(द्वारा श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे - मा. सदस्या)
1. तक्रारदारांना सर्दी व कफाचा त्रास होत असल्यामुळे ता. 21/11/2014 रोजी त्यांचे नातेवाईकासोबत सामनेवाले डॉक्टरकडे गेल्या होत्या. तक्रारदार नियमितपणे सामनेवाले यांचेकडुन गेल्या 2 ते 3 वर्षापासुन किरकोळ आजाराकरीता वैद्यकीय उपचार घेत असल्यामुळे सामनेवाले यांना तक्रारदाराच्या प्रकृतीबाबत तसेच त्यांना असलेल्या औषधांच्या अॅलेर्जीबाबत ज्ञात होते. सामनेवाले यांनी ता. 21/11/2014 रोजी तक्रारदार यांची तपासणी करुन त्यांचे जवळचे प्लॉस्टीक पोच मधील औषध दिले. तक्रारदार यांनी सदर औषध सामनेवाले यांनी दिलेल्या निर्देशानुसार घेतल्यानंतर त्यांच्या त्वचेवर रॅशेस निर्माण झाले. तक्रारदार यांनी ता. 22/11/2014 रोजी त्यांचे नातेवाईकासोबत सामनेवाले यांचेकडुन जाऊन या संदर्भात माहीती दिली. सामनेवाले यांनी पुन्हा जवळचे औषध देवुन काळजीचे कारण नसल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी सदर औषध घेतल्यानंतर त्यांची प्रकृती खूप खराब झाली. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता. 23/11/2014 रोजी मोबाईलवर संपर्क करुन तपासणीसाठी बोलावले तथापी रविवार असल्यामुळे हॉस्पीटल उघडुन तक्रारदार यांची तपासणी करण्यास समनेवाले यांनी नकार दिला. तसचे मेडीकलमध्ये जावून फोनवर संपर्क केल्यास औषध सांगण्याची तयारी दाखवली.
2. तक्रारदार यांच्या त्वचेवर खूप जास्त रॅशेस येवुन प्रकृती अत्यंत खराब झाल्यामुळे जवळच्या डॉक्टरांना डॉ. चूनचून सुरे यांना दाखवले असता त्यांनी तक्रारदाराची प्रकृती त्यांचे उपचाराबाहेरील असल्यामुळे चांगल्या हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तक्रारदार यांना सैफी हॉस्पीटल, मुंबई येथे ता. 23/11/2014 रोजी उपचारासाठी नेण्यात आले. सैफी हॉस्पीटलमध्ये 7 तज्ञ डॉक्टरांनी एकत्रितपणे तक्रारदार यांचा उपचार केला. सैफी हॉस्पीटल येथील डॉक्टराच्या निर्देशानुसार तक्रारदार यांच्या नातेबाईकांनी सामनेवाले यांचेकडे जावुन त्यांनी तक्रारदार यांना ता. 21/11/2014 व ता. 22/11/2014 रोजी दिलेल्या औषधाबाबतचे मेडिकल प्रिस्क्रीपशनची मागणी केली. सामनेवाले यांनी या संदर्भात प्रथमतः नकार दिला तथापी खुप वेळा विचार करून ता. 24/11/2014 रोजी तक्रारदार यांच्या ता. 21/11/2014 व ता. 22/11/2014 रोजीच्या उपचाराबाबतचे प्रिस्क्रीपशन दिले.
3. सामनेवाले यांनी निष्काळजीपणाने त्रृटीची सेवा दिल्यामुळे तक्रारदार यांनी सैफी हॉस्पीटलमध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची रक्कम रु. 7,00,000/- व नुकसान भरपाईची रक्कम रु. 10,00,000/- मागणी करीता तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता. 13/04/2015 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटिस दिली. सदर नोटिस प्राप्त होवुनही सामनेवाले यांनी उत्तर दिले नाही अथवा नोटिसीप्रमाणे कार्यवाही केली नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
4. सामनेवाले यांना मंचाच्या नोटिसची बजावणी होऊनही ते सुनावणीस गैरहजर राहिल्याने ता. 31/05/2016 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचे वाचन करण्यात आले. तक्रारदाराच्या वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला. यावरुन खालीलपमाणे निष्कर्ष काढण्यात येत आहे.
6. कारण मिमांसा
अ) तक्रारदार यांना सामनेवाले यांनी ता. 21/11/2014 व 22/11/2014 रोजी दिलेल्या औाषधाबाबतचे ता. 24/11/2014 रोजीचे मेडिकल प्रिस्क्रीप्शनची प्रत मंचात दाखल आहे. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता. 21/11/2014 व ता. 22/11/2014 रोजी वैद्यकीय उपचार दिल्याचे स्पष्ट होते.
ब) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी त्यांच्या जवळचे दिलेले औषध तक्रारदार यांनी घेतल्यानंतर त्वचेवर रॅशेस आले या बाबतची माहीती सामनेवाले यांना दिल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरे दिवशी काही औषधे दिली तथापी त्यामुळे तक्रारदार यांची प्रकृती अधिकच खराब झाली, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यानंतर काहीच मदत केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सैफी हॉस्पीटल, मुंबई येथे पुढील वैधकीय उपचार केले. तक्रारदार यांनी सदर पुढील उपचारासंदर्भातील कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
क) तक्रारदार यांनी दाखल केलेले ता. 27/11/2014 रोजीचे सैफी हॉस्पीटल येथील डॉ. हकीनुद्दीन अे. पारडवाला यांचे वैद्यकीय प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी ता. 23/11/2014 सैफी हॉस्टपीटलमध्ये अॅडमीट केले होते. तसेच सदर प्रमाणपत्रामध्ये खालीलप्रमाणे नमुद केले आहे.
Mrs. Heena Mustaquim Khan admitted a Saifee Hospital on 23/11/2014, Bed No. 468, IP No. 5621473 under my care is a diagnosed case of Steven Jhonson Syndrome. Patient was admitted with h/o Fever; since 2 days associated with chills and rigors for which she took treatment from family physician (? Antibiotics but details not available); following which patient started developing Exanthem and Ulceration of Lips for which patient was admitted to Saifee Hospital.
वैद्यकीय शास्त्रानुसार
Exanthem – is a Greek word – means a breaking out is a wide spread rash. An Exanthem can be caused by toxins, drugs or micro organism.
Ulcer – is a break in skin or mucous membrane with loss of surface tissue and the disintegration.
वरील ता. 27/11/2014 रोजीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये तक्रारदार यांना सैफी हॉस्पीटलमध्ये दिलेल्या औषधांची यादी नमुद केली आहे. सदर प्रमाणपत्रामध्ये तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन थंडी व तापाकरीता घेतलेल्या औषधामुळे तक्रारदार यांना “Exanthema & Ulceration of lips” हा आजार डेव्हलप झाल्याचे नमुद केले आहे.
ड) तसेच सैफी हॉस्पीटलचे डॉक्टरांनी ता. 10/12/2014 रोजी दिलेल्या वैद्किय प्रमाणपत्रानुसार तक्रारदार यांना “Toxic Epidermal Necrolysis / Steven Johnson Syndrome with left eye corneal perforation” निष्पन्न झाल्यामुळे त्यांना दिलेल्या वैद्किय उपचारांबाबतची यादी प्रमाणपत्रात नमुद केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता. 21/11/2014 रोजी T.Oflox 200 mg व ता. 22/11/2014 रोजी T.Mox 250 mg दिल्याचे सदर प्रमाणपत्रावरुन दिसून येते. तसेच सामनेवाले यांनी ता. 24/11/2014 रोजी वरील औषधे तक्रारदार यांना दिल्याबाबतचे मेडिकल प्रिस्क्रीपशन दिले आहे. सदर मेडीकल प्रिस्क्रीप्शनची प्रत मंचात दाखल आहे.
तक्रारदार यांना सैफी हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचारांकरीता दाखल केल्यानंतर सुरवातीच्या काळात त्यांच्या (initially patient was in sepsis with neutropenia) पांढ-या पेशींची कमतरता असल्याचे नमुद केले आहे.
वैद्यकिय शास्त्रानुसार
Neutropenia means a Low neutrophil count (Low number of white blood cells) white blood cells are important in fighting infection.
Sepsis is a major cause of mortality during neutropenic phase after intensive cytotoxic therapies.
Stevens Johnson Syndrome (SJS) and Toxic epidermal recrolysis (TEN) are now believed to be variants of the same condition, distinct from erythema multiforme.
SJS / TEN is a very rare, acute serious and potentially fatal skin reaction in which there is sheet like skin and mucosal loss.
सैफी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी ता. 10/12/2014 रोजी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार तक्रारदार यांना हॉस्पीटलमध्ये (ता. 23/11/2014 रोजी) त्वचेवर रॅशेस आल्याचे कारणास्तव दाखल केले होते. (Exanthem & Ulceration of lips) त्यावेळी तक्रारदार यांच्या पेशींची कमतरता होती (Sepsis with neutropenia) परंतु नंतर तक्रारदार यांची प्रकृती स्थिर झाली.
सैफी हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या सदर प्रमाणपत्रानुसार सामनेवाले यांनी दिलेल्या T. Oflox T.mox या औषशामुळे तक्रारदार यांना (Exanthem & ulceration) झालो तसेच (Sepsis with neutropenia) पांढ-या पेशी कमी झाल्या होत्या. तक्रारदार यांच्या सदर वैद्यकीय तपासणीनुसार तक्रारदारांना Toxic Epidermal Necrolysis / Steven Johnson Syndrome with left eye corneal perforation” निष्पन्न (diagnosed) झाल्याचे नमुद केले आहे.
वरील मेडीकल रेकॉर्डचे अवलोकन केले असता तक्रारदारांना सैफी हॉस्पीटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. त्वचेवर रॅशेस आले होते, रक्तामधील पांढ-या पेशींची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना हॉस्पीटलच्या Intensive care Unit (ICU) मध्ये वैद्यकीय उपचार दिल्याचे दिसुन येते.
इ) तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता. 21/11/2014 रोजी T.Oflox 200 gm हे औषध दिल्यानंतर त्यांच्या त्वचेवर रॅशेस निर्माण झाले. तक्रारदार यांनी ता. 22/11/2014 रोजी सामनेवाले यांचेकडे जावून या संदर्भात माहीती दिली. सामनेवाले यांनी ता. 22/11/2014 रोजी T.mox 250 gm औषध दिले. त्यानंतर ता. 23/11/2014 रोजी तक्रारदार यांची प्रकृती गंभीर झाली असता त्यांनी सामनेवाले यांना संपर्क केला तथापी ता. 23/11/2014 रोजी रविवार असल्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तपासणी करण्यासाठी नकार दर्शवला. अशा परिस्थितीत तक्रारदार यांना पुढील उपचारासाठी सैफी हॉस्पीटलमध्ये ICU वार्डात दाखल केल्याचे दिसुन येते. तक्रारदार यांची प्रक्रृती ता. 23/11/2014 रोजी जास्त खराब झाल्यानंतर सामनेवाले डॉक्टर तक्रारदार यांची तपासणी करण्यासाठी आले नाहीत अथवा दुस-या हॉस्पीटलमध्ये जाण्याबाबतचे योग्य वैद्यकीय मार्गदर्शनही केले नाही. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 ते 3 वर्षापासुन सामनेवाले डॉक्टरांकडुन नियमीतपणे किरकोळ आजारासाठी तक्रारदार औषधोपचार घेत होत्या. त्यामुळे तक्रारदार यांना कोणत्या औषधांची अॅलर्जी आहे किंवा काय ? याबाबत सामनेवाले यांना ज्ञात होते. प्रस्तुत प्रकरणात सामनेवाले यांना जाहीर प्रकटनाद्वारे नोटिसची बजावणी करुनही गैरहजर असुन त्याचे तर्फे कोणताही खुलासा अथवा आक्षेप दाखल नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा पुरावा अबाधित आहे.
सैफी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या ता. 27/11/2014 व ता. 10/12/2014 रोजीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार ता. 23/11/2014 रोजीपासून तक्रारदार यांची प्रकृती गंभीर झाल्याचे दिसून येते. सामनेवाले यांनी दिलेल्या औषधोपचारामुळे तक्रारदार यांच्या संपुर्ण त्वचेवर रॅशेस आले, डाव्या डोळयाला गंभीर इजा झाली (Left Eye Corneal Perforation) आहे. तक्रारदार यांनी या संदर्भातील फोटो मंचात दाखल केले आहेत. सदर फोटोवरून तक्रारदार यांना त्वचेच्या गंभीर आजार झाल्याचे तसेच डाव्या डोळयावर जास्त परिणाम झाल्याचे दिसून येते.
ई) तक्रारदार यांच्या “skin biopsy report” मधील observation प्रमाणे सैफी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी ता. 10/12/2014 रोजी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये खालील प्रमाणे नमुद केले आहे.
Patient’s skin biopsy report is suggestive of entire epidermis is necrotic with ballooned keratinocytes and clumping of melanin and has separated from the dermis which has significant inflammatory infiltrate. Patient is jointly under the care of Dermatologist _ Dr. Shenaz Arsiwala and Dr. Hasmukh Shroff, Ophthalmologist Dr. O Maskati and Dr. Sandip Jain – plastic Surgeon
वरील वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार तक्रारदाराना त्वचेचा गंभीर आजार झाल्यामुळे Dermatologist - डॉ. शेनाझ अरासवाला व डॉ. श्रॉफ यांचकडे तसेच Ophthalmologist - डॉ भस्कारी आणि plastic surgeon - डॉ. संदीप जैन यांचेकडे jointly वैद्कीय उपचार चालू असल्याचे नमुद केले आहे.
तक्रारीमधील दाखल पुराव्यावरुन, वैद्यकीय प्रमाणपत्रावरून तक्रारदार यांना सामनेवाले यांनी दिलेल्या औषधामुळे डेव्हलप झालेल्या त्वचेच्या आजाराचे गंभीर स्वरूप आढळून येते. तक्रारादारांना यामुळे मानसिक व शारिरीक त्रास झाला, तसेच पुढील वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून त्वचेच्या आजारामुळे संपुर्ण शारीराला व डोळयाला गंभीर स्वरुपाची हानी झाल्याचे दिसून येते.
तक्रारदाराचे झालेले सदर नुकसान पैश्याने भरुन काढणे अशक्य आहे. तक्रारदारांचे नेमके वय तक्रारीमध्ये नमुद नाही. तथापी तक्रारदाराच्या या घटनेची बातमी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्याबाबत प्रत मंचात दाखल आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांचे वय 28 वर्षे नमुद केले आहे. तक्रारदारांचे पुढील आयुष्यावर सदर आजाराचे परिणाम निश्चितच झाले आहेत असे तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन दिसून घेते.
उ) तक्रारदारांनी त्यांचे समर्थनार्थ खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
1) Parmanand Katara V/s. Union of India AIR 1989 SC 2039. मा. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय.
वरील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयातील खालील परिच्छेदांचे आधार तक्रारदार यांनी घेतले आहेत
The secretary of the medical council of India in his affidavit referred to clause 10 & 13 of the code of medical ethics drawn up with the approval of the central Govt., u/s. 33 of the Act by the Council, wherein it has been said.
13) The patient must not be neglected, a physician is free to choose whom be will serve. He should however, respond to any request for his assistance in an emergency or whenever temperate public opinion expects the service. Once having undertaken a case, the physician should not neglect the patient nor should he withdraw from the case without giving notice to the patient his relatives or his responsible friends sufficiently long in advance of his withdrawal to allow them to secure another medical attendant. No provisionally or fully registered medical practitioner shall willfully commit an act of negligence that may deprive his patient or patients from necessary medical case.
वरील न्यायनिवाडा प्रसतुत प्रकरणात लागु होतो असे मंचाचे मत आहे.
2) मा. राष्ट्रीय आयोग दिल्ली यांनी - Revision Petition 2069/10
Appolo Hospital V.s M. Sathyanarayan मध्ये मा. 28/04/2011 रोजी दिलेल्या न्यायनिवाड्या मध्ये खालील प्रमाणे नमुद केले आहे.
Rules made by Medical Council of India
1.3 Maintenance of medical records
1.3.1 _ Every physician shall maintain the medical records pertaining to his / her indoor patients for a period of 3 yrs from the date of commencement of the treatment in a standard Proforma laid down by the medical council of India and attached as Appendix – 3.
1.3.2 - If any request is made for medical records either by the patients / authorized attendant authorities involved, the same may be duty acknowledged and documents shall be issued within the period of 72 hours.
तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकणात मा. सर्वोच्च न्यायालयाचे खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
1) Indian Medical Association V/s. V.P Shantha 1995(6) SCC 651
2) Malaya Kumar Ganguly V/s Dr. Sukumar Mukharjee
3) NIZAM Institute of medixal science V/s. Prasanth S. Dhanka (2009)(3)AVC 2151 (1)(SC)
वर नमुद केलेले तीनही न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकणात लागु होतात असे मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी सैफी हॉस्पीटलचे रु. 5,58,776.67 एवढया रकमेचे ता. 23/11/2014 ते ता. 26/12/2014 रोजीचे वैद्यकीय बील दाखल केले आहे. तक्रारदार यांनी सदर कालावधीत सामनेवाले यांनी दिलेल्या औषधामुळे डेव्हलपर्स झालेल्या त्वचेवरील गंभीर आजाराकरीता सैफी हॉस्पीटल येथे वैद्यकीय उपचार घेतल्याची बाब तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन स्पष्ट झाले आहे.
सबब सदर वैद्यकीय बीलाची रक्कम तक्रारदार यांना देय आहे असे मंचाला वाटते.
तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन रु. 10,00,000/- नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी केली आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारांना वैद्यकीय सेवा देण्यात कसुरी केल्याची बाब सैफी हॉस्पीटल येथील डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन स्पष्ट झाली आहे.
सामनेवाले हे तक्रारदार यांचे फॅमेली डॉक्टर असुन किरकोळ आजाराकरीता त्यांना नियमितपणे 2 – 3 वर्षापासुन औषधोपचार करत होते. त्यामुळे तक्रारदार यांच्या प्रकृतीबाबत संपुर्ण माहीती सामनेवाले यांना ज्ञात होती. तसेच ता. 21/11/2014 रोजी दिलेल्या औषधामुळे तक्रारदार यांचे काही दुष्परिणाम दिसून आल्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विशेष काळजीने पुढील वैद्यकीय उपचार करणे बंधनकारक होते. तसेच तक्रारदार यांचा आजारासंदर्भातील उपचार त्यांना सहजरित्या शक्य होत नसल्यास पुढील उपचाराबाबत योग्य ते वैद्कीय मार्गदर्शन (medical advice) देणे सामनेवाले यांचेवर बंधनकारक होते. सामनेवाले यांनी प्रिस्क्रीप्शन दिल्याशिवाय त्यांचे जवळचे औषध तक्रारदार यांना दिल्यामुळे व सामनेवाले यांनी ता. 21/11/2014 व ता. 22/11/2014 रोजी तक्रारदार यांनी तपासणी करुन नेमके काय निदान केले होते ? कोणते औषध त्यांना दिले होते याबाबी संदर्भात रेकॉर्ड ठेवले नाही. तसेच तक्रारदारांना ता. 22/11/2014 रोजी औषधाची Reaction झाल्याचे दिसूनही सामनेवाले यांनी सदर बाबींची दखल घेवुन तात्काळ उपाय योजना केली नाही. पुढील वैद्यकीय उपचाराबाबत मार्गदर्शन केले नाही. या सर्व सामनेवाले यांची सदरची कृती वैद्यकिय सेवेमध्ये कसुरी केल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांना औषधाच्या दुष्परिणामामुळे (Reaction) झालेल्या गंभीर त्वचेच्या आजारामुळे सैफी हॉस्पीटल येथे वैद्यकीय उपचार घ्यावे लागले, अनेक तपासण्या कराव्या लागल्या तसेच, मुंबई येथे राहण्याचा खर्च त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकरीता करावा लागला, तसेच सदर आजारामुळे त्यांच्या प्रकृतीवर, डाव्या डोळयावर कायम स्वरुपाचा परिणाम झाल्याचे दिसुन येते. सबब झालेल्या पुढील परिणामांची दखल घेतली असता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रु. 5,00,000/- नुकसान भरपाईची रक्कम व तक्रारीचा खर्च रु. 20,000/- देणे न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे.
6. सबब उपरोक्त चर्चेवरुन व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. . “या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
आ दे श
1. तक्रार क्र. 668/2015 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष वैद्यकीय सेवा दिल्याचे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना वैद्यकीय बीलाची रक्कम रु. 5,58,776.00 (अक्षरी रु. पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे शहात्तर फक्त) ता. 26/12/2014 पासून ता. 31/01/2017 पर्यंत 6% व्याजदराने द्यावी विहीत मुदतीत अदा न केल्यास सदर रक्कम ता. 01/02/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदराने द्यावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना नुकसान भरपाई रक्कम रु. 5,00,000/- (अक्षरी रु. पाच लाख फक्त), तसेच तक्रारीचा खर्चाची रक्कम रु. 10,000/- (फक्त रु. दहा हजार फक्त) ता. 31/01/2017 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास सदर रकमा ता. 01/02/2017 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 9% व्याजदराने द्याव्यात.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम अंतर्गत विनियम 2005 मधील विनियम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.