Maharashtra

Nagpur

CC/11/102

Dr. Rakesh Baldevraj Kapoor - Complainant(s)

Versus

Dr. B.K. Murli, Managing Director Hope Hospital, The Multi Speciality Hospital and Research Centre - Opp.Party(s)

Adv. S.B. Solat

26 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/102
 
1. Dr. Rakesh Baldevraj Kapoor
Rachana Madhuban, Flat No. 218, 2nd floor, D-Wing, Koradi Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr. B.K. Murli, Managing Director Hope Hospital, The Multi Speciality Hospital and Research Centre
Near Dhantoli Garden,
Nagpur
Maharashtra
2. Dr. Shri Saurabh Warshane, Shri Krishna Hurdayalaya and Critical Care Centre
Tikekar Road, Opp. New English High School, Dhantoli
Nagpur
Maharashtra
3. Dr. Rajesh Mundhada, Orange City Hospital and Research Institute
19, Pande Layout, Vir Sawarkar Chowk, Nagpur
Nagpur
Mahrashtra
4. Dr. Parag Patil
Care Hospital, 3, Farm Land, Panchsheel Chowk, Ramdaspeth,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. S.B. Solat, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

-निकालपत्र-
( आदेश पारित द्वारा श्री. विजयसिंह ना. राणे, अध्‍यक्ष)
(पारित दिनांक 26 एप्रिल, 2012)
 
1.    ‍याची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,  तो व्‍यवसायाने डॉक्‍टर आहे.  दि. 19.03.2009 रोजी त्‍याचा अपघात झाला. त्‍यानंतर त्‍यास उपचारासाठी गैरअर्जदार क्रं. 1 कडे आणण्‍यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 ने तपासणी केली व          दि. 20.03.2009 रोजी सकाळी त्‍याच्‍या उजव्‍या पायाच्‍या हाडाची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. दुस-या दिवशी त्‍याच्‍या उजव्‍या पायातील रक्‍त प्रवाह कमी झाल्‍याचे लक्षात आल्‍यामुळे डॉ. पाटील यांनी तपासणी केली व त्‍यांच्‍या मते Impending Compartment Syndrome  होते. त्‍याप्रमाणे दि. 21.03.2009 रोजी सकाळी 10.00 वाजता Fasciotomy केली व सायंकाळी 5.40 वाजता Angiography करिता सूचना तक्रारकर्त्
 
 
 
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
दिली व तक्रारकर्त्‍यास वि.प. 2 च्‍या दवाखान्‍यात पाठविण्‍यात आले. त्‍यापूर्वी सकाळी Doppler तपासणी करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये खालीलप्रमाणे निष्‍कर्ष                             निघाला ..............
 
OPINION :
                      F/S/O (FINDING SEEN ON) POSSIBILITY OF ACUTE
                      THROMBUS IN POLITEAL WITH NO FLOW IN ATA
                      AND FEEBLE FLOW IN PTA IN RIGHT LOWER LIMB.
 
2.     वि.प. 2 कडे रात्री 10.30 वाजता तिसरी शस्‍त्रक्रिया त्‍याच्‍यावर करण्‍यात आली ती Etomy, Emblectomy  Vascular repair with graft done. अशा स्‍वरुपाची आहे. पुढे तक्रारकर्त्‍यास पुन्‍हा वि.प. 1 च्‍या दवाखान्‍यात आणले. त्‍या ठिकाणी तक्रारकर्त्‍याच्‍या उजव्‍या पायाचे स्‍नायू खराब झालेले आहे, त्‍यातून दुर्गंधी येत आहे, रक्‍त पुरवठा होत नाही आणि बोटांची हालचाल नाही असा निष्‍कर्ष काढण्‍यात आला. पुढे तक्रारकर्त्‍याचे उजव्‍या पायाची शस्‍त्रक्रिया करुन तो मांडी पासून कापून टाकण्‍यात आला. परिणामी तक्रारकर्ता हा कायम स्‍वरुपी अपंग झाला. तक्रारकर्त्‍याचे निवेदन असे आहे की, गैरअर्जदाराच्‍या निष्‍काळजीपणामुळे योग्‍य वेळी योग्‍य उपचार न केल्‍यामुळे त्‍याची ही अवस्‍था झाली आहे. त्‍याचा पाय कापून टाकावा लागला आणि म्‍हणून त्‍याने ही तक्रार दाखल केली आहे.
 
3.   गैरअर्जदार 1 च्‍या दवाखान्‍यात त्‍यास औषधोपचारासाठी विविध प्रकारच्‍या चाचण्‍यासाठी आलेला खर्च व ओटो बॉक हेल्‍थ केअर इंडिया प्रा.लि.यांचे कडून कृत्रीम पाय विकत घ्‍यावा लागला यासर्वांचा एकूण खर्च रुपये 6,38,766/- इतका आला व त्‍यास यासर्व प्रकारामुळे झालेला मानसिक, शारीरिक त्रास व आर्थिक नुकसान सहन


ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
करावा लागला व सहन करावा लागणार आहे. यासाठी नुकसान भरपाई                   रुपये 10,00,000/-गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी या तक्रारीत केली आहे.
 
