अंमरिम आदेश (दिः 09/03/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर प्रकरण आजचे बोर्डावर घेण्यासाठी अर्जदारांनी अर्ज दाखल केला. अर्ज मंजुर. अर्जदाराने सदर प्रकरण मागे घेण्यासाठी तसेच माननिय कमिश्नर वर्कमन्स कॉम्पेनसेशन, मुंबई यांचे समक्ष दावा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली. 2. सदर प्रकरण सुभाष सावंत राय याला झालेल्या अपघाताच्या नुकसान भरपाई संदर्भात आहे. मंचाच्या मते न्यायाचे दृष्टिने तक्रारकर्त्याला सदर प्रकरण मागे घेण्याची परवानगी देणे आवश्यक आहे व योग्य त्या न्यायिक यंत्रणेसमक्ष नुकसान भरपाईचा दावा दाखल करणेस तक्रारकर्ता स्वतंत्र आहे. या मंचासमोरिल तक्रारीचा प्रलंब कालावधी कालगणणेतुन वगळण्यात येतो. सबब खालीलप्रमाणे अतिम आदेश जारी करण्यात येतो- अंतरिम आदेश 1. तक्रार क्र.68/2010 मागे घेण्यासाठी तक्रारकर्त्याला परवानगी देण्यात येते व तक्रार निकाली काढण्यात येते. 2.खर्चाचे वहन तक्रारकर्त्याचे स्वतः करावे. दिनांक – 09/03/2011 ठिकाण – ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|