(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 24 मे 2011)
अर्जदाराने सदर तक्रार, गैरअर्जदाराचे विरुध्द दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले.
... 2 ... (ग्रा.त.क्र.32/2010)
गै.अ.क्र.1 व 2 हजर होऊन नि.19 नुसार प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्तर दाखल केले. सदर तक्रार अर्जदाराचे रिजाईन्डर/शपथपञाकरीता प्रलंबित आहे. परंतु, अर्जदार व गै.अ. यांनी पुरावा शपथपञ सादर केले नाही व युक्तीवादही केला नाही. त्यामुळे, प्रकरण प्रलंबीत आहे. अर्जदार व त्याचे वकील दिनांक 17/3/2011, 28/3/2011, 30/3/2011, 28/4/2011, 30/4/2011, 18/5/2011 व 24/5/2011 ला सतत गैरहजर. त्यामुळे, प्रकरण दि.30/3/2011 ला डिसमीस इन डिफॉल्टच्या आदेशाकरीता ठेवण्यात आले. त्यानंतर ही, दिनांक 28/4/2011, 30/4/11, 18/5/2011 व 24/5/2011 ला प्रकरण डिसमीस इन डिफॉल्टच्या आदेशाकरीता ठेवण्यात आले, तरी अर्जदार व त्याचे वकील यांना संधी देऊन सुध्दा हजर झाले नाही. त्यामुळे, अर्जदाराला तक्रार पुढे चालवायचे नाही, असे दिसून येत असल्यामुळे व सतत गैरहजर असल्याने, तक्रार डिसमीस इन डिफॉल्ट म्हणून काढून टाकून, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
अर्जदाराची तक्रार डिसमीसल फॉर डिफाल्ट म्हणून काढून टाकण्यात
येत आहे.
गडचिरोली.
दिनांक :- 24/5/2011.