Maharashtra

Nagpur

CC/395/2017

KU. AKANSHA MANOJ WARMA THROUGH, SHRI. MANOJ WARMA, SOU. GAURI WARMA - Complainant(s)

Versus

DR. S. S. YADAV - Opp.Party(s)

ADV. DADARAO BHEDRE

30 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/395/2017
( Date of Filing : 20 Sep 2017 )
 
1. KU. AKANSHA MANOJ WARMA THROUGH, SHRI. MANOJ WARMA, SOU. GAURI WARMA
R/O. LAL SCHOOL, LODHIPURA, BAJERIYA, BAJERIYA CHOWK, NAGPUR
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. DR. S. S. YADAV
YADAV MULTISPECIALIST HOSPITAL, AANKHE, STRIROG HOSPITAL, DOSAR VAISHYA BHAVAN CHOWK, C.A., NAGPUR-440018
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. DADARAO BHEDRE, Advocate for the Complainant 1
 ADV. ANURADHA DESHPANDE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 30 Nov 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  तक्रारकर्ती ही 5 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्‍या तर्फे तिच्‍या आई-वडिलांनी वर्तमान तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्ती कु. आकांक्षाचा उजवा डोळा किंचित लाल झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाच्‍या यादव मल्‍टीस्‍पेशालिटी मध्‍ये उपचाराकरिता दि. 06.12.2016 रोजी आणले होते. तेव्‍हा विरुध्‍द पक्षाने  कु. आकांक्षाला  तपासले आणि डोळयात टाकावयाचे औषध आणि गोळया दिल्‍या होत्‍या व  दि. 09.12.2016 रोजी परत बोलाविले होते. त्‍यानंतर दिनांक 09.12.2016 ला पुन्‍हा औषधी देऊन दि.12.12.2016 ला बोलाविले. कु. आकांक्षाला सदर औषधीमुळे आराम होत नसल्‍याबाबत तक्रारकर्तीच्‍या वडिलांनी विरुध्‍द पक्षाला सांगितले असता विरुध्‍द पक्षाने आकांक्षाचे रक्‍त चाचणी व इतर चाचण्‍या केल्‍या आणि दि.19.12.2016 रोजी डोळयात टाकण्‍याकरिता ड्राप व औषधे दिले व दि. 21.12.2016 रोजी ऑपरेशन करण्‍याकरिता रुपये 25,000/- घेऊन येण्‍यास सांगितले होते. त्‍यानुसार दि. 21.12.2016 रोजी दुपारी 12.00 वा. आकांक्षाला विरुध्‍द पक्षाच्‍या दवाखान्‍यात भरती केले आणि दि. 22.12.2016 रोजी आकांक्षाच्‍या उजव्‍या डोळयाचे ऑपरेशन केले आणि दि. 23.12.2016 ला दुपारी 12.00 वा. दवाखान्‍यातून सुट्टी दिली व याकरिता विरुध्‍द पक्षाने रुपये 25000/- घेतले होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने असा आक्षेप घेतला की, आकांशा हिला ऑपरेशन पूर्वी दिसत होते आणि विरुध्‍द पक्षाच्‍या निष्‍काळजीपणामुळे सदरहू ऑपरेशन हे असफल झाल्‍याने आकांक्षाला उजव्‍या डोळयाने दिसत नसल्‍यामुळे तिला शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने तक्रार मंजूर करण्‍याची विनंती केली आणि आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 19,00,000/- एवढी नुकसानभरपाईची मागणी केली असून  तक्रारीच्‍या खर्चाबाबत रुपये 10,000/- ची मागणी केली आहे.
  3.      विरुध्‍द पक्षाने त्‍यांचा लेखी जबाब नि.क्रं. 10 वर दाखल केला असून तक्रारी मधील त्‍यांच्‍यावर लावलेले आक्षेप नाकारलेले आहे.  विरुध्‍द पक्षाने  पुढे असे नमूद केले की, आकांशाला दि. 06.12.2016 रोजी विरुध्‍द पक्षाच्‍या रुग्‍णालयात आणले नसून दि. 09.12.2016 रोजी विरुध्‍द पक्षाच्‍या रुग्‍णालयात आणण्‍यात आले होते आणि तिचा रुग्‍ण क्रं. ए-16394 असा होता. दि. 09.12.2016 रोजी कु. आकांशाला विरुध्‍द पक्षाच्‍या रुग्‍णालयात आणले तेव्‍हा तिचा डोळा लाल झालेला होता आणि तिची दृष्‍टी सामान्‍य होती. तिला तपासून तिच्‍यावर उपचार करण्‍यात आले आणि  औषधी देण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यानंतर 11 दिवसांनी पुन्‍हा विरुध्‍द पक्षाच्‍या दवाखान्‍यात आणण्‍यात आले त्‍यावेळी कु. आकांक्षाचा उजवा डोळा लाल झाला होता आणि डोळे खूप दुःखत असल्‍याबद्दल तिने सांगितले, यावेळेस तपासणी करुन आकांक्षाच्‍या डोळयाच्‍या आतील भागात पस झाले असल्‍याचे लक्षात आले. तेव्‍हा विरुध्‍द पक्षाने ताबडतोब सोनोग्राफी करण्‍यास सांगितले आणि लहान मुलांच्‍या डोळयाच्‍या डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार डोळयावर शस्‍त्रक्रिया करण्‍यास सांगितले.  कु. आकांक्षाची सोनोग्राफी केल्‍यानंतर तिला लागलेल्‍या मारामुळे बुब्बुळाच्‍या बाजुला रक्‍तस्‍त्राव होऊन रक्‍त जमा झाल्‍याचे आणि रेटिना वेगळे झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. सदर प्रकराला Post Traumatic Endophthalmitis  असे म्‍हणतात. विरुध्‍द पक्षानी आकांक्षाच्‍या डोळयाची जखम स्‍वच्‍छ करुन तिची ताबडतोब  Vitrectomy  करण्‍याचे सुचविले. त्‍याप्रमाणे दि. 19.12.2016 रोजी आकांक्षाच्‍या उजव्‍या डोळयाचे तात्‍काळ ऑपरेशन करण्‍याचे सूचविले होते. परंतु सदर ऑपरेशनसाठी लागणा-या खर्चाची जुळवाजुळव करण्‍यास तक्रारकर्त्‍यांना विलंब लागत असल्‍याचे सांगून कु. आकांक्षा हिला दि. 21.12.2016  रोजी विरुध्‍द पक्षाच्‍या दवाखान्‍यात भरती करण्‍यात आल्‍यानंतर कु. आकांक्षाच्‍या उजव्‍या डोळयावर दि. 22.12.2016 रोजी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली आणि या शस्‍त्रेक्रिये दरम्‍यान डोळयातील बुब्बुळाच्‍या बाजुला पांढ-या भागात छिद्र असून त्‍यातून पस बाहेर येत असल्‍याचे विरुध्‍द पक्षाच्‍या लक्षात आले असता त्‍यांनी पस काढून जखम स्‍वच्‍छ केली व त्‍याच्‍या बाजुला टाके देऊन ऑपरेशन बंद केले. डोळयात जखम असतांना व पस झालेला असताना डोळयाचे ऑपरेशन करता येत नाही असे विरुध्‍द पक्षानी तक्रारकर्त्‍याला सांगितले. कु. आकांक्षा हिला दि. 23.12.2016 रोजी दुपारी रुग्‍णालयातून सुट्टी देण्‍यात आली.  
  4.      विरुध्‍द पक्षाने  तक्रारीतील परिच्‍छेद क्रं. 6 ते 14 मधील सर्व विधाने नाकारलेली आहेत आणि असा बचाव घेतला की, दि. 21.12.2016 रोजी कु. आकांक्षाला  तपासल्‍यानंतर तिच्‍या डोळयातील बुब्‍बुळाच्‍या बाजुच्‍या पांढ-या भागात छिद्र असून त्‍यामधून पस बाहेत येत असल्‍याचे केलेल्‍या तपासण्‍यांवरुन विरुध्‍द पक्षाच्‍या निदर्शनास आले. म्‍हणून त्‍यांनी  शास्‍त्रानुसार  योग्‍य व आवश्‍यक तेवढी प्रक्रिया करुन आकांक्षाची ऑपरेशन बंद केले.
  5.      विरुध्‍द पक्षाने परिच्‍छेद क्रं. 5 मध्‍ये विशेष कथनात नमूद केले की, कु. आकांक्षाच्‍या आई-वडिलांनी दि. 04.01.2017 रोजी डॉ. प्रशांत बावनकुळे यांच्‍या साराक्षी नेत्रालयात भरती केले आणि त्‍यांनी आकांक्षाच्‍या डोळयावर   Lensectomy and Vitrectomy  ही शस्‍त्रक्रिया केली होती. डॉ. बावनकुळे यांनी दिलेल्‍या डिस्‍चार्ज कार्डनुसार कु. आकांक्षा वरील शस्‍त्रक्रिया योग्‍य झाली. तसेच तिच्‍या डोळयात नवीन लेन्‍स टाकण्‍यात आले होते, यावरुन डॉ. बावनकुळे यांच्‍याकडे ऑपरेशन करेपर्यंत आकाक्षां हिला योग्‍य प्रकारे दिसत होते. कारण कु. आकांक्षा ही उजव्‍या डोळयाने अंध झाली असती तर तिच्‍यावर शस्‍त्रक्रियाच करण्‍यात आली नसती, डॉ. बावनकुळे यांनी दिलेल्‍या डिस्‍चार्ज कार्डनुसार कु. आकांक्षाला कोणत्‍याही प्रकारे त्रास झाल्‍यास डोळयात दुखणे, लाली येणे, दृष्‍टी कमी होणे, बुब्बुळ पांढरे अथवा रंगहिन दिसणे, डोळण्‍यामध्‍ये वेदना होणे इ. घडल्‍यास ताबडतोब डॉक्‍रांशी संपर्क करण्‍यास या डिस्‍चार्ज कार्डमध्‍ये सांगण्‍यात आले होते. तथापि कु. आकांक्षा हिला त्रास झाल्‍यास तिला पुन्‍हा डॉक्‍टरांकडे नेण्‍यात आले नाही व यासाठी विरुध्‍द पक्ष जबाबादार नाही. लहान मुलांचे खेळ व आईवडिलांचे दुर्लक्षामुळे  कु. आकांक्षा हिला उजवा डोळा गमवावा लागला.
  6.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यांना कुठलीही दोषपूर्ण सेवा दिली नसून अनुचित प्रथेचा अवलंब केलेला नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याची नुकसान भरपाईची मागणी फेटाळण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याने वर्तमान तक्रार डॉक्‍टरांकडून पैसे उकळण्‍याच्‍या हेतूने आणि त्रास देण्‍याच्‍या हेतूने दाखल केलेली आहे म्‍हणून तक्रारकर्त्‍यांवर दंड बसविण्‍यात यावा.
  7.      आम्‍ही वर्तमान प्रकरणातील उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे याचे अवलोकन केले आणि खालील मुद्दे विचारार्थ घेतली आणि त्‍यावर खालील कारणांसाठी खालीलप्रमाणे निष्‍कर्ष नोंदविलेली आहेत.

मुद्दे उत्‍तर

1.   तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय?             होय

2.   विरुध्‍द पक्षाने कु. आकांक्षाला देण्‍यात आलेल्‍या

     उपचारांमध्‍ये  वैद्यकीय निष्‍काळजीपणा केला आहे काय 

    आणि तक्रारकर्तीच्‍या प्रति सेवेत त्रुटी केली आहे काय ?    नाही

3.   काय आदेश                                अंतिम आदेशानुसार

 

                         निष्‍कर्ष

8.     मुद्दा क्रमांक 1 बाबत -  आम्‍ही तक्रारकर्त्‍याचे वकील श्री. भेदरे आणि विरुध्‍द पक्षाचे वकील श्रीमती अनुराधा देशपांडे  यांचा युक्तिवाद ऐकलेत.

        तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, कु. आकांक्षा हिचा डोळा फक्‍त लालसर झाला होता आणि विरुध्‍द पक्षाने योग्‍य निदान केले नाही आणि High Dose चे औषध दिले आणि सेवेत त्रुटी केली. कु. आकांक्षाच्‍या डोळयाला गंभीर जखम नसतांना ही शस्‍त्रक्रिया शस्‍त्रक्रिया केली आणि तिच्‍या आई-वडिलांना चुकिची माहिती दिली. त्‍यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, आकांक्षाला आता उजव्‍या डोळयाने काहीही दिसून नसून ती एका डोळयाने अंध झालेली आहे. म्‍हणून योग्‍य नुकसान भरपाई देण्‍यात यावी. त्‍यांनी पुढे नमूद केले की, डॉ. बावनकुळे यांच्‍याकडे आंधळी झाल्‍यानंतर नेण्‍यात आले म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी डॉ. बावनकुळे यांना वर्तमान प्रकरणात पक्षकार केलेले नाही. त्‍यांनी पुढे नमूद केले की, मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालाप्रमाणे तज्ञांचा अहवाल मागविण्‍याची गरज नाही आणि  Res ipsa loquitur  च्‍या तत्‍वाप्रमाणे विरुध्‍द पक्षाने निष्‍काळजीपणा केल्‍याचे दिसून येते. म्‍हणून तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

       आपल्‍या युक्तिवादाच्‍या समर्थनार्थ तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेतलेला आहे. ....

  1.  V. Kishan Rao  VS. Nikhil Super Speciality Hospital &   

 Anr. III (2010) CPJ 1 (SC) .

  1.  Malay Kumar Ganguly VS. Sukumar Mukherjee (Dr.) &  Ors. III (2009)CPJ 17 (SC)                                                                                                                                                                                                                                                                                                3    M/s Nanjappa Hospital VS. Karnataka , 2011 (3) CPR 484 (NC)
  2. Dr. Kunal Saha VS. Dr. Sukumar Mukherje & ors.  III (2006)   CPJ 142  (NC)
  3. Indrani Bhattacharjee VS. Farakka Super Thermal PowerProject & Ors. III (2007) CPJ   354 (NC)

 

  1. Sarwat Ali Khan VS. Prof. (Dr.) R. Gogi & Ors.  III (2007) CPJ 179 (NC)

 

  1.  Indian Medical Association VS. V.P. Shantha And Others (1995) 6 Supreme Court Cases 651

 

  1. Jacob Mathew VS. State of Punjab and Another (2005)6 SCC 1
  2. Shaqeen  Qureshi VS. A.K.Dubey and Anr.  2010(2) CPR 500
  3. Regional Manager Ceat Limited VS. KataMreddi Gopal Reddy and Anr. I (1997) CPJ 107 (NC)

 

  1.      विरुध्‍द पक्षाच्‍या वकिलांनी थोडक्‍यात असा युक्तिवाद केला की, आकांक्षा हिला दि. 06.12.2016 रोजी विरुध्‍द पक्षाच्‍या दवाखान्‍यात आणले नव्‍हते आणि तक्रारकतर्याने चुकिची माहितीनमूद केली आहे. दि. 09.12.2016 रोजी आकांक्षाला उपचाराकरिता आणले होते आणि विरुध्‍द पक्षाने प्राथमिक तपासणी करुन योग्‍य औषधोपचार केलेला आहे आणि कु. आकांक्षाला पुन्‍हा 2-3 दिवसांनी तपासणीकरिता आणण्‍यास सांगितले होते,  परंतु तक्रारकर्तीच्‍या वडिलांनी  आकांक्षाला दि. 19.12.2016 ला विरुध्‍द पक्षाच्‍या दवाखान्‍यात आणले आणि त्‍यावेळी सोनोग्राफीची तपासणी करुन पस झाल्‍याचे आढळल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने पस काढण्‍याबाबत योग्‍य उपचार केलेले आहे. विरुध्‍द पक्षाने कोणत्‍याही प्रकारे सेवेत त्रुटी केलेली नाही आणि त.क.यांनी खोडसाळपणे वर्तमान तक्रार दाखल केलेली आहे, म्‍हणून ती दंडात्‍मक खर्चासह खारीज करण्‍यात यावी.  त्‍यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी दाखल केलेले न्‍यायनिवाडे वर्तमान प्रकरणात लागू होत नाही.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने दि. 09.12.2016 ला कु. आकांक्षा वर उपचार केलेले आहे आणि दि. 22.12.2016 रोजी डोळयांवर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याकडून रुपये 25,000/- स्‍वीकारलेले आहे हे नाकारलेले नाही . यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे ग्राहक आहे असे दिसून येते. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 वर होकारार्थी उत्‍तर नोंदविण्‍यात येते. 

 

 

  1. मुद्दा क्रमांक 2 बाबत – तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी दाखल केलेल्‍या वरील न्‍यायनिवाडयाचे आणि वर्तमान प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन केले. वर नमूद केलेल्‍या न्‍यायनिवाडया पैकी क्रं. 7 व 8 वर नमूद केलेल्‍या न्‍यायनिवाडयामध्‍ये वैद्यकीय निष्‍काळजीपणाबाबत महत्‍वाची निरीक्षणे नोंदविलेली आहेत आणि  सदरहू निरीक्षणे आम्‍ही विचारार्थ घेतली. वर्तमान प्रकरणात तक्रारकर्ते यांनी कु. आकांक्षाला दि. 06.12.2016 रोजी उपचाराकरिता विरुध्‍द पक्षाकडे नेले होते याबाबत तक्रारकर्त्‍यानी काहीही पुरावा दाखल केलेला नाही. या उलट दिनांक 23.12.2016 रोजी दिलेल्‍या डिस्‍चार्ज कार्ड मध्‍ये खालीलप्रमाणे निदानाबाबत नमूद केलेले आहे.

        Diagnosis

             H/O INJURY WITH ARROW ON 06.12.2016

             PATIENT COME ON 09/12/2016 IN OPD.

             THEN WAS I QUIET WITH CONJUNTIVAL CONJUNTION

             VISION 6/6. THEN COME ON 19/12/2016  WITH C/O.

             C/O RE PAIN REDNESS SWELLING 7 LOSS OF VISION

             ON EXAMINATION LID EDEMA 

           CONJUNTIVAL CHEMOSIS CORNEA HAZY ALL OVER

             AC FULL OF PUS CONJUNCTIVAL

             SWELLING ON BULBAR SIDE ?

             SITE OF PERFORATION.

सबब कु. आकांक्षाला विरुध्‍द पक्षाकडे दि. 09.12.2016 ला ओ.पी.डी. मध्‍ये उपचाराकरिता आणले होते आणि दि. 09.12.2016 च्‍या पान क्रं. 15 वर दाखल केलेल्‍या प्रिस्‍क्रीपशनप्रमाणे कु. आकांक्षाला उपचार देण्‍यात आले होते. दि. 06.12.2016 रोजी उपचार केल्‍याबाबतचे कुठलेही दस्‍तावेज अभिलेखावर दाखल नाही आणि वरील डिस्‍चार्ज कार्डमध्‍ये नमूद केल्‍यानुसार रुग्‍णाला दि. 09.12.2016 रोजीच आणण्‍यात आलेले आहे. सबब तक्रारकर्त्‍याचे कथन चुकिचे आहे आणि विरुध्‍द पक्षाने दि. 06.12.2016 रोजी  कु. आकांक्षाला कोणतीही वैद्यकीय उपचार केलेले नाही असे आढळून येते. विरुध्‍द पक्षाने त्‍यांच्‍या दवाखान्‍याचे रुग्‍ण तपासणी नोंदवही दाखल केलेली आहे आणि सदरहू नोंदवही प्रमाणे कु. आकांक्षाला  दि. 6, 7 व 8.12.2016 या दिवशी कु. आकांक्षाचे नांव नोंदविलेले नसून तिचे नांव अ.क्रं. 25 वर दि. 09.12.2016 ला नोंदविलेले असल्‍याचे दिसून येते. यावरुन विरुध्‍द पक्षाने कु. आकांक्षाला दि. 06.12.2016 ला कोणतेही उपचार दिलेले नाही असे दिसून येते.

  1.      तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, विरुध्‍द पक्षाने चुकिचे निदान केले आणि चुकिचा उपचार केला. परंतु याबाबत तक्रारकर्त्‍याने केवळ आरोपच केलेले आहे आणि कशा प्रकारे चुकिचा उपचार केलेला आहे हे सिध्‍द केलेले नाही.   तसेच विरुध्‍द पक्षाचा जबाब आल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने योग्‍य प्रकारे प्रतिउत्‍तर वर्तमान प्रकरणात दाखल केलेले नाही आणि प्रतिउत्‍तरामध्‍ये जबाबातील मुद्दे फक्‍त नाकारलेले आहे. दिनांक 09.12.2016 रोजी दिलेल्‍या प्रिस्‍क्रीपशनप्रमाणे कु. आकांक्षाला खालीलप्रमाणे औषधी देण्‍याचा सल्‍ला विरुध्‍द पक्षा तर्फे देण्‍यात आलेला आहे.
  1. ZIFI 50 Sy       एक चम्‍मच दीन में तीन बार              5 days
  2. IBUGESIC PLUS Sy      एक चम्‍मच दीन मे तीन बार  5 days.
  3. FLUR Eye Drops         चार बार                  60 days
  4. MAHAFLOX Eye Drops  चार बार                 60 days
  5. ZINCOVIT Sy   रात मे एक बार                   30 days
  6. ZENTEL Sy         रात मे एक बार                  1 days

विरुध्‍द पक्षाने दि. 09.12.2016 ला उपचार केल्‍यानंतर कु. आकांक्षाला पुन्‍हा साधारण 5 दिवसानंतर तपासण्‍याकरिता आण्‍ंण्‍याचे सूचविले होते परंतु 11 दिवसांनी  तिला पुन्‍हा दवाखान्‍यात आणले होते आणि यावेळेस तपासणी करुन डोळयाच्‍या आतील भागात पस झाल्‍याचे लक्षात आल्‍यावर विरुध्‍द पक्षाने ताबडतोब सोनोग्राफी करण्‍याचा सल्‍ला दिला आणि लहान मुलांच्‍या डोळयांच्‍या डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार शस्‍त्रक्रिया करण्‍यास सांगितले. दि. 19.12.2016 रोजी दिलेल्‍या उपचाराचे प्रिस्‍क्रीपशन अभिलेखावर दाखल आहे. या सर्व प्रकारांमध्‍ये विरुध्‍द पक्षाने चुकिचे निदान केले आणि चुकिचा उपचार केला हे दाखविण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने इतर कोणत्‍याही तज्ञ डॉक्‍टरांचे मत मागविलेले नाही. आणि सर्व कागदपत्रे तज्ञांकडे पाठवून तज्ञ अहवाल ही मागविलेला नाही. सबब विरुध्‍द पक्षाची उपचार देण्‍यामध्‍ये चूक आहे असे खात्रीपूर्वक म्‍हणता येणार नाही. कु. आकांक्षाच्‍या आई-वडिलांनी दि. 09.12.2016 नंतर खूप उशिराने म्‍हणजेच दि. 19.12.2016 ला कु. आकांक्षाला दवाखान्‍यात आणले आणि ही बाब सुध्‍दा अतिशय गंभीर आहे आणि सदरहू काळामध्‍ये योग्‍य उपचार न दिल्‍यामुळे आणि योग्‍य तपासणी न करण्‍यात आल्‍यामुळे कु. आकांक्षाच्‍या डोळयातील जखमे मध्‍ये पस झाला असावा अशी दाट शक्‍यता आहे आणि दि. 19.12.2016 रोजी तपासणी केल्‍यानंतर डाक्‍टरांना डोळयात पस झाले असल्‍याचे दिसून आले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याच्‍या चुकिंसाठी किंवा बेजबाबदार कृतीकरिता विरुध्‍द पक्षाला दोष देता येणार नाही.

  1.      तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तज्ञ अहवालाची गरज नाही आणि आपल्‍या युक्तिवादाच्‍या समर्थनार्थ वर नमूद केलेल्‍या V. Kishan Rao  VS. Nikhil Super Speciality Hospital &   Anr. III (2010) CPJ 1 (SC)     या न्‍यायनिवाडयातील निरीक्षणांचा आधार घेतलेला आहे. या आयोगा समोरील तक्रार ही संक्षिप्‍त रित्‍या चालविण्‍यात येते आणि पुराव्‍याचा कायदा लागू नाही म्‍हणून तज्ञ अहवालाची गरज नाही असा त्‍यांनी युक्तिवाद केला. परंतु वरील निरीक्षणे वर्तमान प्रकरणाला लागू होत नाही. कारण वर्तमान प्रकरणात विरुध्‍द पक्षाचा प्राथमिक दृष्‍टया काही दोष असल्‍याचे उपचारांच्‍या कागदपत्रावरुन दिसून येत नाही. या न्‍यायनिवाडयामध्‍ये नमूद केलेले  Res ipsa loquitur  चे तत्‍व वर्तमान प्रकरणातील वस्‍तुस्थितीला लागू नाही. कारण  विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या उपचारांच्‍या कागदपत्रांवरुन चुकिचे उपचार केले असे म्‍हणण्‍याकरिता काहीही आधार नाही.  सबब तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी या न्‍यायनिवाडयाचा घेतलेला आधार चुकिचा आहे. या उलट कु. आकांक्षाच्‍या आई-वडिलांचा निष्‍काळजीपणाच डोळयामधील जखम गंभीर होण्‍यास कारणीभूत असल्‍याचे दिसून येते.
  2.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍या विरुध्‍द केवळ आरोप केलेले आहे, परंतु सदरहू आरोपांच्‍या समर्थनार्थ कोणताही ठोस व संयुकतीक असा पुरावा किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तीचे मत आयोगासमक्ष दाखल केलेले नाही.  विरुध्‍द पक्षाने दि. 09.12.2016 आणि दि. 19.12.2016 आणि 23.12.2016 रोजी कु. आकांक्षावर करण्‍यात आलेल्‍या उपचार हे वैद्यकीय शास्‍त्राप्रमाणे चुकिचे आहे असे सिध्‍द करणे वर्तमान प्रकरणात आवश्‍यक आहे असे आमचे मत आहे आणि तक्रारकर्त्‍याने ते सिध्‍द केलेले नाही. वर्तमान प्रकरणातील संपूर्ण वस्‍तुस्थितीचा विचार केला असता विरुध्‍द पक्षाने वैद्यकीय निष्‍काळजीपणा केला असा निष्‍कर्ष काढणे न्‍यायोचित नाही असे आमचे मत आहे. सबब विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍या प्रति सेवेत त्रुटी केल्‍याचे सिध्‍द केलेले नाही. वरील सर्व कारणास्‍तव मुद्दा क्रमांक 2 वर नकारार्थी उत्‍तर  नोंदविण्‍यात येते.
  3.      वर्तमान प्रकरणात तक्रारकर्त्‍याने केवळ विरुध्‍द पक्ष यांच्‍या विरुध्‍द आरोप केलेले आहे आणि सदरहू उपचार हे चुकिचे असल्‍याबाबत सिध्‍द केलेले नाही. म्‍हणून वर्तमान तक्रार ही खर्चाच्‍या आदेशासह खारीज करणे योग्‍य आहे असे आमचे मत आहे.

        सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.
  2. तक्रारकर्ते यांनी विरुध्‍द पक्षाला खर्चाबाबत रक्‍कम रुपये 5,000/- द्यावे.
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.