निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 16/05/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 24/05/2013
तक्रार निकाल दिनांकः- 13/12/2013
कालावधी 06 महिने. 19 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मंचक पिता माणीकराव शिंदे. अर्जदार
वय 29 वर्षे. धंदा.निरंक. अॅड.अरुण एम.राऊत.
रा.परळगव्हाण,ता.व जि.परभणी.
विरुध्द
1 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार.
न्यु इंडीया अॅशुरन्स कंपनी लि. अॅड.जी.एच.दोडीया.
विभागीय कार्यालय क्रं. 153400,
सावरकर भवन शिवाजी नगर, कॉंग्रेस हाऊस रोड,पुणे. 422005.
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
डेक्कन इन्शुरंन्स अँन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि,
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजारच्या पाठी मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद 431003.
3 तालुका कृषी अधिकारी. तालुका कृषी कार्यालय, परभणी.
ता. व जि. परभणी 431401.
4 शाखा व्यवस्थापक.
न्यु इंडीया अॅशुरंन्स कंपनी लि.
व्दारा अॅड शर्मा यांच्या घराचा वरचा मजला.
नानलपेठ, परभणी 431401.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी सेवात्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखरल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी.
अर्जदार हा शेतकरी आहे. त्याचे शेत गट नं. 89 मध्ये क्षेत्र 0 हे.50 आर एवढी शेतजमीन मौजे परळगव्हाण तलाठी सज्जा टाकळगव्हाण ता.जि. परभणी येथे आहे. दिनांक 14/11/2011 रोजी अर्जदाराच्या मोटार सायकलला मराठवाडा कृषी विद्यापीठ परीसर या ठिकाणी समोरुन वेगात येणा-या पोलीसांची टाटा सुमो गाडी क्रमांक MH-22 D-7141 ने जोराची धडक दिल्याने अपघात झाला व या अपघातात अर्जदार गंभीररित्या जखमी झाला, अर्जदारावर सरकारी दवाखाना परभणी येथे उपचार करण्यात आले व त्यानंतर पूढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले. यशोदा हॉस्पीटल नांदेड येथे अर्जदाराच्या उजव्या पायाच्या घोट्या पासून खालचा भाग पूर्णपणे निकामी झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली, त्यामुळे अर्जदाराला कायमचे अपंगत्व आले. अर्जदार नांदेड येथील हॉस्पीटल मध्ये अंदाजे एक ते सव्वा महिना अॅडमीट होता, अर्जदार हा शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभार्थी आहे. उपरोक्त योजने अंतर्गत त्यास आलेल्या कायमस्वरुपी अपंगत्वाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे दिनांक 26/07/2012 रोजी दाखल केला, परंतु गैरअर्जदारांनी अर्जदारास आलेले अपंगत्व हे 50 टक्के पेक्षा कमी असल्याचे कारण दाखवुन अर्जदाराचा वाजवी क्लेम बेकायदेशिररित्या नामंजूर केला, त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी अर्जदारास विमा दाव्याची रक्कम रु. 50,000/- अपघात तारखे पासून पूर्ण रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याजदराने द्यावी तसेच मानसिकत्रासापोटी रक्कम 25000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- द्यावी. अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि. 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 5, नि.19 व नि.20 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, 2, 3 व 4 यांना तामील झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी लेखी निवेदन नि. 16 वर व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी निवेदन नि. 14 वर देऊन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, त्यांची संस्था विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण मान्यता प्राप्त असून विमा सेवा देणारी संस्था आहे. महाराष्ट्र शासनाने उपरोक्त योजने अंतर्गत गैरअर्जदाराची सल्लागार म्हणून नेमणुक केलेली आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही, कागदपत्राची छाननी करुन विमा कंपनीकडे परीपूर्ण प्रस्ताव पाठवणी व दाव्याचा निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करणे एवढया पुरतीच त्यांची भुमिका मर्यादीत आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणातून मुक्त करावे अशी विनंती त्यांनी मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी निवेदन सोबत शपथपत्र मंचासमोर दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या प्रिमीयमचा भरणा केलेला नसल्यामुळे अर्जदार हा त्यांचा ग्राहक नाही, पूढे अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर व तज्ञांकडून मिळालेल्या सल्ल्या प्रमाणे अर्जदारास आलेले अपंगत्व 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार अर्जदारास नुकसान भरपाईची रक्कम देता येणार नाही. कारण शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारे लाभ खालील प्रमाणे आहेत.
1) For death only/Total permanent disability. 100% of sum insured. 2) Loss of one Limb or one eye. 50% of sum insured.
3) Loss of sight of both eye. 100% of sum insured.
4) Loss of both hands. 100% of sum insured.
5) Loss of both feet. 100% of sum insured.
6) Loss of one hand and one foot. 100% of sum insured.
7) Loss of one eye and one hand. 100% of sum insured.
8) Loss of one eye and one foot. 100% of sum insured.
अर्जदारास आलेले अपंगत्व वर दर्शविलेल्या तक्त्या प्रमाणे नसल्यामुळे त्यास उपरोक्त योजने अंतर्गत लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दिनांक 26/03/2013 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमादावा निरस्त करण्यात आलेला आहे. सबब, अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी लेखी निवेदन सोबत शपथपत्र नि. 17 वर मंचासमोर दाखल केले आहे.
मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 3 यास तामील झाल्यानंतर देखील तो मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराचा विमादावा निरस्त करुन गैरअर्जदाराने सेवात्रुटी
केल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदार हा शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभार्थी आहे. दिनांक 14/11/2011 रोजी झालेल्या अपघातात अर्जदार जबर जखमी झाला व या अपघातामुळे त्याचा उजवा पाय कायमचा निकामी झाला, त्यामुळे उपरोक्त योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जदाराने आवश्यक कागदपत्रासह क्लेम दाखल केला असता, अर्जदारास आलेले अपंगत्व हे 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्याच्या कारणास्तव अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदाराने निरस्त केला. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.
यावर गैरअर्जदारारचे म्हणणे असे की, अर्जदारास आलेले अपंगत्व 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार अर्जदारास उपरोक्त योजने अंतर्गत लाभ देता येणार नाही. मंचासमोर अर्जदाराने दाखल केलेल्या पुराव्यातील कागदपत्राची पडताळणी केली असता असे लक्षात येते की, अर्जदाराच्या उजव्या पायाला साधारणपणे 60 टक्के अपंगत्व आलेले आहे. यांच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि. 5/11 व नि. 20 वर सामान्य रुग्णालय परभणीच्या वैद्कीय अधिका-यांनी दिेलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. तसेच उपरोक्त योजना ही महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य शेतक-यांच्या हितासाठी जाहिर केलेली कल्याणकारी योजना आहे, त्याचा लाभ देतांना गैरअर्जदार विमा कंपनीने उदार दृष्ठीकोन ठेवणे गरजेचे आहे. सदर प्रकरणात अर्जदारास आलेले अपंगत्व हे कायमस्वरुपी असल्याचे स्पष्ट दिसत असतांना सुध्दा गैरअर्जदाराने निव्वळ अर्जदाराचा न्यायहक्क डावलण्यासाठीच तकलादु स्वरुपाचा बचाव घेतल्याचे मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी वैयक्तिकपणे वा संयुक्तिकरित्या निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत विमादाव्याची रक्कम रु. 50,000/- फक्त
(अक्षरी रु. पन्नासहजार फक्त ) अर्जदारास द्यावी.
3 तसेच गैरअर्जदारांनी मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,500/- फक्त
(अक्षरी रु. दोनहाजर पाचशे फक्त ) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,500/-
फक्त ( अक्षरी रु. दोनहजार पाचशे फक्त) आदेश मुंदतीत अर्जदारास द्यावी.
4 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.