Maharashtra

Kolhapur

CC/11/236

Bhauso Ganpati Dinde - Complainant(s)

Versus

Divisional Officer, The Oriental Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

S V Mane

08 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/236
1. Bhauso Ganpati DindeMazgaon, Tal. Panhala, Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Divisional Officer, The Oriental Insurance Co. Ltd. Kanchanganga, 204 E, Station Road, Kolhapur2. Chairman Indira Sahakari Dudh Vyavsaik Sanstha Ltd.Majgaon, Tal. Panhala, Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S V Mane, Advocate for Complainant
P.R.Ingale , Advocate for Opp.Party

Dated : 08 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.08/09/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या) 

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

           तक्रारदाराचा पशु विमा योजना अंतर्गतचा योग्‍य व न्‍याय्य क्‍लेम नाकारुन सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल केली आहे.  

(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदार हे वर नमुद पत्‍त्‍यावर कायमस्‍वरुपी वास्‍तव्‍यास असून ते गरीब शेतकरी आहेत. सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 चे कोल्‍हापूर स्थित विभागीय विमा इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे विमा उतरविणेचे काम करत असतात. तक्रारदार यांनी स्‍वत:चे उदरनिर्वाहाकरिता व कौटूंबिक दुधाचे गरजेकरिता दि.07/02/2009 रोजी कोपार्डे ग्रामपंचायत कोपार्डे ता.करवीर जि.कोल्‍हापूर यांचे मार्फत श्री पाटलू राऊ पाटील कोपार्डे ता.करवीर जि.कोल्‍हापूर यांचे मालकीची जर्सी जातीची गाय रक्‍कम रु.30,000/- ला खरेदी केली होती. खरेदीवेळी सदर गाय उत्‍तमरित्‍या सशक्‍त होती. सदर गायीपासून तक्रारदाराचे कौटूंबिक दुधाची गरज भागत होती. तथापि भविष्‍यात सदर जर्सी गायीच्‍या जीवीतास हानी पोहचू नये व पर्यायाने तक्रारदार यांचे व कुटूंबाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्‍हणून तक्रारदार यांनी दि.14/02/2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांचे करवीर सामनेवाला क्र.1 यांचेकडे सदर जर्सी गायीचा आवश्‍यक ती विमा रक्‍कम जमा करुन विमा उतरविला होता. पॉलीसी क्र.48/2010/2404 असा आहे.विमा उतरविलेनंतर विमा कंपनीने बिल्‍ला नं.ओ.सी.6/600/46872 असा होता. सदर बिल्‍ला विमा उतरविलेल्‍या गायीच्‍या डाव्‍या कानात योग्‍य प्रकारे मारला होता.
 
