Maharashtra

Sindhudurg

CC/09/101

Shri.Shivram Gopal Mhadalkar - Complainant(s)

Versus

Divisional Manager,Tata Motors Ltd,Thane-400604 & 2 Others - Opp.Party(s)

Mahesh Dattaguru Kunte,Kudal

29 Jul 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/09/101
 
1. Shri.Shivram Gopal Mhadalkar
R/O Kudal, Audumbarnagar,Tal.Kudal
Sindhudurga
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager,Tata Motors Ltd,Thane-400604 & 2 Others
Customers Support,Comershial Vehicals,Teen-Hat Naka,Nyansadhana College sarvis Road,Thane-400604
Thane
Maharastra
2. Manager,Bafna Motors(R)Pvt.Ltd
Mirjole,M.I.D.C.,Ratnagiri
Ratnagiri
Maharastra
3. Manager, Bafna Motors(R) Pvt. Ltd.
U Complex Mumbai Goa Highway Janavali, Kankavali, Tal Kankavali
Sindhudurg
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.Mahendra Goswami. PRESIDENT
  Smt. Ulka Gaokar Member
  smt vafa khan MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

सिंधुदुर्ग जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
                                           तक्रार क्र. 101/2009
                             तक्रार दाखल झाल्‍याचा दि. 23/11/2009
                                             तक्रार निकाल झाल्‍याचा दि.29/07/2010
श्री शिवराम गोपाळ म्‍हाडदळकर
वय सु.32, धंदा बांधकाम व्‍यवसाय,
रा.कुडाळ, औदुंबरनगर, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग.                           ... तक्रारदार
          विरुध्‍द
1)    विभागीय व्‍यवस्‍थापक,
टाटा मोटर्स लिमिटेड
कस्‍टमर्स सपोर्ट, कमर्शियल व्‍हे‍इकल्‍स
तीन हात नाका, ज्ञानसाधना कॉलेज,
सर्व्हीस रोड, ठाणे 400 604.
2)    व्‍यवस्‍थापक,
बाफना मोटर्स (आर) प्रायव्‍हेट लिमिटेड
मिरजोळे, एम.आय.डी.सी. रत्‍नागिरी
3)    व्‍यवस्‍थापक,
बाफना मोटर्स (आर) प्रायव्‍हेट लिमिटेड
यु कॉम्‍ल्‍पेक्‍स, मुंबई – गोवा हायवे
जानवली, कणकवली, ता.कणकवली,
जिल्‍हा सिंधुदुर्ग.                       ... विरुध्‍द पक्ष
                                                                             गणपूर्तीः-
                                           1) श्री. महेन्‍द्र म. गोस्‍वामी,   अध्‍यक्ष
                                                                                     2) श्रीमती उल्‍का राजेश गावकर, सदस्‍या
                                          3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्‍या.                       
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री महेश कुंटे
विरुद्ध पक्ष क्र.1 तर्फे - विधिज्ञ श्री अमेय गुमास्‍ते / श्री कांबळे
विरुद्ध पक्ष क्र.2 व 3 तर्फे - विधिज्ञ राजेश परुळेकर, श्री प्रसन्‍न सावंत
                  (मंचाच्‍या निर्णयाद्वारे श्री महेंद्र म.गोस्‍वामी, अध्‍यक्ष)
नि का ल प त्र
(दि.29/07/2010)
1)    तक्रारदाराचे मालकीचे वाहनात वॉरंटी कालावधीमध्‍ये दोष निर्माण होऊन देखील त्‍या दोषांची दुरुस्‍ती न करुन दिल्‍यामुळे वाहनाची किंमत मिळण्‍यासाठी व नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी सदरची तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. 
2)    तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदाराने दि.15/12/2008 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी उत्‍पादित केलेली टाटा विंगर क्रमांक एमएच 07 क्‍यू 1300 विरुध्‍द पक्ष क्र.1 चे अधिकृत विक्रेता असलेल्‍या विरुध्‍द पक्ष क्र.3 यांचेकडून खरेदी केली. सदरची गाडी खरेदी केल्‍यानंतर एक महिन्‍यातच गाडीच्‍या तक्रारी सुरु झाल्‍या व दि.9/9/2009 रोजी गाडीच्‍या गिअर बॉक्‍समध्‍ये बिघाड झाल्‍यामुळे व सदरची गाडी वॉरंटी कालावधीमध्‍ये असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी गिअर बॉक्‍स बदलून दिला; परंतु त्‍यासाठी तक्रारदारास चार दिवस रत्‍नागिरी येथे मुक्‍काम करावा लागला व त्‍याला रु.8,000/- एवढा खर्च आला. सदर वाहनास खरेदीच्‍या दिनांकापासून 18 महिन्‍यांची वॉरंटी दिलेली होती. तक्रारदार दि.5/3/2009 रोजी पूणे येथे जात असतांना गाडीच्‍या एक्‍सलेटर केबलची तक्रार निर्माण झाली. त्‍यामुळे गाडी दुरुस्‍तीसाठी तात्‍काळ चेतन मोटर्स, कोल्‍हापूर येथे नेण्‍यात येऊन दुरुस्‍त करण्‍यात आली. त्‍यानंतर दि.28/5/2009 रोजी गाडीचा स्पिडोमीटर बंद पडला व गाडीच्‍या व्हिल अलाईनमेंटमध्‍ये दोष‍ निर्माण झाल्‍याने टायर्सची झिज व्‍हायला लागली व ही बाब तक्रारदाराने विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांच्‍या निदर्शनास आणून दिल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी गाडी व्‍यवस्थित असल्‍याचे सर्व्‍हीस बुकावर लिहून दिले. त्‍यावेळी देखील तक्रारदारास रत्‍नागिरी येथे जाण्‍यायेण्‍याचा खर्च रु.4,000/- आला. 
3)    त्‍यानंतर पुन्‍हा दि.16/6/2009 रोजी गाडीमध्‍ये तोच दोष निर्माण झाला याची कल्‍पना विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांना देण्‍यात आली; परंतु विरुध्‍द पक्ष क्र.3 यांनी गाडीत कोणताही दोष नसल्‍याचे लिहून दिले. त्‍यावेळी तक्रारदाराला रु.1,000/- खर्च आला. तक्रारदाराची टाटा विंगर ही गाडी विरुध्‍द पक्षाकडून खरेदी करुन 8 महिने झाले नाहीत तरी गाडीमध्‍ये असंख्‍य बिघाड होत आहेत व सदर गाडीचे पार्टस नीट काम करीत नाहीत, त्‍यामुळे दि.1/7/2009 पासून गाडी बंद अवस्‍थेत आहे. सदर गाडीचे टायर्सही मोठया प्रमाणावर झिजलेले आहे व गाडी 2 महिन्‍यापासून बंद असल्‍यामुळे कर्जाचे हप्‍ते भरावे लागत असून तक्रारदाराच्‍या धंदयाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्‍यामुळे दर महिन्‍याला रु.80,000/- नुकसान झाले आहे. म्‍हणून तक्रारदाराने दि.8/9/2009 रोजी आपले वकीलामार्फत नोटीस पाठवून 10 दिवसांच्‍या आत बिघाड झालेले पार्टस बदलून त्‍याजागी नवीन पार्टस बसवून दयावेत व विशेष करुन गिअर बॉक्‍स,एक्‍सलेटर केबल, स्पिडोमीटर सर्व पार्टस तात्‍काळ बदलून दयावेत व व्हिल अलाईनमेंट व्‍यवस्थित करुन दयावीत व नुकसान भरपाई रु.2 लाख दयावेत अशी मागणी केली; परंतु नोटीशीची दखल न घेतल्‍यामुळे अखेर तक्रारदाराने दि.4/11/2009 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे गाडी जमा केली. तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या टाटा विंगर या गाडीच्‍या पार्टसच्‍या व टायर्सच्‍या अनेक तक्रारी असल्‍यामुळे तक्रारदारास गाडीची किंमत रु.7,90,229/- सह नुकसान भरपाईची रक्‍कम रु.3,20,00/- व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- आपणांस मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत केली आहे. 
4)    तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीसोबत नि.3 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीसोबत विरुध्‍द पक्षास पाठविलेल्‍या नोटीशीची झेरॉक्‍स प्रत, पोस्‍टाच्‍या रसिद पावत्‍यांची झेरॉक्‍स, पोच पावत्‍यांच्‍या झेरॉक्‍स,ओनर्स मॅन्‍युअलची झेरॉक्‍स प्रत, रिपेअर रेकॉडची झेरॉक्‍स प्रत, वाहनाच्‍या फोटोची झेरॉक्‍स प्रत, इंश्‍युरंसची झेरॉक्‍स प्रत, टॅक्‍स इन्‍व्‍हॉईसची झेरॉक्‍स प्रत, वॉरंटीच्‍या अटी व नियमांची झेरॉक्‍स प्रत व दि.4/11/2009 च्‍या जॉब कार्डची झेरॉक्‍स प्रत व डिलिव्‍हरी नोटची झेरॉक्‍स प्रत इ. कागदपत्रे दाखल केली. 
5)    सकृतदर्शनी तक्रारदाराची तक्रार दाखल करुन घेण्‍यास पात्र असल्‍याचे निदर्शनास आल्‍यामुळे मंचाने विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांना नोटीस बजावणी करण्‍याचे आदेश पारीत केले. त्‍यानुसार विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांना नोटीस बजावण्‍यात आली. त्‍यानुसार विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 हे त्‍यांचे वकील प्रतिनिधीमार्फत मंचात हजर होऊन त्‍यांनी नि.14 वर आपली कैफियत दाखल केली. तर विरुध्‍द पक्ष क्र.1 हे उशिराने मंचात हजर झाल्‍यामुळे रु.500/- च्‍या कॉस्‍टवर त्‍यांचे म्‍हणणे नि.21 वर दाखल केले. विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यात तक्रारदाराचे तक्रारीवर आक्षेप घेऊन तक्रारदार हा बांधकाम ठेकेदार असून त्‍याच्‍या मालकीच्‍या एकूण 3 गाडया आहेत व या गाडयांचा तक्रारदार पॅसेंजर वाहतूकीसाठी वापर करतो व धंदयासाठी वाहनाचा वापर करतो. तसेच तो स्‍वतः वाहन चालवित नाही व त्‍याच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना नाही, त्‍यामुळे तो ग्राहक ठरत नाही असा आक्षेप उपस्थित केला. तसेच वाहनात कोणताही दोष नसून दि.4/11/2009 रोजी सर्व्‍हीसिंगसाठी वाहन सोडण्‍यात आले तेव्‍हापासून वाहन नेण्‍यात आले नाही, त्‍यामुळे दि.18/11/2009 रोजी वाहन घेऊन जाण्‍याबाबत पत्र पाठवून देखील अद्याप वाहन नेले नाही व खोटी तक्रार दाखल केली आहे असे म्‍हणणे मांडले. टायरबाबत कोणतीही वॉरंटी दिली जात नसून वाहनाच्‍या वापरानुसार टायरची झिज होते. सदर टायरची तपासणी अपोलो कंपनीच्‍या तज्ञांकडून करण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये कोणताही दोष नसल्‍याचे अहवाल प्राप्‍त झाले असून साधारणतः 30 ते 35 हजार किलोमीटरपर्यंतच टायरचे आयुष्‍य असते असे देखील स्‍पष्‍ट केले व तक्रार फेटाळण्‍याची विनंती केली. 
6)    तर दुसरीकडे विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी त्‍यांच्‍या नि.21 वरील म्‍हणण्‍यात तक्रारदाराचे तक्रारीवर आक्षेप घेऊन तक्रारदाराने वॉरंटीच्‍या नियमानुसार आवश्‍यक असलेल्‍या मोफत व पेड सर्व्‍हीसेस करुन घेतल्‍या नाहीत, त्‍यामुळे वाहनाची देखभाल योग्‍य प्रकारे करण्‍यात आली नाही असा मुद्दा उपस्थित करुन वाहनात कोणताही निर्मीती दोष नाही व त्‍यासंबंधाचा कोणताही पुरावा तक्रारदाराने सादर केला नाही असे म्‍हणणे मांडले. त्‍याचप्रमाणे तक्रारदाराने टाटा मोटर्स फायनांस लि.कडून वाहनासाठी कर्ज घेतले असल्‍यामुळे फायनांसर हा वाहनाचा मालक असून तक्रारदार लाभार्थी आहे. त्‍यामुळे तो ग्राहक होत नाही व या फायनांसरला आवश्‍यक पार्टी म्‍हणून जोडण्‍यात आले नाही तसेच ज्‍या चेतन मोटर्सकडून वाहनाची दुरुस्‍ती करण्‍यात आली त्‍याला देखील आवश्‍यक पार्टी म्‍हणून जोडण्‍यात आले नाही. त्‍यामुळे तक्रार फेटाळण्‍याची विनंती केली.
7)    दरम्‍यान विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी वादग्रस्‍त वाहनाची तपासणी तज्‍ज्ञ व्‍यक्‍तीकडून करुन घेण्‍यासाठी नि.23 वर अर्ज दाखल केला. त्‍या अर्जावर तक्रारदाराने आक्षेप घेऊन अर्ज नामंजूर करण्‍याची विनंती केली. तर विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांनी नाहरकत दिली. मंचाने नि.23 वर आदेश पारीत करुन विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर केला व वादग्रस्‍त वाहनाची तपासणी करणेसाठी कोर्ट कमीशनर म्‍हणून A.R.A.I. PUNE यांची नियुक्‍ती केली. दरम्‍यान तक्रारदाराने त्‍याचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.24 वर दाखल केले. त्‍याचप्रमाणे नि.26 वरील शपथपत्रानुसार त्‍याचे वाहनाची तज्‍ज्ञ व्‍यक्‍तीकडून तपासणी करुन घेण्‍याची आवश्‍यकता नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी नि.29 वर अर्ज दाखल करुन मंचाने कोर्ट कमीशनचा केलेला नि.23 वरील आदेश रिकॉल करावा अशी विनंती केली; परंतु जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला मंचाने पारीत केलेले आदेश Recall किंवा Review करण्‍याचे कोणतेही अधिकार नसल्‍यामुळे नि.29 वरील अर्ज नामंजूर करण्‍यात आला.
8)    तक्रारदाराने दाखल केलेल्‍या पुराव्‍याचे शपथपत्रावर विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 तर्फे उलटतपासाची प्रश्‍नावली नि.33 वर दाखल करण्‍यात आली. त्‍याची उत्‍तरावली तक्रारदाराने नि.35 वर दिली असून आपला पुरावा संपल्‍याची पुरसीस नि.36 वर दाखल केली. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांनी त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.37 वर दाखल केले. त्‍यावर तक्रारदाराने उलटतपासाची प्रश्‍नावली नि.38 वर दाखल केली. तर विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांनी नि.40 वर उलटतपासाची उत्‍तरावली दाखल केली व आपला पुरावा संपल्‍याचे पुरसीस नि.41 वर दाखल केले. तसेच नि.44 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार तक्रारदारास पाठविलेले पत्र, व्‍हील अलाईनमेंटरचा रिपोर्ट, दि.4/11/2009 च्‍या जॉबकार्डची प्रत व टायर्सचा तपासणी अहवाल प्रकरणात दाखल केला. त्‍यानुसार प्रकरण अंतीम युक्‍तीवादासाठी ठेवण्‍यात आले. दरम्‍यान विरुध्‍द पक्ष क्र.1 चे वकीलांनी नि.46 वर अर्ज दाखल करुन तक्रारदाराचा उलटतपास प्रश्‍नावलीच्‍या रुपाने घेण्‍याची परवानगी मागीतली. मंचाने रु.1000/- च्‍या कॉस्‍टवर अर्ज मंजूर केला व नि.47 वरील प्रश्‍नावली दाखल करुन घेतली. तक्रारदाराने या प्रश्‍नावलीची उत्‍तरावली नि.49 वर दि.23/07/2010 ला दाखल केली. त्‍यानुसार पुनश्‍चः प्रकरण अंतीम युक्‍तीवादासाठी घेण्‍यात आले. त्‍यानुसार तक्रारदार व विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 चे वकीलांनी विस्‍तृत स्‍वरुपात तोंडी युक्‍तीवाद केला तर विरुध्‍द पक्ष क्र.3 चे वकीलांनी परस्‍पर ति-हाईत व्‍यक्‍तीच्‍या हस्‍ते लेखी युक्‍तीवाद निकालाचे दिवशी उशीराने दाखल केले. तो लेखी युक्‍तीवाद मंचाने रु.500/- कॉस्‍ट आकारुन नि.50 वर दाखल करुन घेतला व प्रकरण निकालासाठी घेण्‍यात आले.
      9)    तक्रारदाराची तक्रार, त्‍यांने तक्रारीसोबत जोडलेली कागदपत्रे, विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांचे लेखी म्‍हणणे व त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यात तक्रारदार ग्राहक नसल्‍याबद्दलचे आक्षेप व आवश्‍यक पार्टी न जोडल्‍याबद्दलचे आक्षेप, तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, त्‍यांचा करण्‍यात आलेला उलटतपास, विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांचे पुराव्‍याचे शपथपत्र व त्‍यांचा करण्‍यात आलेला उलटतपास व प्रकरणाच्‍या अखेरच्‍या टप्‍प्‍यात करण्‍यात आलेला विस्‍तृत स्‍वरुपातील तोंडी युक्‍तीवाद बघता खालील मुद्दे निष्‍कर्षासाठी निघतात.
 
अ.क्र.
मुद्दे
निष्‍कर्ष
1
तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांचे ‘ग्राहक आहेत काय ? व सदरची तक्रार चालविण्‍याचे अधिकार ग्राहक मंचाला आहेत काय ?
होय
2
विरुध्‍द पक्ष क्र.1 चा आवश्‍यक पार्टी न जोडल्‍यामुळे तक्रार फेटाळण्‍याचा आक्षेप मंजूर होण्‍यास पात्र आहे काय ?
नाही
3
ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी त्रुटी केली आहे काय ?
नाही
4
तक्रारदाराची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? 
नाही
5    
मंचाने दि.12/3/2010 ला पारीत केलेल्‍या नि.23 वरील आदेशाचे पालन विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी न केल्‍यामुळे ते दंडात्‍मक कार्यवाही होणेस पात्र आहेत काय  ?
होय
                   
                                                        
                    -का र ण मि मां सा-
      10)   मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदाराने विरुध्‍द पक्ष क्र.3 कडून टाटा विंगर हे वाहन खरेदी केले असून विरुध्‍द पक्ष क्र.1 हे वाहनाचे उत्‍पादक आहेत, तर विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 हे अधिकृत विक्रेते आहेत. त्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 चे ग्राहक ठरतात. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यात आक्षेप घेऊन तक्रारदार हे व्‍यावसायिक कारणासाठी वाहनाचा वापर करतात, त्‍यामुळे ते ग्राहक होत नाहीत असा आक्षेप घेतला; परंतु तक्रारदार हा जरी बांधकाम व्‍यावसायीक असला तरी त्‍यांने विकत घेतलेले वाहन हे Goods Vehicle नाही किंवा Passenger Vehicle नाही, तर तक्रारदाराने खरेदी केलेले वाहन हे एक ‘लक्‍झरी कार’ आहे; परंतु त्‍याचा वापर ते त्‍यांच्‍या व्‍यवसायासाठी करतात हे दर्शविणारा कोणताही पुरावा विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी सादर केला नाही. त्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांचे ग्राहक ठरत असून सेवेतील त्रुटीचे प्रकरण चालविण्‍याचे अधिकार ग्राहक मंचाला आहेत. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी उपस्थित केलेला आक्षेप फेटाळण्‍यात येतो.
      11)   मुद्दा क्रमांक 2 - विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी त्‍यांचे नि.21 वरील लेखी म्‍हणण्‍यात तक्रारदाराचे तक्रारीवर आक्षेप घेऊन त्‍यांने चेतन मोटर्सला पार्टी म्‍हणून जोडले नाही. तसेच फायनांसरला पार्टी म्‍हणून जोडले नाही, त्‍यामुळे तक्रार फेटाळावी असा आक्षेप घेतला; परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीमध्‍ये फायनांसरच्‍या विरुध्‍द किंवा चेतन मोटर्स यांचेविरुध्‍द कोणतीही तक्रार केली नसल्‍यामुळे व सदर प्रकरणात फायनांसर किंवा चेतन मोटर्स हे आवश्‍यक पार्टी नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 ने घेतलेला आक्षेप फेटाळण्‍यात येतो.
    12)   मुद्दा क्रमांक 3     -    तक्रारदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीचे अवलोकन केल्‍यास त्‍याने त्‍याचे तक्रारीत कुठेही विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी सेवेत त्रुटी केली असल्‍यामुळे नुकसान भरपाई मिळावी असे वर्णन केल्‍याचे दिसून येत नाही. त्‍यामुळे प्रथमदर्शनीच तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र नाही. तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत परिच्‍छेद क्र.2 मध्‍ये दि.9/9/2009 रोजी गिअर बॉक्‍समध्‍ये बिघाड झाल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍या रत्‍नागिरी येथील शोरुममध्‍ये गाडी घेऊन गेला व गिअर बॉक्‍स बदलून देण्‍यात आला असे नमूद केले असल्‍यामुळे तक्रारदाराचे तक्रारीचे निराकरण वॉरंटी कालावधीमध्‍ये करण्‍यात विरुध्‍द पक्ष क्र.2 ने कोणतीही त्रुटी केली नाही हे स्‍पष्‍ट होते. तसेच दि.5/3/2009 ला एक्‍सीलेटर केबलमध्‍ये निर्माण झालेल्‍या दोषाचे निराकरण देखील विरुध्‍द पक्ष क्र.1 चे अधिकृत सर्व्‍हीस सेंटर अर्थात चेतन मोटर्स, कोल्‍हापूर यांनी करुन दिल्‍याचे तक्रारदाराने परिच्‍छेद क्र.3 मध्‍ये मान्‍य केले आहे. त्‍यामुळे देखील सेवेत त्रुटी झाली नसल्‍याचे दिसून येते. एवढेच नव्‍हेतर तक्रारदाराने त्‍याचे वाहन दुरुस्‍तीसाठी दि.4/11/2009 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍याकडे सोडल्‍यावर सदरचे वाहनामध्‍ये आवश्‍यक दुरुस्‍त्‍या करण्‍यात आल्‍याचे विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांनी दाखल केलेल्‍या नि.44/3 वरील जॉबकार्डवरुन दिसून येते; परंतु सदरचे वाहन अद्याप देखील तक्रारदाराने आपल्‍या ताब्‍यात घेतले नसल्‍यामुळे तक्रारदार हा स्‍वतः स्‍वच्‍छ हेतूने मंचासमोर आला नाही हे सिध्‍द होत असून ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी कोणतीही त्रुटी केली नाही, असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.
      13)   मुद्दा क्रमांक 4 – i)    तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत परिच्‍छेद क्र.5 मध्‍ये आपले वाहन दि.1/7/2009 पासून बंद अवस्‍थेत आहे असे नमूद केले आहे तर याच तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.2 मध्‍ये दि.9/9/2009 रोजी तक्रारदाराने त्‍याचे वाहन गिअर बॉक्‍समध्‍ये बिघाड झाल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या रत्‍नागिरी वर्कशॉपमध्‍ये नेल्‍याचे नमूद केले आहे. असाच उल्‍लेख तक्रारदाराने त्‍याच्‍या नि.24 वरील पुराव्‍याच्‍या शपथपत्रात परिच्‍छेद क्र.2 मध्‍ये व नि.38 वरील विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांना विचारलेल्‍या उलटतपासाच्‍या प्रश्‍नावली क्र.4 मध्‍ये केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचे वाहन दि.1/7/2009 पासून बंद अवस्‍थेत असल्‍याचे तक्रारदाराने मान्‍य केल्‍यावर त्‍यांने दि.9/9/2009 रोजी त्‍याचे वाहन रत्‍नागिरीला कसे नेले ? हा महत्‍वाचा प्रश्‍न असून याचा कोणताही खुलासा तक्रारदाराने केला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र नाही.
      ii)         तक्रारदाराने वाहन खरेदी करतांना त्‍याला ओनर्स मॅन्‍युअल मिळाल्‍याचे तक्रारदाराने त्‍याच्‍या उलटतपासाच्‍या उत्‍तरावलीत प्रश्‍न क्र.19 ते 23 ला उत्‍तर देतांना नि.35 वर मान्‍य केले आहे व आपण मॅन्‍युअल प्रकरणात दाखल केले आहे व वॉरंटी, गॅरेंटीचा उल्‍लेख सदर मॅन्‍युअलमध्‍ये आहे असे मान्‍य केले; परंतु तक्रारदाराने तक्रारीसोबत प्रकरण निकालाला घेईस्‍तोवरपर्यंत ओनर्स मॅन्‍युअलची प्रत दाखल केली नाही. त्‍यामुळे वाहनाच्‍या कोणत्‍या पार्टसची वॉरंटी‍ किती होती ? व वॉरंटीमध्‍ये कोणत्‍या पार्टसचा समावेश होता ? हे तक्रारदार सिध्‍द करु शकला नाही. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने त्‍यांच्‍या नि.21 वरील लेखी म्‍हणण्‍यात तक्रारदाराने सर्व्‍हीस मॅन्‍युअलनुसार आवश्‍यक मोफत व पेड सर्व्‍हीसेस केल्‍या नाहीत असा आक्षेप घेतला आहे. मात्र तक्रारदाराने या आक्षेपाचे निराकरण करण्‍यासाठी सर्व्‍हीस बुकातील सर्व्‍हीस कार्डच्‍या प्रती प्रकरणात दाखल केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदाराने त्‍याच्‍या वाहनाच्‍या आवश्‍यक त्‍या सर्व्‍हीसिंग केल्‍या नाहीत हे सिध्‍द होत असून त्‍यामुळे निर्माण झालेल्‍या दोषांसाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांना जबाबदार धरता येत नाही. एवढेच नव्‍हेतर तक्रारदाराने त्‍याचे वाहन दि.4/11/2009 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.2 चे वर्कशॉपमध्‍ये रिपेअरिंगसाठी सोडल्‍याचे तक्रारदाराने स्‍वतः दाखल केलेल्‍या नि.3/10 वरील जॉबकार्डवरुन दिसून येते. या जॉबकार्डमध्‍ये दि.5/11/2009 ला वाहनाची डिलिव्‍हरी मिळणार असल्‍याचे नमूद केल्‍याचे दिसून येते. त्‍यानुसार विरुध्‍द पक्ष क्र.2 ने वाहनामध्‍ये दुरुस्‍ती करुन वाहन रेडी केल्‍याचे नि.43/3 वरील जॉबकार्डवरुन दिसून येते; परंतु तक्रारदाराने स्‍वतः वाहनाची डिलिव्‍हरी न घेतल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी दि.18/11/2009 रोजी नि.44/1 वर तक्रारदारास वाहन घेऊन जाण्‍यासंबंधाने पत्र दिल्‍याचे दिसून येते. हे पत्र पाठ‍वल्‍याची पोस्‍टल रिसिट विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी नि.44/5 वर दाखल केली आहे. त्‍यामुळे देखील तक्रारदाराची स्‍वतःची कृती योग्‍य नसल्‍याचे स्‍पष्‍ट होत असून तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र नाही. 
      iii)         तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत नमूद केलेल्‍या दोषांचे निवारण विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 यांचेकडून झाल्‍याचे सिध्‍द होत असून तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत कुठेही वाहनामध्‍ये निर्मिती दोष आहेत असे स्‍पष्‍ट केलेले नाही; परंतु तक्रारीत विनंती करतांना आपणांस वाहनाची किंमत रु.7,90,229/- मिळावेत अशी मागणी केली आहे. वाहनामध्‍ये असलेले दोष तज्‍ज्ञ ऑटोमोबाईल इंजिनिअरकडून परिक्षण अहवालाद्वारे सिध्‍द करुन घेतल्‍याशिवाय वाहनात दोष आहेत किंवा वाहन सदोष आहे असे म्‍हणता येत नाही. त्‍या दृष्‍टीकोनातून तक्रारदाराने त्‍याचे वाहनाची तपासणी करणेसाठी तज्‍ज्ञ व्‍यक्‍तीची नेमणूक करण्‍याचा अजिबात प्रयत्‍न केला नाही. याउलट नि.26 वर शपथपत्र दाखल करुन त्‍याचे वाहनाची तपासणी करुन घ्‍यायची गरज नाही असे स्‍पष्‍ट केले. त्‍यामुळे वाहनामध्‍ये निर्मितीदोष आहेत किंवा वाहन सदोष आहे किंवा त्‍याचे पार्टस खराब आहेत असे अजिबात मान्‍य करता येत नाही. तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत टायर्स विरुध्‍दची तक्रार उभारली असून विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी दाखल केलेल्‍या नि.44/4 वरील टायर्सविषयीच्‍या अहवालातून 30,000 कि.मी.पर्यंत वाहनाचे टायर्सचे आयुष्‍य असते असे स्‍पष्‍ट केले आहे व तक्रारदाराने स्‍वतः दाखल केलेल्‍या नि.3/10 वरील दि.4/11/2009 चे जॉबकार्डचे अवलोकन केल्‍यास त्‍याचे वाहन 30911 कि.मी. चालल्‍याचे दिसून येते. तसेच सदर अहवालात टायर्समध्‍ये कोणताही निर्मिती दोष नसल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने टायर्सची तपासणी करण्‍यासाठी एक्‍सपर्टची नियुक्‍ती न केल्‍याने विरुध्‍द पक्षाने दाखल केलेला नि.44/4 वरील टायर्सविषयीचा अहवाल मान्‍य करावा लागतो. त्‍यामुळे देखील तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र नाही, असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.
      iv)        मा.राष्‍ट्रीय आयोगाचे अध्‍यक्ष न्‍यायमुर्ती श्री. अशोक भान यांनी MRF LIMITED V/S BALCHANDRA JAMANADAS PATEL (2010 (2) CPR 331 (NC) या प्रकरणात निर्वाळा देतांना वाहनातील टायर्सच्‍या बाबतीत खालील मुद्दा स्‍पष्‍ट केला आहे. 
Manufacturing Defect – Onus would be on consumer buyer to prove that there was manufacturing defect – Petitioner’s Engineer submitted report that there was no manufacturing defect in tyres – No reasons to differ said report” त्‍याचप्रमाणे मा.राष्‍ट्रीय आयोगाचे अध्‍यक्ष न्‍यायमुर्ती श्री. अशोक भान यांनी SCOOTER INDIA LIMITED V/S MANJULABEN KIRITBHAI (2010 (2) CPR 418 (NC) या प्रकरणात निर्वाळा देतांना वाहनाची तपासणी तज्‍ज्ञ व्‍यक्‍तीकडून करणेविषयीचा मुद्दा स्‍पष्‍ट केला असून त्‍याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. 
Manufacturing DefectOnus to prove allegations was on Complainant who alleged defects in vehicle – No report of expert was proved that vehicle had manufacturing defects - Until and unless, the manufacturing defect is pointed out and proved, the manufacturer cannot be asked to replace the vehicle.”
      14)   मुद्दा क्रमांक 5 – सदर तक्रार प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या टाटा मोटर्स लि.ने तक्रारदाराचे वाहनाची Automotive Research Association of India, Pune (In short ARAI)  या तज्‍ज्ञ संस्‍थेमार्फत तपासणी करणेसाठी नि.23 वर अर्ज दाखल केला होता. तो अर्ज मंचाने दि.12/3/2010 च्‍या आदेशान्‍वये मंजूर करुन उपरोक्‍त संस्‍थेची तज्‍ज्ञ कोर्ट कमीशनर म्‍हणून नेमणूक केली व तपासणीचे शुल्‍क विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी जमा करणेचे आदेश दिले. तसेच कोर्ट कमीशरनरने 9/4/2010 पर्यंत अहवाल सादर करण्‍याचे आदेशित करण्‍यात आले होते. त्‍यासाठी विरुध्‍द पक्ष क्र.1 ने विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या ताब्‍यातील वाहन 7 दिवसांच्‍या आत ARAI कडे तपासणीसाठी सुपूर्द करावयाचे होते; परंतु विरुध्‍द पक्ष क्र.1 ने मंचाने आदेशित केलेल्‍या मुदतीत वाहन ARAI कडे सादर केले नाही. व दि.19/3/2010 ला मंचासमोर हजर होऊन प्रकरण बोर्डावर घेण्‍याची विनंती केली व वाहन ARAIपूणे यांचेकडे सादर करणेसाठीची मुदत वाढवून देण्‍याची विनंती केली. तो अर्ज न्‍यायाच्‍या दृष्‍टीकोनातून मंचाने मंजूर केला व दि.23/3/2010 पर्यंतची मुदतवाढ दिली. त्‍यामुळे प्रकरण तज्‍ज्ञांच्‍या अहवालासाठी ठेवण्‍यात आले; परंतु त्‍यानंतर देखील विरुध्‍द पक्ष क्र.1 ने वाहन ARAIयांचेकडे सादर न करता नि.29 वर दि.9/4/2010 ला अर्ज दाखल करुन कोर्ट कमीशनरच्‍या नियुक्‍तीचे आदेश Re-call करावेत अशी विनंती केली. या अर्जात परिच्‍छेद क्र.1 व 2 मध्‍ये वाहनाच्‍या तपासणीसाठी येणारा खर्च रु.50,000/- असल्‍यामुळे व हा खर्च आपण भरु शकत नसल्‍यामुळे आदेश Re-call करावा अशी विनंती केली. त्‍या अर्जावर तक्रारदाराचे वकीलांनी आक्षेप घेतला. त्‍यामुळे प्रकरण नि.29 वरील सुनावणीसाठी ठेवण्‍यात आले; परंतु विरुध्‍द पक्ष क्र.1  ने दि.20/4/2010 ला मुदतवाढीचा अर्ज दाखल केला. तो अर्ज मंचाने मंजूर केला व सुनावणीसाठी 27/4/2010 ला प्रकरण ठेवण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष क्र.1 चे युक्‍तीवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने विरुध्‍द पक्ष क्र.1 चा नि.29 वरील अर्ज नामंजूर केला व जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला, मंचाने पारीत केलेले आदेश Re-call किंवा Review करण्‍याचे कोणतेही अधिकार ग्राहक संरक्षण कायदयात नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले;  परंतु त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र.1 ने वाहनाची तपासणी करणेसाठी कोणतेही शुल्‍क भरले नाही किंवा वादातील वाहन तपासणीसाठी ARAI Pune यांचेकडे जमा केले नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 ने मंचाने पारीत केलेल्‍या आदेशाचे पालन केले नाही व याउलट मंचाने पारीत केलेला नि.23 वरील आदेशाचे उल्‍लंघन केल्‍याचे स्‍पष्‍ट होत असून सदर प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्र.1 ने मंचाचा बहुमूल्‍य वेळ वाया घालवल्‍याचे निष्‍पन्‍न होते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 हे दंडात्‍मक कारवाईस पात्र आहेत असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍या दृष्‍टीकोनातून आम्‍ही खालील अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
                        अं ति म आ दे श
1)    तक्रारदाराची तक्रार फेटाळण्‍यात येते.
2)    विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी मंचाने नि.23 वर पारीत केलेल्‍या दि.12/03/2010 चे आदेशाचे पालन न केल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 14(1)(d) अंतर्गत  दंडात्‍मक नुकसान भरपाई व कलम 14 (1) (i)  अंतर्गत कॉस्‍ट रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) मंचात भरण्‍याचे आदेश पारीत करणेत येतात. 
3)    त्‍याचप्रमाणे नि.50 वर पारीत केलेल्‍या आदेशानुसार रु.500/-(रुपये पाचशे मात्र) कॉस्‍टची रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्र.1 ने मंचात भरण्‍याचे आदेश पारीत करणेत येतात.
4)    आदेश क्र.2 व 3 मध्‍ये पारीत केलेल्‍या आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष क्र.1 ने आदेश प्राप्‍तीच्‍या 30 दिवसांच्‍या आत करावी.
      5)    उपरोक्‍त दंडात्‍मक नुकसान भरपाई व कॉस्‍टची रक्‍कम जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे Legal Aid Fund मध्‍ये जमा करणेत यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः  29/07/2010
 
 
 
     सही/-                           सही/-                       सही/-
(उल्‍का गावकर)                 (महेन्‍द्र म.गोस्‍वामी)                   ( वफा खान)
सदस्‍या,                        अध्‍यक्ष,                      सदस्‍या,
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्‍टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने रवाना दि.
Ars/-
 
 
[HON'ABLE MR. Mr.Mahendra Goswami.]
PRESIDENT
 
[ Smt. Ulka Gaokar]
Member
 
[ smt vafa khan]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.