निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 14/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/09/2012 तक्रार निकाल दिनांकः- 02/04/2014
कालावधी 01वर्ष. 06 महिने. 07दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
जनार्धन पिता बाबुराव गायकवाड, अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.नौकरी, अॅड.डि.यु.दराडे.
रा.पी.डब्लू डी.उपविभागीय कार्यालय,
सेलु.ता.सेलु जि.परभणी.
विरुध्द
1 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय, गैरअर्जदार.
कर्मचारी सहकारी पत पेढी तर्फे अॅड.लहू कुलकर्णी.
व्यवस्थापक, गंगाखेड जि.परभणी.
2 उपअभियंता, स्वतः
सार्वजनीक बांधकाम उपविभाग सेलु.
ता.सेलु जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराने घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करुनही गैरअर्जदार क्रमांक 1 हे गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे बळजबरीने कर्जवसुली करत आहे. व गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 2 चा कर्मचारी व सभासद आहे. अर्जदाराने दिनांक 19/04/1999 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडून 3000/- रु. चे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड अर्जदाराने वेळोवेळी केली, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराच्या खात्यात ती व्यवस्थीत जमा केली नाही व खाते व्यवस्थीत लिहिले नाही व निष्काळजी केली.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 1 याने बेकायदेशिरपणे व्याज आकारणी केली. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 12/04/2007 रोजी अर्ज देवुन खाते उतारा मागीतला. तरी त्यानी खाते उतारा दिला नाही. यावरुन खाते उता-या मध्ये घोळ असलेचे निष्पन्न होते.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदारानी दिनांक 12/04/2007 रोजी एक प्रमाणपत्र दिले व त्यामध्ये अर्जदाराकडून येणे रु. 15103/- दाखविले. त्यानंतर अर्जदाराने खालील रक्कम भरणा केला.
दिनांक 11/04/2000 ला 2000/- रु. दिनांक 15/05/2007 ला 2000/- रु. दिनांक 06/06/2007 ला 2000/- रु. दिनांक 25/04/2007 ला 2000/- रु.दिनांक 04/06/2008 ला 2000/- रु. दिनांक 21/06/2008 ला 2000/- रु. अर्जदाराचे म्हणणे की, एप्रिल 2007 ते जून 2008 पर्यंत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 12,000/- रु. भरले तरीपण ऑक्टोबर 2007 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 याने गैरअर्जदार क्रमांक 2 ला पत्र देवुन कळविले की, अर्जदाराकडे कर्जापोटी थकीत रक्कम रु. 22,999/- आहे. अर्जदाराकडे दिनांक 12/04/2007 ला 15,103/- रु. बाकी असेल व त्यापैकी अर्जदाराने 12000/- रु. भरणा केला आहे. नंतर केवळ 3103/- इतकीच रक्कम बाकी राहिल, परंतु गैरअर्जदाराकडील दप्तरी गोंधळामुळे त्यानी चुकीची रक्कम अर्जदाराकडे दाखविली.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने संपूर्ण रक्कम भरणा केली असून त्याच्याकडे कोणतीही बाकी नाही, तरीही दिनांक 10/08/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 ला पत्र देवुन अर्जदाराच्या पगारीतून रु. 5000/- प्रतीमहा कपात करुन पाठवावे असे कळविले. त्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 2 सदर रक्कम कापन्याच्या तयारीत आहेत व गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार क्रमांक 1 यांना आदेश करावा की, त्याने अर्जदारास बेबाकी प्रमाणपत्र द्यावे व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 याना असा आदेश द्यावा की, त्यानी अर्जदाराच्या मासिक वेतनातून गैरअर्जदार क्रमांक 1 कडून घेतलेल्या कर्जापोटी कोणतेही रक्कम कपात करु नये.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 12 कागदपत्राच्या यादीसह 12 कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केले आहेत. ज्यामध्ये येणे असणा-या कर्जाबाबत प्रमाणपत्राची प्रत, व्याजदराचा तपशिल मिळण्याबाबत प्रमाणपत्र, पावती क्रमांक 688, 1079,1343, 1663,1748,2029, 14, 335, 394 व तसेच कर्ज वसुली बाबत प्रमाणपत्र इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने दिनांक 19/04/1999 रोजी त्यांचेकडून 30,000/- रु. चे कर्ज घेतले होते, परंतु अर्जदाराने ठरल्याप्रमाणे कर्जाची परतफेड वेळेवर जमा केली नाही. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, त्यानी भरलेले हप्ते त्याच्या खात्यात आम्ही जमा केलेले नाही व खाते उतारा व्यवस्थीत लिहिले गेले नाही, तसेच अर्जदाराचे हे म्हणणे देखील खोटे आहे की, आम्ही सदर कर्जावर अवैधरित्या व्याज आकारणी केली. अर्जदाराने आमच्याकडे खाते उतारा कधीही मागीतला नव्हता. आमची पतपेढी नौकरदाराना मागणीनुसार कर्ज देते. अर्जदार हे गैरअर्जदार क्रमांक 2 कडे सेलु येथे नौकरीत आहेत व त्यानी आमच्याकडे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता व त्याच वेळी पतपेढीच्या व्याजाबाबत व इतर नियम व अटी त्यांना सांगीतल्या होत्या व त्या अटी मान्य करुन अर्जदाराने सदरचे कर्ज घेतले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 याचे म्हणणे की, सदरचा तक्रार अर्ज खोटा आहे. खरी वस्तुस्थिती ही आहे की, अर्जदाराने दिनांक 19/04/1999 रोजी 30,000/- रु. आमच्याकडून कर्ज घेतले अर्जदाराने कर्जाची रक्कम उचलल्यानंतर अर्जदाराने 04/08/1999 पासून कांही व्याज व हप्त्याची भरणा त्यांच्याकडे केला. अर्जदाराने पतपेढीचे दिनांक 31/03/2009 पर्यंत 50,698/- व्याजाचे व 14,938/- रु. चा भरणा केलेला आहे. त्यानंतर अर्जदाराने उर्वरित रक्कमेचा व व्याजाचा भरणा केला नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराकडून आज रोजी 25,332/- रु. येणे बाकी आहे. अर्जदार हा जाणीव पूर्वक थकीत रक्कमेचा भरणा करत नाही, याबाबत आमच्या पतपेढीने अर्जदारास लेखी वेळोवेळी कळविले होते, परंतु आज पर्यंत थकीत रक्कम अर्जदाराने भरले नाही, केवळ सदर रक्कम बुडवण्यासाठी ही खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा त्यांच्याकडे मजूर या पदावर कार्यरत आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडी पोटी त्याच्या वेतनातून 3000/- रु. प्रमाणे कपात करुन संस्थेकडे पाठवण्यात येण्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 च्या पतपेढीने दिनांक 18/06/2012 च्या पत्रान्वये आम्हास कळविले, याबाबत संबंधीतास प्रत्यक्षात सांगीतले असता अर्जदारानी सदरची रक्कम कपात करणेस नकार दिला व प्रकरण न्यायालयात दाखल केले असलेणे कपात करण्यात येवू नये अशी विनंती अर्जदाराने केल्यामुळे आम्ही कोणतीही कपात केलेली नाही. बाकी अर्जदाराच्या तक्रारीतील इतर बाबींस त्यांचे कांहीही म्हणणे नाही.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 याने थकीत कर्जाच्या रक्कमे पोटी
अवाजवी रक्कमेची मागणी करुन अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडून दिनांक 19/04/1999 रोजी 30,000/- रु. चे कर्ज घेतले होते. हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांने त्यांच्या लेखी जबाबा मध्ये मान्य केले आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, त्यानी घेतलेल्या सदर कर्जाची परतफेड वेळोवेळी केली याबाबत अर्जदाराने कर्जाचा खाते उता-याची प्रत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे मागणी केली असता, गैरअर्जदार क्रमांक 1 याने दिनांक 12/04/2007 रोजी प्रमाणपत्राव्दारे अर्जदाराकडून येणे रक्कम 15,103/- रु. येणे बाकी आहे, असे आशयाचे प्रमाणपत्र गैरअर्जदाराने अर्जदारास दिले होते. ही बाब नि.क्रमाकं 4/1 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते सदर कागदपत्राचे अवलोकन केले असता अर्जदाराकडे मुद्दल 24,791/- + व्याज 332/- एकुण 25,123/- रु. बाकी आहे. तसेच अर्जदाराचे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे ठेव 6,100/- + 3920/- = 10,020/- गैरअर्जदाराकडे जमा आहेत.
अर्जदाराकडे थकीत असलेल्या रक्कम 25,123/- रु. मधून जमा असलेली ठेव 10,020/- वजा केली असता अर्जदाराकडे आणखी 15,103/- रु. बाकी असल्याचे सदर कागदपत्रावरुन निदर्शनास येते.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 12/04/2007 रोजी 15,103/- रु. बाकी असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे सदर संपूर्ण रक्कमेची भरणा केली, याबाबत अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4 मधील कागदपत्राची अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदाराकडे खालील प्रमाणे रक्कमेचा भरणा केल्याचे दिसून येते.
दिनांक पावती क्रमांक रक्कम रुपये. नि.क्रमांक
11/04/2007 1663 2000/- 4/6
15/05/2007 1748 2000/- 4/7
06/06/2007 2029 2000/- 4/8
25/04/2008 14 2000/- 4/9
04/06/2008 335 2000/- 4/10
21/06/2008 394 2000/- 4/11
अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 च्या दिनांक 12/04/2007 रोजी च्या पत्राव्दारे कळविलेल्या 15,103/- रु. च्या थकीत रक्कमेपोटी दिनांक 12/04/2007 नंतर केवळ 12,000/- रु.गैरअर्जदाराकडे भरले आहेत व 3103/- रु. अर्जदाराकडे बाकी आहेत हे वरील नोंदवरुन सिध्द होते.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्याकडे केवळ 3103/- रु. बाकी असतांना गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 10/08/2012 रोजीच्या पत्राव्दारे गैरअर्जदार क्रमांक 2 यांना अर्जदराच्या पगारीतून दरमहा 5,000/- रु. कपात करावे व अर्जदाराकडे रु. 22,999/- बाकी आहे. असे कळविले याबाबत अर्जदाराने कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.
अर्जदाराने थकीत असलेल्या रु. 3103/- गैरअर्जदार क्रमांक 1 कडे भरणा केल्याचे कोठेही दिसून येत नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रमांक 1 चे लेखी जबाबात म्हणणे की, अर्जदाराकडे दिनांक 30/06/2013 पर्यंत 25,332/- रु. बाकी आहे. याबाबत गैरअर्जदाराने कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणलेला नाही. कर्जाच्या अटीचा व नियमाचे कागदपत्र देखील गैरअर्जदार क्रमांक 1 याने मंचासमोर आणला नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 याने आपल्या लेखी जबाबा अधिक निवेदन खाली परिच्छेद क्रमांक 4 मध्ये खाते पुस्तीका व तारखेचा तक्ता दाखल केला जात आहे. असे म्हंटले आहे, परंतु वास्तविक कोणतेही खाते उतारा गैरअर्जदाराने मंचासमोर दाखल केलेला नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 याने आपल्या लेखी जबाबा सोबत आपले शपथपत्र देखील मंचासमोर दाखल केलेले नाही, म्हणून गैरअर्जदाराचे अर्जदाराकडे बाकी बाबतचे सदरचे म्हणणे ग्राहय धरणे मंचास योग्य वाटत नाही.
गैरअर्जदार क्रमांक 1 च्या दिनांक 12/04/2007 च्या पत्राप्रमाणे अर्जदाराकडे कर्जाची 15,103/- रु. थकीत होती व त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 12,000/- रु. भरल्यानंतर केवळ 3103/- रु. रक्कम थकीत असतांना गैरअर्जदार क्रमांक 1 याने 18/11/2009 रोजीच्या गैरअर्जदार क्रमांक 2 यास लिहिले पत्राव्दारे अर्जदाराकडे 16,725/- रु. थकीत आहे, म्हंटले होते. ही बाब नि.क्रमांक 4/12 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 2 याचा काहीही संबंध नाही. म्हणून प्रस्तुत प्रकरणातून मुक्त करण्यात येते. निश्चित गैरअर्जदार क्रमांक 1 याने अर्जदाराकडे केवळ 3103/- रु. बाकी असतांना जास्त रक्कमेची मागणी करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे थकीत कर्जाच्या रक्कमेपोटी 3,103/-
रु.फक्त ( अक्षरी रु. तीनहजार एकशे तीन फक्त ) आदेश तारखे पासून 30
दिवसांच्या आत भरावेत.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराकडून सदर रक्कम प्राप्त झाल्यानंतर 15
दिवसांच्या आत अर्जदारास कर्जाचे बेबाकी प्रमाणपत्र द्यावे.
4 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.