           सदर विमा उतरविलेली जर्सी गाय 8 महिन्‍यांची गाभण असताना अचानक दि.24/02/2010 रोजी पोट फुगले व गाय मयत झाली. आजारी असल्‍याबद्दल तक्रारदार यांनी दि.10/02/2010पासून डॉ.दत्‍तात्रय डी.शिंदे या अधिकृत डॉक्‍टराचे मार्फत सदर आजारी गायीवर दि.14/02/2010 अखेर उपचार चालू ठेवले होते. तथापि सदर गाय ही उपचारास कोणतीही प्रतिसाद न देता दि.24/02/2010 रोजी मयत झाली. डॉ. दत्‍तात्रय डी.शिंदे यांचेमार्फत पंचांचे समक्ष मृत गायीचे पोस्‍ट मार्टेम करणेत आला. पी.एम.करतेवेळी सदरचा बिल्‍ला कानातून काढून घेतलेला होता. वस्‍तुस्थितीप्रमाणे तसा दाखला व पंचनामा तक्रारदार यांनी प्राप्‍त केलेला आहे. त्‍यानंतर तक्रारदार यांनी मृत जर्सी गायीची मृत्‍यूचे वेळी असणारी किंमत रु.10,000/- योग्‍य त्‍या कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवाला क्र.1 यांचेकडे सामनेवाला क्र.2 यांचेमार्फत मागणी केली होती. तथापि, तक्रारदार यांची असणारी रास्‍त व कायदेशीर मागणी सामनेवाला यांनी विचारात न घेता विमा क्‍लेम नाकारला आहे. सामनेवालांची ही सेवेतील त्रुटी आहे. सबब गायीचे उपचाराकरिता आलेला खर्च व नुकसानीची रक्‍कम मिळणेकरिता प्रस्‍तुतचा अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. विम्‍याची मूळ प्रत सामनेवाला विमा कंपनीने काढून घेतल्‍या आहेत. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन मृत गायीची बाजारभावाने होणारी किंमत रु.30,000/-,गायीचे उपचाराकरिता आलेला खर्च रु.1,000/-,आर्थिक नुकसानीपोटी रक्‍कम रु.10,000/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.6,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/-, असे एकूण रक्‍कम रु.49,000/- व्‍याजासह सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळणेबाबत सदर मंचास‍ विनंती केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदार यांनी मागणी केलेले पशु विमा दाव्‍याचे पत्र, डॉ. शिंदे यांनी गायीला तपासलेले व उपचार केलेले पत्र, पी.एम.रिपोर्ट, व्‍हॅल्‍यूएशन सर्टीफिकेट, सामनेवाला क्र.2 यांचे सभासद असलेबाबतचे पत्र, गाव कामगार पोलीस पाटील यांनी दिलेला दाखला, डॉ. शिंदे यांचे ट्रीटमेंट सर्टीफिकेट, गाय खरेदी केलेली पावती, बिल्‍ला रिटॅगींग करुन मिळणेबाबत विमा कंपनीला दिलेले पत्र, फोटो, पंचासमवेत गायीचा फोटो, मयत गायीसह वासरु याचा फोटो, किसान पॉलीसी प्रस्‍तावपत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.  
(4)        सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार खोटी, चुकीची तथ्‍यहिन आहे. प्रस्‍तुतची तक्रार कायदा व वस्‍तुस्थितीचा विचार केलेस चालणेस पात्र नाही. तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, ज्‍यावेळी सामनेवालांकडे क्‍लेम दाखल झाला. त्‍यावेळी सदर क्‍लेमच्‍या तपासणीअंती दाखल शवविच्‍छेदन अहवालावरुन मयत गायीचे शवविच्‍छेदन श्री शिंदे यांनी केले होते. तथापि, गाय आजारी असताना गायीच्‍या मृत्‍यूपूर्वी तीन-चार दिवस अगोदर रिटॅगींग केले होते.तसेच वर्णनाचे तपशीलामध्‍येही फरक आढळतो. त्‍यामुळे सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारला आहे. तसेच तक्रारदाराने रु.30,000/- विमा रक्‍कम तसेच अन्‍य रक्‍कमांची मागणी केलेली आहे. वस्‍तुत: सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने प्रस्‍तुतच्‍या मागण्‍या मान्‍य करता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवाला यांना विनाकारण खर्चात पाडलेने रक्‍कम रु.5,000/- खर्च देणेबाबत तक्रारदारास हुकूम व्‍हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत सर्व्‍हे रिपोर्ट, क्‍लेम फॉर्म, पशु वैद्यकीय दाखला, पशु मृत्‍यू दाखला, व्‍हॅल्‍यूएशन सर्टीफिकेट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(6)        सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदार हे सदर दुध संस्‍थेचे सभासद असून त्‍यांनी दि.14/02/2009 रोजी सामनेवाला संस्‍थेचे मार्फत सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे जर्शी गाईचा आवश्‍यक रक्‍कम भरुन विमा उतरविला होता. त्‍यानंतर विमा कंपनीने बिल्‍ला नं.ओ.सी.6/600/46872 असा घेतला व त्‍याचा  पॉलीसी क्र.48/2010/2404 असा आहे. तक्रारदार यांनी विमा क्‍लेमबाबतची कागदपत्रे सामनेवालांकडे दिली होती व तक्रारदाराची विमा रक्‍कम देणेची सामनेवाला क्र.1 विमा कंपनीची जबाबदारी आहे. सबब सामनेवाला क्र.2 यांना सदर तक्रारीमधून कमी करणेत यावे अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे.      
 
(7)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदपत्रे, तक्रारदारचे वकील व सामनेवाला क्र.1 चे वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?     --- होय.
2. काय आदेश ?                                             --- शेवटी दिलेप्रमाणे  
मुद्दा क्र.1 व 2:- तक्रारदाराचे गायीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेला होता हे दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. तसेच विमा उतरविणेपूर्वी नमुद गायीची तपासणी केलेली होती. तदनंतरच विमा उतरविलेला होता. सदर विमा उतरवितेवेळी गाय ही 8 महिन्‍याचे गाभण असताना दि.24/02/2010 रोजी पोट फुगून मयत झालेली आहे. सदर गायीवर दि.10/02/2010 पासून उपचार केलेले होते. दि.24/02/2010 रोजी गाय मयत झालेनंतर डॉ.शिंदे यांचेमार्फत पंचांचे समक्ष गायीचे शवविच्‍छेदन केलेले दाखल शवविच्‍छेदन अहवाल, विल्‍हेवाट दाखला व उपचाराची कागदपत्रे इत्‍यादीवरुन निदर्शनास येतो. तसेच नमुद गायीचे रिटॅगींग करणेबाबत दि.15/02/2010 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला विमा कंपनीला पत्राव्‍दारे कळवलेचे दिसून येते. तसेच तक्रारदाराने मागणी केलेल्‍या दावापत्रामध्‍ये पशुवैद्य डॉ.दत्‍तात्रय शिंदे यांनी दिलेले प्रमाणपत्र, शवविच्‍छेदन अहवाल, गावकामगार पोलीस पाटील यांचा दाखला, उपचाराची कागदपत्रे, गाय खरेदी केलेची पावती यावरुन विमा उतरविलेलीच गाय मयत झालेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.  
 
           सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या संग्राम जाधव या इन्‍व्‍हेस्‍टीगेटरच्‍या दि.07/04/2010 चे अहवालनुसार तक्रारदाराचे क्‍लेमबाबत इन्‍व्‍हेस्‍टीगेशन केले असून सदर अहवालामध्‍ये तपासाअंती तक्रारदाराची ओआयसी 161600/46872 हा टॅग असलेली गाय दि.24/2/2010 रोजी मयत झाली. मात्र प्रस्‍तुत गाय आजारी असताना रिटॅगींग केलेमुळे सदरची क्‍लेम फाईल बंद करणेत यावी असे नमुद केलेले आहे. 
 
           दाखल कागदपत्रे व विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे मालकीची विमा उतरविलेलीच गाय मयत झालेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. केवळ गाय आजारी असताना रिटॅगींग केले म्‍हणून क्‍लेम फाईल बंद केलेली आहे ही सामनेवाला यांचे कृत्‍य नमुद पॉलीसीच्‍या अटी वशर्तींचा विचार करता बेकायदेशीर व सेवात्रुटी करणारे आहे. वस्‍तुत: रिटॅगींग हे बिल्‍ला हरवला असलेस केले जाते. सदर रिटॅगींगचा व गायीच्‍या आजारपणाचा कोणताही संबंध नाही. प्रस्‍तुत गाय गाभण अवस्‍थेत मयत झालेली आहे. शवविच्‍छेदनाचे दाखल केलेले फोटोवरुन मयत गायीचे शेजारी मयत वासरुही दिसून येते. तसेच मयतगायीच्‍या डाव्‍या कानामध्‍ये बिल्‍ला दाखवत असलेचा फोटोही प्रस्‍तुत प्रकरणी दाखल आहे. सबब पॉलीसीचा मूळ हेतू विचारात घेता तसेच वस्‍तुस्थितीजन्‍य पुराव्‍याचा विचार करता तक्रारदाराचा क्‍लेम हा केवळ तांत्रिक कारणास्‍तव नाकारुन सेवात्रुटी केली असलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 यांना सामनेवाला क्र.1 यांचे सेवात्रुटीसाठी जबाबदार धरता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           तक्रारदाराने तक्रारीमध्‍ये गायीच्‍या खरेदी रक्‍कम रु.30,000/-ची मागणी केलेली आहे. तसेच उपचाराचा खर्च व आर्थिक नुकसानीची मागणी केलेली आहे. तक्रारदाराच्‍या सदर मागण्‍या मान्‍य करता येणार नाही. कारण तक्रारदाराचे गायीच्‍या विम्‍याची रक्‍कम पॉलीसीप्रमाणे रु.10,000/-आहे. सबब तक्रारदार प्रस्‍तुत रक्‍कम रु.10,000/-व्‍याजासह मिळणेस पात्र आहे. तसेच सामनेवाला यांचे सेवात्रुटीमुळे झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  
                           आदेश 
 
1)    तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.  
2)  सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्‍कम रु.10,000/- (रु.दहा हजार फक्‍त) अदा करावी. सदर रक्‍कमेवर दि.30/04/2010 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.  
3)  सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT