Maharashtra

Ahmednagar

CC/16/86

Ramesh Laxman Pise - Complainant(s)

Versus

Divisional Manager,Life Insurance Corporation of India,Pune Division - Opp.Party(s)

Sachin Ithape

12 Apr 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/86
( Date of Filing : 11 Mar 2016 )
 
1. Ramesh Laxman Pise
Shramsaphalya Niwas,Yasin Nagar,Karjat,Tal Karjat,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager,Life Insurance Corporation of India,Pune Division
Jivan Prakash,6/7,Vidyapeeth Road,Shivaji Nagar,Pune-411 005
Pune
Maharashtra
2. Branch Manager,Life Insurance Corporation of India
Branch-Shrigonda,Patwa Building,Ravivar Peth,Teli Galli,Shrigonda,Tal Shrigonda,
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Sachin Ithape, Advocate
For the Opp. Party: S.T.Joshi, Advocate
Dated : 12 Apr 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी विमा दाव्‍याची रक्‍कम न देऊन द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्‍हणून विमा दाव्‍याची रक्‍कम व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

     तक्रारदार हा मयत रेखा व्‍यंकोबा महेंद्रकर यांचा कायदेशीर पती आहे. मयत रेखा व्‍यंकोबा महेंद्रकर या रयत शिक्षण संस्‍थेमध्‍ये शिक्षिका म्‍हणुन कार्यरत होत्‍या. मयत रेखा व्‍यंकोबा महेंद्रकर हिने त्‍यांचे हयातीमध्‍ये सामनेवाला विमा कंपनीकडे खालील प्रमाणे विमा पॉलीसी घेतल्‍या होत्‍या.

अ.क्र.

पॉलीसी नंबर    

पॉलीसी घेतल्‍याचा दिनांक    

विमा रक्‍कम रुपये

1.

952938501

15.05.2000

25,000/-

2.

952970262

22.06.2002

20,000/-

3.

952727340

15.03.2004

30,000/-

4.

959608523

11.01.2011

2,50,000/-

5.

959616689

15.04.2011

1,25,000/-

त्‍यानुसार तक्रारकर्ता व सामनेवाला यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा देणार असा नातेसंबध निर्माण झाला आहे. तक्रारदार यांची पत्‍नी नोकरी निमित्‍त मौजे दासवडे ता.पाटोदा जि.बीड येथे कार्यरत असताना दिनांक 08.09.2011 रोजी अपघाताने विहीरीतले पाण्‍यात बुडून तिचे अपघाती निधन झाले. त्‍यानंतर त्‍यांचे मृत्‍यूची नोंद प्रथम खबरी अहवाल क्रमांक 33/2011 अन्‍वये दिनांक 08.09.2011 रोजी पाटोदा पोलीस स्‍टेशन येथे देण्‍यात आली. तक्रारदाराने कलम 1 मध्‍ये नमुद केलेल्‍या अनु.क्रमांक 1 व 2 या विमा पॉलीसीच्‍या रकमेची सामनेवाले यांचेकडे सर्व कागदपत्रे देऊन मागणी केली. सामनेवाला यांनी दिनांक 28.11.2011 रोजी तक्रारदार यांचे विमा क्‍लेम मंजुर केला. विमा दाव्‍याची देय रक्‍कम रुपये 61,725/- व 27,120/- ही एच.डी.एफ.सी. बँक शाखा अहमदनगर यांचा धनादेश क्रमांक 612777 व 612778 अन्‍वये तक्रारदारास अदा केली. त्‍यानंतर कलम 1 मध्‍ये नमुद केलेल्‍या अनु.क्रमांक 3 ते 5 या विमा पॉलीसी बाबत तक्रारदारास माहिती झाल्‍यानंतर दिनांक 07.12.2011 रोजी सदरच्‍या विमा पॉलीसी अंतर्गत होणा-या रकमेची मागणी संपुर्ण कागदपत्रासह सामनेवाला यांचेकडे दिनांक 31.03.2012 रोजी पत्र देवुन केली आहे. दिनांक 31.03.2012 रोजीचे पत्रान्‍वये सामनेवाला क्र.1 यांनी कलम 1 मध्‍ये नमुद असलेल्‍या अनु.क्रमांक 4 व 5 या पॉलीसीचे विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारदार हिचे मयत पत्‍नीस मागील 5 वर्षापासून रक्‍त शर्कराचा आजार झाला होता ही बाब सामनेवाले विमा कंपनीपासून लपवून ठेवली व विमा पॉलीसी घेतली. विमा पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार सदरच्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारदार यांना देता येणार नाही. त्‍यामुळे विमा दावा नामंजूर केला. दिनांक 18.07.2012 रोजी सामनेवाला यांनी कलम 1 मध्‍ये नमुद असलेल्‍या विमा पॉलीसीपैकी अनु.क्रमांक 3 या विमा पॉलीसीचा विमा दाव्‍याची रक्‍कम 28,746/- तक्रारदाराला दिलेली आहे. अशा प्रकारे एकुण 5 विमा पॉलीसीपैकी अनु.क्रमांक 1 ते 3 विमा पॉलीसीची रक्‍कम तक्रारदार यास प्राप्‍त झाली आहे. परंतु अनु.क्रमांक 4 व 5 या विमा पॉलीसीची रक्‍क्‍म सामनेवाला यांनी तक्रारदारास देण्‍यास नकार दिला आहे. सामनेवाला यांनी अनु.क्रमांक 1 ते 3 या विमा पॉलीसीच्‍या रक्‍कमा तक्रारदार यांना दिल्‍या, मात्र अनु.क्रमांक 4 व 5 या विमा पॉलीसीच्‍या रक्‍कमा तक्रारदाराला दिल्‍या नाहीत. त्‍यामुळे सदरची तक्रार तक्रारदार यांनी मंचासमक्ष दाखल करुन परीच्‍छेद क्र.7 प्रमाणे मागणी केली आहे.       

3.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी त्‍यांची लेखी कैफियत प्रकरणात दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये सामनेवाला नं.1 व 2 यांनी असे कथन केले की, तक्रारदार यांची मयत पत्‍नीच्‍या नावे तक्रारदाराने दाखल केलेल्‍या 5 पॉलीसी उतरविल्‍या होत्‍या ही बाब मान्‍य केलेली आहे. यापैकी 3 पॉलीसीच्‍या रकमा तक्रारदार यांना दिलेल्‍या आहेत असे कथन केलेले आहे. परंतु तक्रारीमध्‍ये सामनेवाला यांनी पॉलीसी क्र.959608523 ही पॉलीसी घेतल्‍याचा दिनांक 11.01.2011 रक्‍कम रु.2,50,000/- तसेच पॉलीसी क्रमांक ही 959616689 पॉलीसी घेतल्‍याचा दिनांक 15.04.2011 रक्‍कम रु.1,25,000/- ही तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचे नावे असून सदरच्‍या पॉलीसीबाबत तक्रारदाराने विमा दावा सामनेवाला यांचेकडे कागदपत्रे दाखल करुन रक्‍कम मागणी बाबत दावा दाखल केलेला आहे. परंतु सामनेवाला यांनी त्‍या पॉलीसीच्‍या रकमा देण्‍यास नकार दिला. व त्‍याचे कारण लेखी कैफियतीमध्‍ये नमुद केलेले आहे. सामनेवाला यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, संपुर्ण कागदपत्राचे अवलोकन करुन तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचा विहीरीत पाण्‍यात पडून मृत्‍यू झाला आहे. सदरचा मृत्‍यू हा अपघाती नसुन आत्‍महत्‍या या सदरात मोडतो. तसेच दुसरे कारण नमुद केलेले आहे की, तक्रारदार यांचे मयत पत्‍नीने पॉलीसी उतरविणेच्‍यावेळी त्‍यांना 5 वर्षापुर्वी पासून रक्‍त शर्करेचा आजार होता व पॉलीसी उतरवितांना ही बाब मयत पत्‍नीने लपवून ठेवलेली आहे. तसेच प्रपोजल फॉर्म भरतांनासुध्‍दा संपुर्ण कॉलममध्‍ये ही बाब नमुद केलेली नाही. अशा प्रकारे तक्रारदार यांचे मयत पत्‍नीस पॉलीसी उतरवितेवेळी त्‍यांना 5 वर्षा पुर्वी पासून रक्‍त शर्करेचा आजार होता ही बाब सामनेवाला यांचेपासून लपवून ठेवली असल्‍यामुळे सदरचा विमा दाव्‍याची रक्‍कम तक्रारदार यांना देता येणार नाही. अशा प्रकारे पॉलीसीचे अटी व शर्तीनुसार दोन विमा पॉलीसीच्‍या दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास सामनेवाला यांनी नकार दिला आहे. तसेच तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचा मृत्‍यू हा संशयास्‍पद असून तो आत्‍महत्‍या असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. पॉलीसीच्‍या अटी व शर्तीनुसार विमा दाव्‍याची रक्‍कम देता येणार नाही. सबब सामनेवाला नं.1 व 2 यांनी सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी मंचाला विनंती केली आहे.

