नि का ल प ञ
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :-07.07.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, अर्जदाराचे वडीलांनी अर्जदाराचे नावे गैरअर्जदार संस्थेत बचत खाते काढले. अर्जदाराने दिनांक 16/07/2007 ला पतसंस्थेत खाते उघडले असुन त्याचे खाते क्रं 49 असा असुन अर्जदाराचे बचत खात्यात जवळ पास रूपये 33,000/- जमा केले होते व त्यावरील व्याज पतसंस्थाकडे शिल्लक आहे. अर्जदाराने तक्रारीत पुढे असे कथन केले आहे की, अर्जदाराला त्याच्या खात्यात असलेली रक्कम व त्यावर असलेले व्याज संस्थेनी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने दिनांक 13/3/14 ला अर्जदाराने स्वतः अर्ज मागणी करिता गैरअर्जदार पतसंस्थेला नोटीस पाठविले. सदर नोटीस गैरअर्जदाराला दिनांक 16/03/2014 रोजी प्राप्त झाले परंतु अर्जदाराचे खात्यात जमा असलेली रक्कम गैरअर्जदाराने अर्जदाराला दिली नाही. अर्जदाराने दिनांक 07/05/2014 रोजी मा. सहायक निबंधक, सरकारी संस्था, तालुका कार्यालय, बल्लारपुर यांना पत्र लिहीले. गैरअर्जदाराचे सुचने नुसार अर्जदार गैरअर्जदारकडे दिनांक 14/07/2014 ला रक्कम उचलण्यास गेली असतांना गैरअर्जदाराने अर्जदाराचे मुळ पासबुक हिसकावुन घेवुन रक्कम परत केली नाही. त्यामुळे अर्जदाराने सदर प्रकरणात मा. सहायक निबंधक, सरकारी संस्था, बल्लारपुर, लेखी पत्र दिले परंतु त्यावर कोणतेही कार्यवाही झाली नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास प्रती अनुचित व्यापार पध्दती व सेवेत त्रुटी दिली असल्याने सदर तक्रार मंचा समक्ष दाखल करण्यात आली आहे.
अर्जदाराने तक्रारीत अशी मांगणी केली आहे की, अर्जदाराचे बचत खाते मधे जमा केलेली रक्कम व त्यावरील जमा असलेले व्याज गैरअर्जदार संस्थेकडुन मिळविण्याचा आदेश व्हावे व अर्जदाराला झालेले शारीरिक, व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडुन मिळवण्याचा आदेश व्हावे.
अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराला नोटीस प्राप्त होवून गैरअर्जदार मंचासमक्ष हजर झाले व आपले लेखीउत्तर नि. क्रं.9 प्रमाणे दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांचे लेखी उत्तरात असे कथन केलेल आहे की, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदार संस्थेवर लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. अर्जदाराचे वडील गैरअर्जदार संस्थेमधे सन 2007 ते 2009 या कालावधीत प्रभारी व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. त्यांनी संस्थेत अफरातफर करून संस्थेचे आर्थिक नुकसान केले आहे असे त्या कालावधीचे लेखा परीक्षण अहवाल मधे नमुद आहे. या संबंधाने संस्थेचे पत्र अर्जदाराचे वडील श्री. अनिल भाले यांना लिहुन रकमेची मागणी करण्यात आली होती. सदर रक्कम अर्जदाराचे वडीलाने संस्थेत जमा केली नाही. अर्जदाराचे वय जेव्हा 12 वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या वडीलाने अर्जदाराचे नावे गैरअर्जदार संस्थेमधे बचत खाते उघडले. अर्जदाराचे वडीलानी संस्थेत रक्कमाची अफरातफरी केली होती व त्या कालावधीत अर्जदाराचे वडीलाने अर्जदाराचे खाते उघडले. अर्जदाराचे खाते जेव्हा उघडले होते तेव्हा ती अज्ञान होती व त्याची कोणतेही उत्पन्न नव्हती. अर्जदाराचे वडील यांनी संस्थेत अफरातफरी ची रक्कम स्वतःचे मुलीच्या बचत खात्यात जमा दाखवुन मा. न्याय मंचाकडे दिशाभुल करून सदर तक्रार दाखील केली असल्याने खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय
काय किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ?
अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
अर्जदाराचे वडीलांनी अर्जदाराचे नावे गैरअर्जदार संस्थेत बचत खाते काढले. अर्जदाराने दिनांक 16/07/2007 ला पतसंस्थेत खाते उघडले असुन त्याचे खाते क्रं 49 असा असुन अर्जदाराचे बचत खात्यात जवळ पास रूपये 33,000/- जमा केले होते. ही बाब अर्जदाराने दाखल नि.क्रं 4 वर दस्त क्रं 1 वरून सिध्द होते. तसेच गैरअर्जदाराने त्यांचे जवाबात हे मान्य केले आहे की अर्जदाराचे नावाने गैरअर्जदार पतसंस्थेमधे बचत खाते आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदार पतसंस्थाचे ग्राहक आहे. असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारर्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
गैरअर्जदाराने त्यांचे बचाव पक्षात असे मानले आहे की, अर्जदाराचे वडीलानी पतसंस्थेत रक्कमेची अफरातफरी करून अर्जदाराचे खात्यात जमा रक्कम दाखवली आहे. गैरअर्जदार पतसंस्थेनी दिनांक 02/03/2016 रोजी मंचा समक्ष दस्तावेज दाखल केले आहे. सदर दस्तावेजची पडताडणी करतांना असे दिसले की, संस्थेच्या सन 2007 ते 2009 करिता केलेला परीक्षण अहवाल, संस्थेनी अनिल नामदेव यांना दिेलेले नोटीस यांची छांयाकित प्रत असुन त्यावर संस्थे तर्फै किंवा गैरअर्जदारचे अधिवक्ताची कोणतीही सत्य प्रत म्हणुन स्वाक्षरी करण्यात आली नाही व त्या दस्तावेजांवर गैरअर्जदार पतसंस्थातर्फै कोणतेही सदर दस्तावेज सिध्द करण्याकरिता साक्षीपुरावा प्रकरणात घेण्यात आला नाही. या उलट अर्जदाराने नि.क्रं 4 वर दाखल बचत खात्याची पासबुकची प्रत, गैरअर्जदाराला पाठविलेले पत्र, सहायक निबंधकला पाठविलेले पत्र, पोस्टांची पावत्या व त्यावर अर्जदाराचे सत्य प्रत स्वाक्षरी असुन अर्जदाराने नि.क्रं 10 वर दाखल शपथपत्राव्दारे सिध्द केले आहे. गैरअर्जदार पतसंस्थाने अर्जदाराच्या खात्यात जमा असलेली रक्कम अर्जदाराला परत न करून अर्जदाराचे प्रती न्युनतम सेवा दर्शवलेली आहे व अनुचित व्यापार पध्दतीची अवलंबणा केली आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं 2 व 3 चे उत्तर होकार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्ण्यात येत आहे.
अंतीम आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार पतसंस्थाने अर्जदाराचे बचत खाते क्रं 49 मधे रक्कम रूपये 33000/- 8 टक्के दिनांक 13/03/2014 पासुन आदेशाची प्रत मिळण्यापासुन 45 दिवासाच्या आत अर्जदाराला दयावे.
- अर्जदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन 5000/- रूपये व तक्रारीचा खर्च रूपये 2500/- रूपये गैरअर्जदाराला आदेशाची प्रत मिळण्यापासुन 45 दिवसाच्या आत गैरअर्जदाराने अर्जदाराला दयावे.
- आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी..
चंद्रपूर
दिनांक - 07/07/2016