Maharashtra

Ahmednagar

CC/15/187

Savita Sanjay Gunjal - Complainant(s)

Versus

Divisional Manager,United India Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

S.A.Shaikh

30 Apr 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/187
( Date of Filing : 07 May 2015 )
 
1. Savita Sanjay Gunjal
Sangamner Khurd,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager,United India Insurance Co.Ltd.
Hotel Karam Building,Vidya Nagar,Sangamner,Tal Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:S.A.Shaikh, Advocate
For the Opp. Party: Adv.A.K.Bang, Advocate
Dated : 30 Apr 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदार हिची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     तक्रारदार ही वरील ठिकाणची कायम रहिवासी असून तिचे मालकीची महिंद्रा अॅन्‍ड महिंद्रा कंपनीची बोलेरो मॉडेल असलेली ज्‍याचा रजि.नं.एम.एच.17 ए.जे.3208 या क्रमांकाची गाडी होती व आहे. सदर गाडीवर तक्रारदार हिने सामनेवालाकडून विमा उतरविलेला असून त्‍याची मुदत दिनांक 11.01.2013 ते दिनांक 10.01.2014 या कालावधीपर्यंत होती.

3.   वरील गाडीचा तक्रारदार तिचे वैयक्तिक कामाकरीता, घरगुती कामाकरीता वापर करीत होते व त्‍याकामी तक्रारदार हिने अशोक हरीभाऊ खरात यास वरील गाडीवर गाडी चालविणेकामी ड्रायव्‍हर म्‍हणून नेमलेले होते. त्‍याचाच भाग म्‍हणून दिनांक 04.03.2013 रोजी तक्रारदार हिने वरील गाडीवरील ड्रायव्‍हर अशोक हरीभाऊ खरात यास तक्रारदार हिचे वैयक्तिक कामाकरीता त्‍यांचे जवळचे स्‍नेही यांना पुण्‍याहुन संगमनेर येथे घेवुन येण्‍याकरीता वरील गाडी घेवून पुणे येथे पाठविले होते. त्‍याच दिवशी रात्री 11.45 वाजता पुणे येथील डी.वाय.पाटील कॉलेज जवळ काही अज्ञात इसमांनी वरील अशोक हरीभाऊ खरात यास थांबवून त्‍याचे ताब्‍यातील असलेली रक्‍कम रु.1800/- बळजबरीने घेऊन अशोक हरीभाऊ खरात यास मारुन टाकण्‍याचा धाक दाखवून वरील गाडी घेऊन पळुन गेले. त्‍याबाबत अशोक हरीभाऊ खरात याने विश्रांतवाडी पोलीस स्‍टेशन, पुणे येथे फिर्याद देवुन तक्रारदार हिस देखील कळविले. तदनंतर तक्रारदार हिने सामनेवाला यास त्‍याबाबत प्रत्‍यक्ष भेटून कळविले आहे व वरील गाडीसंबंधी घडलेल्‍या वरील घटनेच्‍या अनुषंगाने सामनेवालाकडून विमा मिळणेसंबंधी सामनेवालाकडे आवश्‍यक ती कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे.

4.   अशा वस्‍तुस्थिती असतांना सामनेवाला याने तक्रारदार हिने सामनेवालाकडे सादर केलेल्‍या कागदपत्रांची कोणतीही सारासार चौकशी न करता तक्रारदाराचे वरील गाडीसंबंधी आपण उतरविलेल्‍या विम्‍यासंबंधीच्‍या अटी व शर्तींचा भंग केलेला आहे असा मोघम व खोटा कांगावा करुन तक्रारदार हिस वरील गाडीसंबंधी होणारी विम्‍याची रक्‍कम देण्‍यास नकार देवुन तसे तक्रारदार हिस सामनेवाला यांनी दिनांक 28.01.2014 चे पत्रांन्‍वये कळविले.

5.   म्‍हणून तक्रारदार हिने सामनेवाला यास दिनांक 18.02.2014 रोजी वकीलामार्फत रजि.नोटीस देवून वरील गाडीसंबंधी सामनेवाला याने विमा उतरवितांना निश्चित झालेली रक्‍कम रु.5,10,000/- तसेच वरील रक्‍कम सामनेवाला यांने तक्रारदार हिस देणेकामी जाणीव पुर्वक टाळाटाळ केल्‍यामुळे तक्रारदार हिस झालेल्‍या शारीरीक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रु.10,000/- अशी एकुण रक्‍कम रु.5,20,000/- अदा करावी अशी मागणी केली. सदर नोटीस सामनेवाला यास मिळूनही सामनेवाला याने तक्रारदार हिस नोटीसमधील मागणी केलेली रक्‍कम अदा केली नाही. तसेच नोटीसीस उत्‍तरही दिले नाही. म्‍हणून तक्रारदार हिचे मालकीची वर उल्‍लेखीत गाडी संबंधी सामनेवाला याने विमा उतरवितांना निश्चित केलेली रक्‍कम रु.5,10,000/- तसेच वरील रक्‍कम सामनेवाला याने तक्रारदार हिस देणेकामी जाणीव पुर्वक टाळाटाळ केल्‍यामुळे तक्रारदार हिस झालेल्‍या शारीरीक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रु.10,000/- अशी एकुण रक्‍कम रु.5,20,000/- सामनेवालाकडून वसुल होऊन मिळणेकामी सदर चौकशी अर्ज तक्रारदार हिने मे.कोर्टात दाखल केला आहे.

6.   तक्रारदार हिने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार हिस अर्जात मागणी केल्‍याप्रमाणे विम्‍याची रक्‍कम व नुकसान भरपाईची रक्‍कम अशी एकुण रक्‍कम रुपये 5,20,000/- सामनेवालाकडून वसुल होऊन मिळावी.

7.   तक्रारदार हिने तक्रारीसोबत निशाणी 2 ला अॅफिडेव्‍हीट दाखल केलेले आहे. तसेच निशाणी 6 सोबत 1)मोटार वाहन कव्‍हर नोट दिनांक 9.1.2012 2) सामनेवालाने अर्जदारास दिेलेले पत्र दिनांक 28.1.2014 3) एफ.आय.आर. 83/2012 ची नक्‍कल दिनांक 5.3.2012 4) टॅक्‍स इन्‍व्‍हाईस ची प्रत दिनांक 9.1.2012 5) एम.एच.17 एजे-3208 ची आर.टी.ओ.ऑफिस यांचेकडील इन्‍टीमेशन लेटर दिनांक 20.3.2013 6) अर्जदार हिने सामनेवालाला दिलेली रजि. नोटीस दिनांक 13.2.2014. इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

8.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवाला यांना मे.मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. त्‍यानुसार सामनेवाला हे मे.मंचात हजर झाले व सामनेवालाने निशाणी 12 ला कै‍फियत दाखल केलेली आहे. सामनेवालाने त्‍यांचे कैफियतीमध्‍ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने दिनांक 11.01.2013 ते 10.01.2014 या कालावधीसाठी विमा कंपनीकडे विमा पॉलीसी क्रमांक 162502/31/12/01/00006465 नुसार विमा कंपनीने पॉलीसी धारण केली बाबत सदरील विमा पॉलीसी देतांना विम्‍याचा करार विमा पॉलीसीमध्‍ये नमुद केलेल्‍या अटी व नियमानुसार केला जातो. सदरील वाहन आर.टी.ओ.नोंदणीकृत असून खाजगी वाहन म्‍हणून विमा उतरविलेला आहे. सदर अटी व शर्तीनुसार वाहन हे प्रवाशांना भाडयाने किंवा प्रवासी वाहून नेण्‍यासाठीचा परवाना नाही. तक्रारदार हिचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार हिचा ड्रायव्‍हर पुणेकडून संगमनेरकडे जात असतांना सदरील वाहन हे अशोक खरात चालवित असताना अज्ञात व्‍यक्‍तींनी त्‍यांचे वाहन बळजबरीने पळवून नेले.

9.   सामनेवाला कंपनीने तपासणीकामी एक सदरील बाबतचा तपास केला. वादाची तपास प्रक्रिया सामनेवालातर्फे करताना उपलब्‍ध कागदपत्रांचे आधारे तक्रारदार हिने उघड केली. बरेच वेळी सदरील वाहन अनोळखी व्‍यक्‍तींना भाडयाने देण्‍यात आले आणि अशाच अज्ञात व्‍यक्‍तीं वाहन चालवत असतांना त्‍यांना धमकावुन वाहन घेऊन गेले. अनोळखी व्‍यक्‍तीला भाडयाने वाहन दिल्‍यामुळे विमा उतरविलेले वाहनाची चोरी झाल्‍याची घटना घडली. याशिवाय अनोळखी व्‍यक्‍तीला वाहनाची अनुमती देतांना तक्रारदार हिने पुरेशी काळजी घेतलेली नाही. अशा प्रकारे विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्तींचे उल्‍लंघन तक्रारदार हिने केलेले आहे. तसेच वास्‍तविक चोरीच्‍या दिवशी वाहन व्‍यावसायाकरीता चालवत होते. कारण त्‍यात अनोळखी लोकांना वाहन भाडयाने प्रवास करण्‍यास तक्रारदार हिने परवानगी दिली होती.

