Maharashtra

Nagpur

CC/516/2017

PARAS NATH SINGH & JAMINDAR SINGH - Complainant(s)

Versus

DIVISIONAL RAILWAY MANAGER (COMMERCIAL) - Opp.Party(s)

ADV. D. N. MATHUR

23 Aug 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/516/2017
( Date of Filing : 20 Nov 2017 )
 
1. PARAS NATH SINGH & JAMINDAR SINGH
R/O. PLOT NO. 100, BARDE LAYOUT, DIVYANAGARI ROAD, NEAR S.N. SARVAJANIK SCHOOL, GODHANI (RAILWAY), NAGPUR-441123
NAGPUR
MAHARASHTRA
2. DEVENDRA SINGH & DHARMNATH SINGH
R/O. PLOT NO. 6, VITTHAL RUKMINI NAGAR, KATOL ROAD, NAGPUR-13
NAGPUR
MAHARASHTRA
3. MUNNI SINGH & BHARAT SINGH
R/O. PLOT NO. 58, AYAPPANAGAR, KATOL ROAD, NAGPUR-13
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIVISIONAL RAILWAY MANAGER (COMMERCIAL)
CENTRAL RAILWAY, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSHI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. D. N. MATHUR, Advocate for the Complainant 1
 अॅड.नितिन लांबट, Advocate for the Opp. Party 1
Dated : 23 Aug 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्ता क्रं. 1 ने विरुध्‍द पक्षाच्‍या मोतीबाग नागपूर येथून राखीव आरक्षणामधून सुरत ते वर्धा दि. 12.04.2017 रोजीच्‍या प्रवासाकरिता दि. 17.02.2017 रोजी  गाडी क्रं. 18402  ओखा पुरी एक्‍सप्रेस या गाडीचे श्री. देवेंद्र सिंह, पुरुष, वय -62 वर्षे , बिमला सिंह, स्‍त्री, वय -61 वर्षे, मुन्‍नी सिंह, स्‍त्री, वय-52 वर्षे व एन.के.सिन्‍हा, पुरुष, वय-78 वर्षे या 4 व्‍यक्‍तीच्‍या प्रवासाकरिता तिकीट बुक केले होते व त्‍याचा पी.एन.आर.क्रं. 841- 2189025 असा असून प्रतिक्षा सुची आरक्षण पत्रकाप्रमाणे बैठक क्रं. अनु.क्रं. 31 ते 34 असा देण्‍यात आला होता.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, काही अनपेक्षित कारणामुळे दि. 08.04.2017 ला एन.के.सिन्‍हा यांचे आरक्षित तिकीट रद्द करण्‍यात आले व त्‍यानंतर दि. 09.04.2017 ला बिमला सिंह यांचे आरक्षित तिकीट रद्द करण्‍याकरिता तक्रारकर्ता क्रं. 1 यांनी  cancellation form (कॅन्‍स्‍लेशन फॉर्म) भरुन संबंधित लिपिकाला दिला असता तेथील उपस्थितीत बुकिंग लिपिकांने संपूर्ण तिकिटच रद्द केले व यामध्‍ये देवेंद्र सिंह, मुन्‍नी सिंह यांचे ही आरक्षित तिकीट होते. संबंधित लिपिकाच्‍या उद्देशानुसार तक्रारकर्त्‍याने नव्‍याने आरक्षण मिळण्‍याकरिता ( 2 प्रवाशांकरिता) नविन आरक्षण फॉर्म भरुन सादर केला, त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाकडून तक्रारकर्त्‍याला गाडी क्रं. 18402, ओखा पुरी एक्‍सप्रेस या गाडी मध्‍ये पी.एन.आर.क्रं. 825 8083285 अन्‍वये प्रतिक्षा सुची आरक्षण पत्रकाप्रमाणे बैठक क्रं. 119 व 120 देण्‍यात आला होता. विरुध्‍द पक्षाच्‍या आरक्षित तिकीट खिडकीवरील लिपिकाने  आरक्षित तिकीट रद्द केल्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं. 1 व 2 यांना दि. 12.04.2017 रोजीच्‍या परतीच्‍या प्रवासाकरिता पुनश्‍च  सुरत ते वर्धा , गाडी क्रं. 18402, ओखा पुरी एक्‍सप्रेस या गाडीच्‍या आरक्षण तिकिटा पोटी आरक्षण शुल्‍क भरावे लागले आणि तक्रारकर्त्‍याला 13 तास उभे राहून प्रवास करावा लागला. यामुळे तक्रारकर्त्‍याला नाहक शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविली असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व  नुकसानकरिता प्रत्‍येकी रुपये 30,000 देण्‍याचे आदेशित करावे अशी मागणी केली आहे.
  3.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीनुसार श्री. एस.के.सिन्‍हा यांचे प्रवास तिकिट दि. 08.04.2017 ला रद्द करण्‍यात आले व त्‍यानंतर बिमला सिंह यांचे प्रवास तिकिट रद्द करण्‍याकरिता दि. 09.04.2017 ला विनंती करण्‍यात आली होती. परंतु आरक्षित खिडकीवरील उपस्थितीत लिपिकाच्‍या चुकिमुळे 3 प्रवास तिकिट पैकी एक तिकिट रद्द करण्‍या एैवजी संपूर्ण तिकिट रद्द करण्‍यात आले. तक्रारकर्ता व आरक्षित खिडकीवरील लिपिक यांच्‍या मधील miscommunication (गैरसमजामुळे) संपूर्ण तिकीट  रद्द करण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं. 2 व 3 यांचे प्रवास तिकीट आरक्षण मिळण्‍याकरिता नव्‍याने फॉर्म भरुन सादर केला आणि दि.09.04.2017 ला काढण्‍यात आलेल्‍या प्रवास तिकिटाच्‍या पी.एन.आर.क्रं. 825 8083285 अन्‍वये प्रतिक्षा सुची प्रमाणे अ.क्रं. 119 व 120 देण्‍यात आला होता. तक्रारकर्त्‍याने सदर झालेली चूक वरिष्‍ठांच्‍या निदर्शनास सुरत ते वर्धा प्रवास सुरु करण्‍यापूर्वी आणून दिलेली नाही.
  4.      रेल्‍वे प्रशासन हे प्रतिक्षा प्रवास तिकिटाच्‍या आरक्षणाबाबत गॅरन्‍टी देत नाही व सदर प्रकरणात रेल्‍वेने निर्गमित केलेले प्रवास तिकीट हे अनारक्षित असल्‍याची बाब तक्रारकर्त्‍याला माहिती होती. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षाचे  आरक्षण खिडकीवरील लिपिकाचे miscommunication (गैरसमजामुळे) तक्रारकर्त्‍याचे तिकीट रद्द झाले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कुठलीही  त्रुटीपूर्ण सेवा दिली नसल्‍यामुळे तक्रारकर्ता शारीरिक व मानसिक त्रासाकरिता  नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही, म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  5.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, लेखी युक्तिवाद व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने  खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्र. मुद्दे उत्‍तर

 

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचाग्राहक आहे काय ? होय

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?         नाही
  1. काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे 

 

  • निष्‍कर्ष

 

  1.  मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्ता क्रं. 1 ने दि. 12.04.2017 ला सुरत ते वर्धा प्रवासाकरिता विरुध्‍द पक्षाच्‍या मोतीबाग नागपूर येथील कार्यालयातून  दि.17.02.2017 रोजी  गाडी क्रं. 18402  ओखा पुरी एक्‍सप्रेस या गाडीत 4 व्‍यक्‍तीच्‍या प्रवासाकरिता तिकीट बुक केले होते व त्‍याचा पी.एन.आर.क्रं. 841- 2189025 असा असून प्रतिक्षा सुची आरक्षण पत्रकाप्रमाणे अनारक्षित अनु.क्रं. 31 ते 34 असा देण्‍यात आला होता हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने श्री. एस.के.सिन्‍हा यांचे काही कारणामुळे दि. 08.04.2017 ला प्रवास तिकिट रद्द केले व त्‍यानंतर बिमला सिंह यांचे दि.09.04.2017 ला प्रवास तिकिट रद्द करण्‍याकरिता cancellation form भरुन दिला होता,  परंतु तक्रारकर्त्‍याने तक्रारीत केलेल्‍या आक्षेपाप्रमाणे विरुध्‍द पक्षाच्‍या आरक्षित खिडकीवरील उपस्थितीत लिपिकाच्‍या चुकिमुळे 3 प्रवास तिकिट पैकी एक तिकिट रद्द करण्‍या एैवजी संबंधित लिपिकाने तक्रारकर्त्‍याचे संपूर्ण तिकिट रद्द केल्‍यामुळे तक्रारकर्ता क्रं. 2 व 3 यांचे नांवे पुनश्‍च प्रवास तिकीट आरक्षण मिळण्‍याकरिता नव्‍याने फॉर्म भरुन सादर करावा लागला आणि दि.09.04.2017 ला काढण्‍यात आलेल्‍या प्रवास तिकिटातील पी.एन.आर.क्रं. 825 8083285 अन्‍वये प्रतिक्षा सुची प्रमाणे अ.क्रं. 119 व 120 असा देण्‍यात आला होता असे दाखल केलेल्‍या दस्‍तावेजावरुन दिसून येत असले तरी याबाबतची तक्रार तक्रारकर्त्‍याने त्‍वरित वरिष्‍ठ अधिका-यांकडे केली असल्‍याबाबतचे कोणतेही दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केलेले नाही. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दि. 12.04.2017 रोजीचा सुरत ते वर्धा प्रवास पूर्ण केल्‍यानंतर याबाबतची तक्रार मंचात दाखल केलेली आहे. तसेच अनारक्षित तिकीट हे निश्चित करुन देण्‍याची जबाबदारी ही विरुध्‍द पक्षावर नसते, सदरची निश्चितता ही अॅटोमॅटीक जनरेट होणा-या प्रक्रियेनुसार होत असते यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कुठलीही दोषपूर्ण सेवा दिली असे दिसून येत नाही.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज .

 

  1. उभय पक्षाने खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

                             

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSHI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.