ग्राहक तक्रार अर्ज क्र.75/2007
ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.
अंतीम आदेश दि.30/08/2011
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
1) श्री.संदीप गोविंद कुलकर्णी, तक्रारदार
2) श्रीमती प्रिती संदीप कुलकर्णी, (अँड.जे.व्ही.तारगे)
दोन्ही रा.रुम नं.73, बिल्डींग नं.4,
एम.एच.बी.कॉलनी, सातपूर,नाशिक.
विरुध्द
स्टेट बँक ऑफ इंडिया, सामनेवाला
सातपूर इंडस्ट्रीय एरीया, (अँड.श्रीमती एस.एस.पुर्णपात्रे)
सातपूर ब्रँच, नाशिक-422007.
(नोटीस बजावणी श्री.प्रवीण चिटणीस,बँकेचे चिफ मॅनेजर यांचेवर करावी)
(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांनी सामनेवाले यांचेकडून म्हणून चेकच्या रक्कमेची नुकसान भरपाई रु.56,000/- मिळावी, आर्थीक नुकसान भरपाईपोटी रु.50,000/- मिळावेत. वरील दोन्ही रकमेवर 12टक्के प्रमाणे व्याज मिळावे, नोटीस खर्च रु.1000/- मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी या कामी पान क्र.77 लगत लेखी म्हणणे व पान क्र.71 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून चेकची रक्कम व्याजासह वसूल होवून
मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी, नोटीस खर्चापोटी व अर्जाचे
तक्रार क्र.75/2007
खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांचे वतीने पान क्र.82 लगत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आलेला आहे व अँड.जे.व्ही.तारगे यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांचे वतीने अँड.श्रीमती एस.एस.पुर्णपात्रे यांनी युक्तीवाद केलेला आहे
अर्जदार यांचे नावे सामनेवाला यांचे बँकेत संयुक्त बचत खाते क्र.10381618803 हे खाते उघडलेले होते व या खात्यावर चेकची सुविधा दिलेली होती ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत संयुक्त बचत खाते क्र.10381618803 चा खाते उतारा दाखल केलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 चा खातेउतारा याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी सामनेवाला बँकेबरोबर जो पत्रव्यवहार केलेला आहे त्यानुसार चेकबुक व पासबुक अर्जदार यांनी स्कुटरच्या डिक्कीमध्ये ठेवलेले होते व ते चोरीला गेले आहे. यापैकी दोन बेअरर चेक्स सामनेवाला बॅंकेकडे वटवण्यासाठी आलेले होते. चेक वटण्याकरीता सहीबाबत योग्य ते व्हेरीफिकेशन घेवून दि.14/03/2007 रोजी दुपारी अडीच वाजता चेकची रक्कम, चेक घेवून येणा-या व्यक्तीस अदा केलेली आहे. चेक वटवितांना सामनेवाला बँकेने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला यांचे लेखी म्हणण्याबाबत अर्जदार यांनी पान क्र.20 लगत लेखी प्रतिउत्तर दाखल केलेले आहे व त्यामध्ये सामनेवाला यांचे लेखी म्हणण्यामधील संपुर्ण हकिकत अर्जदार यांनी नाकारलेली आहे. तसेच हरवलेले दोन्ही चेक्स क्र.076336 व क्र.076337 या दोन्ही चेक्सवरील सही अर्जदार यांची नाही असे म्हणणे मांडलेले आहे.
या कामी प्रस्तुत तक्रार अर्जाचा प्रथम निकाल दि.20/10/2007 रोजी झालेला होता व तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात आलेला होता. परंतु त्या निकालपत्राविरुध्द सामनेवाला यांनी मा.राज्य आयोग मुंबई यांचेकडे प्रथम अपील क्र.1556/2007 चे अपील दाखल केलेले होते. या अपीलाचा अंतीम निकाल
तक्रार क्र.75/2007
दि.27/04/2010 रोजी झालेला असून अपील मंजूर करण्यात आलेले आहे व पुन्हा मुळ तक्रार अर्ज फेरसुनावणीस नेमण्यात आलेला आहे व हरवलेले चेक्स व ज्या हरवलेल्या चेक्सच्या आधारावरुन रक्कम बँकेतून काढण्यात आली ते चेक्स् व स्पेसीमन सिग्नेचर कार्ड यांची तपासणी हस्तातर तज्ञाकडून करुन घेण्यात यावी असा निर्णय अपिलामध्ये देण्यात आलेला आहे
अपिलातील आदेशाप्रमाणे प्रस्तुत तक्रार अर्जाचे कामकाज पुन्हा फेरचौकशीसाठी नेमण्यात आलेले आहे.
या कामी सामनेवाला यांचेकडून पान क्र.35 लगत मुळ अस्सल चेक क्र.076336 व क्र.076337 हे दोन चेक्स् व मुळ अस्सल नमुना हस्ताक्षर दाखल करण्यात आलेले आहेत. मा. राज्य आयोग मुंबई यांचे अपिलातील निर्देशानुसार हरवलेले दोन्ही मुळ अस्सल चेक्स श्री.पी.एन.पारीख हस्ताक्षर तज्ञ औरंगाबाद यांचेकडे पाठविण्यात आलेले होते. श्री.पी.एन.पारीख यांचा दि.28/03/2011 रोजीचा अहवाल व त्यासोबतची कागदपत्रे या कामी पान क्र.102 लगत दाखल आहेत. पान क्र.102 चे अहवालाचा विचार होता दोन्ही चेक्सवरील सहया व मुळ स्पेसीमन सिग्नेचर कार्डवरील सही यामध्ये फरक दिसून आलेली आहे. दोन्ही चेक्सवरील सहयामध्ये फरक आहे. दोन्ही चेक्सवरील सहया हया बोगस व बनावट आहेत हे स्पष्ट झालेले आहे. पान क्र.102 चे अहवालाचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचे खात्यावरील दोन्ही चेक्स् वटवितांना योग्य ती खबरदारी घेतलेली नाही हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.35 लगतचे चेक क्रमांक 076336 वरील रक्कम रु.46,500/- व चेक क्र.076337 वरील रक्कम रु.9500/- अशी एकूण रक्कम रु.56,000/- इतकी रक्कम अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
रक्कम रु.56,000/- इतकी मोठी रक्कम सामनेवाला यांच्या चुकीच्या कृत्यामुळे अर्जदार यांना दि.14/03/2007 मिळालेली नाही यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना आर्थीक त्रास सहन करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून आर्थीक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.56,000/- या रकमेवर दि.15/03/2007 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रार क्र.75/2007
सामनेवाला यांचेकडून चेकची रक्कम परत मिळावी म्हणून अर्जदार यांनी सामनेवाला पान क्र.25, पान क्र.26 व पान क्र.30 प्रमाणे पत्रव्यवहार व पान क्र.31 व पान क्र.32 प्रमाणे अँड.जयंती एस.दुप्पलीवार यांचेमार्फत दि.30/03/2007 रोजी नोटीस पाठवलेली आहे. यानंतरही सामनेवाला यांचेकडून रक्कम मिळालेली नाही. यामुळे अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच नोटीस पाठवण्यासाठी व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्च करावा लागलेला आहे. याचा विचार करता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5000/-, नोटीस खर्चापोटी रु.750/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी व वकिलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार क्र.1 व 2 यांना एकत्रीत रित्या खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
अ) रक्कम रु.56,000/- द्यावेत व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवर दि.15/3/2007 पासून संपुर्ण रक्कम फिटेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
ब) मानसिक त्रासापोटी रु.5000/- द्यावेत.
क) नोटीस खर्चापोटी रु.750/- द्यावेत.
ड) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.
(आर.एस.पैलवान) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-30/08/2011