Maharashtra

Nagpur

RBT/CC/4/2019

SHRI UMESH DINKARRAO PANBUDE - Complainant(s)

Versus

DR. SAU RAGINI MILIND MANDLIK CHIEF MANAGER - Opp.Party(s)

SELF

22 Dec 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. RBT/CC/4/2019
 
1. SHRI UMESH DINKARRAO PANBUDE
D 301, SANCHAYINI PRESTIGE PARISAR, SWALABINAGAR, NAGPUR 440022
NAGPUR
MAHARASHTRA
2. SOU. SHITAL UMESH PANBUDE
D 301, SANCHAYINI PRESTIGE PARISAR, SWALABINAGAR, NAGPUR 440022
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DR. SAU RAGINI MILIND MANDLIK CHIEF MANAGER
9 SUYASH NARSHING HOME, NEAR PETROL PUMP, ABHAYNKAR NAGAR, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. DR. MILIND MANDLIK
9, SUYASH NARSING HOME , NEAR PETROL PUMP, ABHAYANKAR NAGAR, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 22 Dec 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्दारा – श्री   संजय वासुदेव पाटीलमा. अध्‍यक्ष)

 1.तक्रारकर्ते यांनी वर्तमान तक्रार ही कलम १२ ग्राहक संरक्षण कायदा १९८६ प्रमाणे १९/३/२०१३ रोजी दाखल केले आहे. तक्रारकर्ते यांची तक्रार थोडक्‍यात खालिलप्रमाणे आहे.

अ. तक्रारकर्ते क्रमांक २ हिने गैरअर्जदार क्रमांक २ कडे दिनांक १०/०६/२०१० रोजी आपले नाव पेशंट म्‍हणून नोंदविले आणि त्‍यावेळेस ती गर्भवती होती. गैरअर्जदार क्रमांक १ हिने तिची तपासणी केली आणि आपला अहवाल कागदावर लिहुन दिला. तक्रारकर्ती क्रमांक २ हिने गैरअर्जदार क्रमांक १ च्‍या  सल्‍लयानुसार रोगनिदान तज्ञांकडे जावून आवश्‍यक ती तपासणी केली आणि सदरहु निदान घेऊन दिनांक ७/७/२०१० रोजी गैरअर्जदार क्रमांक २ कडे गेली आणि गैरअर्जदार क्रमांक २ यांनी नियमीत तपासणी दिनांक २९/७/२०१० रोजी केली आणि गैरअर्जदार क्रमांक १ च्‍या  सल्‍लयानुसार सोनोग्राफी केली. त्‍यानंतर पुन्‍हा गैरअर्जदार यांचे सल्‍ल्‍यानुसार दिनांक २१/८/२०१० व दिनांक २१/९/२०१० रोजी नियमीत तपासणी करुन सोनोग्राफी केली. गैरअर्जदार क्रमांक १ यांनी दस्‍तऐवज क्रमांक ५ प्रमाणे अहवाल लिहुन दिला. गैरअर्जदार क्रमांक १ यांचेकडे नियमीत तपासण्‍या दिनांक २३/११/२०१०, १६/१२/२०१० आणि ४/१/२०११ रोजी केली आणि दिनांक ५/१/२०११ रोजी वेंकटेश ईमेजींग सेंटर येथे सोनोग्राफी केली. गैरअर्जदार क्रमांक १ हिने गर्भाची दिशा उलट्या बाजुने असल्‍याने शस्‍ञक्रिया करणे अनिवार्य आहे असा सल्‍ला दिला आणि त्‍यानुसार दिनांक १४/१/२०११ रोजी अर्जदार क्रमांक २ ची शस्‍ञक्रिया गैरअर्जदार क्रमांक १ व २ च्‍या उपस्थितीत सुयश नर्सिंग होम येथे केली. बाळाचा जन्‍म सकाळी ९.३५ मिनीटांनी झाला असे तक्रारकर्ते यांना सांगितले आणि तक्रारकर्ते क्रमांक २ हिला दिनांक १८/१/२०११ रोजी दवाखान्‍यातुन सुट्टी देण्‍यात आली.

आ. तक्रारकर्ते यांनी पुढे असे नमुद केले की, प्रसुतीपूर्व तपासणीचे वेळेस गैरअर्जदार क्रमांक १ हिने आश्‍वस्‍त केले की, बाळ हे व्‍यवस्थित व सामान्‍य रुपात असुन काळजी करण्‍याचे काहीही कारण नाही, परंतु बाळाचे वजन जन्‍माचे वेळी कमी होते आणि बाळाचे डोके शरीराच्‍या मानाने फारच मोठे होते. परंतु या गोष्‍टींचा गैरअर्जदार क्रमांक १ यांनी डिस्‍चार्ज कार्ड मध्‍ये उल्‍लेख केला नाही. गैरअर्जदार क्रमांक १ व २ यांनी प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर च्‍या  काळातील तपासणी शुक्‍ल म्‍हणून रुपये १२,०००/- एवढी रक्‍कम घेतली आहे आणि बाकी रक्‍कम ही नागपूर महानगरपालिकेकडुन नागपूरचा नागरीक म्‍हणून खास योजनेअंतर्गत दिली गेली. तक्रारकर्ते यांनी बाळाची छायाचिञे तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. सदरहु बाळाची शारीरिक अवस्‍था अतिशय नाजुक आहे आणि त्‍यास अनेक शारीरिक व्‍याधी आहे.

इ. तक्रारकर्ते यांनी पुढे असे नमुद केले की, गैरअर्जदार क्रमांक २ यांनी वेळोवेळी बाळाची तपासणी दिनांक २९/१/२०११, १/२/२०११, २/३/२०११,६/३/२०११, ११/३/२०११, १८/७/२०११, २४/८/२०११, २९/११/२०११, १२/१२/२०११, १२/१/२०१२, १०/०३/२०१२, ७/५/२०१२,३०/०५/२०१२, ४/७/२०१२, ३०/८/२०१२, ८/११/२०१२ या तारखांना केलेल्‍या आहेत. परंतु बाळाच्‍या  असामान्‍य शारीरिक अवस्‍थेचा आणि ञासाचा कधीही उल्‍लेख केलेला नाही. सदरहु बाळास दिनांक १२/११/२०११ रोजी प्रकृती बिघडल्‍यामुळे कलर्स दवाखाना येथे भरती करण्‍यात आले आणि डॉ. विनोद गांधी यांनी बाळावर उपचार केले आणि बाळाच्‍या प्रकृती अस्‍वास्‍थाची खालिलप्रमाणे कारणे दिलेले आहे.

‘FTT- Failure to thrive, skeletal dysplasia, short stature, Hypotonia/ Delayed Motor Devp. & was admitted for LRTI/Acute Respiratory Distress)’ LRTI & congenital dislocation of hip..

त्‍यावेळेस सदरहु बाळाला दिनांक १६/११/२०११ रोजी सुट्टी देण्‍यात आली आणि पुन्‍हा दिनांक १६/३/२०१२ रोजी भरती करण्‍यात आले. यावेळी बाळाच्‍या अस्‍वस्‍थाची कारणे LRTI & congenital dislocation of hip अशी देण्‍यात आली. सदरहु बाळाला डॉ. विनोद गांधी यांची ट्रीटमेंट सुरु आ‍हे. त्‍याचे वजन ६ कि.ग्रॅ. आ‍हे आणि उंची ६० सें.मी. आहे. तक्रारदाराने असे नमुद केले की, यावेळेस सदरहु उंची ८० ते ९० सें.मी. असावयास हवी होती आणि वजन १० ते १३ कि.ग्रॅ. असायला हवे. त्‍यानंतर सदरहु बाळाला दिनांक १५/२/२०१३ रोजी गुरुनानक हॉस्‍पीटल, मुंबई येथे हीप जॉईंट डिसलोकेशनच्‍या  उपचारासाठी भरती करण्‍यात आले आणि सदरहु दवाखान्‍याने ४,००,०००/- खर्चाचा अंदाज दिलेला आहे.

ई. तक्रारदाराने पु्ढे असे नमुद केले की, तक्रारकर्ते यांची आर्थिक परिस्‍थीती अतिशय नाजुक झालेली आहे आणि गैरअर्जदार क्रमांक १ व २ यांच्‍या चुकीच्‍या निदानामुळे तक्रारदारांना आणि त्‍यांच्‍या  बाळाला मानसिक व आर्थिक ञास सहन करावा लागला. म्‍हणून त्‍यांनी विरुध्‍द पक्ष यांचेकडुन नुकसान भरपाईपोटी रक्‍कम अदा करण्‍याची पञ पाठवुन विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी सदरहु पञाला वकील श्री भानुदास कुलकर्णी यांचे मार्फत दिनांक २१/१/२०१३ रोजी उत्‍तर पाठवून विरोध दर्शविला.

उ. तक्रारकर्ते यांनी विरध्‍द पक्ष यांचेवर असे आक्षेप घेतले की, तक्रारकर्ते क्रमांक २ हिचा गर्भपाताचा इतिहास असतांनाही दुस-या गर्भारपणाच्‍या काळात पुरेसी वैद्यकीय काळजी घेतलेली नाही आणि तक्रारकर्ते यांचे बाळ सर्व साधारण असुन काळजी करण्‍याचे कारण नाही असे सांगितले. तसेच बाळाच्‍या  असाधारण तब्‍येतीसाठी आवश्‍यक तपासण्‍या करण्‍याचा सल्‍ला  अर्जदारास दिला नाही. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, गैरअर्जदार यांनी तक्रारकदार क्रमांक २ हिला खालिलप्रमाणे तपासण्‍या करावयास सांगणे आवश्‍यक होते.

 

  1. Inspection of congenital anomalies during 3 trimesters.
  2. Genetic counselling and/or genetic testing to a patient or couple.
  3. Maternal serum screening.
  4. Magnetic resonance imaging (MRI)
  5. Computed tomography (CT)
  6. Radiography
  7. Molecular analysis
  8. Amniocentesis

ऊ. तक्रारकर्ते यांनी पुढे असा आक्षेप घेतला की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी आपले अपयश लपविण्‍यासाठी आणि जबाबदारी टाळण्‍यासाठी बाळाच्‍या शारीरिक कमतरतेबाबतचे उल्‍लेख जाणुनबुजून कागदपञांमध्‍ये केले नाही आणि योग्‍यवेळी गर्भ हा कमतरता असलेला आहे असा सल्‍ला दिलेला नाही. अन्‍यथा सदरहु बाळाला जन्‍म द्यावा किंवा नाही याबाबत योग्‍यवेळी निर्णय घेता आला असता. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, सदरहु अपंग बाळाला आयुष्‍यभर व्‍याधी सोसाव्‍या  लागणार आणि Hip Joint dislocation च्‍या शस्‍ञक्रिया करावी लागणार आणि त्‍यासाठी रक्‍कम रुपये ४,००,०००/- अपेक्षीत आहे आणि सदरहु खर्च करण्‍यास तक्रारकर्ते हे असमर्थ आहे. तक्रारकर्ते क्रमांक १ यांची वार्षिक कमाई केवळ १,५०,०००/- आहे. म्‍हणून तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्ष यांनी बाळाच्‍या उपचारासाठी आयुष्‍यभर सोसाव्‍या लागणा-या खर्चापोटी रक्‍कम रुपये १९,००,०००/- नुकसान भरपाई देण्‍याची मागणी केली आहे आणि शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये ७५,०००/- आणि तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रुपये १५,०००/- अशा मागण्‍या  केल्‍या  आहेत.

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी त्‍यांचा लेखी जबाब दिनांक १७/७/२०१३ रोजी निशानी क्रमांक ६ प्रमाणे दाखल केलेला आहे आणि त्‍यांच्‍यावर केलेले आरोप आणि आक्षेप फेटाळून लावलेले आहे आणि तक्रारकर्ती क्रमांक २ च्‍या  गर्भवती असण्‍याच्‍या काळामध्‍ये योग्‍य  उपचार केल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यांनी असे अभिकथन केले की, प्रललित वैद्यकीय प्रघाताप्रमाणे ३ सोनोग्राफी चाचण्‍या करणे अभिप्रेत असते आणि त्‍याप्रमाणे चाचण्‍या घेण्‍यात आल्‍या  होत्‍या. त्‍यांनी असे नमुद केले की, ३४-३५ व्‍या आठवड्यामुळे सोनोग्राफी चाचणीमध्‍ये गर्भाशतील गर्भाची अवस्‍था लक्षात येते आणि तक्रारकर्ती क्रमांक २ यांचे बाबतीत गर्भाची अवस्‍था उलट्या बाजुने दिसल्‍यामुळे नियमीत बाळंतपण अवघड असल्‍यामुळे शस्‍ञक्रिया (सीझेरीयण) करणे आवश्‍यक होते आणि त्‍याप्रमाणे दिनांक १४/१/२०११ रोजी शस्‍ञक्रिया करुन बाळंतपण करण्‍यात आले आणि दिनांक १८/१/२०११ रोजी अर्जदार क्रमांक २ हिला दवाखान्‍यातुन सुट्टी देण्‍यात आली. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, परिच्‍छेद क्रमांक ८ मधील मजकुर हा चु‍कीचा आणि दिशाभुल करणारा आहे आणि बाळाचे डोके शरिराच्‍या मानाने मोठे होते आणि वजन कमी होते याचा अंदाज सोनोग्राफी चाचण्‍यांमधुन येऊ शकत नाही. गर्भधारणामध्‍ये गर्भ साधारण व समाधानकारक स्थितीत असल्‍याबाबत सोनोग्राफी अहवालावरुन स्‍पष्‍ट होते. दवाखान्‍यातुन सुट्टी देतांना बाळाच्‍या  बाबतीत आवश्‍यक मजकुर गैरअर्जदारांनी केला नाही हा आरोप चुकीचा आहे. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, शस्‍ञक्रिया दवाखान्‍यातील भरती व औषधोपचार याबाबत अत्‍यंत वाजवी शुल्‍क   आकारण्‍यात आले होते. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, बाळाचे जन्‍मानंतर त्‍याला वेळोवेळी लस टोचणे व सर्दी खोकला इत्‍यादी नुसार योग्‍य ते उपचार करण्‍यात आले होते आणि ज्‍या संबंधाने बाळास तपासणीसाठी आणले होते त्‍या सर्व बाबींचा उल्‍लेख तपासणी अहवालात केलेला आहे. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, डॉ. विनोद गांधी यांनी काय निदान केले याबाबतची माहिती अर्जदारांनी गैरअर्जदार यांना अत्‍यंत उशीराने दिली होती. सदरहु बाळाला जी मुलभुत व्‍याधी आहे त्‍यासाठी गैरअर्जदार क्रमांक १ व २ कोणत्‍याही प्रकारे जबाबदार नाही. तिन्‍ही सोनोग्राफी चाचण्‍यांमध्‍ये गर्भामध्‍ये   कोणतेही अनियमीतता अथवा डिफॉरमीटी दर्शविली नव्‍हती. तक्रारदाराची तक्रार अत्‍यंत चुकीच्‍या आणि काल्‍पनिक आधारावर केलेली आहे. गर्भपाताची अनेक कारणे असु शकतात त्‍यामुळे पूर्वी गर्भपात झाला होता या माहितीवरुन कोणताही निष्‍कर्ष काढता येत नाही. तसेच पूर्वी गर्भपात झाल्‍यानंतर त्‍या अर्भकाबाबतचे कोणतेही अहवाल अर्जदारांनी सादर केलेले नव्‍हते आणि कोणतीही माहिती अर्जदारांनी गैरअर्जदार यांना दिलेली नव्‍हती. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी त्‍याबाबत निदान करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. गैरअर्जदार क्रमांक २ यांनी गर्भारपणाच्‍या काळात तक्रारकर्ती क्रमांक २ हिची पुरेशी वैद्यकीय काळजी घेतलेली नाही हा आरोप चुकीचा आहे. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, ञिमासीक सोनोग्राफी चाचणी अहवालाच्‍या  आधारावरच स्‍ञीरोगतज्ञ गर्भाबाबत निदान करतो आणि अर्जदार क्रमांक २ च्‍या तिन्‍ही सोनोग्राफी चाचणी अहवालानुसार गर्भाची वाढ समाधानकारक असल्‍याचे दिसुन आले होते. तक्रारकर्ते यांनी तक्रारीमधील परिच्‍छेद क्रमांक २० मध्‍ये काही चाचण्‍यांचा उल्‍लेख केला आहे. त्‍याबाबत विरुध्‍द पक्ष यांनी खालिलप्रमाणे इंग्रजीमध्‍ये  खुलासा दिलेला आहे.
  1. Inspection of congenital anomalies during 3 trimesters in this behalf it is submitted that three antenatal ultra sonography investigations were made. It is only if the reports suggest any congenital anomaly then only the question of further investigation would arise. In the present case none of the sonography reports had suggested any congenital anomaly in the foetus. Hence there was no occasion for the respondents to suggest any investigation for such a contingency.
  2. Genetic counselling and for genetic testing of the patient or couple- In this behalf it is submitted that firstly there was no family history of any deformity either on the side of applicant No. 1 or applicant No. 2. Similarly the first child of the applicants is absolutely normal. All the three sonography reports did not suggest any nature of deformity in the foetus. Similarly both the parents were also normal. No Gynaecologist can dream of a deformity in the foetus unless there are reports suggestive of such an eventuality. Hence there was no occasion for the respondent to suggest for genetic counselling and for genetic testing.
  3. Maternal Serum Screening:- Basically such a screening is banned and in exceptional cases of history of the parents about chromosomal anomalies testing in permissible.  There had been absolutely no history of chromosomal anomaly in case of applicant No. 1, applicant No. 2 or the first child of the applicants. Resultantly the said investigation was never warranted.
  4. Magnetic resonance imaging (MRI) - This investigative technique is never applied for antenatal investigation. When MRI investigation is not a antenatal investigation, the question of suggesting MRI investigation was impossible.
  5. Computed Tomography and (f) Radiography- it is submitted that both the investigative technique are contra indicated for antenatal investigation. Hence the said techniques could not have been advised by any gynaecologist.
  6. Molecular Analysis- This Technique is also not for antennal investigation and the question of advising the said investigation did not arise.
  7. Amniocentesis- The technique is used in case of chromosomal problem for which there has to be a history. Then only such a technique is firstly permissible and secondly can be advised.

          It this behalf it is submitted that the entire prenatal investigations are controlled by the pre-netal Diagnosis Techniques Act and no investigation can be advised and is permissible contrary to the provisions of the said Act.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी पुढे असे नमुद केले की, बाळाच्‍या जन्‍मानंतर केवळ ४ दिवसांमध्‍ये अशा प्रकारची कमतरता आहे किंवा असाधारण तब्‍येत आहे असे निदान करता येऊ शकत नाही. त्‍याबाबतचे निदान १० महिण्‍यानंतरच दिसुन आले होते. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, डॉ. रवि भेलोंडे यांनी केलेल्‍या  कॅरियोटायपिंग आणि थायरॉईड चाचणी मध्‍ये  नॉर्मल अशाच अहवाल देण्‍यात आला होता. तसेच या क्षेञातील तज्ञ डॉक्‍टर वामन खाडिलकर, पूणे यांच्‍याकडे बाळाला घेऊन जाण्‍याचा सल्‍ला  तक्रारकर्त्‍यांना दिला होता आणि डॉ. खाडिलकर यांनी सातव्‍या वर्षानंतर ग्रोथ हॉर्मोन ट्रीटमेंट सांगितली आहे. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, क्रोमोझोमल अॅनॉमॉली ची कोणतीच बाब कुटुंबात नसल्‍यामुळे त्‍या दृष्‍टीने चाचणी करण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तक्रारकर्ते यांनी परिच्‍छेद क्रमांक २१ ते २७ मध्‍ये केलेल्‍या  आरोप चुकीचे आहे असा विरुध्‍द पक्ष यांनी बचाव घेतलेला आहे आणि विरुध्‍द पक्ष यांनी अत्‍यंत दुर्लक्ष केले  हा आरोप नाकारलेला आहे. विरुध्‍दपक्ष यांनी शेवटी असे नमुद केले की, त्‍यांनी कोणत्‍याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा सेवेमध्‍ये ञुटी केलेली नाही आणि सदरची तक्रार ही काल्‍पनिक स्‍वरुपाची आहे आणि रक्‍कम रुपये १९,००,०००/- एवढ्या नुकसान भरपाई ची मागणी निराधार व तथ्‍यहीन आहे. तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची विरुध्‍दपक्ष क्रमांक १ व २ यांनी विनंती केलेली आहे.
  2. तक्रारीमधील आक्षेप, विरुध्‍द पक्ष यांचा बचाव आणि उभयपक्षंनी दाखल केलेली कागदपञे विचारात घेतल्‍यानंतर या आयोगाने खालिल मुद्दे निर्णयासाठी विचारात घेतले आहे आणि त्‍यावर खालिल कारणास्‍तव खालिलप्रमाणे निष्‍कर्षे नोंदविलेले आहेत.

अ.क्र.                                     मुद्दे                                                                               निष्‍कर्षे

  1.    विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ती क्रमांक २                                           होय

हिला उपचार निरनिराळे उपचार देतांना वैद्यकीय निष्‍काळजीपणा केला

आहे काय ?

2. विरुध्‍द  पक्ष्‍ज्ञ क्रमांक १ व २ यांना तक्रारकर्तीला  दिलेल्‍या वैद्यकीय सेवेमध्‍ये ञुटी             होय

केली आहे काय ?

3. काय आदेश?                                                                                                   अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

कारणमीमांसा

 

  1. मुद्दा क्रमांक १ बाबत – वर्तमान प्रकरणात तक्रारकर्ते यांनी निशानी   क्रमांक २ सोबत निरनिराळी १७ कागदे दाखल केली आहेत. तक्रारकर्ते  यांनी दिनांक २८/१/२०१४ रोजी प्रतिउत्‍तर दाखल केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी पुराव्‍याबाबत शपथपञे अभिलेखावर दाखल केल्‍याचे दिसून येते आणि  त्‍यांनतर विरुध्‍द पक्ष यांनी निशानी १२ प्रमाणे रेडिओलॉजी डिपार्टमेंट जी.एम.सी. नागपूर कडुन तज्ञ अहवाल मागविण्‍यासाठी अर्ज केला. सदरहु अर्ज दिनांक १५/९/२०१५ रोजी मंजूर झाल्‍यानंतर वैद्यकीय अधिक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांनी निशानी क्रमांक १६ च्‍या  पञासोबत तज्ञ अहवाल दाखल केला आहे. सदरहु तज्ञ अहवालावर उभयपक्षांनी आपआपले लेखी म्‍हणणे सादर केले आहे.तक्रारकर्ते यांनी निशानी क्रमांक २२ ला लेखी युक्‍तीवाद दाखल करुन सदरहु लेखी युक्‍तीवाद हाच त्‍यांचा तोंडी युक्‍तीवाद आहे असे या आयोगासमोर नमुद केले. म्‍हणून त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाचे वकील श्री कुलकर्णी यांचा तोंडी युक्‍त्‍ीवाद आम्‍ही ऐकला. उभयपक्षांनी दाखल केलेल्‍या  सर्व कागदपञांचे, तज्ञ अहवालाचे आणि न्‍यायनिवाड्यांचे आम्‍ही अवलोकन केले.
  2. तक्रारकर्ते यांनी त्‍यांच्‍या लेखी युक्‍तीवादात थोडक्‍यात असे नमुद केले की, विरुध्‍द पक्ष यांनी पूर्वीच्‍या गर्भवतीपणाबाबतचा मेडीकल हिस्‍ट्री  विचारात घेतला नाही आणि योग्‍य प्रकारे तक्रारकर्ते यांना सल्‍ला व उपचार दिलेला नाही आणि त्‍यांनी वैद्यकीय निष्‍काळजीपणा केलेला आहे. विरुध्‍द पक्ष यांनी डिलीव्‍हरी बाबत दिलेल्‍या कागदपञांमध्‍ये  सदरहु बाळ लोकेश याचेबाबत Short Stature, Abnormality, हे नमुद केले नाही आणि त्‍यांची जबाबदारी टाळण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे आणि प्रेग्‍नेन्‍सी काळामध्‍ये  केलेला वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाकण्‍यासाठी सर्व बाबी नमुद केल्‍या  नाहीत.  विरुध्‍द पक्ष हे सोनोग्राफीबाबतच्‍या कमतरतेबाबत ज्ञानी होते परंतु त्‍यांनी Past History of Anomaly हा विचारात घेऊन तक्रारकर्ती क्रमांक २ हीचे गर्भारपण हे High Risk प्रेग्‍नेन्‍सी आहे असा सल्‍ला दिलेला नाही आणि त्‍याप्रमाणे उपचार केलेले नाही. याउलट त्‍यांनी गर्भारपणाच्‍या  काळात सर्वकाही नॉर्मल आहे असे सांगितले आणि रिझल्‍ट हा अॅबनॉर्मल मिळाला त्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे जबाबदार आहे. तक्रारकर्ते यांनी आपल्‍या लेखी युक्‍तीवादात असे नमुद केले की, त्‍यांचा मुलगा लोकेश याची शारीरिक स्थिती अतिशय वाईट आहे आणि त्‍यासाठी त्‍यांना सतत लक्ष ठेवावे लागते आणि म्‍हणून तक्रारकर्ती क्रमांक २ हिला कोचिंग क्‍लासेसचा व्‍यवसाय बंद करावा लागला आणि त्‍यामुळे तक्रारकर्ते यांचे नुकसान झालेले आहे. म्‍हणून योग्‍य आणि वाजवी नुकसान भरपाई देण्‍यात यावी.
  1. विरुध्‍द पक्ष यांचे वकील श्री कुलकर्णी यांनी थोडक्‍यात असा युक्‍तीवाद केला की,लोकेश च्‍या वेळी तक्रारकर्ती क्रमांक २ हिची तिसरी प्रेग्‍नन्‍सी  होती आणि तिची दुसरी प्रेग्‍नन्‍सी टर्मीनेट झालेली आहे. दिनांक २९/९/२०१० रोजी दुसरी सोनोग्राफी केल्‍यानंतरही कोणताही प्रॉब्‍लेम सदरहु गर्भामध्‍ये दिसून आलेला नाही आणि सोनोग्राफीमध्‍ये  No Abnormality असा अभिप्राय दिलेला आहे. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, Skeltol Desplacia चा आजार हा बाळाचा जन्‍मानंतर ब-याच महिण्‍यांनी दिसून आला आणि त्‍याला विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ हे जबाबदार नाही. सदरहु गर्भामध्‍ये  कोणतीही Deformity दिसून आलेली नव्‍हती  आणि म्‍हणून विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ व २ यांनी कोणत्‍याही प्रकारे वैद्यकीय सेवेमध्‍ये  ञुटी केलेल्‍या नाहीत. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ते क्रमांक १ व २ हे दोघेही नॉर्मल व्‍यक्‍ती आहे आणि त्‍यांचा पहिले बाळ हे सुद्धा नॉर्मल आहे आणि कोणत्‍याही प्रकारचा Medical Abnormality चा ईतिहास तक्रारकर्ते यांचे कुटूंबामध्‍ये नाही. त्‍यांनी पुढे असा युक्‍तीवाद केला की, तज्ञ अहवाल यांनी दिलेल्‍या परिच्‍छेद क्रमांक २ मध्‍ये ‘ Further Antenatal Investigation like MRI, Amniocentesis or Molecular Testing are not justifiable’ असा अहवाल दिलेला आहे आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्ती क्रमांक २ हिला गर्भारपणात दिलेल्‍या वैद्यकीय सेवेमध्‍ये  कोणत्‍याही प्रकारच्‍या ञुटी केलेल्‍या नाही. म्‍हणून वर्तमान तक्रार ही खारीज करण्‍यात यावी. विरुध्‍द पक्षाचे वकीलांनी खालिल न्‍यायनिवाड्यांचा आधार घेतलेला आहे.
  1.  V. Narayana Vs. Sri Venkateswara Institute of Medical Sciences & Anr., III (2012) CPJ (NC)
  2. Kanishka Vs. Dr. Vibha Dua & Anr., I (2015) CPJ 27 (NC)
  3. Senthil Scan Centre Vs. Shanthi Sridharan & Anr., III (2011) CPJ 54 (Supreme Court)

 

  1. विरुध्‍द पक्ष यांचे वकीलांनी तोंडी युक्‍तीवाद केल्‍यानंतर तक्रारकर्ते क्रमांक १ यांनी असा युक्‍तीवाद केला की, दुस-या गर्भारपणाच्‍या  वेळेस झालेले Abortion हे विरुध्‍द पक्ष यांचे कडे झालेले नाहीत आणि दोन्‍ही वेळेसच्‍या  डिलीवरी या नॉर्मल होत्‍या असे विरुध्‍द पक्ष चुकीचे सांगत आहे.  
  2.  आम्‍ही वर्तमान प्रकरणात तक्रारकर्ते यांनी दाखल केलेली सर्व कागदपञे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती हिच्‍या पञाला वकीलांमार्फत दिलेले दिनांक २१/१/२०१३ चे उत्‍तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या स्‍ञीरोग व प्रसुती शास्‍ञ विभाग यांचे विभाग प्रमुखांनी पाठविलेला तज्ञ अहवाल, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेला श्रीमती अल्‍का श्रीवास्‍तव वि. बेस हॉस्‍पीटल, दिल्‍ली कॅन्‍टॉनमेंट, रिवीजन पिटीशन नंबर २१५८/२०१० मधील मा. राष्‍ट्रीय आयोगाचा दिनांक २/७/२०१५ चा न्‍यायनिवाडा, उभयपक्षांचे लेखी युक्‍तीवाद आणि विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेले न्‍यायनिवाडे या सर्वांचे अवलोकन केले.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी असा बचाव घेतला की, प्रचलित वैद्यकीय प्रघाताप्रमाणे सोनोग्राफीच्‍या ३ चाचण्‍या करणे अभिप्रत असते आणि त्‍याप्रमाणे तक्रारकर्ती क्रमांक २ हिच्‍या चाचण्‍या घेण्‍यात आल्‍या  होत्‍या आणि विरुध्‍द पक्ष यांनी कोणत्‍याही प्रकारे सेवेत ञुटी केलेली नाही. त्‍यांनी असाही आक्षेप घेतला की, तक्रारकर्ते यांनी दुस-या वेळेच्‍या  गर्भापणाबाबतची आणि त्‍यावेळी झालेल्‍या गर्भपाताची विरुध्‍द पक्ष क्रमांक १ हिला माहिती दिली नव्‍हती. परंतु तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्‍या  कागदपञांचे बारकाईने अवलोकन केल्‍यास असे दिसून येते की, जेव्‍हा  तक्रारकर्ते  प्रथमच दिनांक  १०/०६/२०१० रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडे तपासणीसाठी गेले त्‍याचवेळेस तक्रारकर्ती क्रमांक २ हिची ते तिसरे गर्भारपण होते आणि दुस-या गर्भारपणाचेवेळी गर्भपात झाल्‍याचे तक्रारकर्ते यांनी कळविले होते याबाबत कागदपञ क्रमांक १ मध्‍ये  खालिलप्रमाणे निरीक्षणे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी स्‍वतः नोंदविली आहे.                                                                                                                                                                 O/H                  1st + 7 Years + TND A/H                                                                                                                                                                           2nd terminated at 7th month at GMC due                                                                                                                                       to anomaly                                                                                                                                                                                                 3rd P.P.                                                                                                                  
    •  

        वरील कागदपञावरुन  हे स्‍पष्‍ट दिसून येते की, दुसरे गर्भापण हे अॅनॉमली असल्‍यामुळे संपुष्‍टात आले होते हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना माहिती होती. यावरुन असे स्‍पष्‍ट दिसून येते की, विरुध्‍द पक्ष यांनी वर्तमान प्रकरणात खोटा बचाव घेतलेला आहे. दुस-या गर्भापणाच्‍यावेळी तक्रारकर्ते यांना गर्भपात झाला होता आणि त्‍यावेळेसही अॅनॉमली होती. असे असतांनाही तिस-या गर्भापणाच्‍यावेळी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी उत्‍तम आणि पूर्ण काळजी (Reasonable and Sufficient Care) तक्रारकर्ते क्रमांक २ हिचेबाबतीत घेतली नसल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही केवळ सोनोग्राफी रिपोर्ट मधील (No Demonstrable fetal abnormality is seen) या निष्‍कर्षाचा आपल्‍या बचावासाठी (Lame excuse) म्‍हणून वापर करीत असल्‍याचे दिसून येते परंतु सोनोग्राफीमधील संपूर्ण रिपोर्ट आणि तक्रारकर्ती हिच्‍याबाबतीत पूर्वी असलेला गर्भपाताचा इतिहास या बाबी विचारात घेवून गंभीरपणे दखल घेतली नसल्‍याचे दिसून येते आणि त्‍यामुळे तक्रारकर्ती हिचेबाबतीत आधुनिक युगात उपलब्‍ध  असलेल्‍या  निरनिराळ्या चाचण्‍या (Doppler Sonography etc.) करण्‍याबाबत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी योग्‍य विचार केलेला नाही असे दिसुन येते. आम्‍ही  मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या अल्‍का श्रीवास्‍वत वि. बेस हॉस्‍पीटल या न्‍यायनिवाड्यातील परिच्‍छेद १७ मधील निरीक्षणे विचारात घेतली आणि त्‍याप्रमाणे 2 trimester scan च्‍या वेळेस Fetal Anomalies या दिसुन येतात आणि ही टेस्‍ट साधारणतः ११ ते १४ व्‍या आठवड्यात करण्‍यात येते. तक्रारकर्ती क्रमांक २ हिने पूर्वीच्‍या गर्भपाताबाबत माहिती दिल्‍यानंतरही विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी योग्‍य त्‍या चाचण्‍या  करण्‍याबाबत तक्रारकर्ती हिला योग्‍य सल्‍ला दिलेला नाही असे दिसुन येते. सदरहु सोनोग्राफी रिपोर्ट वरुन बाळाचे वजन कमी असल्‍याचे सोनोग्राफी तज्ञाने नमुद केले असतांनाही सदरहु बाळाची (गर्भाची) योग्‍य प्रकारे वाढ होत आहे असा विरुध्‍द पक्ष यांचा बचाव खोटा असल्‍याचे दिसून येते. दिनांक २९/७/२०१० च्‍या Ultrasound Report मध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी खालिलप्रमाणे रिपोर्ट नमुद केलेला आहे.

         No obvious congenital Anomaly seen. All anomalies cannot be ruled out on USG. असे निरीक्षणे नोंदविल्‍यावरही योग्‍य त्‍या चाचण्‍या  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी केलेल्‍या नाहीत.

           मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने Laxman Balakrishna Joshi Vs. Timbak Bapu Godbole & Anr., 1969 (1) SCR 206, या न्‍यायनिवाड्यामध्‍ये खालिलप्रमाणे निरीक्षणे नोंदविलेली आहे.

     ‘The duties which a doctor owes to his patient are clear,. A person who holds himself out ready to give medical advice and treatment impliedly undertakes that he is possessed of skill and knowledge for the purpose. Such a person when consulted by a patient owes him certain duties, viz. A duty of care in deciding whether to undertake the case, a duty of care in deciding what treatment to give or a duty of care in the administration of that treatment. A breach of any of those, duties give a right of action for negligence to, the patient. The practitioner must bring to his task a reasonable degree of skill and knowledge and must exercise a reasonable degree of care. Neither the very highest nor a very low degree of care and competence judged in the light of the particular circumstances of each case is what the law requires’

वरील निरीक्षणावरुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी गर्भवती असलेल्‍या तक्रारकर्तीचे बाबत योग्‍य काळजी घेण्‍याची आवश्‍यकता आहे आणि केवळ दिखाऊपणा करण्‍याची गरज नाही. तक्रारकर्तीचे बाळाचे बाबतीत पहिल्‍या २१ आठवड्यापर्यंत गर्भामधील व्‍यंगाचे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना योग्‍य निदान करता आले नाही. महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना गर्भ हा उलटा दिशेने असल्‍याचे दिसून आल्‍यावरही अधिकच्‍या चाचण्‍या करण्‍यात याव्‍या असा योग्‍य सल्‍ला तक्रारकर्ती हिला दिला नाही. विरुध्‍द पक्ष यांच्‍या वकीलांनी वर्तमान प्रकरणात दाखल केलेल्‍या तज्ञ अहवालाचा आधार घेवून विरुध्‍द पक्ष यांनी सेवेमध्‍ये कोणत्‍याही ञुटी केल्‍या नाही असा युक्‍तीवाद केला परंतु सदरहु युक्‍तीवादामध्‍ये तथ्‍य असल्‍याचे दिसून येत नाही. सदहु अहवालामध्‍ये तज्ञांनी परिच्‍छेद क्रमांक १ मध्‍ये खालिलप्रमाणे आपले मत नोंदविले आहे.

     ‘With history of previous child born with congenital anomalies, this pregnancy becomes high risk for the presence of anomalies. However, the type of anomaly in the previous child is not mentioned anywhere in the records.

     तज्ञांच्‍या या मताप्रमाणे पूर्वीच्‍या गर्भपातामध्‍ये Congenital Anomalies असल्‍यातर वर्तमान गर्भारपण हे अतिशय धोक्‍याचे असते असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेल्‍या आहे. जेव्‍हा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी १०/६/२०१० रोजी तक्रारकर्ती हिला तपासले त्‍यावेळेस पूर्वी गर्भपात झाल्‍याचे आणि तो Anomaly मुळे झाल्‍याचे नमुद केले आहे. असे असतांनाही तक्रारकर्ती हिचे गर्भारपण हे धोक्‍याचे आहे असे विचारात घेऊन योग्‍य त्‍या  Advance Tests का केल्‍या नाही असा साहजिकच प्रश्‍न  पडतो आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ती हिला दिलेल्‍या वैद्यकीय सेवेमध्‍ये ञुटी केल्‍या असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.

     सदरहु तज्ञ यांनी त्‍यांच्‍या अहवालामध्‍ये परिच्‍छेद क्रमांक ५ मध्‍ये खालिलप्रमाणे निरीक्षणे नोंदविले आहे.

     ‘At the time of birth antropometric records such as birth wt, length and head circumference are not mentioned. However weight of baby 10 days after birth is written as 1.9 kg. So it seems that baby was born as IUGR or low birth weight.

 या निरीक्षणाप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती हिचे बाबतीत आवश्‍यक त्‍या बाबी सुद्धा वैद्यकीय कागदपञांमध्‍ये नमुद केल्‍या नाहीत आणि म्‍हणून विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती हिला दिलेल्‍या सेवेमध्‍ये ञुटी केल्‍याचे दिसून येते. सदरहु बाबी नमुद न केलेल्‍या असल्‍यामुळे सदरहु तज्ञे यांनी शेवटच्‍या परिच्‍छेद 6 मध्‍ये खालिलप्रमाणे निष्‍कर्ष नोंदविला आहे.

     ‘This baby was followed regularly by the paediatrician, but skeletal dysplasia and hypotonia was detected at the age of 9-10 months by another paediatrician. From the available records it is not clear or cannot be commented whether the skeletal dysplasia was manifest at birth or manifested later as the baby grew.

          वरील निरीक्षणाप्रमाणे उपलब्‍ध असलेल्‍या रेकॉर्डप्रमाणे सदरहु ३ तज्ञ डॉक्‍टरांनी आपले मत नोंदविलेले आहे आणि म्‍हणून सदरहु अहवालाप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी कोणत्‍याही प्रकारे सेवेमध्‍ये ञुटी केलेली नाही असा विरुध्‍दपक्ष यांचे वकीलांचा युक्‍तीवाद मान्‍य करता येत नाही.

       तक्रारकर्ते हिला सिझेरीयन शस्‍ञक्रिया केल्‍यानंतर दिनांक१८/१/२०११ रोजी दवाखान्‍यातुन सुट्टी देण्‍यात आली आणि त्‍यानंतर जुर्ले २०११ पर्यंत तक्रारकर्ती हिने विरुध्‍द पक्ष यांचेकडुन बाळाचे बाबतीत वैद्यकीय सेवा घेतली आहे परंतु या ७ महिण्‍यांचे काळामध्‍ये सुद्धा सदरहु बाळाला हायपोटोनिया असल्‍याचे विरुध्‍द पक्ष यांना दिसून आले नाही आणि त्‍याबाबतही त्‍यांनी वैद्यकीय कागदपञांमध्‍ये नोंद केलेली नाही. आणि जेव्‍हा दिनांक १२/११/२०११ रोजी सदरहु बाळास कलर्स चिल्‍ड्रेन हॉस्‍पीटल येथे नेण्‍यात आले तेव्‍हा डॉ. विनोद गांधी यांनी खालिलप्रमाणे निदान केले आहे.

Diagnosis: FTT/ short stature/Hypotonia/Delayed Motor devp. Admitted for LRTI/Acute Respiratory Distress.

     परंतु विरुध्‍द पक्ष यांनी सदरहु बाळाचे बाबतीत ७ महिण्‍यांचे कालावधीमध्‍ये सुद्धा कोणतीच निरीक्षणे नोंदविली नाही. Hypotonia/Delayed Motor Devp. ह्या बाबी Clinical Examination मुळे समजू शकत नाही असे विरुध्‍द पक्ष यांना म्‍हणावयाचे आहे आणि म्‍हणून त्‍यांचा युक्‍तीवाद चुकीचा आहे असे आमचे मत आहे.

      Hypotonia या बाबतच्‍या मेडीकल लिटरेचर वरुन असे दिसून येते की, जन्‍मानंतर  Hypotonia कोणत्‍याही Injury, Trauma, brain infection like meningitis or encephalitis, head injury झाल्‍याशिवाय होऊ शकत नाही आणि वर्तमान प्रकरणामध्‍ये  तक्रारकर्ती हिचे बाळाला अशा प्रकारे कोणताही आजार झाल्‍याबाबतचा इतिहास नाही आणि म्‍हणून तक्रारकर्ती हिचे बाळाला असलेला आजार हा जन्‍मतः झालेला असु शकतो आणि विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ती हिची गर्भारपणात योग्‍य  प्रकारे वैद्यकीय काळजी घेतली नसल्‍याचे दिसून येते आणि म्‍हणून तक्रार ही केवळ काल्‍पनिक आधारावर केलेली आहे असे म्‍हणता येणार नाही.

       वर्तमान प्रकरण हे वैद्यकीय सेवेमधील निष्‍काळजी व ञुटी याबाबत असल्‍यामुळे मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने Kusum Sharma & Ors. Vs. Batra Hospital & Medical Research Centre and Ors., I (2010) CPJ 29 (Supreme Court) या न्‍यायनिवाड्यात दिलेली वैद्यकीय निष्‍काळजीपणाबाबतची निरनिराळी तत्‍वे (Principles) विचारात घेणे आवश्‍यक आहे. त्‍यामधील वर्तमान प्रकरणाशी निगडीत असलेली खालिल निरीक्षणे म‍हत्‍वाची आहे.

i. Negligence is the breach of a duty exercised by omission to do something which a reasonable man, guided by those considerations which ordinarily regulate the conduct of human affairs, would do, or doing something which a prudent and reasonable man would not do.’

ii. It is duty of a doctor to exercise a reasonable degree of skill and knowledge and a reasonable degree of care.

iii. It is duty of a doctor to study the symptoms and complaints of the patient carefully and to administer standard treatment.

iv. It is duty of a doctor to carry out necessary investigations through appropriate laboratory tests wherever required to arrive at a proper diagnosis.

       सबब वर्तमान प्रकरणातही विरुध्‍द पक्ष यांनी वरीलप्रमाणे काळजी घेण्‍याची आवश्‍यकता होती असे दिसून येते. The doctor  is not held negligent simply because something goes wrong. असा नियम असला तरी वर्तमान प्रकरणातील तक्रारकर्ती हिचे गर्भारपण ही High Risk Pregnancy आहे ही बाब विरुध्‍द पक्ष यांनी विचारात घेवून योग्‍य त्‍या उपाययोजना आणि चाचण्‍या केलेल्‍या नाही असे दिसून येते आणि केवळ Normal Pregnancy मध्‍ये करण्‍यात येणा-या सोनोग्राफीच्‍या तपासण्‍या केल्‍या आणि त्‍या तपासणीमधील सर्व रिपोर्टचे योग्‍य अवलोकन केलेले आहे असे दिसून येत नाही. 

  1. विरुध्‍द पक्षाचे वकीलांनी वर नमुद केलेल्‍या ३ न्‍यायनिवाड्यांचे आम्‍ही  अवलोकन केले. त्‍यापैकी दोन प्रकरणातील वस्‍तुस्थिती वर्तमान प्रकरणात देण्‍यात आलेल्‍या उपचार (Treatment) पेक्षा वेगळी आहे. प्रथम प्रकरण  Acute Myeloid Leukemia च्‍या  रोगाबाबत आहे. व्दितीय प्रकरण हे गर्भारपणापूर्वी करण्‍यात येणा-या HBA-2 Test बाबत आहे आणि त्‍या  प्रकरणात पेशंट ने पूर्वीच्‍या हिस्‍टरी बाबत डॉक्‍टरांना काहीही कल्‍पना दिलेली नाही, माञ वर्तमान प्रकरणात पूर्वीच्‍या गर्भपाताबाबत आणि अॅनॉमलीबाबत डॉक्‍टरांना/विरुध्‍द पक्ष यांना कल्‍पना दिलेली आहे. विरुध्‍द  पक्ष यांनी Senthil Scan Centre Vs. Shanthi Sridharan & Anr.  या न्‍यायनिवाड्याचा आधार घेतला आहे. या प्रकरणात सोनोग्राफी करणा-या डॉक्‍टरांच्‍या क्‍वॉलिफीकेशन बाबत वाद होता आणि म्‍हणून वस्‍तुस्थिती वेगळी आहे. सदरहु न्‍यायनिवाड्यात Ultra Sound is not a perfect depiction of foetus and scan result cannot be 100% conclusive अशी निरीक्षणे सुद्धा नोंदविलेली आहे. सदरहु निरीक्षणाप्रमाणे जर सोनोग्राफीमध्‍ये १०० टक्‍के बरोबर  निष्‍कर्ष मिळू शकत नसेल तर वर्तमान प्रकरणातील विरुध्‍द पक्ष यांनी केवळ सोनोग्राफीचाच आधार घेणे कितपत योग्‍य आहे आणि तक्रारकर्ती हिचे बाबतीत योग्‍य त्‍या Advance Tests (Like Doppler Ultrasound Test etc.)  न करणे ही सुद्धा विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीचे प्रती वैद्यकीय सेवेमध्‍ये ञुटी आहे हे स्‍पष्‍ट दिसून येते. वरील सर्व कारणास्‍तव विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती क्रमांक २ हिला उपचार देतांना वैद्यकीय निष्‍काळजीपणा केलेला आहे आणि तक्रारकर्तीला दिलेल्‍या वैद्यकीय सेवेमध्‍ये ञुटी केलेली आहे असे सिद्ध झालेले आहे म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रमांक १ व २ यावर होकारार्थी उत्‍तर देत आहे.
  2. मुद्दा क्रमांक ३ बाबतः- मुद्दा क्रमांक १ व २ यावर आम्‍ही होकारार्थी उत्‍तर नोंदविल्‍यामुळे  तक्रारकर्ते यांना योग्‍य ती नुकसान भरपाई मिळणे आवश्‍यक आहे. तक्रारकर्ते यांनी वर्तमान प्रकरणात नुकसानीबाबत रक्‍कम रुपये १९,००,०००/- मागणी केली आहे. परंतु सदरहु रक्‍कम ही मोठी आहे असे आमचे मत आहे. विरुध्‍द पक्ष यांनी योग्‍य वेळी तक्रारकर्ते यांना गर्भामधील कमतरतेची माहिती दिलेली नाही आणि म्‍हणून तक्रारकर्ते यांना अपंग स्‍वरुपाचे बाळ प्राप्‍त झालेले आहे सदरहु अपंग बाळाला आयुष्‍यभर सांभाळणे हे कोणत्‍याही माता आणि पित्‍यांना अतिशय अडचणीचे आणि ञासाचे आहे तसेच त्‍याला इतर नॉर्मल बाळापेक्षा उपचारासाठी सुद्धा जास्‍त खर्च लावणे आवश्‍यक आहे. तक्रारकर्ते यांनी सदरहु बाळास मुंबई येथील गुरुनानक हॉस्‍पीटल मध्‍ये सुद्धा तपासणीसाठी नेले होते आणि सदरहु दवाखान्‍यामध्‍ये त्‍याला सन २०१३ मध्‍ये २,००,०००/- रुपयांपेक्षा जास्‍त खर्च शस्‍ञक्रियेसाठी लागेल असे सांगण्‍यात आले होते. वरील सर्व वस्‍तुस्थिती विचारात घेता तक्रारकर्ते यांना शारीरिक, मानसिक ञासापोटी आणि सतत लागणा’-या वैद्यकीय खर्चापोटी रक्‍कम रुपये १२,००,०००/- मिळणे योग्‍य आणि वाजवी आहे असे आमचे मत आहे. वर्तमान प्रकरण सन  २०१३ पासुन तक्रारकर्ते यांना चालवावे लागले आणि म्‍हणून त्‍यांना तक्रारीच्‍या खर्चाबाबत रक्‍कम रुपये ३०,०००/- मंजूर करणे योग्‍य आणि वाजवी आहे असे आमचे मत आहे. सबब आदेश खालिलप्रमाणे..

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ते क्रमांक १ व २ यांचे बाळाला देण्‍यात आलेल्‍या वैद्यकीय सेवेमध्‍ये आणि तक्रारकर्ती क्रमांक २ हिला देण्‍यात आलेल्‍या वैद्यकीय सेवेमध्‍ये निष्‍काळजीपणा करुन ञुटी केलेल्‍या आहेत असे जाहीर करण्‍यात येते.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी संयुक्‍तीकरित्‍या अथवा वैयक्‍तीकरित्‍या तक्रारकर्ते क्रमांक १ व २ यांना शारीरिक व मानसिक ञासाच्‍या नुकसान भरपाईबाबत  रक्‍कम रुपये १२,००,०००/- (रुपये बारा लाख)  द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्ते यांना खर्चापोटी रुपये ३०,०००/-द्यावे.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. विरुध्‍द पक्ष यांनी वरील आदेशाचे पालन प्र‍त प्राप्‍त झाल्‍यापासुन ३० दिवसाचे आत केले नाही तर तक्रारकर्ते यांना आदेशाच्‍या दिनांकापासुन प्रतीदिन रक्‍कम रुपये ३००/- आदेशाचे पूर्णपणे पालन करेपर्यंत देण्‍यात यावे.
  7. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  8. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.