4.   मंचा तर्फे गैरअर्जदारानां नोटीस पाठविण्‍यात आली. त्‍यांनी हजर होऊन            आप-आपले जबाब दाखल केले .
 
5.    गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्‍या जबाबा द्वारे सर्व विपरित विधान नाकबूल केलीत. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, सेवेतील त्रृटी व निष्‍काळजीपणा यासंबंधी सुस्‍पष्‍ट आणि योग्‍य आरोप करण्‍यात आलेले नाही. ते अस्‍पष्‍ट व अवैज्ञानिक आहे. औषधोपचार मिळत असतानां निर्माण होणारी गुंतागुंत व अनपेक्षित परिणामांना समोर जावे लागते ती सर्व रुग्‍णांना टाळता येत नाही. गैरअर्जदार क्रं. 1 कडून मिळणारी सर्व सेवा सुविधा तसेच त्‍यांचा दर्जा याची तक्रारकर्त्‍यास कल्‍पना होती व ते समाधानकारक होते म्‍हणून तो उपचार घेत होता.
 
6.    गैरअर्जदार क्रं. 1 यांनी पुढे असे नमुद केले की, ते अनुभवी चिकित्‍सक आहेत. तक्रारकर्त्‍यास निर्माण होऊ शकणारी गुंतागुंत याची माहिती दिल्‍या नंतरच उपचार करण्‍यात आले. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर करण्‍यात आलेले आरोप पूर्णतः खोटे आहे. त्‍याच्‍यांकडे तक्रारकर्त्‍याला दाखल करण्‍यात आले. त्‍याची तपासणी केली,            क्ष- किरण तथा इतर चाचण्‍या घेण्‍यात आल्‍या व त्‍याची संमती घेऊन खालीलप्रमाणे उपचार केले आहे.
 
‘ORIF With DHS land suprta condylar
cobra  plate fixation and patellectomy .
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
त्‍यानंतर सुज, हळवेपणा व नाडीचे ठोके कमी झाल्‍याचे दिसून आल्‍यावरुन                   डॉ. भागवतकर व डॉ. पाटील यांच्‍याशी सल्‍लामसलत करुन Fasciotomy चे उपचार करण्‍यात आले. तक्रारकर्ता हा तज्ञांच्‍या देखरेखखाली होता.Angiography  ची सोय त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध नाही म्‍हणून दि. 21.03.2009 ला सायंकाळी 5.00 वाजता तक्रारकर्त्‍यास गैरअर्जदार क्रं. 2 कडे पाठविले. त्‍यावर गैरअर्जदार क्रं.2 ने शस्‍त्रक्रिया केली व दि. 23.03.2009 रोजी त्‍यास पुन्‍हा गैरअर्जदार क्रं.1 कडे पाठविले.                दि. 23.03.2009 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या जख्‍मा चिघळलेल्‍या होत्‍या, बोटांची हालचाल होत नव्‍हती. त्‍यानंतर SGA ची उपचार पध्‍दत वापरुन सर्व काळजी घेण्‍यात आली. पुन्‍हा Angiography करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला. त्‍यानंतर गैरअर्जदार क्रं.3 ने Angiography चे उपचार केले. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्रं. 1 ला अंदाजित खर्चाचे बिल मागितले होते, ते त्‍याला देण्‍यात आले. ते त्‍याने कधीही दिले नाही. शेवटी   दि. 25.03.2009 ला त्‍याच्‍यावर उपचार करुन त्‍याचा पाय गुढग्‍यापासून कापून टाकण्‍यात आला.
 
 
7.    गैरअर्जदार क्रं.1 यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, यासर्व प्रकारात त्‍यानी वैद्यकीय शास्‍त्राच्‍या सर्वसामान्‍य नियमाप्रमाणे औषधोपचार केले जे                      पाठय पुस्‍तकांमध्‍ये नमूद आहे. औषधोपचाराच्‍या सर्वसाधारण नियमापासून ते दूर गेले नाही व त्‍यांचा निष्‍काळजीपणा सिध्‍द करण्‍याची जबाबदारी तक्रारकर्त्‍याची आहे. तक्रारकर्त्‍याने केवळ रुपये 20,000/- जमा केले. रुपये 59,617/- अद्यापी घेणे आहे. थोडक्‍यात तक्रारकर्त्‍याची तक्रार खोटी, चुकिची आणि गैरकायदेशीर असल्‍यामुळे ती खारीज करण्‍यात यावी.
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
8.    वि.प. 2 ने आपला लेखी जबाब दाखल केला व त्‍यातील विपरित विधाने नाकबूल केली. त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी श्रीकृष्‍ण हॉस्‍पीटल मध्‍ये Consultant Surgeon  म्‍हणून बोलविण्‍यात आल्‍यावर तक्रारकर्त्‍याची तपासणी केली. त्‍यावेळेला त्‍यांना खालील बाबी आढळून आल्‍या.
 
“Cold , no pulsation, no sensation, no motor
movement, muscle viability was doubtful
                 (Limb was almost dead)”
 
            Angiography Report नुसार Popliteal artery (Artery of thigh) पूर्णपणे ब्‍लॉक (गुडघ्‍यावर) होती पायाच्‍या तीन arteries पैकी  ((Anterior Tibial (AT), Posterior Tibial (PT), Personal Artery (PA) } दोन  (AT & PA) पूर्णपणे ब्‍लॉक झाला होत्‍या. त्‍यावेळेस अर्जदाराचा अपघात होवून 48 तासापेक्षाही जास्‍त वेळ झाला होता. अशा परिस्थितीत जेव्‍हा की अर्जदाराचा पाय पूर्णपणे निकामी झाला होता. यासंबंधी तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीला पूर्ण माहिती देण्‍यात आली. त्‍यांचा आग्रह होता की, तक्रारकर्त्‍याच्‍या पायावर शस्‍त्रक्रिया करावी. त्‍यांनी तशी संमती दिली, त्‍यावरुन त्‍यांनी शस्‍त्रक्रिया करायला सुरुवात केली, ती उशिरापर्यंत चालली. धमन्‍या बंद झाल्‍या होत्‍या, त्‍यातून ब्‍लॉकेजेस काढण्‍यात आले व रक्‍त प्रवाह पूर्ववत सुरु करण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याचा पाय निकामी झाला, त्‍याचा या उपचाराशी कोणताही संबंध येत नाही.
 
9.    वि.प.क्रं 2 यांनी पुढे असे नमुद केले की, दि. 24.03.2009 रोजी पुन्‍हा त्‍यांच्‍या दवाखान्‍यात आणल्‍यावर तक्रारकर्त्‍याचा पाय निकामी झाल्‍यामुळे त्‍याच्‍यावर


ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
आता शस्‍त्रक्रिया करुन उपाय होणार नाही असे ठरविण्‍यात आले तो संगळयाचा एकत्रित निर्णय होता. थोडक्‍यात या प्रकरणात त्‍यांचा कोणताही दोष नाही. त्‍यांनी विनंती केली की, त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्ता हा त्‍यांच्‍याकडे आणण्‍यात आला त्‍यावेळी 48 तासा पेक्षा जास्‍त कालावधी होऊन गेला होता. जेव्‍हा की, अशा प्रकारची शस्‍त्रक्रिया व उपचार हे 6 तासाच्‍या आत करणे आवश्‍यक असते. तक्रारकर्त्‍याच्‍या व त्‍याच्‍या पत्‍नीच्‍या विनंतीमुळे त्‍यांनी उपचार केले यामध्‍ये त्‍यांचा कोणताही दोष आहे असे म्‍हणता येत नाही . म्‍हणून तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती वि.प.क्रं 2 यांनी  केली.
 
10.   विरुध्‍द पक्ष 3 व 4 यांनी सुध्‍दा आपला जबाब दाखल करुन त.क.ची सर्व विपरित विधाने नाकबूल केली व असे नमूद केले की, त्‍यांच्‍याकडील उपचारामुळे तक्रारकर्त्‍याचा पाय निकामी झालेला नाही. त्‍यांच्‍याकडे उपचार, तक्रारकर्त्‍याचा पाय निकामी झाल्‍यानंतर करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर कोणताही दोष येऊ शकत नाही.
 
11.     उपलब्‍ध दस्‍ताऐवजांचे निरीक्षण तसेच सर्व पक्षांनी केलेला युक्तिवाद यावरुन न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-
 
12.       यातील तक्रारकर्त्‍याच्‍या पायातील उती मृत झाल्‍यात आणि पाय निकामी झाला, परिणामी तो गुडघ्‍याचे वरुन कापावा लागला ही बाब उभय पक्षांनाही मान्‍य आहे.
 
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
13.   पायाची स्थिती तो कापण्‍याचे वेळेस काय होती ? या संबधीचे दस्‍तऐवज आणि माहिती रेकॉर्डवर उपलब्‍ध आहे आणि ती स्थिती व माहिती सर्व पक्षांना मान्‍य आहे,  त्‍या स्थिती संबधाने ऑपरेटीव्‍ह नोटस आहेत, त्‍यावरुन तक्रारकर्त्‍याचे पायाची स्थिती काय झाली होती व तो या अवस्‍थेत कसा पोहचलेला होता, या बाबी स्‍पष्‍ट होतात. त्‍या ऑपरेटीव्‍ह नोटस खालील प्रमाणे-
 
"Popliteal vessels identified, isolated, doubly
 ligated and cut- large thrombus found in each
vessel, roughly at the level of the segmental
                                fracture."
 
14.     यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्‍याच्‍या पायाच्‍या सर्व रोहिण्‍या (artery) मध्‍ये मोठया प्रमाणावर thrombus आढळून आला, याचाच अर्थ तो निर्माण झाला आणि याचे मुख्‍य कारण म्‍हणजे संबधित भाग व  रोहीणी आहात (injured) झालेल्‍या होत्‍या. याचे परिणामी पुढील पायाचे पेशीनां व भागाला रक्‍त पुरवठा झालेला नाही आणि त्‍यामुळे त्‍या पेशी व उती मरण पावल्‍या आणि पुढे त्‍या सडल्‍या आणि त्‍यामुळे पाय गुडघ्‍याचे वर पासून कापून टाकण्‍या शिवाय कोणताही पर्याय उरलेला नव्‍हता, ही स्थिती जरी हया ऑपरेटीव्‍ह नोटस मध्‍ये दिनांक-25.03.2009 ला नोंदविलेली आहे, तरी त्‍यापूर्वीचे निरिक्षणा मध्‍ये सुध्‍दा या स्थितीचे स्‍वरुप दर्शविलेले आहे, हया नोंदी दिनांक-24.03.2009 रोजी गैरअर्जदार/वि.प.क्रं 1 ने घेतलेल्‍या आहेत, त्‍या खालील प्रमाणे-
 
"Right leg muscles was found to be necroses
Foul Smelling+ DP & at Pulsation nut felt,
                 No Fingure movement"
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
म्‍हणजेच 24.03.2009 रोजी तो भाग मृत व सडण्‍याची प्रक्रिया सुरु झालेली होती, हे स्‍पष्‍ट होते.जवळपास असेच निरिक्षण दिनांक-23.03.2009 रोजी त्‍यांनी नोंदविलेले आहे.
15.    थोडे मागे गेल्‍यास या पायाची स्थिती दि.21.03.2009 रोजी                 सायंकाळी 5.40 मिनीटानी, जेंव्‍हा तक्रारकर्त्‍यास, गैरअर्जदार क्रं 2 चे दवाखान्‍यात तपासण्‍यात आले,त्‍यावेळेस खालीलप्रमाणे होती-
"Cold, no pulsation, no sensation, no motor movement,
Muscle viability was doubtful (limb was almost dead) "
 
16.    तेंव्‍हाच्‍याच Angiography Report नुसार Popliteal artery (Artery of thigh) पूर्णपणे ब्‍लॉक (गुडघ्‍यावर) होती पायाच्‍या तीन arteries पैकी  ((Anterior Tibial (AT), Posterior Tibial (PT), Personal Artery (PA) } दोन  (AT & PA) पूर्णपणे ब्‍लॉक झाला होत्‍या. त्‍यावेळेस अर्जदाराचा अपघात होवून 48 तासापेक्षाही जास्‍त वेळ झाला होता. अशा परिस्थितीत जेव्‍हा की अर्जदाराचा पाय पूर्णपणे निकामी झाला होता.
 
17.   थोडक्‍यात तक्रारकर्त्‍याचे पायाची स्थिती तो जवळपास मृत होण्‍याचे संदर्भात दिनांक-21.03.2009 रोजीच स्‍पष्‍ट झालेली होती आणि त्‍यानंतर गैरअर्जदार क्रं 2 ने त्‍यांचेच म्‍हणण्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचे विनंती वरुन वैद्यकीय उपचार केलेत, या सर्व बाबी सर्व गैरअर्जदारांना तसेच तक्रारकर्त्‍यास मान्‍य आहेत, या बाबत कोणीही कोणत्‍याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही
.
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
18.   तक्रारकर्त्‍याचा पाय गैरअर्जदार क्रं 1 कडे त्‍यास जेंव्‍हा भरती केले तेंव्‍हा मृत झालेला नव्‍हता, त्‍यामध्‍ये जीवंतपणाची सर्व लक्षणे दिसून येत होती, मात्र गैरअर्जदार           क्रं 1 कडून, गैरअर्जदार क्रं 2 कडे तक्रारकर्त्‍यास पाठविण्‍यात येई पर्यंत सदरचा पाय हा जवळपास मृत झालेला होता, ही बाब वरील विवेचना वरुन स्‍पष्‍ट होते.
19.   अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रं 1 ची ही जबाबदारी होती की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या पायाची स्थिती वर नमुद केल्‍या प्रमाणे का झाली ? या बाबत आपले स्‍वयंस्‍पष्‍ट स्‍पष्‍टीकरण न्‍यायमंचा समक्ष दयावयास हवे होते परंतु गैरअर्जदार क्रं 1 ने न्‍यायमंचा समक्ष दाखल केलेल्‍या लेखी जबाबात वा अन्‍यत्र या बाबत कोणतेही स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही.
20. यातील तक्रारकर्त्‍याचा पायास मूळात झालेल्‍या दुखापतीचे संदर्भात गैरअर्जदार क्रं 1 चे म्‍हणणे खालील प्रमाणे होते-
 
"Intra capsular fracture neck femur right
with segmental fracture shaft femur with
lower 1/3rd right with intra articular
communited condylor fracture of femur
and patella Rt"
 
21.    अशा स्‍वरुपाचा अपघाती रुग्‍ण हा एखाद्या वैद्यकीय तज्ञाकडे आल्‍या नंतर काय करावयाचे, या संबधीचे निश्चित असे योग्‍य मार्गदर्शन वैद्यकीय शास्‍त्रातील अभ्‍यासक्रमातील ग्रंथात नमुद केलेले आहे, त्‍या नुसार-
      1) प्रथमतः संबधित रुग्‍णाचे प्राण विचविण्‍यासाठी योग्‍य ते वैद्यकीय उपचार
         करणे.
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
     2) दुसरा मुद्या म्‍हणजे संबधित रुग्‍णाचा अवयव वाचविणे.
     3) तिसरा मुद्या म्‍हणजे संबधित रुग्‍णाचे मोडलेल्‍या हाडावर योग्‍य ते वैद्यकीय
         उपचार करणे
 
     नटराजन यांचे आर्थोपेडीक अन्‍ड ट्रॉमेटोलॉजी या ग्रंथाचे प्रकरण-27-Vascular Injury” यात नमुद केल्‍या प्रमाणे-
 
     “In severe injuries to the lower and upper limb fractures are often complicated by injuries to the major blood vessels…..with the increasing incidence of road traffic accidents resulting in multiple major fractures, it is essential for every medical man to be able to recognize the presence of severe vascular trauma in limb injuries, so that urgent steps could be taken to shift the casualty to proper hospitals and save the limb”.
 
22.     या शिवाय, या संबधीची माहिती P.Ruedi, Richard E. Buckley, Christopher G MoranSecond expanded edition- AO Principles of Fracture Management-Volume-1-Principles पान क्रमांक-115 या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे. त्‍यामधील काही महत्‍वाचा भाग येथे उदधृत करण्‍यात येतो.
Introduction:-
                              "Decision making and communication are vital
 Factors  for successful surgery, good surgeons
 make wise decisions. Before recommending
surgical treatment, a thorough assessment
of the patient must be undertaken to understand
the full extent of the injury, anticipate and prevent
Postoperative complications, and determine the
Potential for recovery".
 
          "The first priority is to save life and therefore
The management of major chest, abdominal, and
Head injuries will always take precedent".
 
     "The next priority is to save limb by
Early treatment of vascular injuries and open
Fractures".
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
      "The surgeon must evaluate the
Personality of the injury. This is determined by
 
*Patient factors
 
*the soft tissue injury,
 
*the fracture
 
 In the limbs, each bone and joint should be
 tested for tenderness and stability and a
 neurovascular assessment of each limb is
 mandatory.
 
Vascular Status
         It is mandatory to determine the
vascular states of all injured limbs. The
peripheral pulses, temperature and
capillary refill must be checked and compared
with the uninjured side. Although the absence
of a palpable pulse is an important pointer
to potential vascular damage, the presence
of a pulse or good capillary refill does not
necessarily guarantee an intact vascular supply.
Doppler examination of the injured and
unharmed extremity may be helpful for
screening and the ankle-brachial index (ABI)
is also useful. In all cases of doubt or where
the case history, the physical examination or the
radiographic fracture pattern suggests
 
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
vascular damage, the opinion of a vascular
Surgeon must be obtained urgently. Management
Strategies include urgent angiography in the
vascular radiology suite, immediate on table
angiography or direct w of the injured vessel.
The method chosen will depend upon local
Facilities and protocols.
 
 Damage control surgery-
 
                                In this group of patients only life and
limb-saving surgery should be performed
during the early phase.  The patient should be
transferred to the intensive care unit
as soon as possible and definitive surgery
delayed until the patient’s condition is optimal,
often at 5-10 days posttrauma.
 
                                Full evaluation of the fracture will allow
                       classification and surgical planning, but the
                       timing of surgery is not determined by the
                       fracture but by the physiological condition
                       of the patient and the soft-tissue injury.
 
         The timing of surgery will depend on
the patient’s health and the state of the
soft tissues.
 
 
 
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
                                An arterial injury will dominate the
decision making process because of
the immediate need for arterial
reconstruction with appropriate
stabilization of the fracture.
    
                        Saving limb-
 
                                Stabilization of diaphyseal fractures
is part of an emergency operation to
save a limb in the case of an acute
vascular injury, compartment syndrome
as well as in open fractures. Fracture instability
compromises not only the vascular repair
 but also the healing of any severe soft
 tissue injury.
 
                        Journal of Vascular Surgery-
 
      Popliteal artery injuries: Civilian
experience with sixty-three patients
during a twenty-four year period
(1960 through 1984)
 
                        Summary-
 
                              When a popliteal artery injury
 is suspected, it must be investigated
 immediately by angiography or exploration.
 
 
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
23.    गैरअर्जदार क्रं 1 ने आपल्‍या लेखी जबाबात असा बचाव घेतलेला आहे की, त्‍याने तक्रारकर्त्‍यावर केलेले वैद्यकीय उपचार हे वैद्यक शास्‍त्रातील स्‍थापित पध्‍दती नुसार व क्रमीक वैद्यक शास्‍त्राचे अभ्‍यासक्रमातील ग्रंथा नुसारच केलेले आहेत परंतु त्‍यांना तक्रारकर्त्‍याचे वैद्यकीय उपचारात यश आले नाही, त्‍यामध्‍ये गैरअर्जदार क्रं 1 चा कोणताही दोष नाही कारण त्‍यांनी त.क.वर वैद्यकीय शात्रा नुसार  योग्‍य ते वैद्यकीय उपचार केलेले आहेत.
24.   गैरअर्जदार क्रमांक-1 हे म्‍हणणे बरोबर आहे की,  जर एखाद्या डॉक्‍टरांनी वैद्यकीय शास्‍त्राच्‍या मान्‍य अशा वैद्यकीय पध्‍दती प्रमाणे व वैद्यकीय अभ्‍यासक्रमाच्‍या क्रमीक पुस्‍तकात दर्शविलेल्‍या मागदर्शना प्रमाणे  एखादे रुग्‍णावर वैद्यकीय उपचार केले व त्‍यात संबधित डॉक्‍टरांना यश आले नाही तर त्‍या डॉक्‍टरांना जबाबदार धरता येणार नाही.
 
25.    परंतु गैरअर्जदार क्रमांक-1 यांनी हया वैद्यकीय शास्‍त्राच्‍या पध्‍दती प्रमाणे वैद्यकीय उपचार त.क. वर केले होते, हे दर्शविण्‍याची व ते सिध्‍द करण्‍याची संपूर्णतः जबाबदारी ही गैरअर्जदार क्रं 1 वर येते परंतु गैरअर्जदार क्रमांक-1 यांनी या बाबत कोणताही पुरावा न्‍यायमंचा समक्ष दिलेला नाही वा त्‍या संबधाने योग्‍य असे निवेदनही केलेले नाही.
26.   वस्‍तुतः वैद्यकीय शास्‍त्राच्‍या पध्‍दती प्रमाणे व उपरोक्‍त नमुद केलेल्‍या वैद्यकीय अभ्‍यासक्रमातील ग्रंथातील मजकूरा प्रमाणे गैरअर्जदार क्रं 1 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या पायाचे रक्षण करण्‍याचे दृष्‍टीने पहिल्‍या 06 तासातच सर्व प्रथम  पाऊले  उचलणे गरजेचे व आवश्‍यक होते. त्‍यांनी सर्वप्रथम vascular


ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
status चे योग्‍य अनुमान लावले, त्‍यासाठीच्‍या चाचण्‍या करणे व निदान करुन उपचार करणे गरजेचे होते. मोडलेल्‍या हाडा संबधी शस्‍त्रक्रिया व ते जोडण्‍याची क्रिया या बाबी नंतरही केल्‍या असत्‍या तरी त्‍यात संबधित रुग्‍ण म्‍हणजे त.क.चे कोणतेही नुकसान होण्‍याजोगे नव्‍हते, तसेही त्‍यांनी शस्‍त्रक्रिया दुसरे दिवशी केली आहे. मात्र गैरअर्जदार क्रमांक-1 यांनी त.क.वर वैद्यकीय उपचार करते वेळी तसे काहीही प्रयत्‍न केलेले दिसून येत नाही, असे त्‍यांचेच रेकॉर्ड वरील नोंदी वरुन दिसून येते.
 
27.    गै.अ.क्रं 1 ने त.क.चा पाय वाचविण्‍याचे दृष्‍टीने रक्‍तवाहक नलीकांचे काही नुकसान झाले आहे काय? हे सर्व प्रथम पाहणे गरजचे होते, ही बाब उपरोक्‍त नमुद वैद्यकीय ग्रंथाचे पान क्रं 93 व 94 वर नमुद आहे. याचा शोध घेण्‍याचे दृष्‍टीने त्‍वरीत एंजीओग्राफी करणे गरजेचे होते तसेच डॉपलर पध्‍दतीने सुदृढ पाय व जख्‍मी पाय यातील रक्‍त प्रवाहाची अवस्‍था तपासून दोन्‍ही मधील तफावत जाणून घेऊन, नेमका शोध घेणे गरजेचे होते.
28.  गैरअर्जदार क्रमांक-1 ने उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे कोणतेही वैद्यकीय क्रिया निदान दि.21.03.2009 चे सकाळी 8.00 वाजे पर्यंत केलेले नव्‍हते. गैरअर्जदार क्रं 1 यांचेच रेकॉर्ड प्रमाणे होप हॉस्पिटल हे मल्‍टी स्‍पेशॉलिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आहे, मात्र गैरअर्जदार               क्रमांक-1 च्‍याच म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍या ठिकाणी एन्‍जीओग्राफी करण्‍याची सोय सुध्‍दा उपलब्‍ध नव्‍हती, त्‍यासाठी, गैरअर्जदार क्रं 1 ला,               गैरअर्जदार क्रं 2 कडे  त.क. यास  पाठवावे  लागले,  जे वैद्यकीय निदान व


ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
 रुग्‍णाची वैद्यकीय तपासणी, सर्व प्रथम रुग्‍ण दाखल होते वेळीच करणे आवश्‍यक व गरजेचे होते ते निदान व चाचणी गैरअर्जदार क्रं 1 यांनी             दिनांक-21.03.2009 चे सकाळ पर्यंत केलेली नव्‍हती. जेंव्‍हा की, ही बाब वैद्यकीय शास्‍त्रा प्रमाणे पहिल्‍या 06 तासात करणे गरजेचे आहे.
29. उघडपणे तक्रारकर्त्‍याच्‍या पायाचे रक्‍तवाहक नलीकानां                           झालेल्‍या दुखापतीचे निदान होई पर्यंत व त्‍यावर वैद्यकीय उपचार होई पर्यंत
तक्रारकर्त्‍याचा पाय जवळपास मृत झालेला होता, ही बाब गैरअर्जदार      क्रमांक-2 च्‍या प्रथम वैद्यकीय तपासणीत स्‍पष्‍ट झालेली आहे.
 
   “Cold , no pulsation, no sensation, no motor
movement, muscle viability was doubtful
                  (Limb was almost dead)”
 
30.    तेंव्‍हाचे Angiography Report नुसार Popliteal artery (Artery of thigh) पूर्णपणे ब्‍लॉक (गुडघ्‍यावर) होती पायाच्‍या तीन arteries पैकी  ((Anterior Tibial (AT), Posterior Tibial (PT), Personal Artery (PA) } दोन  (AT & PA) पूर्णपणे ब्‍लॉक झाला होत्‍या. त्‍यावेळेस अर्जदाराचा अपघात होवून 48 तासापेक्षाही जास्‍त वेळ झाला होता. अशा परिस्थितीत जेव्‍हा की अर्जदाराचा पाय पूर्णपणे निकामी झाला होता.
 
31.   गैरअर्जदार क्रं 1 यांनी , गैरअर्जदार क्रं 2  यांचे कडे रुग्‍ण (त.क.) पाठविताना स्‍वतः जाऊन भेट देणे गरजेचे होते, निदान, दुरध्‍वनीद्वारे गैरअर्जदार क्रं 2 ला  रुग्‍णाची स्थिती  काय  आहे व त्‍यावर किती तातडीने


 ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे, हे प्रथम सांगणे गरजेचे होते, तेही गैरअर्जदार क्रं 1 ने कलेले नाही, त्‍यामुळे गैरअर्जदार क्रं 2 कडे, तक्रारकर्त्‍यावर सायंकाळी-5.00 वाजता त.क. तेथे पोहचला असतानाही, रात्री 10.00 नंतर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली, ज्‍या पासून त.क.ला कोणताही फायदा होण्‍याची शक्‍यता अत्‍यंत अत्‍यल्‍प होती व या सर्व स्थितीसाठी एकमेव जबाबदारी ही गैरअर्जदार क्रं 1 यांचेवर येते व त्‍यांचा त.क.चे वैद्यकीय उपचारातील निष्‍काळजीपणा त्‍यामुळे सिध्‍द होते.
32.   गैरअर्जदार क्रं 1 यांनी,  त.क.चे पायावर वैद्यकीय उपचार करताना कोणता निष्‍काळजीपणा  केला हे यावरुन दिसून येते की-
 
"जे वैद्यकीय उपचार त.क.वर गै.अ.क्रं 1 ने वैद्यकीय
शास्‍त्रा प्रमाणे करावयास हवे ते केले नाही,
      परिणामी तक्रारकर्त्‍याचे नुकसान झाले".
 
33.    गैरअर्जदार क्रं 1 यांनी  त.क.चे पायाचे रक्‍तवाहक नलीका संबधी व तिचे स्थिती संबधी सर्व प्रथम शोध घेणे गरजेचे होते कारण या मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या पायाची दुखापत ही segmental & intra articular  fracture of lower end of right femur+ fracture right patella  अशी होती, ज्‍यातून स्‍पष्‍ट अर्थ रक्‍तवाहिन्‍यानां दुखापत झाली असण्‍याची तिव्र शक्‍यता  प्रामुख्‍याने ध्‍वनीत होते. अशी स्थिती असताना गैरअर्जदार क्रमांक 1 ने                      दिनांक 21.03.2009 चे सकाळ पर्यंत त.क.चे उपचारा बाबत या संबधाने
 
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
काहीही केलेले नव्‍हते आणि त्‍यानंतरची स्थिती गैरअर्जदार क्रं 3 ने आपल्‍या अहवालात नमुद केलेली आहे, ती खालील प्रमाणे उदधृत करण्‍यात येते-
 
"OPINION: F/S/O POSSIBILITY OF ACUTE
THROMBUS IN POPLITEAL WITH NO FLOW
 IN ATA AND FEEBLE FLOW IN PTA IN RIGHT
 LOWER LIMB".
 
34.   गैरअर्जदार क्रं 3 चा सदरचे अहवालावर चुकीने दि.20.03.2008 ही तारीख दर्शविलेली आहे, ती दि.21.03.2009 अशी आहे.
 
35.   थोडक्‍यात तक्रारकर्त्‍याच्‍या पायाची स्थिती, तो, गैरअर्जदार क्रं 1 यांचे दवाखान्‍यात असताना पूर्णतः खराब होऊन गेलेली होती व त्‍यानंतरचे त.क.वर झालेले वैद्यकीय उपचार हे जवळपास निरर्थक झालेले होते.
 
36. गैरअर्जदार क्रं 1 यांनी आपले बचावाचे प्रित्‍यर्थ्‍य पुरावा म्‍हणून              डॉ. आशिष विनोद चौबे यांचा प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल केला. सदर प्रतिज्ञालेखाचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, त्‍यांनी स्‍थापित शास्‍त्रीय पध्‍दतीचे विवेचन आपले प्रतिज्ञालेखात कोठेही केलेले नाही व तक्रारकर्त्‍याचा पाय वाचविण्‍याचे दृष्‍टीने गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी काय वैद्यकीय उपचार त.क.चे पायावर केले ? याचा उल्‍लेख प्रतिज्ञालेखात केलेला नाही, इतकेच नव्‍हे तर पायाचे नुकसान का झाले? या संबधीची कोणतीही माहिती व अभिप्राय आपले प्रतिज्ञालेखात नमुद केलेला नाही, यावरुन, एक बाब स्‍पष्‍ट


ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
होते की, सदरचा प्रतिज्ञालेख हा गैरअर्जदार क्रं 1 ला मदत करण्‍याचे दृष्‍टीने, एका अन्‍य वैद्यकीय व्‍यवसायिकाने तयार करुन दिलेला आहे व त्‍यास कोणतेही महत्‍व देता येत नाही.
 
37.   गैरअर्जदार क्रं 1 यांनी आपली भिस्‍त मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेला निकाल, जो-2010 (1) CPR-167 (S.C.) तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाने दिलेला निकाल, जो-I (2010) CPJ-62 (N.C.) या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे, या दोन निकालांवर ठेवली. आम्‍ही दोन्‍ही निकालांचे काळजीपूर्वक अवलोकनकेले असता ते वस्‍तुस्थितीचे संदर्भात या प्रकरणामध्‍ये लागू होत नाही,असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.
38.   यातील तक्रारकर्त्‍याने जी मागणी केलेली आहे, त्‍या संबधाने, दस्‍तऐवज क्रं-4 प्रमाणे त.क.ने गैरअर्जदार क्रं 1 यांचेकडे वैद्यकीय उपचारार्थ रुपये-20,000/- जमा केले असल्‍याचे दिसते. तसेच दस्‍तऐवज क्रं 6 प्रमाणे रुपये-41,000/- दिल्‍याचे दिसून येते. दस्‍तऐवज क्रं 7 प्रमाणे ऑरेन्‍ज सिटी हॉस्पिटल मध्‍ये रुपये-7000/- जमा केल्‍याचे दिसून येते. तर दस्‍तऐवज           क्रं 8 प्रमाणे रुपये-70,000/- अग्रीम अदा केल्‍याचे आणि त्‍यानंतर            रुपये-31,949/- दिल्‍याचे दिसून येते. तसेच रुपये-1,41,000/- कुत्रीम पाय विकत घेण्‍यासाठी खर्च केल्‍याचे दिसून येते . या व्‍यतिरिक्‍त पॅथालॉजी रिपोर्ट, एक्‍स-रे रिपोर्ट व इतर आनुषंगीक खर्च हा सामान्‍यतः                   रुपये-1,00,000/-  पर्यंत  अपेक्षीत आहे आणि वैद्यकीय उपचाराची ही सर्व


 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
रक्‍कम रुपये-4,10,949/- गैरअर्जदार क्रं 1 यांचे कडून मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे.  
 
39.    त.क.ने आपला पाय गमाविल्‍या बद्यल झालेल्‍या मानसिक, शारीरीक त्रासा बद्यल व आर्थिक नुकसानीपोटी रुपये-10,000,00/- एवढी मागणी केलेली आहे. आमच्‍या मते, त.क. झालेल्‍या मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसानी बाबत गैरअर्जदार क्रं-1 कडून रुपये-4,00,000/- एवढी नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे. अशाप्रकारे त.क. हा गैरअर्जदार क्रं -1 यांचे कडून एकूण रुपये-8,10,949/- एवढी नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे.
 
40.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही, प्रस्‍तुत प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
 
              :: आदेश ::
(1)        तक्रारकर्त्‍याची तक्रार, गैरअर्जदार क्रं-1 विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात
           येते.
(2)        सदर निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत,
           गै.अ.क्रं 1 यांनी, तक्रारकर्त्‍यास, त्‍यास वैद्यकीय उपचारार्थ आलेल्‍या
           खर्चा बद्यल तसेच झालेल्‍या मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसानी
           संबधाने एकूण  नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-8,10,949/-
           (अक्षरी रुपये आठ लक्ष दहा हजार नऊशे एकोण पन्‍नास फक्‍त) एवढी
           रक्‍कम. तक्रार दाखल दिनांक-28.02.2011 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य
           अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्‍याजासह द्यावी. विहित मुदतीत
 
ग्राहक तक्रार क्रमांक 102/2011
 
           त.क.ला नुकसानभरपाईची रक्‍कम न दिल्‍यास, सदर रक्‍कम
           द.सा.द.शे.12% दराने दंडनीय व्‍याजासह देण्‍यास गै.अ.क्रं 1 जबाबदार
           राहतील.
(3)        सदर निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत,
           गै.अ.क्रं 1 यांनी, तक्रारकर्त्‍यास,  नुकसानीची रक्‍कम व तक्रारीचे खर्चा
           बद्यल रुपये-2000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) एवढी रक्‍कम
           द्यावी.
(4)       इतर गैरअर्जदारांना प्रस्‍तुत प्रकरणातून मुक्‍त करण्‍यात येते.
(5)        निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्‍या द्याव्‍यात.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.