निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 21/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 09/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 14/11/2011 कालावधी 08 महिने. 05 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. अप्पाराव पि.दिगांबर बरडे. अर्जदार वय 60 वर्ष.धंदा.शेती. अड.डी.यू.दरडे. रा.पेठशिवणी.ता.पालम, जि. परभणी. विरुध्द 1 विभागीय व्यवस्थापक . गैरअर्जदार रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. अड गोपाल दोडीया श्री साई इंटरप्रायजेस, 210 साई इन्फोटेक आर बी. मेहता मार्ग, पटेल चौक, घाटकोपर (पु.) मंबई 400077 2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. भास्करायन,एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग. प्लॉट नं.7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर. सिडको.औरंगाबाद. 3 तालुका क़षी अधिकारी साहेब, स्वतः तालुका क़षी कार्यालय पालम. ता.पालम, जिल्हा परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारांविरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार मौजे पेठशिवणी ता.पालम येथील रहिवासी असून त्याचा मुलगा मयत दिगांबर (राजू) बरडे हा खातेदार शेतकरी होता त्याच्या मालकीची स.नं.120/1/3 व स.न.154/ब पेठशिवणी येथे शेतजमिन आहे. दिनांक 18/06/2009 रोजी दिगांबर ऊर्फ राजू गावातील महाजन यांचे विहीरीतून पाणी काढत असतांना पाय घसरून पडला व बुडून मरण पावला. पालम पोलीस स्टेशनला मयताच्या चुलत भावाने अपघाताची खबर दिल्यावर पोलिसांनी अ.म़त्यु नोंदवून घटनास्थळाचा व मरणोत्तर पंचनामा केला व सरकारी दवाखान्यात प्रेताचे पोष्टमार्टेम केले. त्यानंतर अर्जदारने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे मुलाच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह क्लेम दाखल केला. त्यांनी मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवले. त्यानंतर अर्जदारला गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तारीख 03/02/2010 व 24/02/2010 च्या पञाव्दारे आणखी काही कागदपञांची पुर्तता करण्याबाबत कळविले होते. त्या कागदपञाची पुर्तता गैरअर्जदार क्र.3 कडे पुर्वीच केलेली होती. त्यानंतरही पुन्हा गैरअर्जदार क्र.1 ने तारीख 23/06/10 चे अर्जदारास पञ पाठवून फेरफार उतारा, वयाचा पुरावा, पोलीस पेपर्स, दिगांबर व राजू ही एकच व्यक्ती असल्याचे शपथपञ या कागदपञांची पुर्तता 15 दिवसांत करण्याबाबत कळविले होते. अर्जदारचे म्हणणे असे की, गैरअर्जदार क्र.1 ने शेवटच्या पञातून मागणी केलेंल्या सर्वर कागदपञांची पुर्तता त्यापुर्वीच तारीख 21/11/2009 रोजी केली असतांनाही विनाकारण क्लेम मंजुरीविना रखडत ठेवून सेवाञुटी करून अर्जदाराला नुकसान भरपाई मिळणेपासून वंचीत ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 % व्याजासह मिळावी अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 30 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने तारीख 09/05/2011 रोजी लेखी म्हणणे (नि.19) सादर केले. गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोष्टामार्फत पाठविलेला लेखी जबाब दिनांक 09/05/2011 रोजी प्रकरणात नि.13 ला समाविष्ट करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपला लेखी जबाब प्रकरणात दिनांक 20/06/2011 रोजी सादर केला ( नि.22) वर दाखल केला नि.19 वरील लेखी जबाबात गैरअर्जदार क्रमांक 1 ने असे म्हंटले आहे की, कबाल इन्शुरन्स ब्रोकरन्सकडून अर्जदारच्या मयत मुलाच्या शेतकरी विमा क्लेमची कोणतीही कागदपञे विमा कंपनीला मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून सेवाञुटी होण्याचा व नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. लेखी जबाबात पुढे असेही म्हटले आहे की, क्लेमसंबंधी त्याने कबालकडे चौकशी केली त्यावेळी असे समजले की, अर्जदाराने क्लेमसोबत पाठविलेल्या कागदपञात फेरफार उतारा, म़त्यु उतारा, वयाचा पुरावा, एफ.आय.आर., मयत दिगांबर ऊर्फ राजू ही एकच व्यक्ती असल्याचे शपथपञ ही कागदपञे नव्हती. त्याची पुर्तता करण्यासंबंधी डी.ए.एस.ओ.मार्फत कळविले होते. त्याची अदयापी पुर्तता झालेली नाही. अर्जदाराने तक्रार अर्जात अपु-या कागदपञाची पुर्तता तारीख 21/11/2009 व 13/12/10 रोजी गैरअर्जदार क्र.3 मार्फत केलेली होती हे केलेंले कथन विमा कंपनीने साफ नाकारले आहेत व वरील सर्व बाबी लक्षात घेवून तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार क्र.1 चे शपथपञ (नि.20) दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपले लेखी जबाबात ( नि.13) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा क्लेममधील कागदपञांची छाणणी करून व संबंधिताकडून आवश्यक ती पुर्तता करून घेवून मंजुरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी शासनाने त्यांना मध्यस्थी सल्लागार म्हणुन नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाही किंवा त्यांच्याकडून विमा हप्ताही स्वीकारला जात नाही. मयन दिगांबर/राजू अप्पाराव बरडे याच्या डेथ क्लेमची कागदपञे त्यांना तारीख 26/08/2009 रोजी मिळाली परंतु त्यामध्ये काही आवश्यक कागदपञे नव्हती. त्या अपु-या कागदपञात म़त्युचा दाखला, वयाचा पुरावा, एफ.आय.आर., दिगंबर ऊर्फ राजू ही एकच व्यक्ती असल्याचे शपथपञ या अपु-या कागदपञांची पुर्तता करण्यासाठी अर्जदाराला डी.एस.ए.ओ. परभणी यांना दिनांक 03/02/2010 रोजी कळवले होते. त्यानंतर तारीख 24/02/2010 रोजी स्मरणपञ पाठविले. त्यानंतर कागदपत्रे अपुरे असल्याचा शेरा मारून तो क्लेम विमा कंपनीकडे तारीख 21/06/2010 रोजी पाठविला. त्यानंतर विमा कंपनीने देखील 23/06/2010 चे पञ पाठविले होते. परंतु अर्जदाराकडून कागदपञांची पुर्तता न झाल्यामुळे दिनांक 24/11/2010 च्या पञाने विमा कंपनीने क्लेम नामंजूर केला. सबब त्यांना प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत विमा कंपनीची तारीख 23/06/2010 चे आणि क्लेम नामंजुरीचे तारीख 24/11/2010 चे पञ तसेच कागदपत्रांच्या पुर्तते संबंधी त्यांनी पाठवलेले 2 स्मरणपत्रे वगैरे 4 कागदपञे दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.3 ने आपल्या लेखी जबाबात (नि.22) अर्जदाराच्या तक्रार अर्जाबाबत असा खुलासा केला आहे की, अर्जदाराचा विमा क्लेम मिळाल्यानंतर काही अपु-या कागदपञांची पुर्तता करण्यासाठी पञ पाठविल्यावर ञुटीची पुर्तता केली. त्यानंतर 14/12/2009 रोजी प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी यांचेकडे पाठवला विमा प्रस्तावासंबंधी सहाय्य करण्याचे काम व शेतकरी आणि विमा कंपनी यामध्ये दुवा म्हणुन त्यांच्या कार्यालयाचे काम आहे. सबब त्यांचे विरूध्दची तक्रार रद्द करण्यात याची अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत पुराव्याची 4 कागदपञे दाखल केलेली आहे. पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे व संबंधीत वकिलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराच्या मयत मुलाच्या अपघाती निधनाची विमा नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- चा क्लेम बेकायदेशिररित्या नामंजूर करुन सेवात्रुटी केली आहे काय ? नाही 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचा मुलगा मयत दिगांबर ऊर्फ राजू आप्पाराव बरडे रा.पेठशिवणी हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात नि.4 लगत सादर केलेल्या महसूल रेकॉर्डच्या कागदपत्रावरुन आणि नि.4/1 वरील विमा क्लेमफॉर्म मधील तलाठयाचे प्रमाणपत्रावरुन शाबीत झाले आहे. दिनांक 18.06.2009 रोजी मयत दिगांबर बरडे विहीरीतील पाणी काढीत असतांना पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचा म़त्यु झाला होता ही वस्तुस्थिती देखील पुराव्यात दाखल केलेल्या नि. 4/14 वरील पालम जिल्हा परभणी पोलिस स्टेशन अ. मृत्यु रजि.नं. 13/09 वरील एफ.आय.आर, नि.4/09 वरील मरणोत्तर पंचनामा, नि.4/11 वरील पोस्टमार्टेम रिपोर्ट, नि.4/10 वरील घटनास्थळ पंचनामा या कागदपत्रातून शाबीत झाले आहे. मयत दिगांबर ऊर्फ राजू बरडे हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- मिळणेसाठी अर्जदाराने वर नमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 3 तालुका कृषी अधिकारी पालम यांचेकडे नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता व ती कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 2 ला मिळालेली होती परंतु त्यामध्ये काही कागदपत्रे अपुरी होती असे गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबात म्हंटलेले आहे. गैरअर्जदार क्र.3 कडून गैरअर्जदार क्र.2 कडे, विमाक्लेम व कागदपत्रे गेल्यावर आणखी काही कागदपत्रांची आवश्यकता होती म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 यानी वेळोवेळी पाठविलेल्या पत्रानुसार व स्मरणपत्रातून मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता अर्जदाराने केलेली होती मात्र अर्जदाराकडून कागदपत्रे न मिळाल्याने आवश्यक तो शेरा मारुन विमा कंपनीकडे तारीख 21/06/2010 रोजी प्रस्ताव पाठविलेला होता. विमा कंपनीने देखील त्यानंतर अर्जदारास तारीख 23/06/2010 रोजी पञ पाठवुन काही कागदपत्रांची मागणी केली होती. परंतु मागणी केलेल्या अपु-या कागदपञांची पुर्तता झाली नसल्याने विमा कंपनीने तारीख 24/11/2010 च्या पत्राव्दारे क्लेम नामंजूर केल्याचे कळवले होते असे गैरअर्जदार क्र.1 व 2 याने लेखी जबाबामध्ये म्हंटलेले आहे. पुराव्यात संबंधीत पञाच्या छायाप्रतीही अर्जदारानेच नि.4 लगत दाखल केलेले आहे. क्लेम नामंजुर करण्याचा विमा कंपनीने घेतलेला निर्णय चुकीचा आहे कारण गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी कागदपत्रे पुर्ततेसाठी शेवटची तारीख 08/02/2010 रोजी (नि.4/13) व त्यानंतर विमा कंपनीने तारीख 23/06/2010 रोजी (नि.4/16) स्मरणपत्र पाठवल्यावर तालुका कृषी अधीकारी पालम यांनी जिल्हा कृषी अधिका-याकडे त्या अपु-या कागदपत्रांची पुर्तता करुन पुन्हा तारीख 13/12/2010 रोजी पाठवलेली होती.त्या कव्हरींग लेटरची प्रत (नि.4/18) प्रकरणात अर्जदाराने दाखल केलेली आहे.अपु-या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन गैरअर्जदार क्रमांक 3 ने जिल्हा कृषी अधिका-याकडे पाठवलेली होती हे पुराव्यातून दिसून येत असले तरी जिल्हा कृषी अधिका-याने ती कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर केली होती या संबंधीचा कोणताही ठोस पुरावा अर्जदार अथवा गैरअर्जदार क्रमांक 3 याने प्रकरणात दाखल केलेला नसल्यामुळे ती कागदपत्रे विमा कंपनीकडे गेली होती हे शाबीत झालेले नाही.अर्जदाराने स्वतः परस्पर विमा कंपनीकडे तारीख 23/06/2010 नंतर मागणी केलेली कागदपत्रे पाठवली होती असाही ठोस पुरावा अर्जदाराने प्रकरणात दाखल केलेला नाही.गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांना त्यामुळे यामध्ये दोषी धरता येणार नाही किंवा त्यांच्याकडून सेवात्रुटी झाली असे म्हणता येणार नाही.तरी परंतु शासनाने राज्यातील सर्व खातेदार शेतक-यांसाठी वैयक्तीक अपघात विमा पॉलिसी सर्व शेतक-यांचे विम्याचे हप्ते शासनाच्या तिजोरीतुन भरून शेतक-यांच्या अपघाती मृत्युनंतर किंवा अपघातात कायमचे अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबाला आर्थीक हातभार मिळावा या उद्देशाने कल्याणकारी शेतकरी विमा योजना कार्यान्वीत केलेली आहे. अर्जदारचा मुलगा मयत दिगांबर बरडे हा सदर विमा पॉलिसीचा लाभार्थी असल्याने त्याच्या मृत्यु पश्चात अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास निश्चितपणे पाञ आहे. त्यासाठी कोणतीही अट व नियम काटेकोरपणे पाळण्याचे बंधनकारक नाही. त्याकारणास्तव नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला टाळताही येणार नाही अथवा नाकारता येणार नाही. अर्जदाराने कागदपञांची पुर्तता केल्यानंतर विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास काहीही हरकत नाही.अशाच प्रकारच्या केस मध्ये अपील क्रमांक 1047/08 मध्ये राष्ट्रीय आयोगाने तारीख 05/02/2009 रोजी दिलेल्या निर्णयात व्यक्त केलेल्या मताचा आधार घेवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराच्या मयत मुलाच्या डेथ क्लेम ची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त ) मंजुर करण्यासाठी कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी दिनांक 24.02.10 च्या शेवटच्या स्मरण पञातील मागणी केलेल्या अपु-या कागदपञांची पुर्तता अर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांत करावी. व कागदपञे मिळाल्यानंतर विमा कंपनीने पुढील 30 दिवसाचे आत अर्जदाराचा क्लेम सेटल करावा. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |