Maharashtra

Beed

CC/11/24

Seetabai Shrirang Jadhav - Complainant(s)

Versus

Divisional Manager,Life Insurance Corporation Of India - Opp.Party(s)

13 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/24
 
1. Seetabai Shrirang Jadhav
TPS Colony Parali Vaijanath
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager,Life Insurance Corporation Of India
Adalat Road Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. P. B. Bhat PRESIDENT
 HON'ABLE MR. A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक 24/2011                         तक्रार दाखल तारीख –03/11/2011
                                         निकाल तारीख     – 13/03/2012    
श्रीमती सिताबाई भ्र. श्रीरंग जाधव
वय 46 वर्षे धंदा घरकाम                                         .तक्रारदार
रा.एफ-40/477 टि.पी.एस.कॉलनी,परळी(वै.) जि.बीड
                            विरुध्‍द
1.     भारतीय आयुर्विमा महामंडळ
मार्फत डिव्‍हीजनल मॅनेजर,
एल.आय.सी.ऑफ इंडिया, योगक्षेम,
अदालत रोड, औरंगाबाद                                  सामनेवाला
2.    भारतीय आयुर्विमा महामंडळ,
      मार्फत शाखाधिकारी, एल.आय.सी. कार्यालय,
      शाखा अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड         
 
              को र म - पी.बी.भट, अध्‍यक्ष
                         अजय भोसरेकर, सदस्‍य.
 
                                तक्रारदारातर्फे                 :- अँड.एम.आर.गर्जे
                                सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे       :- अँड.ए.पी.कूलकर्णी 
 
                                          निकालपत्र
 
            तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
            तक्रारदाराच्‍या पतीने सामनेवाला विमा कंपनीकडून विमा पत्र 982171489 चा विमा कालावधी दि.28.7.2004 ते 28.7.2009 ची हमी रक्‍कम रु.60,000/- चा कूटूंबाचे संरक्षणार्थ घेतलेले आहे.
            तक्रारदाराचे पती श्री.श्रीरंग गुणाजी जाधव   हे दि.3.2.2006रोजी वाहनावरुन जात असताना अचानक लूना स्लिप झाल्‍याने जोराचा मार लागल्‍यामुळे त्‍यांना शासकीय रुग्‍णालय परळी येथे भरती करण्‍यात आले.सदरचे वैद्यकीय उपचार करुनही प्रकृतीत फरक न पडल्‍याने वैद्यकीय अधिका-याचे सूचनेनुसार लातूर येथील अपेक्‍स रुग्‍णालय येथे भरती करण्‍यात आले. शेवटी दि.9.2.2006 रोजी ते मयत झाले. त्‍या मृत्‍यूची आकस्‍मीक व अपघात मृत्‍यूची‍ फिर्याद तक्रारदाराचे वतीने पोलिस स्‍टेशन परळी वैजनाथ येथे देण्‍यात आली. त्‍यांचे शवविच्‍छेदन करण्‍यात आले.
            सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या पतीची आकस्‍मीक मृत्‍यूची बातमी तात्‍काळ देण्‍यात आली.नियमानुसार सामनेवालाकडे प्रस्‍ताव अर्ज आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह दाखल करण्‍यात आले. त्‍यानंतर सामनेवाला यांनी विमा रक्‍कम लाभासहीत त्‍यांचे प्रधान कार्यालयाची परवानगी आल्‍यानंतर देण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले. सामनेवाला यांचे अधिकृत प्रतिनिधीने तक्रारदाराच्‍या मृत्‍यूची माहीती संबंधीत पोलिस ठाणे वैद्यकीय अधिकारी व इतर कागदपत्रे पूर्ण शहानिशा केली. चौकशी अंती तक्रारदाराच्‍या पतीचा अपघाताने मृत्‍यू झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.
            सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करण्‍यास सूरुवात केली. तिची परिस्थिती हलाखीची होऊन बिकट स्थिती निर्माण होऊन जीवन परावलंबी झाले. अशा परिस्थितीत सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्‍य सेवा देणे आवश्‍यक होते. परंतु तिला काही खुलासा न झाल्‍याने शेवटी माहीती अधिकार कायदयाने सामनेवालाकडे तक्रार अर्ज दाखल करुन माहीती विचारली असता सामनेवाला यांनीदि.16.2.2009 रोजी अर्जाची दखल घेऊन दि.14.11.2006 व 9.3.2007 रोजीचे पत्रान्‍वये खुलासा देऊन तकारदाराचे पतीने विमा प्रस्‍ताव व त्‍यांचे आजाराची माहीती लपवून ठेवल्‍याचे बेकायदेशीर कारणे दर्शवून विमा कराराची रक्‍कम देण्‍यास असमर्थता दर्शवून तक्रारदाराचा विमा मागण्‍याचा हक्‍क नाकारला. सदरची बाब सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.16.2.2009 रोजी दिलेल्‍या पत्रावरुन माहीती झाली. त्‍यामुळे तक्रार मूदतीत आहे.तरी देखील तांत्रिक मूददा उपस्थित होऊ नये म्‍हणून विलंब माफीचा अर्ज तक्रारी सोबत दाखल केला होता. सामनेवाला यांनी दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला.
            विनंती की,सामनेवाला यांनी विमा करारान्‍वये रक्‍कम रु.60,000/- व त्‍यावरील सर्व लाभाची रक्‍कम तक्रारदारांना द.सा.द.शे 18 टक्‍के व्‍याजासह देण्‍या बाबत आदेश व्‍हावेत. मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.50,000/-देण्‍या बाबत आदेश व्‍हावेत. सोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केला आहे.
            सामनेवाला यांनी त्‍यांचा खुलासा दि.21.5.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्‍यांनी नाकारलेले आहेत. तक्रार मूदतीत नाही.मयत विमेदार हे त्‍यांचे हयातीत एम.एस.ई.बी. खात्‍यात नौकरीला होते. त्‍यांनी वैद्यकीय रजा ब-याच घेतलेल्‍या आहेत. मयत विमेदार यांनी वैद्यकीय कारणास्‍तव दि.29.7.2004 ते 28.8.2004 अशी एकूण27 दिवस रजा घेतली आहे. ते Chronic Pharagitis   आजाराने आजारी होते. त्‍या बाबतचे डॉ.विवेक दांडे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत दाखल केले आहे. 
 
            तसेच मयत विमेदार वैद्यकीय कारणास्‍तव दि.2.6.2004 ते 11.6.2004 पर्यत Chronic Pharagitis    आजाराने आजारी होंते.त्‍या बाबत डॉक्‍टरचे प्रमाणपत्र दि.12.4.2006 रोजीचे अर्जासोबत त्‍यांनी दिलेले आहे.
 
            मयत विमेदार यांनी वरील आजाराची महत्‍वाची बाब दि.22.3.2004 रोजीच्‍या प्रस्‍ताव अर्जात उघड केलेली नाही. तसेच सदर अर्जा खाली त्‍यांनी खोटे घोषणापत्र दिलेले आहे. प्रस्‍तूत अर्जात त्‍याचे प्रकृती बाबत खोटी माहीती दिलेली आहे. सदरची बाब विमा पत्रातील शर्ती व अटीचा भंग करणारी आहे. त्‍यामुळे सामनेवाला यांनी त्‍यांचा दावा नाकारला आहे. तकार खर्चासह रदद करण्‍यात यावी.
            तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र,तक्रारदाराची लेखी यूक्‍तीवादाचे संदर्भात पूरशीस, सामनेवाला यांचा खुलासा,सामनेवाला यांचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
            सामनेवाला  यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्‍तीवाद ऐकला.
            तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता विमा कंपनीने तक्रारदाराचा दावा हा 2007 सालीच नाकारला आहे. तक्रारदारानी सदरची तक्रार 2011 साली दाखल केलेली आहे. या संदर्भात तक्रारदाराना झालेल्‍या विलंबाच्‍या बाबत तक्रारदारांनी सामनेवालाकडे माहीतीचा अधिकारात अर्ज दिला व त्‍यांचे उत्‍तर दि.16.2.2009 रोजी विमा कंपनीने उत्‍तर दिले.त्‍यावरुन तक्रारदाराने दावा नाकारल्‍याची बाब समजली व त्‍यामुळे दोन वर्षाचे मूदतीत तक्रार दाखल करत आहे. संबंधीत तक्रारदाराने विलंब माफीचा अर्ज दिलेला आहे व त्‍यात त्‍यांनी तक्रारदार अशिक्षीत व अडाणी आहे व तिला कायदयाचे ज्ञान नाही. त्‍यामुळे तक्रार मूदतीत दाखल करु शकले नाही म्‍हणून झालेला विलंब माफ करण्‍याची विनंती तक्रारदारानी केलेली आहे.
            या संदर्भात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दि.16.2.2009 रोजीचे पत्रासोबत दि.14.11.2006 आणि दि.9.3.2007 या दोन पत्राचीच प्रति दिल्‍याच्‍या सदर पत्रावरुन स्‍पष्‍ट होते परंतु तत्‍पूर्वी विमा कंपनीने दावा नाकारल्‍याची बाब तक्रारदारांना कळविल्‍याचे व सदरचे पत्र तक्रारदारांना मिळाल्‍या बाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदाराचे म्‍हणणे विलंबाचे संदर्भात ग्राहय धरणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.  त्‍यामुळे तक्रारदारास झालेला विलंबा हा सामाजिक न्‍यायाचे दृष्‍टीने व नैसर्गिक न्‍यायाचे दृष्‍टीने माफ करणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.
            विमेदार त्‍यांचे हयातीत एम.एस.ई.बी. खात्‍यात नौकरीत होता. त्‍यांनी त्‍यांचे नौकरीचे काळात संबंधीत खात्‍याकडे वैद्यकीय रजे बाबत अर्ज दिलेला होता व त्‍यासोबत वैद्यकीय डॉक्‍टराचा दाखला दाखल केलेला आहे. त्‍यांचे कागदपत्रे विमा कंपनीने दाखल केलेले आहेत परंतु या संदर्भात संबंधीत डॉक्‍टर, प्रमाणपत्र देणारे डॉक्‍टर किंवा म.रा.विज मंडळाचा अर्जीतरजेचे संदर्भातील संबंधीत अधिकारी यांचे कोणतेही शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेले नाही. त्‍यामुळे विमेदाराने त्‍यांचे प्रकृतीचे संदर्भात प्रस्‍तूत अर्जात खुलासा नमूद केल्‍याप्रमाणे महत्‍वाची माहीती उघड केली नाही ही बाब स्‍पष्‍ट होत नाही असे न्‍यायमंचाचे मत आहे.
 
            या संदर्भात विमेदाराचा मृत्‍यूहा लूना स्लिप झाल्‍याने पडून अपघाताने झालेला आहे. प्रस्‍तूत अर्जात त्‍यांचे आजारा संबंधीची माहीती उघड न केल्‍याचा व त्‍या कारणाने विमेदाराचा मृत्‍यू होणे यांचे निश्चितपणे परस्‍पर संबंध येऊ शकतो परंतु प्रस्‍तूत तक्रारीत तथाकथीत वैद्यकीय रजेच्‍या संदर्भात दिलेल्‍या आजाराने सदर विमेदाराचा मृत्‍यू झालेला नाही व तो अपघाताने झालेला आहे. त्‍यामुळे सदरची माहीती मृत्‍यूचे कारण यात परस्‍पर संबंध नाही असे न्‍यायमंचाचे मत आहे.
            या संदर्भात सामनेवाला यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍याचे पूष्‍टयर्थ खालील न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.
2006 ACJ 1276
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
FA No. 99 of 1999
Life Insurance Corporation of India and another Vs Maya
 
            Insurance Act,1938—Life insurance—Fraudulent suppression of material facts—Repudiation of claim—Assured was suffering from kidney stones and had taken treatment for 4/5 months about a year prior to his death—Assured gave false information while filing in proposal form and died of ischaemic heart disease associated with renal failure within 3 months of obtaining the policy—L.I.C. repudiated the claim—Whether deceased was guilty of giving incorrect and false information in respect of material aspects of his health and the disease he was suffering from which resulted in his death and L.I.C. was justified in repudiating the claim—Held:yes.
सदर न्‍यायनिर्णयाचे सखोल वाचन केले असता सदरचा निर्णय हा सामनेवाला यांचे समर्थनार्थ लागू होत नाही असे न्‍यायमंचाचे मत आहे.
            महत्‍वाची बाब लपवून ठेवल्‍याची बाब स्‍पष्‍ट न झाल्‍याने सामनेवाला यांनी योग्‍य त-हेने विमा दावा नाकारला असे म्‍हणता येणार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदाराना दयावयाचे सेवेत कसूर केल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना मयत विमेदार श्रीरंग जाधव यांचे विमा पत्रातील विमा नियमानुसार देय असणारी सर्व रक्‍कम लाभासहीत तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.
             सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट झाल्‍याने सामनेवाला   यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्‍कम रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम रु.5,000/- देणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.     
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
                             आदेश
 1.          तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2.          सामनेवाला   यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना मयत   
              विमेदार श्रीरंग जाधव  यांचे विमा पत्राची सर्व लाभासहीत विमा
              नियमा प्रमाणे देय रक्‍कम आदेश मिळाल्‍यापासून  एक महिन्‍याचे  
              आंत अदा करावी.
3.          सामनेवाला  यांना आदेश देण्‍यात येतो की,वरील रक्‍कम मूदतीत  
                       न दिल्‍यास वरील रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज तक्रार  
                       दाखल दि.31.01.2011 पासून देण्‍यास सामनेवाला  जबाबदार
             राहतील.
4.         सामनेवाला यांना आदेश देण्‍यात येतो की, मानसिक त्रासाची  
            रक्‍कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चाची
            रककम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्‍त) आदेश प्राप्‍तीपासून
           30 दिवसांचे आंत अदा करावी.
5.         ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20     
           (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
(अजय भोसरेकर)     (पी.बी.भट)
सदस्‍य          अध्‍यक्ष
                                                                                                                                                                                                                                               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
 
 
[HON'ABLE MR. P. B. Bhat]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.