Maharashtra

Nagpur

CC/10/613

Mamta Sandeep Nigudkar - Complainant(s)

Versus

Dr. Anil Modak - Opp.Party(s)

Adv. A.V.Khare

07 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/613
 
1. Mamta Sandeep Nigudkar
104, Anant Apartment, RPTS Road, Laxminagar, Nagpur 440022
Nagpur
Maharashtra
2. Palash Sandeep Nigudkar
104, Anant Aprtment, RPTS Road, Laxminagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Ayushi Sandeep Nigudkar
104, Anant Apartment, Laxminagar, Nagpur
Napgur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Dr. Anil Modak
K-7, West High Court Road, Near Suyog Mangal Karyalaya Laxminagar, Nagpur 440022
Nagpur
Maharashtra
2. Bhartiya Ayurvidyan Parishad
Packet-14, Sector-8 Dwarka, New Delhi 110077
New Delhi 110077
3. Maharashtra Ayurvidyan Parishad
189-A, Anand Complex, 2nd floor, Sane Guruji Road, Aurther Naka, Chinchpokali (West), Mumbai
Mumbai 400011
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MRS. Jayashree Yende PRESIDING MEMBER
 
PRESENT:
Adv. S.S.Ganvir
......for the Complainant
 Adv.B.G.Kulkarni, Advocate for the Opp. Party 0
ORDER

 

 (आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना.राणे, मा.अध्‍यक्ष)
-///   आ दे श   ///- 
(पारीत दिनांक  30 सप्‍टेंबर, 2011)
   तक्रारकर्त्‍यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
         यातील तक्रारकर्त्‍यांची गैरअर्जदार यांचेविरुध्‍द थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, मयत संदीप निगुडकर यांचे ते वारस आहेत. मयतास छातीत दुखणे व जळजळल्‍यासारखे वाटल्‍यामुळे दिनांक 19/5/2009 ला त्‍यांचे शेजारी श्री. दिघे यांचेसह गैरअर्जदार डॉक्‍टरकडे गेले. तेथे त्‍यांचा ईसीजी रिपोर्ट घेण्‍यात आला व त्‍यात Poor-R-VI-V3 असा निष्‍कर्ष निघाला. गैरअर्जदार डॉक्‍टर यांनी त्‍यांचेजवळून शुल्‍क घेतले आणि दुपारी 12.14 वाजता त्‍यांना सल्‍ला दिला की, त्‍यांनी Blood Sugar FLipid Profiel F या वैद्यकिय चाचण्‍या करुन घ्‍याव्‍यात व दुस-या दिवशी रिपोर्ट दाखवावा. तसेच त्‍यांना काही औषधे देण्‍यात आली आणि ते श्री दिघे यांचेसोबत परत आले. घरी परतल्‍यानंतर थोड्याच वेळात त्‍यांचा त्रास वाढला म्‍हणुन त्‍यांना गैरअर्जदार डॉक्‍टरकडे पुन्‍हा नेण्‍यात आले, मात्र तेव्‍हा डॉक्‍टर त्‍यांचे दवाखान्‍यात हजर नसल्‍यामुळे तक्रारकर्तीचे पतीला ताबडतोब डॉ.बिसने (हृदयरोग तज्ञ) यांचे दवाखान्‍यात नेले आणि दुपारी 1.15 वाजता ते मरण पावले. डॉ. बिसने यांचे बोलण्‍यावरुन मयताला इस्‍पीतळात त्‍वरीत दाखल करणे गरजेचे होते असे आढळून आले. मात्र गैरअर्जदार डॉक्‍टर यांनी तसे केले नाही आणि तसा सल्‍लाही दिला नाही व आपले सेवेत त्रुटी ठेवली. त्‍याबाबतची तक्रार त्‍यांनी भारतीय आयुर्विज्ञान परीषद (Medical Council of India) यांचेकडे केली.
         श्री. निगुडकर हे सन्‍नी पोलीमर्स येथे नोकरीस होते व त्‍यांचे रुपये 18,000/- एवढे मासिक वेतन होते. तक्रारकर्त्‍यांना दुसरे उत्‍पन्‍नाचे साधन नाही. श्री. निगुडकर हे किमान 15 वर्षे तरी निरोगी जिवन जगू शकले असते व त्‍यांचे मुलांना वडीलाचे प्रेम मिळाले असते. यासंदर्भात तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार डॉक्‍टर यांचेशी संपर्क साधुन नुकसान भरपाईची मागणी केली आणि नोटीसही दिली, मात्र त्‍याचा उपयोग झाला नाही. म्‍हणुन शेवटी तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन, तीद्वारे तक्रारकर्तीचे मुलांना वडीलाचे प्रेमापासून वंचित रहावे लागल्‍यामुळे रुपये 5 लक्ष एवढी नुकसान भरपाई द्यावी, तिचे पतीच्‍या वेतनाची रक्‍कम दरमहा रुपये 18,000/- याप्रमाणे पंधरा वर्षांचे रुपये 33,84,000/- मिळाले असते, मात्र मंचाचे अधिकारक्षेत्राचे दृष्‍टीने एकुण रुपये 20 लक्ष एवढी नुकसान भरपाईची मागणी केली, तसेच गैरअर्जदार यांच्‍या चूकीच्‍या निर्णयामुळे त्‍यांना झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 1 लक्ष एवढी रक्‍कम मिळावी, अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
         सदर तक्रार नोंदविल्‍यानंतर तज्ञांचे अहवालासाठी यातील दस्‍तऐवज पाठविले व त्‍यांनी तसा अहवाल दिलेला आहे. त्‍यात त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, त्‍यांनी गैरअर्जदार यांना बोलावून त्‍यांचेकडून माहिती घेतली आणि गैरअर्जदाराने रुग्‍णास भरती करा असे सांगीतले त्‍यांचा दोष नाही असे अहवालात नमूद करुन, अहवाल मंचास पाठविला. अशी माहिती गैरअर्जदाराकडुन घेणे हे तज्ञ समितीचे काम नव्‍हते त्‍यामुळे तो अहवाल विचारात घेण्‍यात आलेला नाही. 
       पुढे गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली व त्‍यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केला. त्‍यांनी तक्रारकर्तीने त्‍यांचेविरुध्‍द केलेली सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, कुठल्‍याही तज्ञ व्‍यक्‍तींचा अहवाल त्‍यांना दोषी ठरविणारा नाही. त्‍यामुळे त्‍यांनी सेवेत त्रुटी ठेवली असा निष्‍कर्ष काढता येत नाही. त्‍यांचे पुढे असेही म्‍हणणे आहे की, त्‍यांनी एमबीबीएस व एमडी या दोन्‍ही पदव्‍या प्राप्‍त केलेल्‍या आहेत. ते फिजीशियन व कॉर्डियॉलॉजिस्‍ट म्‍हणुन गेली 30 वर्षे वैद्यकिय व्‍यवसायात काम करीत आहेत व कर्तव्‍यनिष्‍ठ डॉक्‍टर म्‍हणुन त्‍यांचा लौकिक आहे. सदर रुग्‍ण स्‍वतः त्‍यांचे दवाखान्‍यात चालत आला व त्‍यांचे छातीत जळजळ होत होती, त्‍यावरुन ताबडतोब त्‍यांचा ईसीजी काढण्‍यात आला, त्‍यामध्‍ये लीड व्‍ही—1 व व्‍ही—3 मध्‍ये ‘आर’ व्‍हेव कमजोर असल्‍याचे दिसले. त्‍यामुळे त्‍यांनी रुग्‍णास ताबडतोब स्‍पष्‍ट केले की “ ईसीजी मध्‍ये बदल असल्‍यामुळे त्‍यांना दवाखान्‍यात भरती होणे आवश्‍यक आहे. त्‍यांनी असेही स्‍पष्‍ट केले की, वोकहार्ट हॉस्‍पीटल वा अन्‍य कोणत्‍याही हृदयरोगाशी संबंधित दवाखान्‍यात भरती होणे आवश्‍यक आहे .”   रुग्‍णास उच्‍च रक्‍तदाबाचा त्रास बरेच दिवसांपासून होता व त्‍यासाठी ते ‘अमलोडेपिन’ हे औषध घेत होते. त्‍यामुळे वाढलेला रक्‍तदाब (160/100) ही प्रकर्षाने संयुक्तिक बाब नव्‍हती. तपासणीमध्‍ये असे आढळून आले की, दिवसभराच्‍या सर्व क्रिया त्‍यांनी व्‍यवस्थित पार पाडलेल्‍या होत्‍या व त्‍यांचे नातेवाईकाचे लग्‍न असल्‍याने गेली दोन दिवस ते त्‍यात गर्क होते. सकृतदर्शनी ते अकार्यक्षम, अस्‍थीर किंवा गंभीर नव्‍हते. रुग्‍णाने दवाखान्‍यात भरती होण्‍याचा निर्णय घेण्‍यापूर्वी दुसरे डॉक्‍टरांचे मत घ्‍यावयाचे आहे असे सांगीतले. त्‍यामुळे त्‍यांना काही वैद्यकिय चाचण्‍या सूचविल्‍या व औषधे दिली आणि सक्‍त सूचना दिली की, निर्णय त्‍वरीत घ्‍या व दवाखान्‍यात जा,. रुग्‍ण स्‍वतःहून चालत बाहेर पडले. त्‍यांनी पुढे असेही नमूद केले की, ईसीजीमध्‍ये बदल होता तरी त्‍यांची स्थिती गंभीर नव्‍हती व तसे ते सक्षम होते. यामध्‍ये त्‍यांनी कोणताही सेवेत त्रुटी ठेवली नाही. रुग्‍णाने दवाखान्‍यात भरती होण्‍याचा निर्णय त्‍वरील घेतला नाही आणि त्‍यांचे सल्‍याचा अनादर केला आणि म्‍हणुन त्‍यांचे पुढे आलेल्‍या हृदयविकाराच्‍या झटक्‍यास व त्‍यांचे मृत्‍यूस गैरअर्जदारास जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्त्‍यांनी महाराष्‍ट्र आयुर्विज्ञान परीषद यांचेकडे केलेली तक्रार तथ्‍यहिन आहे व त्‍यातील झालेला निर्णय चूकीचा आहे. यासंबंधी त्‍यांनी मा. उच्‍च न्‍यायालयात रिट दाखल केली व हे प्रकरण न्‍यायप्रविष्‍ट आहे. त्‍यामुळे या तक्रारीमध्‍ये कोणताही निर्णय घेणे ग्राहक मंचाला संयुक्तिक नाही. थोडक्‍यात तक्रारकर्त्‍यांची तक्रार ही अत्‍यंत चूकीची व काल्‍पनिक आरोपांवर आधारलेली असून, तथ्‍यहिन आहे म्‍हणुन ती खारीज होण्‍यास पात्र आहे असा उजर घेतला.
             तक्रारकर्त्‍यांनी आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, सोबत रुग्‍णाचा ईसीजी रिपोर्ट, उपचारासंबंधितची कागदपत्रे, मृत्‍यू प्रमाणपत्र, वैद्यकिय अहवाल, भारतीय आयुर्विज्ञान परीषदेकडे केलेला पत्रव्‍यवहार व त्‍यांनी दिलेले अहवाल, घोषणापत्र, डॉ.अनिल मोडक यांचे पत्र, स्‍मरणपत्रे इत्‍यादी दस्‍तऐवज, तसेच पुराव्‍याचे दृष्‍टीने वेगळा प्रतिज्ञालेख, इंकम टॅक्‍स फॉर्म नं.16, इतर प्रतिज्ञापत्रे व वरीष्‍ठ न्‍यायालयांचे निकाल इत्‍यादी दस्‍तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांनी दस्‍तऐवजाचे यादीसह उच्‍च न्‍यायालयात दाखल केलेले अपील, महाराष्‍ट्र आयुर्विज्ञान परीषदेचा आदेश, इतर वैद्यकिय उपचाराचे कागदपत्र आणि वरीष्‍ट न्‍यायालयांचे निर्वाळे इत्‍यादी दस्‍तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत.
          सदर प्रकरणात दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद मंचाने ऐकला.
          यातील मूख्‍य विचारार्थ मुद्दा खालीलप्रमाणे आहे.
(1)  गैरअर्जदार डॉक्‍टरांचे निष्‍काळजीपणामुळे व सेवेतील त्रुटीमुळे श्री. निगुडकर यांचा  मृत्‍यू झाला आहे काय ? व त्‍यासाठी गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ?          
        सदर प्रकरणात मान्‍य बाब अशी आहे की, मृतक निगुडकर हे दुपारी 12.14 वाजता गैरअर्जदार यांचे दवाखान्‍यात गेले. त्‍यांचा ईसीजी हा सामान्‍य नव्‍हता त्‍यामध्‍ये आर व्‍ही—1 व व्‍ही—3 मध्‍ये ‘आर’ व्‍हेवमध्‍ये कमजोर आढळून आला. त्‍यांचा रक्‍तदाब जरी ते त्‍यासंबंधिचे औषध नियमित घेत होते, तरीही 160/100 असा आढळून आला.
         वरील वस्‍तूस्थितीवरुन व त्‍यांनी ठरविलेल्‍या निष्‍कर्षावरुन गैरअर्जदार यांना त्‍यांचे प्रकृतीची स्थिती अशी लक्षात आली की, त्‍यांनी त्‍वरीत रुग्‍णास रुग्‍णालयात भरती होऊन उपचार घेणे गरजेचे आहे व त्‍यासाठी त्‍यांनी वोकहार्ट या प्रसिध्‍द रुग्‍णालयात वा अन्‍य हृदयरोगाशी संबंधित रुग्‍णालयात त्‍वरीत भरती व्‍हावे असा सल्‍ला गैरअर्जदार यांनी मृतकाला दिला असे गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे, मात्र ह्या बाबी तक्रारकर्त्‍यांना मान्‍य नाही.
         ज्‍याअर्थी, गैरअर्जदार यांनी वरील बचाव या पकरणात घेतलेला आहे, त्‍यासंबंधी एक बाब स्‍पष्‍ट आहे की, संबंधित रुग्‍णाला दवाखान्‍यात भरती करुन हृदयरोगासंबंधिचे उपचार सुरु करणे गरजेचे होते व अगत्‍याचे आहे, त्‍यामध्‍ये विलंब होता कामा नये, यात तक्रारदाराने विलंब केला असून परीणामी त्‍यांना गंभीर हृदयविकाराचा धक्‍का आला आणि त्‍यात ते मरण पावले. गैरअर्जदार यांचेसारख्‍या अनुभवी डॉक्‍टरानी वरील अभिमत दिले की, मृतकास त्‍वरीत उपचाराची गरज होती, ते विचारात घेणे आमचे मते अत्‍यंत गरजेचे आहे.
         गैरअर्जदार यांनी वरील प्रकारचा सल्‍ला दिला, मात्र मृतकाने त्‍यांना दुस-या डॉक्‍टरांचे अभिमत घ्‍यावयाचे आहे असे सांगून त्‍यांचा सल्‍ला मानलेला नाही व ते घरी निघुन गेले. हे गैरअर्जदार यांचे विधान बरोबर आहे काय ? हा महत्‍वाचा प्रश्‍न आहे. गैरअर्जदाराचे वरील विधानास त्‍यांचे स्‍वतःचे निवेदनाशिवाय व प्रतिज्ञालेखाशिवाय इतर कोणताही आधार नाही. गैरअर्जदाराने मयत निगुडकर यांना त्‍यांचे तपासणीचे वेळेस जो सल्‍ला दिला व त्‍यांची तपासणी केली यासंबंधिचा दस्‍तऐवज रेकॉर्डवर दाखल आहे. या दस्‍तऐवजात गैरअर्जदाराने जो सल्‍ला संबंधित रुग्‍णास दिलेला आहे, त्‍यात Blood Sugar F आणि Lipid Profiel F या दोन चाचण्‍यांचे व्‍यतिरिक्‍त कोणताही जास्‍तीचा सल्‍ला दिलेला नाही. संबंधित रुग्‍णास दवाखान्‍यात भरती व्‍हा असा सल्‍ला दिल्‍याचे त्‍यातुन मुळीच दिसून येत नाही. त्‍यासाठी केलेली नोंद यात नाही. त्‍यात दिलेल्‍या औषधांवरुन असे स्‍पष्‍ट होते की, त्‍यांना बहुदा सदर रुग्‍णाचे प्रकरण हे गंभीर वाटले नसावे. यातील एक औषध आम्‍लता दूर करणारे आहे व इतर दोन्‍ही औषधे ही उच्‍च रक्‍तदाबाशी संबंधित आहेत. रुग्‍णाला भरती होण्‍याचा सल्‍ला दिला असता व वेळीच भरती करुन घेतले असते तर रुग्‍णाचे प्राण वाचविता आले असते ही बाब स्‍पष्‍ट आहे.
         मृतकास गैरअर्जदाराने त्‍वरीत भरती होण्‍याचा सल्‍ला दिला होता काय ? यासंबंधी एक महत्‍वाचा पुरावा या प्रकरणात समोर आलेला आहे तो म्‍हणजे मृतक यांना तक्रारकर्त्‍यांचे शेजारी श्री. दिघे यांनी गैरअर्जदाराचे दवाखान्‍यात नेले होते ही बाब गैरअर्जदाराने नाकारलेली नाही. श्री. दिघे यांचा प्रतिज्ञालेख तक्रारदाराने या प्रकरणात दाखल केलेला आहे. ते सेवानिवृत्‍त व्‍यक्‍ती असून त्‍यांनी आपल्‍या प्रतिज्ञालेखाद्वारे असे स्‍पष्‍ट केले आहे की, “त्‍यांनी मृतकास गैरअर्जदाराचे दवाखान्‍यात नेले. गैरअर्जदाराने त्‍यांना विचारपूस केली व सल्‍ला दिला त्‍यावेळेस ते स्‍वतः उपस्थित होते. मयत निगुडकरांनी गैरअर्जदारास त्‍यांचे छातीत दुखत आहे व जळजळल्‍यासारखे वाटत असल्‍याचे सांगीतले. त्‍यांचा ईसीजी घेण्‍यात आला, त्‍यानंतर त्‍याचे अवलोकन केल्‍यावर गैरअर्जदाराने काही वैद्यकिय चाचण्‍या करुन घेण्‍यास सांगून दुसरे दिवशी त्‍याचा अहवाल घेऊन यावा असे सांगीतले व सात दिवसांचे औषध दिले व कोणत्‍याही प्रकारे कोणत्‍याही दवाखान्‍यात भरती होण्‍याचा सल्‍ला दिला नाही. तसेच मृतकाला कुठल्‍याही दुस-या डॉक्‍टरांचे अभिमत घ्‍यावयाचे आहे असे सांगीतले नाही ” असा एक प्रतिज्ञालेख दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराने या प्रतिज्ञालेखातील मजकूर कोणत्‍याही प्रकारे खोडून काढलेला नाही आणि त्‍यामुळे तो प्रतिज्ञालेख पुरावा म्‍हणुन विचारात घेतल्‍यानंतर गैरअर्जदाराचे वरील दोन्‍ही बचाव चूकीचे व पश्‍चातबुध्दितून घेतलेले आहेत ही बाब अगदी स्‍पष्‍ट होते. मृतकास त्‍याच वेळी त्‍वरीत भरती करुन घेण्‍यात आले असते,  व कदाचित त्‍यास वेळीच उपचार मिळाला असता आणि हृदयविकाराचा धक्‍का आला नसता हे म्‍हणण्‍याचा या प्रकरणात भरपूर वाव आहे. यास्‍तव वरील प्रकारे गैरअर्जदाराने यात निष्‍काळजीपणा करुन आपले सेवेत त्रुटी ठेवली यासाठी इतर कोणत्‍याही पुराव्‍याची गरज आहे असे आम्‍हास वाटत नाही. कारण मृतकास तपासल्‍याचा गैरअर्जदाराचा प्राथमिक दस्‍तऐवज हा अतिशय स्‍वंयस्‍पष्‍ट आहे.
       या प्रकरणात तक्रारकर्त्‍यांनी महाराष्‍ट्र आयुर्विज्ञान परीषदेद्वारे दिलेल्‍या निकालाची प्रत दाखल केली आहे. त्‍यावर गैरअर्जदाराचे म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी अपील केले व ते प्रलंबित आहे. म्‍हणुन त्‍याचा आम्‍ही या प्रकरणात विचार करीत नाही आणि वर नमूद केलेल्‍या परीस्थितीत त्‍याचा वेगळा विचार करण्‍याची गरज नाही.
         तक्रारकर्त्‍यांनी मृतकाचे वेतनासंबंधी फॉर्म नं.16 मंचासमक्ष दाखल केला व त्‍याद्वारे त्‍यांचे उत्‍पन्‍न किती होते ही बाब सिध्‍द केलेली आहे. त्‍यांचे एकूण वार्षिक वेतन हे रुपये 2,44,800/- एवढे होते हे त्‍यावरुन दिसून येते. त्‍यांचे वय गैरअर्जदार यांच्‍याच अहवालाप्रमाणे 45 वर्षे एवढे दर्शविलेले आहे. त्‍यांच्‍या आरोग्‍याची स्थिती व इतर बाबी लक्षात घेता, ते किमान पुढील दहा वर्षांकरीता त्‍यांचे कुटूंबाचे पालनपोषण करु शकले असते असा निष्‍कर्ष काढल्‍यास त्‍यात कोणतीही चूक ठरणार नाही. यात आम्‍ही किमान प्रतिमाह रुपये 8,000/- याप्रमाणे ते तक्रारकर्त्‍यांवर खर्च करु शकले असते व तेवढ्या रकमेचे सहाय्य त्‍यांनी तक्रारकर्त्‍यांना दिले असते अशाप्रकारे संपूर्ण कालावधीत तक्रारकर्त्‍याचे कूटुंबाला रुपये 9,60,000/- एवढ्या रक्‍कमेचा लाभ झाला असता, आणि हे कोणत्‍याही प्रकारे चूकीचे ठरणार नाही. तसेच सर्व तक्रारकर्त्‍योंना त्‍यांचेपासून जो आधार व प्रेम मिळाले असते, ज्‍यास ते आता वंचित आहेत. त्‍यासाठी तक्रारकर्ते रुपये 1 लक्ष एवढी नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हास वाटते.
          गैरअर्जदार यांनी आपली भिस्‍त मा. तामीलनाडू राज्‍य ग्राहक आयोग चेन्‍नई यांनी व्‍ही. चंद्रशेखर विरुध्‍द मलार हॉस्‍पीटल लिमी. या प्रकरणात दिलेला निकाल जो I (2001) CPJ 137 याठिकाणी प्रकाशित झालेला आहे, त्‍यावर ठेवली. सदर निकालातील वस्‍तूस्थिती आमचे समोरील प्रकरणात लागू होत नाही. त्‍यामुळे सदर निकाला या प्रकरणी विचारात घेण्‍याचे कोणतेही प्रयोजन नाही.
          मा. सर्वोच्‍च न्‍यालयाने व्‍ही क्रिष्‍ण राव विरुध्‍द निखील सुपर स्‍पेशालिटी हॉस्‍पीटल व इतर यांचेतील प्रकरणात दिलेला निकाल, जो 2010 (6) SRJ 350 (Supreme Court of India)  याठिकाणी प्रकाशित झालेला आहे. या निकालामध्‍ये अशा स्‍वरुपाचे प्रकरणांत तज्ञांचे अभिमताची गरज व अशा प्रकरणांत डॉक्‍टरचे कर्तव्‍य या दोन मुद्यांवर अतिशय स्‍वंयस्‍पष्‍ट निकाल दिलेला आहे, तो आम्‍ही या प्रकरणात विचारात घेत आहोत. त्‍यातील परिच्‍छेद खालीलप्रमाणे उद्घृत करण्‍यात येत आहे.
Expert evidence was not required :- District Forum rightly did not ask the appellant to adduce expert evidence and both State Commission and the National Commission fell into an error by opining to the contrary -- Orders set aside – Respond No.1 is directed to pay the appellant the amount granted in his favour by the District Forum within ten weeks.
Duty of doctor :- One of the duties of the doctor towards his patient is a duty of care in deciding what treatment is to be given and also a duty to take care in the administration of the treatment – A breach of any of those duties may lead to an action for negligence by the patient.
          वरील सर्व वस्‍तूस्थितीचा विचार करता, गैरअर्जदार डॉक्‍टर यांनी त्‍यांचे सेवेत गंभीर स्‍वरुपाची त्रुटी ठेवली आहे असे आमचे मत आहे. यास्‍तव आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-/// अं ती म आ दे श ///-
1.      तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2.      गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यांस रुपये 9,60,000/-एवढी नुकसान भरपाईची रक्‍कम तक्रार दाखल दिनांक 24/4/2010 पासून रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे. 9% दराने व्‍याजासह मिळून येणारी रक्‍कम द्यावी.
3.      गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यांस तक्रारीच्‍या खर्चादाखल रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) एवढी रक्‍कम द्यावी.
4.      गैरअर्जदार यांनी वरील आदेशाचे पालन त्‍यांना आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून एक महिन्‍याचे आत करावे. नपेक्षा उपरोक्‍त रकमेवर द.सा.द.शे. 9% ऐवजी 12%  दराने दंडनिय व्‍याज गैरअर्जदार देणे लागतील.
 
              (नरेश वि. बनसोड)             (विजयसिंह ना. राणे)
                  सदस्‍य                        अध्‍यक्ष
      जि ल्‍हा ग्रा ह क त क्रा र नि वा र ण मं च ना ग पू र
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, नागपूर.
                                   
असहमतीचा आदेश (Dissenting Order)
मा. सदस्‍य श्री. नरेश बनसोड यांचे आदेशांन्‍वये.
 
वरील आदेशाशी असहमत असल्‍यामुळे वेगळा आदेश खालीलप्रमाणे-
      तक्रारकर्ती ही गृहीणी आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीचे शव विच्‍छेदन अहवाल नाही, शासकीय वै्द्यकीय तज्ञ समितीच्‍या अहवालावर तक्रारकर्तीने आक्षेप घेतल्‍यामुळे अहवाल अव्‍हेरल्‍या गेला, तक्रारीसोबत तज्ञ अहवाल नाही. तक्रारकर्तीच्‍या दुस-यांदा केलेल्‍या विनंतीनुसार प्रकरण तज्ञांकडे पाठविल्‍या गेले नाही. तज्ञ अहवालाकरीता गेरअर्जदारांची विनंती नाकारल्‍या गेली, अशा परिस्थितीत योग्‍य न्‍याय निवाडयाकरीता राज्‍य आयोगाचे खालील निकालपत्रात निर्देशीत केल्‍याप्रमाणे संपूर्ण प्रकरणाची कसून तपासणी करणे संयुक्‍तीक आहे असे माझे मत आहे.
MSRDC Mumbai 2003 III CPR 24, Vijay Madhao Kher Vs. Dilip Sitaram Raut.
“If the dispute brought before the consumer fora is amenable to its jurisdiction, then it is obligatory upon fora to probe the same by themselves and resolve it.
 
1.                  तक्रारकर्तीने तक्रारीचे परिच्‍छेद क्र. 1 मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे. ‘तक्रारकर्ती क्र. 1 चे पती मृतक संदीप निरगुडकर ह्यांना गैरअर्जदार क्र. 1 चे इस्‍पीतळात 19.05.2009 ला नेले होते, कारण त्‍यांना छातीमध्‍ये दुखणे व जळजळल्‍या सारखे वाटत होते.’ तक्रारकर्तीने पृष्‍ठ क्र. 19 वर दस्‍तऐवज क्र. 5 मध्‍ये मेडीकल कौंसील ऑफ इंडियाला 18.07.2009 च्‍या पत्रात खालीलप्रमाणे नमूद आहे.
 
“On 19th May 2009, my husband Mr. Sandip Nigudkar, completed his morning abolitions and Pooja as usual. Before leaving for his work at about 10 a.m. he felt discomfort in his abdomen and burning in chest resembling acidity. Therefore, he was taken for consultation to Dr. Vijay Shahane, M B B S, Practicing at Bajaj Nagar, Nagpur 4440010, who on check up advised him heart related check up including ECG.”
 
 
2.                     तक्रारकर्तीने संपूर्ण तक्रारीत डॉ. विजय शहाणे यांचेकडे तपासणीसाठी गेल्‍याची बाब तक्रारीत नमूद केली नाही. तसेच डॉ. शहाणे यांनी हृदयासंबंधी तपासणीबाबत ई.सी.जी. करण्‍याचा सल्‍ला दिल्‍याबाबतची बाबसुध्‍दा मंचासमोरील तक्रारीत नमूद केली नाही. तसेच डॉ. शहाणे यांनी सल्‍ला दिल्‍याबाबतचे पत्र किंवा प्रीस्‍क्रीप्‍शन मंचासमोर नाही. त्‍यामुळे तक्रार दाखल करतेवेळी तक्रारकर्तीने काही बाबी लपवून ठेवलेल्‍या आहेत असे स्‍पष्‍ट दिसते. पृष्‍ठ क्र. 19 वरील पत्रात तक्रारकर्तीने स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की, तिच्‍या पतीच्‍या पोटात अस्‍वस्‍थता वाटत असल्‍याचे, तसेच छातीत एसीडीटीमुळे जळजळल्‍यासारखे वाटत होते असे नमूद आहे. उलटपक्षी, तक्रारीत तक्रारकर्त्‍याने नमूद केले आहे की, तक्रारीचे पतीस छातीत दुखणे व जळजळल्‍यासारखे वाटत होते. त्‍यामुळे तक्रारकर्तीने तक्रार दाखल करतेवेळी संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेऊन हेतूपुरस्‍सर छातीमध्‍ये दुखणे, ‘ही बाब तक्रारीत दाखल केली’, यावरुन तक्रारकर्तीचे कथन हे एकमेकांशी विरोधाभासी आहे व तक्रारकर्तीने आवश्‍यकतेनुसार व सोयीनुसार स्‍वतःच्‍या म्‍हणण्‍यात सोयीस्‍कर सुधारणा करुन घेतलेल्‍या आहेत. त्‍यामुळे तक्रारकर्ती मंचासमोर स्‍वच्‍छ हाताने आलेली नाही असे स्‍पष्‍ट होते.
 
2(ए).              अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 15 वरील गैरअर्जदारांच्‍या पत्रात खालीलप्रमाणे स्‍पष्‍टपणे नमूद आहे.
 
c/o (Complaint of) Intermittant burning in chest not related to exersion. No past history of  Diabetise, Mellitus, Ischaemic Heart Disease (IHD) taking Amlodephin 5 mg OD.
 
गैरअर्जदाराचे वरील पत्रात, मृतकाने सांगितल्‍यानुसार सर्व तक्रारी वि.प.ने नमूद केलेल्‍या आहेत.  गैरअर्जदाराने त्‍याच्‍या नोंदीत Discomfort in abdomen किंवा छातीमध्‍ये दुखणे ही बाब गैरअर्जदाराच्‍या पत्रात नमूद नाही व गैरअर्जदाराने पत्रात योग्‍य बाबीची नोंद घेतली नाही असासुध्‍दा तक्रारकर्तीने आक्षेप घेतलक् नाही. त्‍यामुळे हे सिध्‍द झाले की, गैरअर्जदाराने त्‍याच्‍या पत्रात नोंद केलेली बाब ही योग्‍य असून तक्रारकर्तीच्‍या पतीने विषद केलेल्‍या वस्‍तूस्थितीनुसार आहे असे माझे स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहेत व तक्रारकर्तीने तक्रारीत सोईस्‍कर व्‍हावे म्‍हणून छातीमध्‍ये दुखणे हे तक्रारीत नव्‍याने नोंदले व Discomfort in abdomen ही बाब 18.07.2009 चे पत्रात (एम.एम.सी.चे पत्रात दाखल केलेले) दाखल केलेले विरोधाभासी ठरते.
 
3.                  तक्रारकर्तीने पृष्‍ठ क्र. 3 वरील परीच्‍छेद क्र. 4 मध्‍ये नमूद केले आहे की, डॉ. बिसने यांचे बोलण्‍यावरुन तक्रारकर्तीचे लक्षात आले की, तक्रारकर्तीचे पतीला लौकर इस्‍पीतळात दाखल करावयास पाहिजे होते. परंतू गैरअर्जदारांनी चुकीचा सल्‍ला दिल्‍यामुळे तक्रारकर्तीला आपल्‍या पतीला इस्‍पीतळात दाखल करण्‍यास उशिर झाला व योग्‍य उपचार केले नाही. गैरअर्जदाराचे पृष्‍ठ क्र. 15 मधील पत्रात, खालीलप्रमाणे नमूद केले आहे.
3.
4.                 c/o (Complaint of) Intermittant burning in chest not related to exersion. No past history of  Diabetise, Mellitus, Ischaemic Heart Disease (IHD) taking Amlodephin 5 mg OD.
 
 
O/E A febrile,       (On examination a febrile)
P. 104                    (Pulse 104)
JVP--                     (Jugular Veneous Pressure)--
No edema feet      (No edema feet)
CVS                      (Cardio Vascular System)      |        {No abnormality detected}
RS ……                (Respiratory System)             |                     -”-
Abd                       (Abdomen)                            |                      -”-
 
 
160/100
ECG
Poor r V1 -V3
 
Ad                         (advice)
Bl. Sugar f             (Blood sugar fasting)
   Lipid profile f       (lipid profile fasting)           Rx MET XL 50 mg 1 daily
                                                                                   Amlodac 5 mg OD (Amlodephin)
                                                                                   Tablet Pantocid 40 mg ODX7
 
तक्रारकर्तीने तक्रारीत मृतकाचा सकाळचा घटनाक्रम, तसेच त्‍यास कार्यालयामध्‍ये जाण्‍या आधी सकाळी 10.00 वाजता Discomfort in abdomen and burning in chest resembling acidity असे नमूद आहे.  नंतर डॉ. विजय शहाणे पासून गैरअर्जदाराकडे जाईपर्यंत सकाळी 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत तक्रारकर्तीने रुग्‍णाने काय केले किंवा त्‍या अवधीत तक्रारकर्तीने रुग्‍णाने काही घरगुती औषधोपचार केला काय किंवा नाही याबाबत वस्‍तूस्थिती स्‍पष्‍ट केली नाही. 18.07.2009 चे पत्रात (एम.एम.सी.) तक्रारकर्तीने म्‍हटले आहे की, Therefore, he was taken for consultation to Dr. Vijay Shahane, M B B S, Practicing at Bajaj Nagar, Nagpur. तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र. 1 मध्‍ये तक्रारकर्तीचे पती मृतक संदीप निगुडकर यांनी गैरअर्जदार क्र. 1 चे इस्‍पीतळात उपचाराकरीता 19.05.2009 ला नेले होते, असे दिसते. तक्रारकर्ती स्‍वतः डॉ. शहाणे यांचेकडे घेऊन गेली होती काय किंवा तिचे मृतक पती स्‍वतः डॉ. शहाणेकडे गेले होते काय ही बाब तक्रारकर्तीने संपूर्ण तक्रारीत स्‍पष्‍ट केली नाही. तसेच तक्रारकर्तीचे पती डॉ. शहाणे यांचेकडे एकटेच गेले होते काय किंवा त्‍यांचेसोबत दुसरी कोणती व्‍यक्‍ती गेली होती काय हेसुध्‍दा तक्रारकर्तीने स्‍पष्‍ट केले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने संपूर्ण विचाराअंती तक्रारीत काही बाबींची नोंद केली नाही व काही बाबींची नोंदणी करणे हेतूपुरस्‍सर टाळलेले आहे, काही बाबी हेतूपुरस्‍सर नमूद केल्‍या आहेत. यावरुन तक्रार दाखल करतेवेळी तक्रारकर्ती मंचासमोर स्‍वच्‍छ हाताने आलेली नाही असे माझे स्‍पष्‍ट मत आहे.
4.                युक्‍तीवादाचे वेळेस सातत्‍याने तक्रारकर्तीच्‍या वकिलास विचारले की, रुग्‍णास गैरअर्जदाराचे हॉस्पिटलमध्‍ये कुठल्‍या वाहनाने आणण्‍यात आले होते, त्‍यावर वकिलांनी सांगितले की, मृतकास ऑटोरीक्‍शाने आणले होते, म्‍हणजे मृतक हा घरुन निघाल्‍यानंतर डॉ. शहाणे यांचे हॉस्‍पीटमध्‍ये ऑटोरीक्‍शाने गेले व तेथून नंतर गैरअर्जदाराचे हॉस्पिटलमध्‍ये ऑटोरीक्‍शाने आले होते आणि त्‍यानंतर घरीसुध्‍दा ऑटो रीक्‍शाने गेले असावे असे दिसते. गैरअर्जदाराने लेखी उत्‍तरात म्‍हटले की, मृतक हा त्‍यांच्‍या रुग्‍णालयात पायी चालत आला होता, तपासणीनंतर रुग्‍णालयातून पायी चालतच गेला होता. त्‍यामुळे मृतकाने प्रवास करुनसुध्‍दा गैरअर्जदाराकडे तपासणीचेवेळेस रुग्‍णाची स्थिती ही स्थिर होती या गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यास पुष्‍टी मिळते.
 
5.                पृष्‍ठ क्र.19 वरील पत्रात (एम.एम.सी.) तक्रारकर्तीने नमूद केले आहे की, “It is pertinent to note that on examining the ECG report, Dr. Bisne expressed surprise over the course of action/advice adopted by Dr. Modak. I have therefore a strong reason to believe that Dr. Modak did not deal with my husband properly and gave wrong advice resulting into his unfortunate demise.”
 
 
पृष्‍ठ क्र. 101 वर नि.क्र. 30 वर डॉ. विकास बिसने यांचे शपथपत्र आहे. त्‍यामधील परीच्‍छेद क्र. 2 ते 6 खालीलप्रमाणे आहे.
2.         That it is true that the deceased Mr. Sandip Nirgudkar was brought to my hospital on 19.05.2009. It was a case of severe heart attack (cardiac arrest).
3.         That it is true that he expired in my hospital on 19.05.2009 due to cardiac arrest, eventhough all efforts were made to save his life.
4.         It has been incorrectly alleged that after examining the ECG report on 19.05.2009, I had expressed surprise over the course of action/advise adopted by the non-applicant (Dr. Anil Modak) in the course of treatment to Mr. Sandip Nirgudkar.
5.         That I had not expressed any opinion about the course of treatment and advise given by Dr. Modak to anybody. I was fully attending the patient in view of the fact that he had suffered from cardiac arrest.
6.         The statements made in the complaint about the surprise expressed by me against Dr. Modak are completely incorrect and totally false. Despite the fact that I had not made any statement against Dr. Modak, my name has been unnecessarily involved in the complaint probable to get support to the baseless claims made in the complaint.
 
तक्रारकर्तीने तिचे तक्रारीत वर नमूद केलेले डॉ. बिसने यांचे रुग्‍णाबाबतचे डॉ. मोडकसंबंधीचे कथन पूर्णतः चुकीचे व खोडसाळ स्‍वरुपाचे ठरते असे माझे स्‍पष्‍ट मत आहे, कारण की, डॉ. बिसने यांचे शपथपत्रावरुन हृदय विकाराच्‍या झटक्‍यातून तक्रारकर्तीच्‍या पतीचा जीव वा‍चविण्‍याचा आटोकाट प्रयत्‍न केला होता. तसेच डॉ. बिसने यांनी इ.सी.जी. संबंधी कुठलेही भाष्‍य केलेले नव्‍हते.  तसेच डॉ. मोडक यांचे उपचार आणि सल्‍याबाबत कुठलेही मत प्रदर्शित केले नाही. त्‍याप्रमाणे डॉ. बिसने म्‍हणाले की, तक्रारकर्तीने स्‍वतःच्‍या तथाकथीत कथनामध्‍ये तक्रारीत डॉ. बिसने यांची मदत मिळेल या गैरहेतूने त्‍यांचे नाव अंतर्भूत केले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीचे उपरोक्‍त कथन पूर्णतः चुकीचे व खोडसाळ स्‍वरुपाचे ठरते असे माझे स्‍पष्‍ट मत आहे व तक्रारकर्तीने अज्ञानापोटी व गैरसमजापोटी गैरअर्जदाराबाबत चुकीचे कथन केलेले आहे हे सिध्‍द होते.  तक्रारकर्तीने व त्‍यांचे तथाकथीत शेजारी श्री दीघे यांनी, डॉ. बिसने यांचे शपथपत्राबाबत प्रतिउत्‍तरात/युक्‍तीवादात काही म्‍हणणे मांडले नाही, त्यामुळे डॉ. बिसने यांचे शपथपत्रातील कथन तक्रारकर्तीस मान्‍य आहे असे माझे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच तक्रारकर्तीने डॉ. शहाणे व डॉ. बिसने यांना या तक्रारीत वादी केले असते तर संपूर्ण तक्रारीत न्‍याय निवाडयासाठी योग्‍य परिस्थिती मंचासमोर आली असती, परंतू डॉ. बिसने व डॉ. शहाणे यांना वादी न केल्‍यामुळे, Non joinder of necessary party या कारणास्‍तव सुध्‍दा तक्रार खारीज केल्‍यास वावगे ठरणार नाही असे माझे मत आहे.  
                 
              
6.                गैरअर्जदारांच्‍या पृष्‍ठ क्र. 15 वरील पत्रावरील नोंदीनुसार मृतकास तापासारखी बाब नव्‍हते, तसेच JVP नॉर्मल रेंजमध्‍ये होती, पायावर सूज नव्‍हती, CVS, RS, Abd बाबत कुठलीही ऍबनॉर्मेलिटी आढळून आली नाही, याबाबतीत तक्रारकर्तीने संपूर्ण तक्रारीत काहीही भाष्‍य केले नाही. संपूर्ण प्रकरणात तक्रारकर्तीचा एकमेव आक्षेप आहे की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा ई.सी.जी. घेतल्‍यानंतर Poor r V1 -V3 नुसार तक्रारकर्तीच्‍या पतीस त्‍वरित इस्‍पीतळात दाखल करुन घेण्‍याचा सल्‍ला देणे आवश्‍यक होते, हे एकमेव कारण गैरअर्जदाराच्‍या सेवेतील त्रुटीबाबत नमूद केले आहे. गैरअर्जदारांनी सुचविल्‍यानुसार उपचारात मृतकास सुरु असलेल्‍या औषधासोबत (Amlodepine 5 mg) MET XL 50 mg one daily, Tablet Pantocid 40 mg OD असे नमूद आहे. त्‍यावरुन गैरअर्जदारांनी मृतकास सुरु असलेल्‍या औषधा व्‍यतिरिक्‍त छातीत जळजळल्‍यासारखे वाटत असल्‍यामुळे ऍसिडीटीचा त्रास व जळजळ इ. कमी होण्‍याकरीता Pantocid औषध दिले होते, ते योग्‍यच होते असे माझे मत आहे. तसेच तिचे पतीस सुरु असलेल्‍या औषधा व्‍यतिरिक्‍त दुसरे दिलेले औषध MET XL 50 mg one daily बाबत तक्रारकर्तीचा कुठलाही आक्षेप नाही किंवा तक्रारकर्तीच्‍या पतीस चुकीचे औषधापचार केलाहोता याबाबत काहीही म्‍हणणे नाही.
 
7.                सदर बाबतीत Taber’s cyclopedic Medical dictionary page 1039 “Jugular Veins” चे सुक्ष्‍म अवलोकन केले असता खालीलप्रमाणे बाबी स्‍पष्‍ट केल्‍या आहेत. गैरअर्जदाराचे नोंदीनुसार JVP ही नॉर्मल रेंजमध्‍ये असल्‍याचे दिसते. 
 
 “Jugular Veins-External receives blood from the exterior of the cranium and the deep parts of the face. It was superfacial to the sternocleidomastoid muscle as it passess down neck to join the subclavian vein. Internal, receives blood from the brain and superfacial parts of face and neck. It is directly continues with the transverse sinus accompanying the internal cartoid as it passes down neck and joins with the subclavian vein to from the innominate vein. The Jugular Venus are more prominent during expiration than during  inspiration and are also prominent during cardiac decompansation.”  
 
त्‍यामुळे हे स्‍पष्‍ट होते की, JVP, pulse, RS. Abdomen मध्‍ये काहीही दोष न आढळल्यामुळे तक्रारकर्तीचे पतीस असलेल्‍या हृदयासंबंधीचा आजार हा त्‍यावेळी गंभीर स्‍वरुपाचा नव्‍हता व प्रकृती स्‍थीर होती. Poor r V1 -V3 बाबत गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार मृतकाचे ई.सी.जी. रीपोर्टमध्‍ये बदल आलेले होते. पण ते गंभीर स्‍वरुप दर्शवित नव्‍हते. परंतू त्‍याची स्‍थीती गंभीर स्‍वरुपाची नसल्‍यामुळे, पुढील संभाव्‍य धोक्‍याची दक्षता म्‍हणून गैरअर्जदाराने मृतकास ईस्‍पीतळात भरती होण्‍याचा सल्‍ला दिला होता ही बाब डॉक्‍टरांचे पत्रात नमूद नसली तरीही, त्‍यांचे उत्‍तरातील कथन योग्‍य होते असे माझे स्‍पष्‍ट मत आहे. कारण ब-याच गोष्‍टी डॉक्‍टर रुग्‍णांना समजून सांगतात. परंतू त्‍या प्रत्‍येकीबाबत त्‍याच्‍या पत्रावर नोंद असणे मला संयुक्‍तीक वाटत नाही.  कारण ज्‍याअर्थी, रुग्‍ण स्‍वतः चालत गैरअर्जदाराच्‍या रुग्‍णालयात आला, गैरअर्जदाराच्‍या दवाखान्‍यातून घरी परत गेला होता, त्‍यामुळेसुध्‍दा तक्रारकर्तीचे म्‍हणणे असंदिग्‍ध स्‍वरुपाचे ठरते.  दैनंदिन जिवनात पूर्णपणे डॉक्‍टरांवर आरोप करण्‍यात येतात की, डॉक्‍टर रुग्‍णांना काहीही सबळ कारण नसले तरीही किंवा विनाकारण पैसे उकळण्‍याच्‍या एकमेव हेतूने दवाखान्‍यात भरती करतात, तर दुसरीकडे तक्रारकर्ती गैरअर्जदारावर आरोप करते की, त्‍यांनी तिच्‍या पतीस दवाखान्‍यात भरती होण्‍याचा सल्‍ला दिलेला नाही व जर सल्‍ला दिला असता तर निश्चितच तिने तिच्‍या सोईनुसार भरती केले असते व अतीप्रसंग ओढवला नसता. या तक्रारकर्तीच्‍या म्‍हणण्‍यात निव्‍वळ भावनात्‍मक आधार आहे, परंतू वस्‍तूस्थितीचा आधार नाही असे माझे मत आहे.
8.                   Principles and Practice of Medicine, 20th Edition, Cardio Vascular Disease – Davidson या पुस्‍तकाचे Cardio Vascular Disease- Chapter    मध्‍ये Chest pain बाबत काही बाबी विषेश्‍त्‍वाने नमूद आहे. त्‍यामध्‍ये Chest pain is a common presentation of cardiac disease, but can also be a manifestation of anxiety or of disease of the lungs, the musculoskeletal system or the gastrointestinal system. Some patients deny ‘pain’ ;in favour of ‘discomfort’ but the significance remains the same.  
 
9.              त्‍याचप्रमाणे वरील पुस्‍तकाच्‍या पृष्‍ठ क्र. 554 व 555 वर  cardiac arrest and suddent cardiac death या सदराखाली खालीलप्रमाणे नमूद आहे.
 
 (page 554 & 555)      
Coronary artery disease is the most common condition leading to cardiac arrest. It can came lethal arrhythmia in several sitting-one third of all people developing myocardial infarction die before reaching hospital, many within an hour of onset of acute symptoms and the cardiac rhythm in the majority of these cases is ventricular fibrillation or pulseless ventricular tachycardia. Acute myocardial ischaemia (In the absence of infarction) less often causes these arrhythmias. Patients with a history of previous myocardial infaction are at risk of sudden arrhythmic death due to a combination scar related arrhythmia and Ischaemia. Patients at great risk are those with poor left ventricular function, this risk is reduced by appropriate treatment of heart failure with B-blockers and ACE inhibitors. Some of these patients may be suitable for implantation of a cardiac defibrillator.
 
परंतू सदर रुग्‍णास चेस्‍ट पेन नव्‍हते व छातीत जळजळ होती, त्‍याचा संबंध शारिरीक श्रमाशी नव्‍हता. तसेच तक्रारकर्तीने एम.एम.सी.चे (पृष्‍ठ क्र. 19) मधील तक्रारीत burning in chest resembling acidity त्‍यामुळे नमूद लक्षण हृदयाशी संबंधित नव्‍हते, त्‍यामुळे त्‍याक्षणी त्‍याचे गांभीर्य नव्‍हते असे दिसते.
10.                               तक्रारकर्तीने तक्रारीसोबत त्‍यांचे फॅमिली फिजिशियन असलेले डॉ. शहाणे ह्यांचे उपचाराची कुठलीही कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली नाही. जेणेकरुन, सद्य परिस्थितीचा व मृतकास असलेल्‍या आधीच्‍या आजाराचे योग्‍य आकलन होऊ शकले असते. हीच बाब मृतकाने गैरअर्जदाराकडेसुध्‍दा न कळविल्‍यामुळे गैरअर्जदाराने त्‍याची मागणी करणे, तसेच 19.05.2009 च्‍या आधी केलेल्‍या ई.सी.जी.ची मागणी करणे, जेणेकरुन, 19.05.2009 च्‍या ई.सी.जी.तील नोंदीशी तुलना करणे सोपे झाले असते, यात गैरअर्जदाराची काही चुक नाही. उलटपक्षी, गैरअर्जदाराने योग्‍य निर्णय करण्‍याकरीता मागणी केली ते योग्‍य होते असे माझे मत आहे.
 
11.                गैरअर्जदाराने मृतकास Blood, sugar fasting व liquid profile या दोन्‍ही चाचण्‍या हृदय आजारासंबंधी महत्‍वाच्‍या असल्‍यामुळे व पूर्वीचा रीपोर्ट गैरअर्जदारासमोर नसल्‍यामुळे दिलेला सल्‍ला योग्‍य होता असे माझे मत आहे व ही बाब तक्रारकर्त्‍याने सुध्‍दा नाकारलेली नाही.
 
12.               तक्रारकर्तीने तक्रारीचे परिच्‍छेद क्र. 4 मध्‍ये म्‍हटले की, डॉ. बिसने यांच्‍या बोलण्‍यावरुन तक्रारकर्तीच्‍या लक्षात आले की, तक्रारकर्तीच्‍या पतीला त्‍वरित रुग्‍णालयात दाखल करावयास पाहिजे होते. परंतू गैरअर्जदार क्र. 1 यांनी चुकीचा सल्‍ला दिल्‍यामुळे तक्रारकर्तीला पतीला रुग्‍णालयात दाखल करावयास उशिर झाला. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीला ताबडतोब रुग्‍णालयात दाखल करण्‍याचा सल्‍ला दिला नाही. याउलट, घरी जाण्‍यास सांगितले, म्‍हणून गैरअर्जदाराच्‍या सेवेत त्रुटी आहे. तक्रारककर्तीने चुकीचा सल्‍ला दिला हे भाष्‍य केले परंतू चुकीचा सल्‍ला काय दिला, याची वस्‍तूस्थिती तक्रारीत मंचासमोर मांडली नाही. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत कुठल्‍याही वैद्यकीय तज्ञांचा अहवाल किंवा वैद्यकीय लिटरेचर मंचासमोर दाखल केले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार निव्‍वळ काही बाबी डॉ. बिसने यांच्‍या बोलण्‍यावरुन लक्षात आल्‍या संदर्भात आहे. जेव्‍हा की, डॉ. बिसने यांनी त्‍यांच्‍या शपथपत्रात तक्रारकर्तीने आक्षेपीत केलेली बाब पूर्णपणे नाकारली आहे. त्‍यामुळे सुध्‍दा तक्रारकर्तीची तक्रार ही पूर्णतः वास्‍तविकतेवर नसून काल्‍पनिक बाब गृहित धरुन स्‍वतःच डॉक्‍टरांनी चुकीचा सल्‍ला दिला. या कारणास्‍तव गैरअर्जदाराविरुध्‍द त्‍यांच्‍या सेवेतील निष्‍काळजीपणा व सेवेतील त्रुटी ठरत नाही. या एकमेव कारणासाठी तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे माझे मत आहे.
                  गैरअर्जदाराने योग्‍य निदान, उपचार व सल्‍ला दिला नाही ही बाब डॉ. बिसने यांनी गैरअर्जदाराचा ई.सी.जी. पाहताच मत प्रदर्शित केले, याबाबत तक्रारकर्ती व तिचे तथाकथीत शेजारी ठाम होते तर, सरळ सोपा मार्ग म्‍हणून पोस्‍ट मॉर्टेम करुन घेण्‍याचा पर्याय तक्रारकर्तीस उपलब्‍ध असतांना, जेणेकरुन वि.प.चे निदान व सल्‍यातील चूक शोधल्‍या जाऊ शकली असती व तक्रारकर्तीस स्‍पष्‍ट निष्‍कर्ष प्राप्‍त झाला असता. परंतू पोस्‍ट मॉर्टेम करण्‍याबाबत डॅ. बिसनेला न सुचविता व पोस्‍ट मॉर्टेम करुन न घेता, तक्रारकर्ती एक गृहीणी असतांना, उच्‍च शिक्षीत व अनुभवी वि.प.विरुध्‍द आरोप करणे पूर्णतः असंयुक्‍तकीक असून तक्रारकर्तीने भावनेपोटी व गैरसमजापोटी आरोप केलेले आहे असे माझे मत आहे.  
 
14.               गैरअर्जदारांनी दाखल केलेल्‍या शपथपत्रावरील उत्‍तरावरुन गैरअर्जदार हे एम.एम.बी.एस., एम.डी. असून त्‍यांना वैद्यकीय क्षेत्रातील 30 वर्षाचा अनुभव आहे असे कथन केले व तक्रारकर्तीच्‍या आरोपाबाबत व गेरअर्जदाराचे म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ Poor r WAVE V1 -V3 बाबत मेडीकल आर्टीकल दाखल केले.
 
15.          
 
16.                               मुळ आदेशात तक्रारकर्तीचे तथाकथीत शेजारी यांचे शपथपत्र तक्रार दाखल झाल्‍यानंतर 9 महिन्‍यांनंतर ( श्री. सुधाकर रघुनाथ दिघे यांचे शपथपत्र) दाखल करण्‍यात आले आहे. शपथपत्राचे परिच्‍छेद क्र. 3 मध्‍ये, डॉ. अनिल मोडक यांनी आपल्‍या उत्‍तरात म्‍हटले आहे की, इ.सी.जी.मध्‍ये लीड व्‍ही-1 व व्‍ही-3 मध्‍ये आर वेव्‍ह कमजोर असल्‍याचे नजरेस आल्‍यानंतर पेशंटला त्‍यांनी व्‍होकहार्ट इस्पितळात दाखल होण्‍याचे सुचविले होते अथवा ताबडतोब इस्पितळात दाखल होण्‍याची गरज आहे असा सल्‍ला दिला होता. डॉ. अनिल मोडक हे मयत संदीप निरगुडकर यांच्‍याशी बोलत होते तेव्‍हा मी त्‍यांच्‍या बाजूलाच उभा होतो म्‍हणून मी ठामपणे सांगतो की, डॉ. मोडक यांनी त्‍यांच्‍या उत्‍तरात केलेले कथन संपूर्णपणे चुकीचे असून दीशाभूल करणारे आहे. मी निश्चितपणे सांगतो की डॉ. मोडक यांनी मयत सदीप निरगुडकर यांना मौखिक अथवा लिखित स्‍वरुपात इस्पितळात दाखल होण्‍याचा सल्‍ला दिलाच नाही.
  
17.               तक्रारीतील परिच्‍छेद क्र. 3 व 4 ला गैरअर्जदाराने दिलेल्‍या उत्‍तराला गृहित धरुन श्री. दिघे ह्यांनी शपथपत्रावर म्‍हणणे मांडलेले आहे. जेव्‍हा की, श्री. दिघे ह्यांनी त्‍यांच्‍या शपथपत्रातील डॉ. अनिल मोडककडे सोबत गेल्‍या संदर्भात निव्‍वळ म्‍हणणे मांडणे संयुक्‍तीक असतांना श्री. दीघे यांनी शपथपत्राचे परिच्‍छेद क्र. 3 व 4 मध्‍ये वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्तीचे तक्रारीतील अभीकथन व अप्रत्‍यक्षरीत्‍या काही कारण नसतांना तक्रारकर्त्‍यास शपथपत्रावर पाठबळ देण्‍याचा प्रयत्‍न आहे. जेकी, असंयुक्‍तीक स्‍वरुपाचे असून तक्रारकर्तीच्‍या बाजूने निकाल लागावा या एकमेव हेतूने म्‍हणणे मांडले आहे असे माझे मत आहे व ते अविश्‍वसनीय असल्‍यामुळे मला नाकारणे संयुक्‍तीक वाटते. तसेच एम.एम.सी. ला केलेल्‍या मुळ तक्रारीतसुध्‍दा श्री. दीघे यांच्‍या नावाचा उल्‍लेख नाही, त्‍यामुळे श्री. दीघे यांचे शपथपत्र अविश्‍वसनीय वाटते असे माझे मत आहे. तसेच श्री. दीघे यांनी त्‍यांचे शपथपत्रात डॉ. बिसने यांचेकडे घडलेला वृत्‍तांत नमूद केला नाही व त्‍याबाबत साधा एक शब्‍दसुध्‍दा नमूद केला नाही, त्‍यामुळेसुध्‍दा श्री.दीघे यांचे शपथपत्रावरील म्‍हणणे तक्रारकर्तीनुसार डॉ. बिसने यांनी केलेल्‍या भाष्‍याशी सुसंगत होत नाही व श्री. दीघे यांचे शपथपत्र व तक्रारकर्तीचे डॉ. बिसनेबाबतचे म्‍हणणे पूर्णतः चुकीचे व खोडसाळ स्‍वरुपाचे आहे असे माझे म्‍हणणे आहे. 
18.               तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये अर्जाद्वारे तज्ञ मत घेण्‍याकरीता तज्ञ मताची मागणी केली. त्‍यानुसार अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 42 ते 43 वर तज्ञ समितीचा प्राप्‍त अहवाल दाखल आहे. सदर प्रकरण तज्ञ अहवालाकरीता पाठविण्‍याकरीता मंचाने प्रबंधकास निर्देश दिले होते की, तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये दाखल केलेले दस्‍तऐवज, डीन/सी.एस./वैद्यकीय समिती, मेयो हॉस्‍पीटल, शासकीय रुग्‍णालय, नागपूर यांना दस्‍तऐवज पाठवून त्‍यांचेकडून 15 दिवसांचे आत दस्‍तऐवजांद्वारे वैद्यकीय निष्‍काळजीपणा आहे किंवा नाही याबाबतचे म्‍हणणे सादर करण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले होते.  
 
19.               त्‍यापत्रासोबत तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेले एकूण 10 दस्‍तऐवज तज्ञ समितीकडे पाठविले आहे असे दिसते. त्‍यामध्‍ये ई.सी.जी. रीपोर्ट, प्रीस्‍क्रीप्‍शन कार्ड, डॉ. बिसने यांचे डेथ सर्टिफिकेट, मेडीकल सर्टिफिकेट डेथ ऑफ कॉज, मेडीकल कौंसीलला दिलेले पत्र व त्‍यांचे उत्‍तर, महाराष्‍ट्र कौंसिलचे उत्‍तर, डिक्‍लेरेशन, गैरअर्जदारांचे उत्‍तर, तक्रारकर्तीचे प्रतिउत्‍तर इ. एकूण 10 पत्रांचा समावेश होता. पृष्‍ठ क्र. 36 वर तज्ञ समितीस पाठविण्‍यात आलेले पत्र, तज्ञ समितीने प्रबंधकास पाठविलेले 04.08.2010 चे पत्र, ज्‍यामध्‍ये तज्ञ समितीने सुचित केले की, डॉ. बिसने यांना सर्व कागदपत्रांसह 10.08.2010 रोजी दुपारी 1-00 वाजता तज्ञ समितीसमोर उपस्थित राहण्‍याबाबत कळविण्‍यात यावे, हि विनंती. त्‍याचप्रमाणे 11.08.2010 चे पत्रांन्‍वये प्रबंधकास कळविले की, श्री. बिसने 10.08.2010 ला उपस्थित न झाल्‍यामुळे पुढील तारीख 17.08.2010 ठेवण्‍यात आली आहे. तसेच पृष्‍ठ क्र. 40 वरील तज्ञ समितीच्‍या पत्रात स्‍पष्‍टपणे नमूद आहे की,  
 
दि.10.08.2010 रोजी दु.01-00 वा. तज्ञ समितीची सभा बोलविण्‍यात आली. सभेला डॉ. बिसने, हृदयरोग तज्ञ यांना हजर राहण्‍याबाबत पूर्व सुचना देण्‍यात आली होती. डॉ.बिसने हे सभेला आपले मत व अभिप्राय देण्‍यासाठी हजर झाले नाही.
      वरिष्‍ठ प्राध्‍यापक व विभाग प्रमुख औषधवैद्यकशास्‍त्र विभाग डॉ.पी.पी.जोशी हे सभेला हजर होते. डॉ. बिसने एक आठवडयानंतर दि.17.08.2010 रोजी हजर राहण्‍याबद्दल परत लेखी सुचना देण्‍यात यावी व दुरध्‍वनीद्वारा सुचना देऊन, सभेला हजर राहण्‍याबद्दल विनंती करावी असे सर्वानुमते ठरविण्‍यात आले.
 
यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तज्ञ समितीने तक्रारीत तज्ञ मत देणे अगोदर डॉ. बिसने यांचे नावाचा उल्‍लेख आल्‍यामुळे व त्‍यांच्‍या उपचारासंबंधी दस्‍तऐवज समितीपुढें नसल्‍यामुळे डॉ. बिसने यांना तज्ञ समितीने पाचारण करण्‍याकरीता प्रबंधकास कळवून श्री. बिसने 10.08.2010 ला, 17.08.2010 ला उपस्थित राहण्‍याबाबत कळविण्‍यात आले होते. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, तज्ञ समितीने फक्‍त डॉ. बिसने यांनाच  (प्रबंधकांमार्फत) पत्राद्वारे पाचारण करण्‍यात आले व गैरअर्जदार यांना पाचारण करण्‍यात आले नव्‍हते हे स्‍पष्‍ट होते. तज्ञ समितीचा अहवाल पृष्‍ठ क्र. 43 खालीलप्रमाणे आहे.
“Patient Sandip Nigudkar had visited Dr. Anil Modak on 19.05.2009 at around 12:00 Noon with complaint of intermittent burning sensation in abdomen since three days. Dr. Modak that time examined the patient and his ECG was done and thereafter he advised the patient, Blood Sugar and Lipid Profile. It is stated by Dr. Modak, that he had advised hospitalization. After reviewing the E.C.G. and rest of all other documents, the E.C.G. did not reveal any sign by myocardial infarct. The patient unfortunately became restless and was taken to Bisne’s Hospital, where the patient was declared dead.  
 
            In the given case looking at the available investigations and clinical sympatomology of the patient which were reviewed by this Committee, there seems to be no negligence on the part of Dr. Anil Modak, Consulting Physician.
 
            Dr. Bisne was requested to attend the Expert Committee Meeting to explain his part on dtd.10.08.2010 & 17.08.2010, but he has not attended the meeting.
 
            This opinion is strictly based on the documents submitted Befor the committee by the Hon’ble Forum.
 
            It is requested that the committee members may not be made a party to above complaint.”
 
त्‍यामध्‍ये प्रकर्षाने  It is stated by Dr. Modak, that he had advised hospitalization. या एकमेव तज्ञ समितीच्‍या नोंदीवर तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी आक्षेप घेतला. या एकमेव आक्षेपाला गृहित धरुन मंचाने 14.10.2010 ला खालील आदेश पारित केला.
 
‘सदर तज्ञ अहवालाचे बारकाईने वाचन केले असता, डॉ.मोडक यांनी रुग्‍णास दवाखान्‍यात भरती करा असे सांगितले असे नमूद आहे. ही बाब तक्रारकर्त्‍याने आपल्‍या तक्रारीत कुठेही नमूद केली नाही. यावरुन असे दिसून येते की, डॉ. मोडक यांच्‍या सांगण्‍यावरुन ते यात नमूद करण्‍यात आलेले होते. अशा तज्ञ समितीने तक्रारीत तथ्‍य आहे काय हे तक्रारीतील उपलब्‍ध कागदपत्रांच्‍या आधारे ठरवून तसा अहवाल व निष्‍कर्ष द्यावयास पाहिजे. असे दिसते की, ही तज्ञ समिती स्‍वतः अशा प्रकरणात संबंधित पक्षकारांना बोलावून माहिती घेतात. अशा प्रकारची माहिती घेण्‍यासंबंधीचे अधिकार क्षेत्र त्‍यांना नाही. त्‍यामुळे तज्ञ समितीचा अहवाल विचारात घेणे मंचाचे मते संयुक्‍तीक नाही.वर नमूद केल्‍याप्रमाणे वि.प.ला तज्ञ समितीने स्‍वतः/प्रबंधकांमार्फत पत्राद्वारे/दूरध्‍वनीद्वारे तज्ञ समितीसमोर उपस्थित राहण्‍याबाबत काहीही घडलेले नाही. त्‍यामुळे वरील निष्‍कर्ष असंयुक्‍तीक स्‍वरुपाचा आहे.
 
20.               मंचाने तक्रारीत तज्ञांचे अहवालाकरीता  तज्ञ समितीकडे कागदपत्रे पाठवितांना, दस्‍तऐवजांसोबत महाराष्‍ट्र मेडीकल कौंसिलकडील दस्‍तऐवज व उत्‍तरसुध्‍दा पाठविले होते, त्‍यामुळे वर निष्‍कर्षीत केल्‍याप्रमाणे गैरअर्जदार डॉ. मोडक  यांना तज्ञ समितीने न बोलाविता तज्ञ समितीने तज्ञ अहवाल पाठविलेला आहे. याबाबत गैरअर्जदारास कुठलीही माहिती नसतांना महाराष्‍ट्र मेडीकल कौंसिलसमोर असलेले कागदपत्र व संपूर्ण वस्‍तूस्थितीचे आकलन करुन तज्ञ समितीने त्‍यांचा तज्ञ अहवाल दिलेला होता. त्‍यामुळे निव्‍वळ It is stated by Dr. Modak, that he had advised hospitalization. या वाक्‍यावर तज्ञ समितीचा अहवाल नाकारणे म्‍हणजे शासकीय तज्ञ समितीच्‍या अहवालावर संशय व्‍यक्‍त करणे फार दुःखद आहे असे माझे मत आहे.  दस्‍तऐवजांची पूर्ण शहानीशा व वास्‍तविकतेचा विचार न करता तज्ञांचा अहवाल नाकारलेला आहे. ते पूर्णतः असंयुक्‍तीक स्‍वरुपाचे असून सदर तज्ञ अहवाल तक्रारीचे न्‍याय निवाडयाकरीता गृहित मानणे संयुक्‍तीक वाटते व तज्ञ अहवालानुसार सुध्‍दा गैरअर्जदाराचे सेवेत कुठलीही त्रुटी किंवा निष्‍काळजीपणा असल्‍याचे सिध्‍द न झाल्‍यामुळे तक्रार खारीज करणे मला संयुक्‍तीक वाटते. 
 
 
21.                               गैरअर्जदारांनी सदर प्रकरणामध्‍ये तज्ञ अहवाल सादर करण्‍यासाठी प्रबंधकास अर्ज मंचासमोर 21.03.2011 ला दाखल केला. त्‍यावर तक्रारकर्त्‍याचे वकिलांनी आक्षेप घेतला. गैरअर्जदाराचे तज्ञ अहवाल दाखल करण्‍याबाबतचा अर्ज मंचाने 21.03.2011 चे आदेशांन्‍वये नामंजूर करण्‍यात आलेला आहे. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा V. KISHAN RAO VS. NIKHIL SUPER SPECIALITY HOSPITAL & ANR., 2010 (6) SRJ 350 (2010 CTJ 868)
 
Paragraph No. 13
“In the opinion of this Court, before forming an opinion that expert evidence is necessary, the Fora under the Act must come to a conclusion that the case is complicated enough to require the opinion of an expert or that the facts of the case are such that it cannot be resolved by the members of the Fora without the assistance of expert opinion.”
 
Paragraph No. 27
“The investigating officer must obtain an independent and competent medical opinion preferably from a doctor in Government service, qualified in that branch of medical practice. Such a doctor is expected to give an impartial and unbiased opinion applying the primary test to the facts collected in the course of investigation.”
 
Paragraph No. 54
“This court however makes it clear that before the consumer Fora if any of the parties wants to adduce expert evidence, the members of the For a by applying their mind to the facts and circumstances of the case and the materials on record can allow the parties to adduce such evidence if it is appropriate to do so in the facts of the case. The discretion in this matter is left to the members of For a especially when retired judges of Supreme Court and High Court are appointed to head National Commission and the State Commission respectively. Therefore, these questions are to be judged on the facts of each case and there cannot be a mechanical or strait jacket approach that each and every case must be referred to experts for evidence, When the For a finds that expert evidence is required, the For a must keep in mind that an expert witness in a given case normally discharges two functions, The first duty of the expert is to explain the technical issues as clearly as possible so that it can be understood by a common man. The other function is to assist the Fora in deciding whether the acts or omissions of the medical practitioners or the hospital constitute negligence, In doing so, the expert can throw considerable light on the current state of knowledge in medical science at the time when the patient was treated. In most of the cases the question whether a medical practitioner or the hospital is negligent or not is a mixed question of fact and law and the For a is not bound in every case to accept the opinion of the expert witness. Although, in many cases the opinion of the expert witness may assist the Fora to decide the controversy one way or the other.”
 
तक्रारकर्तीचे तज्ञ समितीच्‍या अहवाल मागण्‍याबाबत विनंती केली होती व ती मंचाने मान्‍य केली, त्‍यामुळे या प्रकरणातील परिस्‍थीतीत तज्ञ मताची आवश्‍यकता होती स्‍पष्‍ट होते. वि.प.ने तज्ञ मत दाखल करण्‍याचा अर्ज मंचाने फेटाळून वि.प.ला तज्ञ अहवाल दाखल करण्‍यापासून वंचित राहिला, जेव्‍हा की, तज्ञ अहवाल योग्‍य न्‍याय निवाडयाकरीता आवश्‍यक होता असे माझे मत आहे. तसेच वरील सर्वोच्‍च निकालपत्रानुसार सुध्‍दा सदर तक्रारीत ई.सी.जी. संदर्भात तांत्रिक बाबी असल्‍यामुळे तज्ञ अहवालाची आवश्‍यकता होती व तज्ञ अहवाल वि.प.चे विनंतीनुसार दाखल करु दिला असता तर संयुक्‍तीक झाले असते असे माझे मत आहे.
 
22.               वरील निकालपत्रात सर्वोच्‍च न्‍यायालयाने तज्ञ अहवालाचे महत्‍व वीषद केले आहे. मुळ आदेशात तज्ञ समितीने दिलेल्‍या अहवालाचे वस्‍तूस्थितीशी आकलन न करता नाकारलेला असून गैरअर्जदाराने तज्ञाचा अहवाल दाखल करण्‍यासाठी केलेली विनंतीसुध्‍दा नाकारलेली आहे. जेव्‍हा की, गैरअर्जदारास तज्ञ समितीचा अहवाल दाखल करण्‍याचा पूर्ण हक्‍क ग्रा.सं.कायद्यानुसार अभिप्रेत आहे. त्‍यामुळे गैरअर्जदारास तज्ञाचा अहवाल दाखल करुन स्‍वतःची बाजू मांडण्‍याची संधीच मिळाली नाही. त्‍यामुळे वर आदेशीत निकाल हा एकतर्फी स्‍वरुपाचा आहे असे दिसते.
 
23.               मुळ आदेशाचे पृष्‍ठ क्र. 8 वर महाराष्‍ट्र आयुर्विज्ञान परीषदेच्‍या निकालाबाबत मत आहे, परंतू गैरअर्जदाराने अपील केले आहे व ते अपील प्रलंबित आहे, या एकमेव कारणासाठी महाराष्‍ट्र आयुर्विज्ञान परीषदेच्‍या निकालाला ग्राह्य धरण्‍यात आलेले नाही. वास्‍तविकतः महाराष्‍ट्र वैद्यकीय अधिनियम 1965 च्‍या कलम 14 कलम 16 (1,2,3) सेक्‍शन 19 (1) मध्‍ये परीषदेच्‍या प्रबंधकांच्‍या संदर्भात  नियुक्‍ती व कर्तव्‍य व जबाबदारीसंबंधी बाब नमूद आहे. त्‍यानुसार परीषदेच्‍या प्रबंधकास/प्रशासकास गैरअर्जदाराविरुध्‍द चौकशी करुन निकाल पारित करण्‍याचे काहीही हक्‍क व अधिकार नाही. उलटपक्षी, महाराष्‍ट्र वैद्यकीय परीषद अधिनियम 1965 च्‍या कलम 22 (1) नुसार, महाराष्‍ट्र वैद्यकीय परीषद किंवा कार्यकारी समितीने डॉक्‍टरांविरुध्‍द शिस्‍त भंग, व्‍यावसायिक वर्तणूक व कोड ऑफ ईथिक्‍सच्‍या अवमाननेसंबंधी चौकशी करण्‍याचे अधिकार क्षेत्र आहे. त्‍यामुळे महाराष्‍ट्र वैद्यकीय परीषदेच्‍या प्रबंधक/प्रशासक यांचेकडून दिलेला निकाल पूर्णतः कायदेसंगत दिसत नसल्‍यामुळे विचारात घेण्‍याचे किंवा त्‍याचा विचार करण्‍याची गरज नाही असे माझे मत आहे.
24.               JVP – Jugular Veins Pressure arrows वरुन JVP नॉर्मल/साधारण होते हे स्‍पष्‍ट होते. वर नमूद परिच्‍छेदात  
 
Jugular Veins (JVP ) are more prominent during expiration than during inspiration during and are also are prominent during the compensation. JVP हा एक heart pumping  एक (criteria) प्रमाण जे डाव्‍या व उजव्‍या बाजूच्‍या मानेच्‍या नसांवरुन सिध्‍द होते. सदर रुग्‍णाचे JVP normal होते म्‍हणजे heart pumping व्‍यवस्थित होते व CVS तसेच RS  सामान्‍य असल्‍याची नोंद गैरअर्जदाराने केल्‍याचे दिसून येते. त्‍यामध्‍ये रक्‍तदाब कमी झालेला नव्‍हता. त्‍या क्षणी मृतक हा स्थिर स्थितीत होता असे स्‍पष्‍ट होते. त्‍यामध्‍ये त्‍या क्षणी रोगाच्‍या तिव्रतेचा अंदाज होत नाही. म्‍हणून  observation करीता ठेवण्‍यासाठी सामान्‍यतः डॉ. सावधानता व पुढील निगराणीकरीता रुग्‍णालयात भरती होण्‍याचा सल्‍ला देतात. तक्रारकर्तीचे पती हे शिक्षीत असल्‍यामुळे गैरअर्जदाराने तोंडी सल्‍ला दिल्‍याचे दिसते. परंतू सदर रुग्‍णाने हॉस्‍पीटल वोक्‍हार्ट किंवा इतर रुग्‍णालयात आंतर रुग्‍ण म्‍हणून भरती होण्‍यास वेळीच मत प्रदर्शित केले नसल्‍यामुळे डॉक्‍टरांनी रुग्‍णास चालू असलेल्‍या औषधांव्‍यतिरित MET XL 50 mg 1 Daily जे रक्‍तदाब नियंत्रित करण्‍यासोबत व हार्ट रेट नियंत्रित करण्‍यास व एंजायना नियंत्रित करण्‍यास दिले होते असे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे सुध्‍दा तक्रारकर्तीने आरोप केल्‍याप्रमाणे वेळीच योग्‍य उपचार केला नाही हा समज पूर्णतः अज्ञानापोटी व चुकीच्‍या समजापोटी केलेला आहे हे स्‍पष्‍ट होते. Tab. Pantocid 40 mg (Pantoprozol) OD/7 जे आम्‍लपीत्‍त किंवा छातीत जळजळणे कमी होण्‍यास उपयोगी असल्‍यामुळे डॉक्‍टरांनी दिलेले आहे असे माझे मत आहे. वर नमूद केल्‍याप्रमाणे महाराष्‍ट्र वैद्यकीय परीषदेसमोर केलेल्‍या तक्रारीत तक्रारकर्तीने छातीमध्‍ये दुखत असल्‍याची बाब नमूद न करता परीणामतः तिचे म्‍हणण्‍यास अनुरुप व्‍‍हावे, म्‍हणून तक्रारीत छातीचे दुखणे नव्‍याने दाखल केले, जे की, गैरअर्जदाराचे नोंदीनुसार सुध्‍दा पूर्णतः अयोग्‍य स्‍वरुपाच्‍या आहे. कारण डॉक्‍टरांनी केलेल्‍या नोंदी तक्रारकर्तीने नाकारलेल्‍या नाहीत. त्‍यासोबत Blood Sugar (Fasting) या रुग्‍णाचे आजारासंबंधात व आवश्‍यक चाचण्‍या (lipid profile fasting) करण्‍याचा सल्‍ला डॉक्‍टरांनी दिलेला आहे असे माझे मत आहे. कारण सदरहू चाचण्‍या करण्‍याबाबत डॉक्‍टरांनी सुचविल्‍याशिवाय सामान्‍यतः   Pathology Laboratory मध्‍ये त्‍या चाचण्‍या करीत नाही. वोक्‍हार्ट रुग्‍णालयात भरती करणे किंवा इतर रुग्‍णालयात भरती करणे याबाबत गैरअर्जदार चाचणी करण्‍याबाबत नमूद केल्‍याप्रमाणे भरती होण्‍याबाबत सल्‍ला देऊ शकला असता. परंतू रुग्‍ण शिक्षीत असल्‍यामुळे तथाकथीत सुज्ञ व्‍यक्‍ती सोबत असल्‍यामुळे लिखित स्‍वरुपात गैरअर्जदाराने नोंद केली नाही यात काही गैर नसून, त्‍यामुळे गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटीशी त्‍याचा संबंध जोडणे हे पूर्णतः असंयुक्‍तीक असल्‍यामुळे नाकारले.
 
25.               सामान्‍यतः वरील पुस्‍तकातील heart disease च्‍या रुग्‍णास sweating, palpitation, अंधारी येणे, रक्‍तप्रवाह कमी पडणे इ. लक्षणे आढळतात. परंतू ह्या सामान्‍य लक्षणाबाबत संपूर्ण तक्रारीत तक्रारकर्तीचे काही विशेष म्‍हणणे आढळून येत नाही. तसेच वरील बाबी गैरअर्जदारांच्‍या निदर्शनास आलेल्‍या नाही, म्‍हणून त्‍याची नोंद नाही. म्‍हणजे त्‍या क्षणी रुग्‍णाची स्थिती स्थिर होती व heart disease संबंधी तिव्रता नव्‍हती या गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यास पुष्‍टी मिळते असे माझे मत आहे.
 
26.               तक्रारकर्तीचे संपूर्ण तक्रारीत आक्षेप आहे की, ई.सी.जी.मध्‍ये R WAVE V1 V3 कमजोर असतांना डॉक्‍टरांनी मृतकास हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याचा सल्‍ला दिला नाही ही गैरअर्जदारांची सेवेतील त्रुटी आहे असे म्‍हटले आहे. डॉक्‍टरांच्‍या पत्रावर असलेल्‍या नोंदीनुसार तक्रारकर्तीने आरोप केला की, Poor R Wave V1 V3 म्‍हणजे R Wave हे ECG Wave चे नाव आहे, ती V1 V3 मध्‍ये कमजोर असल्‍याचे तक्रारकर्तीचे संपूर्ण तक्रारीत गैरअर्जदारावर आरोप असून गैरअर्जदारावर योग्‍य निदान व उपचार करण्‍याचा प्रयत्‍न केला नाही किंवा सल्‍ला दिला नाही असे म्‍हटले आहे. वर नमूद केल्‍याप्रमाणे डॉक्‍टरांनी त्‍याबाबत MET XL 50 mg हे औषध जे रक्‍तदाबासोबत, हार्ट रेट, एंजायना नियंत्रित करण्‍याकरीता दिले होते, त्‍यामुळे तक्रारकर्तीने केलेले आरोप पूर्णतः तज्ञ अहवालाअभावी तथ्‍यहीन ठरतात असे माझे स्‍पष्‍ट मत आहे.
CIMS October-December 1999 Pg. No. 114 Cardio Vascular System यामध्‍ये खालील बाबी नमूद आहेत.
(Caedioselective Betablocker-
Action-Inhibition of beta-1 receptors by metoprolol results in reduced heart rate and lowered blood pressure. Cardiac output is reduced. Renin release is inhibited. Less prtential for bronchoconstriction.
INDICATIONS & DOSAGE
Oral- HYPERTENSION, ANIGINA, FUNCTIONAL CARDIAC DISORDERS, HYPERTHYROIDISM 100 mg dailyu. May be increased by 100 mg at weekly intercal upto 200 mg b.l.d.)
 
गैरअर्जदाराने त्‍याबाबत Davidson Principle & Practice of Medicine, 20th Edition, Page 585 वर MET XL 50 mg    (Metopropol-Generic name) च्‍या उपयोगाबाबत स्‍पष्‍ट निष्‍कर्ष दिलेले आहे व वर नमूद केल्‍याप्रमाणेच रक्‍तदाब, हार्ट रेट व एंजायना नियंत्रित करण्‍याचे उपचाराकरीता आहे.
Betablockers. - These drugs lower myocardial oxygen demand by reducing heart rate, blood pressure and myocardial contractility. Unfortunately, they can exacerbate symptoms of peripheral vascular disease and may provoke bronchospoasm in patient with obstructive airways disease. Properties and side effect of Beta blockers are discussed above page 573.
        In theory, non selective B-blockers may aggrivatge coronary vasospasm by blocking coronary artery B2-adrenoceptors and it is usually advise to used a once daily cardio selective preparation. (e.g.atenolol 50-100 mg daily, slow-release metoprolol 50-200 mg daily, bisoprolol 5-10 mg daily)
 
सदर औषध हे Betablocker या सदरात मोडते. या औषधामुळे रक्‍तदाब, हार्ट रेट व एंजायना नियंत्रित होण्‍यास मदत होते. त्‍यामुळे सदर गोळया prescribed केल्‍यामुळे त्‍या क्षणी आढळलेल्‍या लक्षणानुसार योग्‍य उपचार सुचविले होते हे सिध्‍द होते. त्‍यामुळे गैरअर्जदाराने योग्‍य उपचार/निदान सुचविले नाही हेसुध्‍दा तक्रारकर्तीचे कथन वस्‍तूनिष्‍ठ पूराव्‍याअभावी व तज्ञांच्‍या अहवालाअभावी तथ्‍यहीन ठरते.
 
                   
 
                 गैरअर्जदाराने युक्‍तीवादाचे टप्‍यात Journal of Insurance Medicine Poor R Wave Progression MKCKENZN   MD ECG Case Study चे  Article दाखल केले आणि युक्‍तीवादा दरम्‍यान डॉक्‍टरांनी Article मधील आवश्‍यक व महत्‍वपूर्ण बाबी मंचाचे निदर्शनास आणून दिल्‍या. परंतू मूळ आदेशात त्‍या Article चा साधा उल्‍लेख नाही. जेव्‍हा की, तक्रारकर्तीनुसार R Wave V1 V2 कमजोर असल्‍याचे मुद्यावर संपूर्ण तक्रारीची धुरा/शिकस्‍त आहे. वरील महत्‍वपूर्ण Article कडे लक्ष न देता किंवा दूर्लक्ष झाल्‍यामुळे गैरअर्जदाराचे defence ला अव्‍हेरले गेले आहे असे माझे मत असून ही बाब निवाडयाच्‍या दृष्‍टीने निश्‍चित गैरअर्जदारावर अन्‍यायकारक असून मूळ आदेशातील नोंदीस व निष्‍कर्षास तडा गेलेला आहे व निष्‍कर्ष असंयुक्‍तीक ठरते असे माझे मत आहे. औषध शास्‍त्राचे वर नमूद Article अवलोकन केले असता असे लक्षात आले की,  Poor V1 V3 म्‍हणजे ECG ची R Wave V1 V3 मध्‍ये उंची कमी असणे असा अर्थ अभिप्रेत दिसतो. ई.सी.जी. मध्‍ये काही बदल असल्‍याचे मत डॉक्‍टरांनी व्‍यक्‍त केले, त्‍यामुळे डॉक्‍टरांचे मतास पुष्‍टी मिळते. सदर बदल रुग्‍णाचे Clinical Background सोबत तुलना किंवा मुल्‍यांकन करुन निष्‍कर्ष काढावा लागतो असे पुस्‍तकाचे व वरील Article चे अवलोकनावरुन स्‍पष्‍ट होते.
 
JOURNAL OF INSURANCE MEDICINE, j Insur Med 2005;37:58-62 POOR R-WAVE PROGRESSION, Ross MacKenzie, MD (Page No. 58)
 
 
“Poor R-wave progression is a common ECG pattern in which the expected increase of R-wave amplitude in successive right and midprecordial leads does not occur. It occurs in about 10% of hospitalized adult patient and as many as 8% of patients examined for coronary artery disease, Poor R-wave progression was the sixth commonest abnormal ECG pattern in a series of 19,734 ECGs collected consecutively by Metropolitan Life Insurance Company over a period of 5 ¼ years.
 
            Despite its prevalence, the definition and risk selection implications of this entity are unclear and controversial. Medical directors often report this pattern with qualifiers such as suggestive but not diagnostic of, consistent with, cannot rule out, possible, or probable anterior myocardial infarction. In an insurance risk selection setting, the lack of a definitive decision frequently results in a delay of loss of important business.
 
            Attempts have been made to improve the predictive accuracy of poor R-wave progression for the diagnosis of anterior myocardial infaction by refining the ECG criteria. In these studies, the presence of anterior myocardial infaction was determined with various techniques, including port-mortem studies, vectocardiography, planar thallium scintography and contrast ventriculography. A recent systematic evaluation of commonly used and previously published criteria for poor R-wave progression was reported by Gami et al using dual isotope gated single emission computed tomography (SPECT) as the gold standard. This technique is very sensitive for myocardial infractions and misses only 5% of subendocardial infarctions identified with contrast-enhanced magnetic resonance imaging. These investigators found that only a small percentage of individuals who met carious criteria for poor R-wave progression (a proportion no different than would be expected by chance) had myocardial infraction. They concluded that although poor R-wave progression may occur in the presence and as a consequence of anterior myocardial infraction, the association is not strong and does not differ from that predicted by chance alone. It occurs with sufficient frequency in individuals without anterior myocardial infraction that it does not provide useful discriminant value. They recommended against making specific comments about the presence of anterior myocardial infraction on the basis of the ECG finding or poor R-wave progression.       
 
27.                तक्रारकर्तीने दाखल केलेले ई.सी.जी. व वर नमूद Article मधील ई.सी.जी.ची तुलना केली असता, दोन्‍ही ई.सी.जी. मध्‍ये पूर्णतः साम्‍य असल्‍याचे दिसते. त्‍यामुळे सुध्‍दा सदर Article त्‍यातील तथ्‍ये व तुलनेकडे कानाडोळा करणे न्‍यायाचे दृष्‍टीने गैरअर्जदारावर अन्‍यायकारक ठरते. जेव्‍हा की, सदर Article मधील तथ्‍य गैरअर्जदार डॉक्‍टराच्‍या मतास पुष्‍टी देते. यावरुन हे स्‍पष्‍ट होते की, Poor R Wave does not suggest any conclusion like acute heart attack. Heart attack ची त्‍याक्षणी पुष्‍टी होते. त्‍यामुळे गैरअर्जदाराने ई.सी.जी.मध्‍ये बदल आहे, त्‍याच कारणासाठी MET XL हे सुचवून, हॉस्पिटलमध्‍ये भरती होणे रुग्‍णाचे दृष्‍टीने आवश्‍यक आहे, त्‍याबाबत केलेले मत प्रदर्शन/सुचना/सल्‍ला योग्‍यहोता व निव्‍वळ प्रीस्‍क्रीप्‍शनमध्‍ये नोंद नाही, या कारणास्‍तव महत्‍वपूर्ण गैरअर्जदाराचे म्‍हणणे नाकारणे पूर्णतः असंयुक्‍तीक आहे. त्‍यामुळे त्‍या कारणास्‍तव गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी ठेवली असे मूळ आदेशातील निष्‍कर्ष तज्ञ व्‍यक्‍तीच्‍या अहवालाशिवाय काल्‍पनिक स्‍वरुपाचे असून तथ्‍यावर आधारलेले नाही असे माझे स्‍पष्‍ट मत आहे. Davidson Principle & Practice of Medicine, 20th Edition, Page 536 वर त्‍याची सविस्‍तर माहिती आहे.
 
PRSENTING PROBLEMS IN CADIOVASCULAR DISEASE
 
“Cardio vascular disease gives rise to a relatively limited range of symptoms. Differential diagnosis therefore often depends on careful analysis of the factors that provoke the symptoms, the subtle differences in how they are described by the patient, the clinical findings and appropriate investigations.
 
            A close relationship between symptoms and exercise is the hallmark of heart disease, The New York Heart Association (NYHA) functional classification is often used to grade disability.”
 
 
CHARACTERISTICS OF ISCHAEMIC CARDIAC PAIN
 
“The pain of myocardial infarction typically takes several minutes or even longer time to develop; similarly, angina builds up gradually in proportion to the intensity of exertion. Pain that occurs after rather than during exertion is usually musculoskeletal or psychological in origin. The pain of aortic dissection, massive pulmonary embolism or pneumothorax is usually very sudden or instantaneous in onset. 
     
28.                               Davidson मधील पुस्‍तकाचे पृष्‍ठ क्र. 522 वर “Prompt recognition of heart disease is limited by two key factors. It is very commonly latent. For example, disease of the coronary arteries can proceed to an advanced stage before the patient notices any symptoms. Secondly, the diversity of symptoms attributable to heart disease is limited and it is common for many different pathologies to present through a common symptomatic pathway.” असे नमूद केले आहे. वरील परिच्‍छेदावरुन त्‍याक्षणी रुग्‍णाला अशी कोणतीही लक्षणे नसल्‍यामुळे व केलेले निदान व औषधोपचारात कुठल्‍याही प्रकारचा निष्‍काळजीपणा व सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. उलटपक्षी, मृतकाने हॉस्‍पीटलमध्‍ये भरती होण्‍याबाबत वेळीच मत प्रदर्शित केले असते व डॉक्‍टरांच्‍या सल्‍याला स्विकारुन व त्‍यासंबंधाने उपचाराकरीता भरती झाले असते, तर शेवटच्‍या क्षणापर्यंत आवश्‍यक उपचार तेथे होऊ शकले असते. परंतू तिव्र स्‍वरुपाच्‍या हार्ट अटॅकवर प्रतिबंध घालता आला असता व मृत्‍यू झाला नसता याबाबत वैद्यकीय शास्‍त्र हमी देत नाही असे पुस्‍तकाच्‍या अवलोकनावरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे रुग्‍ण व तथाकथीत तज्ञ शेजारी सोबत्‍याचा निष्‍काळजीपणा कारणीभूत ठरला असे माझे मत आहे. तक्रारकर्तीने शपथपत्राच्‍या परिच्‍छेद क्र. 6 मध्‍ये वि.प.ने Pantocid हे   antinausia व antacid आहे असा औषधोपचार सुचविला होता असे नमूद आहे.  Pantocid या औषधाचा antinausia सोबत काही संबंध नसल्‍यामुळे antinausia संदर्भातील कथन पूर्णतः अज्ञानापोटी चुकीचे आहे असे माझे मत आहे. उलटपक्षी, वर नमूद केल्‍याप्रमाणे मृतकास सुरु असलेल्‍या औषधासोबत (Amaldopin) MET XL हे महत्‍वपूर्ण औषध दिले होते हे सिध्‍द झालेले आहे.
29.               डॉ. बिसने यांचे मृत्‍यू प्रमाणपत्रामध्‍ये cardiorespitatory arrest secondary to cardiogenic shock हे निदान मृत्‍युचे दाखल्‍यात नमूद आहे. हृदयाच्‍या स्थितीमध्‍ये रक्‍तदाब कमी होणे व मेंदूला रक्‍तप्रवाह कमी झाल्‍यामुळे श्‍वसनक्रिया व हृदय संबंधाने बंद झाले असे दिसते. ही सर्व स्थिती व त्‍या क्षणी आढळून आलेली बाब (Positive findings) यांची नोंद डॉ. बिसने यांनी घेतली व त्‍या क्षणी त्‍यांना काय आढळून आले आणि त्‍यावर त्‍यांनी काय उपचार केले याबाबतची कागदपत्रे, ई.सी.जी. तक्रारकर्तीने दाखल न करुन, त्‍यावेळी डॉ. बिसने यांच्‍या रुग्‍णालयात रुग्‍णावर काय उपचार करण्‍यात आले व वस्‍तूस्थिती आणि तथ्‍य मंचापासून लपविले आहे. तसेच तक्रारकर्तीचे तज्ञ शेजारी यांनी शपथपत्रामध्‍ये त्‍या दिवशीची व क्षणीची वस्‍तूस्थिती हेतूपूरस्‍सरपणे लपवून ठेवली आहे असे माझे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे सुध्‍दा तक्रारकर्तीचे शेजारी यांचे शपथपत्रातील म्‍हणणे विश्‍वसनीय नाही असे माझे मत आहे.
 
30.               जर तक्रारकर्तीने डॉ. शहाणे यांचे रुग्‍णालयातील औषधोपचाराची कागदपत्रे, सुचविलेले पत्र व तपासणीबाबतची कागदपत्रे दाखल केली असती तर रुग्‍ण गैरअर्जदाराकडे येण्‍या आधीची तपासणी, त्‍याची स्थिती, केलेले निदान व उपचार याबाबत स्‍पष्‍ट स्थिती समोर येऊन गैरअर्जदाराचे निदान, उपचार लक्षात घेऊन योग्‍य पाहणी केली असती व पडताळणी केली असती व मंच/मी योग्‍य निष्‍कर्षापर्यंत पोहोचू शकलो असतो. परंतू वरील दोन्‍ही डॉक्‍टरांचे दस्‍तऐवज मंचासमोर नसल्‍यामुळे अनभिज्ञ तक्रारकर्तीच्‍या मताशी सहमत होणे व गैरअर्जदाराचे रुग्‍णालयात भरती होण्‍याचा सल्‍ला प्रीस्‍क्रीप्‍शन पत्रात न घेणे (तज्ञ सल्‍ला दिला होता) या एकमेव कारणासाठी सेवेतील निष्‍काळजीपणा व त्रुटीचा निष्‍कर्ष असंयुक्‍तीक स्‍वरुपाचा असून अनुभवी व निष्‍णात गैरअर्जदारावर अन्‍यायकारक होईल असे माझे मत आहे.
 
31.                                                                          तक्रारकर्तीने गैरअर्जदारांवर त्‍यांनी योग्‍य उपचार केले नाही असे शपथपत्रात म्‍हटले होते. परंतू त्‍या क्षणी योग्‍य उपचार काय करणे आवश्‍यक होते हे स्‍पष्‍ट केले नाही. तसेच तक्रारकर्तीने गैरअर्जदार डॉक्‍टरांनी केलेल्‍या निदानाबाबत व सुचविलेल्‍या उपचारामध्‍ये काय चुक किंवा त्रुटी होती हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी तिचेवर असतांना तिने ती पार पाडली नाही. तसेच गैरअर्जदारांचा निष्‍काळजीपणा सिध्‍द करण्‍याकरीता प्रचलित पध्‍दतीनुसार तक्रारकर्तीने तज्ञ अहवाल दाखल न करणेए तसेच मंचाने अहवाल प्राप्‍त करणे आवश्‍यक होते, परंतू उलटपक्षी तक्रारकर्तीने 4 व्‍यक्‍तींच्‍या तज्ञ समितीने निष्‍पक्षपणे दिलेला तज्ञ अहवाल गैरसमजापोटी वास्‍तविकतेची शहानीशा न करता त्‍यावर आक्षेप घेतला हे फार दुर्भाग्‍यपूर्ण आहे. गैरअर्जदारांनी तज्ञांचा अहवाल दाखल करण्‍याबाबत केलेल्‍या अर्जावर आक्षेप घेऊन व मंचाने तो अर्ज नाकारुन गैरअर्जदारास तज्ञ अहवाल दाखल करण्‍यास परावृत्‍त केले आहे. परंतू तज्ञ अहवालावर तक्रारकर्तीचा आरोप काल्‍पनिक स्‍वरुपाचा आहे, हे सुध्‍दा गृहित धरुन निष्‍कर्ष काढण्‍यात आल्‍यामुळे, ग्रा.सं.का.स अभिप्रेत नसल्‍यामुळे सदर आरोप तथ्‍यहीन व अर्थहीन वाटतो.
31.
32.                                      वरील प्रमाणे Principles of clinical electrocardiography, 9th Edition, Mervin J. Goldman, MD, Clinical Professor of Medicine, University of California School of Medicine, San Francisco या पुस्‍तकाचे Introduction to Electrocardiography च्‍या Cautions to the beginner च्‍या परिच्‍छेदात खालीलप्रमाणे नमूद आहे.
 
The ECG is a laboratory test only and is not a sine qua non of heart disease diagnosis. A patient with an organic heart disorder may have a normal ECG, and a perfectly normal individual may show nonspecific electrocardiographic abnormalities. All too often a patient is relegated to the status of cardiac invalid solely on the basis of some electrocardiographic abnormality. On the other hand, a patient may be given unwarranted assurance of the absence of heart disease solely on the basis of a normal ECG. The ECG must always be interpreted in conjunction with the clinical findings. In general, the person best qualified to interpret the ECG is the physician caring for the patient.
 
 
 
“The ECG must always be interpreted in conjunction with the clinical findings. In general, the person best qualified to interpret the ECG is the physician caring for the patient.” 
 
त्‍यानुसार ई.सी.जी. हा गैरअर्जदाराकडे रुग्‍ण आल्‍यानंतर आढळलेल्‍या क्‍लीनीकल फाईडींगशी तुलना केल्‍यानंतरच निदान करणे अत्‍यंत आवश्‍यक असते. त्‍यानंतर पुढील औषधोपचाराची लाईन ऑफ एक्‍शन निर्धारित करावी लागते व त्‍यानुसारच गैरअर्जदाराने ई.सी.जी.ची नोंद व इतर नमूद क्‍लीनीकल फाईडींग अभ्‍यासून हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याचा सल्‍ला दिला होता. परंतू रुग्‍णाने भरती होण्‍याबाबत मत प्रदर्शित न केल्‍यामुळे व रुग्‍णास Second Opinion घ्‍यावयाचं असल्‍यामुळे वि.प.ने औषधोपचार सुचविला होता. त्‍यामुळे गैरअर्जदाराने योग्‍य प्रकारे निर्णय घेतलेला आहे आणि त्‍यात त्रुटी नाही असे माझे स्‍पष्‍ट मत आहे.
            वि.प.ने पृष्‍ठ क्र. 110 वर एक आर्टीकल दाखल केले, त्‍यामध्‍ये How to measure S.T. Elevation ? बाबत चित्रासह नोंद आहे. त्‍यातच ECG has to interpreted in the light of clinical picture. V1 V3  कमजोर असतांनासुध्‍दा “This ECG did not show any of this features to call acute myocardial infarction. S.T. Elevation मध्‍ये J Point  उंचावणे असा होतो. वि.प.ने दाखल केलेल्‍या लीटरेचरमध्‍ये S.T. Elevation ची परिस्थिती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यावरुन acute heart attack  मध्‍ये ई.सी.जी.ची स्थिती कशी असू शकते हे चित्राद्वारे मंचाचे निदर्शनास आणले आहे. त्‍या बाबीकडेसुध्‍दा मुळ आदेशात नोंद/उल्‍लेख आढळत नाही. परंतू रुग्‍णाच्‍या ई.सी.जी.चे अवलोकन केले असता ई.सी.जी.चे वेळी acute heart attack   हे स्‍पष्‍ट होते, त्‍यामुळे सुध्‍दा तक्रारकर्ती व श्री. दीघे यांचे आरोप तज्ञ अहवालाअभावी अविश्‍वनीय ठरतात.
 
32(ए)               मुळ आदेशाचे पृष्‍ठ क्र. 5 (1) मध्‍ये सदर प्रकरणात मान्य बाब अशी आहे की, मृत निरगुडकर हे दुपारी 12ः14 वाजता गैरअर्जदारांचे दवाखान्‍यात गेले.
                     तक्रारीचे परिच्‍छेद क्र. 2 मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद आहे. वि.प.क्र. 1 ने ई.सी.जी.मशिनद्वारे आलेल्‍या निकालाची पडताळणी करुन तक्रारकर्तीच्‍या पतीला सल्‍ला दिला.
                     वरील दोन्‍ही नोंदीवरुन वरील निकालपत्रात योग्‍य नोंद घेण्‍यात आली नाही असे दिसते.
                     मुळ आदेशातील पृष्‍ठ क्र. 6, परि. क्र. 2 शेवटच्‍या ओळीमध्‍ये, ’यातील एक औषध आम्‍लता दूर करणारे व दुसरे औषध उच्‍च रक्‍तदाबाशी संबंधित आहे. परंतू Amaldopin  हे औषध रक्‍तदाब नियंत्रित करण्‍यासंबंधी आहे. सदर औषध हे Anti-Hypertensive Drugs  या सदरात मोडते (SIMS Oct-Dec 1999 Pg.No.94). परंतू MET XL हे औषध हृदय आजाराचे संबंधित आहे हे वरील परिच्‍छेदात स्‍पष्‍ट झालेले आहे (SIMS Oct-Dec 1999 Pg.No.114). त्‍यामुळे मुळ आदेशात दोन्‍ही औषधे रक्‍तदाबासंबंधित आहेत, हा अनुमान पूर्णतः काल्‍पनिक व अयोग्‍य तसेच तज्ञ अहवालाअभावी असंयुक्‍तीक आहे असा निष्‍कर्ष नीघतो. 
 
 
33.               मुळ निकालपत्रात तक्रारकर्तीने दाखल केलेले सर्वाच्‍च न्‍यायालयाचे V. Kishan Rao Vs. Nikhil Super Speciality Hospital & Anr., 2010 (6) SRJ 350  या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. मुळ निकालपत्रात पृष्‍ठ क्र. 9 वर Expert evidence was not required व duty of doctor  याबाबत उल्‍लेख आहे. या निकालामध्‍ये अशा स्‍वरुपाच्‍या प्रकरणात तज्ञांचे अभीमताची गरज व डॉक्‍टरांचे कर्तव्‍य काय असते या दोन मुद्यावर स्‍वयंस्‍पष्‍ट निकाला दिलेला आहे. तसेच काही म्‍हणणे प्रमाणित केले आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे या निकालपत्रात रुग्‍ण हा मलेरीयाचे आजाराने ग्रस्‍त होता व त्‍यामुळे ताप व थंडी वाजण्‍याचे कारणास्‍तव वरील सुपर स्‍पेशालिटी हॉस्पीटलमध्‍ये भरती झाले होते. त्‍या रुग्‍णाचे पॅथालॉजी इन्‍व्‍हेस्‍टीगेशन केल्‍यानंतर WIDAL TEST मध्‍ये टायफॉईडच्‍या आजाराची पाहणी करण्‍याकरीता चाचणी केल्‍यानंतर त्‍यात टायफॉईड नसल्‍याचे निष्‍पक्षपणे सिध्‍द झालेले असतांनासुध्‍दा वरील सुपर स्‍पेशालिटी हॉस्पीटलमध्‍ये मलेरीयाचे आजाराकरीता उपचार करण्‍याऐवजी टायफॉईडच्‍या आजाराचे उपचार करण्‍यात आले व त्‍यामुळे रुग्‍णाची प्रकृती खालावली व त्‍यातच रुग्‍णाचा मृत्‍यु झाला, म्‍हणून Principle of res ipsa loquitur चे तत्‍व मान्‍य केले होते, त्‍यामुळे त्‍या तक्रारीत तज्ञांच्‍या मताची गरज नाही हे जिल्‍हा मंचाचे मत सर्वोच्‍च न्‍यायालयाने मान्‍य केले होते. सदर तक्रारीत रुग्‍ण हा बाहय OPD Patient  म्‍हणून गैरअर्जदाराकडे आला होता. वरील निकालपत्रात रोगाचे निदान व औषधोपचारात झालेली चूक ही सिध्‍द झालेली होती. सदर तक्रारीत डॉक्‍टरांचे निदान व उपचारात चूक तक्रारकर्ती सिध्‍द करु शकली नाही. त्‍यामुळे सदर निकालपत्र संबंधीत बाब लागू करणे योग्‍य नाही असे माझे स्‍पष्‍ट मत आहे.
 
33.                                            यावरुन मुळ आदेशात Expert evidence was not requiredअसानिष्‍कर्ष काढणे पूर्णतः असंयुक्‍तीक स्वरुपाचे आहे असे माझे स्‍पष्‍ट मत आहे. वर नमूद सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्रात, सर्वोच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य माजी न्‍यायाधीश श्री. लाहोटी यांनी Jacob Mathew Vs. State of Punjab and Ant. (2005) 6 SCC 1, 2005 CTJ 1085  या निकालपत्रात खालीलप्रमाणे नमूद आहे.
 
“Chief Justice Lahoti has accepted Bolam Test as correctly laying down the standards for judging cases of Medical Negligence, we follow the same and refuse to depart from it.”
 
असा निष्‍कर्ष काढलेला आहे आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्राचे परिच्‍छेद क्र. 24 मध्‍ये, “Lord Atkin explained the shades of distinction between the two very elegantly and which is excerpted below :-
 
“Simple lack of care such as will constitute civil liability is not enough. For purposes of the criminal law there are degrees of negligence, and a very high degree of negligence is required to be proved before the felony is established.”  
 
34                                      मुळ आदेशात डॉक्‍टरांच्‍या कर्तव्‍याबद्दल (Duty of Doctor) नमूद केले आहे. त्‍यानुसार असे दिसते की, डॉक्‍टरांनी रुग्‍णास काय औषध द्यावे हे ठरविणे, तसेच Administration of Treatment बाबत काळजी करणे त्‍यांचे कर्तव्‍य आहे व त्‍या दोनपैकी एकही बाबीबाबत breach झाल्‍यास डॉक्‍टर रुग्‍णाप्रती निष्‍काळजीपणाकरीता जबाबदार ठरतात असे नमूद आहे. वरील विवेचनावरुन हे स्‍पष्‍ट झालेले आहे की, गैरअर्जदारांनी रुग्‍णाचे आजाराचे योग्‍य निदान करुन आवश्‍यक औषध सुचविले होते, त्‍यामुळे एक जबाबदारी योग्‍य प्रकारे पार पाडली असे माझे स्‍पष्‍ट मत आहे. डॉक्‍टरांच्‍या Administration of Treatment या नोंदीबाबत माझे असे स्‍पष्‍ट मत आहे की, ह्या निकालपत्रातील रुग्‍ण हा आंतर रुग्‍ण म्‍हणून निखिल सुपर स्‍पेशालिटी हॉस्पीटलमध्‍ये भरती होते, त्‍यामुळे Administration of Treatment ची जबाबदारी त्‍या डॉक्‍टरांवर होती हे निर्धारित केलेले योग्‍य होते, परंतू सदर तक्रारीतील रुग्‍ण हा बाह्य रुग्‍ण OPD रुग्‍ण म्‍हणून गैरअर्जदाराकडे आल्‍यामुळे डॉक्‍टरांची दुसरी जबाबदारी Administration of Treatment बाबत डॉक्‍टरांच्‍या निष्‍काळजीपणास आरोप निर्धारित करता येत नाही. उलटपक्षी, डॉक्‍टरांनी सुचविलेले MET XL हे हृदय आजाराशी संबंधित अतिआवश्‍यक औषध त्‍वरित खरेदी करुन रुग्‍णाने घेतले असते तर, काही अंशी एकूण उद्भवलेले हृदयाच्‍या आजाराचे तिव्रतेस आळा बसला असता. परंतू तक्रारकर्तीने तिचे तक्रारीत गैरअर्जदाराने नमूद केलेले औषध एक तासाच्‍या अवधीत घेतले काय ? ह्याचा साधा उल्‍लेख केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ती व मृतक त्‍यास स्‍वतः जबाबदार आहेत असे माझे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेला सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्रात खालीलप्रमाणे विशेषत्‍वाने नमूद आहे.
 
“The test of medical negligence which was laid down in Bolam Vs. Friern Hospital Management Committee reported in 1957 (2) All England Law Reports 118, has been accepted by this Court as laying down correct tests in cases of medical negligence.”
 
 
Bolam Test   
 
“A Doctor is not guilty of negligence if he has acted in accordance with a practice accepted as proper by a responsible body of medical men skilled in that particular art”
 
Paragraph 18
 
“It is also held that in the realm of diagnosis and treatment there is ample scope or genuine difference of opinion and a doctor is not negligent merely because his conclusion differs from that of other professional men. It was also made clear that the true test for establishing negligence in diagnosis or treatment on the part of a doctor is whether he has been proved to be guilty of such failure as no doctor of ordinary skill would be guilty of if acting with ordinary care.”
 
35.                                वरील विवेचनावरुन, दोन्‍ही परिच्‍छेदावरुन व गैरअर्जदारांनी दाखल केलेल्‍या Articleवरुनहे स्‍पष्‍ट होते की, डॉक्‍टरांनी निदानात व उपचारात अवलंबिलेली कार्यपध्‍दती ही जगप्रसिध्‍दDavidson  च्‍या पुस्‍तकानुयार योग्‍य होती. Articleनुसार योग्‍य होती असे स्‍पष्‍ट होते. कारण तक्रारकर्ती तज्ञ अहवाल दाखल करण्‍यास पूर्णतः अपयशी ठरली. उलटपक्षी, तक्रारकर्तीने सरकारी तज्ञांच्‍या मंचासमोर आलेल्‍या अहवालावर गैरसमजापोटी आक्षेप घेतला. तसेच गैरअर्जदाराला तज्ञ अहवाल दाखल करण्‍यास आक्षेप घेऊन सत्‍य तज्ञ मत मंचासमोर येऊच दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ती त्‍यास सर्वस्‍वी दोषी आहे. वरील विवेचनावरुन हे सिध्‍द झाले की, गैरअर्जदाराच्‍या निदानात व उपचारात व सल्‍यात कुठल्‍याही प्रकारची त्रुटी नाही, त्‍यामुळे गैरअर्जदार निष्‍काळजीपणाच्‍या आरोपाकरीता जबाबदार नाही असे माझे स्‍पष्‍ट मत आहे.
 
 
36.               गैरअर्जदाराने दाखल केलेल्‍या TAMILNADU STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, CHENNAI, V. CHANDRASEKAR VS. MALAR HOSPITALS LTD. I (2001) CPJ 137 निवाडयामध्‍ये खालील निष्‍कर्ष काढलेले आहे.
 
“Medical negligence-Deficiency in Service-Wrong Diagnosis-Complainant having severe chest pain-Underwent Coronary Angiogram and Angioplastry-Not satisfied with treatment given-Admitted in another hospital, undergone by-pass surgery-Compensation claimed-Diagnosis is forming of opinion on examination of patient-Opinion may vary from one medical expert to another-Wrong diagnosis not amount to deficiency in service-Complainant not entitled to any compensation.”
 
त्‍यामध्‍ये मुळ तक्रारीतील वस्‍तूस्थिती व या निकालपत्रातील वस्‍तूस्थितीत साम्‍य नाही या सबबीखाली नाकारणे अनुचित आहे. उलटपक्षी, तक्रारकर्तीने डॉ. शहाणे यांचे उपचाराचे मागिल तपशिल दाखल केलेले नाही. वरील परिच्‍छेदात गैरअर्जदाराचा निष्‍काळजीपणा नाही हे सिध्‍द झालेले असतांना सुध्‍दा व Judgment of error नसतांनासुध्‍दा, Judgment of error आहे हे गृहित जरीही धरले, तरीही वैद्यकीय सेवेतील त्रुटी ठरत नाही असा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष काढलेला आहे  व तो या तक्रारीस लागू पडतो असे माझे मत आहे.
 
37.               मला खालील महत्‍वपूर्ण निकालपत्र मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचे व मा. राष्‍ट्रीय आयोगाचे असल्‍यामुळे नमूद करणे आवश्‍यक वाटते. वरील निकालपत्राची व त्‍यात प्रमाणित केलेल्‍या बाबींचा विचार केला असता हे स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी व निष्‍काळजीपणा सिध्‍द करणे ही तक्रारकर्त्‍यांची जबाबदारी होती. परंतू अनभिज्ञ तक्रारकर्तीने निव्‍वळ चुकीच्‍या बाबी नमूद करुन व डॉ. बिसनेच्‍या तोंडी भाष्‍यावरुन लक्षात आल्‍यामुळे गैरअर्जदाराच्‍या सेवेतील निष्‍काळजीपणा गृहित धरुन सेवेतील त्रुटीबाबत निष्‍कर्ष काढणे पूर्णतः चूकीचे आहे. तक्रारकर्ती वि.प.चा वैद्यकीय सेवेतील निष्‍काळजीपणा सिध्‍द करण्‍याच पूर्णतः अपयशी ठरली आहे. वरील विवेचनावरुन व खालील निकालपत्रावरुन माझे स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे की, तक्रारकर्तीची तक्रार ही खारीज होण्‍यास पात्र असल्‍यामुळे, सदर तक्रार कुठल्‍याही खर्चाशिवाय खारीज करीत आहे.
 
NCDRC 2011 (4) (PR15) Mrs. NALINI V/S THE CHIEF CARDOAC SIRGEPM-MANIPAL HOSPITAL & ANR. (Case of unstable angina and diabetic mellitus)
Medical services-medical negligence-death of patient-complaint dismissed by State Commission-Deceased was sufferings from unstable angina and diabetic mellitus-In case of alleged medical negligence, it is necessary to prove that concerned medical practitioner was either incompetent to give treatment or there was absence of the care and skill which is expected from a prudent practitioner-Initially consent of deceased was obtained operation was not done without informing consequences and probability of complications arising out of such operation-No expert’s evidence adduced by appellant-complaint before State Commission-Medical Board of AIIMS ruled out an act of omission or commission on part of hospital and treating team to be labeled of medical negligence-Report of AIIMS cannot be lightly brushed aside-Hospital of respondents was be well equipped and there was expertise available to treat patient- Appeal dismissed.
 
In complicated cases, without support of expert opinion, complainant’s case of alleged medical negligence cannot be accepted only on basis of his affidavit or some entries in medical records.
 
 
2007 CTJ 1025 (NC), AJAY SAINI V/S JABALPUR HOSPITAL & RESEARCH CENTRE,
He received treatment elsewhere. However, details of the treatment not provided-No expert evidence adduced by the complainant to sustain his allegation on medical negligence.
 
DR. JACOB MATHEW V/S STATE OF PUNJAB   2005 (3) CPJ 9 (SC)
Private complainant may not be entertained unless complainant produced prima-facie evidence before court in form of credible opinion given by another Competent doctor to support change a rashness or negligence on part of accused doctor.
 
 
Dr. LAXMAN BALKRISHAN JOSHI V/S TRIMBAK BAPU GODBOLE AIR 1989 (SC) 128
In this context with reference to the duties of the doctors to the patient this court in appeal, assured as follows,- The duties which a doctor owes to his patient are clear. A person holds himself out ready to give medical advise and treatment impliedly undertakes that he is possessed of skill and knowledge for purpose. Such a person when consulted by a patient owes him certain duties. viz. a duty of care in deciding whether, to undertake the case, a duty of care in deciding whether treatment to give or duty of care in administration of treatment, a breach of any of those duties given a right of action for negligence to the patient. The practitioner must bring to its task a reasonable degree of skill knowledge and must exercise a reasonable degree of care-neither the very highest nor a very low degree of care and competence judge in the light of particular circumstances is what the law requires.
 
Supreme Court of India 2009 CTJ 581 Dr. C P Shrikumar V/S S. Ramanujan
A mere averntment in the complaint which is denied by the other side can by no stretch of imagination can be said to be evidence by which the case of complainant can be proved. 
 
It is the obligation of the complainant to provide the facta probanda as well as facta probantia.
 
 
2008 CTJ 1093 (NC) Wasudeo Prasad Maheshwari V/S Indraprastha appolo Hospital New Delhi
 
This is case of breathlessness
Allegedly failed to disgnose real condition of his heart. Onus of proving medical negligence is on the complainant. Second O.P. undoubtedly possess of the requisite skill and qualification which he applied with due care and reasonable competents-medical negligence not proved-complaint dismissed.
 
NCDRC 2008 (2) CPR 123, Anilkumar Gupta V/S Dr. Mukesh Jaim
Negligence can not be proved on the basis of surmises and lose evidence-  It has to be proved solid evidence and medical record-patient is expected to co-operate the doctor and follow his advise strictly to unable the doctor to achieve success in post operative care, which is important as surgery itself. It is not expected that every physician and surgeon is gifted with extra skills or they can perform miracles, what is expected doctor is whether the procedure adopted by the doctor is acceptable to the medical profession.
 
AIR 1975 Bombay High Court 306
Philips India Limited V/S Kunju Punnu
Whereby it is held that principle of law of medical negligence should be based on correct principle and not on the basis of the conjectures and surmises and irrelevant consideration and misunderstanding, evidence on record. The relevant portion is extracted as hereunder-
 
            Courts should be careful in censuring profession main like doctors. In the absence  of clear and satisfactory evidence of negligence from which the only probable inference is one of negligence, it should be wrong to censur the doctor who belongs to a learned profession and who are ordinarily expected to maintain high standards of professional conduct in dealing with the patient.
 
NCDRC 2011 III CPR 2011, Smt. Anju Sharma V/S D. Sharma
Complainant have not produced any medical literature or expert opinion to established any of their allegation regarding treatment. Medical negligence must be proved by medical literature or expert opinion.
 
 
2009 CTJ 1064 Malaykumar Ganguly V/S Dr. Sukumar Mukherjee
 
Charge of professional negligence on a medical person is a serious one as it affects his professional status and reputation and as such the burden of proof could be more onerous. A doctor can not be had negligent only because something went wrong. He also can not be liable for mischance or misadventure or for an error of judgement in making choice when two options are available. The mistake in diagnosis is not necessarily a negligent diagnosis. 
 
S.C of India 2009 CTJ 472 Ms. Ins. Malhotra V/S D.A.Kriplani
 
The human body and its working is nothing than a highly complixity of medical science, the scope of misgiving and misplaced allegations against operator i.e. the doctor cannot be ruled out.
 
For a medical accident or failure, the responsibility may lie medical practitioner and equally it may not. The in adequacy of the case the nature of human psychology itself and sheer chance may have combined produce result in which doctors contributions is either relatively or completely blameless. Therefore, actual blame for the out come, has to attribute with the great cautions.
 
वरील विवेचनावरुन व वरील निकालपत्रात प्रमाणित केल्‍याप्रमाणे वि.प.च्‍या निदानात, सल्‍यात व औषधोपचारात निष्‍काळजीपणा सिध्‍द करण्‍यात तक्रारकर्ती पूर्णपणे अपयशी ठरली आहे. वि.प.हे उच्‍च शिक्षीत अर्हताप्राप्‍त डॉक्‍टर असून त्‍यांना हृदयाच्‍या व इतर आजारासंबंधी 30 वर्षाचा अनुभव असून, त्‍यांनी केलेले निदान व दिलेला सल्‍ला व औषधोपचार योग्‍य होते हे उत्‍तरात तसेच वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित आर्टीकलद्वारे सिध्‍द केल्‍यामुळे वि.प. यांच्‍या सेवेत निष्‍काळजीपणा असल्‍याबाबत निष्‍कर्ष काढणे असंयुक्‍तीक आहे असे माझे मत आहे, म्‍हणून सुध्‍दा सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र असून तक्रार खारीज करण्‍यात येते. म्‍हणून खालील आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2)    दोन्‍ही पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.
 
 
 
 
 
                                    (नरेश बनसोड)
                                       सदस्‍य
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर.
तक्रार क्र. 613/2010
 
आदेशावर तिसरे मत.
(पारित दिनांक : 07 जानेवारी 2012)
 
सौ. जयश्री येंडे, मा. सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये.
 
 
1.    सदर प्रकरणातील दोन्‍ही बाजूंचे म्‍हणणे व जवाब, प्रतिज्ञापत्रे व इतर सादर केलेले पुरावे यांचे अवलोकन करता मी, जिल्‍हा ग्राहक मंचाचे मा. सदस्‍य, श्री. नरेश बनसोड यांनी दिलेल्‍या निकालाशी सहमत आहे. त्‍याची कारणे खालीलप्रमाणे आहे.
 
 
2.    कुठल्‍याही प्रकरणात वैद्यकीय निष्‍काळजीपणा ठरवितांना एक लक्षात घ्‍यावयास पाहिजे, ते म्‍हणजे एखादी दुर्घटना (mishap) झाली किंवा रुग्‍ण दगावला, म्‍हणजे त्‍यामध्‍ये उपचार करणा-या डॉक्‍टरांचा वैद्यकीय निष्‍काळजीपणा कायदेशीररीत्‍या होईलच असे नाही. डॉक्‍टरांनी रुग्‍णावर उपचार करतांना जर सामान्‍य डॉक्‍टरांकडून अपेक्षीत असलेली काळजी घेतली नाही तरच तो वैद्यकीय निष्‍काळजीपणा होतो असे वरिष्‍ठ न्‍यायालयांनी वेगवेगळया निकालामध्‍ये म्‍हटलेले आहे. वरिष्‍ठ न्‍यायालयांनी दिलेल्‍या तत्‍वानुसार, तसेच कायद्याच्‍या कक्षेत जर निष्‍काळजीपणा होत नसेल तर ती फक्‍त एक दुर्दैवी घटना म्‍हणावी लागेल.
 
3.                या प्रकरणातील वस्‍तूस्थितीवरुन असे दिसते की, जिल्‍हा ग्राहक मंचानेच तक्रारकर्त्‍यांच्‍या विनंतीवरुन वैद्यकीय निष्‍काळजीपणा ठरविण्‍याकरीता एका तज्ञ समिती नियुक्‍त केली होती, ज्‍यामध्‍ये Prof. & Head Dept. of Medicine, Prof. & Head Dept. of Surgery, Prof. & Head Dept. of Anaesthesia, Civil Surgeon या वैद्यकीय तज्ञांचा समावेश होता. या तज्ञ समितीने तक्रारीतील कागदपत्राची पडताळणी करुन आपला अहवाल जिल्‍हा मंचाला सादर केला. या अहवालानुसार गैरअर्जदाराचा वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाला असे म्‍हणता येणार नाही असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍यांच्‍या मते तज्ञ समितीने डॉ. मोडक व डॉ. बिसने यांना बोलावून प्रकरणाचा चौकशी करुन आपला अहवाला दिला. परंतू सदर अहवालात, “After reviewing the ECG & rest of all other documents] the ECG did not reveal any sign by Myocardial Infarct  असे नमूद आहे. तसेच सदर अहवाल This opinion is strictly based on the documents submitted before the committee by the Hon’ble Forum” असे नमूद केलेले आहे. त्‍याचप्रमाणे डॉ. बिसने यांच्‍या वक्‍तव्‍यावर तक्रारकर्तीने जोर दिला. ते वक्‍तव्‍य डॉ. बिसने यांनी केले नसल्‍याचे, तसेच सदरच्‍या प्रकरणाला आधार मिळण्‍यासाठी विनाकारण डॉ. बिसने यांना समाविष्‍ट केल्‍याचे डॉ. बिसने यांनी आपल्या शपथपत्रात म्‍हटले आहे.  KISHAN RAO V/S NIKHIL SUPER SPECIALITY HOSPITAL (2010) 5 Supreme Court Cases 513 मध्‍ये देखील मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने म्‍हटलेले आहे.        Expert opinion is required only when a case is complicated enough warranting expert opinion, or facts of a case are such that Forum cannot resolve an issue without expert’s assistance.  सदर तक्रारीत तज्ञांच्‍या मताची आवश्‍यकता होती, म्‍हणून या मंचाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन तज्ञ समितीची नेमणूक केली होती. तज्ञ समितीच्‍या अहवालामध्‍ये गैरअर्जदाराकडून वैद्यकीय निष्‍काळजीपणा झाला नसल्‍याचे म्‍हटलेले आहे. त्‍यामुळे या प्रकरणातसुध्‍दा तज्ञ डॉक्‍टरांचा समावेश असलेल्‍या व ग्राहक मंचानेच नियुक्‍त केलेल्‍या समितीचे मत गैरअर्जदाराचा निष्‍काळजीपणा ठरवितांना विचारात घेणे आवश्‍यक आहे असे माझे मत आहे.
 
4.          तक्रारकर्तीचा तक्रारीमध्‍ये मुख्‍य आरोप आहे की, गैरअर्जदार डॉक्‍टरांनी तक्रारकर्तीचे पती यांचे योग्‍य निदान न करुन त्‍यांना त्‍याच्‍या दवाखान्‍यात भरती न केल्‍यामुळे त्‍यांना हृदय विकाराचा झटका आला व त्‍यात त्‍याचा मृत्‍यु झाला. सादर केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन असे दिसते की, तक्रारकर्तीचे पती त्‍यावेळी पायी चालत दवाखान्‍यात गेले होते. याठिकाणी Wrong diagnosis किंवा   Error of judgement  हा मुद्दा  (issue)  आहे. कुसुम शर्मा वि. बत्रा हॉस्पिटल आणि मेडीकल रीसर्च सेंटर (2010) 3 Supreme Court Cases 480 याप्रकरणामध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने दि. 10 फेब्रुवारी 2010 मध्‍ये दिलेल्‍या निकालामध्‍ये असे म्‍हटले आहे की, “Negligence to be established by the prosecution must be culpable or gross and not the negligence merely based upon an error of judgement.”
 
सुप्रीम कोर्टाने पुढे असेही म्‍हटले की, “In an realm of diagnosis and treatment there is scope for genuine difference of opinion and one professional doctor is clearly not negligent merely because his conclusion differs from that of other professional doctor.”  
 
तसेच अजयकुमार गुप्‍ता वि. इंदिरा गांधी इंस्‍टीटयुट ऑफ मेडीकल सायंसेस 2010 (1) S C C631 या निकालामध्‍ये सुध्‍दा राष्‍ट्रीय आयोगाने डॉक्‍टरांच्‍या निदानामध्‍ये चुक ही वैद्यकीय निष्‍काळजीपणा होत नाही असे मत व्‍यक्‍त केले आहे.
 
5.          तक्रारकर्तीने स्‍वतःहून महा. वैद्यकीय परिषद (महा. मेडीकल कौंसील) यांचेकडे गैरअर्जदाराविरुध्‍द वैद्यकीय निष्‍काळजीपणा याबाबत योग्‍य ती कारवाई करण्‍याबाबत तक्रार केली होती. वैद्यकीय परीषदेने आपल्‍या अहवालात गैरअर्जदाराचा निष्‍काळजीपणा झाला असे म्‍हटले आहे. महा. आयुर्विज्ञान परीषदेने आपल्‍या अहवालात Procedure चे पालन केले किंवा नाही हे ठरविण्‍याचा या ग्राहक मंचाला अधिकार नाही. तसेच महा वैद्यकीय परीषदेच्‍या निकालाविरुध्‍द गैरअर्जदाराने अपील दाखल केले आहे. ते प्रलंबित आहे. त्‍यामुळे या आधारावर वैद्यकीय निष्‍काळजीपणाबाबत निर्णय घेणे संयुक्‍तीक होणार नाही. त्‍याचप्रमाणे मेडीकल कौंसीलचा कायदा व प्रक्रिया ही ग्रा.सं.कायद्याच्‍या तरतूदीपेक्षा वेगळी आहे.
6.          तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू ही निश्चितच दुर्दैवी बाब आहे. परंतू कायदेशीर व तांत्रिक, तसेच वरील न्‍यायालयांनी वेळोवेळी दिलेल्‍या निवाडयातील आशय व निष्‍काळजीपणाबाबत आखुन दिलेली तत्‍वे याचा विचार करता सदरच्‍या प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार डॉक्‍टरांनी वैद्यकीय निष्‍काळजीपणा केला असे म्‍हणता येणार नाही. तसेच सदरच्‍या प्रकरणातील वस्‍तुस्थिती गैरअर्जदार डॉक्‍टरांच्‍या निष्‍काळजीपणा सिध्‍द करण्‍यास पूरेशी नाही. सबब श्री. नरेश बनसोड, मा. सदस्‍य यांनी दिलेल्‍या निकालाशी मी सहमत आहे.
 
 
 
                                          (जयश्री येंडे)
                                            सदस्‍या                   
 
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
PRESIDING MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.