Maharashtra

Kolhapur

CC/09/410

Amar Shivaji Mhadeshwar. - Complainant(s)

Versus

Divisional Manager,National Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv. R.N.Powar.

06 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/410
1. Amar Shivaji Mhadeshwar.A/p Yelawade, Tal. Radhanagari.Kolhapur.Maharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Divisional Manager,National Insurance Co. Ltd.1241 E Shahumill Road,Kolhapur.Kolhapur.Maharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :Adv. R.N.Powar., Advocate for Complainant
Adv A D Chougule, Advocate for Opp.Party

Dated : 06 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.06.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           तक्रारदारांच्‍याकडे टाटा सुमो एम्.एच्.17 क्‍यु 416 हे वाहन होते. सदर वाहनावरती सामनेवाला विमा कंपनीची पॉलीस उतरविली होती. सदर पॉलीसी क्र.270801/31/076100007584 असा असून त्‍याचा कालावधी दि.15.08.2007 ते दि.14.08.2008 असा होता. सदर वाहनास दि.06.07.2008 रोजी झाडाला धडकून अपघात झाला. सदर अपघातामध्‍ये तक्रारदारांचे वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सदर वाहनाची आयडीव्‍ही रुपये 3,50,000/- इतकी आहे. त्‍याप्रमाणे सामनेवाला यांचेकडे सदर रक्‍कमेची मागणी केली असता दि.25.05.2009 रोजी रक्‍कम रुपये 1,47,500/- इतकी रक्‍कम देवू केली. सदरची रक्‍कम तक्रारदारांनी स्‍वत:च्‍या कोणत्‍याही हक्‍कास बाधा न येता स्विकारतो असे सांगितल्‍याने सामनेवाला यांनी सदरची रक्‍कम देता येत नसल्‍याचे सांगितले. सामनेवाला विमा कंपनीने दि.1,47,500/- इतकी रक्‍कम मंजूर केली. तसेच, अपघात परिस्थिती वाहन विक्री करुन रुपये 50,000/- तक्रारदारांना मिळालेले आहेत. सबब, सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवल्‍याने क्‍लेमची उर्वरित रक्‍कम रुपये 3,00,000/- देणेचा आदेश व्‍हावा, तसेच त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- देणेचे आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत सेटलमेंट लेटर, पॉलीसी सर्टिफिकेट, डिस्‍चार्ज व्‍हौचर, चार्जशिट इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(4)        सामनेवाला विमा कंपनीने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, विमा पॉलीसी ही अटी व शर्तीनुसार एकूण नुकसानीमधून सर्व वजावटी जाता होणारे नुकसान हे रुपये 3,50,000/- च्‍या 75 टक्‍केपेक्षा कमी असल्‍याने अपघातामध्‍ये वाहनाचे पूर्णपणे नुकसान झालेले नाही. सामनेवाला विमा कंपनीने सर्व्‍हेअर यांची नेमणुक करुन त्‍यांनी दिलेल्‍या अहवालानुसार कॅश लॉस बेसिसवरती फूल अण्‍ड फायनल पेमेंट म्‍हणून रुपये 1,47,500/- देणेस तयार होते. सदरची रक्‍कम ही योग्‍य व बरोबर आहे. सदर वाहनाची नोंदणी दि.09.02.2004 रोजी झालेली आहे व वाहनाचा अपघात दि.06.07.2008 रोजी झालेला आहे. एखादे वाहन चार वर्षांहून अधिक काळ वापरले गेले असेल तर सर्व वजावटी जाता गाडी दुरुस्‍ती करुन घेतल्‍या नंतर जी खर्चाची बिल कंपनीकडे सादर केली जातात व त्‍यानुसार सर्व्‍हेअरची नेमणुक करुन नुकसान भरपाई दिली जाते. परंतु, तक्रारदारांनी अपघातातील दुरुस्‍त करुन ने घेता रक्‍कम रुपये 50,000/- ला विक्री केले आहे. सामनेवाला कंपनीने देवू केलेली रक्‍कम रुपये 1,47,500/- ही रक्‍कम बरोबर आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट रुपये 15,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(5)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टर्थ्‍य टाटा सुमो ची पॅकेज पॉलीसी, पुरवणी व अंतिम सर्व्‍हे रिपोर्ट इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
(5)        या मंचाने दोन्‍ही बाजूंच्‍या वकिलांचे युक्तिवाद सविस्‍तर व विस्‍तृतपणे ऐकले आहे. सामनेवाला यांच्‍या वकिलांनी पॉलीसीच्‍या अटी व शर्ती या मंचाचे निदर्शनास आणून दिलेल्‍या आहेत. त्‍यातील महत्‍त्‍वाच्‍या अटी खालीलप्रमाणे :-
THE SCHEDULE OF DEPRECIATION FOR FIXING IDV OF THE VEHICLE
 

AGE OF THE VEHICLE
% OF DEPECIATION FOR FIXING IDV
Not exceeing 6 months
5%
Exceeding 6 months but not exceeding 1 year
15%
Exceeding 1 year but not exceeding 2 years
20%
Exceeding 2 years but not exceeding 3 years
30%
Exceeding 3 years but not exceeding 4 years
40%
Exceeding 4 years but not exceeding 5 years
50%

 
The insured vehicle shall be treated as a CTL if the aggregate cost of retrieval and/or repair of the vehicle, subject to terms and conditions of the policy, exceeds 75% of the IDV of the vehicle.
 
3.     The Company may at its own option repair reinstate or replace the vehicle insured or part thereof and/or its accessories or may pay in cash the amount of the loss or damage and the liability of the Company shall not exceed :
 
(a)    for total loss/constructive total loss of the vehicle the Insured’s Declared Value (IDV)        of the vehicle (including accessories thereon) as specified in the Schedule less the value of the wreck.
(b)    for partial losses, i.e. losses other than Total Loss/Constructive Total Loss of the vehicle-actual and reasonable costs of repair and/or replacement of parts lost/damaged subject to depreciation as per limits specified.
 
(6)        तक्रारदारांच्‍या वाहनाची नोंदणी दि.09.02.2004 रोजी झालेली आहे व अपघात हा दि.06.07.2008 रोजी झालेला आहे. तसेच, सदरचे वाहन हे दुरुस्‍ती न करता त्रयस्‍थ व्‍यक्‍तीस विकलेले आहे. सदर वस्‍तुस्थितीचा विचार करता तसेच उपरोक्‍त उल्‍लेख केलेल्‍या पॉलीसीतील अटी व शर्ती यांचा विचार करता सर्व्‍हेअर यांनी त्‍या अनुषंगाने दिलेला सर्व्‍हे अहवाल यांचे अवलोकन केले असता सर्व्‍हेअर यांनी दिलेल्‍या अहवालामध्‍ये कुठेही अनियमितता दिसून येत नाही. सबब, सर्व्‍हेअर यांच्‍या अहवालानुसार सामनेवालाविमा कंपनीने तक्रारदारांना रक्‍कम रुपये 1,47,500/- मंजूरकेलेले आहेत. सदरची रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. याशिवाय उपरोक्‍त विवेचन विचारात घेता कोणतेही रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र नाहीत. त्‍यामुळे सामनेवाला यांच्‍या सेवेत त्रुटी झाली नसल्‍याचा निष्‍कर्ष हे मंच काढीत आहे. तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवादाचेवेळेस खालील पूर्वाधाराचा उल्‍लेख केलेला आहे. 
 
1.     II (2007) CPJ 193 (NC) - Ramesh Khaitan vs. National Insurance Co.Ltd.
 
2.     IV (2009) ACC 356 (SC) - New India Assurance Co.Ltd. vs. Pradeep Kumar.
 
(7)        पंरतु, तक्रारीच्‍या स्‍वरुपाचे अवलोकन केले असता सदरचे पूर्वाधार प्रस्‍तुत प्रकरणी लागू होत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना त्‍यांनी मंजूर केलेली रक्‍कम रुपये  1,47,500/- (रुपये एक लाख सत्‍तेचाळीस पाचशे फक्‍त) द्यावेत.
(3)   खर्चाबाबत आदेश नाहीत.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT