Maharashtra

Beed

CC/10/5

Bhausaheb Trimbakrao Kakade. - Complainant(s)

Versus

Divisional Manager,National Insurance Company. - Opp.Party(s)

V.Y.Ghadge.

03 Dec 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/10/5
 
1. Bhausaheb Trimbakrao Kakade.
R/o Nipani Jawalka,Tq.Georai,Dist.Beed
Beed
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager,National Insurance Company.
Divisional Office,Hazari Chambers,Station road,Aurangabad.
Aurangabad.
Maharastra
2. Branch Manager,Bank of Maharashtra,
Bank of Maharashtra,Branch Gadhi,Tq.Georai,Dist.Beed.
Beed.
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  Sou. M. S. Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                           तक्रारदारातर्फे    – वकील – व्‍ही.वाय.घाडगे,
                           सामनेवाले 1 तर्फे – वकिल – आर.एस.थिगळे.
                           सामनेवाले 2 तर्फे – वकिल – आर.एस.कुकडगांवकर 
        
                              ।। निकालपत्र ।।
                ( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्‍वरुपे – सदस्‍या )
तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदाराचे निपाणी जवळका ता.गेवराई जि.बीड येथे ‘‘ धनंजय किराणा स्‍टोअर्स ’’ या नांवाने दुकान आहे. तक्रारदारांनी सामनंवाले नं. 2 बॅंकेडून पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत ता.4.4.2007 रोजी रक्‍कम रु.60,000/- किराणा दुकाना करीता कर्ज घेतले होते. तक्रारदारांने त्‍यांचे दुकानातील सर्व सामान सदर कर्जरक्‍कमेच्‍या सुरक्षेसाठी गहाण ठेवले होते. सामनेवाले दोन यांनी त्‍याच दिवशी सदर किराणा स्‍टोअर्स व त्‍यातील सामानाची रक्‍कम रु.1,00,000/- एवढया रक्‍कमेची विमा पॉलीसी सामनेवाले नं.1 यांचेकडे घेतली होती. सदर पॉलीसी क्र.270605/48/07/ 9800000048 असुन प्रिमियमची रक्‍कम सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या कर्जामधुन कपात करुन सामनेवाले न.1 यांचेकडे पाठविली होती. सामनेवाले नं.1 यांना सदरचा प्रिमियम ता. 9.4.2007 रोजी प्राप्‍त झाला.
दुर्दैवाने ता.9.4.2007 रोजी सकाळी 4.30 वाजता सदर दूकानास आग लागून दुकानातील सर्व सामान व फर्निचर जळून रक्‍कम रु.1,25,000/- एवढया रक्‍कमेचे नुकसान झाले. व त्‍याबाबतची तक्रार पोलीस स्‍टेशन, गेवराई यांचेकडे ता.9.4.2007 रोजी 4.30 वाजता दिलेली आहे, तसेच घटनास्‍थळ पंचनामा झाला आहे. सामनेवाले नं.1 यांनी वर नमुद केलेली विमा पॉलीसीचा प्रिमियमची रक्‍कम ता.9.4.2007 रोजी सकाळी 11.55 वाजता मिळाली आहे. तक्रारदारांचे दुकानास ता;9.4.2007 रोजी सकाळी 4.30 वाजता आग लागली आहे. सामनेवाले नं.1 यांनी सदरच्‍या प्रिमियमची रक्‍कम घटनेनंतर मिळाली असाल्‍यामुळे सामनेवाले नं.1 सदर नुकसानभरपाईस जबाबदार नाहीत. सामनेवाले नं.1 यांचेकडील विमा पॉलीसीच्‍या रक्‍कमेचा चेक अथवा डी.डी.चा रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतरच मिळूशकते या कारणास्‍तव सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांचा विमाप्रस्‍ताव नो-क्‍लेम या कारणावरुन तक्रारदारांची फाईल बंद करण्‍यात आली. सामनेवाले नं.1 यांनी सदर विमा पॉलीसीची कव्‍हारनोट नं.013979 ता.5.4.2007 रोजी दिली होती. अशा परिस्थितीत तक्रारदरारांची विमा पॉलीसी ता.9.4.2007 रोजी वैध असुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्‍कम दिली नाही. सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे धनाकर्ष डीडी उशिरा पाठविला, तक्रारदार सदर विलंबास जबाबदार नाही. तक्रारदारांची विमा पॉलीसी कव्‍हारनोट ता.5.4.2007 रोजी निर्गमित केलेली असल्‍यामुळे विमा पॉलीसी ता.5.4.2007 पासुनच वैध आहे. तक्रारदारांची विमा पॉलीसी सामनेवाले नं.1 यांनी डीडी प्राप्‍त झाल्‍यानंतर वैध होत. अशा परिस्थितीत तक्रारदारांचे झालेले नुकसान भरपाईची रक्‍कम देण्‍यास सामनेवाले नं.1 व 2 यांचेवर जबाबदारी आहे.
सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 हे हजर झाले असुन त्‍यांनी त्‍यांचा खुलासा ता.5.5.2010 रोजी न्‍यायमंचात दाखल केला आहे. सामनेवाले नं.1 यांना तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला मजकुर मान्‍य नाही. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला मजकुर पुराव्‍यानिशी सिध्‍द करणे आवश्‍यक आहे. तक्रारदारांच्‍या प्रिमियमची रक्‍कम डीडी द्वारे ता.9.4.2007 रोजी सकाळी 11.55 नंतर प्राप्‍त झाली. परंतु दुकान जळाल्‍याची घटना ता.9.4.2007 रोजी पहाटे 4.30 घडली आहे. सामनेवाले नं.1 यांना प्रिमियमची रक्‍कम घटनेनंतर मिळाली आहे. त्‍यामुळे सामनेवाले नं.1 नुकसान भरपाईची रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाहीत. विमेदाराची विमा पॉलीसी ही प्रिमियमची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतरच पॉलीसी वैध होते. त्‍यामुळे तक्रारदरारांची फाईल नो-क्‍लेम या सदराखाली बंद करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी, अशी सामनेवाले नं.1 यांनी विनंती केली आहे.
सदर प्रकरणात सामनेवाले नं.2 हजर झाले असुन त्‍यांनी त्‍यांचा खुलासा ता.10.05.2010 रोजी न्‍यायमंचात दाखल केला आहे. सामनेवाले नं.2 यांना तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कांही मजकुर मान्‍य असुन उर्वरित मजकुर मान्‍य नाही. तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 यांचेकडून पंतप्रधान योजनेअंतर्गत रक्‍कम रु.60,000/- चे कर्ज घेतल्‍याची बाब सामनेवाले नं.2 यांना मान्‍य आहे. सामनेवाले नं.2 यांनी ता.28.3.2007 रोजी तक्रारदारांचे किराणा दुकानाचा त्‍यातील सामान व फर्निचरसहीत कर्जाचे रक्‍कमेच्‍या सुरक्षेसाठी विमा पॉलीसी सामनेवाले नं.1 यांचेकडून घेतली होती. सदर विमा पॉलीसीचा प्रिमियमची रक्‍कम रु.4,460/- सामनेवाले नं.1 यांचे एजंट श्री मिलींद कुलकर्णी तर्फे डी.डी पाठविला होता. त्‍यानंतर सामनेवाले नं.1 यांनी सदर विमा पॉलीसीची कव्‍हर नोट ता.5.4.2007 रोजी तक्रारदारांना दिली होती. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांचे प्रिमियमची रक्‍कम सोबतच सामनेवाले नं.1 यांचेकडे इतर दोन कर्जदारांचे प्रिमियमची रक्‍कम सामनेवाले नं.1 यांचे कायदेशीर एजंटमार्फत ता.28.3.2007 रोजी पाठविलेली होती. तक्रारदारांचे विमा पॉलीसीतील कव्‍हरनोट प्रमाणे विमा कालावधी ता. 5.4.2007 ते 4.4.2008 नमुद करण्‍यात आला आहे.
सामनेवाले नं.2 यांनी सदर घटनेची माहिती त्‍याच दिवशी सामनेवाले नं.1 यांचेकडे देवून सदर घटनेची तपासणी करण्‍याकरीता सर्व्‍हेअर पाठविण्‍याबाबत सामनेवाले नं.1 यांना सांगीतले होते. अशा परिस्थितीत सामनेवाले नं.2 विरुध्‍दची तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी.
न्‍यायम निर्णयासाठी मुद्दे.                                  उत्‍तरे.
1.     सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदारांना विमा पत्रा             सामनेवाले नं.1                 
      प्रमाणे नुकसानभरपाईची रक्‍कम अदा न करुन                करीता होय.           
      तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूरी केल्‍याची बाब             सामनेवाले नं.2           
      तक्रारदारांनी सिध्‍द केली आहे काय ?                       करीता नाही.
2.    तक्ररदार दाद मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                     होय.
3.    अंतिम आदेश काय ?                                  निकालाप्रमाणे.
      तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, पुराव्‍याचे शपथपत्र, सामनेवाले नं.1 यांचा खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं.2 यांचा लेखी खुलासा, शपथपत्र, कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील व्‍ही.वाय. घाडगे, सामनेवाले नं.1 यांचे विद्वान वकील आर.एस.थिगळे सामनेवाले नं.2 यांचे विद्वान वकील आर.एस.कुक्‍कडगांवकर यांचा युक्‍तीवाद ऐकला.
      तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 यांचेकडून रक्‍कम रु.60,000/- पंतप्रधान योजनेअंतर्गत कर्ज घेतले होते. सामनेवाले नं.2 बँकेने सामनेवाले नं.1 विमा कंपनीकडे ता.28.3.2007 ला सदर विमा पॉलीसी क्र. 270605/48/07/ 9800000048 घेतली. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांचा दुकानातील सामानासह विमा सामनेवाले नं.1 यांचेकडून घेतला. सदर विमा पॉलीसीचा प्रिमियमची रक्‍कम रु.4,460/- सामनेवाले नं.1 यांचेकडे सामनेवाले नं.2 यांनी अदा केली असून सामनेवाले नं.1 यांनी कव्‍हरनोट नं.013989 ता.5.4.2007 रोजी दिली आहे. सदर विमा पॉलीसीचा कालावधी ता.5.4.2007 ते 4.4.2008 असा आहे. दुर्दैवाने तक्रारदारांचे दुकानाला ता. 9.4.2007 रोजी सकाळी 4.30 अचानक आग लागली व त्‍यामध्‍ये तक्रारदारांच्‍या दुकानाचे रक्‍कम रु.1,25,000/- नुकसान झाले. सदर घटनेची माहिती तक्रारदारांनी पोलीस स्‍टेशन, गेवराई यांचेकडे दिली. तक्रारदारांची विमा पॉलीसी सदर घटनेच्‍या वेळी वैध असुनही सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाईची रक्‍कम देण्‍यास नकार दिला. सामनेवाले यांनी ता.26.2.2009 रोजी पत्र पाठवून तक्रारदाराचे प्रिमियमची रक्‍कम सामनेवाले नं.2 यांचेकडून डीडी द्वारे ता.9.4.2007 रोजी 11.45 नंतर प्राप्‍त झाल्‍यामुळे व सदरची घटना ता.9.4.2007 रोजी सकाळी 4.30 घडली असल्‍यामुळे तक्रारदारांचे विमा प्रिमियमची रक्‍कम घटनेच्‍या नंतर मिळाली असल्‍यामुळे तक्रारदारांचा विमा क्‍लेम नो क्‍लेम या सदराखाली बंद करण्‍यात आला आहे, असे कळविण्‍यात आला आहे. तक्रारदारांचे सदर विमा पॉलीसी प्रिमियमची रक्‍कम सामनेवाले नं.2 यांनी दिलेल्‍या कर्जातुन घेतली असून सदरची रक्‍कम सामनेवाले नं.1 यांना सामनेवाले नं.2 यांचेकडून मिळण्‍यास विलंब झाला असल्‍यास या संबंधात तक्रारदारांचा कोणताही दोष नाही. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांनी ता.5.4.2007 रोजी सदर विमा पॉलीसीची कव्‍हरनोट देवून विमा कालावधी ता.4.4.2007 ते 4.4.2008 असा असल्‍याचे नमुद केले आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले तक्रारदारांना नुकसानभरपाईची रक्‍कम देण्‍यास जबाबदार आहेत अशी तक्रारदारांची तक्रार आहे.                                                    
सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 हजर झाले असुन त्‍यांनी खुलाशात नमुद केल्‍या प्रमाणे तक्रारदारांचा प्रिमियमची रक्‍कम ता.9.4.2007 रोजी सकाळी 11.55 ला मिळालेली असून तक्रारदारांचे दुकान सकाळी 4.30 जळालेले असल्‍यामुळे सदर घटनेची कोणतीही जबाबदारी सामनेवाले नं.1 यांचेवर नसल्‍याचे नमुद केले आहे. विमेदारांनी विमापॉलीसीच्‍या प्रिमियमची रक्‍कम अदा केल्‍यानंतर पॉलीस वैध होते असे सामनेवाले नं.1 यांचे म्‍हणने आहे. सामनेवाले नं.2 यांचे खुलाशानुसार, सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे तक्रारदारांच्‍या प्रिमियमची रक्‍कम ता.28.3.2007 रोजी डी.डी द्वारे पाठविलेली आहे. सदर डी.डी.ची रक्‍कम रु.1,982/- असुन तक्रारदारांसोबत इतर दोन कर्जदारांचा विमा प्रिमियची रक्‍कम सामनेवाले नं.1 यांचेकडे पाठविलेली आहे. त्‍याचप्रमाणे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांचे विमापॉलीसीची कव्‍हरनोट ता.5.4.2007 रोजी दिली आहे. अशा परिस्थितीत घटनेच्‍या वेळी तक्रारदारांची विमापॉलीसी वैध असून सामनेवाले नं.1 हे नुकसानभरपाईची रक्‍कम देण्‍यास जबाबदार आहेत असे नमुद केले आहे.
      सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 विमा कंपनीने सर्व्‍हे रिपोर्ट, कागदपत्र दाखल केल्‍याचे दिसून येते. सामनेवाले विमा कंपनीच्‍या ता.27.6.2007 रोजीच्‍या फायर सर्व्‍हे रिपोर्ट नुसार विमा कालावधी 5.4.2000 ते 4.4.2008 आहे. यावरुन सदरची घटना ता.9.4.2008 रोजी विमा कालावधीतच घडलेली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तसेच सदर सर्व्‍हेरिपोर्ट प्रमाणे नेट असेसमेंट रक्‍क्‍म रु.73,000/- एवढी दाखविण्‍यात आलेली असून    ( नेट लॉस) निव्‍वळ नुकसान रक्‍कम रु.58,327/- एवढी दाखविण्‍यात आलेली आहे.
तक्रारीतील मजकूर तसेच सामनेवाले नं.2 यांचे खुलाशावरुन तक्रारारांच्‍या सदर विमा पॉलीसीच्‍या प्रिमियमची रक्‍कम ता.28.3.2007 रोजी सामनेवाले नं.1 यांचे विमाप्रतिनिधी श्री मिलींद कुलकर्णी यांचे तर्फे ता.28.3.2007 रोजीच्‍या डी.डी.ने पाठविली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. विमा प्रतिनिधीनी सामनेवाले नं.1 यांचेकडे विलंबाने सदर प्रिमियम भरणा केल्‍यामुळे सदरची रक्‍कम सामनेवाले नं.1 यांचेकडे उशिराने प्राप्‍त झाल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सदर विलंबास तक्रारदार अथवा सामनेवाले नं.2 हे जबाबदार नाही. तक्रारदारांनी प्रिमियमची रक्‍कम ता.28.3.2007 रोजी दिलेली असून सामनेवाले नं.2 यांनी ता. 28.3.2007 रोजीच्‍या डी.डी.ने सामनेवाले नं.1 यांचेकडे त्‍यांचे प्रतिनिधी मार्फत पाठ‍वलेली आहे. अशा परिस्थितीत सदर विलंबास सामनेवाले नं.1 यांचे विमा प्रतिनिधी जबाबदार असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. श्री. मिलींद कुलकर्णी हे सामनेवाले नं.1 यांचे प्रतिनिधी असल्‍यामुळे सदरी विलंबाची जबाबदारी सामनेवाले नं.1 यांचेवर येते. सदर विलंबास तक्रारदार जबाबदार नसल्‍यामुळे नुकसान भरपाईची रक्‍क्‍म तक्रारदारांना अदा करण्‍याची जबाबदादारी सामनेवाले नं.1 विमा कंपनीवर आहे, असे न्‍यायमंचाचे मत आहे.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता, सामनेवाले नं.1 विमा कपंनीने दाखल केलेल्‍या ता.27.7.2007 रोजीच्‍या सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे नूकसान भरपाईची रक्‍कम रु. 58,327/- सामनेवाले विमा कंपनीने तक्रारदारांना देणे उचित होईल, असे न्‍यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांच्‍या विमा पॉलीसीच्‍या प्रिमियमची रक्‍कम मुदतीत सामनेवाले नं.1 विमा कंपनीकडे अदा केल्‍याची बाब स्‍पष्‍ट झाल्‍यामुळे सामनेवाले नं.2 यांची सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट होत नाही, असे न्‍यायमंचाचे मत आहे.
      सामनेवाले नं.1 यांची सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट झालेली असल्‍यामूळे नूकसान भरपाईची रक्‍क्‍म रु. 58,327/- तक्रारदारांना देणे उचित होईल, तसेच मानसिक त्रासाची रक्‍कम रु.3,000/-, तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.2,000/- देणे उचित होईल, असे न्‍यायमंचाचे मत आहे.
      सबब, न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
                           ।। आ दे श ।।
1.     तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.
2     सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्‍कम रु.58,327/- ( अक्षरी रुपये आठ्ठावण हजार तीनशे सतावीस फक्‍त ) आदेश मिळाल्‍या पासून एक महिन्‍याचे आत अदा करावी.
3.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, सदरची रक्‍कम विहित मुदतीत अदा न केल्‍यास त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासून म्‍हणजेच ता.18.1.2010 पासून द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज देण्‍यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4.    सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- ( अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त ) आदेश मिळाल्‍या पासून एक महिन्‍याचे आत अदा करावे.
5.    सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना सदर तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त ) आदेश मिळाल्‍या पासून एक महिन्‍याचे आत अदा करावे.
6.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 तधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍याचे संच तक्रारदारास परत करावेत.
 
                          ( सौ.एम.एस.विश्‍वरुपे )     ( पी. बी. भट )
                                सदस्‍या,                अध्‍यक्ष,
                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, बीड जि.बीड
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ Sou. M. S. Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.