Maharashtra

Nagpur

CC/496/2019

NEELIMA PURUSHOTTAM HARODE - Complainant(s)

Versus

DR. SATBHAMA GOUTAM NANIWADEKAR - Opp.Party(s)

ADV. SHRI. VIVEK AWCHAT

05 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/496/2019
( Date of Filing : 30 Aug 2019 )
 
1. NEELIMA PURUSHOTTAM HARODE
R/O. SATLAJ PLOT NO. 9, NEAR BSNL, KHAMALA ROAD, PRATAP NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DR. SATBHAMA GOUTAM NANIWADEKAR
R/O. PLOT NO. 49, SHIVAM APARTMENT, KHAMALA, RAMKRISHNA NAGAR, NEAR PRATAP NAGAR SQUARE, OPP. UNION BANK, NAGPUR-440025
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 05 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्तीला पाठीचा ञास असल्‍यामुळे ती स्‍पेशालिस्‍ट डॉक्‍टर कडुन उपचार घेत होती परंतु तिचा असलेला पाठीचा ञास कमी करण्‍याकरीता एका पर्यायी थेरपी मदतीची गरज होती. तक्रारकर्ती तीच्‍या घराजवळ असणा-या अॅक्‍युपेंचर स्‍पेशालिस्‍ट चा शोध घेत होती. त्‍याकरीता तीने इंटरनेट च्‍या आधारे गुगल वेबसाईटवर विरुध्‍द पक्षाची जाहीरात बघीतली त्‍यामध्‍ये विरुध्‍द पक्ष अॅक्‍युपंचर थेरपीमध्‍ये तज्ञ आणि एम.डी. आहेत व  जाहीरातीमध्‍ये नमुद होते की, विरुध्‍द पक्ष पाठीच्‍या ञासावर, अस्‍थमा मायग्रेन यावर उपचार करण्‍यात तज्ञ आहेत. त्‍याअनुषंगाने तक्रारकर्तीच्‍या  पतीने दिनांक १५/२/२०१९ रोजी विरुध्‍द पक्षाचे क्लिनीक ला जावुन तक्रारकर्तीवर करावयाच्‍या उपचाराच्‍या  अनुषंगाने चौकशी केली. तक्रारकर्तीच्‍या पतीने विरुध्‍द पक्षाला यापूर्वी तक्रारकर्तीवर केलेल्‍या  उपचाराचे दस्‍ताऐवज दाखविले. विरुध्‍द पक्षाने दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर तक्रारकर्तीला शंभर टक्‍के आराम अॅक्‍युपंचर उपचारादरम्‍यान होईल असे आश्‍वासीत केले. विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या आश्‍वासनानुसार तक्रारकर्तीच्‍या पतीने तक्रारकर्तीला विरुध्‍द  पक्षाचे क्लिनीक ला नेले. त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाने इतर पेशंटवर केलेल्‍या  उपचारामुळे त्‍यांना आराम मिळाल्‍याबाबतचे पेशंट चे छायाचिञ दाखविले. तक्रारकर्तीने विरुध्‍द  पक्षाकडे असलेल्‍या वैद्यकीय शिक्षणाबाबत चौकशी केली असता विरुध्‍द  पक्षाने रायपूर छत्‍तीसगड येथुन एम.डी. अॅक्‍युपंचर ही डीग्री प्राप्‍त केल्‍याचे सांगितले. तिला या व्‍यवसायाच्‍या पाच ते दहा वर्षाचा अनुभव असुन तिचा नोंदणी क्रमांक ००९ हा आहे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला अॅक्‍युपंचर थेरपी उपचाराकरीता रुपये २६,०००/- आगाऊ जमा करण्‍यास सांगितले व ते नगदी द्यावयास सांगितले. विरुध्‍द पक्षाला भेट द्यावयाचे दिवशी तक्रारकर्तीकडुन रुपये ४००/- कन्‍सलटन्‍ट फी म्‍हणून घेण्‍यात आली व ती तक्रारकर्तीने दिनांक १५/२/२०१९ रोजी अदा केली. तसेच दिनांक १५/२/२०१९ रोजी तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला पहिला हप्‍ता रुपये ११,०००/- नगदी अदा केले व तो विरुध्‍द पक्षाने स्विकारला व त्‍याच दिवशी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीवर उपचारास सुरवात केली. विरुध्‍द पक्षाने उपचाराचे पहिले सेशन दिनांक १५/२/२०१९ रोजी संपल्‍यानंतर दुस-या सेशनपूर्वी दुसरा हप्‍ता रुपये १५,०००/-अदा करण्‍यास तक्रारकर्तीला सांगितले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीवर उपचारा दरम्‍यान तक्रारकर्तीच्‍या संपूर्ण शरीरावर टाचणी ने टोचले. शरीरावरील प्रेशर पॉईंट अॅक्‍टीवेट करणे जरुरी आहे. यामुळे पाठीचे दुखने कमी होते. अॅक्‍युपंचर थेरपी मध्‍ये विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या  शरीरावर टाचणी टोचुन त्‍यामधुन इलेक्‍ट्रीक शॉक तक्रारकर्तीला दिले. सदरचा उपचार दिनांक १५/२/२०१९ ते दिनांक १९/२/२०१९ पर्यंत दररोज दोन तास चालला. परंतु उपचाराचे दहा सेशन पूर्ण होऊनही तक्रारकर्तीला आराम मिळाला नाही व पाठीचा ञास कमी व्‍हायचे ऐवजी तक्रारकर्तीच्‍या  पाठीचा दुखण्‍याचा ञास वाढला. पाठीच्‍या दुखण्‍यात झालेली वाढ तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाचे निर्दशनास आणुन दिले परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला सांगितले की, सदर उपचारामध्‍ये ञास सहन करावा लागेल. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या वाढत्‍या दुखण्‍याकडे दुर्लक्ष केले. परंतु तक्रारकर्तीचे दुखने वाढल्‍यामुळे उपचारादरम्‍यान विरुध्‍द पक्षाने गोळ्याची नावे उघड न करता तक्रारकर्तीला अॅलोपॅथी गोळ्या दिल्‍या. जेव्‍हा  तक्रारकर्तीने सदर औषधी घेण्‍यास नकार दिला तेव्‍हा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दटावुन सांगितले की, त्‍याचा परिणाम पुढच्‍या अॅक्‍युपंचर उपचारावर होईल. तक्रारकर्तीला तिला होत असलेल्‍या ञासापासुन आराम मिळाला नाही. शेवटी तक्रारकर्तीने दिनांक २०/०२/२०१९ रोजी तज्ञ डॉक्‍टरांशी संपर्क साधला. व त्‍यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार डॉक्‍टरांनी तक्रारकर्तीला एम.आर.आय. स्‍कॅन काढावयास सांगितले. एम.आर.आय. स्‍कॅन रिपोर्टवरुन हे निर्दशनास आले की, तक्रारकर्तीची प्रकृती अॅक्‍युपंचर उपचारामुळे अधिक खालावली आहे. तक्रारकर्तीला झालेल्‍या अधिकच्‍या  ञासामुळे डॉक्‍टरांनी तक्रारकर्तीला ऑपरेशन करावयास सांगितले व त्‍यानुसार तक्रारकर्तीला दिनांक २५/२/२०१९ रोजी दवाखान्‍यात भरती करुन तक्रारकर्तीचे दिनांक २६/०२/२०१९ रोजी डॉक्‍टरांनी ऑपरेशन केले. गेटवेल हॉस्‍पीटलमध्‍ये उपचारानंतर डॉक्‍टरांनी दिनांक १/३/२०१९ रोजी तक्रारकर्तीला दवाखान्‍यातुन सुटी दिली. ऑपरेशन नंतर तक्रारकर्तीला तीन महिने घरी आराम करावयास सांगितले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीवर अॅक्‍युपंचर थेरपी या अव्‍यवसायीक उपचारानंतर केलेल्‍या उपचारामुळे तक्रारकर्तीला ऑपरेशन करावे लागले. त्‍यामुळे तक्रारकर्तीला रुपये २,००,०००/- खर्च आला. तक्रारकर्तीच्‍या पतीने तक्रारकर्तीवर केलेल्‍या  चुकीच्‍या उपचारामुळे विरुध्‍द  पक्षाला त्‍याने त्‍यापोटी दिलेल्‍या रकमेची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्षाने उध्‍दटपणामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीला उत्‍तर दिले. तक्रारकर्तीच्‍या पतीने विरुध्‍द पक्षाला रक्‍कम परत दिली नाही तर पोलिस स्‍टेशन मध्‍ये तक्रार दाखल करील असे सांगितले. त्‍याप्रमाणे दिनांक १३/३/२०१९ रोजी विरुध्‍द पक्षाने रुपये १०,०००/- परत केले आणि उर्वरीत रुपये १६,०००/- परत करण्‍याचे आश्‍वासीत केले. परंतु अनेकदा विनंती करुनही तक्रारकर्तीला रक्‍कम परत केली नाही.
  4. दिनांक १३/३/२०१९ रोजी जेव्‍हा तक्रारकर्तीच्‍या पतीने उपचाराचे दस्‍ताऐवजाची मागणी केली त्‍यावेळी प्रथमच विरुध्‍द पक्षाने स्‍वतःच्‍या  हस्‍ताक्षराचे दस्‍ताऐवज दिले. त्‍यामध्‍ये तिने लिहुन दिले की, ती काही रक्‍कम परत करीत आहे जी तीने तक्रारकर्तीकडुन घेतली होती. तक्रारकर्तीने अनेकदा विनंती करुनही विरुध्‍द पक्षाने रक्‍कम परत केली नाही. करीता तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द पोलिस स्‍टेशन ला दिनांक १९/०३/२०१९ रोजी लेखी तक्रार दाखल केली परंतु पोलिस अधिका-यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला दिनांक १/८/२०१९ ला कायदेशीर नोटीस बजावली व ती विरुध्‍द पक्षाला प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने दखल घेतली नाही करीता तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्ष अॅक्‍युपंचर थेरपी क्लिनीक चालवुन अनुचित व्‍यापार करीत आहे असे घोषित व्‍हावे व विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की त्‍यांनी अनुचित व्‍यापार पद्धत बंद करावी.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की त्‍यांनी तक्रारकर्तीकडुन घेतलेल्‍या रकमेपैकी उर्वरीत देय रक्‍कम रुपये १६,०००/- परत करावी व मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ३०,०००/- अदा करावा.
  3. तक्रारकर्तीला कराव्‍या लागलेल्‍या ऑपरेशन पोटी तक्रारकर्तीला रुपये २,००,०००/- अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्षाला दिनांक ५/१०/२०१९ रोजी नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष मंचासमोर हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ३/१२/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर तसेच लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

       

       अ.क्र.                  मुद्दे                                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने दोषपूर्ण सेवा दिली काय व अनुचित                               नाही

व्‍यापार पद्धतीचा अवलंब केला काय?                                                                               

  1. काय आदेश ?                                                                      अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडुन तिला असलेल्‍या पाठदुखीकरीता अॅक्‍युपंचर थेरेपी अंतर्गत तिच्‍यावर दिनांक १५/२/२०१९ ते १९/२/२०१९ पर्यंत १० सेशनमध्‍ये उपचार करुन घेण्‍याकरीता विरुध्‍द पक्षाला दिनांक १५/२/२०१९ रोजी रुपये ११,०००/- नगदी दिले व उर्वरीत रक्‍कम पुढच्‍या सेशनमध्‍ये  देऊन उपचाराकरीता एकुण रक्‍कम २६०००/- अदा केले. तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल निशानी क्रमांक २ चे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीवर दिनांक १५/२/२०१९ ते १९/२/२०१९ या कालावधीमध्‍ये दररोज दोन तासाप्रमाणे १० सेशनमध्‍ये अॅक्‍युपंचर थेरेपी अंतर्गत उपचार केले. तक्रारकर्तीला उपचा-यादरम्‍यान आराम न मिळाल्‍यामुळे तीला दुस-या तज्ञ डॉक्‍टरांची मदत घेऊन ऑपरेशन करावे लागले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला पैशाची मागणी केली. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर असे निर्दशनास येते की, विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्तीला रुपये १०,०००/- परत केले असुन उर्वरीत रक्‍कम रुपये १६,०००/- उपचारापोटी घेतली. त्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचेमधील करार संपुष्‍टात आला असुन तक्रारकर्तीला विरुध्‍द पक्षाकडुन तिच्‍यावर करण्‍यात आलेल्‍या उपचारामुळे तक्रारकर्तीला ञास झाला हे सिद्ध करण्‍याकरीता तक्रारकर्तीने कोणत्‍याही वैद्यकीय तज्ञांचा अहवाल मंचाचे अभिलेखावर दाखल केलेला नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीप्रती अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी व दोषपूर्ण सेवा देणारी कृती केली नसल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.