Maharashtra

Aurangabad

cc/07/29

Suresh Narayan Chavan - Complainant(s)

Versus

Dr. Deelip G. O. Patwardhan - Opp.Party(s)

Adv.Rahul Joshi

19 Nov 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
Complaint Case No. cc/07/29
1. Suresh Narayan Chavan R/o Labour colony. Aurangabad ...........Appellant(s)

Versus.
1. Dr. Deelip G. O. PatwardhanPatwardhan Hospital, Bansilal Nagar, Station road Aurangabad 2. United India Insurance Company Ltd.,Osmanapura, Aurangabad ...........Respondent(s)



BEFORE:
Smt. Anjali L. Deshmukh ,PRESIDENT Smt.Rekha Kapadiya ,MEMBER Smt.Jyoti H.Patki ,MEMBER
PRESENT :Adv.Rahul Joshi , Advocate for Complainant
Adv.Jayant Chitnis, Advocate for Opp.Party Adv.S.S.Rathi, Advocate for Opp.Party

Dated : 19 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्‍यक्ष)

      तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार खालीलप्रमाणे आहे.
      दिनांक 8/8/2004 रोजी अपघातामुळे तक्रारदाराच्‍या उजव्‍या पायाला फ्रॅक्‍चर झाले त्‍यामुळे त्‍यांना गैरअर्जदार क्र 1 यांच्‍या  दवाखान्‍यात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले. दिनांक 16/8/2004 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 डॉक्‍टरानी तक्रारदाराच्‍या उजव्‍या पायामध्‍ये आयर्न रॉड बसवून ऑपरेशन केले. दिनांक 24/8/2004 रोजी त्‍यांना डिस्‍चार्ज दिला. तक्रारदाराचे असे म्‍हणणे आहे की, डॉक्‍टरांनी केलेले हे ऑपरेशन त्‍यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे यशस्‍वी झाले नाही. ऑपरेशनच्‍या वेळेस डॉक्‍टरानी निकृष्‍ट दर्जचा रॉड बसविल्‍यामुळे तक्रारदारास डिसेंबर 2004 पासून त्रास सुरु झाला. त्‍यासाठी दिनांक 10/1/2005 रोजी तक्रारदार, गैरअर्जदार क्र 1 डॉक्‍टराकडे दाखविण्‍यासाठी गेले.  डॉक्‍टरानी तक्रारदाराच्‍या पायाचा एक्‍स रे काढला असता तक्रारदाराच्‍या पायात बसविलेला रॉड तुटलेला दिसून आला.त्‍यामुळेच तक्रारदारास अजुनही कोणाच्‍या तरी आधाराशिवाय चालता येत नाही. अपघातापासून तक्रारदार बेडरिडन आहेत. तक्रारदारानी गैरअर्जदार डॉक्‍टराची सर्व 1 लाखाची बिले भरली तरीही गैरअर्जदार डॉक्‍टरानी त्‍या बिलाच्‍या पावत्‍या दिल्‍या नाहीत असे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. गैरअर्जदार डॉक्‍टराचे रु 1 लाखाचे बिल भरल्‍यानंतरही तक्रारदारास औषधासाठी पुन्‍हा रु 1 लाख खर्च करावा लागला. दिनांक 10/1/2005 पासून गैरअर्जदाराकडे तपासणी केली असताना त्‍यांना तुटलेला रॉड काढता आला नाही व नविन बसविता आला नाही त्‍यामुळे तक्रारदारास कायमचे अपंगत्‍व आले व बेडरिडन रहावे लागले. तक्रारदार हे घरातील कर्ता आहेत. गैरअर्जदार डॉक्‍टरानी निष्‍काळजीपणाने ऑपरेशन केल्‍यामुळे तक्रारदार काम करु शकत नाहीत म्‍हणून तक्रारदारानी नुकसान भरपाईच्‍या मागणीसाठी दिनांक 15/11/2006 रोजी रु 20 लाखाची गैरअर्जदार डॉक्‍टरास कायदेशिर नोटीस पाठविली. त्‍याची दखलही गैरअर्जदार डॉक्‍टरानी घेतली नाही म्‍हणून सदरील तक्रार. गैरअर्जदार डॉक्‍टरानी तक्रारदारास वैद्यकीय सेवा देण्‍यामध्‍ये निष्‍काळजीपणा केला त्‍यामुळे रु 20 लाख 15 टक्‍के व्‍याजासह व मुळ कागदपत्राची मागणी करतात. 
 
