6. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्ता मृतक विजया वसंत गावडे यांचे पती असुन वारसार असुन लाभार्थी म्हणून सुध्दा सदर तक्रार चालविण्यास समर्थ आहेत. तक्रारकर्त्याचे लग्न दि.03.05.2001 रोजी झाले असुन ब-याच वर्षांनंतर तक्रारकर्त्याचे पत्नी गरोदर राहीली. सदरची बाब समजताच विरुध्द पक्ष डॉ. नितिन एस. कोडवते, यांचे खाजगी रुग्नालयात तक्रारकर्त्याची पत्नी नियमीतपणे जात होती व डॉक्टरांचे सल्ल्याप्रमाणे काटेकोरपणे औषधे घेत होती. 7. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- तक्रारकर्त्याची पत्नी विरुध्द पक्षाकडे गरोदर झाल्यापासुन उपचार करीत होती हे तक्रारकर्ता व विरुध्द पक्षांनी दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन सिध्द होते. विरुध्द पक्षांचे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याला पत्नीच्या मृत्यूच्या रात्री सांगितले होते की, माझेकडे जी सुविधा जसे आय.सी.यु.,रक्त तपासणी, रक्त पुरवण्याची व सोनोग्राफीची सुविधा नसल्यामुळे तुम्ही पेशंटला सरकारी दवाखान्यात घेऊन जा असा सल्ला दिला होता. विरुध्द पक्षांनी दाखल केलेल्या दस्तावेज क्र. 25,26 व 27 निशाणी क्र.7 नुसार सिध्द होते मग विरुध्द पक्षाने कशाला ‘मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पीटल’, म्हणून रुग्णाला सेवा देत आहे. जेव्हा की, मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपरोक्त सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच विरुध्द पक्षाने आपल्या लेखी उत्तरात असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने मृतक पत्नीची सोनोग्राफी माझेकडून गेल्यानंतर सरकारी दवाखान्यात भरती झाल्यावर केलेली आहे. परंतु जेव्हा तक्रारकर्ता सरकारी दवाखान्यात पत्नीला भरती केले व तिचेवर उपचार सुरु असतांना तिचे जवळ डॉ. कुंभारे यांची सोनोग्राफी रिपोर्ट होती असे कथन स्वतः सरकारी दवाखात्याचे डॉ. दिपचंद सोयाम व डॉ. अनिल यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. विरुध्द पक्षानं निशाणी क्र.7 वरील दस्तावेज क्र. 3 चा अहवालातील पान क्र.10 ईथे हे ही उल्लेखनिय आहे की, जिल्हा सामान्य रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा असेल व त्यासाठी रात्री 1.30 वाजता तक्रारकर्त्यास प्रायव्हेट डॉक्टरकडून सोनोग्राफी घेण्याची गरज नाही. एकंदरीत विरुध्द पक्ष याबाबतीत खोटे कथन करीत असल्याचे सिध्द होते. तसेच सदर निशाणी क्र.7 वरील दस्तावेज क्र. 3 चा अहवालातील पान क्र.10 वरील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अहवालानुसार विरुध्द पक्षांनी दिेलेले उपचारामुळे प्रसुतीनंतर अती रक्तस्त्राव झाल्यामुळे तक्रारकरर्त्याचे पत्नीचा मृत्यू उपचारा दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दि.07.10.2016 रोजी रात्री 10.30 वाजता झाला. एकंदरीत तक्रारकर्त्याची त्यावेळची मानसिक स्थिती बघता तक्रारकर्त्याचे पत्नीला लग्नानंतर ब-याच वर्षांनी गरोदरपणा आला व अश्या स्थितीत बाळ उपचारा दरम्यान मरण पावले व पत्नीही नंतर मरण पावली याला विरुध्द पक्ष पुर्णपणे जबाबदार आहे, असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. जर विरुध्द पक्षांनी वेळेत सेवा दिली असती तर कदाचीत तक्रारकर्त्याचे पत्नीचा मृत्यू टाळता आला असता. एकंदरीत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास न्युनतापूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे, असे या न्याय मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे. - // अंतिम आदेश // - 1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्षांविरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु. 5,00,000/- व तक्रारीचा खर्च 5,000/- अदा करावा. 3. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. 4. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी. 5. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. |