तक्रार क्रमांक – 499/2008 तक्रार दाखल दिनांक – 18/11/2008 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी - 01 वर्ष 04 महिने 29 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर मे. आर.एन.के फ्लूईड कंट्रोलस गाला क्र. 1, म्हात्रे कंपाऊंड, सोनार पाडा, मानपाडा, डोंबिवली (पुर्व) 421 201 जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द 1. डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., मधुकुंज, प्लॉट नं. P/52, एम.आय.डी.सी, फेज 2, कल्याण-शिल रोड, सोनार पाडा, डोंबिवली(पु) 421 201. 2. दि ब्रांच मॅनेजर डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., नांदिवली रोड ब्रांच, डोंबिवली(पु) 421 201, जिल्हा - ठाणे. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल शिवप्रसाद शेट्टी वि.प तर्फे वकिल श्री.वैभव खिस्ती आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. सदस्या सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार मे. आर.एन.के फ्लुईड कन्ट्रोल तर्फे श्री.आर.डि.जोशी यांनी डोंबिवली नगर सहकारी बँक लि., व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे. यात त्यांनी विरुध्द पक्षकारा कडुन मुदत उलटुन गेलेल्या चेक संबंधी खात्यात तेवढी रक्कम जमा नसल्याबद्दल कारण दिल्यामुळे जो मानसिक त्रास भोगावा लागला त्याबद्दल तक्रारकर्ता यांनी नुकसान भरपाई मागितली आहे.
2. तक्रारकर्ता यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मे.एम.एच. एंटरप्रायजेस यांच्या नावे दि.03/06/2006 या तारखेचे 4 धनादेश अनुक्रमे .. 2 .. 2646, 2647, 26244, व 26245 दिले होते परंतु मे.एम.के.ऐंटरप्रायजेस यांनी सदरचे धनादेश विरुध्द पक्षकार बँकेकडे सहा महीन्याची चेकची validity मुदत ओलांडुन गेल्यावर जमा केले त्यामुळे सदरचे चेक 5/12/2006 रोजी dishonour झाले व विरुध्द पक्षकार ने 'Exceeds Arrangement' असा रिमार्क मारला. तक्रारकर्ता यांची सदर बॅकेकडे रु.3,00,000/-रकमेपर्यंतची क्रेडीट फॅसीलीटी होती. सदर रिमार्कामुळे मे. एम.के.एंटरप्रायजेस यांनी तक्रारकर्ता यांचे विरुध्द u/s 138 नुसार क्रिमिनल कंम्प्लेंट दाखल केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या धंद्यावर व व्यक्तीमत्वावर जो धब्बा लागला त्याचा तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. विरुध्द पक्षकार बँकेने तक्रारकर्ता यांना पाठवलेले पत्र दि.10/09/2008 यामध्येही स्पष्ट नमुद केलेले आहे कि, The said cheques were presented for payments after six months from the date of issue i.e after the said cheques were become stale and outdated and as such even you would have maintained the sufficient balance in your account the said cheques were bound to be dishououred being outdated cheques.
3. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.20/01/2009 रोजी निशाणी 6 वर दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी सदरचे चारही धनादेश मुदत बाह्य असल्याचे कबुल केले आहे परंतु सदर धनादेश डिपॉझीट केल्यावर तक्रारकर्ता यांची कॅश क्रेडिट फॅसीलीटीचे लिमिट ओलांडले जात होते. म्हणजे ते तीन लाखापेक्षाही जास्त होत होते. म्हणुन बँकेने सदरचे कारण म्हणजे 'Exceeds Arrangement' असे तक्रारकर्ता यांच्या चारही dishonour झालेल्या चेकसंबंधी दिले व सदर चेकस डिपॉझीट करुन घेणे यामध्ये विरुध्द पक्षकार बँकेच्या सेवेत कमतरता किंवा त्रृटी होऊ शकत नाही.
4 . उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावाजन्य कागदपत्रे व लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद पडताळुन पाहीले व मंचापुढे एकमेव प्रश्न उपस्थित होतो. विरुध्द पक्षकार 1 व 2 यांच्या सेवेत निष्काळजीपणा व त्रृटी किंवा कमतरता आढळते का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारकर्ता यांनी मे.एम.के.एंटरप्रायजेस यांना दिलेले चारही चेक्स दि.03/06/2006 रोजीचे होते. परंतु सदरचे धनादेश सहा महिन्यानंतर
.. 3 .. म्हणजे मुदतबाह्य झाल्यानंतर बँकेमध्ये डिपॉझीट केले गेले होते. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या क्रेडीट फॅसीलीटीत, खात्यात जरी पुर्ण रक्कम असती तरीही सदरचे चेक वटवता आलेच नसते. तसेच चारही धनादेश stale and outdated झाले असल्याचा कबुली जबाब विरुध्द पक्षकार नं.2 बँकेने त्यांच्या दि.10/09/2008 मधील पत्रात दिलेलाच आहे. त्यामुळे चेक डिपॉझिट करुन घेण्यात बँकेच्य सेवेत त्रृटी, कमतरता किंवा निष्काळजीपणा आढळत नाही परंतु सदर चेकस वटवता आले नसल्याचे जे कारण विरुध्द पक्षकार यांनी नमुद केले 'Exceeds Arrangement' चुकीचे आढळते. यापेक्षा विरुध्द पक्षकार यांनी 'Cheque stale and outdated' असे कारण देणे रास्त ठरले असते. मंचाच्या मते चेक वटवता न येण्याचे योग्य कारण नमुद करण्यात बँकेच्या सेवेत त्रृटी व निष्काळजीपणा आढळतो म्हणुन हे मंच खालील अंतिम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र.499/2008 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार 1 व 2 यांनी तक्रारदारास या तक्रारीचा खर्च रु.500/-(रु.पाचशे फक्त) द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार नं.1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या किंवा स्वतंत्रपणे तक्रारकर्तीयास सेवेतील निष्काळजीपणा बद्दल नुकसान भरपाई व मानसिक त्रासाचे रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त)द्यावेत या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याच्या आत करावे अन्यथा तदनंतर वरील रकमेवर 9% व्याज द्यावे लागेल. 3.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 17/04/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|