निकालपत्र
(पारीत दिनांक 04 आक्टोंबर, 2010)
व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडकयात आशय असा की, 1. तक्रारकर्ता यांच्या डाव्या मांडीजवळ टयुमर झाल्यामुळे ते वैद्यकिय उपचाराकरीता विरुध्दपक्ष यांच्या हॉस्पिटलमध्ये जुन-2009 मध्ये भरती झाले. विरुध्दपक्ष यांनी निष्काळजीपणे टयुमरवर शस्त्रक्रिया केल्यामुळे मांडीजवळील नसला गंभीर इजा पोहचली व त्यातुन अविरत रक्त व पू वाहू लागले व त्याठिकाणी गंभीर नासुर झाल्यामुळे दिनांक 14/06/2009 रोजी तक्रारकर्ता यांना मेडीकल कॉलेज, नागपूर येथे उपचाराकरीता पाठविण्याची शिफारस करण्यात आली.
2. तक्रारकर्ता यांचेवर मेडीकल कॉलेज, नागपूर येथे तीन महिणे वैद्यकिय उपचार करण्यात आले व त्यांना जवळपास 1,00,000/- खर्च आला परंतू तक्रारकर्ता यांची जखम अजूनही बरी झाली नाही.
..2..
..2..
3. तक्रारकर्ता हे गरीब रिक्षाचालक असून त्यांना आता रिक्षा चालविणे हे अशक्य होवून बसले आहे. तक्रारकर्ता मागणी करतात की, त्यांना रुपये 5,00,000/- ही रक्कम विरुध्दपक्षयांचेकडून नुकसानभरपाई म्हणून मिळावी.
4. विरुध्दपक्ष त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता यांना फॉरनियर गँगरीन हा रोग होता व तो पोटापासून जांगेपर्यंत पसरल्यामुळे तेथे पू झाला होता. तो आणखी पसरु नये म्हणून एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यांचेकडे प्लॅस्टीक सर्जरीची सोय नसल्यामुळे तक्रारकर्ता यांना नागपूर मेडीकल कॉलेजला पाठविण्यात आले. विरुध्दपक्ष यांच्या सेवेत न्युनता नसल्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही रुपये 5,000/- च्या नुकसानभरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
5. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताऐवज, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता हे विरुध्दपक्ष यांच्यामुळे गँगरीन झाले असे म्हणतात तर विरुध्दपक्ष यांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्ता यांना फॉरनियर गँगरीन हे पुर्वीपासून होते. विरुध्दपक्ष यांच्या चुकीमुळे गॅगरीन झाले अथवा माडीच्या नसला गंभीर इजा झाली असे दाखविणारा कोणताही लेखी पुरावा तक्रारकर्ता यांच्या मार्फत रेकॉर्डवर दाखल करण्यात आलेला नाही.
6. तक्रारकर्ता यांना झालेल्या टयुमरवर ऑपरेशन करण्याची गरज नव्हती, औषधे देण्याची गरज होती असे विधान तक्रारकर्ता करतात. मात्र तक्रारकर्ता यांनी असे सुचविणारा कोणत्याही वैद्यकिय तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही.
7. तक्रारकर्ता हे त्यांच्या ग्राहक तक्रारीमध्ये म्हणतात की, त्यांना वैद्यकिय उपचाराकरीता रुपये 1,00,000/- खर्च आला. मात्र तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे व नागपूर मेडीकल कॉलेज येथे उपचार केले जे की, शासकीय दवाखाने आहेत. तसेच तक्रारकर्ता यांनी एकही वैद्यकिय देयक सदर प्रकरणात रेकॉर्डवर दाखल केले नाही त्यामुळे त्यांना रुपये 1,00,000/- खर्च आला ही बाब सिध्द होत नाही.
8. तक्रारकर्ता यांनी सदर प्रकरणात 2005 (5) ALL MR (SC)42, AIR 2007 S.C. 1819 व 2010(5) M.H.L.J 52. हे केस लॉ दाखल केले तर विरुध्दपक्ष यांनी 2010ALL S.C.R. 510 हा केस लॉ रेकॉर्डवर दाखल केला आहे. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले केस लॉ हे तथ्य व परीस्थिती भिन्न असल्यामुळे सदर प्रकरणास लागू होत नाहीत.
..3..
..3..
9. विरुध्दपक्ष यांनी चुकीच्या पध्दतीमुळे शस्त्रक्रिया केल्यामुळे तक्रारकर्ता यांच्या मांडीजवळ नसला गंभीर इजा पोहचल्यामुळे त्यांना जखम झाली व विरुध्दपक्ष यांच्या सेवेत न्युनता आहे हे सिध्द करण्यास तक्रारकर्ता हे अपयशी ठरले आहेत.
असे तथ्य व परीस्थीत असतांना सदर आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार खारीज करण्यात येत आहे.