10.  म्‍हणून विमा धोरणांचा वापर न करता विमा पॉलीसीच्‍या अटी व नियमांच्‍या मर्यादेचे उल्‍लंघन होत असल्‍याने सामनेवाला कंपनीने तक्रारदाराचे दाव्‍याचे योग्‍यरित्‍या खंडन केलेले आहे. त्‍याबाबत पत्र देऊन सविस्‍तर माहिती दिलेली आहे. म्‍हणून विमा कंपनीने सेवेमध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही.

11.  वैयक्तिकरित्‍या सदरहू तक्रारीत विविध तथ्‍यावर विचार केला असता तक्रारदार हिचे कडून केलेली तक्रार विचारात घेतली. तरी सदरील वाद दिवाणी स्‍वरुपाचा आहे. म्‍हणून सर्व बाबीचा विचार करता तक्रारदार हिची तक्रार खारीज करण्‍यात यावी. सामनेवालास नुकसान भरपाईची प्रतिपुर्ती रुपये 5,000/- देण्‍यात यावी असे सामनेवालाने त्‍यांचे कैफियतीत नमुद केलेले आहे.

12.  सामनेवाला विमा कंपनीने निशाणी 13 सोबत तक्रारीतील नमुद विमा धारक वाहनाचे विमा अटी व शर्तीची प्रस्‍तावित प्रत दाखल केलेली आहे. निशाणी 15 ला तक्रारदाराने सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. तसेच निशाणी 17 ला लेखी युक्‍तीवाद दाखल केलेला आहे. त्‍यात सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार हिचे वाहनावर विमा होता ही बाब मान्‍य केलेली आहे. तसेच तक्रारदार हिने असे म्‍हटंलेले आहे की, सामनेवालाने त्‍यांचे कैफियतीमध्‍ये तक्रारदार यांनी सामनेवालास दिनांक 28.01.2014 रोजी पत्र देऊन त्‍यांचे मालकीचे वाहन क्र.एम.एच.17-एजे-3208 बलेरो कंपनीची कार चोरी झाल्‍याचे मान्‍य केल्‍याचे म्‍हंटले आहे. तसेच तक्रारदार हिने विमा दाव्‍यासंदर्भात कुठल्‍याही अटी व शर्तीचा भंग केलेला नाही असे लेखी युक्‍तीवादात नमुद करुन विमा उतरविल्‍याचे निश्‍चीत केलेली रक्‍कम रुपये 5,10,000/- तसेच तक्रारदार हिस झालेल्‍या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये 10,000/- अशी एकुण 5,20,000/- रुपये तक्रारदार हिस देण्‍याचा हुकूम व्‍हावा असे लेखी युक्‍तीवादात नमुद केलेले आहे.

13.  सामनेवाला यांनी निशाणी 19 ला मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍याय निवाडे दाखल केले आहेत.

Consumer Protection Act, 1986- Sections 12 and 17- Insurance claim jeep registered as a private Omni – comprehensively insured was stolen- Claim was repudiated on ground that vehicle was given on hire was being used against limitation as to use- District Forum dismissed complaint and State Commission upheld the order- FIR lodged by driver of vehicle and report of investigator show that vehicle was being used against limitation as to use and repudiation of claim was justified- No reason to differ with vies view. Result: Revision dismissed.

2007 (1) CPR 230 (NC), Jagdeesh Singh V.s The United India Insurance Co.Ltd.,

14.  तक्रारदार हिने दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, लेखी युक्‍तीवाद, सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कैफियत, कागदपत्रे यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवालाने केलेला तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. या सर्व बाबींचे अवलोकन केले असता न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय.?                    

 

... होय.

2.

सामनेवालाकडून तक्रारदार नुकसान भरपाई व खर्च मिळणेस पात्र आहे काय.?                    

 

...अंशतः होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

15.   मुद्दा क्र.1  – तक्रारदारतर्फे निशाणी 17 ला लेखी युक्‍तीवाद दाखल केलेला आहे. त्‍यात तक्रारीतील म्‍हणणे नमुद केलेले असून त्‍यासोबत अधिकचा लेखी युक्‍तीवादात सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदार हिचे तक्रारीतील नमुद वाहनावर विमा उतरविला आहे ही बाब मान्‍य केलेली आहे. तसेच सामनेवालाने त्‍यांचे कैफियतीत बलेरो कंपनीची कार चोरी झाल्‍याचे मान्‍य केल्‍याचे म्‍हटंले आहे. तसेच तक्रारदार हिने विमा दाव्‍यासंदर्भात कुठल्‍याही अटी व शर्तीचा भंग केलेला नाही असे नमुद करुन विमा दाव्‍याची रक्‍कम 5,10,000/- रुपये तसेच मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रु.10,000/- अशी एकुण 5,20,000/- मिळण्‍याकामी लेखी युक्‍तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत सदरील तक्रारीतील नमुद वाहन अनोळखी व्‍यक्‍तींना भाडयाने देण्‍यात आले. अज्ञात व्‍यक्‍ती वाहन चालवित असतांना त्‍यास इतर लोकांनी त्‍यांना धमकावून वाहन घेऊन गेले. अनोळखी व्‍यक्‍तीस वाहन चोरीचे दिवशी भाडयाने दिल्‍यामुळे सदरील वाहनात अनोळखी लोकांना वाहन भाडयाने प्रवास करण्‍यास तक्रारदार हिने परवानगी दिली. विमा पॉलीसीचे शर्तीच्‍या मर्यादेचे उल्लंघन होत असल्‍याचे सामनेवाला कंपनीने तक्रारदार हिच्‍या दाव्‍याचा योग्‍यरित्‍या खंडन केले आहे. विमा कंपनीने तक्रारदारास त्‍याबाबत कळविले आहे.

16.  सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये सामनेवाला विमा कंपनीने कागदपत्रांची तपासणी केली असता नमुद वाहन वेळोवेळी भाडयाने दिले असल्‍याचे तसेच सदर वाहन चोरीचे वेळी भाडयाने दिले असल्‍याचे नमुद केले आहे. परंतु त्‍याबाबत कुठलाही ठोस पुरावा व कुठलिही कागदपत्रे मे.मंचात दाखल केलेली नाहीत. त्‍यामुळे नमुद वाहन चोरीचे वेळी भाडयाने दिले असल्‍याबाबत पुरावा नसल्‍याचे सिध्‍द होत आहे. तसेच एफ.आय.आर. मध्‍ये सामनेवालाने म्‍हटंल्‍याप्रमाणे कुठल्‍याही प्रकारचे सदरचे वाहन हे भाडयाने दिले असल्‍याबाबतचा उल्‍लेख नाही. त्‍याच प्रमाणे सदरील संपुर्ण प्रकरणात सामनेवालाने वाहन भाडयाने दिले होते याबाबतचा कुठलाही पुरेसा पुरावा दिलेला नाही. सामनेवाला यांनी निशाणी 19 सोबत मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचा न्‍याय निवाडा दाखल केलेला आहे. 2007 (1) CPR 230 (NC), Jagdeesh Singh V.s The United India Insurance Co.Ltd.,

वरील न्‍याय निवाडा सामनेवालाने दाखल केलेला आहे. त्‍यात वाहन चालकाने दाखल केलेले एफ.आय.आर. आणि विमा कंपनीचे तपास अधिका-याचे अहवालानुसार वाहन हे मर्यादेचे विरुध्‍द वापरण्‍यात आले आणि विमा पॉलीसीचे अटी व शर्तीचे उल्‍लंघन झाले असल्‍यामुळे मा.राष्‍ट्रीय आयोग यांनी तक्रारदाराचे पिटीशन फेटाळलेले आहे. सदरील न्‍याय निवाडा या तक्रारीस लागू पडत नाही. कारण सदरचे न्‍याय निवाडयात विमा कंपनीचे अधिका-यांचा अहवाल आहे. तसेच एफ.आय.आर. मध्‍ये वाहन भाडयाने दिल्‍याचे नमुद आहे. परंतु या तक्रारीत सामनेवाले कंपनीचे अधिका-यांचा अहवाल नाही. तसेच एफ.आय.आर.मध्‍ये वाहन भाडयाने दिल्‍याचे नमुद नाही.  

17.  तक्रारदार हिचा विमा दावा नाकारुन सामनेवाला यांनी तक्रारदार हिस द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेली आहे असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

18.  मुद्दा क्र.2 – मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन सामनेवाला क्र.2  विमा कंपनीकडे उतरविलेले वाहनाचा विमा निश्‍चीतीची रक्‍कम व नुकसान भरपाईची रक्‍कम व विमा निश्‍चीतीची रक्‍कम 5,10,000/- व तक्रारदार हिसा झालेल्या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापेाटी रक्‍कम रुपये 5,000/- देणे उचीत ठरेल. म्‍हणून मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

19.  मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदार हिची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला यांनी तक्रारदार हिस विमा दावा निश्‍चीतीची रक्‍कम रु.5,10,000/- (रक्‍कम रु.पाच लाख दहा हजार फक्‍त) तक्रारदार हिस द्यावे.

3.   सामनेवाला यांनी तक्रारदार हिस झालेल्‍या शारीरीक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च 3,000/- (रक्‍कम रु.तीन हजार फक्‍त ) तक्रारदार हिस द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारदार हिस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.