      तक्रारदारानी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
      गैरअर्जदार क्रमांक 1 डॉक्‍टरानी त्‍यांच्‍या लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्‍या मागणीस विरोध दर्शविला आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 8/8/2004 रोजी तक्रारदार अपघातामध्‍ये जखमी झाल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे आले होते, त्‍यांच्‍या उजव्‍या पायास फ्रॅक्‍चर झाले. तक्रारदारावर इनडोअर पेशंट म्‍हणून उपचार केले. एक्‍स रे काढले. तक्रारदाराच्‍या उजव्‍या पायावर metal implant करण्‍यात आले.
 
 तक्रारदारानी त्‍यांच्‍या तक्रारीत दिनांक 24/8/2004 रोजी गैरअर्जदाराच्‍या दवाखान्‍यातून त्‍यांना डिसचार्ज देण्‍यात आला असे नमूद केले आहे परंतु ही बाब सत्‍य नाही. वस्‍तुस्थिती अशी आहे की, तक्रारदार हे हॉस्पिटलची बिले न भरता हॉस्पिटलमधून निघून गेले. त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदयानुसार तक्रारदार गैरअर्जदाराचे ग्राहक होऊ शकत नाहीत.
 
गैरअर्जदाराने तक्रारदाराच्‍या पायाचे ऑपरेशन केले ते अयशस्‍वी झाले हे तक्रारदाराचे म्‍हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदारानी चुकीचे ऑपरेशन केले हे सिध्‍द करण्‍यासाठी कुठलाही एक्‍स रे दाखल केला नाही.
 
तक्रारदाराच्‍या पायात metal implant बसविले होते ते तुटले असेल, नादुरुस्‍त झाले असेल, हे कदाचित गुंतागुतीमुळे सुध्‍दा होऊ शकते. यावरुन ऑपरेशन अयशस्‍वी झाले असे म्‍हणता येत नाही. ऑपरेशन जर अयशस्‍वी झाले असते तर लगेचच दिनांक 24/8/2004 नंतर लक्षात आले असते. तक्रारदार हे दुचाकीवर फिरतात. यावरुन तक्रारदाराचा पाय 100 टक्‍के व्‍यवस्थित आहे हे स्‍पष्‍ट होते.
 
तक्रारदारानी गैरअर्जदार डॉक्‍टराचे रु 1लाखाचे बिल भरले नाही तशा प्रकारच्‍या पावत्‍याही त्‍यांनी मंचात दाखल केल्‍या नाहीत. तसेच तक्रारदाराने गैरअर्जदार डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्‍शन्‍स दाखल केले नाहीत. गैरअर्जदार डॉक्‍टरांची अशी मागणी आहे की, डिसचार्ज कार्ड, एक्‍स रे,मेडिकल प्रिस्‍क्रीप्‍शन, metal implant, बिले, फालोअप, पॅथॉलॉजी अहवाल, गैरअर्जदाराने तक्रारदारास दिलेले डिसचार्ज कार्ड, इतर डॉक्‍टरांना दाखवलेले उपचाराची कागदपत्रे, तज्ञाचा अहवाल, क्‍लेम केलेला फॉर्म, हे सर्व मंचात दाखल करावे. 
 
गैरअर्जदार डॉक्‍टराकडून उपचार घेतल्‍यानंतर तक्रारदारानी इतर डॉक्‍टराकडून उपचार घेतला नव्‍हता किंवा त्‍यांच्‍याकडे येऊन चेकअप केले नव्‍हते. तसेच तक्रारदाराने इतर कुठल्‍याच डॉक्‍टरांची औषधे घेतली नाहीत त्‍यामुळे गैरअर्जदार डॉक्‍टरानी केलेले ऑपरेशन यशस्‍वी झाले होते हे स्‍पष्‍ट आहे.
तक्रारदार त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये ते बेडरिडन आहेत असे म्‍हणतात परंतु मंचामध्‍ये ते प्रत्‍येक तारखेस हजर राहतात तसेच ते दुचाकीवर फिरतात त्‍यामुळे तक्रारदाराचे हे म्‍हणणे योग्‍य नाही.
      गैरअर्जदार डॉक्‍टरांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदाराचे ऑपरेशन सन 2004 मध्‍ये झाले आणि तक्रारदारानी प्रस्‍तुतची तक्रार सन 2007 मध्‍ये केलेली आहे.
 
      तक्रारदाराने एकूण रु 21 लाख 15 टक्‍के व्‍याजदराने मागतात. यावरुन ही तक्रार जिल्‍हा मंचात चालू शकत नाही. कारण मंचाचे Pecuniary  Jurisdiction रु 20 लाखापर्यंतच आहे.
 
तक्रारदारास कायमचे अपंगत्‍व आले असे ते म्‍हणतात त्‍यासाठी त्‍यांनी कुठल्‍याही सर्जनचे प्रमाणपत्र दाखल केले नाही.
 
तक्रारदार हे अनकंट्रोल्‍ड डायबेटीक पेशंट होते तरीसुध्‍दा त्‍यांचे ऑपरेशन यशस्‍वीरित्‍या केलेले आहे. म्‍हणूनच तक्रारदार आज कुठल्‍याही आधाराशिवाय चालू फिरु शकतात. वरील कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदार डॉक्‍टरानी आपल्‍या लेखी जवाबासोबत शपथपत्र आणि मोठया संख्‍येने कागदपत्रे, मेडिकल लिटरेचर,निवाडा दाखल केले आहे.
 
      गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, संपूर्ण तक्रार अर्जात  त्‍यांच्‍या विरुध्‍द कुठलीही तक्रार नाही. म्‍हणून तक्रारीतून त्‍यांना वगळण्‍यात यावे अशी विनंती करतात.
 
दोन्‍हीही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराची तक्रार ही खालील चार मुद्दांवर आधारीत आहे.
1.       गैरअर्जदार डॉक्‍टरांनी तक्रारदाराच्‍या उजव्‍या पायाच्‍या ऑपरेशनच्‍या वेळेस निकृष्‍ट दर्जाचा रॉड बसविला.
 
2.       तक्रारदारानी गैरअर्जदार डॉक्‍टरांना ऑपरेशनची फिस आणि रक्‍कम दिली तरी सुध्‍दा त्‍यांनी पावत्‍या दिल्‍या नाहीत.
 
3.       गैरअर्जदार डॉक्‍टरानी तक्रारदाराच्‍या पायात निकृष्‍ट दर्जाचा रॉड बसविल्‍यामुळे त्‍यांना कायमचे अपंगत्‍व आले व ते बेडरिडन आहेत.
4.       वैद्यकिय निष्‍काळजीपणा.
 
1.        निकृष्‍ट दर्जाचा रॉड बसविला--- तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार गैरअर्जदार डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या पायात निकृष्‍ट दर्जाचा रॉड बसविला.याकरीता त्‍यांनी बी.ई. (मेकॅनिकल) श्री दिघे यांचे शपथपत्र /अहवाल दाखल केले आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍या रॉडवर जोरदार स्‍ट्रेस, दाब पडला तर लॉ ऑफ मेकॅनिक्‍स नुसार रॉड तुटू शकतो.प्रस्‍तूतच्‍या प्रकरणात सुध्‍दा गैरअर्जदार डॉक्‍टरांनी तक्रारदाराच्‍या पायात जो रॉड बसविला होता त्‍याच्‍या होलमध्‍ये स्‍क्रू बसविलाच नाही त्‍यामुळे त्‍याला ते वजन पेलवले नाही व त्‍याचे दोन तुकडे झाले. त्‍या अहवालाची पाहणी केली असता असे दिसून येते की, श्री दिघे हे बी.ई(‍मेकॅि‍नकल) आहेत ,metal implant तयार करणा-या कंपनीत ते तज्ञ म्‍हणून काम करीत नाहीत, त्‍यांना या metal implant ची माहिती नाही. केवळ एक्‍स रे फिल्‍म पाहून आणि तक्रारदाराच्‍या माहितीवरच तक्रारदाराच्‍या पायातील रॉड हा सदोष आहे असा अहवाल दिला. एकीकडे होलमध्‍ये स्‍क्रू बसविला नाही म्‍हणून वजनामुळे रॉडचे तुकडे पडले म्‍हणतात तर दुसरीकडे रॉड सदोष आहे म्‍हणतात. मंचाच्‍या मते श्री दिघे हे या विषयातील तज्ञ नाहीत, व त्‍यांनी दिलेल्‍या निष्‍कर्षास कुठलाही आधार नाही म्‍हणून मंच त्‍यांचा अहवाल मान्‍य करीत नाही. तक्रारदारानी डॉ पी.एस.जैस्‍वाल यांचेही शपथपत्र आणि प्रमाणपत्र दाखल केले आहे.त्‍यांनी त्‍यांच्‍या प्रमाणपत्रात असे म्‍हटले आहे की, Intra Medullary nail याचे दोन तुकडे झाले. याचे कारण होल पॉईंट ला स्‍ट्रेस आल्‍यामुळे या रॉडचे दोन तुकडे झाले (The intra medullary nail broken into two pieces from lower end due to metal fatique) . त्‍याच प्रमाणपत्रात त्‍यांनी असेही नमूद केले आहे की, Now latest x ray shows fractor is almost united. या प्रमाणपत्रावरुन असे स्‍पष्‍ट होते की, होल पॉईंटवर स्‍ट्रेस पडल्‍यामुळे त्‍या रॉडचे दोन तुकडे झाले. तक्रारदार हे डॉ जैस्‍वाल यांच्‍याकडे दिनांक 26/9/2007 रोजी गेलेले दिसून येते व त्‍या दिवशीच म्‍हणजे ऑपरेशन झाल्‍यानंतर तीन वर्षानी त्‍यांनी हे सर्टिफिकेट दिलेले आहे त्‍याच्‍यामध्‍ये फ्रॅक्‍चर जूळून आहे असे म्‍हणतात. यावरुन असे दिसून येते की, दिनांक 26/9/2007 पर्यंत त्‍यांचे फ्रॅक्‍चर जुळून आले होते. तक्रारदाराचे असे म्‍हणणे आहे की, डॉक्‍टरांनी निकृष्‍ट दर्जाचा रॉड वापरल्‍यामुळे त्‍याचे दोन तुकडे झाले . तक्रारदारानी त्‍यांच्‍या मूळ तक्रारीमध्‍ये असे कुठेही म्‍हटले नाही की, गैरअर्जदार डॉक्‍टरानी नको तिथे होल पाडून त्‍यास स्‍क्रू बसविला नाही व त्‍यामुळे त्‍यावर स्‍ट्रेस पडून तो तुटला. हे त्‍यांनी त्‍यांच्‍या शपथपत्रात म्‍हटले आहे. त्‍यानंतरच या डॉक्‍टरानी प्रमाणपत्र दिल्‍याचे दिसून येते. यावर गैरअर्जदार डॉक्‍टरांचे असे म्‍हणणे आहे की, असा रॉड हाडामध्‍ये बसविल्‍यानंतर वरुन त्‍यांना अनावश्‍यक होल / जास्‍तीचे होल पाडता येत नाही. तक्रारदारानी अशा प्रकारचे कुठलेही मेडिकल लिटरेचर दाखल केले नाही. उलट याबाबत गैरअर्जदार डॉक्‍टरानी मंचासमोर, हाडामध्‍ये फ्रॅक्‍चर झाले असल्‍यास metal implant कशा प्रकारे केले जाते, कशा प्रकारे स्टिल रॉड असतो हे सर्व दाखवून दिलेले आहे. मूळत: तक्रारदारानी हे सर्व तक्रारीमध्‍ये नमूद केलेले नाही व तक्रारीमध्‍ये बदल सुध्‍दा केलेला नाही. केवळ नंतर दिलेल्‍या शपथपत्रात असे आरोप केलेले आहेत. नंतर दिलेले शपथपत्र हे तक्रारीचा भाग होऊ शकत नाही असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारदाराची जी पहिली मागणी आहे रॉड निकृष्‍ट दर्जाचा बसविला हे तक्रारदारानी मेडिकल लिटरेचर द्वारे किंवा तज्ञाच्‍या अहवालाने सिध्‍द केलेले नाही. म्‍हणून तक्रारदाराचा हा आरोप मंच मान्‍य करीत नाही.
2.       पावत्‍या दिल्‍या नाहीत ----- तक्रारदाराची दुसरी मागणी किंवा आरोप असा आहे की, तक्रारदारानी हॉस्पिटलच्‍या बिलांची रक्‍कम दिली तरीही गैरअर्जदार डॉक्‍टरांनी त्‍यांना पावत्‍या दिल्‍या नाहीत. यावर गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदारानी बिलाची रक्‍कम न भरता , डिसचार्ज कार्ड न घेता, एक्‍स रे‍ रिपोर्ट न घेता, दवाखान्‍यातून निघून गेले. याच कागदपत्रांची मागणी गैरअर्जदारानी केली होती ती कागदपत्रे शेवटपर्यंत तक्रारदारानी मंचात जमा केली नाहीत. यावरुन तक्रारदार हे डिसचार्ज कार्ड न घेताच निघून गेले होते हे स्‍पष्‍ट होते. तक्रारदारानी हे मुद्दे पुराव्‍यासहीत सिध्‍द केले नाहीत म्‍हणून हे आरोप देखील मंच मान्‍य करीत नाही.
3.      कायमचे अपंगत्‍व आणि बेडरिडन ----   तक्रार दाखल केल्‍यापासून  तक्रारदारास मंचात प्रत्‍येक तारखेस व्‍यवस्थित त्‍यांच्‍या पायाने चालत आल्‍याचे, तसेच कुठल्‍याही आधाराशिवाय आल्‍याचे मंचानी पाहिलेले आहे. दिनांक 4/10/2010 रोजी मंचाने तक्रारदारास त्‍यांना कुठल्‍याही आधा‍राशिवाय चालता येते का ?  हा प्रश्‍न विचारला असता त्‍यांनी सन 2007 पर्यंत आधार घ्‍यावा लागत होता आता नाही असे सांगितले. याचाच अर्थ तक्रारदार यांना कुठल्‍याही आधाराशिवाय चालता येते ते बेडरिडन नाहीत हे सिध्‍द होते. तक्रारदारानी कायमचे अपंगत्‍व आल्‍याचे प्रमाणपत्र दाखल केले नाही. यावरुन तक्रारदारास कायमचे अपंगत्‍व आलेले नाही व ते बेडरिडन नाहीत हे सिध्‍द होते. 
 
4.        वैद्यकिय निष्‍काळजीपणा - तक्रारदारानी दिनांक 23/6/2010   रोजी शपथपत्र दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी गैरअर्जदार डॉक्‍टरावर तीन आरोप केलेले आहेत. उदा. योग्‍य रितीने metal implant केले नाही, होल पाडल्‍यामुळे रॉड तुटला व हाडही तुटले याला तक्रारदारानी कांहीही पुरावा दिला नाही. तज्ञाचे प्रमाणपत्र, शपथपत्र नाही. डॉ जैस्‍वाल यांचे प्रमाणपत्र व शपथपत्र आहे त्‍यामध्‍ये ते गैरअर्जदार डॉक्‍टरानी चुकीचे ऑपरेशन केले,त्‍यात त्‍यांचा निष्‍काळजीपणा आहे असे नमूद केले नाही. गैरअर्जदार डॉक्‍टरानी कशा प्रकारे ऑपरेशन केले होते हे त्‍यांनी लिटरेचर दाखल करुन व नेलींग कशा प्रकारे केली जाते याची माहिती मंचासमोर प्रात्‍यक्षिक करुन दिली. यावरुन तक्रारदाराने म्‍हटल्‍याप्रमाणे implant nailing केल्‍यानंतर चुकीच्‍या‍ ठिकाणी रॉड व नेल्‍स बसविल्‍यामुळे, हाडावरुनच नविन ठिकाणी नेलींग केली हे सिध्‍द झाले नाही. तक्रारदाराने त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये ऑपरेशन हाडावरुन नेलींग केले जाते हे लिटरेचरद्वारे किंवा तज्ञाच्‍या अहवालाद्वारे दाखवून दिले नाही किंवा ऑपरेशन कशा प्रकारे करावयास पाहिजे होते व गैरअर्जदार डॉक्‍टरानी कशा प्रकारे केले हे लिटरेचरवरुन दाखवून दिले नाही. तक्रारदारानी गैरअर्जदार डॉक्‍टराविरुध्‍द बिनबुडाचे आरोप केले आहेत जे मूळ तक्रारीत नाहीत. किंबहूना तक्रारीमध्‍ये तसा बदलही केलेला नाही. गैरअर्जदारानी तक्रारदाराचे ऑपरेशन कसे केले हे लिटरेचरद्वारे दाखवून दिले आहे. ऑपरेशन केल्‍यानंतर पाच महिन्‍यानी तक्रारदार डॉक्‍टराकडे गेल्‍यानंतर एक्‍स रे मध्‍ये रॉड तुटल्‍याचे दिसून आले हे कदाचित इतरही कारणामुळे तुटले असावेत. परंतू ऑपरेशन झाल्‍यानंतर पाच महिने तक्रारदार व्‍यवस्थित होते. ऑपरेशन केल्‍यानंतर त्‍यांना लगेचच त्रास झाला असल्‍याबाबतचे इतर दवाखान्‍यातील कागदपत्रे, उपचार घेतल्‍याबद्दलचे प्रिस्क्रिप्‍शन्‍स तक्रारदाराने दाखल केले नाही. ऑपरेशन झाल्‍यानंतर जवळजवळ 5 महिन्‍यानी तक्रारदार पुन्‍हा गैरअर्जदार डॉक्‍टराकडेच दाखविण्‍यासाठी / उपचारासाठी आले. जर डॉक्‍टरानी केलेले ऑपरेशन अयशस्‍वी झाले असते तर तक्रारदार पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍याचकडे गेले नसते. यावरुन गैरअर्जदार डॉक्‍टरानी केलेले ऑपरेशन यशस्‍वी झाले हे स्‍पष्‍ट होते.
 
गैरअर्जदार डॉक्‍टरांचे हे म्‍हणणे आहे की, तक्रारदारानी विलंब माफीचा अर्ज मंचात दाखल केला नाही. तक्रारदाराचे ऑपरेशन दिनांक 16/08/2004    रोजी झाले त्‍यानंतर पुन्‍हा एकदा ते त्‍यांच्‍याकडे दिनांक 10/12/2005 रोजी गेले असता त्‍यावेळेस त्‍यांना रॉड तुटल्‍याचे दिसून आले. त्‍या दिवसापासून घटनेचे कारण (कॉज ऑफ अक्‍शन) धरले तरी तक्रारदाराने मंचात दिनांक 24/1/2007 रोजी दाखल केली म्‍हणजेच 14 दिवसाचा विलंब झालेला आहे . म्‍हणून तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे. तसेच pecunary jurisdiction या मुद्दावरुन सुध्‍दा तक्रारदाराची तक्रार निकाली काढावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. तक्रारदाराने रु 20 लाख मागितले आहेत. व्‍याज आणि नुकसान भरपाई हे pecunary Jurisdiction  पाहताना लक्षात घेतले जात नाही. म्‍हणूनच या मंचास pecunary Jurisdiction आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारानी तक्रारीमध्‍ये दिलेले चार मुद्दे पुराव्‍यासहीत सिध्‍द केले नाहीत. गैरअर्जदार डॉक्‍टरानी प्रस्‍तूतच्‍या प्रकरणामध्‍ये, मेडिकल प्रोसिजरनुसार ऑपरेशन केले आहे, उपचार दिलेले आहेत. तक्रारदार ऑपरेशन केल्‍यानंतर कुठल्‍याही तक्रारी शिवाय(complaints and complications)हॉस्पिटलमधून घरी गेले. म्‍हणजेच ऑपरेशन यशस्‍वी झाले यात गैरअर्जदार डॉक्‍टराचा कुठलाच वैद्यकिय निष्‍काळजीपणा नाही. तक्रारदारानी वरिष्‍ठ न्‍यायालयाचे अनेक निवाडे दाखल केले आहेत. ते हया तक्रारीस लागू होत नाहीत असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदारानी सुध्‍दा निवाडे दाखल केले, ते या प्रकरणात लागू होतात असे मंचाचे मत आहे.गैरअर्जदार डॉक्‍टरानी त्‍यांच्‍या वैद्यकिय क्षेत्रातील आजपर्यतचा अनुभव व कौशल्‍य वापरुन तक्रारदाराच्‍या पायाचे ऑपरेशन केल्‍याचे दिसून येते. असे असतानाही तक्रारदारानी कुठल्‍याही पुरावाशिवाय गैरअर्जदार डॉक्‍टरावर आरोप केल्‍याचेही स्‍पष्‍ट होते व ते आरोप तक्रारदार सिध्‍द करु शकले नाहीत, म्‍हणूनच मंच तक्रारदाराची तक्रार नामंजुर करीत आहे.
      वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
                  
                                   आदेश
 
 तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.
 
 
 
(श्रीमती ज्‍योती पत्‍की)      (श्रीमती रेखा कापडिया)          (श्रीमती अंजली देशमुख)
       सदस्‍य                                    सदस्‍य                                    अध्‍यक्ष

[ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER