Maharashtra

Gadchiroli

CC/11/2017

Shri. Narayan Paika Munghate - Complainant(s)

Versus

Dr. Rajesh M. Battulwar, Eye Doctor & 2 Others - Opp.Party(s)

Self

30 Jun 2017

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/11/2017
 
1. Shri. Narayan Paika Munghate
Age- 62 Yr., Occu- President, Dr. Babasaheb Ambedkar Sahayyata Center, At. Chankainagar, Ward No. 15, Gadchiroli, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr. Rajesh M. Battulwar, Eye Doctor & 2 Others
At. General Hospital, Gadchiroli, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashstra
2. Dr. Pramod Khandate, Eye Surgeon
At. General Hospital, Gadachiroli, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
3. Dr. Kiran Madavi, Ophthalmologist Officer
At. General Hospital, Gadchiroli, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. Roza F. Khobragade PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 
For the Complainant:Self, Advocate
For the Opp. Party:
Dated : 30 Jun 2017
Final Order / Judgement

आदेश

( मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो. झवेरी, सदस्य )

(पारित दि. 30/06/2017)

 

                                 अर्जदार , श्री. नारायण पैका मुनघाटे, यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अंतर्गत तक्रार दाखल केली. सदर तक्रार वर दि. 09/06/2017 ला प्राथमिक सुनावणी ऐकण्यात आली. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार क्र. CC/11/2017 सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ. राजेश म. बत्तुलवार (नेत्रचिकित्सक), डॉ. प्रमोद खंडाते (सिव्हील सर्जन), डॉ. किरण मडावी (नेत्रचिकित्सक अधिकारी) यांचे विरुद्ध दाखल करून अर्जदाराचे म्हणणे असे आहे कि, अर्जदाराला डोळ्याला त्रास झाला असल्यामुळे गैरअर्जदार डॉक्टर क्र. 1 कडे दि. 21 नोव्हेंबर 2015 ला डोळे तपासणी करिता गेले असता सदर गैरअर्जदार क्र. 1 ने काही औषधी लिहून दिले. अर्जदार दि. 05 जानेवारी 2016, 29 जानेवारी 2016, 03 ऑक्टोंबर 2016, 15 ऑक्टोंबर 2016 व 21 नोव्हेंबर 2016 असे अनेकदा गैरअर्जदार डॉक्टर कडे डोळे तपासणी करिता गेलेले आहेत. प्रत्येक वेळी डोळे तपासणी करिता सरकारी सामान्य रुग्णालय येथे OPD कार्ड काढून तपासणी केलेली आहे. सदर सर्व OPD कार्ड निशाणी क्र. 2 नुसार अर्जदाराने तक्रार सोबत दाखल केलेले आहेत. या मंचाद्वारे सर्व OPD कार्ड तपासणी केली असता, हे सर्व OPD कार्ड कोणतीही फी अर्जदाराने न भरता सरकारी नियमानुसार सर्वसामान्य करिता तसेच अर्जादाराकरिता शुल्कमुक्त / फ्री आहे व हि सेवा अर्जदाराने निशुल्क घेतलेली आहे.   

 

                                अर्जदाराने सरकारी सामान्य रुग्णालय येथे मोफत सेवा घेतलेली आहे. म्हणून ग्रा. सं. कायदा 1986 चे कलम 2(O) प्रमाणे कोणतीही मोफत दिली जाणारी सेवा यांचा समावेश होणार नाही तसेच 2(D) प्रमाणे अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक होत नाही. तसेच अर्जदाराला गैरअर्जदारांचे ग्राहक आहे हे सिद्ध करण्याकरिता संधी दिली असता, अर्जदाराने सिद्ध केले नसल्याने अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक होत नाही हे या न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खालील आदेशाप्रमाणे निकाली काढण्यात येत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
  2. अर्जदार यांनी आपला खर्च स्वतः सोसावा.
  3. अर्जादाराने तक्रार मद्धे दाखल केलेले मुळ दस्तावेज यांची सत्यप्रत घेऊन तक्रारीतील मूळ दस्तावेज अर्जदाराला परत करण्यात यावी.
  4. उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामूल्य देण्यात यावी. 
 
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.