// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 132/2014
दाखल दिनांक : 16/06/2014
निर्णय दिनांक : 12/02/2015
बालाप्रसाद शिवप्रसाद लाहोटी
वय 77 वर्षे, व्यवसाय – सेवानिवृत्त
रा. व्दारा नवजिवन हॉस्पीटल कॅम्प रोड
अमरावती ता.जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
नॅशनल इंन्शुरन्स कं.लि.
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर
‘गोपाल प्लाझा’ देवरणकर नगर
बडनेरा रोड, अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. महेंद्र
विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 तर्फे : अॅड. खेतकडे
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 12/02/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..2..
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे मागील 10 वर्षापासुन तो नियमीतपणे मेडिक्लेम पॉलिसी घेत आहे. तक्रारदाराने विरुध्दपक्षा कडून दि. २९.९.२०१३ ते २८.९.२०१४ या कालावधीसाठी मेडिक्लेम पॉलिसी रु. २,००,०००/- ची स्वतःसाठी, व पत्नीसाठी घेतली होती, त्याबद्दलचे प्रिमीयम विरुध्दपक्ष यांना दिले होते.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याची शस्त्रक्रिया होण्यापूर्वी 5-6 महिने आधी त्याच्या दोन्ही गुडघ्यात Osteoarthritis चा आजार झाला व त्याने महाजन अॅर्थेा अॅण्ड सर्जीकल हॉस्पीटल नागपुर येथील डॉ. उन्मेश महाजन यांचा सल्ला घेतला. औषधोपचार घेवूनही त्याला आराम न पडल्याने डॉ. महाजन यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये तक्रारदाराच्या उजवा गुडघा बदलवून घेण्याबद्दलची शस्त्रक्रियाचा सल्ला दिला त्याबद्दल तक्रारदाराचे चिरंजीव यांनी विरुध्दपक्ष यांना दि. २१.११.२०१३ रोजी या शस्त्रक्रिया बद्दल माहिती दिली. दि. २३.११.२०१३ रोजी डॉ. महाजन यांनी तक्रारदाराच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. तक्रारदार हा दि. २२.११.२०१३ ते ३.१२.२०१३ या कालावधीत डॉ. महाजन यांच्या दवाखान्यात शस्त्रक्रिया झाल्यामुळे अंतर रुग्ण होता. या शस्त्रक्रियेचा रु. २,००,०००/- खर्च आला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..3..
4. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याला आलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मिळण्यासाठी त्याने दि. ६.१२.२०१३ रोजी सर्व कागदपत्रासह विरुध्दपक्षाकडे दावा अर्ज सादर केला. परंतु विरुध्दपक्षाने 6 महिन्याचा कालावधी उलटल्यावर सुध्दा तक्रारदाराच्या दावा अर्जावर निर्णय घेतला नाही. त्याबद्दल तक्रारदाराने विरुध्दपक्षास विचारणा करण्यात येऊनही त्याच्या अर्जावर निर्णय घेण्याची प्रक्रियेत विरुध्दपक्षाने विलंब केलेला आहे. वास्तविक विरुध्दपक्षाची जबाबदारी होती की, तक्रारदाराचा दावा अर्जावर लवकर निर्णय घ्यावा, परंतु त्यांनी तसे न केल्याने तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला.
5. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याच्या विनंती वरुनही दावा लवकर निकाली न काढल्याने त्यांनी दि. २६.२.२०१४ रोजी विरुध्दपक्ष यांना पत्र दिले व त्यानंतर दि. ११.४.२०१४ रोजी नोटीस पाठवून त्याचा दावा अर्ज हा निकाली काढण्याची विनंती केली. नोटीस मिळाल्यानंतर सुध्दा तक्रार अर्ज दाखल करेपर्यंत विरुध्दपक्षाने दावा अर्जावर निर्णय न घेवून तक्रारदाराला प्रतिपुर्तीची रक्कम मिळण्या पासुन वंचित ठेवले तसेच त्याच्या नोटीसला उत्तर दिले नाही. कोणत्याही योग्य कारणा शिवाय विरुध्दपक्ष हे विलंब करीत आहे त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केलेली असल्याने
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..4..
तसेच दावा अर्जावर निर्णय घेवून त्याच्या विमा पॉलिसी अंतर्गत वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती न दिल्याने जो मानसिक त्रास सहन करावा लागला त्यासाठी हा तक्रार अर्ज दाखल करुन विरुध्दपक्षाने तक्रारदारास आलेला वैद्यकीय खर्चाचे रु. २,००,०००/-, मानसिक त्रासाबद्दल रु. ५०,०००/- व रु. २०,०००/- या तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षाकडून मिळावा यासाठी हा तक्रार अर्ज दाखल केला.
4. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 15 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला ज्यात त्यांनी हे कबुल केले की, पॉलिसीची मुदत ही तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे होती. परंतु तक्रार अर्जातील इतर सर्व मजकूर त्यांनी नाकारला. शेवटी असे कथन केले की, तक्रारदाराने २००९ ते २०१४ या कालावधीत मेडिक्लेम पॉलिसी तो व त्याचे कुटुंबिय यांचेसाठी घेतली होती. सुरवातीची पॉलिसी ही सन २००९-१० त्याचा कालावधी दि. २९.९.२००९ ते २८.९.२०१० असा होता ही घेतली होती. तक्रारदाराने मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत आलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मिळण्यासाठी जो अर्ज केला होता तो विरुध्दपक्षाने Third Party Administrator (T.P.A.) याच्याकडे लगेच पाठविल्या नंतर त्यांनी त्यावर निर्णय घ्यावयाचा होता. T.P.A. यांनी विरुध्दपक्षाचे तर्फे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार रु. ६५,०००/- वैद्यकीय
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..5..
प्रतिपुर्तीची रक्कम मंजूर केली होती, व त्याबद्दलचे पत्र दि. ५.८.२०१४ रोजी तक्रारदाराला पाठविले होते.
5. विरुध्दपक्षाच्या कथना प्रमाणे तक्रारदारास जो विकार झाला होता यासाठी 4 वर्षाचा वेटींग पिरेड होता त्याबद्दलचा उल्लेख पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये नमूद आहे व तो विचारात घेवून तक्रारदारास रु. ६५,०००/- मंजूर करण्यात आले व त्यासाठी त्यांनी सन २००९-१० या कालावधीसाठी रु. ५०,०००/- ची मेडिक्लेम पॉलिसी घेतली होती ती व रु. १५,०००/- बोनस विचारात घेवून रु. ६५,०००/- मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर दि. १८.३.२०१४ रोजी विरुध्दपक्षाने तक्रारदारास धनादेशाव्दारे रु. ५५,९००/- दिले. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती विचारात घेवून तक्रारदाराचा दावा अर्ज हा मंजूर करण्यात आला. वरील कारणावरुन तक्रार अर्ज हा रद्द करावा अशी विनंती विरुध्दपक्षाने केली.
6. तक्रारदाराने निशाणी 21 ला प्रतिउत्तर दाखल दाखल करुन त्यात असे कथन केले की, रु. ५५,९००/- हे तक्रारदाराच्या मुलाच्या खात्यात जमा केले परंतु त्याबद्दलची माहिती तक्रारदाराला दिली नाही. दि. ५.८.२०१४ रोजीचे विरुध्दपक्षाचे पत्र तक्रारदाराला मिळाले नव्हते. त्यांनी असेही
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..6..
कथन केले की, विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार जर त्याला रु. ६५,०००/- देण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर फक्त रु. ५५,९००/- का जमा करण्यात आले याचे कारण विरुध्दपक्षाने दिले नाही. पॉलिसीच्या अटी व नियमा बद्दलचे कोणतेही दस्त त्याला दिले नव्हते किंवा त्याबद्दल त्याला सांगितले नव्हते.
7. तक्रारदाराने निशाणी 35 व विरुध्दपक्षाने निशाणी 36 ला लेखी युक्तीवाद दाखल केला.
8. तक्रार अर्ज, लेखी जबाब दोन्ही पक्षांनी दाखल केलेले दस्त तसेच दोन्ही पक्षा तर्फे त्यांच्या वकीलांनी केलेला लेखी व तोंडी युक्तीवाद त्यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी
केली का ? .... होय
- तक्रारदार हा मागणी प्रमाणे नुकसान
भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? .. अंशतः होय
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..7..
कारणमिमांसा ः-
9. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. महेंद्र यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने जी मेडिक्लेम पॉलिसी काढली होती त्या पॉलिसी मध्ये 4 वर्षाचा वेटींग पिरेड राहिल असे नमूद नव्हते. विरुध्दपक्षाने या अटी बद्दल जे दस्त दाखल केले त्याची प्रत यापूर्वी तक्रारदाराला दिलेली नव्हती. तसेच बोनस रु. १५,०००/- हा विरुध्दपक्षाने दाखविला असला तरी निशाणी 29 ला जो खुलासा विरुध्दपक्षाने केलेला आहे त्यात २००६-०७ या वर्षात बोनस रु. १५,०००/- दाखविले असून सन २००७-०८ मध्ये तो शुन्य दाखविला आहे. त्यांच्या कथना प्रमाणे तक्रारदाराच्या मेडिक्लेम पॉलिसी नुसार तक्रारदारास जो वैद्यकीय खर्च रु. २,००,०००/- आला त्याची प्रतिपुर्ती करण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्षाची असतांना सुध्दा त्यांनी ती केली नाही. विरुध्दपक्षाने दाखल केलेले दस्तावरुन असे दिसते की, त्याने तक्रारदाराचा विमा दावा अर्ज हा रु. ६५,०००/- चा मंजूर केला परंतु प्रत्यक्षात रक्कम रु. ५५,९००/- तक्रारदाराच्या मुलाच्या खात्यात जमा करण्यात आली, ही कमी रक्कम का जमा केली याचे कारण विरुध्दपक्षाने दिलेले नाही. तसेचही रक्कम जमा करण्याबद्दलची माहिती तक्रारदाराला देण्यात आली नव्हती त्यामुळे तक्रारदाराला या व्यवहाराची माहिती नव्हती. त्यांनी असाही युक्तीवाद केला की, विमा पॉलिसीच्या अटी व
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..8..
शर्तीनुसार T.P.A. यांना प्रतिपुर्तीची रक्कम ठरविण्याचे अधिकार नाही. त्यांनी असाही युक्तीवाद केला की, तक्रारदाराने पाठविलेल्या नोटीसला विरुध्दपक्षाने उत्तर दिले नाही व एकंदर बाबीचा विचार करता विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असून त्याबद्दल तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र होतो.
10. विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. खेतकडे यांनी असा युक्तीवाद केला की, सन २००६-०७ च्या विमा पॉलिसी नंतर सन २००७-०८ या वर्षासाठी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करीत असतांना त्यामध्ये खंड पडला होता व त्यामुळे बोनस रक्कम ही शुन्य दाखविण्यात आली, परंतु प्रतिपुर्ती अर्जाचा विचार करतांना रु. १५,०००/- बोनस रक्कमेचा विचार करण्यात आला. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार जी रक्कम देय होती ती रक्कम रु. ५५,९००/- तक्रारदारास देण्यात आली. T.P.A. बद्दलची माहिती तसेच रु. ५५,९००/- जमा केल्याची माहिती तक्रारदाराला होती तसेच ती देण्यात आली होती. तक्रारदाराने पुर्वी घेतलेल्या मेडिक्लेम पॉलिसी मध्ये सुध्दा वेटींग पिरेड बद्दल उल्लेख होता व त्यामुळे ही बाब तक्रारदाराला माहिती होती. तक्रारदाराने त्याच्या मुलाचा खाते क्रमांक दिलेला असल्याने त्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली व त्यामुळे रक्कम जमा केल्याची माहिती तक्रारदाराला
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..9..
नव्हती हे खरे नाही. त्यांनी असाही युक्तीवाद केला की, विरुध्दपक्षाने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार देय होणारी रक्कम ही तक्रारदाराला दिलेली आहे त्यामुळे त्यांनी शेवटी असे कथन केले की, हा तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा.
11. तक्रारदाराने दि. २९.९.२०१३ ते २८.९.२०१४ या कालावधीसाठी मेडिक्लेम पॉलिसी रु. २,००,०००/- ची काढली होती ही बाब दाखल केलेल्या दस्तावरुन शाबीत होते. तसेच तक्रारदाराने निशाणी 2 सोबत त्याचे शस्त्रक्रियेवर त्याला डॉ. महाजन यांचे हॉस्पीटल मध्ये रु. २,००,०००/- चा जो वैद्यकीय खर्च आला त्याबद्दलचे बिल दि. २३.११.२०१३ चे दाखल केलेले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा की, तक्रारदाराने विमा पॉलिसी अंतर्गत प्रतिपुर्ती मिळण्यासाठी जो अर्ज केला होता तो विचारात घेवून त्याबद्दल रु. ६५,०००/- प्रतिपुर्तीची रक्कम देण्याचा जो निर्णय टी.पी.ए. यांनी घेतला होता. असे असतांना विरुध्दपक्षाने त्यांचे लेखी जबाबात हया सर्व बाबी का नाकारल्या हे न समजण्यासारखे आहे.
12. तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून यापुर्वीही मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली होती, सन २००९-१० ची तक्रारदाराची मेडिक्लेम पॉलिसी विरुध्दपक्षाने दाखल केली त्यावरुन असे दिसते की, ती
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..10..
रु. ५०,०००/- ची होती. तक्रारदाराने त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार माहिती नव्हती हे समजण्यासारखे नाही. या विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदारास जो विकार झाला होता त्याबद्दल त्यांनी डॉ. महाजन यांचेकडे वैद्यकीय उपचार घेतला त्याचा वेटींग पिरेड हा 4 वर्षाचा आहे व तो विचारात घेवून सन २००९-१० ची तक्रारदाराची मेडिक्लेम पॉलिसी रक्कमेचा विचार करुन तसेच बोनस विचारात घेवून विरुध्दपक्षाने त्याचा दावा अर्ज हा रु. ६५,०००/- पर्यंत मंजूर केल्याचे दिसते यात विरुध्दपक्षाने कोणतेही चुक केल्याचे निदर्शनास येत नाही. तकारदाराला पॉलिसी मिळाल्यानंतर जर त्यास अटी व शर्तीचे दस्त मिळाले नव्हते तर त्याबद्दल त्यांनी विरुध्दपक्षाकडे लगेच तक्रार करावयास पाहिजे होती तसे केल्याचे दिसत नाही.
13. तक्रारदाराने तक्रार अर्जात असे कथन केले की, त्यांनी विमा पॉलिसी अंतर्गत प्रतिपुर्ती मिळण्यासाठी जो अर्ज केला होता त्यावर विरुध्दपक्षाने तक्रार दाखल करेपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही व प्रतिपुर्तीची रक्कम त्यास दिली नाही. वास्तविक रेकॉर्डवर दाखल दस्तावरुन ही बाब शाबीत होते की, प्रतिपुर्तीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर टी.पी.ए. यांनी दि. १८.३.२०१४ ला रु. ५५,९००/- चा धनादेश तक्रारदाराचा मुलगा डॉ. गोविंद लाहोटी यांचे
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..11..
बचत खात्यात जमा केला होता. युक्तीवाद दरम्यान अॅड. श्री. खेतकडे यांनी असे कथन केले की, तक्रारदाराने त्याच्या मुलाचा खाते नंबर दिला असल्याने ही रक्कम त्या खात्यात जमा करण्यात आली. अशा परिस्थितीत येथे हे विचारात घ्यावे लागेल की, तक्रारदाराने दिलेल्या खात्यात जर दि. १८.३.२०१४ ला रु. ५५,९००/- ची रक्कम प्रतिपुर्ती म्हणून जमा केली होती तर ती रक्कम कोठून व कशा बद्दल जमा झाली याची माहिती एकतर तक्रारदाराने स्वतः किंवा त्याच्या मुलाने करावयास पाहिजे होती हे केल्याचे दिसत नाही. त्यामुळे तक्रारदाराचे कथन की, त्याचा अर्ज हा विरुध्दपक्षाने निकाली काढला नाही यात तथ्य आढळून येत नाही.
14. तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो विरुध्दपक्षाने टी.पी.ए. कडे पाठविला होता व त्यांनी रु. ५०,०००/- ची विमा रक्कम सन २००९-१० ची पॉलिसी विचारात घेवून रु. १५,०००/- बोनस याचा विचार करुन रु. ६५,०००/- प्रतिपुर्ती देण्याचा निर्णय घेतला. पॉलिसीची अट क्र.4 (3) नुसार हे योग्य असल्याचे दिसते. जर रु. ६५,०००/- प्रतिपुर्ती देण्याचा निर्णय टी.पी.ए. यांनी घेतला होता तर तक्रारदाराला रु. ५५,९००/- का देण्यात आले याचे कारण मात्र समाधानकारकरित्या विरुध्दपक्षाने मंचा समोर आणले नाही. वास्तविक रु. ६५,०००/- प्रतिपुर्ती देण्याचा निर्णय झाला होता
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..12..
तर तक्रारदारास रु. ६५,०००/- द्यावयास पाहिजे होते. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती मधील ५.३.५ नुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाचे आत निर्णय घ्यावा लागतो, या प्रकरणात टी.पी.ए. किंवा विरुध्दपक्षाने या मुदतीत निर्णय घेतल्याचे दिसत नाही त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढण्यात येतो. 30 दिवसाचे आत निर्णय न घेतल्यास देय रक्कमेवर या अटी प्रमाणे व्याज देय होते तसेच जर विरुध्दपक्षाने दि. १८.३.२०१४ ला तक्रारदाराच्या मुलाच्या बचत खात्यात रु. ५५,९००/- प्रतिपुर्तीची रक्कम जमा केली होती तर तक्रारदाराने जी नोटीस दि. ११.४.२०१४ रोजी विरुध्दपक्षाला पाठविली होती ती दि. १५.४.२०१४ रोजी मिळाली होती तर त्या नोटीसला उत्तर देवून विरुध्दपक्षाने ही माहिती तक्रारदाराला देणे अपेक्षीत होते. ग्राहकाकडून नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर अशा परिस्थितीत देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्षाची असतांना ते शांत राहिले ही त्यांची कृति सेवेतील त्रुटी ठरते.
15. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. महेंद्र यांनी युक्तीवाद दरम्यान असा मुद्दा मांडला की, टी.पी.ए. यांना प्रतिपुर्तीची रक्कम ठरविण्याचा अधिकार नाही या उलट विरुध्दपक्षा तर्फे
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..13..
अॅड. श्री. खेतकडे यांनी युक्तीवाद दरम्यान असा मुद्दा उपस्थित केला की, विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार प्रतिपुर्तीची रक्कम ठरविण्याचा निर्णय हा टी.पी.ए. यांना घ्यावयाचा आहे. तक्रारदाराने टी.पी.ए. यांना या प्रकरणात सामील केलेले नसल्याने हा अर्ज चालु शकत नाही. युक्तीवाद दरम्यान अॅड. श्री. महेंद्र यांनी विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीतील ५.३.६ चा आधार घेतला ज्यात जरी असे लिहले असेल की, प्रतिपुर्तीचा अर्ज हा रद्द करण्याचा अधिकार टी.पी.ए. यांना नसला तरी त्यात असे नमूद आहे की, पॉलिसी अंतर्गत प्रतिपुर्तीची किती रक्कम देणे योग्य होते याची शिफारस ते विमा कंपनीस करु शकतात व त्या शिफारसी नुसार विमा कंपनीने विमा धारकास रक्कम द्यावयाची असते. अशा परिस्थितीत टी.पी.ए. यांना या प्रकरणात सामील न केल्याने हा अर्ज रद्द होऊ शकत नाही.
16. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार प्रतिपुर्तीची रक्कम रु. ६५,०००/- देय असतांना रु. ५५,९००/- ही दिलेली आहे ती कशी चुकीची आहे हे तक्रारदार शाबीत करु शकला नाही. तसेच 4 वर्षाचा वेटींग पिरेड व सन २००९-१० चे रु. ५०,०००/- विमा पॉलिसी व रु. १५,०००/- बोनस विचारात घेवून तक्रारदारास प्रतिपुर्तीची रक्कम रु. ६५,०००/- देय असल्याबद्दलचा जो निर्णय
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..14..
घेण्यात आला तो योग्य वाटतो. वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारास रु. ६५,०००/- पैकी रु. ५५,९००/- देण्यात आले. वास्तविक त्यास रु. ६५,०००/- द्यावयास पाहिजे होते. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार 30 दिवसाच्या आत निर्णय न घेतल्याने व्याज देय होते त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात येतो की, विरुध्दपक्ष हे तक्रारदारास प्रतिपुर्तीची राहिलेली रक्कम रु. ९,१००/- त्यावर द.सा.द.शे. १० टक्के व्याज दराने देण्यास जबाबदार होते.
17. दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद तसेच वर केलेले विवेचन यावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, विरुध्दपक्ष हे तक्रारदारास रु. ९,१००/- त्यावर दि. ६.१२.२०१३ पासुन द.सा.द.शे. १० टक्के व्याज दराने देण्यास जबाबदार होते तसेच विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारास जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल रु. १०,०००/- विरुध्दपक्षाकडून तक्रारदारास देय होतात. यावरुन मुद्दा क्र.1 ला होकारार्थी व 2 ला अंशतः होकारार्थी उत्तर देण्यात येते व तक्रार अर्ज हा खालील आदेशा प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 132/2014
..15..
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास रु. ९,१००/- त्यावर दि. ६.१२.२०१३ पासुन द.सा.द.शे. १० टक्के व्याज दराने या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावे अन्यथा त्यावर द.सा.द.शे. १२ टक्के व्याज देय होईल.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास रु. १०,०००/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु. २,०००/- द्यावे. व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 12/02/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष