जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/59 प्रकरण दाखल तारीख - 18/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 29/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या शंकर मारोती इंगळे, वय 68 वर्षे , धंदा शेती, अर्जदार. रा. आनंदनगर चौक, नांदेड. विरुध्द. डॉ.के.जी.तेहरा, गैरअर्जदार. आसरा नेत्रालय, आस्था हॉस्पीटल जवळ, डॉक्टर गल्ली, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.आर.व्ही.पाटील. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) गैरअर्जदार डॉ.के.जी.तेहरा यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात, अर्जदारहे दि.13/12/2009 रोजी गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात गेले, दवाखान्याच्या साईन बोर्डवर कॉप्युटराइझड मशिनद्वारे तपासणी केली जाते असे लिहीले होते. गैरअर्जदाराने कॉप्युटर मशीनने डोळयाची तपासणी केली नाही. यात चष्म्याचा दुरचा नंबर 0.75,0.75 राईट लेफट जवळचा 2.5 व 3.25 असा नंबर काढुन कार्डवर लेखी दिला. याबाबत अर्जदाराने स्वस्तिक ऑप्टीकल येथुन चष्मा तयार करुन घेतला व चष्मा घेतल्यावर रस्त्यावरील काही भाग उजवीकडील बाजु उंच व डावीकडील बाजु खोल दिसत होती. 2-3 दिवस वापरुनही फरक पडला नाही. अर्जदारास नंबर चुक असल्याची शंका आल्याने डॉ.कंधारे नेत्र तज्ञ यांना दि.16/12/2009 रोजी डोळयाची तपासणी करुन दुरचा नंबर 0.50,0.50 व जवळचा नंबर 3.5,3.5 असा दिला. दुस-या तपासणीनंतर दोन्ही तपासणीतील फरक दिसला. यानंतर बनविलेला चष्मा हा नंबर प्रमाणे होता. अर्जदारास नाहक भिंग बदलावे लागले. म्हणुन गैरअर्जदाराच्या सेवेच्या त्रुटीबद्यल त्यांनी अर्जात म्हटल्याप्रमाणे रु.7,180/- नुकसान भरपाई म्हणुन मागीतले आहे. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणे की, अर्जदाराची तक्रार ही खोटी व बनावट आहे. गैरअर्जदार हे शहरातील सिनीयर मोस्ट नेत्र विषेज्ञ असुन त्यांनी शासनाच्या सेवेत नौकरीही केलेली आहे. आजपर्यंत त्यांच्यावर ठपका नाही. गैरअर्जदाराने आसरा नेत्रालय येथे कॉम्प्युटरने डोळे तपासले जातात असे कुठेही लिहीलेले नाही व पावतीवरही लिहीलेले नाही. म्हणजे संबंधीत व्यक्तिला भिंगाद्वारेच डोळे तपासुन दिले जाते त्या व्यक्तिला समारे बसवून व डोळयास वेगवेगळया भिंगाद्वारे समोर असलेले अंक, अक्षर विचारुन तपासले जातात. पेशंट हा किती अचुक सांगतो यावरुन पेशंटच्या समाधानाप्रमाणे दिसते, कमी दिसते असे सांगितले तर नंबर चुकू शकतो, बरोबर दिसत असतांना अधिकचा नंबर म्हणुन डॉक्टर फसु शकतो. ब-याच लोकांनी या प्रकारचा अनुचित प्रकार करुन डॉक्टराकडुन खंडणी मागण्याचा प्रकार केला आहे व चुक कबुल करा व लेखी लिहून द्या व धमाकावुन रक्कम गोळा करतात. संबंधीत नेत्रालयाकडे कॉम्प्युटर मशीन नाही हे सुध्दा अर्जदाराने कबुल केलेले आहे. अर्जदारास पावतीवर कॉम्प्युटर मशीन आहे असे कुठेही उल्लेख नाही किंवा नंबर नाही. तक्रार काळजीपुर्वक पाहील्यास अर्जदारास कॉम्प्युटरने डोळे तपासावयाचे होते असे दिसते व असे असेल तर त्यांनी त्याच वेळेस तुमच्याकडे कॉम्प्युटर मशीन नाही असे म्हणुन नीघुन जायचे होते. गैरअर्जदाराने अर्जदाराचे डोळे त्यांच्या सांगण्यावरुन तपासले त्यामुळे नंबर हे त्यांच्या सांगण्यावरुन नीघतो. 2-3 डॉक्टराकडे डोळे तपासले असता, त्यात फरक पडतो. यात गैरअर्जदारांची कुठलीही चुक नाही. फिर्यादीला जर वेगळे दिसत होते तर त्यांनी सरळ गैरअर्जदाराकडे येऊन विचारणे आवश्यक होते असे न करता ते दुस-या डॉक्टराकडे गेले. गैरअर्जदाराने डोळे बरोबर तपासले आहे यात कुठेही हलगर्जीपणा केलेला नाही त्यामुळे नुकसान भरपाई मागण्याचा अर्जदारांना अधिकार नाही. म्हणुन त्यांची तक्रार खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईन तपासून व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी सिध्द करतात काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी आसरा नेत्रालय येथे242 चे कार्ड दाखल केलेले आहे. त्यात दोन्ही डोळयासाठी दुरचा नंबर + 0.75 , असे असुन उजवीकडे जवळचा नंबर + 2.5 व डावीकडे + 3.25 असा आहे त्या कार्डवर कुठेही कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासले जाते असे लिहीलेले नाही. त्यांनी चष्मा स्वस्तीक ऑप्टीकल मध्ये बनवला याबद्यल पावती क्र.1235 दाखल आहे. चष्मा हा नंबरप्रमाणे करुन देण्यात आला परंतु त्यामुळे अर्जदाराच्या डोळयास बरोबर दिसेनासे झाले त्यामुळे त्यांनी सुश्रूती आय हॉस्पीटल डॉ.कंधारे यांचेकडे डोळे तपासले त्यात दुरचा नंबर + 0.50 दोन्ही डोळयासाठी व जवळचा नंबर +3.50 दोन्ही डोळयासाठी यात बारकाईने पाहीले असता, दुरचा नंबरमध्ये + 0.2 चा फरक आहे. उजवा डोळयात जवळचा नंबर मध्ये +1.0 नंबरचा फरक दिसतो तर डाव्या डोळयास दुरचा नंबरमध्ये 0.25 चा फरक आहे. दुरचा नंबरमध्ये +.25 चा फरक दिसून येतो डोळा रिफ्रॅशन पध्दतीने तपासतांना स्टीलचा चष्मा लावून त्यावर भिंग टाकले जाते व ते पेशंटला समोरचे बोर्डावरील अक्षर वाचण्यास सांगितले जाते हे वाचताना पेशंट कमी अधिक दिसते त्याप्रमाणे डॉक्टर भिंग बदलत राहतो व जेंव्हा पेशंट हा या नंबरने बरोबर दिसते असे सांगीतल्यावर तो नंबर लावून दिला जातो. हे जितके अचूक अक्षर वाचून सांगितले त्यावरच हे नंबर अचूक नंबर अवलंबून असते. पेशंटने सांगण्यास थोडाबहुत जरी फरक केला तर नंबर चुकू शकतो. फक्त उजवा डोळयामध्ये + 1.00 चा फरक पडला असता चष्मा घातल्यावर तो बनविल्यावर डॉक्टराकडे आणुन दाखवणे हे पेशंटचे काम असते. अर्जदार यांना चष्म्या पासुन जर त्रास होत हाता तर त्यांनी डॉक्टरांना विचारणे आवश्यक होते असे असतांना त्यांनी तसे न करता दुस-या डॉक्टराकडे डोळे तपासले यात डोळे तपासण्यात गैरअर्जदारांनी कुठेही निष्काळजीपणा केला असे वाटत नाही. आम्ही शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय यांचेकडे तज्ञाचा अभिप्राय देण्यासाठी पाठविले असता त्यांनी आपला अहवाल देतांना अर्जदारास वेडेवाकडे दिसू शकते तर तशी पुर्व कल्पना पेशंटला डॉक्टरने देणे गरजेचे आहे. व दोन नेत्र तज्ञाकडे चष्म्याचा वेगवेगळा नंबर नीघू शकतो. डॉक्टरने वेगवेगळे भिंग टाकून नजर पाहत असतांना पेशंट गोधळून जाणे व अयोग्य किंवा चूक उत्तरे देणे घडु शकते. तसेच चार्ट व पेशंटचे अंतर कमी जास्त असणे इ.कारणे असू शकतात. कॉम्प्युटर मशीन सुध्दा वेगळा रिपोर्ट देते त्यामुळे वेगळा चष्मा नंबर दिला जाणे निष्काळजीपणा आहे असे वाटत नाही म्हणुन अर्जदारास नवीन चष्म्याने त्रास होत असल्यास त्यांनी तपसाण्यासाठी डॉक्टराकडे जाणे, तपासणी करुन घेणे आवश्यक असते असे आपले मत दिलेले आहे. अर्जदाराचे अजून एक आक्षेप की, डॉक्टराचे समोरासमोर दोन नेत्रालय क्लिनीक आहेत त्यात अपोलो नेत्रालय यांच्या बोर्डावर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासले जातात असे लिहीलेले आहे व समोर आसरा नेत्रालयचा बोर्ड आहे त्यात कॉम्प्युटरचा उल्लेख नाही व अर्जदाराचे डोळे हे आसरा नेत्रालय येथे तपासण्यात आले आहे. त्यामुळे येथे कॉम्प्युअर नसतांना किंवा अर्जदाराने अशा प्रकारची चौकशी केली असे अर्जदार म्हणत नाही. डॉक्टर आपल्या हॉस्पीटलचे ब्रँच कुठेही टाकू शकतो यात सेवेतील त्रुटी असे म्हणता येणार नाही. एकंदरीत सर्व बाबींवरुन आम्ही या मतास आलो आहोत की, गैरअर्जदार डोळे तपासण्यामध्ये निष्काळजीपणा झालेली आहे असे वाटत नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार,लघुलेखक. |