निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 28/06/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 07/07/2011
तक्रार निकाल दिनांकः- 12/04/2011
कालावधी 9 महिने 5 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या
सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
लक्ष्मीबाई भ्र.आश्रोबा उर्फ रामचंद्र नागरे अर्जदार
वय 25 वर्ष.धंदा. घरकाम. अड.ए.डी.खापरे.
रा.कौडगांव, ता.जिंतुर, जि.परभणी.
विरुध्द
1 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार.
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडिया.
मंडल कार्यालय, क्रं.2 अंबिका हाउस.
शंकर नगर चौक,नागपूर 400010
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
युनाइटेड इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायण,एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग
प्लॉट नं. 7 सेक्टर ई 1, टाउन सेंटर
सिडको,औरंगाबाद.
3 तालुका कृषी अधिकारी, स्वतः
तालुका कृषी कार्यालय, जिंतुर
ता.जिंतुर, जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेची नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे कौडगाव ता.जिंतुर, जि. परभणी येथील रहिवाशी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा अर्जदारचा मयत पती आश्रोबा उर्फ रामचंद्र नागरे हा देखील लाभार्थी होता तारीख 19/01/2010 रोजी अर्जदारच्या पतीचा वाहन अपघातात मृत्यू झाला औंढा नागनाथ पोलिस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पोस्टमार्टेमसाठी शव सरकारी दवाखान्यात पाठवले. अर्जदारने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेमफॉर्मसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिनांक 01/04/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सादर केली होती. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 ने क्लेम मंजुरीसाठी ही कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे पाठवली, परंतु क्लेम मंजुर करुन नुकसान भरपाई न देता पॉलिसीची मुदत संपल्यावर 90 दिवसांचे आत क्लेम सादर केला नाही या कारणावरुन तो नामंजूर केला. अशा रितीने सेवात्रुटी करुन नुकसान भरपाई देण्यापासून वंचित ठेवले आहे म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार क्र.1 कडुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी याखेरिज मानसिक त्रासापोटी रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 17 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने तारीख 03/09/2011 रोजी आपला लेखी जबाब (नि.18) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोष्टाव्दारे आपले लेखी म्हणणे मंचाकडे पाठविले होते ते दिनांक 06.08.2011 रोजी प्रकरणात नि.7 ला समाविष्ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी मंचाची नोटीस स्वीकारूनही नेमलेल्या तारखेस मंचापुढे हजर राहुन आपले लेखी म्हणणे प्रकरणात सादर न केल्यामुळे त्यांचे विरूध्द तारीख 02/03/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.18) तक्रार अर्जातून त्यांच्या विरुध्द केलेल्या विधानांचा इन्कार करुन प्रस्तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्द मुळीच चालणेस पात्र नाही त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही असे म्हंटलेले आहे. त्यांचे पुढे म्हणणे असे की, अर्जदारने पाठविलेल्या क्लेम कागदपञात डेथ सर्टीफिकेट, फेरुफार, वयाचा दाखला, ड्रायव्हीग लायसेन्स पाठविलेली नव्हती. ती पाठविण्याबाबत कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांना तारीख 03/11/2010 रोजी कळविले होते. त्यानंतर स्मरणपञे पाठवुन देखील कागदपञांची मुदतीत पुर्तता झाली नाही. सदरची कागदपञे 14.11.10 रोजी प्राप्त झाली. ती पॉलिसीची शेवटची मुदत संपल्यानंतर 90 दिवसाचे आत प्राप्त होणे आवश्यक होते. पॉलिसी कंडीशनप्रमाणे वरील मुदतीत कागदपञे न मिळाल्यामुळे पॉलिसी नियम अटीचे उल्लंघन केलें असल्यामुळे नियमाप्रमाणे गैरअर्जदारावर नुकसान भरपाई देण्याची मुळीच जबाबदारी येत नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराविरूध्द तक्रार अर्जामध्ये केलेली बाकीची सर्व विधाने साफ नाकारून तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार नं 1 चे शपथपत्र (नि.19) दाखल केले आहे आणि पुराव्यातील कागदपञात नि.22 लगत विमा पॉलिसीची छायाप्रत दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.7) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्रांची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत आश्रोबा उर्फ रामचंद्र दशरथ नागरे याच्या डेथक्लेमची कागदपत्रे तारीख 17/05/2010 रोजी प्राप्त झाली. त्यामध्ये काही अपुरी कागदपञे होती. त्याची पुर्तता करण्यासाठी अर्जदारास ता.03.11.10 रोजी पञ पाठविले होते. त्यानंतरही पुन्हा 06.12.10 रोजी स्मरणपञे पाठविली होती. परंतु मुदतीत न आल्यामुळे तसा शेरा मारून विमा कंपनीकडे अपु-या कागदपञासह क्लेम 21.12.10 रोजी पाठविला. त्यानंतर विमा कंपनीने 24.03.11 च्या पञाव्दारे अर्जदारास पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत कागदपञे न दिल्यामुळे क्लेम नाकारला असल्याचे कळविले होते. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबासोबत विमा कंपनीच्या तारीख 24.03.11 ची कॉपी व कागदपञ पुर्ततेसंबंधी अर्जदारास पाठवलेल्या पञाच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.
तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.खापरे आणि गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दोडिया यानी युक्तिवाद केला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्ये उत्तर
1 गैरअर्जदार 1 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या
शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई
मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? होय
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराचा मयत पती आश्रोबा उर्फ रामचंद्र दशरथ नागरे हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात नि.4 लगत सादर केलेल्या नि.4/8 वरील गट क्र.49 चा 7/12 उतारा, नि.4/10 वरील फेरफार उतारा, नि.4/11 वरील गाव न.नं.6-क चा उतारा, नि.4/9 वरील होल्डींग प्रमाणपञ या महसुल कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 19.01.2010 रोजी मयत आश्रोबा नागरे व त्याचा जोडीदार उध्दव नागरे मोटर सायकल क्र. एमएच 38/1422 वरून गावाकडुन औंढयाकडे येत असतांना दु.12.30 वाजता समोरून भरधाव येणारा टेम्पो क्र.एमएच 22/1149 च्या चालकाने मोटार सायकलला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात अर्जदाराचा पती मयत झाला होता ही वस्तुस्थिती पुराव्यात दाखल केलेल्या नि.4/13 वरील औंढा पोलिस स्टेशन अ.मृ.क्रमांक 05/10 मधील घटनास्थळ पंचनामा, नि.4/14 वरील मरणोत्तर पंचनामा, नि.4/12 वरील पी.एम.रिपोर्ट या पुराव्यातून शाबीत झाले आहे.
मयत आश्रोबा नागरे हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी ) विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे तारीख 01/04/2010 रोजी विमा क्लेमसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती. गैरअर्जदार क्रमांक 3 ने सर्व कागदपञांची जुळणी करून क्लेम मंजुरीसाठी गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे पाठविलेला होता ही अडमीटेड फॅक्ट आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी लेखी जबाबामध्ये असे नमुद केलें आहे की, गैरअर्जदार क्र.3 तर्फे पाठविलेल्या कागदपञात काही अपुरी कागदपञे असल्यामुळे त्याची पुर्तता करण्यासाठी अर्जदाराला कळविले होते परंतु मागणी केलेंल्या कागदपञांची पुर्तता पॉलिसीची शेवटची मुदत संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत न मिळाल्यामुळे अर्जदारकडुन पॉलिसी नियमांचे उल्लंगन झाल्यामुळे नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येत नसल्याने तारीख 24.03.11 च्या पञाव्दारे अर्जदाराचा क्लेम नामंजुर केला असल्याचे तिला कळविले होते. त्या क्लेम नामंजुर पञाची छायाप्रत अर्जदाराने पुराव्यात नि.4/1 वर दाखल केली आहे. परंतु याबाबतीत आमचे म्हणणे असे की, पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसात दाखल केला नाही म्हणून क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राह्य धरता येणार नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.
या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे. ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते. अर्जदाराचा क्लेम चुकीच्या पध्दतीने नाकारुन तीला मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केलेली असल्याचे स्पष्ट दिसते. गैरअर्जदार नं 3 यांनी मयत आश्रोबा नागरे याचा डेथक्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन त्याच्यावर अन्याय केलेला आहे व नुकसान भरपाई मिळणे पासून वंचित ठेवलेले आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार नं 1 यांनी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई
रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास द्यावी.
3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा.
4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या सदस्या अध्यक्ष