Maharashtra

Jalna

CC/106/2011

Smt.Anjana Maruti More - Complainant(s)

Versus

Divisional Manager,Cabal Insurance Broking Service Pvt.Ltd - Opp.Party(s)

R.V.Jadhav

25 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/106/2011
 
1. Smt.Anjana Maruti More
R/O- Ramnager(Karkhana),Tq-Jalna
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager,Cabal Insurance Broking Service Pvt.Ltd
Shop No.1,Disha Alankar Complex,Town Center,Cidco,Aurangabad.
Aurangabad
Maharashtra
2. Branch Manager,Reliance General Insurance Co.Ltd
19,Reliance Center,Walchand Hirachand Marg,Belar Estate,Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Mr. D. S. Deshmukh PRESIDENT
 HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe MEMBER
 HONABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:R.V.Jadhav, Advocate for the Complainant 1
 
अड.पी.एम.परिहार
......for the Opp. Party
ORDER

 

 (घोषित दि. 25.01.2012 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया सदस्‍या)
 
अर्जदाराच्‍या तक्रारी नुसार त्‍यांच्‍या पतीचा दिनांक 25.11.2007 रोजी वाहन अपघातात मृत्‍यू झाला. सदरील घटनेची नोंद जालना पोलीस स्‍टेशन मध्‍ये करण्‍यात आली. अर्जदाराचे पती शेतकरी असल्‍यामुळे त्‍यांनी महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेद्वारे विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी दिनांक 22.02.2008 रोजी प्रस्‍ताव पाठवला व प्रस्‍तावा सोबत शेतकरी असल्‍याचा पुरावा म्‍हणून सर्व कागदपत्रे पाठविली. गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 23.06.2010 रोजी कागदपत्र अपूर्ण असल्‍याचे पत्र दिले. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी सर्व कागदपत्रे दिली असून अद्यापही विमा रक्‍कम मिळालेली नाही. अर्जदाराने विमा रकमेची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेल्‍या जवाबानुसार त्‍यांना अर्जदाराचा प्रस्‍ताव दिनांक 04.08.2008 रोजी मिळाला असून सदरील प्रस्‍तावामध्‍ये तलाठी, तहसीदाराचे मूळ कागदपत्र, 6 क चा उतारा, मृत्‍यू प्रमाणपत्र, वयाचा दाखला, पोस्‍ट मार्टम रिपोर्टची प्रमाणित प्रत, पोलीसांनी प्रमाणित केलेला वैद्यकीय अहवाल इत्‍यादी कागदपत्रे नसल्‍यामुळे त्‍यांना दिनांक 15.08.2008, 18.11.2008 व 20.03.2009 रोजी स्‍मरणपत्रे पाठविली व नंतर दिनांक 21.03.2009 रोजी विमा कंपनीस अपूर्ण प्रस्‍ताव पाठवून दिला. विमा कंपनीने दिनांक 24.11.2010 रोजी अपूर्ण कागदपत्र या कारणावरुन प्रस्‍ताव नामंजूर केला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्‍या जवाबानुसार अर्जदाराने प्रस्‍तावा सोबत अपूर्ण कागदपत्रे पाठविली. प्रस्‍तावा सोबत संपूर्ण कागदपत्रे असल्‍याशिवाय प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात येत नाही. अर्जदाराने तलाठी, तहसीलदाराची मूळ कागदपत्रे, 6 क चा उतारा, मृत्‍यू प्रमाणपत्र इत्‍यादी कागदपत्रे पाठविली नसल्‍यामूळे दिनांक 24.01.2010 रोजी त्‍यांचा प्रस्‍ताव नामंजूर करण्‍यात आला.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे आढळून येते की, अर्जदाराचा मृत्‍यू दिनांक 25.11.2007 रोजी वाहन अपघतात झाला आहे. अर्जदाराने पी.एम.रिपोर्ट, घटनास्‍थळ पंचनामा इत्‍यादी कागदपत्रे तक्रारी सोबत दाखल केली आहेत. अर्जदाराने दिनांक 22.02.2008 रोजी गैरअर्जदार यांच्‍याकडे विमा प्रस्‍ताव पाठविला असता अपूर्ण कागदपत्र असल्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास तलाठी, तहसीलदाराचे मूळ कागदपत्र, 6 क चा उतारा, मृत्‍यू प्रमाणपत्र, वयाचा दाखला, पोस्‍ट मार्टम रिपोर्टची प्रमाणित प्रत इत्‍यादी कागदपत्रे पाठविण्‍या संबंधी अर्जदारास कळविले आहे. अर्जदाराने सदरील कागदपत्रे पाठविले असल्‍यामुळे त्‍यांचा प्रस्‍ताव नामंजूर झाल्‍याचे गैरअर्जदार यांनी म्‍हटले आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे निरीक्षण केल्‍यावर ते योग्‍य व नियमाप्रमाणे असल्‍याचे दिसून येते.
अर्जदार विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
 
आदेश
 
  1. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास 30 दिवसात 1,00,000/- रुपये (रुपये एक लाख फक्‍त) विमा रक्‍कम द्यावी.
  2. खर्चा बद्दल आदेश नाही.
 
 
[HONORABLE Mr. D. S. Deshmukh]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe]
MEMBER
 
[HONABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.