जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/39 प्रकरण दाखल तारीख - 04/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 30/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य अशोक पि.हरीनाम मोरे, अर्जदार. रा. आंचोली ता.नायगांव (खै) जि.नांदेड. विरुध्द. डॉ.जी.व्ही.पोलावार, गैरअर्जदार. अनंत क्लिनीक नायगांव (बा) ता.नायगांव (खै) जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एस.साळवे. गैरअर्जदार तर्फे वकील - अड.यु.जी.मेगदे. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्या) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे ती अशी की, अर्जदार हे मौजे अंचोली ता.नायगांव (खै) जि.नांदेड येथील रहिवाशी असून ते शेतीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालवितो. गैरअर्जदार हे नायगांव येथील रहिवाशी असून नायगांव येथे त्यांचा अनंत क्लिनीक नांवाचा दवाखाना आहे. सदर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.14/11/2009 रोजी त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाला विळयाचा मार लागला म्हणुन इलाजाकामी गेलेला होता. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या अंगठयाला चुकीचा इलाज केला आणि त्यांचा डाव्या हाताचा अंगठा निकामी झाल्यामुळे अर्जदाराची अशी मागणी आहे की, मानसिक धक्का व त्रास रु.25,000/-, शारिरीक त्रास व असुवीधा रु.25,000/-, आर्थीक झळ व खर्च रु.20,000/-, शेतीच्या कामाच्या फायदयापासुन वंचित राहिल्यामुळे नुकसान भरपाई रु.30,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/-, इतर नुकसान भरपाई रु.20,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही गैरअर्जदार यांना बदनाम करण्यासाठी दाखल केलेली असून ती बिनबुडाची आहे व कुठलाही पक्का पुरावा यामध्ये नसल्यामुळे ती खारीज करण्यात यावी. अर्जदार जेंव्हा गैरअर्जदार यांचेकडे जखम झाल्या झाल्या आलेले होते, त्यावेळी अर्जदाराचा अंगठा हा लोंबकळत होता व त्यातुन बरेचसे रक्त जात होते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा अंगठा सरळ करुन त्याच्या दोन्ही बाजुला बाहेरुन सपोर्ट देऊन व त्यावर वेस्टर्न बांधले व अर्जदाराचा अंगठा तुटून खाली पडण्या पासुन वाचवला व कुठल्याही प्रकारची सर्जरी किंवा लोखंडी रॉड टाकणे हे उपचार गैरअर्जदार यांनी केले नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार रद्य करण्यात यावी. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्र व शपथपत्र व इतर कागदपत्र याची तपासणी करुन व दोन्ही वकीलांचा युक्ततीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे काय? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 व 2 अर्जदार हे मौजे अंचोली ता.नायगांव (खै) जि.नांदेड येथील रहिवाशी असून शेतीचा व्यवसाय करतात असे त्यांनी कथन केले आहे व गैरअर्जदार हे नायगांव येथील रहिवाशी असून त्यांचे अनंत क्लीनीक आहे. दि.14/11/2009 रोजी अर्जदारास डाव्या हाताच्या अंगठयाला विळयाचा मार लागला म्हणुन अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडे दाखविण्यासाठी गेले होते. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराने मलमपटटीचा इलाज न करता डाव्या हाताच्या अंगठयात लोखंडी रॉड टाकला तो रॉड टाकल्यानंतर अर्जदारास खुप त्रास होत होता त्यानंतर गैरअर्जदार अर्जदारास अंगठा तोडावा लागेल असा सल्ला दिला. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराने त्याच्या अंगठयामध्ये रॉड टाकण्याची गरज नसतांना देखील रॉड टाकुन जखमी केले व त्यामुळे अर्जदाराचा डावा अंगठा निकामी झाला. गैरअर्जदार यांनी केलेल्या इलाजामुळे अर्जदार शेतीचे काम करण्या पासुन वंचीत झाला व त्याचे खुप नुकसान झाले. अर्जदार शेतीचा व्यवसाय करुन स्वतःची व कुटूंबाची उपजिवीका करत होता व शेतातुन 5 ते 6 हजाराचे काम करत होता त्यामुळे अर्जदाराचे सध्याचे उत्पन्न बंद झालेले आहे. त्यामुळे त्रास होत आहे. अर्जदाराचा अंगठा तोडावा लागेल असा सल्ला दिल्यानंतर अर्जदाराने दुस-या हॉस्पीटला जाण्याचा निर्णय घेतला व नांदेडला जाऊन प्राचेत हॉस्पीटल येथे उपचार केला. गैरअर्जदार यांनी रॉड टाकल्यामुळे अर्जदाराचे नुकसान झाले व म्हणुन अर्जदाराने गैरअर्जदारास लेखी नोटीस दिली व त्या नोटीसद्वारे अर्जदारास 15 दिवसांच्या आंत मेडिकलचा खर्च व मानसिक त्रास मिळुन रु.75,000/- द्यावे अशी मागणी केली व गैरअर्जदारांनी अर्जदारास कुठलीही रक्कम न दिल्यामुळे अर्जदार तक्रार घेऊन ग्राहक मंचात दाखल झाले. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदारास झालेला खर्च रु.25,000/-, शारीरिक त्रास व असुवीधा रु.25,000/-,आर्थीक झळ व खर्च रु.20,000/- शेतीच्या कामाचे झालेले नुकसान रु.30,000/-,तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/-, इतर नुकसान भरपाई रु.20,000/- असे एकुण रु.1,25,000/- नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडुन मागणी केलेली आहे. अशाच प्रकारचे मजकुराचे शपथपत्र अर्जदाराने दाखल केलेले आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार हे एम.डी.आयुर्वेदिक डॉक्टर असुन त्यांना शस्त्रक्रीया करण्याची परवानगी नसतांना देखील त्यांनी शस्त्रक्रीया केली ही त्यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.1,25,000/- नुकसान भरपाई द्यावी. अर्जदाराने त्यास लागलेले औषधीचे पावत्या व गैरअर्जदार यांचेकडे उपचार केल्यानंतर प्राचेत हॉस्पीटल नांदेड येथे उपचार केला त्या औषधीचे प्रिस्क्रीप्शन जोडलेले आहे. तसेच एक्सरे काढले होते तेही मुळप्रत मंचासमोर दाखवण्यात आले आहे. गैरअर्जदार हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही गैरअर्जदार यांना बदनाम करण्यासाठी दाखल केलेली असून ती बिनबुडाची आहे व कुठलाही पक्का पुरावा यामध्ये नसल्यामुळे ती खारीज करण्यात यावी. अर्जदार जेंव्हा गैरअर्जदार यांचेकडे जखम झाल्या झाल्या आलेले होते, त्यावेळी अर्जदाराचा अंगठा हा लोंबकळत होता व त्यातुन बरेचसे रक्त जात होते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा अंगठा सरळ करुन त्याच्या दोन्ही बाजुला बाहेरुन सपोर्ट देऊन व त्यावर वेस्टन बांधले व अर्जदाराचा अंगठा तुटून खाली पडण्या पासुन वाचवला व कुठल्याही प्रकारची सर्जरी किंवा लोखंडी रॉड टाकणे हे उपचार गैरअर्जदार यांनी टाकले नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार रद्य करण्यात यावी. उलटपक्षी अर्जदारास पुढील उपचार मिळेपर्यंत त्यावर इतर इन्फेक्शन होऊ नये किंवा तो अंगठा तुटून खाली पडू नये याबद्यल गैरअर्जदारांनी काळजी घेतलेली आहे व त्यांनी रेफरन्स लेटर देऊन पुढील डॉक्टरांकडे पाठविला होता. अर्जदाराने ही तक्रार गैरअर्जदार डॉक्टर यांचेवर विनाकारण केलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेले एक्सरेची मुळ प्रत पाहीली असता, त्यामध्ये रॉड टाकलेले दिसत आहे तसेच अर्जदाराने दाखल केलेले त्यांचे पुढील उपचाराचे कागदपत्र पाहता ती सर्व प्राचेत हॉस्पीटल नांदेड येथील असून त्यामध्ये गैरअर्जदार डॉक्टर यांनी सर्जरी असे दिसुन येत नाही. अर्जदाराने उपचार करतांना प्रथम कोणत्या डॉक्टरांकडे जात आहोत याचा विचार स्वतः करणे आवश्यक होते. अर्जदारास माहीत होते की, गैरअर्जदार डॉ.पोलावार हे एम.डी. आयुर्वेदिक आहेत. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार डॉ.पोलावार हे सर्जरी करु शकत नाही तरीही त्यांनी त्यांच्या क्लिनीकवर बोर्ड लावलेला आहे हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदार यांनी सेंटर कॉन्सींल ऑफ इंडिया मेडीसीन यांच्या कायदयानुसार गैरअर्जदार डॉक्टर हे अलोपेथीक मेडसीन, मॉडर्न मेडिसीन गायनॉक्लॉलॉजी या सर्व विषयात ट्रेंड असुन यात ते सर्जरी करु शकतात, अशाप्रकारचे पेपर्स मंचासमोर दाखल केलेले आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे उपचारासाठी जायचे की नाही हे ठरविणे आवश्यक होते. उलटपक्षी गैरअर्जदार डॉ.पोलावारनी प्राथमीक उपचार करुन रेफरन्स लेटर दिलेले आहे ही गोष्ट मंचासमोर स्पष्ट झालेले आहे व अर्जदाराने कथन केल्याप्रमाणे कुठल्याप्रकारची सर्जरी डॉ.पोलावार यांनी केलेली नाही असे दिसून येते. अर्जदारास केलेली मदत व त्यास दिलेले रेफरन्स लेटर यावरुन अर्जदाराने गैरअर्जदाराच्या विरोधात केलेली तक्रार ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सिध्द होत नसुन ती खारीज करण्यास पात्र आहे, या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. म्हणुन अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येते. आदेश. 1. अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |