अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक :एपीडीएफ/86/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक : 09/03/2005
तक्रार निकाल दिनांक : 28/12/2011
1. एमक्यूअर फार्मास्यूटीकल्स लिमीटड, ..)
पत्ता :- स.नं. 255/2, हिंजवडी, ता. मुळशी ..)
जिल्हा – पुणे – 410 027. ..)
आर.बी. ईस्टेट, दापोडी, पुणे – 411 012. ..)
..)
2. दि ओरीएंटल इन्श्यूरन्स कंपनी लिमीटेड, ..)
विभागीय कार्यालय क्र. 1, जीवन दर्शन, तिसरा मजला, ..)
एन्.सी. केळकर रोड, नारायण पेठ, पुणे – 30. ..)... तक्रारदार
विरुध्द
डोअर्स ट्रान्सपोर्ट लिमीटेड, ..)
सेक्टर नं. 23, प्लॉट नं. 117, ..)
ट्रान्सपोर्ट नगर, निगडी, पुणे – 411 044. ..)... जाबदार
********************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2005 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/67/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/86/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2008 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथवा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदारांना मंचाने नोटीस काढली असता तक्रारदार नोटीस मिळूनही मे. मंचासमोर हजर राहिले नाहीत. सबब सदरहू प्रकरण चालविण्यामध्ये तक्रारदारांना स्वारस्य नाही या निष्कर्षाअंती प्रस्तूतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – 28/12/2011