Maharashtra

Bhandara

CC/17/79

Arun Asaram Waghmare - Complainant(s)

Versus

Dr. Yogesh R. Jibhakate - Opp.Party(s)

Adv. Krushnakumar C. Bawankar

15 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/17/79
( Date of Filing : 19 Aug 2017 )
 
1. Arun Asaram Waghmare
labour R/o Sonuli Tah.Bhandara
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr. Yogesh R. Jibhakate
Medical Practitioner. C.o Indrakshi Eye Care Rajiv Gandhi Chowk. Takiya Ward.
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Feb 2021
Final Order / Judgement

                   (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार )

                                                                             (पारीत दिनांक–  15 फेब्रुवारी, 2021)

   

01.  तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरां विरुध्‍द त्‍याचे डाव्‍या डोळयाचे मोतीबिंदु शस्‍त्रक्रियेचे वेळी वैद्दकीय निष्‍काळजीपणामुळे डाव्‍या डोळयाचे झालेल्‍या नुकसानी  बाबत दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

        तक्रारकर्त्‍यास त्‍याचे डाव्‍या डोळयाचे दृष्‍टी बाबत त्रास होता त्‍यामुळे त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टर जे नेत्रशल्‍य चिकीत्‍सक आहेत यांचे दवाखान्‍यात दिनांक-25.07.2016 रोजी भेट दिली होती,  त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याचा रक्‍तदाब आणि रक्‍तातील साखरेची तपासणी केली आणि त्‍याला डोळयाचे शस्‍त्रक्रियेचा सल्‍ला दिला होता. त्‍यानुसार तक्रारकर्ता हा दिनांक-04.08.2016 रोजी डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये करीता विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात भरती झाला होता, विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याच दिवशी त्‍याचे डाव्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया केली होती आणि त्‍याच दिवशी त्‍याला दवाखान्‍यातून डिसचॉर्ज दिला होता. डिसचॉर्ज देते वेळी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याला काही औषधी लिहून दिली व डोळयाचे चष्‍म्‍यासाठी क्रमांक लिहून दिला आणि सात दिवसा नंतर तपासणीसाठी येण्‍यास सांगितले होते.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-12.08.2016 रोजी त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात भेट दिली असता तेथे विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांच्‍या पत्‍नी डॉ.विशाखा वाय.जिभकाटे ज्‍या सुध्‍दा डॉक्‍टर आहेत त्‍यांनी तपासणी केली व त्‍यांचे डॉक्‍टर पतीं कडून तपासणी करुन घेण्‍यास सांगितले होते. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याला असे सांगितले की, डोळयाला सुज आहे व मशीनव्‍दारे डोळयास दाबले होते. त्‍यानंतर तो त्‍याचे घरी आला, त्‍या दिवशी
डोळयामध्‍ये वेदना होत असल्‍याने तो रात्रभर घरी झोपू शकला नाही त्‍यामुळे त्‍याने दुसरे दिवशी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यास भेट दिली. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी डोळयाची तपासणी करुन सांगितले की, डोळयाचे टाके बरोबर लागलेले नाही त्‍यामुळे त्‍यांनी दुस-यांदा टाके लावले परंतु डोळा दुरुस्‍त झाला नाही. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याला दत्‍तवाडी रोड, नागपूर ये‍थील डॉ.अजय कुळकर्णी यांचेकडे तपासणी करण्‍यास दिनांक-14.09.2016 रोजी रेफर केले. डॉ.अजय कुळकर्णी यांनी तक्रारकर्त्‍याचे डोळयाची तपासणी केली असता त्‍याला लेन्‍स बसविण्‍याचा सल्‍ला दिला, जो डाव्‍या डोळयाचे शस्‍त्रक्रियेचे वेळी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी बदलवविला होता. त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरां कडून डोळयातील लेन्‍स बदलवून घेतला परंतु डोळयाने दिसू शकले नाही. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याला डॉ.लांबट नागपूर यांचेकडे रेफर केले असता डॉ.लांबट यांनी डोळयाची शस्‍त्रक्रिया करावी लागेल आणि त्‍यासाठी रुपये-1,00,000/- खर्च येईल असेही सांगितले परंतु शस्‍त्रक्रिया यशस्‍वी होईल या बाबतची खात्री ते देऊ शकले नाही, त्‍यामुळे तो खूप घाबरला होता. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने भंडारा येथील डोळयांचे डॉक्‍टर श्री अग्रवाल यांचे दवाखान्‍यात तपासणी केली असता त्‍यांनी औषधी लिहून दिली आणि त्‍याचा डोळा पूर्णतः खराब झाल्‍याचे सांगितले.

      तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याचे डोळयाची शस्‍त्रक्रिया करते वेळी डोळयास नेमका कोणता आजार झालेला आहे या बाबत माहिती दिली नव्‍हती केवळ शस्‍त्रक्रियेची गरज असल्‍याचे सांगितले होते. शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी झाल्‍या नंतर त्‍याचा डोळा मशीने दाबला आणि त्‍यानंतर पुन्‍हा डोळा मशीनने दाबल्‍यामुळे डोळा पूर्णपणे निकामी झाला. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी निष्‍काळजीपणाने त्‍याचे डोळयावर शस्‍त्रक्रिया केल्‍यामुळे त्‍याचा डोळा आता दुरुस्‍त होण्‍या पलीकडील  आहे. त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात भेटी दिल्‍या असता प्रत्‍येक वेळी त्‍याचे कडून फी चे शुल्‍क आकारण्‍यात आले. त्‍याला वैद्दकीय उपचारार्थ दिनांक-04.08.2016 ते दिनांक-06.06.2017 या कालावधीत जवळपास एकूण रुपये-2,00,000/- खर्च आलेला आहे. तसेच विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी दुस-या डॉक्‍टरांकडे रेफर केल्‍यामुळे त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात जुन्‍या मशीन आहेत, तसेच शस्‍त्रक्रियेचे साहित्‍य व्‍यवस्थितरित्‍या धुतल्‍या जात नाही, अत्‍यंत हलक्‍या दर्जाचे साहित्‍य उपयोगात आणले जाते. शस्‍त्रक्रिया ही हळुवारपणे करीत नाहीत,  पुरेश्‍या मात्रेत  गुंगीचे औषध (Anesthesia) देत नाही ज्‍यामुळे शस्‍त्रक्रियेचे वेळी पूर्ण गुंगी येत नसल्‍याने शस्‍त्रक्रियेचे वेळी वेदना होतात. एकाच दिवशी भरपूर रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया होत असल्‍याने त्‍या घाईघाईने उरकविल्‍या जातात. संबधित रुग्‍णा कडून शस्‍त्रक्रिये पूर्वी रुग्‍णाची स्‍वतःची जबाबदारी राहिल असे लिहून घेतल्‍याने व रुग्‍णाची सहमती असल्‍याने  विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांकडून बेजबाबदारपणे शस्‍त्रक्रिया केल्‍या जातात. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे वैद्दकीय निष्‍काळजीपणाने केलेल्‍या शस्‍त्रक्रियेमुळे त्‍याचे डोळयाची पूर्णपणे दृष्‍टी गेलेली आहे, त्‍यामुळे त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांना दिनांक-16.06.2017 रोजी नोटीस पाठवून त्‍याव्‍दारे त्‍याचे डोळयाची कुठल्‍याही डॉक्‍टरां कडून शस्‍त्रक्रिया करुन दयावी जेणे करुन त्‍याचे डोळयाची गेलेली दृष्‍टी परत येईल किंवा डोळयाचे नुकसानी बाबत रुपये-5,00,000/- नुकसान भरपाई दयावी अशी मागणी केली. सदर नोटीसला विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी दिनांक-30 जून, 2017 रोजी उत्‍तर पाठवून त्‍याव्‍दारे त्‍यांची तक्रारकर्त्‍याचे प्रकरणात संपूर्ण जबाबदारी नाकारली, म्‍हणून शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरां विरुध्‍द दाखल करुन त्‍याव्‍दारे पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

  1. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांना आदेशित करण्‍यात यावे की, जर तक्रारकर्त्‍याचा डोळा हा कोणत्‍याही नेत्रशल्‍य चिकित्‍सकां कडून दुरुस्‍त होण्‍याची शक्‍यता असेल तर तो विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी दुरुस्‍त करुन दयावा.
  2. जर तक्रारकर्त्‍याचा डोळा हा दुरुस्‍त होण्‍या पलीकडे असेल तर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांना त्‍यांचे वैद्दकीय निष्‍काळजीपणा बद्दल रुपये-5,00,000/- नुकसान भरपाई  तक्रारकर्त्‍यास अदा करण्‍याचे आदेशित व्‍हावे.
  3. प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-50,000/- विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांकडून तक्रारकर्त्‍याला देण्‍यात यावा. याशिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी पान क्रं 52 ते 59 वर लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यांनी उत्‍तरामध्‍ये प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरां विरुध्‍द वैद्दकीय निष्‍काळजीपणाचे जे आरोप केलेत त्‍या संबधाने वैद्दकीय क्षेत्रातील तज्ञांचा पुरावा दाखल केलेला नाही ज्‍यावरुन विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे विरुध्‍द निष्‍काळजीपणाचे केलेले आरोप सिध्‍द होतील. या संबधात विरुध्‍दपक्ष यांनी मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने “Martin F. D’Souza-Versus-Mohd. Ishfaq” या प्रकरणात पारीत केलेला न्‍यायनिवाडा जो AIR SC 2049 या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे यावर आपली भिस्‍त ठेवली. सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये वैद्दकीय निष्‍काळजीपणाचे प्रकरणात डॉक्‍टरांना नोटीस देण्‍यापूर्वी सदर प्रकरण हे तज्ञ डॉक्‍टरांचे समीती समोर पाठवावे आणि त्‍यांचे अहवाला नुसार जर निष्‍काळजीपणा दिसून आल्‍यास त्‍यानंतर संबधित डॉक्‍टरांना न्‍यायालयाची नोटीस पाठविण्‍यात यावी. सदर न्‍यायनिवाडया प्रमाणे तज्ञांचे पुराव्‍या शिवाय प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर चालू शकत नाही. जर जिल्‍हा ग्राहक आयोगास या प्रकरणात निकाल पारीत करावयाचा असेल तर वैद्दकीय निष्‍काळजीपणा संबधात तज्ञांचा अहवाल मागविण्‍यात यावा.

    विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी परिच्‍छेद निहाय उत्‍तरे देताना तक्रारकर्त्‍याचे डोळयावर दिनांक-04.08.2016 रोजी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली होती ही बाब मान्‍य केली मात्र त्‍याचे डोळयावर सुज असल्‍याने मशीनने त्‍याचा डोळा दाबला होता त्‍यामुळे रात्रभर त्‍याचे डोळयास वेदना होत्‍या, त्‍याने पुन्‍हा विरुध्‍दपक्षाचे दवाखान्‍यात भेट दिली असता डोळयास योग्‍यप्रकारे टाके घातले नसून पुन्‍हा टाके घातले परंतु त्‍याचा डोळा दुरुस्‍त होऊ शकला नाही हे सर्व आरोप नामंजूर केलेत. तक्रारकर्त्‍यास डॉ. अजय कुळकर्णी नागपूर यांचेकडे तपासणीसाठी पाठविण्‍यात आले हाते व त्‍यांनी लेन्‍स बदलविण्‍यास सांगितले होते ही बाब मंजूर केली. तक्रारकर्त्‍यास डॉ.लांबट नागपूर यांचेकडे तपासणीसाठी रेफर केले होते ही बाब मंजूर केली परंतु त्‍यांनी रुपये-1,00,000/- खर्च येणार असल्‍याचे सांगितल्‍याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्ता हा डॉ.लांबट यांना कधीही भेटला नाही. तक्रारकर्त्‍याने भंडारा येथील डॉक्‍टर अग्रवाल यांचे दवाखान्‍यात भेट दिली होती व त्‍यांनी संपूर्ण डोळा निकामी झाल्‍याचे त्‍याला सांगितले होते ही बाब सुध्‍दा नामंजूर केली. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याचे डाव्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया करते वेळी डोळयास नेमका कोणता आजार झालेला आहे या बाबत माहिती दिली नव्‍हती केवळ शस्‍त्रक्रियेची गरज असल्‍याचे सांगितले होते ही बाब नामंजूर केली. त्‍याचे डोळयाची शस्‍त्रक्रिया अयशस्‍वी ठरल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी मशीनने त्‍याचे डोळयावर दाब दिला आणि पुन्‍हा त्‍याचे डोळयाचे टाके घातले परिणामी वैद्दकीय निषकाळजीपणामुळे त्‍याचा संपूर्ण डोळा निरुपयोगी झाला होता हे सर्व आरोप नामंजूर केलेत. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी शस्‍त्रक्रिया निष्‍काळजीपणाने केली, त्‍यांचे दवाखान्‍यातील मशीन जुनी असल्‍याचे तसेच शस्‍त्रक्रियेचे साहित्‍य निर्जतुंकीकरण होत नसल्‍याचे व ते योग्‍य दर्जाचे नसल्‍या बाबतचे तक्रारकर्त्‍याचे आरोप नामंजूर केलेत. तक्रारकर्त्‍याने    दिनांक-16 जून, 2017 रोजीचे दिलेल्‍या नोटीसला त्‍यांनी दिनांक-30 जून, 2017 रोजी उत्‍तर दिले असल्‍याचे मान्‍य केले.

    आपले विशेष कथनात विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी नमुद केले की, ते नेत्रतज्ञ असून इन्‍द्राक्षी आय केअर नावाने भंडारा येथे डोळयांचा दवाखाना चालवितात. त्‍यांचे दवाखान्‍याची बॉम्‍बे नर्सिंग होमस रजिस्‍ट्रेशन अॅक्‍ट 1949 खाली नोंदणी झालेली असून त्‍याचा नोंदणी क्रं-डीएचबी/बीएनएचए/02/16 असा आहे. त्‍यांचे दवाखान्‍यास Pre Accreditation Award प्राप्‍त झालेला आहे, सदर अवार्ड वरुन लक्षात येईल की, त्‍यांचे दवाखान्‍याची गुणवत्‍ता व सुरक्षितता चांगली आहे. तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या नेत्रावर मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया फोल्‍डेबल लेन्‍ससह त्‍यांचे दवाखान्‍यात करण्‍यात आली होती, त्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे दवाखान्‍यास दिनांक-25.07.2016 रोजी भेट दिली होती त्‍यावेळी त्‍याचे दोन्‍ही डोळयांचे मोतीबिंदूची तपासणी करण्‍यात आली होती. त्‍याचे डाव्‍या डोळयाची  दृष्‍टी निकृष्‍ट होती. त्‍याचे उजव्‍या डोळयाची दृष्‍टी 6/24 आणि बरोबर 6/9 अशी होती परंतु डाव्‍या डोळयाची दृष्‍टी (Left eye vision was only counting finger 1 feet) फक्‍त एक फूट अंतरापर्यंत बोट मोजण्‍या ईतपत होती. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याचे डाव्‍या नेत्रावर संरक्षित व्हिज्‍युअल रोगनिदान अंतर्गत (Under guarded visual prognosis) शस्‍त्रक्रिया करण्‍याचे ठरविले. त्‍याचे डाव्‍या डोळयातील पडदयाची स्थिती स्‍पष्‍ट नव्‍हती (Retina status was also not clear). शस्‍त्रक्रिया करण्‍यापूर्वी तक्रारकर्त्‍याचे आरोग्‍याची तपासणी करण्‍यात आली होती. शस्‍त्रक्रिया करण्‍यापूर्वी तक्रारकर्त्‍याची सहमती म्‍हणून त्‍याची स्‍वाक्षरी घेण्‍यात आली होती आणि दिनांक-04.08.2016 रोजी त्‍याचे डाव्‍या डोळयावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली  होती आणि त्‍याच दिवशी त्‍याला दवाखान्‍यातून सुट्टी (Discharge) देण्‍यात आला होती, त्‍यावेळी त्‍याला काही औषधी लिहून देण्‍यात आली होती, त्‍यावेळी  त्‍याची Slit lamp examination करण्‍यात आली होती आणि  त्‍योवळी लेन्‍स योग्‍य  स्थितीत होता. दुसरे दिवशी दिनांक-05.08.2016 रोजी तक्रारकर्ता तपासणीसाठी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात आला होता, त्‍यावेळी त्‍याचे दृष्‍टीमध्‍ये  (Visual acuity improved)  सुधार 6/24 होता त्‍यामुळे त्‍याला पुन्‍हा 07 दिवसांनी तपासणीसाठी येण्‍यास सांगितले होते. त्‍यानंतर दिनांक-12.08.2016 रोजी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांच्‍या पत्‍नी डॉ. विशाखा जिभकाटे ज्‍या सुध्‍दा नेत्र शल्‍यक्रिया चिकित्‍सक (MS Ophthalmology) आहेत त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयाची तपासणी केली, त्‍यावेळी डॉ. विशाखा यांचे असे लक्षात आले की, Visual acuity reduced to finger counting 1 meter, cornea was oedematous. Anterior chamber was shallow and lens which was implanted was de-centred inferiorly. Anterior chamber was shallow due to leakage of aquous (fluid) through incision which happened due to improper post operative care like rubbing of eyes, coughing, sleeping on same side. तक्रारकर्त्‍याचे डोळयाचे आतील कक्ष उथळ झाला होता आणि  टाकण्‍यात आलेला लेन्‍स व्‍यवस्थित नव्‍हता  डोळया मधून  द्रव निघत होता आणि असे होण्‍याचे कारण म्‍हणजे डोळयाची शस्‍त्रक्रिया झाल्‍या नंतर योग्‍य ती काळजी न घेणे जसे डोळे चोळणे, जोरदार खोकला आणि एकाच बाजूवर झोपणे यामुळे सुध्‍दा असे होऊ शकते. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे डाव्‍या डोळयावर शास्‍त्रक्रिया केल्‍या नंतर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी दिलेल्‍या सुचनांकडे पुर्णपणे दुर्लक्ष्‍य केले होते. डोळयाची शस्‍त्रक्रिया झाल्‍या नंतर दुसरे दिवशी त्‍याची दृष्‍टी 6/24 अशी होती आणि एका आठवडया नंतर ती दृष्‍टी धुसर झाली होती. तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयाची स्थिती पाहता त्‍वरीत A.C. reformation and IOL (Lens) centsation done on the  same day i.e. on 12/08/2016 आणि त्‍यानंतर त्‍याला दुसरे दिवशी तपासणीसाठी बोलाविण्‍यात आले होते. त्‍यावेळी त्‍याचे डोळयावर दाब दिला नव्‍हता किंवा त्‍याचे डाव्‍या डोळयावर टाके लावले नव्‍हते. तक्रारकर्ता हा दोन दिवसा नंतर आला त्‍यावेळी Intraocular pressure was high, cornea was oedematous and lens was de-centred inferiorly i.e. Lens has lost support due to sublaxation. The complainant has developed complication of secondary glaucoma and corneal edema and lens dislocation due to improper care on the part of complainant himself. तक्रारकर्त्‍याचे डोळयाचा काचबिंदू, कार्निएल एडीमा आणि लेन्‍स व्‍यवस्थित नव्‍हता यासाठी तक्रारकर्ता हा स्‍वतःच जबाबदार होता परंतु या सर्व बाबींवर वैद्दकीय शास्‍त्रात उच्‍चपातळीवर उपचार असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी प्रख्‍यात नेत्रतज्ञ डॉ. अजय कुळकर्णी आणि त्‍यानंतर डॉ. सारंग लांबट यांचेकडे तपासणीसाठी त्‍याला रेफर केले होते. डॉ. कुळकर्णी यांनी तक्रारकर्त्‍यास  त्‍याचे अव्‍यवस्‍थीत झालेले लेन्‍स  व्‍यवस्थित करण्‍या करीता शस्‍त्रक्रिया सुचविली होती (To operate for dislocated lens removal with anterior vitrectomy with kerato plasty) परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला नाही आणि स्‍वतःच्‍या पसंतीने अन्‍य नेत्रतज्ञा कडे तपासणीसाठी तो गेला होता. तक्रारकर्त्‍याने योग्‍य वैद्दकीय उपचार करण्‍याऐवजी स्‍वतःहून दुखणे वाढविले. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याचेवर  योग्‍य उपचार केलेले आहेत, त्‍यांनी त्‍याचे डाव्‍या डोळयावर शस्‍त्रक्रिया करताना कोणताही वैद्दकीय निष्‍काळजीपणा केलेला नाही त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांवर त्‍याला नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी येत नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे जवळ कोणताही कायदेशीर दस्‍तऐवजी पुरावा नसताना विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे विरुध्‍द आरोप केलेले आहेत. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरां कडून पैसे उकळण्‍याचे दृष्‍टीने ही तक्रार दाखल केलेली आहे. उपरोक्‍त विवेचना वरुन तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी केली.

04.  तक्रारकर्त्‍याने  तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 14 नुसार एकूण-19 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी वेळोवेळी लिहून दिलेले प्रिस्‍क्रीप्‍शनस, विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे  डिसचॉर्ज कॉर्ड, मनोरमा क्लिनीक, नागपूर येथील डॉ. अजय कुळकर्णी यांनी लिहून दिलेले प्रिस्‍क्रीप्‍शन, सुरज आय ईन्सिटयुट, नागपूर येथील डॉ.सारंग लांबट यांचे प्रिस्‍क्रीप्‍शनस व बिले, सुरज आय ईन्सिटयुट, नागपूर येथील केस समरी, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे नोटीसला दिलेले उत्‍तर अशा दस्‍तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याला 30 टक्‍के अंधत्‍व आल्‍या बद्दल जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक भंडारा दवाखान्‍यातील प्रमाणपत्राची प्रत पान क्रं 102 व 103 वर दाखल केली. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 105 वरील दस्‍तऐवज यादी नुसार सरकारी दवाखाना भंडारा येथील दिनांक-29 मे, 2019 रोजीचा दसतऐवज तसेच शाळा सोडल्‍याचा दाखला व आधारकॉर्डची प्रत दाखल केली. पान क्रं 134 वर जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक भंडारा दवाखान्‍यातील प्रमाणपत्र ज्‍यावरुन तक्रारकर्त्‍याला 30 टक्‍के कायमस्‍वरुपी अंधत्‍व आल्‍याचे नमुद आहे. पृष्‍ट क्रं- 9  ते 11 वर तक्रारकर्त्‍याने शपथेवरील पुरावा दाखल केला.  तसेच पान क्रं 60 ते 62 वर शपथे वरील पुरावा दाखल केला. पृष्‍ट क्रं-65 ते 68 नुसार तक्रारकर्त्‍याने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

05.   विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी लेखी उत्‍तर पान क्रं-52 ते 59 वर दाखल केले. तसेच पान क्रं 91 ते 93 वर शपथे वरील पुरावा दाखल केला. पान क्रं 94 ते 98 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी मा.राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र मुंबई यांनी प्रथम अपिल क्रं 343/2000 या मध्‍ये दिनांक-11.05.2010 रोजी पारीत केलेल्‍या निवाडयाची प्रत पान क्रं 193 ते 220 वर दाखल केली.

06    महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य सेवा, जिल्‍हा अंधत्‍व नियंत्रण व दृष्‍टी क्षीणता सोसायटी भंडारा यांचे कडून तक्रारकर्त्‍याचे प्रकरणात जिल्‍हा ग्राहक आयोग भंडारा यांचे कडून अहवाल मागविण्‍यात आला होता, त्‍यानुसार सदर चौकशी समितीने आपला दिनांक 27 जानेवारी, 2020 रोजीचा चौकशी अहवाल पान क्रं 140 ते 149 वर दाखल केला.

07.  उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवज, शपथे वरील पुरावा, लेखी युक्‍तीवाद ईत्‍यादीचे काळजीपूर्वक अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे व्‍दारा करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री बावनकर तर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे वतीने वकील श्री मनिष रावलानी यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला,  तक्रारकर्तीची तक्रार, त्‍यावरुन जिल्‍हा  ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयावर मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया करण्‍यापूर्वी व त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी वैद्दकीय निष्‍काळजीपणा केल्‍याची बाब तक्रारकर्त्‍याचे प्रकरणात सिध्‍द होते  काय?

-होय -

 

 

 

 

2

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                    :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 व 2 बाबत

08.  तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे तो दिनांक-04.08.2016 रोजी डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये करीता विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात भरती झाला होता, विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याच दिवशी त्‍याचे डाव्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया केली होती आणि त्‍याच दिवशी डिसचॉर्ज दिला होता. पुढे  दिनांक-12.08.2016 रोजी त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यात भेट दिली असता विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी तपासणी करुन त्‍याला असे सांगितले की, डोळयाला सुज आहे व मशीनव्‍दारे डोळयास दाबले होते. त्‍यानंतर तो त्‍याचे घरी आला, त्‍या दिवशी डोळयामध्‍ये वेदना होत असल्‍याने तो रात्रभर घरी झोपू शकला नाही. त्‍याने दुसरे दिवशी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे दवाखान्‍यास भेट दिली. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी डोळयाची तपासणी करुन सांगितले की, डोळयाचे टाके बरोबर लागलेले नाही त्‍यामुळे त्‍यांनी दुस-यांदा टाके लावले परंतु डोळा दुरुस्‍त झाला नाही. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याला नागपूर ये‍थील डॉ.अजय कुळकर्णी यांचेकडे तपासणी करण्‍यास दिनांक-14.09.2016 रोजी रेफर केले. डॉ.अजय कुळकर्णी यांनी त्‍याचे डाव्‍या डोळयाची तपासणी केली असता त्‍याला लेन्‍स बसविण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याला डॉ.लांबट नागपूर यांचेकडे रेफर केले असता डॉ.लांबट यांनी डोळयाची शस्‍त्रक्रिया करावी लागेल आणि त्‍यासाठी रुपये-1,00,000/- खर्च येईल असेही सांगितले परंतु शस्‍त्रक्रिया यशस्‍वी होईल या बाबतची खात्री ते देऊ शकले नाही, त्‍यामुळे तो खूप घाबरला होता. त्‍यानंतर त्‍याने भंडारा येथील डोळयांचे डॉक्‍टर श्री अग्रवाल यांचे दवाखान्‍यात तपासणी केली असता त्‍यांनी औषधी लिहून दिली आणि त्‍याचा डोळा पूर्णतः खराब झाल्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी तयाचे डाव्‍या डोळयाची मोतीबिंदूची शस्‍त्रक्रिया करण्‍यापूर्वी व नंतर निष्‍काळजीपणा केलेला असल्‍याने त्‍याचा डोळा पूर्णतः निरुपयोगी झाला.

09.   याउलट विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी त्‍याचे डाव्‍या डोळयाचे मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया करते वेळी  वैद्दकीय दृष्‍टया योग्‍य ती काळजी घेतली होती तसेच त्‍याला प्रत्‍येक बाबीची माहिती दिली होती. परंतु शस्‍त्रक्रिया झाल्‍या नंतर तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे सल्‍ल्‍याचे पालन केले नाही तसेच स्‍वतःच्‍या मर्जीने दुसरीकडे उपचार घेणे सुरु केले त्‍यामुळे त्‍याचा त्रास वाढला. त्‍यांनी त्‍याचे डाव्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया करताना कोणताही निष्‍काळजीपणा केलेला नाही वा तसा कोणताही पुरावा त्‍याने दाखल केलेला नाही.

     विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी आपले लेखी उत्‍तरातील विशेष कथनात मान्‍य केलेले आहे की, तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयावर शस्‍त्रक्रिया केल्‍या नंतर दिनांक-12.08.2016 रोजी त्‍यांच्‍या पत्‍नी डॉ. विशाखा जिभकाटे नेत्र शल्‍यक्रिया चिकित्‍सक (MS Ophthalmology) यांनी डाव्‍या डोळयाची तपासणी केली असता असे लक्षात आले की,  त्‍याचे डोळयाचे आतील कक्ष उथळ झाला होता आणि  टाकण्‍यात आलेला लेन्‍स व्‍यवस्थित नव्‍हता, त्‍याचे  डोळया मधून  द्रव निघत होता आणि शस्‍त्रक्रियेचे  एका आठवडया नंतरच त्‍याचे डोळयाची दृष्‍टी धुसर झाली होती. त्‍यामुळे त्‍याच दिवशी त्‍याचे डाव्‍या डोळयाचे  A.C. reformation and IOL (Lens) centsation केले. त्‍यानंतर तो दोन दिवसा नंतर आला त्‍यावेळी Intraocular pressure was high, cornea was oedematous and lens was de-centred inferiorly i.e. Lens has lost support due to sublaxation. The complainant has developed complication of secondary glaucoma and corneal edema and lens dislocation due to improper care on the part of complainant himself. त्‍याचे डोळयाचा काचबिंदू, कार्निएल एडीमा आणि लेन्‍स व्‍यवस्थित नव्‍हता त्‍यामुळे त्‍यांनी प्रख्‍यात नेत्रतज्ञ डॉ. अजय कुळकर्णी आणि त्‍यानंतर डॉ. सारंग लांबट यांचेकडे तपासणीसाठी  रेफर केले होते.

10.   जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा तर्फे या प्रकरणात जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथील तज्ञ डॉक्‍टरांचे कमेटीचा अहवाल मागविण्‍यात आला होता, त्‍या नुसार नेत्र विभाग, सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथील तज्ञ डॉक्‍टरांचे कमेटीने आपला अहवाल दिनांक-27 जानेवारी, 2020 रोजीचा या प्रकरणात पान क्रं 140 ते 149 वर दाखल केला, त्‍यांनी खालील प्रमाणे अहवाल दिला-

  1. Indrakshi Eye Care Hospital situated at Rajiv Gandhi Chowk Bhandara is registered Vide No.-DJB/BNHA/02/16 with Civil Surgeon under Bombay Nursing home Registration Act, 1949.

 

  1. After verifying IPD, OT and Auto clave records, the Committee come to conclusion that OT has been properly sterilized as per prevailing norms.

 

  1. Post-operative complications due to negligence either from operating surgeon or from the patient himself in taking care of his left eye cannot be commented upon.

 

  1. Poor visual prognosis left eye.
  1. On examination pt is found to have left eye bullous keratopathy (Decompensation of the cornea) it occurs due to failure of the the endnothelial pump due to decrease/failure of endothelial cell of cornea.

 

  1. As we do not have the date of preoperative state/condition of cornea (i.e.Endothelial count of cells) It is not possible to comment whether the present condition is either due to pre-existing cause or after surgery or whether it has been aggravated during surgery.

 

  1. Surgeons appeared to have adequate care and due diligence while treating patient. (Preoperative inv.Fitness etc.)
  1. Treatment seens to be in accordance with existing prevailing protocol.

 

   सदर तज्ञ डॉक्‍टरांचे कमेटीचे अहवालावर डॉ. विनोद घडसिंग, नेत्रशल्‍य चिकित्‍सक, डॉ.करुणा खोब्रागडे, नेत्रशल्‍य चिकित्‍सक, डॉ.रेखा धकाते, जिल्‍हा नेत्रशल्‍य चिकित्‍सक, डॉ.निखील डोकरीमारे, निवासी वैद्दकीय अधिकारी आणि डॉ.सुनिता बढे, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथील कार्यरत तज्ञांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.

    सदर अहवालाचे आम्‍ही काळजीपूर्वक अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये असे स्‍पष्‍टपणे नमुद आहे की, Post-operative complications due to negligence either from operating surgeon or from the patient himself in taking care of his left eye cannot be commented upon. It is not possible to comment whether the present condition is either due to pre-existing cause or after surgery or whether it has been aggravated during surgery सदर , तज्ञ कमेटीच्‍या अहवाला मधील अभिप्राया वरुन असा अर्थ निघतो की,  तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळया मध्‍ये जो त्रास आहे तो नेत्रशल्‍य चिकित्‍सकांनी योग्‍यप्रकारे सर्जनी नंतर काळजी न घेतल्‍यामुळे किंवा रुग्‍णाने सर्जरी नंतर योग्‍य ती काळजी न घेतल्‍यामुळे निर्माण झाला, तसेच   डोळयांचा त्रास  पूर्वी किंवा सर्जरी नंतर निर्माण झाला या बद्दल या क्षणी काहीही सांगता येत नसल्‍याचे नमुद केलेले आहे. त्‍यामुळे सदर तज्ञांचे  अहवाला वरुन काहीही निष्‍कर्ष काढता येऊ शकत नाही, असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

11.  या संबधात विरुध्‍दपक्ष यांनी मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने “Martin F. D’Souza-Versus-Mohd. Ishfaq” या प्रकरणात पारीत केलेला न्‍यायनिवाडा जो AIR SC 2049 या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे यावर आपली भिस्‍त ठेवली. सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये वैद्दकीय निष्‍काळजीपणाचे प्रकरणात डॉक्‍टरांना नोटीस देण्‍यापूर्वी सदर प्रकरण हे तज्ञ डॉक्‍टरांचे समीती समोर पाठवावे आणि त्‍यांचे अहवाला नुसार जर निष्‍काळजीपणा दिसून आल्‍यास त्‍यानंतर संबधित डॉक्‍टरांना न्‍यायालयाची नोटीस पाठविण्‍यात यावी असे नमुद केलेले आहे.

    हातातील प्रकरणा मध्‍ये जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथील कार्यरत नेत्रशल्‍य चिकित्‍सक या तज्ञ समिती मार्फत अहवाल मागविण्‍यात आला होता पंरतु वर नमुद केल्‍या प्रमाणे सदर अहवाला मध्‍ये तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळया मध्‍ये उदभवलेल्‍या त्रासा बाबत त्‍यांनी या क्षणी काहीही सांगता येत नसल्‍याचे स्‍पष्‍टपणे अहवालात नमुद केलेले आहे. त्‍यामुळे सदर तज्ञ डॉक्‍टरांचे अहवालाचा विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांना काहीही फायदा होणार नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

12.   तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी युक्‍तीवादाचे समर्थनार्थ मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे खालील निवाडयाचा आधार घेतला-

Hon’ble Supreme Court of India-AIR 1989 SC-1570-“A.S. Mittal and another-Verusus-State of U.P. and others”-Decided on -12/05/1989

      सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडयाचे आम्‍ही काळजीपूर्वक अवलोकन केले त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे- “The operations in the camp should only be performed by qualified, experienced Ophthalmic Surgeons registered with Medical Council of India or any State Medical Council.  The camp should not be used as a training ground for post-graduate students, and operative work should not be entrusted to post-graduate students.

     सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयातील निवाडया प्रमाणे डोळयांचे कॅम्‍प मध्‍ये सर्जरी झालेली असून त्‍यावर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असा निर्वाळा दिलेला आहे की, कॅम्‍प मध्‍ये डोळयांवरील शस्‍त्रक्रिया ही मेडीकल कॉऊन्‍सील ऑफ इंडीया किंवा राज्‍य शासनाचे मेडीकल काऊन्‍सील कडून नोंदणीकृत तज्ञ डॉक्‍टरांव्‍दारेच केली जावी. पदव्‍युत्‍तर विद्दार्थ्‍यां कडून कॅम्‍प मध्‍ये प्रशिक्षण देण्‍यासाठी डोळयांची शस्‍त्रक्रिया करणे अपेक्षीत नाही.

     आमचे समोरील हातातील प्रकरणात अशी वस्‍तुस्थिती नसलयाने सदर न्‍यायनिवाडयाचा उपयोग तक्रारकर्त्‍यास होणार नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

13.   तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचे संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे प्रकरणातील दाखल अभिलेखाचे अवलोकन करण्‍यात आले. डॉ. कुळकर्णी यांनी दिनांक-14.09.2016 रोजी तक्रारकर्त्‍याचे डोळयाची तपासणी केल्‍या बाबतचा दस्‍तऐवज पान क्रं 24 वर दाखल आहे, सदर दस्‍तऐवजा प्रमाणे त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास  त्‍याचे अव्‍यवस्‍थीत झालेले लेन्‍स  व्‍यवस्थित करण्‍या करीता शस्‍त्रक्रिया सुचविली होती व ही बाब विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांना सुध्‍दा मान्‍य आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने डॉ.सारंग लांबट यांचेकडे तपासणी दिनांक-18.01.2017 रोजी केल्‍या बाबतचा दसतऐवज पान क्रं 28 वर दाखल आहे, त्‍यानुसार त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे डोळयात मोतीबिंदू असल्‍याचे रोगनिदान करुन पुढे Advice :- “PKP + Glued IOL Surgery”  असे नमुद करुन शस्‍त्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिल्‍याचे नमुद आहे.

14.   वरील सर्व दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयावर विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी दिनांक-04.08.2016 रोजी जी मोतीबिंदूची शस्‍त्रक्रिया केली होती तीच मूळात व्‍यवस्थित झालेली नव्‍हती. याचे कारण असे आहे की, शस्‍त्रक्रिये नंतर एका  आठवडया नंतर म्‍हणजे दिनांक-12.08.2016 रोजी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी त्‍याचे डाव्‍या डोळयाची तपासणी केली असता त्‍याचे  डोळयाचे आतील कक्ष उथळ झाला होता आणि  टाकण्‍यात आलेला लेन्‍स व्‍यवस्थित नव्‍हता, तयाचे  डोळया मधून  द्रव निघत होता आणि त्‍याचे डोळयाची दृष्‍टी धुसर झाली होती या बाबी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी स्‍वतःच मान्‍य केलेल्‍या आहेत. त्‍यानंतर डॉक्‍टर कुळकर्णी यांनी दिनांक-14.09.2016 रोजी आणि डॉ.सारंग लांबट यांनी दिनांक-18.01.2017 रोजी तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयाची तपासणी केल्‍या नंतर “IOL Surgery” शस्‍त्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिला. यावरुन ही बाब सिध्‍द होते की, विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयावर मोतीविंदूची शस्‍त्रक्रिया करताना योग्‍य ती वैद्दकीय काळजी घेतलेली नसल्‍याने त्‍याला अन्‍य डॉक्‍टरांकडे विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी स्‍वतःच रेफर केलेले आहे. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचे म्‍हणण्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे डाव्‍या डोळयावर शस्‍त्रक्रिया झाल्‍या नंतर त्‍यांनी दिलेल्‍या सल्‍ल्‍या प्रमाणे योग्‍य ती काळजी घेतली नाही परंतु या बाबतचा कोणताही सक्षम पुरावा त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेला नाही. उपरोक्‍त सखोल विवेचना वरुन ही बाब सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयाचे मोतीबिंदू शस्‍त्रक्रिये मुळे नुकसान झालेले आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षां कडून नुकसान भरपाईची रक्‍कम आणि तक्रारखर्च मिळण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

    15.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोग प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

 

                                                                    :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्त्‍याची  तक्रार विरुध्‍दपक्ष इंद्राक्षी आय केयर, भंडारा आणि सदर आय केअरचे चालक डॉक्‍टर योगेश आर.जिभकाटे, यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2.  
  3. विरुध्‍दपक्ष इंद्राक्षी आय केयर, भंडारा आणि सदर आय केअरचे चालक डॉक्‍टर योगेश आर.जिभकाटे यांना वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयाचे झालेल्‍या नुकसानी बाबत भरपाई म्‍हणून रुपये-3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लक्ष फक्‍त) एवढी रक्‍कम तक्रारकर्त्‍यास सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत दयावेत. विहित मुदतीत विरुध्‍दपक्ष यांनी  आदेशाचे अनुपालन न केल्‍यास सदर नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-3,00,000/- मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्‍के दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम तक्रारकर्त्‍यास देण्‍यास विरुध्‍दपक्ष जबाबदार राहतील.

 

  1.  विरुध्‍दपक्ष इंद्राक्षी आय केयर, भंडारा आणि सदर आय केअरचे चालक डॉक्‍टर योगेश आर.जिभकाटे यांना वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास प्रस्‍तुत तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अदा करावेत.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष इंद्राक्षी आय केयर, भंडारा आणि सदर आय केअरचे चालक डॉक्‍टर योगेश आर.जिभकाटे यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

(05) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध       करुन देण्‍यात याव्‍यात.

 

(06) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स  त्‍यांना परत करण्‍यात याव्‍यात.              

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.