Maharashtra

Nanded

CC/10/99

Amindershingh Chanchalsingh Mann - Complainant(s)

Versus

Divisional Manager,United India Insurance Company Lit. - Opp.Party(s)

ADV.S.R.Agrawal

12 Oct 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/99
1. Amindershingh Chanchalsingh Mann R/o.Tupps,Tq.& Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Divisional Manager,United India Insurance Company Lit. Guru Comples G.G.Road NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBERHON'BLE MR. Member Mr. S. J. Samte ,MEMBER
PRESENT :

Dated : 12 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/99
                          प्रकरण दाखल तारीख - 30/03/2010
                          प्रकरण निकाल तारीख 12/10/2010
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
अमिंदरसिंघ पि. चंचलसिंघ मान
वय 26 वर्षे, धंदा व्‍यापार                                 अर्जदार
रा. तुप्‍पा ता.जि. नांदेड
     विरुध्‍द.
1. युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     तर्फे वीभागीय व्‍यवस्‍थापक                           गैरअर्जदार
     गूरु कॉम्‍पेक्‍स, जी.जी.रोड. नांदेड.
2.                 इंडस इण्‍ड बँक,
2.शाखा नांदेड, तर्फे लिगल एक्‍झीकेटीव्‍ह,
2.बाफना पॉंईट, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.संदिप अग्रवाल.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील        -  अड.एस.जी.मडडे.
गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील        - अड.वाय.एस.अर्धापूरकर
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
         गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
          थोडक्‍यात अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदार हा ट्रक क्र.एम.एच-26-एच-7187  चा मालक आहे. ट्रक हा वर्ष 2006 मध्‍ये उत्‍पादित केलेला आहे. अर्जदाराने गेरअर्जदार विमा कंपनीकडून दि.7..11.2008 ते 8.11.2009 या कालावधीकरिता ट्रकचा विमा काढलेला आहे. ट्रकची किंमत रु.10,50,000/- इतकी आहे. विमा पॉलिसीचा नंबर 230600/31/08/01/0004143 असा आहे.दि.5.4.2009 रोजी सदर ट्रक हा
 
 
 
सांगलीहून नागपूर येथे जात असताना ट्रक क्र.एम.पी.-09-एच.पी.6769 या ट्रकला समोरुन जोरदार धडक दिली.  अपघात घडला त्‍यावेळेस ट्रक क्रंमाक एम.एच-26-एच-7178 हा चालक नामे हरदिपसिंघ चरणजितसिंघ खैरा हा चालवत होता वत्‍यांच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना होता.   पोलिस ठाणे अर्धापूर यांनी ट्रक क्र. एम.पी-09-एच.पी.6769 च्‍या ड्रायव्‍हर विरुध्‍द गून्‍हा क्र.75/2009 दि.5.4.2009 रोजी नोंदविला. अपघात इतका जोरात होता की ट्रक क्र. एम.पी.-09-एच.पी.6769 यांने अर्जदाराचा ट्रक क्र. एम.एच-26-एच-7178 ला धडक दिल्‍यानंतर अर्जदाराच्‍या ट्रकच्‍या कॅबीन, रेडीयटर, जाळी, पंखे, इंजिन चेसीस, टायर डिक्‍स, चाकाची घडी गेअर बॉक्‍स यांचे पूर्णत नूकसान होऊन ते निकामी झाले. अपघाताची माहीती गैरअर्जदार विमा कंपनीला देण्‍यात आली. त्‍यांनी जी.आर.पाटील यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नियूक्‍ती केली. सर्व्‍हेअर सर्व्‍हे केल्‍यावर अर्जदाराचे ट्रकचे संपूर्ण नूकसान झाल्‍याचे कबूल केले. अर्जदाराने ट्रक टोचा करुन नांदेड येथे आणला. नांदेड येथील गॅरेजमध्‍ये चालकाकडून पाहणी केल्‍यानंतर त्‍यांनी सदर ट्रक दूरुस्‍त होण्‍याजोगा नसल्‍याबाबतचे मत व्‍यक्‍त केले. जर दूरुस्‍त केल्‍यास रु.9,00,000/-खर्च येईल असे सांगितले. सर्व्‍हेअर श्री. जी.आर पाटील यांनी सर्व्‍हे रिपोर्ट मध्‍ये ट्रकचे रु.3,60,000/-चे नूकसान झाल्‍याचा चूकीचा अभीप्राय दिला आहे. तो अभीप्राय अर्जदार यांना मान्‍य नाही. सदर ट्रक हा इंडूसंड बँक यांच्‍याकडून घेतलेल्‍या कर्जाद्वारे खरेदी केला होता. त्‍यामूळे अर्जदारास ट्रकचा हप्‍ताभरणे कठीन जात आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराला दि.01.12.2009 रोजी वकिलामार्फत क्‍लेम मिळण्‍याबददल नोटीस पाठविली परंतु नोटीस मिळूनही नोटीसचे उत्‍तर ही दिले नाही व रक्‍कम ही दिली नाही. म्‍हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास नूकसान भरपाई रु.9,00,000/- दि.5.4.2009 पासून 18 टक्‍के व्‍याजसही दयावेत, तसेच मानसिक ञासापोटी रु.1,00,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.10,000/- दयावेत.
              गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचे सेवेमध्‍ये कोणतीही ञूटी नाही कारण त्‍यांनी अर्जदाराचा क्‍लेम फेटाळलेला नाही. अर्जदाराचा क्‍लेम प्रलंबित ठेवलेला आहे. अर्जदारानी दाखल केलेला क्‍लेम हा वेगळा आहे. अर्जदारानी नवीन कागदपञ सरळ मंचामध्‍ये दाखल केलेले आहेत.अर्जदार यांना सदर तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार नाही. अपघाताच्‍या वेळेस हरदिपसिंघ खैरा हा वाहन चालवित नव्‍हता व चालकही नव्‍हता. तसेच व्‍हॅडींग व इफेक्‍टींव्‍ह ड्रायव्‍हीग लायसन्‍स त्‍यांचे कडे नव्‍हते.
 
 
अपघातात ट्रकचे इतके नूकसान झालेले नाही. अपघातात वाहनाचे जास्‍त नूकसान झालेले नाही तर फार कमी नूकसान झालेले आहे, कारण नूकसानीबददल स्‍पेअर्स पार्टसचे व लेबर चार्जेसचे इस्‍टीमेंट दाखल केलेले नाही.गैरअर्जदार यांचे सर्व्‍हेअर जी आर पाटील यांनी रु.3,60,000/- चे ट्रकचे नूकसान झाल्‍याचा रिपोर्ट दिला आहे.अर्जदाराचे सर्व आरोप हे खोटे व बीनबूडाचे आहेत.गैरअर्जदार यांना दि.01.12.2009 रोजीची अर्जदाराची कोणतीही नोटीस मिळालेली नाही. गैरअर्जदार यांना दि.6.4.2009 रोजी अपघाताची माहीती कळाल्‍याबरोबर सर्व्‍हेअर पी.व्‍ही. तांदळे यांनी सर्व्‍हे करुन दि.17.4.2009 रोजी सर्व्‍हे रिपोर्ट सादर केला. फायनल सर्व्‍हे रिपोर्ट श्री.जी.आर.पाटील यांनी दि.17.4.2009 व 2.5.2009 रोजी केला व रिपोर्ट दि.28.7.2009 रोजी सादर केला. फायनल असेंसमेट रिपोर्ट हा जे पार्ट कायमचे निकामी झाले आहेत त्‍याबददल दिलेला आहे. गैरअर्जदार यांचे सर्व्‍हेअर यांनी अपघाताच्‍या क्‍लेम बददल कॅश लॉस बेसिस वर सेंटल करण्‍याचा नीर्णय घ्‍यावा असे गैरअर्जदार यांना म्‍हटले पण गैरअर्जदार हे तयार झाले नाहीत.सर्व्‍हेअर यांनी अर्जदार यांना सांगितले की, सदर क्‍लेम हा रिपेअर बेसिस वर सेंटल करावा असे म्‍हटले, पण कॅश लॉस बेसिसवर नाही.कॅश लॉस बेसिस वर रु.3,60,000/- एवढे होत होते तर रिपेअर बेसिस वर रु.6,30,481/- होत होते. अर्जदार यांनी दि.15.10.2009 रोजी पञ देऊन विनंती केली की, ते रु.3,60,841/- या कॅश लॉस बेसिस वर घेण्‍यास तयार आहेत. परंतु त्‍यांनी तो घेतला नाही. कारण त्‍यांना रिपेअर बेसिस वर रु.6,30,481/- एवढी रक्‍कम हवी होती. गैरअर्जदाराच्‍या सेवेत कूठलीही ञूटी नसून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
                       गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. दावा, मागणी व प्रार्थना या बददल गैरअर्जदार यांना मान्‍य आहे व ही रक्‍कम गैरअर्जदार यांना देणे कायदेशीर बंधनकारक आहे. गैरअर्जदार क्र.2 ही एक बँकीग कंपनी आहे, गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांना वादातील वाहन ट्रक क्र.एम.एच.-26-एच-7187 हे खरेदीसाठी रु.10,70,000/- कर्ज पुरवठा केला होता. अर्जदाराने ही रक्‍कम न भरता थकबाकी केली. सदरील प्रकरण हे चेन्‍नई येथील आरबीट्रेटर कडे दाखल केले आहे. मा. आरबीट्रेटर यांनी त्‍यात अवार्ड पारीत केला आहे व अवार्ड क्र.29317/2009 अन्‍वये आदेश पारीत केले आहेत.अवार्डमधील आदेशाप्रमाणे करारातील ट्रक क्र.एम.एच.-26-एच-7187 गैरअर्जदार क्र.2 यांना जप्‍त करुन विकण्‍याचा अधिकार मिळाला आहे. अर्जदाराकडून एकूण रु.1,17,096/- एवढे व्‍याज येणे बाकी आहे.    तसेच
 
 
एकूण व्‍याजासहीत रक्‍कम रु.7,71,116/- प्राप्‍त होणे बाकी आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 यांच्‍यामधील करारानुसार इन्‍शूरन्‍स मधील रक्‍कमेवरती अर्जदाराऐवजी गैरअर्जदार क्र.2 यांचा अधिकार आहे. सदरील प्रकरणात अर्जदाराने गाडीचे संपूर्ण नुकसान झाले असलयाने इन्‍शूरन्‍स अन्‍वये संपूर्ण इन्‍शुवरड वाहनाची रक्‍कम मागितली आहे, गैरअर्जदार क्र.2 यांचा वाहनावरती संपूर्ण चार्ज आहे तसेच इन्‍शूरन्‍स वरती संपूर्ण अधिकार आहे. अर्जदाराची मागणी मान्‍य करुन त्‍यातील रक्‍कम रु.7,71,716/- ही गैरअर्जदार क्र.2 यांना देण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?          होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार यांचा अशोक लेलॅड हा एम.एच.-26-एच-7187 यांची गैरअर्जदार यांचेकडे पॉलिसी क्र. 230600/31/08/01/0004143या नावांने विमा रु.10,50,000/- उतरविला होता. दि.5.4.2009 रोजी हा ट्रक सांगलीवरुन नागपूर येथे जात असताना समोरुन येणा-या ट्रक क्र.एम.पी.09-एच.पी.-6769 या ट्रकने जोरात धडकदिली. त्‍यांच वेळी वाहन हे हरदिंपसिंघ खैरा हा चालवीत होता. यासाठी पोलिस स्‍टेशन अर्धापूर यांनी दि.5.4.2009 रोजी गून्‍हा नंबर 75/2009 नोदंविला आहेत. गैरअर्जदार यांना सूचना मिळाल्‍यावर त्‍यांनी प्राथमिक सर्व्‍हेसाठी जी.आर. पाटील यांना पाठविले. श्री. जी.आर.पाटील यांनी घटनास्‍थळाचा सर्व्‍हे करुन रिपेरिंग बेसिसवर रु.6,30,481/- देण्‍याचे मान्‍य केले. कॅश लॉस बेसिसवर रु.3,60,841/- देण्‍याचे सूचविले आहे, अर्जदार यांना हे अमान्‍य आहे. अर्जदाराच्‍या मते गाडीचा टोटल लॉस झालेला आहे संपूर्ण गाडी ही निकामी झाली असून फेकून दयायच्‍या कामाची आहे. एंकदर अर्जदाराचे स्‍वरुप व परिस्थितीजन्‍य पूरावा जसे की, पोलिस पंचनामा यांचे अवलोकन केले असता अर्जदाराचे वाहन हे समोरुन येणा-या ट्रक यांची समोरासमोर टकर झाली व यात अपघातग्रस्‍त वाहनाचे भरपूर नूकसान झाले. ही गोश्‍ट खरी आहे की, वाहनाचे नूकसान झाले  परंतु  समोरासमोर  टक्‍कर  झाल्‍यानंतर  ते  वाहन फेकून दयायच्‍या
 
 
कामाचे होईल व परत वापरात येणार नाही असे होऊ शकत नाही. कारण समोरा समोर टक्‍कर झाल्‍यानंतर फार तर समोरचा भाग, इंजिन, रेडियेटर इत्‍यादी चे नूकसान होऊ शकते, ट्रकची मागील बाजू बॉडी यांचे नूकसान होण्‍याची शक्‍यता नाही. कारण पंचनाम्‍यावरुन असे दिसून येते की, गाडी  पलटी खाल्‍लेली नाही, उभ्‍या गाडीस समोरुन टक्‍कर करण्‍यात जे टायर, डिस्‍क मागील बॉडी चा भाग हा खराब व्‍हायचे काही कारण नाही. म्‍हणजे अर्जदाराच्‍या ट्रकचे टोटल लॉस झाले आहे असे शक्‍य नाही. त्‍यात अर्जदार यांनी जे इस्‍टीमेंट दिले आहे हया इस्‍टीमेटवरुन एकच पार्ट दहा दहा वेळेस लिहील्‍याचे दिसून येते. म्‍हणजे रिपिटेशन भरपूर झालेले आहे. इस्‍टीमेंटमध्‍ये लिहीलेल्‍या किंमती सोबत प्राईस लिस्‍ट नसल्‍याकारणाने हया किंमती कन्‍फॉर्म होऊ शकत नाहीत. ट्रकची समोरील चेसीस बेंड झाली तरी हाफ चेसीस बदलता येऊ शकते. इंजिन देखील धडकेने पूर्णतः ख्रराब होऊ शकत नाही. त्‍यात जूजबी दूरुस्‍ती केल्‍यास ते कामास येऊ शकते. कॅबीन, समोरचा बॉडी शो, रेडीयेटर इत्‍यादी भागच अपघातात खराब होऊ शकतात. यात गीअर बॉक्‍स, क्‍लच हे खराब होऊ शकत नाही. असेंब्‍ली फ्रेम ची किंमत इस्‍टीमेंट मध्‍ये रु.2,00,856/- दाखवलेली आहे. क्‍लचची किंमत रु.34062/- दाखविण्‍यात आलेलीक आहे व दिलेल्‍या इस्‍टीमेंट हे गूडगिला अटोमोबाईल्‍स यांनी दिलेले आहे.त्‍यांनी इस्‍टीमेंट बरोबर दिल्‍याचे वाटत नाही. यात नि.8 लेबर चार्जेस बददल दाखवलेली किंमत ही व नि.9 कॅबीनची किंमत ही दाखविण्‍यात आलेली आहे. रेडीयेटर इस्‍टीमेंट चे त्‍यांनी नि. 10 वर दाखवलेली असून देखील रु.96,540/- हे ही झाल्‍याचे दिसून येते. सर्व्‍हेअर हा पहिला व तज्ञ व्‍यक्‍ती आहे जो की अपघातग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे करुन त्‍यांचा लॉस असेस करु शकतो. परंतु यासाठी देखील संबंधीत गॅरेजमध्‍ये वाहन नेल्‍याचे नंतर त्‍यांचे डॅमेज पार्टस खोलण्‍याचे नंतरच दिलेले इस्‍टीमेंट चेक करुन यात काही दूरुस्‍ती होऊ शकते व काय होऊ शकत नाही, कूठला पार्ट घ्‍यायचा व कूठला डिसअलाऊ कराचा हे सर्व्‍हेअरच सांगू शकतो. म्‍हणून सर्व्‍हे श्री.जी.आर पाटील यांनी जो सर्व्‍हे केलेला आहे याप्रमाणे इस्‍टीमेंटच्‍या किंमती व अलाऊ केलेल्‍या किंमती दर्शवलेल्‍या आहेत. म्‍हणून इस्‍टीमेंटची किंमत पूर्णतः ग्राहय धरुन व दिलेले सर्व पार्टस लक्षात घेता समोर समोरा ट्रकची  धडक झाल्‍यानंतर ट्रकचा पूर्ण लॉस होऊ शकत नाही यामतावर आम्‍ही आलो आहोत. यूक्‍तीवादाचे हवेळी आम्‍ही हा ट्रक आणि अर्जदाराचा ट्रक परत उपयोगात येऊ शकत नाही असा एका तज्ञाचे सर्व्‍हे आणण्‍याची सूचना केली होती परंतु असे प्रमाणपञ ते आणू शकले नाहीत. गैरअर्जदार  यांनी  आपले  म्‍हणण्‍यात  कॅश लॉस बेसिसवर रु.3,60,841/-
 
 
क्‍लेम देण्‍याचे नाकारले आहे परंतु रिपेअर बेसिसवर रु.6,30,481/- देण्‍यासाठी संमती दिली आहे. मा. राष्‍ट्रीय आयोग यांचे अनेक सायटेशनमध्‍ये असे म्‍हटले आहे की, सर्व्‍हेअरचा रिपोर्ट हा अतीशय महत्‍वाचा रिपोर्ट आहे म्‍हणून सर्व्‍हेअरच्‍या रिपोर्टला महत्‍व दिले गेले पाहिजे. यात गैरअर्जदार यांनी असेही म्‍हटले आहे की, अजूनही त्‍यांनी तो क्‍लेम देण्‍याचे नाकारले नाही, व ते सतत अर्जदाराला आवश्‍यक ते कागदपञ यांची पूर्तता करण्‍याचे सांगत आहेत. परंतु अर्जदार ते करीत नाहीत. यात सर्व्‍हेअरने अर्जदाराशी केलेला पञव्‍यवहार दाखल केलेला आहे. यात अर्जदार यांचे दि.15.10.2009 रोजीचे गैरअर्जदार यांचे नांवाने लिहीलेले पञ दाखल केलेले आहे, यात रु.3,60,841/- कॅश लॉस बेसिसवर घेण्‍याची तयारी दर्शविली होती परंतु यांस गैरअर्जदार यांचीच तयारी नव्‍हती. त्‍यामूळे असे पञ दाखल जरी केले असले तरी ते विचारात आम्‍ही घेणार नाही. गैरअर्जदार यांनी अजून एक आक्षेप असा घेतला आहे की, पॉलिसी नंबर  230600/31/08/01/0004143  ही अमिदरसिंघ मान यांचे नांवावर आहे व वाहनाचे आर सी बूक देखील अमिंदरसिंघ मान यांचे नावांवर आहे. वाहनाचा फिटनेट देखील आहे. तसेच वाहन चालक हरदिपंसिंघ खैरा यांचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स एम.एम.-26-452-2003 हे ही दाखल आहे. या कूठल्‍याही वीषयी आक्षेप नाही. फक्‍त पॉलिसीवर अमिदरंसींघ चंचलसिंघ मान   असे नांव आलेले आहे तेव्‍हा पॉलिसी वरील नांव व इतर कागदपञा वरील नांव हे एकच व्‍यक्‍ती आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार यांचे नांवा वीषयीचा आक्षेप आम्‍ही अमान्‍य करीत आहोत. सर्व्‍हेअर यांनी रिपेरिंग बेसिसवर मंजूर केलेली रक्‍कम रु.6,30,481/- अर्जदार यांना त्‍यांचे वाहनाची नूकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावी, वाहन हे 2006 चे आहे हे लक्षात घेऊन याप्रमाणे वाहनाचा घसारा त्‍यातून कमी होईल. नक्‍त रक्‍कम अर्जदारास मिळावी. दोन्‍ही पक्षकारांनी मा.सर्वोच्‍च न्‍यायालय या सायटेशन द्वारे अर्जदार असे जरी म्‍हणत असले तरी सर्व्‍हेअरचा रिपोर्ट हा शेवटचा नाही तो सर्व्‍हेअरचा रिपोर्ट कसा चूक आहे हे दर्शविण्‍यासाठी दूस-या एखादया Competent  सर्व्‍हेटरने सर्व्‍हे केला पाहिजे किंवा अटोमोबाईल्‍स क्षेञातील एखादया तज्ञ व्‍यक्‍तीचे  तसे सर्व्‍हे पाहिजे तेव्‍हाच सर्व्‍हेअरचा रिपोर्ट चॅलेंज केल्‍या जाऊ शकतो. या प्रकरणात अर्जदार यांनी दाखल केलेले इस्‍टीमेंटच बरोबर आढळून येत नाही.गैरअर्जदार क्र.2 ही बँक आहे त्‍यांनी कर्ज दिले आहे, त्‍यांचा बोजा असल्‍यामुळे अर्जदार यांना देण्‍यात येणारी रक्‍कम अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 यांचे संयुक्‍त कर्ज खात्‍यावर जमा होईल.
 
 
 
              गैरअर्जदाराने आक्षेप घेतला आहे की, अद्याप त्‍यांनी दावा नाकारला नाही, म्‍हणून ही तक्रार अपरिपक्‍व आहे, परंतु हे प्रकरण चालू असताना गैरअर्जदारांनी आम्‍ही रिपेरिंग बेसीसवर रक्‍कम देण्‍यास तयार आहोत कॅश लॉस बेसिसरवर रक्‍कम देणार नाही असे स्‍पष्‍ट केलेले आहे. तेव्‍हा त्‍यांचा काय नीर्णय आहे तो झालाच आहे. दोघात टोटल लॉस बेसिसवर क्‍लेम  दयावा या बददल वाद चालू होता,  त्‍यामूळे क्‍लेम सेंटलमेंट होऊ शकला नाही. यास्‍तव अर्जदार यांना मानसिक ञास देणे योग्‍य होणार नाही.
         
         दूसरे एक IV (2009) CPJ 46 (SC) Supreme Court of India, New India Assurance Co.Ltd. Vs. Pradeep Kumar,    यात कारगो हे बूडालेले होते, त्‍यामूळे ते दूरुस्‍त करण्‍याचा प्रश्‍नच येत नाही व त्‍यांची काय किंमत होते हे सिध्‍द करण्‍याची गरजही नाही. पॉलिसी घेताना जी रक्‍कम ठरविली गेली असेल अशा वेळेस तीच रक्‍कम दयावी लागेल. परंतु यात त्‍या शिपचे काहीच हाती लागणे शक्‍य नाही. प्रस्‍तूत प्रकरणात वाहनाची समोरा समोर टक्‍कर झालेली आहे त्‍यामूळे हे सायटेशन या प्रकरणास लागू होणार नाही.
 
              IV (2009) CPJ 1 (SC) Supreme Court of India, Oriental Insurance Company Ltd.   Vs. Ozma Shipping company and anr.  या प्रमाणे सर्व्‍हेअरने इस्‍टीमेंट मध्‍ये दाखवलेली रक्‍कम मान्‍य जरी केली नसेल तरी इस्‍टीमेट मध्‍हये लिहीलेली रक्‍कमेच्‍या सोबत प्राईस लिस्‍ट जोडलेली नाही. त्‍यामूळे इस्‍टीमेंट मध्‍ये लिहीलेली रक्‍कम ही अवाजवी व जास्‍तीची होती असे दिसून येते.
 
              IV (2009) CPJ 230 (NC)    National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, Oriental Insurance Co.Ltd. Vs.  Mehar Chand, हे अपघातामध्‍ये अपंगत्‍वा आल्‍याबददल आहे. त्‍यामूळे हे प्रस्‍तूत केस लॉ लागू होणार नाही.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                      आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार क्र.1 यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना ट्रक क्र. एम.एच-26-एच-7187 च्‍या अपघातातील नूकसानी बददल रिपेरिंग बेसिसवर रु.6,30,481/- व त्‍यावर तक्रार दाखल झाल्‍यापासून म्‍हणजे दि.30.03.2010 रोजी पासून 9 टक्‍के व्‍याजाने, घसारा कापून (डिप्रिसिऐशन ) उर्वरित रक्‍कम अर्जदारास पॉलिसीच्‍या नियमाप्रमाणे दयावी.
3.                                         मानसिक ञासाबददल आदेश नाही, गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्‍द आदेश नाही.
4.                                         दावा खर्च म्‍हणून रु.2,000/-
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील     श्रीमती सुवर्णा देशमूख       श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                         सदस्‍या                          सदस्‍य
           
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक   

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER