Maharashtra

Ahmednagar

CC/14/248

M/s.Manohar Appliances & Electronics,Prop.Mrs.Bharti Manohar Dembla - Complainant(s)

Versus

Divisional Manager,National Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

A.R.Firodiya

05 Dec 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/14/248
( Date of Filing : 16 Jun 2014 )
 
1. M/s.Manohar Appliances & Electronics,Prop.Mrs.Bharti Manohar Dembla
P-79,MIDC,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager,National Insurance Co.Ltd.
Ambar Plaza,Station Road,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Divisional Manager,United India Insurance Co.Ltd.
Kisan Kranti Building,Market Yard,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
3. Manager,State Bank of India
M.I.D.C. Branch,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:A.R.Firodiya, Advocate
For the Opp. Party: A.K.Bang/ A.B.Kothari, Advocate
Dated : 05 Dec 2018
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

     तक्रारदार हे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तू विकण्‍याचा व्‍यवसाय करतात. त्‍यांचे सामनेवाला नं.3 कडे कॅश क्रेडीट अकौंट होते. तक्रारदार यांनी त्‍यांचे दुकानामध्‍ये असलेल्‍या वस्‍तुंचा 67,00,000/- रुपयाचा व्‍यापार शॉप किपर नावाची विमा पॉलीसी उतरविला होती. सदरहू विम्‍याचा कालावधी दिनांक 18.05.2012 ते 17.05.2013 असा आहे. सदरहू विमा हा सामनेवाला नं.1 यांचेकडे उतरविला आहे. burglary BP policy सामनेवाला नं.2 यांचेकडे रक्‍कम रु.50,00,00/- ची उतरविली आहे. सदरच्‍या विम्‍याचा कालावधी दिनांक 04.04.2012 ते 03.04.2013 असा आहे. 5 नोव्‍हेंबर 2012 चे रात्री तक्रारदार यांचे दुकानामध्‍ये चोरी झाली. त्‍यामध्‍ये एल.सी.डी व एल.ई.डी व इतर वस्‍तू चोरी गेल्‍या. सदरहू वस्‍तुचा सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडे तक्रारदाराने विमा उतरविला होता. सदरहू चोरीची खबर तक्रारदार यांनी पोलीस स्‍टेशनला दिलेली होती. तसेच सामनेवाला नं.1 व नं.2 यांना कळविले. सामनेवाला नं.3 यांचेमार्फत सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडे सदरहू विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी विमा दावा सादर केला आहे. सदरहू चोरीची खबर प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाला न.1 व 2 यांनी श्री.नरेंद्र लोहाडे यांची सर्व्‍हेअर म्‍हणून तक्रारदाराचे दुकानाचे तपासणीसाठी पाठविले. सर्व्‍हेअर यांनी तपासणी करुन सदरहू चोरीची एकुण नुकसान रक्‍कम रुपये 16,10,000/- अशी काढली आहे. सर्व्‍हेअर यांनी तक्रारदार यांना तपासणी करण्‍यासाठी मदत केली. सर्व्‍हेअर यांनी पोलीस तपासाची कागदपत्रे व इतर संपुर्ण नुकसान हे विचारात घेऊन एकुण रक्‍कम रुपये 14,01,700/- अशी अंतिम नुकसान काढले आहे. तक्रारदार यांचे दुकानातील संपुर्ण वस्‍तू सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडे विमा उतरविल्‍यामुळे विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याची जबाबदारी ही सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडे आहे. मात्र सामनेवाला यांनी रक्‍कम रुपये 6,09,041/- असे परतफेड (reimbursed ) केल्‍याचे व सदरहू रक्‍कम सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदाराला दिलेली आहे. मात्र सामनेवाला नं.1 यांनी विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारदार यांना दिलेली नाही. नरेंद्र लोहाडे यास सामनेवाला नं.1 व 2 यांनी सर्व्‍हेअर म्‍हणून नेमले होते. त्‍यांनी काढलेला नुकसानीचा खर्च तक्रारदाराला विमा वस्‍तुची रक्‍कम म्‍हणून देणे गरजेचे होते, परंतू तसे केले नाही. सामनेवाला नं.3 यांनी सामनेवाला नं.1 व 2 यांचेवर योग्‍य ती कारवाई करुन विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारदाराला मिळवून देणे गरजेचे होते. मात्र सामनेवाला नं.3 यांनी त्‍यांची जबाबदारी पार पाडली नाही. अशा प्रकारे त्‍यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला. सामनेवाला हे तक्रारदाराला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 7,92,659/- सामनेवालानी मिळून तक्रारदाराला देणे आवश्‍यक आहे. परंतू सामनेवाला यांना सदरची रक्‍कम तक्रारदाराला दिली नाही, त्‍यामुळे तक्रारदाराने या मंचात तक्रार दाखल करुन परीच्‍छेद क्र.8 प्रमाणे मागणी केली आहे.

3.   सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.15 प्रमाणे  दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे कथन केले की, तक्रारदाराने त्‍याचे दुकानात व्‍यापार सुरक्षा विमा उतरविला होता. सदरहू विमा पॉलीसी क्र.271900/48/12/980000297 असा आहे. व सदरहू विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 18.05.2012 ते 17.05.2013 असा आहे. संपुर्ण वस्‍तुचा 67,00,000/- रुपयाचा विमा उतरविला होता ही बाब सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत मान्‍य केलेली आहे. पुढे सामनेवाला नं.1 यांनी  असे कथन केलेले आहे की, विमा पॉलीसीचे शर्ती व अटी नुसार कोणताही लॉस झाल्‍यानंतर विमा कंपनीला 15 दिवसाचे आत नोटीस पाठवून कळविणे गरजेचे होते. परंतू तशी कोणतीही चोरीबद्दल सूचना सामनेवाला नं.1 यांना प्राप्‍त झाली नाही. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाला नं.3 यांचेकडून कर्ज घेतले, तेव्‍हा सुध्‍दा सामनेवाला नं.1 यांना या घटनेबाबत कोणतीही सुचना दिलेली नाही व कोणत्‍याही प्रकारचा विमा दावा सामनेवाला नं.1 यांचकडे पाठविला नाही. त्‍यानंतर दिनांक 08.07.2013 रोजी सामनेवाला नं.1 यांना सामनेवाला नं.3 यांचेव्‍दारे सदरचे घटनेबाबत कळविण्‍यात आले. त्‍यानंतर दिनांक 09.07.2013 रोजी सामनेवाला नं.1 यांना सामनेवाला नं.3 मार्फत सुचना मिळाली. अशा प्रकारे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीचा भंग केला आहे. तसेच सामनेवाला नं.2 ही दुसरी विमा कपंनी असल्‍यामुळे त्‍याचा कोणताही निर्णय ते सामेनवाला नं.1 यांचेवर बंधनकारक नाही. तसेच सामनेवाला नं.1 यांनी कोणत्‍याही प्रकारचा करारनामा सामनेवाला नं.2 यांचेसोबत केलेला नाही. सामनेवाला नं.3 यांनी सामनेवाला नं.1 यांना सदरचे घटनेची सुचना उशीरा दिलेली आहे व सामनेवाला नं.1 यांना वेळोवेळी तक्रारदाराचे आलेले नोटीसला उत्‍तर दिलेले आहे. अशा प्रकारे सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांचे सेवेत त्रुटी कोणतीही त्रुटी केली नाही. यामध्‍ये सामनेवाला नं.1 यांनी कोणतीही दुषीत सेवा दिलेली नसल्‍यामुळे तक्रारदाराची सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी सामनेवाला नं.1 यांनी विनंती केली आहे.

4.   सामनेवाला नं.2 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी 12 प्रमाणे प्रकरणात दाखल केली. त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदाराचे दुकानाची चोरी झाल्‍याचे व त्‍यांचे दुकानातील वस्‍तूचा विमा उतरविला व विमा कालावधी मान्‍य केलेला आहे. व त्‍यानुसार सर्व्‍हेअरने सदरचे दुकानाची तपासणी करुन अहवाल सादर केला. त्‍या पाहणी अहवालानुसार सामनेवाला नं.2 यांनी रक्‍कम रुपये 6,09,041/- तक्रारदाराला दिलेली आहे व त्‍या बद्दलची पावती घेतलेली आहे. अशा प्रकारे त्‍याचेमध्‍ये (Full and Final) पुर्ण आणि अंतिम सेटलमेंट झालेले आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांची सदरची तक्रार ही मेंटेनेबल नाही. पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार सदरची विमा पॉलीसीची तक्रारदाराला त्‍याची रक्‍कम दिलेली आहे. तसेच सदरचे घटनेबाबत सामेनवाला नं.1 यांना त्‍यांचे कैफियतीत नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी यांची सुध्‍दा जबाबदारी होती ही बाब नमुद केलेली आहे. अशा प्रकारे तक्रारदार यांना सामनेवाला नं.2 यांनी विमा दाव्‍याची रक्‍कम दिलेली आहे, त्‍यांनी सेवेत त्रुटी केलेली नाही. सदरची तक्रार ही सामनेवाला नं.2 यांचे विरुध्‍द खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी सामनेवाले नं.2 यांनी मंचाला विनंती केली आहे.

5.   सामनेवाला नं.3 यांना प्रस्‍तूतचे प्रकरणाची नोटीस प्राप्‍त झाली. परंतू ते प्रकरणात हजर झाले नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द सदरची तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा आदेश निशाणी 1 वर पारीत करण्‍यात आला.

6.   तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, त्‍यांचे वकील श्री.फिरोदिया यांनी केलेला युक्‍तीवाद व सामनेवाला नं.1 व 2 यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र व त्‍यांचे वकील श्री.बंग व श्री.कोठारी यांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सेवा देणेत त्रुटी केली आहे काय.?

... होय.

केवळ सामनेवाला नं.1 यांनी  

2.

तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे काय.?                                                         

... होय.

सामनेवाला नं.1 यांचेकडून

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

7.   मुद्दा क्र.1 व 2ः- तक्रारदार यांची अहमदनगर येथे मेसर्स मनोहर अप्‍लायसेंस अॅन्‍ड इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तु विकण्‍याचे दुकान आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला नं.1 यांचेकडे सदरहू दुकानातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तुंचा 67,00,000/- रुपयाचा व्‍यापार शॉप किपर असा विमा उतरविला होता व त्‍या विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 18.05.2012 ते 17.05.2013 असा आहे. तसेच तक्रारदाराने सामनेवाला नं.2 यांचेकडे burglary BP policy हा विमा रक्‍कम रुपये 50,00,000/- चा उतरविला होता, त्‍याचा कालावधी दिनांक 04.04.2012 ते 03.04.2013 असा होता. तक्रारदाराचे दुकानामध्‍ये विमा कालावधीत म्‍हणजेच दिनांक 05.11.2012 चे रात्री दुकानामध्‍ये चोरी झाली. त्‍यामध्‍ये एल.सी.डी व एल.ई.डी. व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तूची चोरी झाली. त्‍यानंतर तक्रारदाराने सदरची तक्रार एम.आय.डी.सी. पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंदविली व सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडे विमा उतरविल्‍यामुळे विमा रकमेची मागणी केली. तक्रारदाराचे दुकानामध्‍ये चोरी झाल्‍याची बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदाराने दोषारोपपत्र (अंतिम अहवाल) प्रकरणात दाखल केला आहे, त्‍यामध्‍ये आरोपी तपासाअंती मिळून न आल्‍याने फायनल (अ) समरी न्‍यायालयाने मंजूर केली आहे. वरील दस्‍तावरुन तक्रारदाराचे दुकानामधील चोरी झाली ही बाब स्‍प्‍ष्‍ट होते. तक्रारदाराने सामनेवाला नं.3 यांचेकडून कर्ज प्रकरण केले होते ही बाब वादातील नाही. सदरच्‍या घटनेनंतर सामनेवाला नं.2 यांनी दाखल केलेल्‍या पत्रानुसार सर्व्‍हेअर नरेंद्र लोहाडे यांची नेमणुक केली होती. सदरहू सर्व्‍हेअरची नेमणुक करताना तक्रारदाराने सामनेवाला नं.1 कडून व्‍यापार शॉप किपर हा विमा उतरविला होता ही बाब सर्व्‍हेअर यांना माहित असल्‍याचे दिसून येते. व त्‍यानुसार सर्व्‍हेअर यांनी तक्रारदाराचे दुकानाची तपासणी करुन तसा तपासणी अहवाल दोनही विमा कंपनीची प्रमाणशीर जबाबदारी निश्‍चीत करुन तपासणी अहवाल सादर केला आहे. सदरचा तपासणी अहवाल व पोलीस तपासणी रिपोर्टनुसार एकुण नुकसान झाल्‍याची रक्‍कम 14,01,700/- रुपये अशी काढली आहे, ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदाराने सर्व्‍हेअर यांचा रिपोर्ट प्रकरणात दाखल केला आहे. सदरचे रिपोर्टचे अवलोकन केले असता, त्‍यामध्‍ये त्‍यांनी नुकसान झालेली रक्‍कम रुपये 14,01,700/- काढली आहे. व त्‍याची  उत्‍तरदायित्‍व (liability) हे सामनेवाला नं.1 व 2 यांचेवर कशा प्रकारे राहील ही बाब सुध्‍दा अहवालामध्‍ये नमुद केली आहे. त्‍यानुसार युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी म्‍हणजे सामनेवाला नं.2 यांचेकडे रक्‍कम रु.6,09,434.78 व सामनेवाला नं.1 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी यांचेकडे 7,92,265.22 असे व्‍हॅल्‍यू काढले होते. सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांच्‍या लेखी कैफियतीमध्‍ये कथन केले की, नेमणूक केलेला सर्व्‍हेअर हा त्‍यांचे कपंनीचा नाही, त्‍यामुळे अहवालात नमुद असलेली रक्‍कम अमान्‍य केलेली आहे. परंतू सामनेवाला नं.1 यांना चोरीच्‍या घटनेची सुचना दिल्‍यानंतर त्‍यांनी आपला स्‍वतःचा सर्व्‍हेअर नेमणुक करुन अहवाल प्राप्‍त करुन घेतला नाही. तसेच सर्व्‍हेअर यांनी संपुर्ण दुकानाची तपासणी करुन विमा पॉलीसीच्‍या स्‍वरुपानुसार दोनही कंपनीची जबाबदारी निश्‍चीत करुन तसा अहवाल सादर केला आहे. त्‍यामुळे सामनेवाला नं.1 यांनी नरेंद्र लोहाडे यांना सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍त केले. व सदरचा अहवाल त्‍यांना मान्‍य करणे बंधनकारक नाही हे सामनेवाला नं.1 यांचे कथन ग्राहय धरता येत नाही.

8.   तक्रारदाराने कथन केले आहे की, सामनेवाला नं.2 यांनी एकूण रक्‍कम रुपये 6,09,041/- तक्रारदाराला दिलेले आहे. परंतू उर्वरीत रक्‍कम सर्व्‍हेअरच्‍या अहवालानुसार प्राप्‍त झाली नाही. तक्रारदाराचे या कथनावर सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये असे नमुद केले आहे की, त्‍यांना सदरचे चोरीचे घटनेविषयी कळविण्‍यात आले नाही. त्‍यामुळे पॉलीसीच्‍या अटी व शर्तीमध्‍ये नमुद असल्याप्रमाणे तक्रारदाराने चोरी झाल्‍यापासून 15 दिवसाचे आत नोटीस पाठविणे गरजेचे होते, परंतू तसे केले नाही व कोणतीही सुचना न दिल्‍यामुळे पॉलीसीचे अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्‍यामुळे विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारदाराला देता येणार नाही असा बचाव घेतला. परंतू या बचावासाठी तक्रारदाराने दाखल केलेले सामनेवाला नं.3 यांनी सामेनवाला नं.1 यांना दिलेल्‍या पत्राचे अवलोकन केले. सदरहू पत्र हे दिनांक 07.03.2013 चे आहे. त्‍यानुसार सामनेवाला नं.1 यांना सामनेवाला नं.3 यांनी सदरचे घटनेबाबत सुचना दिलेली आहे. तसेच दिनांक 08.07.2013 ला सुध्‍दा सामनेवाला नं.3 यांनी पत्र देऊन कळविले होते. तसेच प्रकरणात सामनेवाला नं.1 नी तक्रारदाराला पाठविलेले पत्र दिनांक 02.07.2013 चे आहे. सदरहू पत्राचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, सामनेवाला नं.1 ला या घटनेची सुचना मिळाली होती. त्‍यामुळे सामनेवाला नं.1 यांनी घेतलेला बचाव की, त्‍यांना घटनेची सुचना मिळाली नाही ही बाब ग्राह्य धरता येणार नाही. सदरची पॉलीसी ही सामेनवाला नं.1 व 2 यांचे सोबत काढलेली होती त्‍यामुळे त्‍यांची जबाबदारी असल्‍याने विमा पॉलीसीत नमुद आहे. त्‍यामुळे सदरचे नुकसान भरपाईपोटी सामनेवाला नं.1 यांचीसुध्‍दा विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यासाठी जबाबदारी निश्‍चीत होते. परंतु दाखल असलेले सर्व्‍हेअरचा रिपोर्ट हा सामनेवाला नं.1 व 2 यांचे सर्व्‍हेअर म्‍हणून त्‍यांनी तपासणी केलेली आहे. तसा तपासणी अहवाल दाखल केलेला आहे. यासाठी सामनेवाला नं.1 यांनी कोणताही आक्षेप नोंदविलेला नाही. त्‍यामुळे सदरचा सर्व्‍हेअरचा तपासणी अहवाल हा ग्राहय धरण्‍यात येतो. सामनेवाला नं.2 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये कथन केले, तेव्‍हा सर्व्‍हेअरने काढलेल्‍या अॅसेस व्‍हॅल्‍यू (मुल्‍ल्‍य) नुसार रक्‍कम रुपये 6,09,041/- ही रक्‍कम तक्रारदाराला दिलेली आहे, हे तक्रारदाराला मान्‍य आहे. त्‍यामुळे सदरची तक्रारीमध्‍ये सामनेवाला नं.2 युनाटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी यांनी त्‍यांचेकडे होणारी रक्‍कम तक्रारदाराला अदा केली आहे. त्‍यामुळे प्रस्‍तूतचे प्रकरणामध्‍ये सामनेवाला नं.2 यांचा कोणत्‍याही विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यासाठी जबाबदारी होती असे म्‍हणता येणार नाही.

9.   सामनेवाला नं.3 यांनी सदरचे घटनेविषयी सामनेवाला नं.1 यांना लगेच कळविणे आवश्‍यक होते. तरीही सामनेवाला नं.3 यांनी चोरी झाल्‍याबाबत सामनेवाला नं.1 यांना दिनांक 07.03.2013, 08.07.2013 ला कळविले होते. सामनेवाला नं.3 यांनी सामेनवाला नं.1 यांना कळविण्‍यासाठी उशीर केला असल्‍याने त्‍यात तक्रारदाराची कोणतीही चुक नाही, त्‍यासाठी तक्रारदाराला जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाला नं.1 यांचेकडे तक्रारदार यांचे दुकानातील वस्‍तुंचा विमा उतरविला आहे ही बाब सामनेवाला नं.1 यांना मान्‍य आहे. सदर चोरीची घटना घडलेबाबत संपुर्ण कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केलेली आहेत. तक्रारदाराने दुकानात चोरी झालेली होती ही बाब दस्‍तावेजावरुन सिध्‍द केलेली आहे. यामंचाने प्रकरणामध्‍ये दाखल असलेल्‍या तज्ञांचे तपासणी अहवालावरुन सामनेवला नं.1 यांचे विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारदाराला देण्‍याची जबाबदारी निश्‍चीत केलेली आहे. सदर अहवालास अधीन राहून सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदाराला उर्वरीत रक्‍कम रुपये 7,92,265/- तक्रारदाराला द्यावेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

10.  सामनेवाला नं.1 यांनी सदरचे बचावासाठी

(I) मा.राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, कर्नाटक 2002 (2) CPR PAGE 367 Valerian S.J..Lobo v/s. The Oriental Insurance Co. Ltd & Anr.

या न्‍याय निवाडयांचा आधार घेतला, मंचाने सदरहू न्‍याय निवाडयाचे वाचन केले असता, सदरहू न्‍याय निवाडा मेडीक्‍लेम पॉलीसी विषयी असून तो या प्रकरणामध्‍ये लागू पडत नाही.

(II) 2011 (3) CPR PAGE 148 (NC) Mrs.Sudesh Gupta V/s. ICICI Prudential Life Insurance Co.Ltd & Anr.

सदरचा न्‍याय निवाडा हा मोटार व्‍हीईकल अॅक्‍ट व मेडीक्‍लेम पॉलीसी संबंधी असल्‍यामुळे तो ग्राहय धरता येत नाही.

प्रस्‍तुतचे प्रकरणामध्‍ये तक्रारदाराने संपुर्ण कागदपत्र व पुराव्‍यासह त्‍यांची तक्रार सिध्‍द केलेली आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.   

11.  सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदाराला विमा दाव्‍याची रक्‍कम दिली नाही व विनाकारण त्‍यांचा विमा दावा नामंजूर केला. त्‍यामध्‍ये निश्‍चीतच सेवेत त्रुटी केली ही बाब स्‍पष्‍ट होते. सबब तक्रारदार यांना काही रक्‍कम नुकसान भरपाईपोटी देणे आवश्‍यक आहे.

12.   मुद्दा क्र.3   मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ  दे  श -

1)   तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

2)   सामनेवाला नं.1 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी यांनी तक्रारदाराला विमा दाव्‍याची रक्‍कम रु.7,92,265/- (रक्‍कम रुपये सात लाख बॅन्नव हजार दोनशे पासष्‍ट फक्‍त) या निकालाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत द्यावी. मुदतीत रक्‍कम न दिल्यास सदरचे रकमेवर द.सा.द.शे.9 टक्‍के दराने संपुर्ण रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज द्यावे.  

3)   सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदार यांना शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम  रु.10,000/- [रक्‍कम रुपये दहा हजार फक्‍त] व या तक्रारीचा खर्च रक्‍कम  रु.5,000/- [रक्‍कम रुपये पाच हजार फक्‍त] द्यावे.

4)   सामनेवाला नं.2 व 3 यांचे विरुध्‍द सदरची तक्रार खारीज करण्‍यात येते.

5)   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क दयावी.

6)   या प्रकरणाची  “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदारास परत द्यावी.  

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.