जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर दरखास्त क्र. 81/2010 (480/2007 तक्रार दाखल दिनांक – 28/04/2009 निकालपत्र दिनांक – 23/02/2011 श्री. योगेंद्र स्वरुप गुप्ता रा. प्लॉट नं. 404, विधी कॉम्प्लेक्स योगी धाम जवळ, मुरबाड रोड, कल्याण(प) जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द 1.मे. विधी बिल्डर्स तर्फे डॉ. कांती आर शहा, सी-3/311, नरमदा लोकग्राम, कल्याण(पु) जि. - ठाणे. 2.मे. आय.सी.आय.सी.आय होम फायनान्स कं. लि., 1E, रामकृष्ण नगर सो. मुरबाड रोड, हिरो होंडा शोरुम जवळ,
कल्याण(प), जिल्हा - ठाणे 421 304. .. विरुध्दपक्ष
समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्रीमती. ज्योती अय्यर - मा. सदस्या उपस्थिती - उभय पक्ष हजर आदेश (दिः 23/02/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रार क्र.480/2007 या प्रकरणी मंचाने दि.31/10/2009 रोजी पारित केलेल्या आदेशाच्या अमलबजावणी संदर्भात सदर दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले. 2. विरुध्द पक्षाने वादग्रस्त सदनिकेतील पाण्याच्या गळतीबाबत दुरूस्ती करुन द्यावी तसेच तक्रारकर्त्याला रु.10,000/- नुकसान भरपाई व रु.3,000/- न्यायिक खर्चाचे द्यावेत, त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाने बांधकाम पुर्णत्वाचा दाखला व वापर परवाना द्यावा असे या आदेशात नमुद करण्यात आहे. अर्जासोबत मंचाच्या आदेशाची प्रत अर्जदाराने दाखल केली. दि.15/02/2011 रोजी प्रकरण सुनावणीस आले असता विरुध्द पक्षानी प्रतीज्ञापत्र दाखल केले व नमुद केले की मंचाच्या आदेशानुसार वादग्रस्त सदनिकेतील पाण्याच्या गळती संदर्भात दुरूस्तीचे काम पुर्ण करण्यात आलेले आहे. प्रतिज्ञापत्रासोबत त्यांनी चार्टरड इंजिनिअर सी.एल.गुप्ता यांचे दुरूस्तीचे काम पुर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र दि.04/07/2011 ची प्रत दाखल केली. सुनावणीचे वेळेस हजर असलेल्या अर्जदाराने स्वतः ही बाब मान्य केली की दुरूस्तीचे काम पुर्ण झालेले आहे. गैरअर्जदार याआधीच दि.04/08/2010 रोजीच्या डि.डि.द्वारे रु.13,000/- ...2... (दरखास्त क्र.81/10(480/07) अर्जदाराला दिलेले आहे. इमारत बांधकाम पुर्णत्वाचा दाखला तसेच वापर परवाना याची प्रत अर्जदाराला देण्यात यईल असे गैरअर्जदारांनी कबुल केले. त्याप्रमाणे त्यांच्या प्रमाणित प्रती अर्जदाराला देण्यात आल्यात.. मंचाच्या आदेशाची पुर्तता झालेली असल्याने सदर दरखास्त निकाली काढण्यात येते. दिनांक – 23/02/2011 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|