4.   तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, शपथपत्र व तक्रारदार यांचे विद्वान वकील श्री.इथापे यांनी केलेला युक्‍तीवादाचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेला जबाब, कागदपत्रे, शपथपत्र व सामनेवाला नं.1 व 2 यांचे विद्वान वकील श्री.जोशी यांनी केलेला युक्‍तीवाद ऐकला. व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय.?                                                         

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय.?                                                         

 

... होय.

3.

तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे काय.?                                                         

 

... होय.

4.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

का र ण मि मां सा

5.   मुद्दा क्र.1 व 2 ः- तक्रारदार हा मयत रेखा व्‍यंकोबा महेंद्रकर हिचा कायदेशीर पती आहे. तक्रारदार यांची पत्‍नी मयत रेखा व्‍यंकोबा महेंद्रकर या रयत शिक्षण संस्‍थेमध्‍ये शिक्षिका म्‍हणुन कार्यरत असतांना तिने तक्रारीमध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे एकुण 5 विमा पॉलीसी उतरविल्‍या होत्‍या. व त्‍याबाबतच्‍या हप्‍त्‍याच्‍या रक्‍कम सामनेवाला यांचेकडे भरलेल्‍या आहेत ही बाब सामनेवाला यांनी अमान्‍य केलेली नाही. तक्रारदार यांनी विमा पॉलीसी उतविल्‍याबद्दलचे दस्‍त प्रकरणात दाखल केलेले आहेत. सदरील विमा पॉलीसीमध्‍ये तक्रारदार हा मयत रेखा व्‍यंकोबा महेंद्रकर हिचा पती असून ते सदर पॉलीसीमध्‍ये नॉमीनी म्‍हणून त्‍यांचे नांव नमुद केलेले आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे ही बाब दाखल कागदपत्रावरुन तक्रारदार यांनी सिध्‍द केलेले आहे. तसेच तक्रारदार यांची मयत पत्‍नीची विमा पॉलीसी उतरविल्‍यानंतर व तिचा दिनांक 08.09.2011 रोजी विहीरीत पडून मृत्‍यू झाला. त्‍यानंतर तिचे मृत्‍यूची नोंद प्रथम खबरी अहवाल क्रमांक 33/2011 अन्‍वये दिनाक 08.09.2011 रोजी पाटोदा पोलीस स्‍टेशन येथे नोंदविण्‍यात आली. याबाबतचे पोलीस स्‍टेशनचे दस्‍त प्रकरणात दाखल केलेले आहेत. यावरुन तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचा आकस्मिक मृत्‍यू झाला या बाबत स्‍पष्‍ट होते. तिचे मृत्‍यू पश्‍चात तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे विमा दाव्‍याची रक्‍कमेची मागणी केली. व सामनेवाला यांनी पॉलीसी क्र. 952938501, 952970262 व 952727340 या तीन पॉलीसीच्‍या रकमा तक्रारदार यांना सामनेवालाकडून प्राप्‍त झालेल्‍या आहेत, ही बाब वादातील नाही. मात्र तक्रारदार यांनी पॉलीसी क्र. 959608523 व   959616689 या दोन पॉलीसीच्‍या रकमेची मागणी केली आहे. परंतू सामनेवाला यांनी सदरच्‍या पॉलीसीच्‍या रकमा तक्रारदार यांना दिलेल्‍या नाही व त्‍यांचा विमा दावा तक्रारदार यांचे मयत पत्‍नीने पॉलीसी उतरवितेवेळी त्‍यांना 5 वर्षापुर्वीपासून रक्‍त शर्करेचा आजार होता ही बाब लपवून ठेवली आहे. त्‍याबाबतचे विमा पॉलीसीचे प्रपोजल फॉर्म सामनेवाला यांनी दाखल केले आहे, त्‍यामध्‍ये कुठेही तक्रारदाराचे पत्‍नीस 5 वर्षापुर्वीपासून रक्‍त शर्करेचा आजार होता असे नमुद नाही. सदरची बाब ही लपवून ठेवल्‍यामुळे तक्रारदार यांची मयत पत्‍नीचा विमा पॉलीसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केला आहे. त्‍यामुळे त्‍यांना विमा दावा देता येणार नाही असे कारण दिले आहे. तसेच त्‍यांचे कैफियतीमध्‍ये दुसरे असे कारण नमुद केले आहे की, तक्रारदार यांची मयत पत्‍नीचा मृत्‍यू हा विहीरीत बुडून झाला हे संशयास्‍पद आहे. तक्रारदार यांचे मयत पत्‍नीने विमा दावा दाखल केला असे सामनेवाला यांनी कथन केले. परंतू तक्रारदार यांनी दाखल असलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन केले असता, संपुर्ण कागदपत्रामध्‍ये तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचा विहीरीत पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला असा आकस्मिक मृत्‍यू झाला आहे. त्‍यांचे सामनेवालाने दिलेल्‍या जबाबातसुध्‍दा पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला ही बाब नमुद केलेली आहे. मात्र तसे कुठेही तक्रारदार यांचे मयत पत्‍नी आत्‍महत्‍या केली अशी नोंद नाही. सामनेवाला यांनी हा घेतलेला बचाव योग्‍य आहे किंवा नाही हे दर्शविण्‍यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे मंचासमक्ष सामनेवालाने घेतलेला बचाव अपु-या कागदोपत्री पुराव्‍यामुळे सिध्‍द होऊ शकले नाही. दाखल कागदपत्रावरुन तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचा आकस्मिक मृत्‍यू झाला ही बाब स्‍पष्‍ट झाली आहे. त्‍यामुळे सदरचा मृत्‍यू हा आत्‍महत्‍या आहे असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा दावा चुकीचे कारणामुळे नामंजुर केला. तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचा मृत्‍यू हा विहीरीत पाण्‍यात बुडून झाला आहे हे तिला असलेल्‍या रक्‍त शर्करेच्‍या आजारामुळे झालेला नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी घेतलेला बचाव विमा पॉलीसी उतरविताना 5 वर्षा पुर्वीपासून तक्रारदाराचे पत्‍नीला रक्‍त शर्करेचा आजार होता ही बाब लपवून ठेवली आहे हे संयुक्‍तीक नाही. तक्रारदार यांची मयत पत्‍नी ही रक्‍त शर्करेच्‍या आजाराने मयत झाली नसून विहीरीत पाण्‍यात बुडून मयत झालेली आहे. त्‍यामुळे सदरचा बचाव हा ग्राह्य धरता येणार नाही. अशा प्रकारे सामनेवाला यांनी विनाकारण तक्रारदाराचा विमा दावा नामंजुर केला. त्‍यामुळे त्‍यांनी निश्‍चीतच सेवेत त्रुटी केली आहे, ही बाब स्‍पष्‍ट होते. सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

6.   मुद्दा क्र.3 ः- तक्रारदार यांनी त्‍यांचे तक्रारीमध्‍ये ही बाब मान्‍य केली आहे की, तक्रारदार हे नमुद असलेल्‍या 3 पॉलीसीची रक्‍कम तक्रारदार यांना प्राप्‍त झालेली आहे. मात्र त्‍यांचे नंतरचे दोन पॉलीसीच्‍या रकमा तक्रारदार यांना प्राप्‍त झालेल्‍या नाहीत. त्‍यामुळे सामनेवालाकडे तक्रारदार यांनी मागणी केली. परंतु त्‍यांचे संयुक्‍तीक कारण न देता विमा दावा सामनेवाला यांनी नामंजूर केला. तक्रारदार यांचे कथन की, त्‍यांचे पत्‍नीचा मृत्‍यू हा आकस्क्ति मृत्‍यू झाला आहे ही बाब स्‍पष्‍ट करण्‍यासाठी तक्रारदार यांनी पोलीस पेपर दाखल केलेले आहेत. यावरुन मृत्‍यूचे कारण मंचासमक्ष सिध्‍द झालेले आहे. तक्रारदार यांचे मयत पत्‍नीने विमा पॉलीसी उतरवित्‍या होत्‍या ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. सबब सामनेवाला यांनी विमा पॉलीसीची मिळणारी रक्‍कम ही तक्रारदार हा मयत पत्‍नीचा नॉमीनी असल्‍याची नोंद पॉलीसी पेपरमध्‍ये असल्‍यामुळे तक्रारदार यांना पॉलीसीची रक्‍कम देणे आवश्‍यक आहे. तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचा मृत्‍यू हा पाण्‍यात बुडून झालेला आहे. सामनेवाला यांनी घेतलेला बचाव हा आत्‍महत्‍या केलेली आहे ही बाब सिध्‍द करणारे दस्‍तावेज दाखल केलेले नाही. तसेच पुढे असा बचाव घेतला आहे की, तक्रारदार यांचे मयत पत्‍नीस रक्‍त शर्करेचा आजार पॉलीसी उतरवितेवेळी 5 वर्षापुर्वी पासून होता ही बाब लपवून ठेवली. तक्रारदार यांचे मयत पत्‍नीचा मृत्‍यू हा रक्‍त शर्करा या आजारामुळे झाला नसल्‍याने सदरचा बचाव ग्राह्य धरता येणार नाही. तक्रारदार हा पॉलीसीच्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे. तक्रारदार यांनी मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचा न्‍याय निवाडा प्रकरणात दाखल केला आहे.

2009 (2) CPR 44. Himachal Pradesh State Consumer Disputes Redressal Commission, Shimla.

Life Insurance Corporation of India and Another V/s. Kanta devi. Appeal No.367 of 2007 Decided on 01.01.2009 या न्‍याय निवाडयात खालील बाबी निर्देशित केलेल्‍या आहेत.

Consumer Protection Act, 1986- Sections 12 and 17- Claim under life insurance policy-Appellant had repudiated and resisted claim on plea that insured was suffering from cancer and died as result thereof and fact was suppressed in proposal-Onus was on appellant to have placed acceptable and legal evidence in support of their plea-Confidential Claim Enquiry report relied by appellant showed that deceased at best could be said to be suffering from some throat infection-Whether it was cancerous or not, there was no material on record-Complaint allegations were that insured died due to fall and he died on the way to hospital-No nexus between cause of death and alleged disease of cancer-District Forum was right in allowing claim under policy.

          सदरचा न्‍याय निवाडा तक्रारदाराचे तक्रारीतील कथनाशी व त्‍यातील निर्णीत बाबी या सदरच्‍या तक्रारीशी लागू पडतो. सदरचा न्‍याय निर्णयाचा विचार करता व तक्रारदाराने दाखल केलेली कागदपत्रे व योग्‍य त्‍या पुराव्‍यावरुन सदरची तक्रार ही अंशतः मंजुर करण्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. सबब मुद्दा क्र.3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   तक्रारदार यांना त्यांचा विमा दावा हा विनाकारण सामनेवाला यांनी नामंजुर केला व तक्रारदाराला मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्‍यामुळे तक्रारदार यांना निश्‍चीतच शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. सबब त्‍यांना शारीरीक, मानसिक व आर्थिक खर्चापोटी काही रक्‍कम व तक्रारदार दाखल केल्‍यामुळे तक्रारीचे खर्चापोटी काही रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 

8.   मुद्दा क्र.4   मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.4 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ  दे  श -

1)   तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

2)   सामनेवाला नं.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास विमा पॉलीसी क्रमांक 959608523 ची रक्‍कम रु.2,50,000/- [रक्‍कम रुपये दोन लाख पन्‍नास हजार फक्‍त] व त्‍यावर तक्रारदाराने पॉलीसी घेतलेचा दिनांक 11.01.2011 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने संपुर्ण रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज द्यावे. 

3)   सामनेवाला नं.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास विमा पॉलीसी क्रमांक 959616689 ची रक्‍कम रु.1,25,000/- [रक्‍कम रुपये एक लाख पंच्‍चवीस हजार फक्‍त] व त्‍यावर तक्रारदाराने पॉलीसी घेतलेचा दिनांक 15.04.2011 पासून द.सा.द.शे.8 टक्‍के दराने संपुर्ण रक्‍कम फिटेपावेतो व्‍याज द्यावे.  

4)   सामनेवाला नं.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- [रक्‍कम रुपये दहा हजार फक्‍त] व या तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.5,000/- [रक्‍कम रुपये पाच हजार फक्‍त] तक्रारदार यास द्यावा.

5) वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या या आदेशापासून 30 दिवसाचे आत करावी.

6)   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क द्यावी.

7)   या प्रकरणाची  “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदारास परत दयावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.