घोषित द्वारा - श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणेआहे. तक्रारदारानी त्यांची मुलीस दिनांक 13/9/2009 रोजी संध्याकाळी 10.30 वाजता छावणी सामान्य रुग्णालय औरंगाबाद येथे तिलाप्रसुतीच्या वेदना होत होत्या म्हणून दाखविण्यासाठी घेऊन गेले. तेथेगेल्यानंतर तेथील नर्स एस टी गायकवाड यांनी मुलीस तपासले आणि सांगितले की, पेशंटचा रक्तदाब खूप वाढलेला आहे दवाखान्यामध्ये दोन्हीही डॉक्टर हजर नाहीत तरी तक्रारदारानी त्यांच्या मुलीस प्रसुतीसाठी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये घेऊनजावे. त्यावेळेस तक्रारदारानी नर्सला अशी विनंती केली की, डॉक्टरांना फोंन लावावाआणि डॉक्टरांना दवाखान्यात बोलवून घ्यावे. म्हणून नर्सने डॉक्टरांना फोन केलाअसता डॉक्टर दवाखान्यात येण्यास तयार नसलयाचे दिसले. त्यानंतर तक्रारदारानेचस्वत: डॉक्टर गीता मालू यांच्याशी फोनवरुन बोलून त्यांच्या मुलीस तपासावे अशीविनंती केली. त्यानंतर डॉक्टर गीता मालू यांनी पेशंटचा रक्तदाब वाढला आहे आणितिला रक्तस्त्राव होत असल्यामुळे पेशंटला मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये घेऊनजाण्याचा सल्ला दिला व फोन बंद केला. त्यानंतर नर्सने त्यांना मेडिकलहॉस्पिटलमध्ये लवकर जाण्याचा सल्ला दिला. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, त्यांनी पूर्वीसुध्दा त्यांच्या मोठया मुलीच्या प्रसुतीच्या वेळेस याच दवाखान्यात आणलेले असताना नेमके हेच कारण सांगून परत पाठविले होते म्हणून तक्रारदारानी नर्सला डॉ धामंदे यांना फोन करण्यास सांगितले. त्यावेळेस डॉक्टरांनी असे सांगितले की, ते जालना येथे आहेत म्हणून ते येऊ शकत नाहीत वपेशंटला मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. शेवटी नाईलाजाने तक्रारदारानीत्यांच्या मुलीस खाजगी दवाखान्यात नेले. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, फक्त त्यांच्या मुलीचीच तक्रार घेऊन मंचात आले नाहीत तर छावणी येथील रुग्ण जे रात्री बेरात्री दवाखान्यात येतात, त्यांना कांही ना काही कारण सांगून दुस-या दवाखान्यात पाठवून दिले जाते/ जाण्यास सांगितले जाते. छावणीतील रुग्णासाठी हादवाखाना असला तरी त्यांना तेथे उपचार मिळत नाही. या दोन्हीही डॉक्टरांचे शहरामध्ये दवाखाने आहेत. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदारांकडून त्यांना खाजगी दवाखान्यात आलेला खर्च रु 3200/- तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटीआणि खर्चाबद्दल योग्य तो आदेश द्यावा अशी विनंती करतात. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रेजोडली आहेत. तसेच पुराव्यापोटी शपथपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी त्यांचा लेखीजवाब संयुक्तपणे दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पेशंटगैरअर्जदारांच्या हॉस्पिटलमध्ये आली त्यावेळेस पेशंटची परिस्थिती अत्यंत गंभीरहोती. ब्लड प्रेशर वाढलेले होते. त्यादिवशी स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉक्टर रजेवर होते. सदरील हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी पेशंटच्या उपचाराची सोयनाही. तसेच आयसीयु , लहान मुलांचे डॉक्टर, भूलतज्ञ, प्रशिक्षीत कर्मचारीवर्ग, उपलब्ध नाही. या दवाखान्यामध्ये फक्त दोनच डॉक्टर आहेत. त्यापैकी एक सर्जनआहेत. पेशंटचे नातेवाईक डॉ धामंदे यांचीशी बोलले परंतु डॉक्टर धामंदे हे सर्जन आहेत ते स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ नाहीत आणि दुसरे डॉक्टर हे दोनदिवसाच्या रजेवर गेलेले होते. दिनांक 13/9/2009 रोजी रविवार होता. त्या दिवशी नर्स गायकवाडा यांनी पेशंटला तपासले आणि पेशंटची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. पेशंट ही पहिल्या वेळेस गरोदर होती आणि तिला प्रसुती वेदना होतहोत्या. ब्लड प्रेशर वाढलेले होते आणि रक्तस्त्राव होत होता. म्हणूनगैरअर्जदार क्रमांक 2यांनी सांगितल्यानुसार नर्स गायकवाड यांनी त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. हे हॉस्पिटल कँटोनमेंट हॉस्पिटलपासुन जवळम्हणजेच 10 ते 15 मिनीटाच्या अंतरावर आहे. सदरील पेशंट हे हायरिस्क असून सदरील दवाखान्यात आयसीयुची सोय, भूलतज्ञ नाही्. सदरील हॉस्पिटल हे शासनाच्या नियमानुसार चालते. पेशंटचे प्राण वाचावे म्हणून त्यांनी दुस-या हॉस्पिटलमध्ये पेशंटला पाठवून दिले. गैरअर्जदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 आणि 2 हे कोठेही खाजगी प्रॅक्टीस करीत नाहीत. त्यांच्याविरुध्द व सदरील हॉस्पिटल विरुध्द कुठेही तक्रार दाखल नाही. तक्रारदारानी त्यांच्या मुलीस फिरदोस हॉस्पिटलमध्ये नेले होते त्याची पावती पाहता हेहॉस्पिटल जुना बाजार औरंगाबाद येथे आहे. वास्तविक पाहता कँन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलच्या जवळ शासकीय वैद्यकीय रुग्णालय असून सुध्दा तक्रारदार फिरदोस हॉस्पिटलमध्ये पेशंटला घेऊन गेले. शासकीय रुग्णालयात 24 तास सेवा उपलबध असतात.यावरुन सदरील तक्रारदारानी प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केली आहे म्हणून तक्रार नामंजूर करावी अशी विनंती करतात. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, ते स्वत:त्यांच्या गरोदर मुलीस घेऊन दिनांक 13/9/2009 रोजी रात्री 10:30 वाजतागैरअर्जदारांच्या दवाखान्यात पोहचले त्यावेळेस तेथे एकही डॉक्टर उपलब्धनव्हते. हॉस्पिटल - पेशंटला कँन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे नेल्यानंतर तेथे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते म्हणून दुस-या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले,तेथीलनर्सने तक्रारदाराच्या मुलीस हायबीपी होता म्हणून घाटी शासकीय रुग्णालय व महाविद्यालय येथे जाण्याचा सल्ला दिला. कँन्टोन्मेंट हॉस्पिटल तेथील लोकांच्या सोयीकरीताआहे. हॉस्पीटलमध्ये डॉक्टर अनुपस्थित असणे हे गैरसोयीचे आहे. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार तेथे दोन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे. त्यापैकी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मालू हे दिनांक 12 व 13/9/2010 या दोन दिवसांच्या रजेवर होते. दुसरेडॉ धामंदे हे सर्जन आहेत ते स्त्रीरोगशास्त्र तज्ञ नाहीत. डॉ मालू हे रजेवर असल्याबद्दल रजिष्टरची फोटो स्टेट कॉपी दाखल केली आहे. परंतु हॉस्पिटलला रजा पाठविल्याचा पुरावा दाखल केलेला नाही. हॉस्पिटलच्या सीईओने त्यांची रजा घेणे, मंजूर करणे व त्यांच्या बदल्यात दुस-या डॉक्टरची डयुटी लावणे हे अत्यंत महत्वाचे असतानाही हॉस्पिटलच्या सीईओ ने तसे केले नाही. हॉस्पिटलमध्येकुठल्याही सोयी सुविधा नाहीत त्यामुळे त्यांनी तक्रारदारास त्यांच्या पेशंटलाघाटीमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सदरील हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्याबाबींची कमतरता आहे याबाबत डॉक्टरांनी सीईओ ला केलेला पत्रव्यवहार मंचात दाखलकेलेला आहे. प्राथमिक सोयी सुविधा देखील या दवाखान्यात नाहीत आणि त्यामध्येसुधारणा आणि देखभालही केलेली नाही हे या पत्र व्यवहारावरुन दिसून येते. वास्तविकपाहता, हॉस्पिटल चालवण्यासाठी जे नॉर्म्स शासनाने घालून दिलेले आहेत हे याहॉस्पिटलने पूर्णपणे पाळलेले नाहीत असे दिसते. तसेच हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा करण्यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला दिसून येत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना दुस-या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. या हॉस्पिटलचा तेथीलरहिवाशांना कांहीही उपयोग नाही व अशा स्वत:च आजारी व सलाईनवर असलेलेहॉस्पिटल बंद करावे, चालू ठेऊन तेथील रहिवाशांची गैरसोय करु नये असे मंचाचे मतआहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हे अनेक कारणासाठी जनतेकडून टॅक्स घेते तरीही कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल हे सोयीसुविधायुक्त नाही. हॉस्पिटल हे जनतेच्या सेवेसाठी असतेव तेथे सेवाच न देणे व रुग्णांना इतरत्र पाठविणे ही सेवेतील त्रुटी ठरते वत्यासाठी हॉस्पिटल जबाबदार आहे असे मंचाचे मत आहे. डॉ गीता मालु तक्रारदार जेंव्हात्यांच्या मुलीस घेऊन कँन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेस तेथे एकहीडॉक्टर उपलब्ध नव्हते . त्या दिवशी डॉ गीता मालू यांची दोन दिवसांची रजा होतीअसे डॉ मालू यांचे म्हणणे आहे. तक्रारदार त्यांच्या मुलीस दिवस गेल्यापासून याच दवाखान्यात घेऊन जात होते हे दाखविण्यासाठी तक्रारदारानी एएनसी कार्ड दाखल केलेआहे. तेथील नर्सने डॉ मालू यांना फोन केला असता त्यांनी तक्रारदारास त्यांच्या मुलाला घाटी रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तक्रारदारस्वत: डॉ मालू यांना फोनवरुन बोलले व त्यांच्या मुलीस त्यांनी तपासावे अशीविनंती केली. डॉ गीता मालू यांनी पेशंटचा रक्तदाब वाढलेला आहे व रक्तस्त्राव होत असल्यामुळे घाटी रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. डॉ मालू यांचीत्या दिवशीची रजा असल्यामुळे त्यांच्या विरुध्द कुठलाही आदेश करणे योग्यहोणार नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, दोन्हीही डॉक्टर हे दुसरीकडे प्रायव्हेट प्रॅक्टीस करतात. डॉक्टरानी लेखी जवाबामध्ये ते प्रायव्हेट प्रॅक्टीस करीत नाहीत असे नमूद केले होते. परंतु तक्रारदारानी अनेक पेशंटला दोन्हीही डॉक्टरांनी त्याच्या स्वत:च्या खाजगी दवाखान्यामध्ये उपचार केल्याचे प्रिस्क्रिप्शन आणि दवाखान्याचे फोटो दाखल केले आहेत. त्यानंतर डॉ मालू यांनी त्यांचे शपथपत्र दाखल केले व त्यात त्यांना नॉन प्रॅक्टीसींग अलाऊंस मिळत नसल्यामुळे त्यांना प्रॅक्टीस करता येते असे म्हणतात. यावरुन हे सर्व आप्टर थॉट असल्याचे दिसून येते. परंतु याबाबत त्यांनी रुल्स दाखल केले नाहीत. तसेच अपॉइंटमेंट लेटर ज्यामध्ये नॉन प्रॅक्टीसींग अलाऊंस मिळत नसल्याबद्दल नमूद केलेले असते ते सुध्दा दाखल केलेले नाही. फक्त कँन्टोन्मेट बोर्डाचे सीईओ यांचे सर्टीफिकेट दाखल केले आहे. त्यांचे शपथपत्रही दाखल केले नाही. यामध्ये गैरअर्जदार हॉस्पिटल आणि डॉ धामंदे यांचे अशा प्रकारचे शपथपत्र दाखल नाही. वास्तविक पाहता ज्या सीईओने सर्टीफिकेट दिले त्यांचे शपथपत्र किंवा त्यांच्या लेखी जवाबात सुध्दा हेच यावयास पाहिजे होते. त्यामुळे मंच तकारदार म्हणतात त्याप्रमाणे दोन्हीही डॉक्टर कँन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलमध्ये काम न करता स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करतात हे स्पष्ट होते. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, या दवाखान्यात नेहमीच पेशंट गेले असता त्यांना उपचार न करता दुस-या दवाखान्यता पाठवून दिले जाते. त्यासाठी तक्रारदारानी इतर पेशंटला हा अनुभव आल्याचे शपथपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदारांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदाराच्या मुलीस हाय बीपी असल्यामुळे व डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तेथील नर्सने दुस-या दवाखान्यात जाण्यास सांगितले. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी करता असे दिसून येते की, तक्रारदाराने त्यांच्या मुलीस दुस-या दिवशी फिरदोस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलेले होते. त्या दिवशीच्या कागदपत्रावर दिनांक 14/9/2009 व तक्रारदाराच्या मुलीचा बीपी 130/80 असा होता. त्या कागदपत्रावर डॉ सय्यदा खान यांनी असे कोठेही नमूद केले नाही की पेशंटचा बीपी हाय होता. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार पेशंटचा बीपी हाय असल्यामुळे त्यांनी त्यांच्या दवाखान्यात प्रसुतीसाठी ठेऊन घेतले नाही आणि दुस-या दवाखान्यात जाण्यास सांगितले. परंतु तक्रारदाराने त्यांच्या मुलीस कुठेही न नेता घरी गेले व दुस-या दिवशी सकाळी 8:30 वाजजा फिरदोस हॉस्पिटलमध्ये मुलीस दाखल केले. डॉक्टर सय्यदा खान यांनी तसे पेपरवर पेशंटला हाय बीपी होता असे नमूद केले नाही. तर बीपी 130/80 असल्याचे नमूद केले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरुन सुध्दा दोन्हीही गैरअर्जदारानी पेशंटला हाय बीपी होता म्हणून त्यासाठी डॉ सय्यदा यांनी औषध व इंजेक्शन दिले हे सिध्द केले नाही. उलट पेशंट नॉर्मल होते म्हणून फिरदोस हॉस्पिटलमधून एकाच दिवसात त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे हे कागदपत्रावरुन दिसून येते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार नेहमीच हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर तिथे उपचार न करता त्याना दुस-या दवाखान्यात उपचारासाठी पाठवून देतात. डॉक्टर धामंदे हॉस्पिटलमध्ये डॉ गीता मालू नसल्यामुळे तेथील नर्सनेडॉ धामंदे यांना फोन केला त्यावेळेस डॉ धामंदे यांनी असे सांगितले की, ते जालनायेथे आहेत म्हणून ते येऊ शकत नाहीत, पेशंटला घाटी रुग्णालयात पाठवूनद्यावे. गैरअर्जदार क्रमांक 1,2 व 3 यांनी त्यांचा लेखी जवाब एकत्रितरित्यादिलेला आहे. त्यामध्ये डॉ धामंदे हे सर्जन आहेत ते स्त्रीरोगशास्त्र तज्ञनाहीत असे नमूद केलेले आहे. लेखी जवाबामध्ये डॉ धामंदे हे त्या दिवशीहॉस्पिटलमध्ये उपस्थित नव्हते त्यासाठी त्यांची रजा होती किंवा नव्हती याबद्दल कुठेही नमूद केलेले नाही. तक्रारदाराच्याम्हणण्यानुसार डॉ धामंदे हे त्या दिवशी जालना येथे होते. सीईओने डॉ धामंदेयांच्या जागी इतर डॉक्टराची डयुटी लावली होती किंवा नाही याबद्दल लेखीजवाबामध्ये कुठेही स्पष्टीकरण दिलेले नाही. फक्त डॉ धामंदे हे जनरल सर्जन आहेत असे म्हटले आहे. सर्जन आहेत म्हणजे ते जास्त क्वालीफाईड (उच्च शिक्षीत) आहेत. एमबीबीएस ही वैद्यकीय क्षेत्रातीलप्राथमिक पदवी आहे. एमबीबीएस होण्याच्या कालावधीत , त्या अभ्यासक्रमात प्रसूती कशीकरावी याबद्दल शिकविले जाते. एमबीबीएस चा लॉंगफॉर्म बॅचलर इन मेडिसीन अण्ड बॅचलर इन सर्जरी असा आहे. या संपूर्ण शैक्षणिक सत्रामध्ये त्यांना इतर विषयासोबतप्रसुतीचे पण शिक्षण दिले जाते. असे असून सुध्दा डॉ धामंदे यांच्याम्हणण्यानुसार ते स्त्रीरोगशास्त्र तज्ञ म्हणून तक्रारदारासत्यांनी घाटीमध्ये पाठवून दिले आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाच्यानिर्णयानुसार, मिडवायफरीना प्रसुती बाबतचेप्रशिक्षण दिले जाते तसेच प्रशिक्षीत दाया सुध्दा प्रसुती करु शकतात. डॉ अभय बंग व डॉ राणी बंग यांनीअनेक अशा दायाना प्रशिक्षण दिले आहे. कारण दूर्गम भागामध्ये डॉक्टर जाण्यास तयारनसतात व प्रसुतीच्या वेळेस ब-याच वेळेस आई व बाळाचा मृत्यू होतो. त्या प्रशिक्षित दाया योग्य रितीने प्रसुती करु शकतात हेत्यांनी जगास दाखवून दिलेले आहे. डॉ धामंदे हे स्वत: उच्च शिक्षीत असतानाही तेकेवळ स्त्री रोग शास्त्र तज्ञ नाहीत याचा आधार घेऊन स्वत:चा बचाव करुपाहतात. परंतु हे मंचास पटत नाही. लेखी जवाबामध्ये तक्रारदाराच्या मुलीचा जीववाचावा म्हणून त्यांनी तक्रारदारास त्यांच्या मुलीस घाटी रुग्णालयामध्ये घेऊनजाण्याचा सल्ला दिला असे सांगतात. परंतु ते स्वत: हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहूनत्यांनी योग्य रितीने डयुटी केली असती व त्यानंतर पेशंट गंभीर आहे म्हणून दुसरीकडे रेफर केले असते तर ते योग्य ठरले असते. परंतु स्वत:डयुटी न करता त्यांनी तक्रारदाराच्या मुलीस दुस-या दवाखान्यात पाठवून देऊनस्वत:वरची जबाबदारी ढकलून दिल्याचे दिसते. सदरील बाब ही डॉक्टरांनीपदवीदानाच्या वेळेस घेतलेल्या Hepocroticoath च्या विरुध्द असल्याचे दिसूनयेते. या सर्व कारणावरुन गैरअर्जदार डॉ धामंदे हे सर्वस्वी जबाबदार ठरतात असेमंचाचे मत आहे. तसेच त्यांनी रुग्णास सेवा दिली नाही व ते रुग्णालयात उपस्थितनव्हते यास ते जबाबदार ठरतात. डॉ धामंदे यांनी त्यांच्या लेखी जवाबामध्ये ते स्वत: खाजगी प्रॅक्टीस करीत नसल्याचे सांगतात. परंतु तक्रारदारानी प्रेस्टीजहॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिटयूट,खडकेश्वर औरंगाबाद येथे त्यांच्यादवाखान्याच्या नावाच्या पाटीचा फोटो दाखल केला आहे. तसेच डॉ धामंदे यांनी त्यांच्यादवाखान्यात पेशंटला तपासलेल्या व औषधी लिहून दिलेल्या चिठ्ठया दाखल केल्याआहेत. यावरुन डॉ धामंदे हे खाजगी प्रॅक्टीस करतात हे दिसून येते. गैरअर्जदारानीत्यांचा लेखी जवाब स्वत:ची सही करुन ते दाखल केलेले आहे यावरुन त्यांनी असत्यलेखी जवाब दाखल केल्याचे दिसून येते. तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की, त्यांनी पूर्वीसुध्दा त्यांच्या मोठया मुलीस प्रसुतीकरीता याच हॉस्पिटलमध्ये नेले होते वत्यावेळेसही नेमके हेच कारण सांगून त्यांना परत पाठवून देण्यात आले होते.दोन्हीही गैरअर्जदारानी त्यांच्या लेखी जवाबामध्ये तक्रारदाराने त्यांच्यामुलीस हॉस्पिटलमध्ये आणले त्यावेळेस पेशंटचा बीपी हाय होता म्हणून तिला दुस-यादवाखान्यात पाठवून दिल्याचे म्हणतात. दवाखान्यातील नर्स गायकवाड यांनीतक्रारदाराच्या मुलीस हाय बीपी होता असे लिहून दिलेली चिठ्ठी तक्रारदाराने दाखलकेलेली आहे. ती चिठ्ठी पाहिली असता सदरील नर्सला इंग्रजीचे व्यवस्थित ज्ञान नाही असेदिसून येते कारण सदरील चिठ्ठीमध्ये ब-याच इंग्रजी स्पेलींगच्या चुका आहेत. नर्सबनण्यासाठी इंग्रजीचे ज्ञान असणे गरजेचे आहे असे मंचाचे मत आहे. केवळ यानर्सच्या चिठ्ठीवर दोन्हीही डॉक्टर आणि हॉस्पिटल विश्वास ठेऊन पेशंटला हाय बीपीहोता व ती हाय रिस्कची पेशंट होती म्हणून तिच्या वर उपचार न करता इतरत्रजाण्याचा सल्ला दिला आहे. पेशंटला हाय बीपी होता व ती हाय रिस्कची होती हे कुठल्याही कागदपत्रावरुन दिसून येत नाही. पेशंटची दुस-या हॉस्पिटलमध्ये प्रसुतीहोऊन तिला दुस-या दिवशी डिसचार्ज सुध्दा मिळालेला आहे. यावरुन पेशंटला हाय बीपीनव्हता हे सिध्द होते. खोटया कारणावरुन गैरअर्जदार क्रमांक 1,2 व 3 यांनी तक्रारदाराच्या मुलीस त्यांच्या दवाखान्यामध्ये दाखल करुन घेतले नाही हे सिध्द होते. गैरअर्जदारांच्या म्हणण्यानुसार दोन्हीही डॉक्टर हे केंद्रशासनाने कर्मचारी असल्यामुळे त्यांच्या वर कुठलीही केस दाखल करण्यापूर्वीपरवानगी घ्यावी लागते. त्यामुळे सदरील मंचास प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही. परंतु ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 3 नुसारसदरील प्रकरण दाखल करुन घेण्याचा अधिकार मंचास आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार कॅन्टोन्मेंट एरियामध्ये राहतात, तेथील टॅक्स भरतात आणि पेशंट ही पूर्वीपासून त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये जात असल्याचे एएनसी कार्डवरुन दिसून येते. यावरुन तक्रारदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत असे मंचाचे मत आहे. यासाठी मंच मा.सर्वाच्च न्यायालय यांनी दिलेला पथदर्शक निवाडा Indian Medical Association v.s V.P.Shanta and othrs. III (1995) CPJ 1(SC) = AIR 1996 SC 550 चा आधार घेत आहे. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणेआदेश देत आहे आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास आलेला खर्च रु 3200/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु 5000/- व तक्रारीचा खर्च रु 1,000/- द्यावा. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमतीअंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |