Maharashtra

Osmanabad

cc/151/2012

nanasaheeb Vithal Kumbhar - Complainant(s)

Versus

Dr. Sanjay Parade - Opp.Party(s)

S.A.Deshpande

11 Sep 2014

ORDER

Heading1
Heading2
 
Complaint Case No. cc/151/2012
 
1. nanasaheeb Vithal Kumbhar
R/O Alani Tq. and/Dist. Osmanabad
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

ग्राहक तक्रार  क्र.  151/2012

                                                                                    अर्ज दाखल तारीख : 03/07/2012

                                                                                    अर्ज निकाल तारीख: 11/09/2014

                                                                                    कालावधी: 02 वर्षे 02 महिने 09 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.   नानासाहेब विठठल कूंभार,

     वय-40 वर्षे, धंदा – व्‍यापार,

     रा.आळणी ता.जि.उस्‍मानाबाद.                           तक्रारदार

                            

                            वि  रु  ध्‍द

 

1.    डॉ. संजय पराडे,

वय-45 वर्षे, धंदा- पशुवैद्यकीय अधिकारी,

रा. लासुर्णे, ता. इंदापुर, जि. पुणे.

 

2.    डॉ. राजकुमार रंगनाथ ढवळशंख,

वय- सज्ञान, धंदा-पशु वैद्यकीय अधिकारी,

      रा.उपळे (मा.) ता.जि. उस्मानाबाद.                    विरुध्‍द  पक्षकार

 

 कोरम :           1) मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                                    २) मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍.

                                     तक्रारदारातर्फे विधीज्ञ      :  श्री.एस.ए.देशपांडे.

               विरुध्‍द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.व्‍ही.तांबे.

                        निकालपत्र

मा. सदस्‍य श्री. मुकुंद बी. सस्‍ते यांचे व्‍दारा:

1)    तक्रारदाराच्‍या तक्रारी अर्जाचे थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे :

      तक्रारदार मौजे आळणी ता.जि.उस्‍मानाबाद येथील रहीवाशी असून व्‍यवसायाने कुंभार आहे. मातीचे साहित्‍य घडविणे व ते विक्री करणे हा अर्जदाराचा एक व्‍यवसाय आहे.  मातीचे साहित्‍य घडविणे लग्‍नाच्‍य वरातीसाठी घोडे पालन केलेले होते व त्‍या घोडयापासून तक्रार अर्जदार लग्‍न सराईमध्‍ये उत्‍पन्‍न घेत होते. या शिवाय तक्रार अर्जदार आपल्‍या घोडयाच्‍या सहाय्याने कुंभार व्‍यवसाय कही करत असत. तक्रारदाराने दोन उमदे घोडे खरेदी केले. त्‍यासाठी अनुक्रमे रु.1,60,000/- व दुस-या घोडयासाठीजो पाच वर्ष वयाचा रु.1,85,000/- इतकी किंमत देवून विकत घेतलेला होता. त्‍या दोन्ही घोडयाच्‍या सहाय्याने तक्रारदार लग्‍न सराईतील वरातीसाठी भाडे कमवत असत. प्रत्‍येक घोडयास पाच ते सात हजारापर्यंत एका समारंभास अर्जदारास मिळात असत. घोडयाने माज करु नये व त्‍यांची प्रकृती सुदृढ रहावी या दृष्‍टीकोणातुन घोडयांचे निर्बीजकरण शस्‍त्रक्रिया करुन घेणे जरुरी व आवश्‍य होते व अशा प्रकारचे निर्बिजकरणाची शस्‍त्रक्रिया उत्‍तम प्रकारे करणारे व त्‍यासाठी गावोगाव जावून फिरुन खाजगी स्‍वरुपाची शस्‍त्रक्रिया करण्‍याचा प्रयत्‍न विप क्र.1 हा करत असत. विप क्र.1 याला रु.8,000/- दिले. विप क्र.1 यांनी दि.13/05/2012 रोजी आळणी येथे येवून शस्‍त्रक्रीया करण्‍यासाठी पाचारण केले. विपने सदर घोडयांची शस्‍त्रक्रीया करीत असतांना हलगर्जीपणा व कसुरही केला. त्‍यामुळे घोडयास रक्‍तस्‍त्राव सुरु झाला व ते बंद होण्‍याची कुठलीही शक्‍यता दिसुन आली नाही. त्‍यामुळे त्‍याबाबत विप क्र. 1 याला सांगितले त्‍यावर विप क्र.1 यांनी माझे मित्र डॉ. शंकर रामा राठोड यांना सुचना देतो व जरुर ते औषधोपचार कसा करायचा हे ही सांगतो व त्‍याप्रमाणे ते घोडयाचा उपचार करतील, काळजी करु नये अशी खात्री दिली.  त्‍यानुसार डॉ. शंकर राठोड यांनी घोडयाची तपासणी केली व सांगितले की निर्बीजकरण शस्‍त्रक्रिया चुकीची व निष्‍काळजीपणे झाल्‍यामुळे रक्‍तस्‍त्राव सुरु झालेला आहे. तथापी विप क्र.1 यांनी सांगितल्‍याप्रमाणे त्‍यांनी औषधउपचार केले. मात्र दोन्‍ही घोडे अनुक्रमे 21 व 22 मे 2012 रोजी मेले. म्‍हणून सदरच्‍या घोडयांचा पोस्‍टमार्टम विप क्र.2 यांचेकडे केला असता त्‍यांनी एक पोस्‍टमार्टम रिपोर्ट दिला व दुसरा रिपोर्ट विप क्र.1 व 2 यांच्‍यात संगनमत असल्‍याने वारंवार विनंत्‍या करूनही दिला नाही. सदर घोडयांचा मृत्‍यु झाला व त्‍यामुळे मिळणारे 40 ते 50 हजाराचे 15 ते 20 वर्षे मिळणारे उत्‍पन्‍न बंद झालेले आहे. सदर घोडे मेल्‍यामुळे अर्जदार धास्‍ती घेवून आजारी पडले आहे. म्‍हणून विप क्र.1 व 2 यांचेकडून हलगर्जीपणाने  केलेले घोडयाचे निर्बिजकरण व त्‍यामुळ झालेला घोडयांचा मृत्‍यु यांची किंमत रु.3,45,000/- व त्‍याचप्रमाणे अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी व खर्चासाठी विप कडून रु.50,000/- व या अर्जापोटी रु.5,000/- असे मिळुन रु.4,00,000/- मिळणेत यावेत व तसा आदेश देण्‍यात यावा. अशी विनंती केली आहे.

 

    तक्रारदाराने तक्रारीसोबत कागदपत्रांची यादीवर घोडयाचे फोटो, जनावर विक्री 2 पावत्‍या,  जिल्‍हा अधिकारी साहेबांना केलेला अर्ज व त्‍यांनी दिलेला रिपोर्ट, पोलीस निरीक्षक साहेबांना केलेला अर्ज, वर्तमान पत्रातील कात्रण संख्‍या दोन, डॉक्‍टराच्‍या पत्‍याचे कार्ड, घोडयावर केलेला उपचार औषधे ई. कागदपत्रे दाखल केली आहेत.  

 

2)  सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्‍द पक्षकार क्र.1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्‍यांनी दि.05/12/2012 रोजी आपले म्‍हणणे दाखल केले ते संक्षीप्‍त स्‍वरुपात खालीलप्रमाणे

 

     विप क्र.1 हे डॉ.संजय पराडे हे पशुधन विकास अधिकारी म्‍हणुन मौजे लासुर्णे ता. इंदापुर जि. पुणे येथे शासकिय सेवेमध्‍ये आहेत. विप क्र.1 हे वर उल्‍लेखलेल्या शासकिय दवाखान्‍यामध्‍ये पशुधन विकास अधिकारी म्‍हणुन नौकरीस असल्‍याने व विप क्र.1 यांनी अर्जदाराच्‍या घोडयांवरील शस्‍त्रक्रिया योग्‍य ती काळजी घेवून केली आहे तसेच सदर शस्‍त्रक्रिया विप क्र.1 यांनी तक्रारदाराकडून पैस न घेता मोफत केलेली असल्‍याने तक्रारदार हा विप क्र.1 चा ग्राहक होवू शकत नाही. अर्जदाराने डॉ. शंकर राठोड यांच्‍याकडून उपचार घेतल्‍याचे नमूद केले मात्र त्‍यांना आवश्‍यक पार्टी म्‍हणुन प्रकरणी समाविष्‍ठ केले नाही.  घोडयांचा मृत्‍यू रक्‍तस्‍त्रावामुळे झाला नाही कारण घोडे दि.13/05/2012 रोजी शस्‍त्रक्रिया झाली व घोडयाचा मृत्‍यू दि.21/05/2012 व 22/05/2012 रोजी झाला कारण रक्‍तस्‍त्राव झाल्‍यावर घोडा एवढया काळ जगू शकत नाही. विप क्र.1 यांचा डॉ.शंकर राठोड नावाचा कोणी मित्र नाही. तक्रारदाराने ऑपरेशननंतर योग्य ती काळजी न घेतल्‍याने व तज्ञ पदवीधर पशुवैद्यकीय अधिका-याकडून योग्‍य ते उपचार करुन घ्‍यावे लागतील असे सांगून देखील तसे न केल्‍याने सदर घोडे मृत्‍यू पावले. विप क्र.1 हे महाराष्‍ट्र शासनाच्‍या सेवेत कार्यरत असून शस्‍त्रक्रियेत नाव लौकिक मिळविलेला आहे. विप क्र.1 शेतक-यांना सुटटीच्‍या दिवशी गरजु शेतक-यांना त्‍यांच्‍या प्राण्‍यांवर मोफत शस्‍त्रक्रिया करुन देतात. तक्रारदारची तक्रार खोटी असून व बनावट असून खर्चासह फेटाळण्‍यात यावी. विप क्र.1 यास मानसिक व आर्थिक त्रास दिल्‍यामुळे  अर्जदाराकडून रु.10,000/- खर्चाबाबत या विपस मिळणे न्‍याय आहे असे नमूद केले आहे

 

3)  सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्‍द पक्षकार क्र.2 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्‍यांनी दि.15/09/2013 रोजी आपले म्‍हणणे दाखल केले ते संक्षीप्‍त स्‍वरुपात खालीलप्रमाणे.

 

      तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार चुकीची व काल्‍पनीक आहे. विप क्र.2 हा पशुधन विकास अधिकारी म्‍हणुन मौजे उपळा ता. जि. उस्‍मानबाद येथे शासकिय सेवेमध्‍ये आहे. सदरील विपने मयत घोडयाचे पोष्‍ट मार्टम मोफत कलेले असल्‍याने तक्रारदार विपचा ग्राहक होवू शकत नाही. अर्जदार घोडयांचा उपयोग व्‍यवसायासाठी करत असल्‍याने मे. न्‍यायमंचात तक्रार दाखल करण्‍याचा कायदेशीर अधिकार नाही. तक्रारदाराने सांगितलेल्‍या किंमत हया अवास्‍तव आहे. प्रत्येक घोडयापासून मिळणारे उत्‍पन्‍न काल्‍पनिक आहे. दि.22/05/2012 रोजी ठाणे अंमलदार पोलीस दुरक्षेत्र येडशी यांचे पत्र प्राप्‍त होताच अर्जदाराचे सदर घोडयांची पाहणी केली असता सदर घोडा संपूर्ण सडलेला होता. व दुसरा घोडयाचे पोस्‍ट मार्टम रिपोर्ट करुन संबंधित पोलीस स्‍टेशनला देवून रितसर पोहोच घेतलेली आहे. सदर घोडे हे केवळ ऑपरेशन नंतर योग्‍य ती काळजी न घेतल्‍यामुळे गॅस गँगरीन झाल्‍याने मयत झाले. सदर बाबत तक्रारदाराने स्‍वच्‍छतेची काळजी न घेतल्‍याने तक्रारदारामुळेच सदर घटना घडली असून यास तक्रारदारच जबाबदार आहे असे नमूद केले आहे. व्‍हीसेरा अहवालकरीता पोलीसांना कळवून देखील व्‍हीसेरा ताब्‍यात घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत घेवून गेलेले नाहीत. विप क्र. 2 यांची विप क्र.1 यांच्‍याशी ओळख नाही. म्‍हणून सदरचा दावा खर्चासह नामंजूर करावा तसेच सदर घटनेबाबत विपस मानसिक व आर्थिक त्रास दिल्‍यामुळे अर्जदाराकडून रु.10,000/- खर्चाबाबत विपस मिळावे असे नमूद केले आहे.   

 

4)    तक्रारदाराची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्‍हणणे, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्‍यादींचा विचार करता आम्‍ही निष्‍कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्‍यांचे निष्‍कर्ष खाली दिलेल्‍या कारणांसाठी देतो.

मुद्ये                                  निष्‍कर्ष

1)  तक्रारदार विरुध्‍द पक्षकार यांचा ग्राहक होतो काय ?                   होय.

 

2)  विरुध्‍द पक्षकारने अर्जदाराच्‍या सेवेत त्रुटी केली आहे का ?              होय.

 

3)  अर्जदार नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे काय ?                 होय.

 

4)  काय आदेश ?                                                                         शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्षाचे विवेचन  

5)   मुद्या क्र.1 चे विवेचन:

     विप क्र.1 यांनी वरील शस्‍त्रक्रीया पैसे न घेता मोफत केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे विप क्र.1 चे ग्राहक होवू शकत नाही हा बचाव विप क्र.1 घेतलेला आहे. शासकीय सेवेच्‍या दरम्‍यान पशु सेवार्थ गरजू शेतक-यांना त्‍यांच्‍या प्राण्‍यांवर मोफत शस्‍त्रक्रीया / उपचार करुन देतात. अशा स्‍वरुपाचे निवेदन केलेले आहे. या संदर्भात तक्रारदाराने विपची सेवा ही मोबदला घेवून घेतली काय हा प्रश्‍न उरतो. परंतु विपने हेही मान्‍य केलेले आहे की, ते शासकीय सेवेत लासर्णी ता. इंदापुर येथे आहे व सुटटीच्‍या दिवशी फक्‍त मोफत सेवा देतात. अर्थातच शासकीय सेवेमध्‍येही त्‍यांना पगार दिला जातो व येणा-या ग्राहकांना मोफतच किंवा अत्‍यंत अल्‍प दरात ही शासकीय सेवा दिली जाते. त्‍यामुळे फक्‍त उर्वरीत वेळेत मोफत सेवा देतात असे त्‍यांचे म्‍हणणे हे त्‍यांची शासकीय सेवा वाचविण्‍यासाठी आहे. प्रत्यक्षात 200 किलोमिटर वरुन कोणताही खर्च न घेता तसेच तक्रारदाराची विप क्र.1 चे कोणतेही नाते संबंध नसतांना किंवा तशी कोणतीही ओळख नसतांना विना मोबदला पुणे जिल्‍हयातुन उस्‍मानाबाद जिल्‍हयात येवून आपली सेवा विना मोबदला देतात हे खरे नाही. सर्वसाधारण ग्रामिण भागात तसेच काही अंशी शहरी भागातही अनेक सेवा विना पावती पैसे घेवून दिली जाते. त्‍या मागे कायदेशीर कार्यवाही पासून वाचणे हा सेवा देणा-याचा उददेश असतो. ही सुध्‍दा ग्रा. सं.का. नुसार कलम 2 (r) unfair practice आहे. किमान पक्षी या प्रकरणात तरी तो असावा कारण विप हा शासकीय सेवेत आहे त्‍यामुळे तो पावती देण्‍याचे टाळतो. त्यामुळे याबाबत न्‍यायीक नोंद घेवून सदरची सेवा ही मोबदल्याच्‍या स्वरुपात दिलेली आहे या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत व चार्ज केलेली रक्‍कमेबाबत वाद जर असता तर त्‍यावेळी पावती ही कागदपत्रात मुख्‍य बाब ठरली असती परंतु तो वाद प्रत्‍यक्ष प्रकरणात नाही किंवा तक्रारदाराची तशी मागणीही नाही. तसेच सदरची सेवा ही implied contract च्‍या दृष्‍टीकोणातूनही पाहणे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने योग्‍य वाटते. म्‍हणून आम्‍ही मुद्या क्र.1 चे उत्‍तर होय असे देतो.

6)   मुद्या क्र. 2 व 3 चे विवेचन:

    विप क्र.1 ने ही बाब मान्‍य केली आहे कि, त्‍यांने तक्रारदाराच्‍या दोन्‍ही घोडयावरही शस्‍त्रक्रिया केलेली आहे. परंतु शस्‍त्रक्रियेची व्‍यवस्‍था केल्‍यानंतर दि.13/05/2012 रोजी शस्‍त्रक्रिया झाल्‍यानंतर रक्‍तस्‍त्राव बंद झाला नाही तर घोडा जिवंत राहू शकत नाही व ऑपरेशन नंतर तक्रारदाराने घ्‍यावयाची काळजी न घेल्‍याने व गोठयाची निगा न ठेवल्‍याने म्‍हणेजेच पोष्‍ट ऑपरेटीव्‍ह गोष्‍टीत घ्‍यावयाची काळजी न घेतल्‍याने सदर घटना घडली. असे म्‍हंटले आहे. त्‍यामुळे या संदर्भात दुसरे शपथपत्र जे की डॉ.शंकर रोठोड यांनी दिलेले आहे व त्‍यामध्‍ये त्‍यांनी डॉ. पराडे यांनी शस्‍त्रक्रिया केल्‍याचे व दि.13/05/2012 रोजी संध्‍याकाळी 5.00 फोन करुन ट्रीटमेंट देणे विषयी सांगितल्‍याचे आढळून येते व शस्‍त्रक्रियेमुळे घोडयाच्‍या अंगावर सुज जास्‍त दिसुन येते हे डॉ.पराडे यांना सांगितल्‍याचे शपथपत्रावर नमूद केले  आहे. याच्‍या उलट अनुषंगाने विप क्र.2 डॉक्‍टर राजकूमार ढवळशंख जे उपळा पशु वैदयकीय अधिकारी म्‍हणुन आहेत, त्‍यांनी जे म्‍हणणे दिलेले आहे व शपथपत्र केलेले आहे त्‍यामध्‍ये घोडयाचा मृत्‍यू हा पोष्‍ट ऑपरेटीव्‍ह केअर न घेण्‍यात आल्‍यामुळे झाल्‍याचे म्‍हणणे आहे. तथापि राजकुमार ढवळशंख यांनी एम.एल.सी. केस असल्‍यामुळे पी.एम. रिपोर्ट दिला नाही. तसेच त्‍यांच्‍यावर डॉ. पराडे यांचे ओळख नाही असे म्‍हणणे आहे. त्‍यांच सोबत दिलेला अहवाल हा अंतीम अहवाल नसल्‍याचाही मुद्या मांडलेला आहे. त्‍यामुळे डॉ. राठोड  त्‍यांनी सदर घोडयांच्‍या मृत्‍यू संबंधी शपथपत्र दाखल केले आहे त्‍यात त्‍यांनी गोठयाची पाहणी केली असता तेथे पुर्णपणे फरशी केलेली असून अर्जदाराचा गोठा स्‍वच्‍छ होता. केवळ रक्‍तस्‍त्राव जास्‍त झाल्‍याने व शस्‍त्रक्रियेपुर्वी व नंतर तो थांबविणे कामी योग्य दक्षता डॉ. पराडे यांनी न घेतल्‍यामुळे सदर घटना घडलेली आहे असे म्‍हंटलेले आहे. दोन्‍ही डॉक्‍टरांचे परस्‍पर विरोधी शपथपत्र दाखल झाल्‍यामुळे डॉ.राजकुमार ढवळशंख यांच्‍या पी.एम. रिपोर्टची पडताळणी केली असता त्‍यांनी दि.23/05/2012 रोजी फक्‍त एका घोडयाचा पी.एम. रिपोर्ट केल्‍याचे आढळून येते दुस-या घोडयाच्‍या संदर्भात दुसरा घोडा सडलेल्‍या अवस्‍थेत असल्‍यामुळे पी.एम. करणे शक्‍य झाले नाही असे म्‍हणणे दिलेले आहे. सदरचा अहवाल पो.नि. उस्‍मानाबाद ग्रामीण यांना दिलेला आहे. सदरचा अहवाल हा पो.नि. उस्‍मानाबाद यांनी पत्र दिल्‍यानंतर केला असून सदरबाबत कागदोपत्री पुर्तता करण्‍यात तक्रारदाराचा वेळ गेल्याचे दिसते व त्‍यामुळेच पहीला घोडयापासून दुर्गंधी येत असावी व त्‍यामुळे त्‍याचे पोस्‍ट मार्टम करणे टाळलेले दिसते मात्र पशु वैदयकीय अधिकारी यांनी नमुद केल्‍याप्रमाणे दि.21/05/20012 रोजी मृत्‍यू पावलेल्‍या घोडा दि.23/05/2012 रोजी नेहमी शवविच्‍छेदन करणा-या डॉक्‍टरांसाठी शवविच्‍छेदन न करता येण्‍यासारखी परि‍स्थिती निर्माण होते हेच मुळी संशयास्‍पद आहे. तसेच त्‍यांचे म्‍हणणे की सदर गोठयात स्‍वच्‍छता नसल्याने इन्‍फेक्‍शन झाले या म्‍हणण्‍यास दुजोरा म्‍हणून त्‍यांनी सदर गोठयात असणा-या अस्‍वच्‍छतेबाबत कोणतेही विशीष्‍ठ उल्‍लेख केलेला नसून मे महीन्‍यात सदर नैसग्रीक परीस्थितीही असणेही अपेक्षित नाही. त्‍याचप्रमाणे दोन नवे घोडे खरेदी खरेदी करणारा तक्रारदार यांच्‍या घोडयाच्‍या निर्बीजीकरणा सारख्‍या शस्‍त्रक्रियेबाबत पुणे जिल्‍हयाचे डॉक्‍टरांशी संपर्क करुन विना मोबदला पाचारण करतात व त्‍याच घोडयांची प्रकृतीत सुधाराणा होत नसल्यास तक्रारदार पुन्‍हा त्‍या डॉक्‍टरांना सदरबाबत कळवत नाही व सदर डॉक्‍टरांना याबाबत माहीती नसल्‍याने ते परत त्‍या घोडयांना विना मोबदला उपचारासाठी येत नाही वगैरे विपचे म्‍हणणे सर्व संशयास्‍पद आपली जबाबदारी झटकणारे व तर्कास न पटणारे आहे. तथापि MLC असतांना विप क्र.2 डॉक्‍टरांचे वागणे संशयास्‍पद वाटते सोबत एक पत्र दि.13/05/2012 रोजी पुढील उपचार नजीकच्‍या पदवीधर डॉक्‍टराकडून करुन घेइन व त्‍याची जबाबदारी डॉ.परांडे यांचेवर राहणार नाही. हे संमती पत्र लिहून दिलेले आहे. परंतु संबंधीत पत्रावरील सही ग्रामपंचायत कार्यालयाने पावती व त्‍यावर केलेली सही यामध्‍ये ही मोठा फरक दिसुन येतो. अर्थातच हे सबंधीत पत्र संशयास्‍पद आहे म्‍हणुन पुरावा म्‍हणुन मान्‍य करता येणार नाही. वास्‍तवीक पाहता विप क्र.1 यांच्‍या लेखी युक्तिवादामध्‍ये फौजदारी गुन्‍हा असल्‍याचे नमूद केले आहे. परंतु तो दाखल केला नाही. या न्‍याय मंचास तशा स्‍वरुपाचे आदेश देणे विषयी विनंती केलेली आहे. तथापि तसे आदेश नसतांनाही विपने फौजदारी गुन्‍हा नोंदविणे शक्‍य होते.

 

7)     तक्रारदाराने घोडयांच्‍या खरेदीबाबत दाखल केलेली विक्री परीवर्तन पावतीचे अवलोकन केले असता हया बाबत खरे की पावती ही मृत्‍यू नंतरच्‍या तारखेची आहे. परंतु सदरची पावती ही विक्री परीवर्तन पावती आहे व त्‍यावर मागील दाखल क्रमांक अनुक्रमांक 324, माळेगाव यात्रा व दुसरी 288, कृषी उत्‍पन बाजार समीती, अकलूज असे दिसून येते. या दाखल कागदपत्रा संदर्भात खात्री जमा करुन घेणे विपस शक्‍य होते. परंतु त्‍यांनी ते करुन घेतलेले दिसुन येते नाही. त्‍यामुळे पावतीच्‍या सत्‍यतेबाबत आक्षेप घेतांना त्‍या अवैध असल्याचे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी विप यांच्‍यावर आहे. तथापि युक्तिवादादरम्‍यान मागील पावत्‍या ग्रा.प. कार्यालयातुन मिळवून हजर करण्‍याविषयी सुचना दिली असता तक्रारदाराने त्‍या दाखल केल्‍या आहेत. व त्‍याची सत्‍यता पडताळुन सदरच्‍या पावत्‍या ग्राहय धरत आहेत. त्‍याच सोबत विपने असेही आक्षेप दाखल केले आहे की सदरचे घोडे हे व्‍यापार करण्‍यासाठी वापरले जात होते. तथापि तक्रारदार हे घोडयांचे व्‍यापारी नसून घोडयांचा वापर करुन उपजीवीकेसाठी पैसे मिळवत होते त्‍यामुळे त्‍याला व्‍यवयायीक अथवा व्‍यापार करणे म्‍हणता येणार नाही.

 

8)    याच सोबत विपने वरीष्‍ठ न्‍यायालयाचा न्‍याय निवाडा दाखल केला आहे त्‍यामध्‍ये सीव्‍हील अपील 1385/01 कुसुम शर्मा विरुध्‍द बात्रा हॉस्‍पीटल या मध्‍ये

Consumer Protection Act (68 of 1986) S.32, S.2(1) (g) Penal Code (45 of 1860), S.88, S.92, S.370 – Medical negligence – Surgery performed for removal of abdominal tumor –Procedure adopted by doctor performing surgery supported by expert opinion- Negligence cannot be attributed to doctor- Medical professional are not to be  unnecessarily harassed or humiliated so that they can perform their duties without fear and apprehension-Malicious prosecution against medical professors/ hospitals for extracting uncalled for compensation –Not maintainable.

 

यामध्‍ये  मा. वरीष्‍ठ न्‍यायालयाने म्‍हंटल्‍यानुसार जर डॉक्‍टीराने त्‍यांची सेवा व्‍यवसायीक कौशल्‍य पुर्णपणे पणाला लावून केली आहे असे सिध्‍द झाले तर त्‍याला निष्‍काळजीपणा म्‍हणता येणार नाही मात्र दुस-या एका तज्ञांनी त्‍याच मताशी सहमत दर्शवीली पाहीजे परंतु प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये विप क्र.1 यांनी सदरच्‍या शस्‍त्रक्रिया कौशल्‍यपुर्ण कलेलेल्‍या दिसून येत नाही म्‍हणून विप क्र.1 च्‍या समर्थनार्थ डॉ.ढवळशंख यांनी दिलेल्‍या शपथपत्राचा फायदा विप क्र.1 यांना होवू शकत नाही. तसेच मुक्‍या जनावरांचे ऑपरेशन करतांना डॉक्‍टराची जबाबदारी अधिक आहे कारण त्‍याला होणारा त्रास तो सांगू शकत नाही. सदरच्‍या न्‍यायीक सिध्‍दांता मधील डॉक्‍टर हा माणसाचा आहे तर प्रस्‍तुत प्रकरणातील डॉक्‍टर हा जनावरांचा आहे.

9)    याच सोबत दुसरे न्‍यायिक सिध्‍दांत सीव्‍हील अपील क्र.3541/2002  मार्टीन एफ. डीसोजा विरुध्‍द मोह, अश्‍फाक यामध्‍येही तज्ञ डॉक्‍टांबाबत मा.वरीष्‍ट न्‍यायालयाने सुचना केलेली आहे. सदर प्रकरणी उपचारासाठी अत्‍यंत निरोगी घोडे निर्बीजकरण सारख्‍या सामान्‍य शस्‍त्रक्रियेसाठी विप क्र.1 यांच्‍याकडे सोपवण्‍यात आले होते. ज्‍यामध्‍ये विशेष कौशल्‍याची गरज/आवश्‍यक नाही. तथापि ऑपरेशन दरम्‍यान झालेल्‍या चुकामुळेच रक्‍तस्‍त्राव थांबु शकला नाही या मताशी आम्‍ही आलेलो आहोत. तसेच एक नव्‍हे तर दोन्‍ही घोडे एक उपचारा दरम्‍यान मृत्‍यू पावलेले आहेत. हयाही गोष्‍टी लक्षात घेण्‍यासारख्‍या आहेत. एका घोडयाची पी.एम.नोंद केली नसल्याचे पी.एम. करण्‍या-या डॉक्‍टरांनी सांगितले व सदरचे मत हे अंतिम मत नाही असेही म्‍हंटलेले आहे. त्‍यामुळे त्‍याला तज्ञ डॉक्‍टरांचे मत म्‍हणता येणार नाही. या उलट या तक्रारदाराकडे उपजीवीकेचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे तो सदर घोडयांची काळजी घेणार नाही हे मान्‍य होण्‍यासारखे नाही. तसेच सदर पोष्‍ट मार्टम रिपोर्टवर विप क्र.2 यांची सही नाही. सोबत तक्रारदाराने त्‍यांचे झालेले व्‍यवसायिक नुकसानीबाबत व भविष्‍यातील नुकसानीबाबत आम्‍हाला भाष्‍य करता येणार नाही. कारण तसे नुकसानीबाबतचे ठोस पुरावे या न्‍यायमंचापुढे आलेले नाहीत. त्‍यामुळे त्‍याचे घोडयांच्‍या किंमती व्‍यतिरिक्‍त इतर कोणतेही नुकसान आम्‍हाला मान्‍य करता येणार नाही.

                    आदेश

1)  तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

2)  विप क्र.1 यांनी तक्रारदारास घोडयांची किंमत अनुक्रमे रु.1,60,000/- (रुपये एक लाख

    साठ हजार फक्‍त) व 1,85,000/-(रुपये एक लाख पंच्‍यांशी हजार फक्‍त) द.सा.द.शे. 9

    टक्‍के व्‍याज दराने तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत

    द्यावी.

3)  विप क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी, व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.10,000/-

    (रुपये दहा हजार फक्‍त) द्यावे.

4)   डॉ.ढवळशंख यांनी पी. एम. करण्‍यास टाळाटाळ केली व कर्तव्‍यात निक्‍काळजीपणा   

    दाखवला तसेच ग्राहकाने केलेल्‍या पत्रव्‍यवहाराकडे दुर्लक्ष केले. म्हणून वरीष्‍ठ

    कार्यालयाने याची नोंद घ्‍यावी व पुढील योग्‍य ती कार्यवाही करावी.

5)  वरील आदेशाची पुर्तता करुन विप क्र.1 यांनी तसा अहवाल 45 दिवसात

    मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी दोन्‍ही पक्षकारांनी मंचा हजर रहावे.

6)  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

   (श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी)                                                                                                      (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)

        अध्‍यक्ष                                                                                                                               सदस्‍य    

                                                       जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.