निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 22/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/05/2013
तक्रार निकाल दिनांकः- 08/10/2013
कालावधी 05 महिने. 06 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मारोतराव तुळशीराम पोहकर. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.मजुरी. अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.नागेश कोल्हापुरी फुटवेअर,
शिवाजी कॉम्प्लेक्स, वसमत रोड,परभणी.
विरुध्द
1 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.गुरु कॉम्प्लेक्स, अॅड.जी.एच.दोडीया.
गुरु गोविंदसिंग रोड,मु.पो.जि.नांदेड 431 601.
2 प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय,परभणी.
वसमत रोड, मु.पो.ता.जि. परभणी 431 401.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचे स्टुंन्डन्ट सेफ्टी पॉलिसी अंतर्गत 20,000/- रु. अर्जदारास देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचा मुलगा श्रीनीवास मारोतराव पोहकर 2010-11 या वर्षामध्ये गैरअर्जदार क्रमांक 2 कडे बी.ए. व्दितीय वर्षात शिक्षण घेत होता व विद्यार्थ्याकडून विमा हप्ता घेवुन गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे 20,000/- रुपयांची स्टुंन्डन्ट सेफ्टी पॉलिसी काढली होती, ज्याचा पॉलिसी क्रमांक 230600/48/10/42/00000508 व पॉलिसी कालावधी 28/08/2010 ते 27/08/2015 असा होता. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 18 मार्च 2011 रोजी मयत श्रीनीवास मारोतराव पोहकर हे त्याच्या बहीणीच्या मुलीस शाळेतून गाडीवर जात असतांना तो वसमत रोडवर तलाठी भवन जवळ असतांना त्याच्या पाठी मागुन एक ट्रक ज्याचा क्रमांक एम.एच. - 22 – 2858 हा भरधाव व निष्काळजीपणे आला व त्या ट्रक ड्रायव्हरने मयत श्रीनीवास यास पाठी मागून जोराची धडक दिली. त्यात श्रीनीवास पोहकर याच्या शरीरावर ट्रकच्या समोरचा व नंतर पाठी मागचा चाक जावून त्याच्या शरीराचा चेंदा मेंदा झाला, त्यातच तो मृत्यू पावला. सदरची घटना 1: 45 वाजता घडली व त्या बद्दलची फिर्याद नवा मोंढा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली व ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात 279, 304, भा.द.वी. प्रमाणे गुन्हा क्रमांक 57/11 नुसार त्याच दिवशी दाखल करण्यात आला. व पोलीसांनी मयताच्या बॉडीवर मरणोत्तर पंचनामा करुन मेडीकल ऑफीसरकडे पोस्टमार्टेम करुन घेतले अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार दुःखातून सावरुन 12/05/2011 रोजी संपूर्ण कागदपत्रां सहीत प्रतिवादी क्रमांक 2 मार्फत सदरील पॉलिसीची रक्कम मिळावी, म्हणून क्लेम दाखल केला. सदरील पॉलिसीची माहिती प्रतिवादी क्रमांक 1 ने प्रतिवादी क्रमांक 2 कडे दिलेली होती, परंतु शेवट पर्यंत प्रतिवादी क्रमांक 2 ने अर्जदारास पॉलिसीची प्रत दिलेली नाही. व जाणून बुजून अर्जदारास त्रास दिला. अर्जदाराने वेळोवेळी मागणी केली तेव्हा गैरअर्जदार क्रमांक 2 म्हणाले की, तुम्हांला तुमचा क्लेम घ्यावयाचा आहे किंवा नाही, पॉलिसीची काय आवश्यकता आहे असे म्हणाले. दिनांक 24/05/2011 रोजी प्रतिवादी क्रमांक 1 याने प्रतिवादी क्रमांक 2 यांना असे पत्र दिले की, सदरील दाव्या संबंधी मयाताचे ड्रायव्हींग लायसेंस, पॉलिसीचे पसै भरल्याची पावती दाखल करा म्हणजे दावा निकाली काढता येईल. त्या प्रमाणे सदरील पत्र हे आल्याचे प्रतिवादी क्रमांक 2 ने अर्जदारास त्यावेळी कळविले नाही. खरे पाहता कंपनीकडे पॉलिसीची डुप्लीकेट पॉलिसी असते पोलीस पेपर दिल्यानंतर ईतर कागदपत्रांची गरजच काय व पॉलिसी ही स्टुंन्डन्ट सेफ्टीसाठी आहे. मोटार कायद्या खाली नाही, केवळ मानसिकत्रास देण्यासाठी प्रतिवादी क्रमांक 1 ने अर्जदाराचा क्लेम टाळला आहे व प्रतिवादी क्रमांक 2 ने अर्जदारास नंतर
कळविलेमुळे प्रतिवादी क्रमांक 1 व 2 दंडास पात्र आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, ऑगस्ट 2011 मध्ये अर्जदार प्रतिवादी क्रमांक 2 कडे गेला असता प्रतिवादी क्रमांक 2 ने नमुद कागदपत्रे विमा कंपनीने प्रतिवादी क्रमांक 1 कडे मागणी केल्या बद्दल सांगीतले तेव्हा अर्जदाराने मयताचे ड्रायव्हींग लायसेंस अपघातात हरवल्याचे शपथपत्राव्दारे प्रतिवादी क्रमांक 1 व 2 कडे सादर केले व शेवटी परत गैरअर्जदार क्रमांक 1 ने प्रतिवादी क्रमांक 2 ला दिनांक 30/11/2011 रोजी मयताचे ड्रायव्हींग लायसेंस दाखल न केल्यामुळे अर्जदाराचा क्लेम नो क्लेम म्हणून बंद करण्यात आला, असे कळविले. म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यास अर्जदारास भाग पडले व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर होवुन गैरअर्जदार 1 व 2 यांना असा आदेश व्हावा की, अर्जदारास स्टुंन्डन्ट सेफ्टी पॉलिसी नुसार 20,000/- रुपये अपघात तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के दराने देण्याचा हुकूम करावा, व तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल गैरअर्जदारांनी अर्जदारास 25,000/- रुपये व खर्चापौटी 10,000/- रुपये अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. अशी मंचास विनंती केली आहे.
नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 4 वर अर्जदाराने 20 कागदपत्रांच्या यादीसह 20 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
ज्यामध्ये 1) Application for giving claim, 2) Claim form Submitted by res.No.2 Before Company., 3) Copy of complaint to P.S. about accident., 4) Inquest Panchanama., 5) Spot Panchanama., 6) Post mortem report., 7) Death certificate., 8) Letter issued by respondent no.2 to insurance company., 9) Letter issued by respondent no.2 to insurance company., 10)Letter issued by complainant., 11) Letter issued by complainant., 12)letter issued by company., 13) Letter issued by company., 14) Letter issued by the Respondent no.2 To respondent no.1., 15)Affidavit field by complainant., 16) Paper cutting about the accident. 17) Claim repudiation letter., 18) Policy copy with claim note., 19) Claim repudiation letter., 20) Application under information Right of information Act to respondent. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
लेखी जबाब दाखल करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर, नि.क्रमांक 10 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. व खारीज होणे योग्य आहे व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही. म्हणून सदरची तक्रार सी.पी.अॅक्ट अंतर्गत चालू शकत नाही व विद्यमान मंचास चालवण्याचा अधिकार नाही. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 ने दिलेली माहीती नुसार गैरअर्जदार क्रमांक 1 ने विमा काढला. व तसेच सदरच्या प्रकारणा मध्ये अर्जदाराच्या मयत मुलाचे ड्रायव्हींग लायसेंसची मागणी केली असता अर्जदाराने ते दाखल न केल्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा स्टुंन्डन्टचा विमादावा फेटाळून लावला, म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने कायद्यान्वे योग्तेच केलेले आहे. व कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. अशी विनंती केली आहे.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 11 वर गैरअर्जदारने आपले शपथपत्र दाखल केलले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 16 वर आपला लेखी जबाब सादर केला आहे.त्यांत त्याचे असे म्हणणे आहे की, विमा पॉलिसी ही 28/08/2010 ते 27/08/2011 पर्यंत होती, गैरअर्जदार क्रमांक 2 ने मुदती मध्ये विमा प्रस्ताव पाठविला होता व दिनांक 15/09/2011 रोजीच्या पत्राने राहिलेल्या त्रुटीची पुर्तता केली, विमा कंपनीने गैरअर्जदार क्रमांक 2 यांना पॉलिसीची प्रत दिली नाही. तसेच विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा ड्रायव्हींग लायसेंस दाखल न केल्यामुळे अर्जदाराचा विमा प्रस्ताव फेटाळला व गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सवेत त्रुटी दिलेली नाही. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार 10,000/- रुपये खर्च आकारुन फेटाळण्यात यावी.
नि.क्रमांक 17 वर गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपला शपथपत्र दाखल केलेला आहे.
दोन्हीबाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराचा विमादावा फेटाळून
अर्जदारास सेवेतत्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचा मयत मुलगा नामे श्रीनीवास मारोतराव पोहकर हा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे बी.ए. व्दितीय वर्षांत मृत्यू समयी शिकत होता ही बाब नि.क्रमांक 4/जी वरील महाविद्यालयाने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमा प्रस्ताव सादर करण्यात करीता अर्ज मिळणे बाबत अर्ज केला होता, या कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच मयत श्रीनीवास याचा मृत्यू दिनांक 18/03/2011 रोजी वसमत रोडवर परभणी येथे अपघात झाला होता. व तो अपघात ट्रक क्रमांक एम.एच.-22- 2858 या ट्रकने मयत श्रीनीवास यास मागून जोराने धडक दिली होती व सदर ट्रक श्रीनीवास यांच्या अंगावरुन जावून श्रीनीवास यांचा मृत्यू झाला होता ही बाब नि.क्रमांक 4/ इ वरील एफ.आय.आर. वरुन व तसेच पोस्टमार्टेम रिपोर्टवरुन सिध्द होते. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे मयत श्रीनीवास याचा स्टुंन्डन्ट सेफ्टी पॉलिसी अंतर्गत रक्कम मिळविण्या करीता अर्ज केला होता ही बाब नि.क्रमांक 4/ ए वरील व 4/ बी वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. व तसेच अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 ने मयत श्रीनीवास यांचे ड्रायव्हींग लायसेंस व तसेच पैसे भरल्याची पावती व न्यूज पेपरची कटींग इत्यादी कागदपत्रांची मागणी केली होती ही बाब नि.क्रमांक 4/के व 4/एल या कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच अर्जदाराचा विमादावा सदरचे कागदपत्रे न दाखल केल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ने फेटाळला. ही बाब नि.क्रमांक 4/पी वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. वास्तविक अर्जदाराच्या मयत मुलाचे गैरअर्जदार क्रमांक 1 कडे स्टुंन्डन्ट सेफ्टी पॉलिसी अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 2 मार्फत विमा काढला होता ही बाब अॅडमिटेड फॅक्ट आहे. कारण गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने त्यांच्या लेखी जबाबात पॉलिसी काढल्याचे कोठेही नाकारले नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 ने मंचासमोर सदर पॉलिसीची प्रत दाखल केलेली नाही.त्यामुळे ड्रायव्हींग लायसेंस आवश्यक राहिले असते तर व तसा नियम राहिला असता तर गैरअर्जदार क्रमांक 1 ने तो नियम मंचासमोर आणणे आवश्यक होते, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याबद्दलचा कोणताही नियम मंचासमोर आणला नाही. तसेच सदरील प्रकरणात अर्जदाराच्या मयत मुलाचा मृत्यू हा ट्रकने मागुन येवुन धडक दिल्यामुळे झाला आहे, त्यामुळे ड्रायव्हींग लायसेंसची मागणी करणे योग्य नाही. व त्या कारणाहून अर्जदाराचा विमा प्रस्ताव नाकारुन अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. व अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 1 कडून 20,000/- रुपये मिळवण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास
स्टुडन्ट सेफ्टी पॉलिसी अंतर्गत रु.20,000/- फक्त (अक्षरी रु. वीसहजार फक्त)
द्यावे.व शारीरिक त्रासा बद्दल रु. 5,000/- फक्त (अक्षरी रु.पाचहजार फक्त) व
दाव्याच्या खर्चापोटी रु.2,000/- फक्त अक्षरी रु.दोनहजार फक्त) गैरअर्जदाराने
अर्जदारास आदेश मुदतीत द्यावे.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.