Maharashtra

Kolhapur

CC/05/282

Mahadev Shahu Karape - Complainant(s)

Versus

Dr. Kiran N. Doshi - Opp.Party(s)

A.D.Bhumkar/R.R.Wayangankar

30 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/05/282
1. Mahadev Shahu KarapeMain Road,Kasaba Bawada,Tal.Karveer,Dist.Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Dr. Kiran N. DoshiDoshi Nursing Home, Behind Tourist Hotel, New Shahupuri, Near S.T.Stand, Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :A.D.Bhumkar/R.R.Wayangankar, Advocate for Complainant
D.P.Mundargi, Advocate for Opp.Party

Dated : 30 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.30.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदार हे कोल्‍हापूर येथील गर्व्‍हमेंट प्रेस येथे नोकरीस आहेत. दि.02.02.2004 रोजी रात्री 8 वाजणेचे सुमारास कोल्‍हापूर येथे त्‍यांचा अपघात होवून उजवा पाय गुडघ्‍यातून मोडला. तक्रारदारांच्‍या कुटुंबियांनी तक्रारदारांना दि.02.02.2004 रोजीच रात्री सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांच्‍याकडे दाखल केले. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍यावर एक वर्षाच्‍या कालावधीत उपचार करीत होते. त्‍यामध्‍ये तक्रारदारांचा मोडलेला पाय व्‍यवस्थित करणेसाठी पहिले ऑपरेशन केले. त्‍यामध्‍ये सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या पायामध्‍ये नटबोल्‍ट व लोखंडी सळया घातल्‍या होत्‍या. ऑपरेशननंतर असे दिसून आले की, पायामध्‍ये बसविलेले नट-बोल्‍ट सैल होवू लागले, पायाचे हाड नीटपणे जुळलेले नव्‍हते. तक्रारदार व त्‍यांच्‍या कुटुंबियानी सामनेवाला यांना तसे सांगूनही त्‍यांनी त्‍यामध्‍ये हलगर्जीपणा केला व तक्रारदारांच्‍या पायाकडे व्‍यवस्थित लक्ष न देता डॉक्‍टर म्‍हणून कोणतीही काळजी घेतली नाही व या कालावधीमध्‍ये तक्रारदारांच्‍याकडून रक्‍कम रुपये 1 लाख उपचारासाठी घेतले. तसेच, याव्‍यतिरिक्‍त तक्रारदारांना औषधोपचारासाठी बराच मोठा खर्च झालेला आहे.
 
(3)        तक्रारदार त्‍यांच्‍या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला डॉक्‍टरांनी पहिला ऑपरेशन चुकीचे झाले आहे याची माहिती तक्रारदारांना न देता तक्रारदारांना दुसरे ऑपरेशन करावे लागेल त्‍यासाठी मुंबईहून गुडघ्‍याचे हाड आणावयाचे आहे व ऑपरेशन करुन पाय व्‍यवस्थित करुन देतो असे तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबियांना आश्‍वासन दिले व एकूण खर्च रुपये 1 लाख येईल असे सांगितले. त्‍याप्रमाणे सामनेवाला यांना रक्‍कम रुपये 1 लाख दिले. अशी एकूण रक्‍कम रुपये 2,00,000/- सामनेवाला यांना दिलेले आहेत. 
 
(4)        तक्रारदार पुढे सांगतात, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍याकडून रक्‍कम स्विकारुन दुसरे ऑपरेशन केले. दुसरे ऑपरेशन केल्‍यानंतरही पायात बसविलेले लोंखडी रॉड, नट-बोल्‍ट, गुडघ्‍यामधील कृत्रिम हाड व्‍यवस्थित बसविलेले नव्‍हते. याबाबत सामनेवाला यांना सांगूनही त्‍यांनी अजिबात लक्ष दिले नाही. सदर ऑपरेशनमध्‍ये तक्रारदारांना शारिरीक वेदना होवून त्रास झालेला आहे. 
 
(5)        तक्रारदार त्‍यांच्‍या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांची दोन ऑपरेशन्‍स् होवूनही त्‍यांचा पाय बरा झालेला नव्‍हता. सामनेवाला यांनी तिसरे ऑपरेशन करावे लागेल असे तक्रारदार व त्‍यांच्‍या कुटुंबियांना सांगितले व त्‍यासाठी तक्रारदारांना रककम रुपये 1,10,000/- इतका खर्च आलेला आहे. तिस-या ऑपरेशनमध्‍ये पाय बरा न होता पूर्णपणे निकामी झाला आहे.
 
(6)        तक्रारदार त्‍यांच्‍या तक्रारीत पुढे सांगतात, तद्नंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांना चौथे ऑपरेशन करावे लागेल व त्‍याचा खर्च रुपये 1 लाख येईल असे सांगितले. तीन ऑपरेशन करुनही पाय बरा न झाल्‍याने तक्रारदारांचा सामनेवाला यांचेवरील विश्‍वास कमी झाला. त्‍यामुळे सामनेवाला यांचेकडील पुढील उपचार घेणेचे तक्रारदारांनी सोडून दिले व ते कोल्‍हापूर येथील तज्‍ज्ञ डॉक्‍टर श्री.शिवप्रसाद खोत यांचेकडे उपचार घेणेचे ठरविले. सदर उपचारामध्‍ये सर्व औषधोपचार व तीनवेळा केलेली ऑपरेशन्‍स चुकीच्‍या पध्‍दतीने केलेली आहे, पाय पूर्णपणे निकामी झाले आहे व पायाचे चौथे ऑपरेशन करुन पाय कोणत्‍याही परिस्थिती व्‍यवस्थित होणार नाही व पाय गुडघ्‍याततून काढण्‍याशिवाय पर्याय नाही असे तज्‍ज्ञ डॉ.श्री.खोत यांनी तक्रारदारांना सांगितले. त्‍याप्रमाणे डॉ.शिवप्रसाद खोंत यांनी तक्रारदारांचे ऑपरेशन केले व त्‍यांचा पाय गुडघ्‍यातून काढावा लागला. त्‍यासाठी तक्रारदारांना रक्‍कम रुपये 50,000/- इतका खर्च आलेला आहे. 
 
(7)        तक्रारदार त्‍यांच्‍या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍यावर तिन्‍हीवेळा केलेले ऑपरेशन्‍स निष्‍काळजीपणा व बेफिकिरीने केलेली आहेत. व्‍यवस्थितपणे ऑपरेशन केले असते तर पाय बरा झाला असता त्‍यामुळे तक्रारदारांना त्‍यांचा पाय गमवावा लागला आहे व प्रचंड मानसिक त्रास तक्रारदार व त्‍यांच्‍या कुटुंबियांना झाला आहे. तक्रारदारांना तिन्‍ही ऑपरेशन्‍ससाठी झालेला खर्च रुपये 3,10,000/-, तक्रारदारांना एक वर्ष नोकरी करता आली नाही त्‍यामध्‍ये झालेले नुकसान रुपये 1,50,000/-, कृत्रिम पाय बसविणेसाठी तक्रारदारांना रुपये 20,000/- चे दरम्‍यान खर्च आला आहे. चौथ्‍या ऑपरेशनसाठी रक्‍कम रुपये 50,000/- खर्च आलेला आहे. कायमचे अपंगत्‍व आल्‍याने मानसिक त्रासापोटी रुपये 1,50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- अशी एकूण रक्‍कम रुपये 6,85,000/- द.सा.द.शे.15 टक्‍के व्‍याजासह देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
 
(8)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबतदि.17.09.2004 रोजीचे सर्टिफिकेट, दि.03.03.2004 रोजीचे खर्चाचे सर्टिफिकेट फॉर्म ‘सी’, सदरप्रमाणेचे सर्टिफिकेट फॉर्म ‘डी’ व बिले (दि.03.03.2004), ट्रिटमेंटच्‍या बिलाची पावती, दि.11.07.2005 रोजी सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, पोचपावती, दि.11.03.2005 रोजीचे शाहुपूरी पोलीस स्‍टेशनमधील चार्जशीट, दि.03.02.2004 रोजीचा पंचनामा, दि.02.02.2004 रोजीचा ज‍बाब इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. 
      
(9)        सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदार हे दि.02.02.2004 रोजी अ‍ॅक्सिडेंट पेशंट म्‍हणून सामनेवाला यांच्‍या दवाखान्‍यात अ‍ॅडमिट झाले. त्‍यावेळी शाहुपूरी पोलीस ठाण्‍यात कळविणेत आले. तक्रारदार सामनेवाला यांच्‍या दवाखान्‍यात अ‍ॅडमिट झाले त्‍यावेळेस त्‍यांची स्थिती अत्‍यंत गंभीर व नाजूक होती. त्‍यावर सामनेवाला यांनी ताबडतोब विविध प्रकारचे एक्‍सरे काढून उपचार सुरु केले. जखमा या गंभीर स्‍वरुपाच्‍या होत्‍या. तक्रारदारांच्‍या इतर लॅबोरेटरी टेस्‍ट पूर्ण झाल्‍यावर सामनेवाला यांच्‍या लक्षात आले की, तक्रारदारांना गंभीर स्‍वरुपाचा मधुमेह आहे व त्‍यांनी ही बाब सामनेवाला यांच्‍यापासून लपवून ठेवली. अपघाताचेवेळेस तक्रारदारांच्‍या अंगातून बरेचशे रक्‍त वाहून गेले होते. अशा कठीण परिस्थितीत, तक्रारदारांच्‍यावर उपचार सुरु केले व उपचार सुरु करण्‍यापूर्वी तक्रारदारांचे भाऊ, इतर नातेवाईक यांच्‍याकडून लेखी लिहून घेतले. तक्रारदारांना भुलीखाली घेवून जखमा साफ करुन पुढील उपचार करणे अशा बाबी करुन दि.07.02.2004, दि.17.02.2004, दि.28.02.2004 रोजी स्‍वतंत्रपणे जनरल भुलीखाली प्रोसिजर करुन उपचार केले आहेत व त्‍याप्रमाणे दि.03.03.2004 रोजी डिस्‍चार्ज दिलेला आहे. 
 
(10)       सामनेवाला त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदार पेशंट पुन्‍हा दि.23.03.004 रोजी अ‍ॅडमिट झाला, त्‍याचदिवशी ऑपरेशन जनरल भुलेखाली करुन दुसरे दिवशी डिस्‍चार्ज दिलेला आहे. त्‍यानंतर पुन्‍हा पेशंट दि.15.06.2004 रोजी अ‍ॅडमिट झाला, कारण त्‍याचे म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍याच्‍या पायातील रॉड तुटला होता. सदरचा रॉड तुटणेस तक्रारदार हेच सर्वस्‍वी जबाबदार आहेत. त्‍याप्रमाणे त्‍याचदिवशी जनरल भुलेखाली ऑपरेशन करुन तुटलेला रॉड काढून रिंग फिक्‍सेटर बसविला. त्‍यानंतर तक्रारदारांनी प्रकृती ठणठणीत झाली व दि.21.06.2004 रोजी डिस्‍चार्ज दिला. त्‍यानंतर पुन्‍हा तक्रारदार पेशंट दि.17.07.2004 रोजी सामनेवाला यांच्‍या दवाखान्‍यात अ‍ॅडमिट झाला व त्‍याचे दि.28.07.2004 रोजी व दि.04.08.2004 रोजी बोन ग्राफ्टींगचे वगैरे पुन्‍हा ऑपरेशन करुन पुन्‍हा ऑपरेशन करुन त्‍याची परिस्थिती पुर्णपणे सुधारलेने दि.21.08.2004 रोजी डिस्‍चार्ज दिला. 
 
(11)        सामनेवाला त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, वास्‍तविक दि.03.03.2004 रोजीच्‍या रुपये 94,170/- या व्‍यतिरिक्‍त तक्रारदारांनी उपचाराचे बिल दिलेले नाही. दि.21.07.2004 रोजी बिल महिन्‍या-दिड महिन्‍यात देवू असे लिहून दिलेले आहे. तसेच, दि.21.08.2004 रोजी संपूर्ण एक्‍सरे प्‍लेटस्, रिपोर्टस्, डिस्‍चार्ज कार्ड देवून पेशंट अत्‍यंत ठणठणीत पध्‍दतीने सामनेवाला यांच्‍या दवाखान्‍यातून डिस्‍चार्ज होवून गेले आहेत. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी.  कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट रुपये 5 लाख देणेचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
 
(12)       सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत त्‍यांचे हॉस्पिटलमधील केसपेपर्स (क्र.1 ते 113) च्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.         
 
(13)       तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे, दोन्‍ही बाजूंनी दाखल केलेली कागदपत्रे व शपथपत्रे यांचे अवलोकन केले असता प्रस्‍तुत प्रकरणी खालीलप्रमाणे मुद्दे निष्‍कर्षाकरिता येत आहेत :-
 
1.    तक्रारदार व सामनेवाला यांच्‍यामध्‍ये ग्राहक हे
       नाते निर्माण होते काय ?                                               -- होय
 
2.    सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांच्‍या वैद्यकिय
       सेवेमध्‍ये निष्‍काळजीपणा झालेला आहे काय ?                   -- होय
 
3.    तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत              -- होय
           काय ?
 
4.    काय आदेश ?                                                              -- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र. 1 :-
 
           प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांच्‍या वकिलांचा तसेच सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी स्‍वत: केलेला युक्तिवाद, तसेच सामनेवाला यांच्‍या वकिलांचा युक्तिवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे या मंचाने ऐकून घेतलेला आहे. तसेच, उपलब्‍ध कागदपत्रांचे व दाखल शपथपत्रांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी मोबदला घेवून तक्रारदार रुग्‍णास वैद्यकिय सेवा दिली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(ओ) यातील तरतुद विचारात घेतली असता सदरचा वाद ग्राहक वाद होत आहे व तक्रारदार रुग्‍ण हे सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांचे ग्राहक होत आहेत असा निष्‍कर्ष काढीत आहेत. सदर विवेचनास हे मंच खालील पूर्वाधाराचा आधार घेत आहे :-
 
Indian Medical Association v. V P Shanta - (1995) 6 SCC 651 = JT 1995 (8) SC 119 = (1995) 19 CLA 258 (SC) = 1996 CCJ 1 = (1996) 1 Comp LJ 15 = (1995) 2 CPJ1 = (1996) 86 Comp Cas 806 = AIR SCW 4463 = (1995) 3 CTJ 969 = AIR 1996 SC 550.
 
           वरील विवेचन व पूर्वाधार विचारात घेता मुद्दा क्र.1 होकारार्थी आहे.
 
मुद्दा क्र.2 :-
          
      तक्रारदारांची तक्रार ही सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी वैद्यकिय निष्‍काळजीपणा केलेला आहे व त्‍याबाबतची नुकसान भरपाई प्रस्‍तुत प्रकरणी मागितलेली आहे. सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदारांना दि.02.02.2004 रोजी रात्री 8 वाजता अपघात झालेला आहे व सदर दिवशी रात्रीच सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांच्‍या दवाखान्‍यात अ‍ॅडमिट केले आहे. त्‍यावेळेस सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी तक्रारदार रुग्‍णावरती उपचार सुरु केले आहेत व त्‍यानंतर दि.28.02.2004 रोजी लेखी संम्‍मती घेवून तक्रारदारांच्‍या मोडलेल्‍या हाडासाठी शस्‍त्रक्रिया केलेली आहे दि.03.03.2004 रोजी डिस्‍चार्ज दिलेला आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदार रुग्‍णास दि.23.03.2004 रोजी तक्रारदारांना अ‍ॅडमिट करुन जनरल भुलीखाली शस्‍त्रक्रिया केली व त्‍यांनतर तक्रारदार पुन्‍हा दि.15.06.2004 रोजी अ‍ॅडमिट झाले.   त्‍यावेळी पायाचा रॉड तुटलेला होता. पुन्‍हा ऑपरेशन करुन सदर तुटलेला रॉड काढून रिंग फिक्‍सेटर बसविलेला आहे व दि.21.06.2004 रोजी डिस्‍चार्ज घेतलेला आहे. पुन्‍हा दि.17.07.2004 रोजी व दि.28.07.2004 व दि.04.08.2004 रोजी बोन ग्राफिटंगचे ऑपरेशन करुन दि.12.08.2004 रोजी डिस्‍चार्ज दिलेला आहे. सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी तक्रारदारांना गंभीर स्‍वरुपाचा मधुमेह होता व सदर मधुमेह असलेचे लपवून ठेवले असलेचे त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात नमूद केले आहे. परंतु, उपरोक्‍त वस्‍तुस्थितीचा विचार करता कोणतीही शस्‍त्रक्रिया करीत असताना मधुमेहाबाबतची चाचणी करणे अनिवार्य असते. उपरोक्‍त उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी तक्रारदारांच्‍या मोडलेल्‍या हाडावरती शस्‍त्रक्रिया केलेल्‍या आहेत. त्‍या-त्‍यावेळेस तक्रारदारांचे रक्‍तामध्‍ये असलेली साखर नियंत्रित करुन उपचार करणे आवश्‍यक होते. तक्रारदारांच्‍या पायामध्‍ये प्रथम ऑपरेशन करुन रॉड बसविलेला आहे. तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍या दवाखान्‍यात अ‍ॅडमिट करुन प्रथम जखमेवरती उपचार केलेले आहेत व त्‍यानंतर तक्रारदारांच्‍यावरती ऑपरेशन करुन रॉड बसविलेला आहे. दरम्‍यानच्‍या कालावधीमध्‍ये तक्रारदारांच्‍या रक्‍तामध्‍ये जादा असलेली साखर नियंत्रित करता येणे शक्‍य होते. परंतु, तक्रारदारांच्‍या रक्‍तातील साखर नियंत्रित न करता सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी शस्‍त्रक्रिया केलेल्‍या आहेत. 
 
           या मंचाने सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी निष्‍काळजीपणा केला आहे किंवा कसे याबाबत राजर्षि छ.शाहु शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्‍हापूर यांचेकडून वैद्यकिय अहवाल येणेबाबतचा आदेश केला. त्‍यानुसार डॉ.राहुल बडे, विभाग प्रमुख, अस्थिव्‍यंगशल्‍यचिकित्‍सा विभाग यांनी अहवाल दिलेला आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍या अहवालामध्‍ये सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांचा वैद्यकिय निष्‍काळजीपणा नाही असा अहवाल दिलेला आहे. तक्रारदारांच्‍या वकिलांनी सदर डॉ.राहुल बडे यांचा उलटतपास घेणेस परवागनी मिळावी याबाबचा अर्ज दिला होता;  सदर अर्जावर या मंचाने आदेश पारीत करुन सदर डॉ.राहुल बडे यांना तक्रारदारांनी प्रश्‍नावली (Interrogatory) द्यावी व सदर डॉक्‍टरांनी सदर प्रश्‍नावलीस शपथपत्रावरती उत्‍तरे द्यावीत असा आदेश पारीत केला. त्‍यानुसार तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या प्रश्‍नावलीवरती साक्षीदार, डॉ.राहुल बडे यांनी उत्‍तरे दिलेली आहेत. सदर प्रश्‍नावली व त्‍यावर दिलेली उत्‍तरे यांचे अवलोकन केले असता व त्‍या अनुषंगाने तज्‍ज्ञ मताचे अवलोकन केले असता सदर तज्‍ज्ञ मताचा अहवाल हा विसंगत तसेच त्रोटक माहितीवर आधारित व वैद्यकियशास्‍त्राचा आधार घेवून केला नसल्‍याचे दिसून येते. सदर प्रश्‍नावलीतील प्रश्‍न क्र.20 यामध्‍ये ‘पेशंट अडमिट झालेवर त्‍याचा रक्‍तदाब तसेच त्‍याचे रक्‍तातील साखर तपासणे आवश्‍यक आहे काय ?’ या प्रश्‍नास डॉ.राहुल बडे यांनी ‘होय’ असे उत्‍तर दिले आहे. तसेच, प्रश्‍न क्र.24 - ‘‘पेशंटचे रक्‍तातील साखर नियंत्रित करणे आवश्‍यक असते काय ?’’ या प्रश्‍नास - ‘‘इमर्जन्‍सी ऑपरेशनसाठी रक्‍तातील साखर नियंत्रित करणे गरजेचे नसते, परंतु नियोजित ऑपरेशनसाठी साखर शक्‍य तेवढी नियंत्रित करणे आवश्‍यक असते’’ असे उत्‍तर दिले आहे. तसेच, प्रश्‍न क्र.26 - ‘‘ऑपरेशनपूर्वी साखर नियंत्रित करणेची जबाबदारी संबंधित डॉक्‍टरांची असते’’ या प्रश्‍नास डॉ.राहुल बडे यांनी ‘होय’ असे उत्‍तर दिले आहे. प्रश्‍न क्र.32 - ‘‘तक्रारदार यांच्‍या रक्‍तातील साखर तपासलेबाबत रिपोर्टस् दिसून येत नाही’’ या प्रश्‍नास ‘साखर तपासणीचे रिपोर्टस् दिसून येत नाहीत’ असे उत्‍तर दिले आहे. प्रश्‍न क्र.36 या मध्‍ये ‘‘तक्रारदार सामनेवाला यांचे दवाखान्‍यात अडमिट झाला त्‍यावेळेस पायाची जखम तीव्र व जंतुसंसर्ग झाला होता काय ?’’ या प्रश्‍नास जखम तीव्र व जंतुसंसर्ग झाला होता असे उत्‍तर दिले आहे. तसेच, प्रश्‍न क्र.37 - ‘‘ऑपरेशन करणेपूर्वी जंतुसंसर्ग पूर्णपणे कमी करुन जखम बरी करणे आवश्‍यक असते काय ?’’ या प्रश्‍नास ‘इमर्जन्‍सी ऑपरेशनचेवेळी जंतुसंसर्ग पूर्ण बरे करणे आवश्‍यक नसते’ असे उत्‍तर दिले आहे. सदर प्रश्‍नावलीमधील प्रश्‍न क्र.58 - ‘‘तक्रारदारांच्‍या पायातील हाडे ही रॉडमुळे व्‍यवस्थित न बसल्‍यामुळे रॉड मोडला?’’      या प्रश्‍नास ‘सांगता येत नाही’ असे उत्‍तर दिले आहे. तसेच, प्रश्‍न क्र.59 - तक्रारदारांच्‍या पायामध्‍ये बसविलेला रॉड चुकीच्‍या पध्‍दतीने बसविलेला असल्‍याने हाडे जुळून आली नव्‍हती ?’’ या प्रश्‍नास ‘निश्चित सांगता येत नाही’ असे उत्‍तर दिले आहे.   तसेच प्रश्‍न क्र.63 यामध्‍ये सामनेवाला यांनी तक्रारदारांचे रॉड काढून रिंग फिक्‍सेटर बसविला’’ या प्रश्‍नास ‘होय’ असे उत्‍तर दिले आहे. तसेच, प्रश्‍न क्र.63 - ‘‘सदर रिंग फिक्‍सेटरची क्षमता काय होती व त्‍याची नोंद केसपेपरमध्‍ये नमूद नाही ?’’   या प्रश्‍नास होय असे उत्‍तर दिले आहे. तसेच, प्रश्‍न क्र.65 - ‘‘सदर रिंग फिक्‍सेटर योग्‍य दर्जाचा होता किंवा नाही याबाबत तुम्‍ही काही सांगू शकत नाही’’ या प्रश्‍नास नाही असे उत्‍तर दिले आहे. तसेच प्रश्‍न क्र. 66 - ‘‘सदर रिंग फिक्‍सेटर बसवूनही तक्रारदारांच्‍या पायातील हाडे व सांधे जुळलेली नव्‍हती’’ या प्रश्‍नास ‘‘हाडे व सांधे जुळलेली नव्‍हती’’ असे उत्‍तर दिले आहे. तसेच प्रश्‍न क्र.68 - ‘‘सामनेवाला यांनी बोन ग्राफिटींग ऑपरेशन करुनही तक्रारदारांच्‍या पायातील हाडे व सांधे जुळून आलेली नव्‍हती’’ या प्रश्‍नास ‘नाही’ असे उत्‍तर दिले आहे. तसेच, प्रश्‍न क्र.79 - ‘‘केसमधील कागदपत्रे, रिपोर्टस, एक्‍सरे प्‍लेटस् आणि सामनेवाला डॉ.दोशी यांचेकडील सर्व कागदपत्रे तुम्‍हास पहावयास मिळाली नाहीत’’ या प्रश्‍नावर साक्षीदार डॉ.राहुल बडे यांनी ‘होय’ असे उत्‍तर दिले आहे. उपरोक्‍त प्रश्‍नावली व त्‍यास तज्‍ज्ञ मताचा अहवाल देणारे डॉ.राहुल बडे यांनी दिलेली उत्‍तरे, तसेच सदरचा तज्‍ज्ञ मताचा अहवाल यामध्‍ये अत्‍यंत विसंगती दिसून येते. तज्‍ज्ञ मताचा अहवाल हा त्रोटक स्‍वरुपाचा दिलेला आहे. त्‍यामुळे सदरचा अहवाल हा पुराव्‍याच्‍या दृष्‍टीने निर्णायक पुरावा म्‍हणून वाचता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
           
           पंरतु, प्रस्‍तुत प्रकरणातील घटना विचारात घेतली असता सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी तक्रारदार रुग्‍णास प्रथम अ‍ॅडमिट केलेनंतर उपचार सुरु केले व त्‍यानंतर काही कालावधीने ऑपरेशन करुन रॉड बसविलेला आहे. दरम्‍यानच्‍या कालावधीमध्‍ये तक्रारदार रुग्‍णाच्‍या रक्‍तातील असलेली साखर नियंत्रित करुन ऑपरेशन्‍स केलेली आहेत याबाबत कोणताही सुसंगत पुरावा प्रस्‍तुत कामी दाखल नाही. तसेच, त्‍यानंतरही तक्रारदारांच्‍यावर केलेले दुसरे व तिसरे ऑपरेशन चे वेळेसही साखर नियंत्रित करुन उपचार केले आहेत असे दिसून येत नाही. तक्रारदारांना उच्‍च रक्‍तदाब तसेच मधुमेह होता. या दोन्‍ही बांबी नियंत्रित करुन शस्‍त्रकिया करता आली असती. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी समोर येत आहे.
 
           उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी तिन्‍हीवेळा शस्‍त्रक्रिया केल्‍यानंतर व त्‍यातूनही तक्रारदारांचा पाय बरा होवू शकला नसल्‍याने तक्रारदार हे डॉ.शिवप्रसाद डी. खोत, एम्.एस्.(आर्थो), डी.ऑर्थो.कन्‍स्‍लटिंग ऑर्थोपेडिक सर्जन यांचेकडे अ‍ॅडमिट झाले ही वस्‍तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिलेली आहे. त्‍या अनुषंगाने सदर डॉ.शिवप्रसाद दत्‍तात्रय खोत यांना साक्षी समन्‍स काढणेत आले होते. सदर साक्षीदार डॉ.खोत यांनी तक्रारदारांचेवर उपचार केलेबाबतचे केसपेपर्स दाखल केले आहेत व त्‍या अनुषंगाने शपथपत्र दाखल केले आहे. सदर शपथपत्र व केसपेपर्स यांचे अवलोकन या मंचाने केले आहे. सदर शपथपत्रामध्‍ये डॉ.खोत पुढीलप्रमाणे नमूद करतात :-
 
2. तारीख 06.01.2005 इ.रोजी माझेकडे महादेव शाहू करपे नांवाचा पेशंट ट्रिटमेंटसाठी आला होता. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार त्‍याला ता.02.02.2004 इ.रोजी अपघात झाला होता व त्‍याबाबत त्‍याने डॉ.दोशी यांचेकडे ट्रिटमेंट घेतली होती. ता.06.01.2005 इ.रोजी त्‍याची फिजीकल कंडीशन पुढीलप्रमाणे होती :-
 
a) Stiff Rt. lower limb (उजवा पाय खुब्‍याखाली सरळ व घट्ट झाला    होता)
 
b) Frank mobility supracondylar femur Rt. leg (गुडघ्‍याचेवर पाय लुळा पडला होता)
 
c) Infection and discharging sinuses anteriorly and supracondylar region Rt. femur (गुडघ्‍यावरील जखमांमधून पू येत होता)
 
d) Rt. lower limb 2-1/4 (उजवा पाय लांबीला 2-1/4लहान झाला होता)
 
e) Broken nail in shaft of right tibia (गुडघ्‍याखाली पायामध्‍ये मोडलेली सळी होती)
 
f) Non-union fracture tibia with sequestrum and  discharging sinuses (गुडघ्‍याखाली पायाचे फ्रॅक्‍चर जुळलेले नव्‍हते, हाड सडलेले होते, पू येत होता)
 
g) Non-union wupracondylar fracture Rt. femur with osteomyelitis (मांडीच्‍या हाडाचे फ्रॅक्‍चर जुळलेले नव्‍हते, सडलेले होते)
 
h) Septic arthritis knee (गुडघ्‍याच्‍या सांध्‍यात सेप्‍सीस व पस होता)
 
           सदर शपथपत्रातील परिच्‍छेद 2(इ) चे अवलोकन केले असता तक्रारदार हे दि.06.01.2005 रोजी डॉ.खोत यांचेकडे अ‍ॅडमिट झाले असता त्‍यावेळेस तक्रारदारांच्‍या गुडघ्‍याखालील पायामध्‍ये मोडलेली सळी होती असे सदर शपथपत्रात नमूद केले आहे. सदर वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांच्‍या मोडलेल्‍या हाडावर प्रथम ऑपरेशन करुन रॉड बसविलेला होता व सदरचा रॉड मोडल्‍यामुळे पुन्‍हा तक्रारदार सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांचेकडे अ‍ॅडमिट झाले आहे. त्‍यावेळेस सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी रिंग फिक्‍सेटर बसविलेला आहे. त्‍यानंतर तिसरे ऑपरेशन करुन बोन ग्राफटींग केले आहे. सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी पायामध्‍ये मोडलेली सळी तशीच ठेवून दुसरे व तिसरे ऑपरेशन केले आहे. त्‍यामुळे जंतुसंसर्ग झालेला आहे. पायाचे फ्रॅक्‍चर जुळलेले नाही. जखमामधून पू वहात होता. गुडघ्‍याच्‍या सांध्‍यात सेप्‍सीस व पस होता. त्‍यामुळे डॉ.खोत यांनी दोन टप्‍प्‍यात शस्‍त्रक्रिया करुन तक्रारदारांचा गुडघ्‍याच्‍यावर पाय कापावा लागला व मोडलेली सळी मांडीच्‍या हाडातून काढावी लागली. सदर वस्‍तुस्थितीचा विचार करता हे मंच (Res Ipsa Loquitur) वस्‍तुस्थिती स्‍वत:हून बोलकी असते या तत्‍त्‍वाचा हे मंच विचार करीत आहे. उपरोक्‍त नमूद केलेली वस्‍तुस्थिती विचारात घेता सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी प्रथम केलेल्‍या शस्‍त्रक्रियेतून रॉड बसविलेला आहे व सदर रॉड मोडल्‍यानंतर पुन्‍हा दुसरी शस्‍त्रक्रिया करुन रिंग फिक्‍सेटर बसविलेला आहे व त्‍यानंतर तिसरी शस्‍त्रक्रिया करुन बोन ग्राफटींग केले आहे. तरीही हाडामध्‍ये तशीच मोडलेली सळी न काढता ठेवली आहे व त्‍यामुळे जंतुसंसर्ग होवून तक्रारदारांचा पाय काढावा लागला आहे. सदरची वस्‍तुस्थिती विचार करता (Res Ipsa Loquitur) वस्‍तुस्थिती स्‍वत:हून बोलकी असते हे तत्‍त्‍व प्रस्‍तुत प्रकरणी लागू होत आहे व त्‍या अनुषंगाने साक्षीदार, डॉ.खोत यांनी तक्रारदारांच्‍यावर उपचार केलेबाबतचे केसपेपर्स व त्‍या अनुषंगाने दाखल केलेले शपथपत्र यांचे अवलोकन केले असता (Res Ipsa Loquitur) वस्‍तुस्थिती स्‍वत:हून बोलकी असते हे तत्‍त्‍व प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी सिध्‍द केले आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
           उपरोक्‍त विवेचन केलेप्रमाणे तज्‍ज्ञ मताचा अहवाल हा त्रोटक व विसंगत असून तो निर्णायक पुरावा म्‍हणून स्विकृत करता येणार नाही व (Res Ipsa Loquitur) वस्‍तुस्थिती स्‍वत:हून बोलकी असते हे तत्‍त्‍व प्रस्‍तुत प्रकरणी सिध्‍द झाले आहे. याचा विचार करता सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी वैद्यकिय निष्‍काळजीपणा केलेला आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास हे मंच खालील पूर्वाधाराचा आधार घेत आहे :-
 
2010 SAR (Civil) 550 - Supreme Court - V. Kishan Rao Vs. Nikhil Super Speciality Hospital & Anr.
 
(A) Consumer Protection Act, 1986 - Sec.2(1)(o) and 14 - Medical negligence - Requirement of expert evidence - Fora is not bound in every case to accept the opinion of the expert witness - In the complaint appellant alleged that his wife was not given proper treatment - District Forum relied on the evidence of doctor who was examined on behalf of the respondent doctor deposed “I have not treated the case for malarial fever” - But the death certificate disclosed that patient died due to malaria - In view of this finding Distt. Forum awarded compensation - State Commission has recorded a finding that no expert opinion was produced to prove that line of treatment adopted by respondent was wrong or was due to negligence of respondent doctor - National Commission upheld the finding - Hence this appeal - Held : in the facts and circumstances of the case expert evidence is not required - In most of the case, medical negligent is a mixed question of law and fact - The Fora is not bound in every case to accept the opinion of expert witness - The orders passed by National Commission and State Commission - Unsustainable, the respondent is directed to pay the appellant the amount granted by District Forum, appeal allowed.
 
           उपरोक्‍त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता मुद्दा क्र.2 हा होकारार्थी आहे. 
 
मुद्दा क्र.3 :-
           तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये एकूण नुकसान भरपाई रुपये 6,85,000/- ची मागणी केली आहे. उपरोक्‍त विवेचनाचा विचार करता सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी केलेल्‍या वैद्यकिय निष्‍काळजीपणामुळे तक्रारदारांना आर्थिक त्रास झालेला आहे व निष्‍काळजीपणामुळे शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. त्‍यामुळे सर्वकंष विचार करता सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी तक्रारदारांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 5,00,000/- द्यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
 
           उपरोक्‍त संपूर्ण विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रुपये 5,00,000/- (रुपये पाच लाख फक्‍त) द्यावेत.

3.    सामनेवाला वैद्यकिय व्‍यावसायिक यांनी तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) द्यावेत.


[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT