जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/03. प्रकरण दाखल तारीख - 04/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 29/07/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. वसंत पि. आनंदराव कल्याण वय 26 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा.नायगांव ता.नायगांव जि. नांदेड विरुध्द. 1. डॉ.लक्ष्मीकांत बजाज बजाज हॉस्पीटल कॉम्प्लेक्स, तरोडेकर भाजी मार्केटच्या पाठीमागे, वजिराबाद, नांदेड. गैरअर्जदार 2. शाखा व्यवस्थापक, नॅशनल इन्शूरन्स कंपनी नगिना घाट रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.पी.आर.अग्रवाल गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकिल - अड.एस.ऐ.पाठक निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार यांचा मूलगा प्रथम यांच्या जन्मानंतर दोन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर अचानक त्यांच्या शरीरामध्ये ताप राहत होता. त्यांस गैरअर्जदार यांच्याकडे दि.11.01.2009 रोजी अडमिट केले. अर्जदार यांचे मूलांचे विवीध तपासण्या केल्या. अर्जदार यांना विविध प्रकारचे औषधी मेडीकल मधून आणावयास भाग पाडले व अर्जदार यांचे मूलास मेंदू ज्वर झाला आहे असे सांगितले. त्यासाठी अर्जदाराच्या मूलास काही दिवस दवाखान्यातच ठेवावे लागले. अर्जदार यांच्या मूलाला दि.11.01.2009 रोजी गैरअर्जदार यांनी अडमिट करुन घेतल्यापासून त्यानंतर दि.24.01.2009 पर्यत गैरअर्जदार यांनी इलाज केला. या 14 दिवसांच्या काळातील खर्चाबददल सर्व पावत्या तक्रारी सोबत जोडलेल्या आहेत. गैरअर्जदार यांनी 14 दिवस इलाज करुनही अर्जदाराच्या मूलाच्या तब्येतीत काही सूधारणा होत नव्हती. तरी देखील गैरअर्जदार यांनी काही घाबरु नका लवकरच तबीयेत सूधारुन जाईल अशी हमी देऊ लागले. गैरअर्जदार यांना अर्जदार यांचे मूलाबाब योग्य निदान शेवटपर्यत करु शकले नाहीत. शेवटी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे मूलास हैद्राबाद येथे घेऊन जावे लागेल व तेथेच इलाज होऊ शकतो असे सांगितले.त्याबाबत त्यांनी हैद्राबाद येथील डॉक्टरास पञ दयावे असे सांगितले पण त्यांनी पञ दिले व उडवाउडवीची उत्तरे दिली. अर्जदार यांनी नांदेड येथील विवेकानंद बाल रुग्णालय येथे डॉ.रेंगे यांचेकडे इलाजासाठी अर्जदाराच्या मूलास नेले व तेथे इलाज चालू ठेवला. तेथे नेल्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर मूलाचे तब्येतीमध्ये सूधारणा दिसू लागली. डॉ. रेंगे यांनी केलेल्या इलाजामूळे फार लवकर गूण आला व अर्जदार यांचे मूलाची तब्येत अतीशय ठणठणीत झाली. अर्जदार यांना मूलासाठी परत खर्च करावा लागला व गैरअर्जदार यांचेकडे जवळपास रु.1,00,000/- खर्च करावा लागला. अर्जदाराच्या मूलाच्या इलाजा मध् गैरअर्जदार यांनी निष्काळजीपणा केल्यामूळे अर्जदाराचे प्रचंड नूकसान झाले. अनावश्यक लागलेल्या खर्चास आपण जबाबदार असल्यामूळे सदरील रक्कम परत करावी अशी वेळोवेळी विनंती केली परंतु गैरअर्जदार यांनी आपणास काय करावयाचे ते करा असे म्हणाले. डॉ. रेंगे यांचेकडून पूर्वीचा इलाज चूक झाल्याबददल लेखी दयावे असे मागितले परंतु त्यांनी तसे लेखी दिले नाही.त्यामूळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, अर्जदारास अनावश्यक झालेल्या खर्चाबददल रु.1,00,000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत व गैरअर्जदार यांनी केलेल्या चूकीच्या सेवेमूळे व निष्काळजीपणाबददल मिळालेल्या शारीरिक आर्थिक ञासापोटी रु.50,000/- मिळावेत तसेच दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांचे मूलाचे जन्मानंतर दोन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर शरीरामध्ये ताप राहत होता. अर्जदार यांनी त्यांचे मूलाला दि.11.01.2009 रोजी शरीक केले होते. अर्जदार यांनी त्यांचा मूलगा यांस जीवनज्योत बाल रुग्णालय डॉ. मनूरकर नांदेड यांचे मार्फत आर्शीवाद बाल रुग्णालय नांदेड यांचेकडे दि.11.01.2009 रोजी शरीक केले. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे येण्यापूर्वी मूलास जीवनज्योत बाल रुग्णालय यांचेकडे दोन दिवस इलाज करुन नंतर गैरअर्जदाराकडे नेले होते. हे म्हणणे खोटे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदार यांना त्यांच्या मूलास मेंदूज्वर झाला आहे असे सांगितले. अर्जदार यांचा मूलगा दि.11.1.2009 ते 24.1.2009 पर्यत गैरअर्जदार यांचे दवाखान्यात शरीक होता व गैरअर्जदार यांची संमती नसताना मूलास त्यावर पूर्ण इलाज होण्यापूर्वीच अर्जदार यांनी दि.24.1.2009 रोजी स्वतःच्या जिम्मेदारीवर घेऊन गेले. परंतु हे म्हणणे खोटे आहे औषधी तसेच तपासणीसाठी रु.1,00,000/- खर्च आला.ज्या पावत्या दाखल केल्या आहेत त्यात गैरअर्जदारास फिस दिली किंवा गैरअर्जदाराच्या रुग्णालयात खर्च केला असे नाहीत.हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदाराच्या मूलास हैद्राबाद येथे घेऊन जाण्यास सांगितले असा अर्जदाराच्या मूलास कूठेही घेऊन जाण्याबददल सल्ला दिलेला नाही. अर्जदाराने डॉ. रेंगे येथे शरीक केल्यानंतर काय इलाज केला ते केसपेपर व झालेल्या खर्चाच्या पावत्या मूददामहून दाखल केलेल्या नाहीत. गैरअर्जदाराने जो इलाज केला तो बरोबर होता हे दाखविण्यासाठी या जवाबसोबत बालरोग तज्ञ डॉक्टर श्री. एन.भास्कर नांदेड यांचा अभिप्राय दाखल केला आहे. अशा केसेस मध्ये रुग्णास इलाज चालू असताना त्यांस कमीत कमी 1 ते 2 आठवडे सुधारणा दिसण्यास वेळ लागतो. हे म्हणणे खोटे आहे की, अर्जदार यांनी डॉ. रेंगे यांचेकडून गैरअर्जदाराकडून चूकीचा इलाज झाल्याबददल लेखी माहीती मागितली होती.अर्जदाराने गैरअर्जदाराकडून मूलाला केलेल्या इलाजा बाबत ञूटी केली किंवा कसूरता केली या बाबत कोणताही पूरावा दाखल केलेला नाही. आर्शीवाद बाल रुग्णालय हे नोंदणीकृत भागीदारी संस्था आहे व अजून चार डॉक्टर सदरील भागीदारी संस्थेचे भागीदार आहे त्यामूळे अर्जदार यांनी त्यांना सूध्दा प्रतिवादी करणे जरुरीचे होते पण तसे अर्जदाराने केलेले नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने केस सीपीजे 2009 (1) पान 32 मध्ये असे म्हटले आहे की, अर्जदाराने तक्रारीमध्ये केलेल्या आजारपणा वीषयी तज्ञ आहेत डॉक्टरचे मत घेणे आवश्यक आहे.अर्जदार यांनी जीवनज्योत रग्णालय येथे दि.11.1.2009 रोजी शरीक केले होते ही बाब मूददामहून लपवून ठेवलेली आहे म्हणजे अर्जदार हे स्वच्छ हाताने समोर आलेले नाहीत. अर्जदाराकडून गैरअर्जदारांने मूलावर इलाज करण्यापूर्वी संमती पञ घेऊन मगच इलाज केला आहे.अर्जदाराचे मूलाचे सिटीस्कॅन केले होते ही बाब अर्जदाराने तक्रारीमध्ये नमूद केलेली नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराची संमती न घेताच मूलास विवेकांनद बाल रुग्णालय येथे दि.24.1.2009 रोजी घेऊन गेले.अर्जदाराने जे काही कागदपञ दाखल केले त्यावरुन जो इलाज चालू होता तोच इलाज त्यांनी केला. गैरअर्जदार यांना व्यक्तीशः वाईटहेतूने गैरअर्जदार करुन खोटी फिर्याद दाखल केली आहे म्हणून अर्जदाराची तक्रार खारीज करावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी बोगस तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी सबळ पूरावा दाखल करुन तक्रार सिध्द करावी. अर्जदार यांचा मूलगा शरीक होता या बददल त्यांना माहीती नाही. अर्जदार व डॉक्टरा मध्ये असलेल्या संबंधा बाबत त्यांना माहीती नाही. अर्जदार यांनी या बाबत गैरअर्जदार यांना कोणतीही नोटीस अथवा पञ दिलेले नाही. तक्रारी मध्ये गैरअर्जदार क्र.2 विरुध्द कोणतेही आरोप केलेले नाही किंवा त्यांचे सेवेत ञूटी आहे असे म्हटलेले नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार त्यांचे विरुध्द खर्चासहीत फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द त्यांनी जाणूनबूजून चूकीचे निदान करुन अर्जदाराचा मूलगा प्रथम यांस त्यांचेकडे 14 दिवस शरीक करुन ठेवले व त्यानंतरही गैरअर्जदार यांनी इलाज होऊ शकत नसल्याने त्यांना हैद्राबाद जाण्याचा सल्ला दिला. अर्जदार यांचा मूलगा प्रथम यांला जन्मानंतर दोन महिन्याने शरीरात ताप राहत होता म्हणून त्यांनी दि.11.01.2009 रोजी शरीक केले व दि.24.1.2009 रोजी गैरअर्जदार यांचे दवाखान्यातून त्यांला विवेकानंद रुग्णालय येथे डॉ. रेंगे यांचेकडे नेण्यात आले. गैरअर्जदार यांनी यावर आक्षेप घेत अर्जदाराचे सर्व म्हणणे खोटे असून गैरअर्जदार यांचे रुग्णालयामध्ये अर्जदाराने त्यांचा मूलगा प्रथम यांला इलाजासाठी पहिल्यादा आणले नाही. अर्जदाराने त्यांचे तक्रारीत खरी माहीती लपवून ठेवली आहे. याउलट अर्जदाराने त्यांचा मूलगा प्रथम यांस आर्शीर्वाद रुग्णालय येथे दि.11.01.2009 रोजी शरीक केले. यापूर्वी जीवनज्योत बाल रुग्णालय डॉ. मनूरकर यांचे रुग्णालयात दि.10.1.2009 रोजी 12 वाजता शरीक केले होते म्हणजे दूसरे दिवशी दि.11.01.2009 रोजी राञी 10 वाजता आर्शीर्वाद रुग्णालयात पाठविले. यासाठी दि.11.01.2009 रोजीचे जीवनज्योत रुग्णालयाचे गैरअर्जदार यांचेकडे रेफर केल्याचे पञ दाखल केलेले आहे. यानंतर प्रथम हा दि.11.1.2009 ते 24.01.2009 पर्यत गैरअर्जदार यांचे रुग्णालयात शरीक होता व यावर इलाज केलेले केस पेपर्स दाखल केलेले आहेत. यात असेही लिहीलेले आहे की, मला डॉक्टर साहेंबानी बाळाच्या आजारा वीषयी माहीती दिलेली आहे व यांस माझी पूर्ण संमती आहे असे संमतीपञ देऊन बाळाचे काका यांनी सही केलेली आहे. यानंतर रोज काय उपचार केले ते उपचाराचे सर्व कागदपञ या सोबत दाखल केलेले आहेत. अर्जदाराने दाखल केलेले दि.12.1.2009 रोजीचा ब्लड रिपोर्ट पाहिल्यास त्यांस एचबी कमी होता. डब्लूबीसी कॉऊट हया नॉर्मल पेक्षा जास्त म्हणजे 36100 होत्या. Atypical Lymphocytes दिसत आहेत असे निदान केलेले आहे. यापूर्वीच्या पॅथोलॉजी चा रिपोर्ट दि.10.01.2009 रोजीचा पाहिल्यास एचबी 5.4 व डब्लूबीसी 41200 असे दाखवलेले आहे. म्हणजे गैरअर्जदार यांचे रुग्णालयात शरीक केल्यानंतर दोन्ही रिपोर्टचे कंपारिझन केले असता बाळाचे प्रकृतीत सूधारणा झाल्याचे दिसते. म्हणजे डब्लूबीसी कॉउंट व एचबी यात सूधारणा झाली आहे असे दिसून येते. गैरअर्जदार यांचेकडे आणण्याआधी जीवनज्योत रुग्णालय येथे इलाज केला ही गोष्ट लपवून ठेवली. यांचा अर्थ ते स्वच्छ हाताने आलेले नाहीत. आर्शीर्वाद रुग्णालयामध्ये भागीदारी संस्थेचे कागदपञ पाहिले असता त्यात अजून दोन डॉक्टर आहेत व गैरअर्जदार यांचे समवेत त्यांची भागीदारी आहेत त्यांना या तक्रारीत पक्षकार करणे आवश्यक होते. गैरअर्जदार यांचेकडे इलाज होत नाही म्हणून त्यांनी हैद्राबाद येथे नेण्यास सांगितले व त्यांचे म्हणण्यानुसार अर्जदार यांनी प्रथम यांस हैद्राबाद येथे नेलेले नाही. तर ते बाळास घेऊन डॉ.रेंगे यांचेकडे गेले व रेंगे यांनी त्यावर दि.24.1.2009 ते 09.02.2009 पर्यत जवळपास 17 दिवस शरीक करुन घेऊन त्यावर इजा केला. गैरअर्जदाराच्या मते डॉ. रेंगे विवेकानंद बाल रुग्णालय यांनी त्यांचेवर काय इलाज केला यांचे केस पेपर्स दाखवावेत परंतु अर्जदार यांनी ते दाखल केले नाही. केस पेपर्स दाखल केले असते तर त्यांनी काय इलाज केला म्हणजे गैरअर्जदाराने केलेला इलाज किंवा निदान चूक होते काय ? हे ठरविण्यासाठी त्यांचा उपयोग झाला असता किंवा एखादया डॉक्टरचे इलाज चूक होता असे म्हणावयाचे असेल तर अर्जदारास दूस-या डॉक्टराकडून नक्की काय निदान करावे व काय औषधोउपचार करावयाचा होता हे सांगून आधीचा इलाजाची पध्दती चूक होती हे ठरवीणे क्रमप्राप्त होते. अर्जदार हे काही तज्ञ नाहीत किंवा त्यांनी तज्ञाचा सल्ला ही घेतलेला नाही, तर कशाचे आधारे त्यांचे मूलावर इलाज चूक झाला हे सिध्द होऊ शकत नाही व गैरअर्जदार यांचे अर्जदार यांचेशी काही पूर्वपरिचय नाही किंवा वैर ही नाही किंवा एखादया बाळाच्या जीवनाशी कोणताही डॉक्टर खेळेल असे म्हणता येणार नाही. इलाज पध्दती करताना डॉक्टरने प्रामाणीकपणे त्यांचेवर उपचार करणे भाग आहे. त्यात निष्काळजीपणा करु नये. एखादे निदान चूक होण्याची शक्यता असते परंतु यांचा अर्थ त्यांनी निष्काळजीपणा केला असे होत नाही. त्यांने प्रामाणिक आपले कार्य केले का नाही हेच पाहणे महत्वाचे आहे. अर्जदारावर गैरअर्जदाराने बाल रोग तज्ञ एन. भास्कर यांस त्यांला झालेल्या रोगावर काय इलाज करणे शक्य होते यांचा अभीप्राय दिलेला आहे. गैरअर्जदाराने असे म्हटलेले आहे की, रुग्णास झालेला आजार चांगला होण्यासाठी वेळ लागतो तर गैरअर्जदार यांचे कडून डॉ. रेंगे यांचेकडे पून्हा म्हणजे 24 दिवसांनंतर परत 17 दिवस होऊन गेले होते व त्यावर उपचार चालू होते म्हणजेच साहजीकच बाळाच्या प्रकृतीत सूधारणा होण्याची शक्यता आहे.ज्या दिवशी अर्जदार यांनी दि.24.1.2009 रोजी त्यांचा मूलगा प्रथम यांचा डिसचार्ज मागितला त्यादिवशी डिसचार्ज देताना केस पेपर वर मी माझे बाळाच्या फाईल सर्व रिपोर्ट माझे जिम्मेदारीवर घेऊन जात आहे त्यांचे काही बरेवाईट झाल्यास मी जबाबदार राहील,त्यावर अर्जदार यांची सही आहे. याशिवाय कन्संट या नांवाखाली मी माझे बाळास स्वतःचे जिम्मेदारीवर घेऊन जात आहे त्यावर साक्षीदारासमवेत अर्जदार यांनी सही केलेली आहे. तसेच डॉ.भास्कर यांचे शपथपञ दाखल केलेले आहे. डॉ. भास्कर यांचे शपथपञावरुन बाळास C.S.F. असून प्रोटीन्स/आणि सेल्स वाढले म्हणजे (Meningitis or Encefhlitis ) झाले व त्यावर उपचार दिले. त्यासाठी Antibiotics and Anticonvulsions सूरु केल्याचे म्हटले आहे. सिटी स्कॅन केल्यावर Tuberculous Meningitis व त्यासाठी Anti Koch Treatment सूरु केली व यांला प्रतिसाद मिळण्यासाठी दोन आठवडयाचा अवधी लागतो असे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी पण अशाच प्रकारची ट्टिमेंट दिलेली आहे. रोगाचे निदान देखील हेच केलेले आहे. तसेच जीवनज्योत बाळ रुग्णालय डॉ. मनूरकर यांनी सूध्दा तसाच रिपोर्ट दिलेला आहे. जीवनज्योत रुग्णालय यांनी देखील अर्जदार यांचे सहीने बाळाची तब्येत नाजूक आहे यांची कल्पना त्यांना दिली होती डॉ. रेंगे नी पण गैरअर्जदार यांनी दिलेले उपचार चालू ठेवले होते व हयापूर्वी औषधोउपचार डॉ. मनूरकर यांचे कडे केले होते, असे दि.10.01.2009 रोजीच्या केस पेपर्स वरुन दिसते. म्हणजे 10 व 11 हे दोन दिवस जीवनज्योत येथे देखील उपचार करण्यात आले यावीषयी अर्जदाराने काही तक्रार केलेली नाही. एकंदरीत सर्व पूरावे व कागदपञे पाहिले असता गैरअर्जदार यांनी उपचार करण्यात हलगर्जीपणा केला किंवा निष्काळजीपणा केला असे आम्हास वाटत नाही. रोगनिदाना संबंधी काही मेडीकल केस पेपर्स त्यांत Management of Acute Seizure ही थेरी दिलेली आहे. याशिवाय हॉस्पीटल ट्रीटंमेंट काय असावी यांचाही उल्लेख केलेला आहे. Partially treated Purulent Meningitis poses a difficult diagnostic dilemma. Treat with a combination of antipyogenic and antitubercular regimen for 10 days and repeat the lumbar puncture to evaluate response. Bacterial meningitis cases are likely to improve substantially and the antitubercular treatment be discontinued. Encephalitis :- The onset is acute with fever, seizures, disturbances of sensorium, drowsiness, and diffuse or focal neurological signs. The cerebrospinal fluid reveals mild pleocytosis, normal or mildly elevated proteins and normal sugar. CT scan is normal. EEG may be abnormal. असे म्हटले आहे. वरील सर्व कागदपञे व पूरावे बघीतल्यानंतर आम्ही या नीणर्यास आलो आहोत की, गैरअर्जदार यांचे सेवेत निष्काळजीपणा झालेला आहे हे सिध्द न झाल्याने त्यांचेकडून सेवेतील ञूटी झाली असे म्हणता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. उभयपक्षाना निकाल कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जयंत पारवेकर लघूलेखक |