Maharashtra

Nagpur

CC/08/360

Shri Vijaykumar K.Patrikar - Complainant(s)

Versus

Dr. Ravi Sawarbandhe - Opp.Party(s)

ADV.MRS.ANURADHA DESPANDE

14 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/08/360
1. Shri Vijaykumar K.PatrikarC/o.Tichkule, 458, Anandnagar, Sakkardara PSO, NagpurNAGPURMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. Dr. Ravi Sawarbandhe457, Anandnagar, Sakkardara, NagpurNAGPURMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 14 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

( मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलिंद केदार सदस्‍य)
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 08/02/2011)
 
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 अंतर्गत कलम 12 अन्‍वये दाखल केलेली असून तक्रारकर्ता नागपूर येथे वास्‍तव्‍यास असून रेल्‍वे कर्मचारी आहे. तसेच गैरअर्जदार हे अस्थिरोग तज्ञ आहे.
 
2.    तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, ते व त्‍यांची पत्‍नी दि.31.07.2006 रोजी सायंकाळी 7-00 वा. बाहेर सायकल रीक्‍शाने गेले असता अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने ते व त्‍यांची पत्‍नी या अपघातामध्‍ये जखमी झाले. क्ष-किरण तपासणीनंतर तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या पायाच्‍या मांडीचे हाड तुटल्‍याचे निदर्शनास आले. गैरअर्जदाराने त्‍यावर शस्‍त्रक्रिया करणे गरजेचे असल्‍याने सांगितले व काही औषधे, इंजेक्‍शन लिहून दिलीत. दि.02.08.2006 ला तक्रारकर्त्‍याच्‍या विविध रक्‍त चाचण्‍या डॉ. वझे यांचेकडे करण्‍यात येऊन त्‍याचदिवशी तक्रारकर्त्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. शस्‍त्रक्रियेनंतर काही औषधे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला लिहून दिली. यानंतर तक्रारकर्त्‍याने पाय दुखत असल्‍याचे गैरअर्जदारांना सांगितले. त्‍यावर गैरअर्जदारांनी दुर्लक्ष केले. तक्रारकर्त्‍याच्‍या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आलेल्‍या जागेतून रक्‍तातील पातळ द्रव वाहत असल्‍याचे निदर्शनास आले व वारंवार काढून टाकले, तरीही परत ते येत होते.
      शस्‍त्रक्रियेनंतर 12 व्‍या दिवशी टाके काढण्‍यात आले व फिजियोथेरपीकरीता तक्रारकर्त्‍याला रुग्‍णालयात ठेवण्‍यात आले. या काळात तक्रारकर्त्‍याच्‍या पायाला वेदना होत असल्‍याने त्‍याने याबाबत गैरअर्जदारांना सांगितले.  गैरअर्जदाराने डॉ. सारडा यांचेकडे पस कल्‍चर टेस्‍ट करण्‍यास सांगितले व दि.18.08.2006 च्‍या टेस्‍ट अहवालावरुन जखमेत पस झाल्‍याचे सिध्‍द झाले. गैरअर्जदाराने यावर काही औषधे लिहून दिली व ग्‍लुकोजची चाचणी करण्‍यास सांगितले. सदर चाचणीवरुन तक्रारकर्त्‍याच्‍या शरीरात ग्‍लुकोजचे प्रमाणे व्‍यवस्‍थीत असल्‍याचे निदर्शनास आले. दि.20.10.2006 ला तक्रारकर्त्‍याला रुग्‍णालयातून सुट्टी देण्‍यात आली व रोज जखमेवर मलमपट्टी करण्‍याकरीता गैरअर्जदाराकडे जात असतांना पायात वेदना होत असल्‍याची तक्रार केली होती.
 
      दि.29.11.2006 ला तक्रारकर्त्‍याच्‍या उघडया जखमेवर गैरअर्जदाराने टाके दिले व दि.16.12.2006 ला ते काढून टाकले. यावेळीही तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना पाय दुखत असल्‍याची तक्रार केली. परंतू आता कोणताही द्रव वाहत नसल्‍याचे गैरअर्जदार डॉक्‍टरांनी सांगितले.
      दि.21.11.2006 रोजी तक्रारकर्त्‍याने पायांची जखम डॉ. किरण सावजी यांना दाखवून तपासून घेतले. त्‍यावेळी जखमेतून पस वाहात असल्‍याचे म्‍हटले व क्ष-किरण तपासणी करण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने सारडा पॅथालॉजी अँड इमेजिंग क्‍लीनींग येथे क्ष-किरण तपासणी केली. क्ष-किरण तपासणीमध्‍ये पायाच्‍या हाडांमध्‍ये टाकण्‍यात आलेले खिळे व दोरी निघाल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत होते. सदर क्ष-किरण गैरअर्जदारांना दाखविला असता त्‍यांनी 02.12.2006 रोजी पस कल्‍चर टेस्‍ट करण्‍यास सांगितले. यावेळी जखमेतून द्रव वाहत होता. गैरअर्जदाराने दि.05.02.2007 च्‍या केस समरीमध्‍ये व्‍यायाम करतांना तक्रारकर्त्‍याला धक्‍का बसून पायात वेदना सुरु झाल्‍याचे नमूद केले आहे.
तक्रारकर्त्‍याने दि.06.03.2007 रोजी सुश्रृत रुग्‍णालय आणि संशोधन केंद्राचे डॉ.सुधीर बाभुळकर यांचेकडे जाऊन तपासणी केली असता त्‍यांनी पायाचे हाड जुळले नसून पायात व्‍यंग आल्‍याचे नमूद केले. तसेच तक्रारकर्त्‍याला हाडाच्‍या जोडण्‍याकरीता टाकण्‍यात आलेले प्‍लेट, नेल व धागा काढून पायातील पस काढण्‍यासाठी ऑपरेशनचा सल्‍ला दिला. याकरीता तक्रारकर्त्‍याला परत औषधे व उपचाराकरीता खर्च आला व तक्रारकर्त्‍याला शस्‍त्रक्रियेत External Fixater लावण्‍यात आले. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याला एकूण रु.48,000/- खर्च आला. दि.22.03.2007 रोजी तक्रारकर्त्‍याला रुग्‍णालयातून सुट्टी देण्‍यात आली. यानंतर डॉ. बाभूळकर यांनी क्ष-किरण तपासणी करुन हाडाची स्थिती उत्‍तम असल्‍याचे दिसून आल्‍याचे सांगितले. गैरअर्जदाराच्‍या चुकीच्‍या उपचारामुळे पायात आलेले व्‍यंग घालविण्‍याकरीता Bone Grafting ची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली याकरीता रु.17,000/- खर्च करावा लागला.
गैरअर्जदाराने उपचारानंतर योग्‍य खबरदारी घेण्‍यास केलेल्‍या दिरंगाईमुळे तक्रारकर्त्‍याला कायम स्‍वरुपी अपंगत्‍वाला सामोरे जावे लागले. तसेच मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. गैरअर्जदाराच्‍या निष्‍काळजीपणामुळे झालेल्‍या अपंगत्‍वाला व आर्थिक बोजामुळे तक्रारकर्त्‍याने रु.1,35,382/- ची खर्चाची व भरपाईकरीता रु.15,00,000/- आणि तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारीचे पुष्‍टयर्थ एकूण 18 दस्‍तऐवज दाखल केलेले आहे.
 
2.    सदर प्रकरणाचा नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्‍यात आला असता त्‍यांनी तक्रारीस प्राथमिक आक्षेप तक्रारीवर घेऊन लेखी उत्‍तर दाखल केले.
 
3.    गैरअर्जदाराने आपल्‍या प्राथमिक आक्षेपात सदर तक्रार मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यांनी पुढे असेही नमूद केले आहे की, तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांच्‍या घराच्‍या बाजूला राहत होता, त्‍यांची चांगली ओळख होती व त्‍यांनी गैरअर्जदारांकडुन उपचाराबाबत कोणतीही रक्‍कम घेतली नाही, म्‍हणून तो ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. त्‍यांनी सदर तक्रार ही तक्रारकर्ते यांनी पैसे उकळण्‍याकरीता व दुष्‍ट हेतूने दाखल केलेली आहे.
4.    सदर अर्जाला तक्रारकर्त्‍याने उत्‍तर दाखल करुन गैरअर्जदाराचे सर्व म्‍हणणे नाकारले आहे. सदर अर्ज अंतिम आदेशाचे वेळेस विचारात घेण्‍याचा आदेश मंचाने पारित केला.
 
5.    गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी उत्‍तरामध्‍ये, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराने केलेल्‍या उपचाराच्‍या खर्चाची एकही पावती मंचासमोर दाखल केली नसल्‍याचे म्‍हटले आहे. सदर तक्रार ही खोटी असल्‍याचे नमूद करुन ती दिवाणी स्‍वरुपाची असल्‍याने खारीज करण्‍याबाबत विनंती केलेली आहे.
      गैरअर्जदाराने लेखी उत्‍तरात पुढे असेही नमूद केले की, तक्रारकर्त्‍याला सुट्टी दिली तेव्‍हा हाडाची जोडणी योग्‍यप्रकारे करण्‍यात आली व फिजियोथेरपीकरीता तक्रारकर्त्‍यास रुग्‍णालयात येण्‍यास सांगितले होते. तक्रारकर्त्‍याच्‍या हलगर्जीपणामुळे पट्टी तुटली असे गैरअर्जदाराने नमूद केले. निकृष्‍ट दर्जाचे पट्टीमुळे पायातील हाड मोडू शकते. तक्रारकर्त्‍याने सदर पट्टी निर्मात्‍याला विरुध्‍द पक्ष केले नाही असे आपल्‍या उत्‍तरात म्‍हटले आहे. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे इतर सर्व म्‍हणणे नाकारले असून सदर तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.
 
6.    सदर तक्रार मंचासमक्ष दि.31.01.2011 रोजी युक्‍तीवादाकरीता आली. गैरअर्जदाराने लेखी युक्‍तीवाद दाखल केला व तो तोंडी युक्‍तीवाद म्‍हणून विचारात घेण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍यांच्‍या वकिलांनी युक्‍तीवाद केला. मंचाने सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, त्‍यांचे कथन व युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
7.    तक्रारकर्त्‍याचा अपघात 31.07.2006 रोजी झाला आणि त्‍यानंतर तो उपचार करण्‍याकरीता गैरअर्जदाराकडे गेला ही बाब उभय पक्षाचे कथनावरुन स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदाराने प्राथमिक आक्षेप घेतला आहे की, त्‍याने तक्रारकर्त्‍याकडून उपचाराबाबत काहीही मोबदला घेतला नाही व तक्रारकर्त्‍याने त्‍यासंबंधी कोणतेही दस्‍तऐवज दाखल केले नाही. यावरुन तक्रारकर्त्‍याचे वकिलांनी युक्‍तीवाद केला की, गैरअर्जदाराने पावती दिलेली नाही व ती नंतर देण्‍यात येईल असे सांगून तक्रारकर्त्‍याला रुग्‍णालयातून सुट्टी देण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याने श्री. सतिश गांगलवार व श्री. राजेंद्र पद्ममाकर थेटे यांचे प्रतिज्ञापत्र नि.क्र.13 व 14 वर दाखल केले आहे. दोन्‍ही प्रतिज्ञार्थींनी आपले प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, शस्‍त्रक्रियेकरीता रु.60,000/- खर्च येईल असे गैरअर्जदाराने सांगितले होते व सदर रक्‍कमेचा गैरअर्जदार ह्यांचेकडे भरणा करण्‍यात आला होता. गैरअर्जदाराने आपल्‍या प्राथमिक आक्षेपात ही दोन्‍ही शपथपत्रे खोटी असल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू त्‍यांनी दोन्‍ही शपथपत्रधारकाची उलट तपासणी घेण्‍याचे कोणतेही औचित्‍य दाखविले नाही किंवा तक्रारकर्ता त्‍यांच्‍या रुग्‍णालयात भरती असतांनाच्‍या काळातील त्‍याचे कोणतेही रजिस्‍टर दाखल केले नाही. फक्‍त शपथपत्र खोटे आहे असे म्‍हणून ते ग्राहक ठरु शकत नाही असा गैरअर्जदारांचा युक्‍तीवाद अमान्‍य करण्‍यात येतो, कारण तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले नि.क्र. 13 व 14 वरील शपथपत्र खोटे आहे हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी गैरअर्जदाराची होती. ती गैरअर्जदाराने पार पाडली नाही. त्‍यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याकडून रु.60,000/- शस्‍त्रक्रियेकरीता घेतले होते ही बाब स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदाराने आपल्‍या प्राथमिक आक्षेपात केलेले कथन ग्राह्य धरण्‍यात येत नाही, कारण कोणत्‍याही ओळखीच्‍या माणसांकडून इतकी मोठी शस्‍त्रक्रिया करीत असतांना ती विनामुल्‍य करण्‍याचे कोणतेही औचित्‍य स्‍पष्‍ट होत नाही. तसेच सदर शस्‍त्रक्रिया विनामुल्‍य केल्‍या गेली हे सिध्‍द करणारे कोणतेही दस्‍तऐवज गैरअर्जदाराने दाखल केले नाही. त्‍यामुळे ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराला शस्‍त्रक्रियेकरीता रु.60,000/- रक्‍कम दिली होती व ती गैरअर्जदाराने स्विकारली. परंतू त्‍याबाबतची पावती गैरअर्जदाराने दिलेली नाही, त्‍यामुळे ग्रा.सं.का.नुसार तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ‘ग्राहक’ ठरतो व तक्रारकर्ता आणि गैरअर्जदार ह्यांच्‍यामधील वादाचे निराकरण करण्‍याचे अधिकार मंचाला पोहोचतात असे मंचाचे मत आहे.
 
8.    सदर प्रकरणामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या पायाच्‍या मांडीचे हाड तुटले होते ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज व उभय पक्षाच्‍या कथनावरुन स्‍पष्‍ट होते व त्‍यासंबंधीची शस्‍त्रक्रिया तक्रारकर्त्‍यावर 02.08.2006 रोजी केली होती ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन व गैरअर्जदाराचे कथनावरुन स्‍पष्‍ट होते. सदर प्रकरणामध्‍ये वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाला की नाही ही बाबही तपासण्‍याकरीता सदर प्रकरण अधिष्‍ठाता, इंदिरा गांधी गव्‍हर्नमेंट मेडीकल कॉलेज, (मेयो हॉस्पिटल), नागपूर ह्यांचेकडे पाठविण्‍यात येऊन त्‍यांचा तज्ञ अहवाल मागविण्‍यात आला होता. त्‍यांनी सदर प्रकरणात आपले तज्ञ मत दिले असून ते नि.क्र.53 वर दाखल आहे. ते खालीलप्रमाणे आहे.
OPINION
 
1.                 The treatment given by Dr. Ravi Sawarbandhe is not adequate. The fracture was improper, inadequate and not fixed rigidly.
2.                 There was infection of the operated femur left side i.e. osteomyetitis of femur bone leading to implant failure.  
 
 
सदर अहवालाचे अवलोकन केले असता, त्‍यात गैरअर्जदाराने दिलेले उपचार हे पर्याप्‍त नव्‍हते. तुटलेल्‍या हाडाची जुळवणी ही अयोग्‍य, अपर्याप्‍त होती आणि ताठपणे केलेली नव्‍हती. गैरअर्जदारानेसुध्‍दा होप हॉस्पिटल, नागपूर यांचे तज्ञ मत यामध्‍ये दाखल केले आहे. ते मत त्‍यांनी स्‍वतःहून दाखल केले असून त्‍याकरीता कोणते दस्‍तऐवज दिले याचा कोणताही उल्‍लेख नाही. परंतू अधिष्‍ठाता, इंदिरा गांधी गव्‍हर्नमेंट मेडीकल कॉलेज, (मेयो हॉस्पिटल), नागपूर यांचेकडे तक्रारीतील सर्व दस्‍तऐवज पाठविले होते व त्‍या आधारे त्‍यांनी जे मत दिले, त्‍यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे उपचार हे योग्‍य पध्‍दतीने केलेले नाही आणि त्‍यामुळेच तक्रारकर्त्‍याचे पायामध्‍ये हाड जोडण्‍याची प्रक्रिया योग्‍य प्रकारे होऊ शकली नाही.
 
9.    गैरअर्जदाराने आपल्‍या उत्‍तरामध्‍ये निकृष्‍ठ दर्जाच्‍या पट्टया लावल्‍या असता हाड जोडणी योग्‍य प्रकारे होऊ शकत नाही असे नमूद केले आहे व त्‍याकरीता त्‍या पट्टयांचा निर्मात्‍याला विरुध्‍द पक्ष करणे गरजेचे होते असे म्‍हटले आहे. ह्याचाच अर्थ असा निघतो की, हाड जोडण्‍याकरीता वापरलेल्‍या पट्टया योग्‍य नव्‍हत्‍या, तर त्‍याचा उपयोग गैरअर्जदाराने करावयास नको होता व त्‍यासंबंधीची सुचना त्‍यांनी तक्रारकर्ता किंवा त्‍यांच्‍या नातेवाईकास द्यावयास पाहिजे होती, कारण गैरअर्जदार हे वैद्यकीय क्षेत्रातील अस्थिरोग तज्ञ असून त्‍यांनी त्‍याबाबत संपूर्ण जाणिव असणे गरजेचे आहे. परंतू स्‍वतःची जबाबदारी दुस-यावर टाकण्‍याचा प्रयत्‍न गैरअर्जदार या प्रकरणात करीत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
 
10.              तक्रारकर्त्‍याने डॉ. सुधीर बाभुळकर ह्यांच्‍याकडे उपचार घेतले. डॉ. सुधीर बाभुळकर ह्यांच्‍या दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन ही बाब सिध्‍द व स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याचे उपचार हे योग्‍य पध्‍दतीने केलेले नसल्‍याने तक्रारकर्त्‍यास शारिरीक त्रास झाला. डॉ. सुधीर बाभुळकर यांच्‍या उपचारानंतर तक्रारकर्त्‍याचे हाड जुळलेले आहे व शस्‍त्रक्रियेच्‍या जागेवर वाहणारा पससुध्‍दा बंद झालेला आहे. यामध्‍ये ही बाब स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याची शस्‍त्रक्रिया योग्‍य पध्‍दतीने केलेली नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्ता हा त्‍यांच्‍याकडे फिजियोथेरपी करण्‍याकरीता आला नव्‍हता असे जे नमूद केले आहे ही बाब अमान्‍य करण्‍यात येते, कारण शस्‍त्रक्रियेनंतरसुध्‍दा तक्रारकर्ता हा वारंवार गैरअर्जदाराकडे गेल्‍याचे दस्‍तऐवजांवरुन स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदाराच्‍या चुकीमुळे व निष्‍काळजीपणामुळे तक्रारकर्त्‍याचा पाय आखुड झाला ही बाब डॉ. सुधीर बाभुळकर यांनी दिलेल्‍या प्रमाणपत्रावरुन (नि.क्र.42) निदर्शनास येते. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा त्‍यांनी गैरअर्जदाराला दिलेल्‍या शस्‍त्रक्रियेचे रु.60,000/- व शस्‍त्रक्रियेकरीता केलेला इतर सर्व खर्च, दुस-या शस्‍त्रक्रियेकरीता केलेला रु.16,000/- खर्च व इतर खर्च असे एकूण रु.1,35,382/- गैरअर्जदाराकडून मिळण्‍यास पात्र ठरतात.
 
11.    तक्रारकर्त्‍याने मानसिक व शारिरीक त्रास व अपंगत्‍वाकरीता रु.15,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर प्रकरणात ही बाब स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराने वैद्यकीय निष्‍काळजीपणा केला आणि योग्‍य ती काळजी घेतली नाही व तक्रारकर्त्‍याची शस्‍त्रक्रिया वैद्यकीय प्रणालीप्रमाणे न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे व त्‍याचा पाय आखुड झालेला आहे. तक्रारकर्ता हा रेल्‍वे कर्मचारी असून पाय आखुड झाल्‍यामुळे त्‍याच्‍या कार्यक्षमतेवर परिणाम झालेला आहे व पुढे होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्‍ये तक्रारकर्ता हा शारिरीक व मानसिक त्रास व अपंगत्‍वाकरीता गैरअर्जदाराकडून रु.5,00,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.10,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो.
वरील सर्व निष्‍कर्षावरुन, उपलब्‍ध दस्‍तऐवजांवरुन, दाखल शप‍थपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
-आदेश-
 
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराने वैद्यकीय निष्‍काळजीपणा केल्‍याचे घोषित करण्‍यात येते.
3)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला रु.1,35,382/- ही  रक्‍कम आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाच्‍या आत द्यावी अन्‍यथा सदर      रकमेवर गैरअर्जदार द.सा.द.शे. 9%  व्‍याज देय राहील.  
4)    गैरअर्जदाराने शारिरीक व मानसिक त्रासाच्‍या, तसेच आलेल्‍या अपंगत्‍वाच्‍या      भरपाईबाबत रु.5,00,000/- तक्रारकर्त्‍याला द्यावे.
5)    तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.10,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला द्यावे.
6)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे      आत करावे.
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT