Maharashtra

Bhandara

CC/14/101

Sujit Janardan Gabhane - Complainant(s)

Versus

Dr. Pradip Meghare - Opp.Party(s)

Adv. D.N.Bawane

11 Jan 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/14/101
 
1. Sujit Janardan Gabhane
R/o. Pohara (Lakhani), Tah. Lakhani, Dist. Bhandara
BHANDARA
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr. Pradip Meghare
R/o. Meghare Nursing Home, Station Road, Bhandara
Bhandara
Maharashtra
2. Dr. A.V.Gomkale
R/o. Akshay X-Ray, Sonography and Colour Doppler Clinic, Near Pande Mahal, Mahal Road, Bhandara
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 11 Jan 2017
Final Order / Judgement

तक्रार दाखल दिनांकः 23/12/2014

आदेश पारित दिनांकः 11/01/2017

 

 

तक्रार क्रमांक.      :          101/2014

 

                    

तक्रारकर्ता               :           श्री सुजीत जनार्दन गभणे

                                    वय – 21 वर्षे, धंदा – पानाचे दुकान,

                                    रा. पोहरा(लाखनी), ता.लाखनी जि.भंडारा

       

                                                                  

-: विरुद्ध :-

 

 

 

 

विरुध्‍द पक्ष         : 1)   डॉ.प्रदीप मेघरे

                                    वय – 50 वर्षे, धंदा – वैदयकिय व्‍यवसाय,

                                    मेघरे नर्सिंग होम, स्‍टेशन रोड,

                                    भंडारा ता.जि.भंडारा

 

 

                    2)  डॉ.ए.व्‍ही.गोमकाळे

वय – 50 वर्षे, धंदा – वैदयकिय व्‍यवसाय,

      अक्षय एक्‍स–रे, सोनोग्राफी अॅन्‍ड कलर डॉपलर 

क्लिनीक, पांडे महाल, महाल रोड, भंडारा

                                

           

 

तक्रारकर्त्‍यातर्फे       :     अॅड.डी.एन.बावणे

वि.प.1 तर्फे        :     अॅड.एन.एस.तलमले

                        अॅड.टी.झेड.गायधने, अॅड.एस.एस.लांबट,

वि.प.2            :     स्‍वतः

 

 

 

            गणपूर्ती            :     श्री. मनोहर चिलबुले        -    अध्‍यक्ष.

                                    श्री. एच. एम. पटेरीया      -    सदस्‍य.

 

                                                                       

श्री. मनोहर चिलबुले, अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

-//    दे    //-

  (पारित दिनांक – 11  जानेवारी 2017)

 

 

            तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त विवरण येणेप्रमाणे.

 

                                      तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे

 

  1. .            तक्रारकर्ता चहाचे दुकान चालवून त्‍याच्‍या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. तक्रारकर्त्‍याचे पोट दुखत असल्‍याने त्‍याने दिनांक19/6/2014 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 डॉ.प्रदीप मेघरे यांची भेट घेतली.  विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्‍यास अपेंडिक्‍स चा आजार असून ऑपरेशन करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर तक्रारकर्ता दिनांक 26/10/2014 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1च्‍या दवाखान्‍यात गेला असता त्‍याने अपेंडिक्‍स चे ऑपरेशनसाठी ताबडतोब भरती होण्‍यास सांगितले. आणि विरुध्‍द पक्ष क्र.2 डॉ.गोमकाळे यांच्‍याकडून किंवा सोनोव्हिजन इमॅजिंग सेन्‍टर,भंडारा (Sonovision Imaging Centre, Bhandra ) यांचेकडून सोनोग्राफी करुन घेण्‍याचा सल्‍ला दिला. तक्रारकर्ता दिनांक 26/10/2014 रोजी डॉ.गोमकाळे यांच्‍या सोनोग्राफी सेन्‍टर मध्‍ये गेला असता त्‍यांचा दवाखाना बंद असल्‍याने दुस-या दिवशी म्‍हणजे दिनांक 27/10/2014 रोजी तो विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या दवाखान्‍यात सोनोग्राफी करण्‍यासाठी गेला. विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्‍याची सोनोग्राफी करुन त्‍याच दिवशी अहवाल दिला आणि त्‍यांत “Appendix is markedly swollen, diameter – 15mm. Opinion – Acute appendicitis. A left renal calyceal Calculus”. असे नमुद केले.  

 

            दिनांक 27/10/2014 रोजी तक्रारकर्त्‍याने सोनोग्राफीचा वरील अहवाल विरुध्‍द पक्ष क्र.1 डॉ. प्रदीप मेघरे यांना दाखविला. सदर अहवाल पाहून विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी अपेंडिक्‍स चे ऑपरेशन त्‍वरीत करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले व त्‍यासाठी 12 ते 13 हजार रुपये खर्च येईल तसेच औषधीसाठी 2 ते 3 हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. विरुध्‍द पक्ष क्र.1 डॉ.प्रदीप मेघरे यांनी तक्रारकर्त्‍यास दिनांक 19/6/2014 रोजी दिलेल्‍या औषधीच्‍या चिठठीवर दिनांक 26/10/2014 रोजी सोनोग्राफी करण्‍याबाबतचा सल्‍ला लिहून दिला.

 

                                                विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी ताबडतोब अपेंडिक्‍सचे ऑपरेशन करण्‍याचा सल्‍ला दिल्‍यावरुन अपेंडिक्‍सच्‍या निदानाबाबत तक्रारकर्त्‍यास संशय आला त्‍यामुळे तो उपचारासाठी दिनांक 28/10/2014 रोजी शासकिय सर्वोपचार रुग्‍णालय, भंडारा येथे गेला. तेथे त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दिलेले औषधाचे prescription आणि विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी दिलेला सोनोग्राफीचा अहवाल डॉक्‍टरांना दाखविला. सर्वोपचार रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी सदर  prescription आणि सोनोग्राफीचा अहवाल पाहिल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याची रक्‍ततपासणी तसेच HIV ची चाचणी करण्‍यास सांगितले. त्‍यानंतर तक्रारकर्ता सर्वोपचार रुग्‍णालय, भंडारा येथे अपेंडिक्‍स च्‍या ऑपरेशनसाठी दिनांक 29/10/2014 रोजी भरती झाला.

 

                        दिनांक  30/10/2014 रोजी तक्रारकर्त्‍याला अपेंडिक्‍सच्‍या ऑपरेशन साठी ऑपरेशन थियटर मध्‍ये नेण्‍यात आले असता तेथील शल्‍यविशारदाने तक्रारकर्त्‍याची तपासणी करुन त्‍याला अपेंडिक्‍सच्‍या ऑपरेशनची गरज नसल्‍याचे सांगितले आणि डॉक्‍टर मेश्राम यांच्‍याकडे पाठविले. डॉक्‍टर मेश्राम यांनी सोनोग्राफी केली आणि शल्‍यविशारद यांच्‍या सारखेच मतप्रदर्शन केले. डॉक्‍टर मेश्राम यांनी केलेल्‍या सोनोग्राफी बाबत “ The complainants appendix is normal and therefore it does not require surgery.” असा अभिप्राय दिला. तक्रारकर्त्‍यास अशक्‍तता वाटत असल्‍याने त्‍या दिवशी त्‍याला  रुग्‍णालयातच ठेवून घेतले आणि दिनांक 30/10/2014 रोजी रुग्‍णालयातून सुटटी दिली.

 

                        तक्रारकर्त्‍याच्‍या अपेंडिक्‍स बाबत दोन्‍ही डॉक्‍टरांनी वेगवेगळे अभिप्राय व्‍यक्‍त केल्‍याने तो आणि त्‍याचे कुटूंबिय चिंतेत होते. शंका दुर करण्‍यासाठी त्‍याने दिनांक 1/11/2014 रोजी सोनोव्हिजन इमॅजिंग सेंटर, भंडारा येथे सोनोग्राफी करुन घेतली. त्‍यात तक्रारकर्त्‍याचे अपेंडिक्‍स सामान्‍य असल्‍याचे आढळून आले. याचा अर्थ विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी अपेंडिक्‍स बाबत दिलेला ऑपरेशनचा सल्‍ला आणि अहवाल चुकीचा असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याला दिनांक 26/10/2014 पासून ते 1/11/2014 पर्यंतच्‍या काळात अतिशय मानसिक त्रास सोसावा लागला. तसेच विरुध्‍द पक्षाच्‍या चुकीच्‍या सल्‍ल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला 8 दिवसाचा व्‍यवसाय गमवावा लागला. विरुध्‍द पक्षाच्‍या चुकीच्‍या निदानामुळे आणि चुकीच्‍या सल्‍ल्‍यामुळे जर तक्रारकर्त्‍याला अपेंडिक्‍सचे ऑपरेशन करावे लागले असते तर दैनंदिन व्‍यवहार अनेक दिवस बंद ठेवावा लागला असता आणि त्‍यामुळे त्‍याच्‍या व्‍यवसायावर दुष्‍परिणाम झाला असता.

 

                        विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी रुग्‍णावर उपचार व तपासणी करतांना व्‍यावसायिक ज्ञान व कुशलतेचा वापर करणे आवश्‍यक आहे. परंतु त्‍यांनी ते न करता निष्‍काळजीपणा  करुन  चुकीचे  निदान  केले  आणि  आपल्‍या वैदयकिय सेवेच्‍या कर्तव्‍यात कसुल केला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

           

                 

            1) विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास सोनोग्राफी व दवाखान्‍याच्‍या इतर   

                             खर्चासाठी आलेला खर्च रुपये 10,000/- दयावा.

 

2) विरुध्‍द  पक्षाने  तक्रारकर्त्‍यास त्‍याच्‍या  व्‍यवसायाच्‍या झालेल्‍या  

      नुकसानापोटी रुपये 10,000/- दयावे.

 

  1.   पक्षाने  तक्रारकर्त्‍यास  झालेल्‍या  शारीरिक  त्रासाबाबत  

     नुकसान भरपाई रुपये 10,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

 

 

4) विरुध्‍द  पक्षाने  तक्रारकर्त्‍यास  झालेल्‍या मानसिक त्रासाबाबत    

     नुकसान भरपाई रुपये 50,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा.

 

5) तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- विरुध्‍द पक्षावर बसवावा.

 

 

            तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या पृष्‍ट्यर्थ डॉ. मेघरे यांचे प्रिस्क्रिप्‍शन, डॉ. गोमकाळे यांचा सोनोग्राफी रिपोर्ट, सामान्‍य रुग्‍णालय, भंडाराची पावती, सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथील डॉ.चे प्रिस्क्रिप्‍शन, सामान्‍य रुग्‍णाल्‍य भंडारा येथील सोनोग्राफी रिपोर्ट, सोनोव्हिजन इमॅजिंग सेंटर, भंडारा येथील सोनोग्राफी रिपोर्ट तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास पाठविलेली नोटीस व त्‍याची पोचपावती इ. दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत.

 

  1. .                 विरुध्‍द पक्ष क्र.1 डॉ.प्रदीप मेघरे यांनी लेखी जबाब दाखल करुन  तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की दिनांक 19/6/2014 तक्रारकर्ता तपासणी साठी आला तेव्‍हा त्‍याने तपासणी करुन तक्रारकर्त्‍याच्‍या आजाराचे संभाव्‍य निदान ‘Acute Appendicitis’ असे केले आणि तक्रारकर्त्‍याला सोनोग्राफी करण्‍याचा त्‍याच दिवशी लेखी सल्‍ला दिला. त्‍यावेळी अपेंडिक्‍सचे 100% निदान झालेले नसल्‍याने अपेंडिक्‍सचे ऑपरेशन करण्‍याचा सल्‍ला दिला नव्‍हता. संभाव्‍य निदानावरुन दिनांक 19/6/2014 रोजी औषधी लिहून दिली होती.

 

            तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन तो दिनांक 27/10/2014 रोजी म्‍हणजे 4 महिन्‍यानंतर सोनोग्राफीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.2 डॉ.गोमकाळे यांच्‍याकडे गेल्‍या असल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने लिहून दिलेल्‍या औषधामुळे तक्रारकर्त्‍याचा त्रास कमी झाल्‍याने दिनांक 19/6/2014 नंतर तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे तपासणी साठी किंवा सल्‍ला घेण्‍यासाठी कधीही आला नाही.  तक्रारकर्ता सर्वोपचार रुग्‍णालय, भंडारा येथे दाखल झाला तेव्‍हा त्‍यास तपासणा-या व ऑपरेशनसाठी दाखल करुन घेणा-या डॉक्‍टरांचे नांव तक्रारीत नमुद नाही. ज्‍या डॉक्‍टरांनी त्‍यांस ऑपरेशन टेबलवर तपासल्‍यानंतर डॉक्‍टर मेश्राम यांच्‍याकडे सोनोग्राफी साठी पाठविले त्‍याचेही नांव नमुद नाही आणि त्‍यांचे शपथपत्र मंचासमोर दाखल केले नाही. तक्रारीमध्‍ये डॉक्‍टर मेश्राम यांनी सोनोग्राफी केल्‍याचे नमुद आहे मात्र तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन सोनोग्राफीचा अहवाल डॉक्‍टर चहांदे यांनी दिल्‍याचे दिसून येते. दिनांक 19/6/2014 रोजीच्‍या तपासणी व औषधोपचारानंतर 4 महिन्‍यात तक्रारकर्त्‍याचा अपेंडिक्‍सचा त्रास कमी झालेला असू शकतो. विरुध्‍द पक्षाच्‍या औषधोपचाराने तक्रारकर्त्‍याचा अपेंडिक्‍सचा त्रास कमी झाला असल्‍याने विरुध्‍द पक्ष 1 कडून रुग्‍णसेवेत कोणताही न्‍युनतापुर्ण व्‍यवहार झालेला नाही म्‍हणुन तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

 

            विरुध्‍द पक्ष क्र.2 डॉ.ए.व्‍ही.गोमकाळे यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याची सोनोग्राफी केल्‍याचे मान्‍य केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की सोनोग्राफी मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या अपेंडिक्‍स वर सुज आल्‍याचे त्‍यांना आढळून आले व त्‍याप्रमाणे त्‍यांनी सोनोग्राफीचा अहवाल दिलेला आहे. जेव्‍हा अपेंडिक्‍सचा आकार 6 mm पेक्षा अधिक असतो तेव्‍हा तो वाढलेला असल्‍याचे समजण्‍यात येते. तक्रारकर्त्‍याच्‍या अपेंडिक्‍स चा आकार 15 mm होता. त्‍यांना सोनोग्राफीचा 22 वर्षांचा अनुभव आहे आणि त्‍यांनी आपला दिर्घ अनुभव व कौशल्‍य वापरुन केलेले निदान 100 टक्‍के बरोबर होते. अपेंडिक्‍सचे निदान केल्‍यानंतर त्‍यावर औषधोपचार किंवा ऑपरेशन करुन तो बरा होतो. त्‍याबाबतचा निर्णय शल्‍यविशारदाने घ्‍यावयाचा असतो. काही रुग्‍णांच्‍या बाबतीत अपेंडिक्‍स औषधोपचाराने देखिल बरा होवू शकतो. सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने प्रथम सोनोग्राफी केल्‍यानंतर दुसरी सोनोग्राफी सहा दिवसांनी केली आहे आणि त्‍यामुळे मध्‍यतंरीच्‍या काळात केलेल्‍या औषधोपचारामुळे दुस-या सोनोग्राफीत अपेंडिक्‍सचा आकार सामान्‍य दिसू शकतो. एकाच गोष्‍टीच्‍या बाबतीत दोन डॉक्‍टरांचे भिन्‍न मत असू शकते. परंतु त्‍यामुळे एक डॉक्‍टर निष्‍काळजी होता असे म्‍हणता येत नाही. त्‍यांनी दिलेल्‍या इतर रुग्‍णांच्‍या सोनाग्राफी अहवालावरुन डॉ. मेघरे यांनी केलेल्‍या ऑपरेशन मुळे अनेक रुग्‍णांचा जिव वाचलेला आहे. त्‍यापैकी एकाच रुग्‍णाचे दोन सोनोग्राफी अहवाल लेखी जबाबासोबत दाखल केले आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता त्‍यांच्‍याकडून सेवेत कोणताही न्‍युनतापुर्ण व्‍यवहार झाला नसल्‍याने त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे.

           

  1. .          उभय पक्षांच्‍या कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.

 

 

            मुद्दे                                                   निष्‍कर्ष

 

 

1) वि.प.ने न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार केलेला आहे काय? –           नाही.

                                           

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय?     नाही.

3) अंतीम आदेश काय?                                  तक्रार खारीज  

                                               

 

 कारणमिमांसा  

 

 

  1.                     मुद्दा क्र.1 बाबततक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला आणि मौखीक युक्‍तीवादाचे वेळी गैरहजर राहिल्‍याने त्‍यांचा लेखी युक्‍तीवाद हाच तोंडी युक्‍तीवाद म्‍हणून विचारात घेण्‍यात आला. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 युक्‍तीवादाच्‍या वेळी गैरहजर राहिल्‍याने त्‍यांनी दाखल केलेला लेखी जबाब हाच त्‍यांचा युक्‍तीवाद समजण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष क्र.1 चे अधिवक्‍ता श्री तलमले यांनी मौखीक युक्‍तीवाद केला तो प्रकरणाच्‍या निर्णयासाठी विचारात घेण्‍यात आला.

 

तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या लेखी युक्‍तीवादात नमुद केले आहे कि, दिनांक 19/6/2014 रोजी तक्रारकर्ता पोटदुखीच्‍या त्रासासाठी उपचार करण्‍यास विरुध्‍द पक्ष क्र.1 डॉ.प्रदीप मेघरे यांच्‍या दवाखान्‍यात गेला. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तपासणी करुन तक्रारकर्त्‍यास अपेंडिक्‍सचा त्रास उद्भवला असून ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक 26/10/2014 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 ची भेट घेतली असता अपेंडिक्‍सचे त्‍वरीत ऑपरेशन करावे लागेल असे सांगून दवाखान्‍यात भरती होण्‍यास सांगितले व डॉ गोमकाळे विरुध्‍द पक्ष क्र.2 किंवा सेानोव्हिजन सेंटर, भंडारा येथून सोनोग्राफी करण्‍यास सांगितले व तसे दिनांक 19/6/2014 च्‍या औषधाच्‍या चिठठीवर लिहून दिले. तक्रारकर्त्‍याने दिनांक 27/10/2014 रोजी डॉ. गोमकाळे यांचे कडून सोनोग्राफी केली असता “अॅक्‍युट अपेंडिक्‍स” असल्‍याचा अहवाल दिला. तो दस्‍त क्र.2 वर दाखल केला आहे. दिनांक 27/10/2014 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 ला सोनोग्राफीचा अहवाल दाखविला तेव्‍हा अपेंडिक्‍सच्‍या शस्‍त्रक्रियेचा खर्च रुये 12-13 हजार आणि औषधखर्च रुपये 2-3 हजार येईल असे सांगून ऑपरेशन साठी भरती होण्‍यास सांगितले.

 

 तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 च्‍या निदानाबाबत शंका आल्‍याने दिनांक 28/10/2014 रोजी सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथे उपचार करुन घेण्‍यास गेला. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दिलेले Prescription व विरुध्‍द पक्ष क्र.2 ने दिलेला सोनोग्राफी अहवाल पाहिल्‍यानंतर तेथील डॉक्‍टरांनी इतर तपासण्‍या करुन घेतल्‍या आणि दिनांक 29/10/2014 रोजी शस्‍त्रक्रियेसाठी भरती होण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ता भरती झाला आणि दिनांक 30/10/2014 रोजी त्‍यास ऑपरेशन टेबलवर डॉक्‍टरांनी तपासले असता शस्‍त्रक्रियेची गरज नसल्‍याचे आढळून आल्‍यामुळे डॉ.मेश्राम यांचेकडे पुन्‍हा तपासणीसाठी पाठविले. डॉ.मेश्राम यांनी तपासले व  सोनोग्राफी करुन घेतली त्‍यांत अपेंडिक्‍सची स्थिती नॉर्मल असल्‍याचे आढळून आले. सदर अहवाल दस्‍त क्र.5 व आहे. त्‍यानंतर दिनांक 1/11/2014 रोजी सोनोव्हिजन इमॅजिंग सेंटर, भंडारा येथे सोनोग्राफी केली असता अपेंडिक्‍सची स्थिती सामान्‍य आढळून आली. सदर अहवाल दस्‍त क्र.6 वर आहे.

 

      वरीलप्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या अपेंडिक्‍सची वाढ झालेली नसतांना विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी अपेंडिक्‍सची वाढ झाल्‍याचे चुकीने निदान केले आणि विरुध्‍द पक्ष क्र.1 ने त्‍यासाठी ऑपरेशन आवश्‍यक असल्‍याने ऑपरेशन करता भरती होण्‍याचा चुकीचा सल्‍ला दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक तनावाखाली दिवस काढावे लागले. तसेच इतर डॉक्‍टरांकडे पुन्‍हा पुन्‍हा तपासणी करुन घ्‍यावी लागल्‍याने मानसिक त्रास सहन करावा लागला. सदर वस्‍तुस्थितीमुळे तक्रारकर्त्‍याचे चहापानाचे  दुकान  आठ  दिवस  बंद  ठेवावे  लागले. विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 च्‍या चुकीच्‍या निदानामुळे तक्रारकर्त्‍याने आवश्‍यकता नसलेली शस्‍त्रक्रिया करुन घेतली असती व त्‍यास शस्‍त्रक्रियेच्‍या वेदना व परिणाम सहन करावे लागले असते. म्‍हणुन विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2ची कृती वैदयकिय निष्‍काळजीपणा आणि सेवेतील न्‍युनता आहे.

 

            विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा की, केवळ शारीरिक तपासणी करुन (Clinical examination) अपेंडिक्‍सचे 100 टक्‍के निदान करता येत नाही. त्‍यासाठी सोनोग्राफीच्‍या प्रगत तंत्राचा वापर केला जातो. म्‍हणुन दिनांक 19/6/2014 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या शारीरिक तपासणीत जेंव्‍हा तक्रारकर्त्‍यास संभवतः अपेंडिक्‍सचा त्रास असल्‍याचे विरुध्‍द पक्ष क्र.1 ला आढळून आले तेंव्‍हा त्‍याच दिवशी तक्रारकर्त्‍याने डॉ.गोमकाळे किंवा सोनोव्हिजन इमॅजिंग सेंटर, भंडारा यांचे कडून सोनोग्राफी करुन घ्‍यावी असा सल्‍ला औषधाच्‍या चिठ्ठीवर लिहून दिला आणि 3 दिवसांचे औषध दिले. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दिलेल्‍या औषधामुळे तक्रारकर्त्‍याचा अपेंडिक्‍सचा त्रास कमी झाल्‍यामुळे मात्र तक्रारकर्ता त्‍यानंतर सल्‍ल्‍याप्रमाणे सोनोग्राफी अहवाल घेवून विरुध्‍द पक्षाकडे कधीही आला नाही. सोनाग्राफी अहवालाद्वारे अपेंडिक्‍सचे निश्चित निदानच झाले नसल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्‍यास ऑपरेशनसाठी त्‍याच्‍या दवाखान्‍यात भरती होण्‍यास सांगण्‍याचा प्रश्‍नच निर्माण झाला नाही. जर तक्रारकर्त्‍यास अपेंडिक्‍स ऑपरेशन करावे लागेल असे विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दिनांक 19/6/2014 रोजी सांगितले असते तर तक्रारकर्ता ऑपरेशनपुर्वी कराव्‍या लागणा-या सोनोग्राफीसाठी दिनांक 27/10/2014 पर्यंत 4 महिने थांबला नसता. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने  केलेल्‍या निदानात व औषधोपचारात कोणतीही चुक नव्‍हती.

 

            विरुध्‍द पक्ष क्र.1 शल्‍य विशारद आहे. तक्रारकर्ता पोटदुखीच्‍या त्रासासाठी दिनांक 19/6/2014 रोजी त्‍यांचेकडे गेल्‍यावर शारीरिक तपासणीत (Clinical examination) जर अपेंडिक्‍सचा त्रास असल्‍याची शक्‍यत दिसून आली तर सदर निदानाची 100% खात्री करुन घेण्‍यासाठी सोनोग्राफी करुन घेण्‍याची गरज आहे व म्‍हणुन त्‍याच दिवशी विरुध्‍द पक्ष क्र.1 ने सोनोग्राफीचा सल्‍ला औषधाच्‍या चिठ्ठीवर लिहून दिल्‍याचे आणि 3 दिवसाचे औषध देखिल दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते. दिनांक 19/6/2014 रोजीच्‍या औषधामुळे जर तक्रारकर्त्‍याच्‍या पोटदुखीस आराम मिळाला नसता तर तो 3 दिवसांनंतर परत तपासणीसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 किंवा अन्‍य डॉक्‍टरांकडे गेला असता. परंतु विरुध्‍द पक्षाच्‍या औषधामुळे आराम मिळाल्‍याने तक्रारकर्ता 3 दिवसांनंतर औषधोपचारासाठी परत विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे गेला नाही. तक्रारकर्त्‍याने अपेंडिक्‍सचे निदान करण्‍यासाठी दिनांक 19/6/2014 नंतर 4 महिनेपर्यंत सोनोग्राफी करुन घेतली नाही. त्‍यामुळे सोनोग्राफीशिवाय विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दिनांक 19/6/2014 रोजी अपेंडिक्‍सच्‍या ऑपरेशनचा सल्‍ला दिला हा तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद स्विकारणे कठीण आहे. अपेंडिक्‍सचे ऑपरेशनचा सल्‍ला दिला असता तर तक्रारकर्त्‍याने त्‍यासाठी आवश्‍यक असलेली सोनोग्राफी चाचणी त्‍वरीत करुन घेतली असती व 4 महिनेपर्यंत वेळ वाया घालविला नसता. तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दिनांक 26/10/2014 रोजी सोनोग्राफीचा सल्‍ला दिला असता तर ती तारीख नमुद केली असती. परंतु सोनोग्राफीच्‍या सल्‍ल्‍यावर अशी कोणतीही तारीख नसल्‍याने सदरचा सल्‍ला दिनांक 19/6/2014 रोजीच दिल्‍याचा विरुध्‍द पक्षाच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद अधिक तर्कसंगत आहे. म्‍हणुन विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून दिनांक 19/6/2014 रोजी केलेले औषधोपचार आणि शारीरिक तपासणीत अपेंडिक्‍सची शक्‍यता आढळून आल्‍याने निदान निश्चित करण्‍यासाठी (for conformation) सोनोग्राफीचा सल्‍ला देण्‍याची कृती सेवेतील न्‍युनता किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब ठरत नाही.

 

            तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 डॉ.गोमकाळे यांच्‍याकडून सोनोग्राफी करुन घेतली त्‍याचा अहवाल दस्‍त क्र.2 वर दाखल केला असून सदर तपासणीत रोगनिदान शास्‍त्राप्रमाणे (Pathology) अपेंडिक्‍सवर सूज आल्‍याने  त्‍याचा व्‍यास 15 mm झाल्‍याचे नमुद आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 चे म्‍हणणे असे की,. अपेंडिक्‍सचा व्‍यास 6  mm पेक्षा अधिक असल्‍यास तो रोगग्रस्‍त (pathological) समजण्‍यात येतो. त्‍यांना सोनोग्राफीद्वारे रोगनिदान शास्‍त्रातील 22 वर्षांचा अनुभव असून त्‍यांनी आजपर्यंत हजारो सामान्‍य व रोगग्रस्‍त अपेंडिक्‍सचे निरिक्षण व परिक्षण केले आहे आणि तक्रारकर्त्‍याच्‍या प्रकरणात त्‍यांनी नोंदविलेले निरिक्षण 100% बरोबर आहे.

 

            अपेंडिक्‍सचे रोगनिदान झाल्‍यावर सदर विकृती औषधोपचाराने किंवा शस्‍त्रक्रियेद्वारे दूर करण्‍याचा निर्णय शल्‍यविशारदाने घ्‍यावयाचा आहे. सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याचा अपेंडिक्‍स औषधोपचाराने बरा झाल्‍याचे दिसून येते व म्‍हणूनच त्‍यांच्‍याकडे केलेल्‍या पहिल्‍या सोनोग्राफीनंतर 6 दिवसांनी दुस-या ठिकाणी केलेल्‍या सोनोग्राफीत अपेंडिक्‍स सामान्‍य दिसू शकतो. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याची सोनोग्राफी करतांना आपला प्रदिर्घ अनुभव आणि कौशल्‍याचा पूर्ण उपयोग केला असून सेवेत कोणताही न्‍युनतापुर्ण व्‍यवहार केलेला नाही.

 

      विरुध्‍द पक्ष क्र.2 ने केलेल्‍या सोनोग्राफीचा दिनांक 27/10/2014 चा अहवाल व सोनोग्राफीची प्रिंट देखिल तक्रारकर्त्‍याने दाखल केली आहे. सदर प्रिंटमध्‍ये दिसणारा अपेंडिक्‍सचा आकार सामान्‍य असूनही तो 15 mm इतका वाढला असल्‍याचा चुकीचा व खोटा अहवाल दिल्‍याचे सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने सोनोग्राफी मधील कोणत्‍याही तज्ञाची साक्ष घेतलेली नाही. त्‍यामुळे दिनांक 27/10/2014 चा विरुध्‍द पक्ष क्र.2 ने दिलेला अहवाल चुकीचा असल्‍याचे सिध्‍द होत नाही.

 

      तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे की, त्‍याला विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 च्‍या निदानाबाबत शंका आल्‍याने तो तपासणीसाठी दिनांक 28/10/2014 रोजी सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथे गेला. त्‍यामुळे त्‍याला अपेंडिक्‍सचा खरोखरच त्रास आहे व त्‍यासाठी ऑपरेशनची आवश्‍यकता आहे याची खात्री केल्‍याशिवाय तक्रारकर्त्‍याला दिनांक 29/10/2014 रोजी ऑपरेशनसाठी भरती करुन घेण्‍याची शक्‍यता नाही. यावरुन सामान्‍य रुग्‍णालयात तक्रारकर्ता भरती झाला तेव्‍हा प्रत्‍यक्षात काय स्थिती होती हे दर्शविण्‍यासाठी सामान्‍य रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी केलेल्‍या तपासणीचा अहवाल तक्रारकर्त्‍याने दाखल करणे आवश्‍यक असतांना तो केलेला नाही. तक्रारकर्त्‍यास ऑपरेशन साठी भरती करतांना ज्‍या डॉक्‍टरांनी Clinical आणि Pathological examination केली त्‍यांना तक्रारकर्त्‍यास अपेंडिक्‍सचा त्रास असल्‍याची खात्री झाल्‍यामुळेच त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास ऑपरेशनसाठी भरती करुन घेतले. म्‍हणजेच सामान्‍य रुग्‍णालयाती ज्‍या डॉक्‍टरांनी तक्रारकर्त्‍यास ऑपरेशनसाठी भरती करुन घेतले त्‍यांचे निदान आणि विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 चे तक्रारकर्त्‍याच्‍या अपेंडिक्‍स बाबतचे निदान सारखेच होते असे दिसून येते.

 

             दिनांक 30/10/2014 रोजी तक्रारकर्त्‍यास ऑपरेशन टेबलवर नेल्‍यानंतर जे शल्‍यविशारद ऑपरेशन करणार होते त्‍यांनी तक्रारकर्त्‍याची तपासणी केल्‍यावर ऑपरेशनची आवश्‍यकता नाही असे सांगितल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे. मात्र त्‍या डॉक्‍टरांचे नांव आणि त्‍यांनी ऑपरेशन करण्‍याची आवश्‍यकता नाही असा दिलेला अभिप्राय किंवा त्‍या डॉक्‍टरांचे शपथपत्र पुरावा म्‍हणुन सादर केलेले नाही. शल्‍यविशारदाने तक्रारकर्त्‍यास डॉ.मेश्राम यांचेकडे पाठविले व त्‍यांनी पुन्‍हा तपासणी करुन आणि सोनोग्राफी करुन अपेंडिक्‍स नॉर्मल असल्‍याने ऑपरेशनची गरज नाही असा अभिप्राय दिल्‍याचे म्‍हटले असले तरी डॉ.मेश्राम यांचा अभिप्राय किंवा सोनोग्राफी रिपोर्ट दाखल केला नाही. जो सोनोग्राफी रिपोर्ट दाखल केला आहे  तो सोनोग्राफी प्रिंट शिवाय असून त्‍यावर डॉ.चहांदे यांची सही आहे. सदर रिपोर्ट देणा-या डॉक्‍टरांचे देखिल शपथपत्र तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले नसल्‍याने त्‍यादवारे विरुध्‍द पक्ष क्र.2 ने दिलेला अहवाल चुकीचा ठरत नाही.

 

            ऑपरेशनचे वेळी जर शल्‍यविशारदांना तक्रारकर्त्‍याचा अपेंडिक्‍स ऑपरेशन न करता औषधाने बरा होवू शकतो असे वाटले असेल आणि त्‍यांनी ऑपरेशनची आवश्‍यकता नाही असे तक्रारकर्त्‍यास सांगितले असेल तर त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 चे निदान खोटे ठरत नाही. कारण अपेंडिक्‍सचे उपचाराबाबत इंटरनेट वर खालीलप्रमाणे माहिती उपलब्‍ध आहे.

 

Treatment for appendicitis varies

“In rare cases, appendicitis may get better without surgery. Treatment might involve only antibiotics and a liquid diet. In most cases, however, however, surgery will be necessary. The type of surgery will depend on the details of your case”.

(From Article by Verneda Lights and Elizabeth Boskey, PhD)

 

                  1/11/2014 रोजी म्‍हणजे 6 दिवसांनी तक्रारकर्त्‍याने सोनोव्हिजन इमॅजिंग सेंटर येथे करुन घेतलेल्‍या सोनोग्राफीचा अहवाल दस्‍त क्र.6 वर दाखल केलेला आहे. त्‍यांत अपेंडिक्‍स बाबत कोणतीही विकृती दर्शविलेली नाही. सदर डॉक्‍टरांचे शपथपत्र देखिल तक्रारकर्त्‍याने दाखल केले नाही. अशा परिस्थितीत दिनांक 27/10/2014 रोजी असलेली अपेंडिक्‍सची सूज अॅन्‍टीबायोटिक्‍समुळे कमी झाल्‍याने 6 दिवसांनी अपेंडिक्‍सचा आकार सामान्‍य झाल्‍याची विरुध्‍द पक्ष क्र.2 ने सांगितलेली शक्‍यता नजरेआड करता येणार नाही. म्‍हणुन तक्रारकर्त्‍याला सामान्‍य रुग्‍णालय, भंडारा येथे तपासणी करुन ऑपरेशनसाठी भरती करुन घेणारे, ऑपरेशनच्‍या  टेबलबर  ऑपरेशनची आवश्‍यकता  नाही  असे  सांगणारे आणि त्‍या दिवशी तक्रारकर्त्‍याची पुन्‍हा तपासणी व सोनोग्राफी करणा-या आणि विरुध्‍द पक्षाने केलेल्‍या सोनोग्राफी नंतर 6 दिवसांनी 1/11/2015 रोजी सोनोग्राफी करणा-या डॉक्‍टरांच्‍या शपथपत्राशिवाय त्‍यावेळची नक्‍की वस्‍तुस्थिती काय होती हे सिध्‍द होवू शकत नसल्‍याने अशा पुराव्‍याअभावी विरुध्‍द पक्ष क्र.2 ने दिनांक 27/10/2014 रोजी सोनोग्राफी करुन सूज आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा अपेंडिक्‍सचा आकार 15 mm म्‍हणजे सामान्‍यापेक्षा वाढलेला होता असा दिलेला अहवाल चुकीचा होता व त्‍यामुळे त्‍यांचेकडून वैदयकिय सेवेत न्‍युनतापुर्ण व्‍यवहार झाला हा तक्रारकर्त्‍याचा आरोप सिध्‍द होत नाही.

म्‍हणुन मुद्दा क्र.1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी दिलेला आहे.       

                       

5.          मुद्दा क्र.2 व 3 बाबतमुद्दा क्र.1 वरील निष्‍कर्षाप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 कडून सेवेत कोणताही न्‍युनतापुर्ण व्‍यवहार घडल्‍याचे सिध्‍द न झाल्‍याने तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पात्र नाही. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

     

     वरील निष्‍कर्षास अनुसरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

           

- आ दे श  -

 

     

  1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.
  2.     खर्च ज्‍याचा त्‍याने सहन करावा.
  3.     आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्‍य पुरवावी.
  4.     प्रकरणाची ब व क प्रत तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

   

                

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.