Maharashtra

Thane

CC/08/577

Smt. Shalan Tanaji Shirsagar - Complainant(s)

Versus

Divisional Manager, - Opp.Party(s)

27 Jun 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/08/577
 
1. Smt. Shalan Tanaji Shirsagar
At Post Kalher, Room No. 4, Ghar No. 186, Tal. Bhiwandi, Dist. Thane.
Thane.
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager,
The New India Assurance Co. Ltd., Mumbai Division, D.O. 110800/615, Shri. Pant Bhavan, Chowpatty, Mumbai - 400 007.
Mumbai.
Maharastra
2. For Service Summons - The New India Assurance Co. Ltd.
Shivkrupa Building, Naupada, Gokhale Road, Thane.
Thane
Maharastra
3. Pancard Club Ltd.,
111/113, Kalinadas Udyog Bhavan, Near Century Bazar, Prabhadevi, Mumbai - 400 025.
Mumbai.
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.B. SOMANI PRESIDENT
  HON'BLE MRS. JYOTI IYER MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

द्वारा श्री.आर.बी.सोमानी - मा. अध्‍यक्ष

1.       प्रस्‍तुत दाखल होण्याचा ओघ जास्‍त आहे तसेच दैनिक बोर्डावर जास्‍त प्रकरणे असतात त्‍यामुळे लेखी जबाब दाखल झाल्याचे तीन महिनेचे आत प्रकरण निकाली काढले जाऊ शकलेले नाही. तसेच दैनिक बोर्डावर जास्‍त प्रकरणामुळे आदेशासाठी बंद केलेल्या प्रकरणात दिलेल्‍या तारखेला नि‍काल देऊ शकलेलो नाही.

2.        तक्रारदार मयत तानाजी शिवाजी श्रीसागर याची पत्‍नी शालन यांनी प्रस्‍तुत तक्रार सामनेवाले नं. 1 विमा कंपनी तसेच पॉनकार्ड क्‍लब यांचे विरुध्‍द दाखल केली असुन त्‍यांचे कथन

 

असे की, दि.24/04/2008 रोजी सकाळी 10.45 वाजताचे सुमारास तानाजी ऑटो क्र.MH04CG 1990 च्या ड्रायव्ह‍िंग सिटवर जबरदस्‍त हार्ट अटॅक आल्‍याने उरण येथे तीचे पती मरण पावला. सदर ऑटो तो चालवित होता. मयताने रु.1,000/- भरुन सामनेवाले नं. 2 कडे सदस्‍यता घेतली. सामनेवाले नं. 2 यांनी नं. 1 मार्फत पॉलीसी क्र.010800/42/07/03/00001010 असा वैयक्‍ति‍क अपघात विमा रु.50,000/- चा काढला.

3.        मयताचा विमा घटनेच्‍या तारखेला अस्‍तीत्‍वात होता. तक्रारदार मयताची पत्‍नी असुन सामनेवाल्याची ग्राहक आहे आणि तक्रार दाखल करण्‍यास सक्षम आहे. उरण पोलीस स्‍टेशन 174 सि.आर.पी.सी अंतर्गत मर्ग दाखल केला. सामनेवाले विमा कंपनीकडे दि.30/09/2008 ला क्‍लेम दाखल केले असता कोणतेही उत्‍तर आले नाही. अशा प्रकारे उत्‍तर देण्‍याचे टाळुल दोषपुर्ण सेवा दिलेली आहे. मयत हा एकटा कमवणारा होता म्हणुन मागणीनुसार नुकसान भरपाई .सा..शे 12% व्‍याज आणि मानसिक त्रासापोटी रु.50,000/- तक्रारीचा खर्चापोटी रु.10,000/- मिळावी अशी तक्रारदाराची प्रतिज्ञालेखासह दाखल केले तसेच यादी निशाणी 3 सोबत पॉनकार्ड क्‍लबची सदस्‍यता कार्ड, मृत्‍यु दाखला, रेशन कार्ड, पोलीस रिपोर्ट, पी. एम रिपोर्ट, क्‍लेम दाखल केल्‍याबद्दल पोच व इतर दस्‍तऐवज दाखल आहेत.

4.       सामनेवाले यांना तत्‍कालीन मंचाने कुरीयर मार्फत नोटिस काढली  परंतु सामनेवाले नं. 1 हजर झाले नाही, म्‍हणुन त्‍याचे विरुध्‍द प्रकरण विना लेखी जबाब चालवण्‍यात येणार आहे. निशाणी 1 वर दि.11/02/2009 ला आदेश पारीत केलेले आहे. सामनेवाले नं. 2 ने हजर होऊन त्‍याचे आक्षेप नोंदविले मंचाचे रेकॉर्डनुसार सामनेवाले नं. 2 ने आपले लेखी जबाब दाखल केलेले आहे. तक्रारदाराचे संपुर्ण आक्षेप फेटाळले व नमुद केले की तक्रारदार सामनेवालेंचे ग्राहक नाही आणि

या मंचाच्‍या कार्यक्षेत्रात प्रस्‍तुत तक्रार चालु शकते कारण तसा करार होता. पॉलीसी सदस्‍यत्‍वतः दाखल्‍यास नाव टाकल्‍याने पॉलीसी निर्गमित केल्‍याचे सिध्‍द होत नाही. म्‍हणुन विम्याचा फायदा मिळु शकत नाही. आर्बिट्रेशन कलम असल्‍याने सदर करार आर्बिटेटर कडे पाठवावा.

 

5.       विम्याची सोय कोणतीही अतिरिक्‍त रक्‍कम न घेता पुरविलेली आहे. विमा हा दि.18/05/2008 पासुन सुरू होणे होते आणि प्रकरणातील तक्रारदाराचा पती यांस दि.12/04/2008 रोजी कळालेली आहे. म्‍हणजेच घटनेच्‍या तारखेला सामनेवालेकडे मयताची विमा पॉलीसी नव्‍हती. मयताच्‍या मृत्‍यु दावा मिळणेस तक्रारदार पात्र नाही. सामनेवालेंनी लेखी जबाबासोबत मयताने भरुन दिलेला फॉर्म व इतर निवाडे दाखल कलेले आहे.

6.       तक्रारदार हिने निशाणी 9 वर आपले प्रतिज्ञालेख दाखल करुन सामनेवाले कथनाचा विरोध केलेला आहे. दि.12/04/2008 सदस्‍यता घेतली होती त्‍या दिवसापासुनच विमा लागु होतो तसेच पुढे नमुद केले की, या मंचाचे कार्यक्षेत्रात सामनेवाले नं.1 ची शाखा आहे म्‍हणुन प्रस्‍तुत तक्रार या मंचात चालू शकते. सामनेवाले यांनी कोणतेही दस्‍तऐवज दाखल केलेला नाही. प्रस्‍तुत प्रकरण हे आबिट्रेशन क्‍लॉज असेल तरी या मंचासमक्ष चालू शकते. पॉलीसी ही कवरनोट जारी झाल्‍यापासुन सुरु होतो पॉलीसी निर्गमित झाल्‍यापासुन नाही. म्‍हणुन मयताचा विमा घटनेच्‍य तारखेला आहे व म्‍हणुन तक्रारदार रक्‍कम मिळणेस पात्र आहे. तसेच सामनेवाले यांनी रु.900/- मेंबरशिप फी पोटी रु.100 कार्यालय खर्चाकरिता आहे.

         निशाणी 8 वर सामनेवाले नं. 2 ने प्रस्‍तुत तक्रार खारीज करावी असा अर्ज केला त्‍यावर तक्रारदाराने आक्षेप घेतला सदर अर्ज अंतिम निकालासोबत निकाली काढण्‍यात येतो.

7.       उभय पक्षांचे शपथेवरील कथन व लेखी कथन, दाखल दस्‍तऐवज यांचे सुक्ष्‍म वाचन केल्यानंतर व निवाडयांचे वाचन केल्‍यानंतर आणि उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकल्‍या नंतर मंचाद्वारे तक्रार निर्णयांवित करण्‍याकरिता खालील मुद्दे काढण्‍यात आले.

मुद्दे-

1 तक्रारदार ही सामनेवाला यांची ग्राहक आहे काय?

2 मयताचा अपघाती मृत्‍यु झाला आहे काय? किंवा तक्रारदारही मयताच्‍या वैयक्तिक

 

 विमा अपघात विमा अंतर्गत क्‍लेम मिळण्‍यास पात्र आहे काय ?

3 वर्कमेंट कॉम्‍पेन्‍सेशन अॅक्‍ट अंतर्गत दाव्‍याची बाधा या प्रकरणास येते काय ?

4 सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम वेळेत निकाली न काढून दोषपुर्ण सेवा दिलेली

  आहे काय ?

5- अंतिम आदेश काय आहे ?                       शेवटी दिल्‍याप्रमाणे

कारणे व निष्‍कर्ष -

8.       मुददा क्र.1- तक्रारदार यांनी सामनेवाला विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असुन ती चालु शकत नाही असा सामनेवाला नंबर 2 यांनी आक्षेप घेतला आहे कारण ते सामनेवाला यांचे ग्राहक नाही आणि विमा सेवा पुरविण्‍याचा करार सामनेवाला नंबर 2 यांनी केलेला नाही. सामनेवाला यांचे सदस्‍या करीता पॉलीसी मिळावी व वैयक्तिक अपघात मृत्‍यु झाल्‍यास वारसांना नुकसानभरपाई मिळावी म्‍हणून ग्राहकाच्‍या सेवेसाठी विना मृल्‍य पॉलीसी काढली आहे म्‍हणून तक्रारदारही सामनेवाला यांची ग्राहक नाही कारण सेवा पुरविण्‍याची कोणतीही फीस अथवा मेहनताना घेतलेला नाही आणि म्‍हणून तक्रार खारीज करावी. तक्रारदार यांनी युक्‍तीवाद केला की, सामनेवाला नंबर 2 यांचेकडे तक्रारदार यांनी 9 वर्षा करीता सदस्‍यत्‍व घेतले होते रक्‍कम घेऊन सदस्‍यत्‍व स्विकारल्‍याने तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होतात.

          दाखल दस्‍ताऐवज यादी निशाणी 3/1 वर आहे. त्‍यामधुन बोध होतो की, तक्रारदार यांचे मयत पती यांनी सभासदत्‍व घेतले होते आणि त्‍या करीता रक्‍कम भरलेली आहे आणि म्‍हणून तक्रारदार हे सामनेवाला नंबर 2 यांचे ग्राहक होतात असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

9.    मुददा क्र.2 व 3- मयताचा मृत्‍यु हा वैयक्तिक अपघाती होता काय हा प्रश्‍न सुध्‍दा मंचासमक्ष प्रस्‍तुत प्रकरण निकाली काढतांना उपस्थित झालेला आहे.  सामनेवाला यांनी हया विषयी कोणताही बचाव घेतलेला नाही.  सामनेवाला यांना इतर बचावाचे मुददे उपस्थित

 

केलेले आहे.  मंचाचे मते सदर मुददा सुध्‍दा प्रकरणाच्‍या मुळाशी आहे.  मयताला वाहनाचे चालक सिटवर असतांना जबरदस्‍त हार्ट अटॅक येऊन तो जागीच कोसळला असे तक्रारीचे कथन आहे तसेच पी.एम. रिपोर्ट नुसार त्‍याला हार्ट अटॅकमुळे मृत्‍यु आला आहे असे नमुद आहे.  हार्ट अटॅक  किंवा

हृदयघात हा वैयक्तिक अपघात होता कारण अचानक झालेले अपघात ज्‍याची कोणतीही सुचना नाही, ज्ञात ईतिहास नाही, ईलाज नाही अशा बाहेरील कारणांमुळे आलेला अटॅक हा अपघात होतो.

         अपघाताची परीभाषा मंचाचे मते जे नैसर्गिक नाही आणि अनअपेक्षीत, अचानक हाता बाहेरील स्थितीमुळे ओढावलेला घात आहे.  या प्रकरणात मयताचे हृदयावर घात झालेला आहे सबब प्रस्‍तुत प्रकरण वैयक्तिक अपघात विमा अंतर्गत येतो आणि मयताचे नंतर तक्रारदार सदर वैयक्त्कि अपघाता करीता सामनेवाला कडून नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

10.      सदर निशाणी 3/1 मेंबरशीप सर्टीफीकेटच्‍या मागे अटी व शर्ती दिलेल्‍या आहेत त्‍या खालील प्रमाणे आहेत.

Terms and conditions of personal accidental death policy

personal accident insurance policy (Age Limit 5 -70 Years)

Whereas the insured named herein or on his / her behalf

PANCARD CLUBS LTD. has paid to The New India Assurance

company limited (herein after called the insurance Company)

the premium for the insurance of the risk of death due to any

bodily injury resulting solely and directly form accident arised by

outward violent and visible means the insurance company shall pay

 

the capital sum insured provided such injury shall within Twelve

calendar months of its occurrence be the sole and direct5 cause of

death of the insured to the insured to the NOMINEE or legal

Representative stated in the certificate.

CERTIFIED DETAILS

  1. Name of the insured As mentioned in the box Name Address and

  Age of the Certificate Holder under the schedule overleaf.

  1. Address ----------Do.--------
  2. Period of Insurance Twelve moths from the insurance commencement

  date as mentioned in the schedule overleaf and any subsequent period for which the   

  Insurance company may accept a renewal premium.

  1. Capital Sum Insured Same as mentioned as maximum sum insured in schedule overleaf.
  2. Premium As agreed. in witness where of the undersigned being duly authorized by the        

  insurance company and on behalf of the insurance company has set his hoods at

  Mumbai.                                                                                      

                                    For The New India Assurance Co. Ltd.                                                                                            

                                                    sd/-

                                                                          Authorized Representative

सदरील निशाणी-3 वरील पॉलीसी सुरु होण्‍याची ता.18.05.2008 अशी नमुद आहे. सदर पान क्रमांक-2 वरील अटींनुसार पॉलीसी सुरु होण्‍याची तारीख त्‍यावरील लिहिलेल्‍या तारखेपासुन सुरु होईल असे अटी व शर्तींमधुन स्‍पष्‍ट होते. मंचाच्‍या मते सामनेवाला नं.1 यांची पॉलीसी ता.18.05.2008 रोजी सुरु झाली होती आणि तक्रारदाराची सामनेवाला यांच्‍याकडे सदस्‍यतः ता.12.04.2008 रोजी सुरु झाली होती असे दस्‍ताऐवजा वरुन सिध्‍द होते.

 

 

 

11.   सामनेवाला नं.2 यांनी मंचा समक्ष तक्रारदारातर्फे भरण्‍यात आलेल्‍या फॉर्म पान क्रमांक-95 निशाणी- वर दाखल आहे. सदर फॉर्मच्‍या अटी व शर्ती मागिल बाजुस नमुद आहे. त्‍यामधील अपघाती विमा योजनेनुसार सदस्‍यत्‍वाच्‍या नंतर विमा 30 दिवसांनी लागु होईल असे नमुद आहे.  मंचाच्‍या मते या फॉर्मच्‍या अटी खुपच बारीक व न समजण्‍यासारख्‍या दिसुन येतात आणि सदरील फॉर्मचे मागिल छापील मजकुराचे खालील बाजुस मयताची सही नाही.

12.      सदरील फॉर्मचे मागिल अटींचे अवलोकन केले असता सदरील वर नमुद Declaration मधील व फॉर्मच्‍या मागिल त्‍याच अटी आहेत किंवा वेगळया अटी तक्रारदाराच्‍या मयत पतीस दिल्‍या गेल्‍या होत्‍या असे कोठेही सामनेवाला नं.2 चे स्‍पष्‍टपणे कथन नाही. तसेच

काही क्षणासाठी ग्राहय धरले की, फॉर्मच्‍या मागील अटींचा हा संदर्भ आहे परंतु मंचाच्‍या मते अटी व शर्ती या खुप सुक्ष्‍म व वाचन करण्‍यास योग्‍य नसल्‍यास ते पुर्णपणे मयताला समजल्‍या हे कुठेही सिध्‍द होत नाही असे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी सामनेवाला नं.2 यांच्‍यावर आहे.  याला सामनेवाला यांनी ठाम बचाव सदर दस्‍ताऐवजाचे आधारे घेतला आहे आणि तक्रारदाराने याविषयी सही करणार व्‍यक्‍ती मयत झाल्‍याने त्‍या अटी नाकारल्‍या असल्‍याने ते सिध्‍द करणे

सामनेवाला नं.2 वर बंधनकारक आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. आणि सामनेवाला नं.2 यांनी त्‍याविषयीही समाधान केलेले नाही आणि सामनेवाला यांच्‍या मते तक्रारदाराच्‍या मयत पतीला वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी कधी सुरु होईल याबददल कोणतेही स्‍पष्‍टीकरण

नसल्‍याने सामनेवाला नं.2 यांनी  ( तक्रारदाराचे मयत पतीस ) याबददल सुस्‍पष्‍ट समजले, वाचले बाबत योग्‍य माहिती दिलेली दिसुन येत नाही आणि मंचाच्‍या मते पॉलीसी अस्तित्‍वात नाही

 

 

 

 

आणि सामनेवाला नं.1 यांना पॉलीसी अंतर्गत विमा हप्‍ता मिळालेला नाही म्‍हणून सामनेवाला नं.1 हे विमा रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाहीत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

13.      परंतु निशाणी- पान क्रमांक-95 व त्‍यामागिल अटी यांचे सुक्ष्‍म अवलोकन केल्‍यानंतर मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे की,मयत विमाधारकास त्‍याच अटी समजवल्‍या गेल्‍या आहेत असे कोठेही स्‍पष्‍ट व सिध्‍द होत नाही. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या बचावात मा.राज्‍य आयोग तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाचे तसेच मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अनेक न्‍याय निवाडे दाखल करुन युक्‍तीवाद केला की,या मंचास प्रस्‍तुत तक्रार निकाली काढण्‍याचा अधिकार नाही आणि इतर मुद्यांवर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडे सुध्‍दा दाखल केले आहेत. मंचाच्‍या मते प्रस्‍तुत निवाडे या प्रकरणाला लागु होत नाही.

14.      निशाणी अ च्‍या समोरील बाजुस लिहिल्‍याप्रमाणे  Declaration by the Applicant- I am applying for the purchase of Room nights under the New Royal Holiday.  I declare that I have read and understood the terms & conditions.  The terms & have been explained to me in a language known to me.   I hereby agree to abide by there  terms & conditions. I declare that the information given above is true and correct.                                                                     

                                                         ---------Sd/-----------

15.      ग्राहक संरक्षण कायदा हा इतर कायदयाच्‍या व्‍यतिरिक्‍त व कोणत्‍याही कायदयास बाधा न येता ग्राहकांच्‍या हितार्थ बनवला आहे आणि म्‍हणून मंचाचे मते सामनेवाला यांनी

दाखल केलेले न्‍याय निवाडे या प्रकरणास लागु होत नाही व वर्कमन कॉम्‍पेनसेशन अॅक्‍ट अंतर्गत प्रकरणाची बाधा येत नाही.

16.     मुददा क्र.4 व 5 सामनेवाला यांनी निशाणी- पान क्रमांक-95 सभासद अर्ज भरुन घेतांना पॉलीसीबददल कोणतेही स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही आणि म्‍हणून या विषयी पॉलीसी कधी चालू होईल हे मयतास माहित नसल्‍याने त्‍याने सभासद होण्‍याच्‍या तारखेसच पॉलीसी सुरु

 

होईल असे ग्राहय धरुन रक्‍कम भरलेली आहे व म्‍हणून त्‍याच तारखेस त्‍याचा विमा सुरु होणे आवश्‍यक होते. परंतु तसे झालेले दिसुन येत नाही.

17.      सामनेवाला नं.2 यांनी मयतास योग्‍य माहिती न देऊन त्‍यांस सदस्‍यत्‍व घेण्‍याचे अप्रत्‍यक्ष प्रलोभन किंवा समज दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते आणि मयताने सदस्‍यात्‍वतः तारखेपासुन  पॉलीसी मिळेल या आशेने व अमीशाला बळीपडून व सामनेवाला हयांचे समज दिल्‍यावरुन सदस्‍यत्‍व व पॉलीसी घेतलेली आहे आणि म्‍हणून सामनेवाला यांनी मयताच्‍या पॉलीसीचे लाभ मयत तक्रारदार यांना देण्‍यास ते जबाबदार आहेत आणि ते मागणी करुन न देऊन सामेनवाला यांनी तक्रारदारास दोष पुर्ण सेवा दिली आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत झाले आहे.

18.      वरील प्रकरणात सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नामंजुर करुन दोषपुर्ण सेवा दिल्‍याचे मंचाने ग्राहय धरले आणि म्‍हणून सामनेवाला नं.2 हे प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च तसेच

सदर विमा दावा रकमेवर व्‍याज वजा नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 19.      वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                                                 --- दे श ---

1. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

2. सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदारहिचा क्‍लेम नामंजुर करुन दोषपुर्ण सेवा दिलेली आहे.

3. सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदार हिस रक्‍कम रु.50,000/- पॉलीसी अंतर्गत रक्‍कम क्‍लेम

  तारखेपासुन संपुर्ण रक्‍कम फीटेपर्यंत दरसाल दर शेकडा 7 टक्‍के प्रमाणे व्‍याज देय करावे.

4. सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-

  देय करावे.   

 

5. तक्रारीच्‍या खर्चापोटी सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदार हिस रक्‍कम रु.5,000/- देय करावे.

6. सामनेवाला नं.1 यांच्‍या विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

 

7. उपरोक्‍त आदेशाचे पालन सामनेवाला नं.2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 30 दिवसांचे   

  आंत करावी अन्‍यथा संपुर्ण आदेशीत रकमेवर देय व्‍याज 7 टक्‍के ऐवजी 9 टक्‍के राहिल याची

  सामनेवाला नं.2 यांनी नोंद घ्‍यावी.

 

ता.27.06.2012.      

 
 
[HON'ABLE MR. R.B. SOMANI]
PRESIDENT
 
[ HON'BLE MRS. JYOTI IYER]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.