासणी करणे गरजेचे असल्‍याने रुग्‍णाला ही सुविधा उपलब्‍ध असलेल्या हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्‍याचे सुचविले. अशा प्रकारे सामनेवालाने तक्रारकर्तास कोणताही निष्‍काळजीपणा केलेला नाही. व योग्‍य पध्‍दतीने औषधोपचार केलेले आहेत. सामनेवाला नं.1 हे स्‍वतः बीए.एमएस आहेत. त्‍यांना अशा प्रकारचा औषधोपचार करण्‍याची परवानगी आहे. सामनेवाला नं.2 यांनी कोणतीही औषधोपचार केलेले नाही. रुग्‍णाच्‍या नातेवाईकांनी रुग्‍णाला मुंबई येथे अॅडमीट करुन पुढील उपचार घेतले. त्‍यानंतर रुग्‍णाच्‍या भावाने सामनेवाला यांना रक्‍कम रु.1,70,000/- ची मागणी करुन धमकी दिली, रक्‍कम नाही दिली तर सामनेवाला यांना खोटया केसमध्‍ये अडकवून पेपरला बातमी देवून बदनामी करु अशी धमकी दिली. सामनेवाला यांचेकडून गैर मार्गाने पैसे उकळण्‍यासाठी तक्रारकर्ताने सदरची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. म्‍हणून सदर तक्रारीत तक्रारकर्ता यांना कॉम्‍पेसेटरी कॉस्‍ट लावून खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती करण्‍यात आली आहे.

  5.   तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज, सामनेवालाचा दाखल जबाब व उभय पक्षकारांनी दाखल केलेले मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍याय निवाडे, सामनेवाला यांनी दाखल केलेले दस्‍तावेजावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारकर्ता हा सामनेवाला क्र.1 व 2 यांचा “ग्राहक” आहे काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब किंवा सेवेत त्रुटी दर्शविलेली आहे काय.?

 

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ता हा सामनेवालाकडून दिनांक 21.02.2013, 23.02.2013, 24.02.2013 ला उपचार घेतले. तसेच तक्रारकर्ताने दाखल निशाणी क्र.7 वरील दस्‍त क्र.3/2 ची पडताळणी करताना असे दिसून आले की, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारकर्ताला सामनेवाला क्र.2 यांचे हॉस्पिटलमधून तक्रारकर्ताला औषधे देऊन औषधोपचार पावती (prescription) देण्‍यात आली आहे. म्‍हणून तक्रारकर्ता हे सामनेवाला क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत असे सिध्‍द होते. म्‍हणून सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 – सामनेवाला क्र.1 ची शैक्षणिक पात्रता बीए.एमएस आहे. तसेच सामनेवाला क्र.2 याची शैक्षणिक पात्रता बी.एच.एम.एस. अशी आहे यात काही वाद नाही. तसेच सामनेवाला क्र.1 व 2 हे सिताई हॉस्पिटल चालवतात. सामनेवाला क्र.1 व 2 चे परचीमध्‍ये आर्थोपेडीक औषधे लिहून औषधोपचाराची पावती दिलेली आहे. तसेच दिनांक 21.02.2013 रोजी तक्रारकर्ताचे उपचाराकरीता तक्रारकर्ताला डॉयक्‍लोनॅक 1.0 सीसी इजेक्‍शन डाव्‍याबाजूचे कंबरलेला दिले आहे. तसेच Avil हे इंजेक्‍शन तक्रारकर्ताचे उजव्‍याबाजूच्‍या कंबरेला देण्‍यात आले ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी Harishbhai Shamjibhai & 2 Ors. V. D.C.Gohil यात दिलेल्‍या न्‍याय निवारण आणि मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी Bhanwar Kanwar v.R.K.Gupta & Another यात दिलेल्‍या न्‍याय निर्णयानुसार  Wherein unauthorized medical treatment was administered, it amounts to unfair trade practice and administering allopathic medicine by a person who is qualified in Ayurvedic medicine, cannot be approved of the Hon’ble Ap[ex Court on the facts of this case (supra), enhanced the compensation amount from Rs.5 lacs to Rs. 15 lacs. Another judgment of this Commission, in the case Dr. R.R.Singh v. Pratibha P. Gamre, Revision Petition No.887 of 2012, decided on 14.05.2012, by the Bench of Justice J.M. Malik and Mr.Suresh Chandra, held that the Ayurveda doctor negligent for prescribing allopathic medicines and awarded Rs.7 lakh, as compensation.

11. Therefore, the person who is authorized to practice under Indian Medicine Central Council Act, 1970 is not at all entitled and authorized to prescribe medicines under the Indian Medical Council Act, 1956. We are of considered view that the OP having studied one particular system of medicine, cannot possibly, claim complete knowledge about the druge of the other system of medicine. The transgression into other branches of medicine would tantamount to quackery. “

11. Thus, there is no need of any expert report. The facts of this case speak for themselves. The principle of res ipsa loquitur will apply for the following reasons. Firstly, the OP-1 had no authority to prescribe the allopathic medicine. He is at liberty, to give his own ayurvedic medicine, as per the Book. He has no authority to trespass into allopathy. Whenever an Allopathic medicine is to be given, it must be Allopathic Doctor.  

     सदर प्रकरणात सामनेवालाने कैफियतीमध्‍ये असे सांगितले आहे की. त्‍यांना अॅलोपॅथीक पध्‍दतीची परवानगी होती. परंतू सदर प्रकरणात सामनेवाला हे परवानगी शासनाकडून घेतलेला परवाना प्रकरणात दाखल करण्‍यात आलेला नाही. व महाराष्‍ट्र शासन यांनी दिनांक 25.09.1992 यात काढलेल्‍या परीपत्रकाची पडताळणी करतांना असे दिसून आले की, आर्युवेदीक डॉक्‍टरांना अॅलोपेथीकची प्रॅक्‍टीस करणेची परवानगी आहे. परंतू त्‍यांनी त्‍या संदर्भात जेव्‍हा प्रशिक्षण घेतलेले असेल. तोपर्यंत त्‍याला अॅलोपेथीक मध्‍ये प्रॅक्‍टीस करण्‍याची परवानगी आहे. सदर प्रकरणात सामनेवालाने अॅलोपॅथीक प्रॅक्‍टीस करण्‍याचे प्रशिक्षण घेतलेले होते या संदर्भात कोणताही पुरावा सादर केलेला नाही. सामनेवालाने प्रकणात स्‍वतः मान्‍य केलेले आहे की, तक्रारकर्ताला अॅलोपेथीक इंजेक्‍शन तसेच औषधे देण्‍यात आली. जेव्‍हा की, सामनेवालाने त्‍या संदर्भात कोणती‍ही चिकीत्‍सा पध्‍दत वापर करण्‍याची परवानगी नव्‍हती. तक्रारकर्ताने निशाणी 7 वर दाखल केलेल्‍या दस्‍ताची पडताळणी करताना असे दिसून आले की, Deep seated abscessc Neorotising fasciitis Lt side fasciatises Post Jniectianal Abscess Co Fasie Ctomy on 01.03.2013 असे दिसून आले. याअर्थी तक्रारकर्ता यांना सामनेवालाने दिलेल्‍या इंजेक्‍शनमुळे तक्रारकर्ताला त्रास झाला व त्‍याचे प्रमाण वाढत गेले त्‍यामुळे तक्रारकर्ताला त्‍यांचे उपचाराकरीता शस्‍त्रक्रिया करावी लागली. सामनेवालाने तक्रारकर्ताला लावण्‍यात आलेले इंजेक्‍शन हे योग्‍य पध्‍दतीने लावलेले नसल्‍याने सदर त्रास तक्रारकर्ताला भोगावा लागला. सामनेवाला यांनी अॅलोपॅथीची कोणतीही औषधोपचार करण्‍यास कोणतीही परवानगी नसतांना त्‍यांनी तक्रारकर्ताची अॅलोपॅथीक पध्‍दतीव्दारे उपचार करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ताला त्रास सहन करावा लागला असे तक्रारकर्ताचे दस्‍तावेज व सामनेवालाचे जबाबावरुन सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

सामनेवाला यांनी वरील नमुद न्‍याय निवाडयाचा आधार घेताना असे निदर्शनास आले की, सामनेवालाने तक्रारकर्ताला शैक्षणिक पात्रता नसतांनासुध्‍दा व कोणतेही योग्‍य प्रशिक्षण घेतले नसतांना उपचार घेतले. तक्रारकर्तावर अॅलोपेथीक व्‍दारे उपचार केले ही बाब सामनेवालाची तक्रारकर्ताप्रति व सेवेत त्रुटी दर्शविते व सिध्‍द होते.

8.   मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन तसेच निशाणी 19 हिरामोंगी नवनीत हॉस्पिटल मध्‍ये घेतलेल्‍या उपचार व त्‍या उपचारावर आलेल्‍या औषधोपचाराचा खर्चावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्ताला आलेल्‍या औषधोपचाराचा खर्च रक्‍कम रुपये 3,00,000/- (रक्‍कम रु.तीन लाख  फक्‍त) तक्रारकर्ताला द्यावेत.

3.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्ताला झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- (रक्‍कम रु.पन्‍नास हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च 10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त ) तक्रारकर्ताला द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.