Maharashtra

Bhandara

CC/18/56

URMILA YASHWANT RUKHMODE - Complainant(s)

Versus

DIVISIONAL MANAGER. THE ORIANTAL INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

MR. UDAY P. KSHIRSAGAR

23 Aug 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/56
( Date of Filing : 05 Sep 2018 )
 
1. URMILA YASHWANT RUKHMODE
WALMAJHARI TA.SAKOLI DISTT.BHANDARA
BHANDARA
MAHARSHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIVISIONAL MANAGER. THE ORIANTAL INSURANCE CO. LTD.
PLOT NO. 321 A.2 OSWAL BANDHU SAMAJ BUILDING J.N ROAD PUNE 411042
PUNE
MAHARASHTRA
2. DIVISIONAL MANAGER. THE ORIANTAL INSURANCE CO. LTD.
DIVISIONAL OFFICE. MENTAL HOSPITAL SQUARE. CHHINDWADA ROAD. NAGPUR
NAGPUR
MAHARSHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI. SAKOLI
TA.SAKOLI DISTT.BHANDARA
BHANDARA
MAHARSHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR. UDAY P. KSHIRSAGAR , Advocate
For the Opp. Party:
Dated : 23 Aug 2019
Final Order / Judgement

             (पारीत व्‍दारा  श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्‍या)

                                                                        (पारीत दिनांक– 23 ऑगस्‍ट, 2019)   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 दि ओरिएटंल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-     

      तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचा पती मृतक श्री यशवंत नथ्‍थु रुखमोडे हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची मौजा वलमाझरी, तालुका- साकेाली, जिल्‍हा- भंडारा येथे भूमापन क्रं- 243 ही शेत जमीन होती आणि त्‍यावर त्‍याचा आणि त्‍याचे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा  स्विकारुन तसेच आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे पतीचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा सरकाद्वारे काढण्‍यात आला असल्‍याने पतीचे मृत्‍यू नंतर पत्‍नी या नात्‍याने ती कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे.

     तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचा विषारी साप चावल्‍यामुळे वैद्दकीय उपचारा दरम्‍यान दिनांक-20/07/2017 रोजी अपघाती मृत्‍यू झाला. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-04.10.2017 रोजी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला. परंतु विरुध्‍दपक्ष  क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-05.06.2018 रोजीचे पत्रा नुसार व्‍हीसेरा रिपोर्ट नुसार मृतकाचे शरिरात विष आढळून आले नाही असे कारण दर्शवून तिचा विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा विनाकारण नामंजूर केला. म्‍हणून तक्रारकर्तीने या तक्रारीव्‍दारे विरुध्‍दपक्षाकडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विमा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-04.10.2017 पासून द.सा.द.शे.-18% दराने व्‍याजासह मागितली असून तिला झालेल्‍या त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-50,000/- तसेच तक्रारखर्च म्‍हणून रुपये-20,000/- मागितले आहे.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनी तर्फे मंचा समक्ष पान क्रं 60 व 61 वर लेखी उत्‍तर दाखल करण्‍यात आले, विरुध्‍दपक्ष विमा कपंनी तर्फे दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारकर्तीच्‍या पतीची शेत जमीन होती. तसेच तक्रारकर्तीचे पतीचा वैद्दकीय उपचार घेत असताना शासकीय रुग्‍णालयात दिनांक 20/07/2017 रोजी मृत्‍यू झाला या बाबी मान्‍य केल्‍यात. परंतु डॉक्‍टरांचे शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये मृतकाचा मृत्‍यू सर्पदंशामुळे झालेला आहे असे मत दिलेले नाही. त्‍याच प्रमाणे मृतकाच्‍या शरिरात विष आढळून आले नाही असे शवविच्‍छेदन अहवाला वरुन दिसून येते, या रास्‍त कारणामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला कारण मृतकाचा मृत्‍यू सर्पदंशामुळेच झाला होता ही बाब निर्विवादपणे सिध्‍द होणे आवश्‍यक आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. वर नमुद कारणांमुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

04.   विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, जिल्‍हा भंडारा यांनी पान क्रं 57 व 58 वर लेखी उत्‍तर ग्राहक मंचा समक्ष दाखल केले. तक्रारकर्तीचे पतीची शेतजमीन होती व तो शेतीचा व्‍यवसाय करीता होता ही बाब मान्‍य केली. पतीचे मृत्‍यू नंतर तक्रारकर्तीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयातम विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दिनांक-13.10.2017 रोजी दाखल केल्‍याची बाब मान्‍य केली. दिनांक-13.10.2017 रोजी विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह  प्राप्‍त झाल्‍या नंतर त्‍यांनी लगेच तो विमा दावा प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात जावक क्रं-1062, दिनांक-24.10.2018 रोजी पाठविला होता. विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे हे सर्वस्‍वी विमा कंपनीचे काम आहे, सबब त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.

05.    तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ठ क्रं- 10 नुसार एकूण-10 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये शेतकरी अपघात विमा योजना  2016-2017 शासन निर्णय, विमा दावा प्रस्‍ताव नामंजूरीचे पत्र, विमा दावा प्रस्‍ताव, 7/12 उतारा, पोलीस दस्‍ताऐवज, पी.एम. रिपोर्ट, रासायनिक विश्‍लेषण अहवाल (Viscera Report) मृत्‍यु प्रमाणपत्र, तिचे पतीचा वयाचा पुरावा, तक्रारकर्तीचे ओळखपत्र अश्‍या दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 63 व 64 वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला तसेच, पृष्‍ट क्रं-68 व 69 वर तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर पान क्रं 60 व 61 वर दाखल करण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनी तर्फे पुराव्‍याचे शपथपत्र पृष्‍ठ क्रं- 65 व 66  वर दाखल केले असुन तसेच पान क्रं 67 वर लेखी युक्तिवादा संदर्भात पुरसिस दाखल केली.

07.   तक्रारकर्तीची तक्रार, शपथेवरील पुरावा आणि लेखी युक्तिवाद तसेच  विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीतर्फे लेखी उत्‍तर, शपथेवरील पुरावा त्‍याच बरोबर तक्रारकर्तीने प्रकरणांत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्‍यात आले. मौखीक युक्‍तीवादाचे वेळी विरुध्‍दपक्ष क्रं. 3 गैरहजर होते. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर तसेच विरुदपक्ष क्रं 1 व 2 विमाकंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशीने यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.   

                                                                                   :: निष्‍कर्ष ::

08.   सदर प्रकरणांत विरुध्‍दपक्ष क्रं.1 व 2 विमा कंपनी तर्फे दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारकर्तीचे पतीचा वैद्यकीय उपचारा दरम्‍यान दिनांक 20/07/2017 रोजी मृत्‍यू झाला होता व त्‍याचे मालकीची शेती होती या बाबी संबधाने कोणताही विवाद उपस्थित केलेला नाही.

09.   विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे उत्‍तरा प्रमाणे डॉक्‍टरांचे शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये मृतकाचा मृत्‍यू सर्पदंशामुळे झालेला आहे असे मत दिलेले नाही. त्‍याच प्रमाणे मृतकाच्‍या शरिरात विष आढळून आले नाही असे शवविच्‍छेदन अहवाला वरुन दिसून येते, या रास्‍त कारणामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला कारण मृतकाचा मृत्‍यू सर्पदंशामुळेच झाला होता ही बाब निर्विवादपणे सिध्‍द होणे आवश्‍यक आहे, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.

10.   तक्रारकर्तीने तालुका कृषि अधिकारी, साकोली, जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दिनांक 13/10/2017 रोजी दाखल केला. तसेच विमा दावा प्रस्‍तावा सोबत  7/12 उतारा प्रत,  ईतर शेतीची कागदपत्रे, पोलीस दस्‍तऐवज, वैद्दकीय रुग्‍णालय साकोली, जिल्‍हा भंडारा येथील शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र अशा सर्व दस्‍तऐवजाच्‍या सादर केल्‍याची बाब सिध्‍द होते.

11.    मृतकाचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये “Opinion as to the cause probable cause of death-Viscera preserved opinion reserved” असे नमुद केलेले आहे.

12.   रासायनिक विश्‍लेषण प्रयोगशाळा, महाराष्‍ट्र राज्‍य नागपूर यांनी दिनांक-12 ऑक्‍टोंबर, 2017 रोजीचे दिलेला अहवाल जो पान क्रं 48 वर दाखल आहे, त्‍यामध्‍ये  पुढील प्रमाणे नमुद केले-

  -Results of Analysis-

 

“General and specific chemical testing does not reveal any chemical poison in exhibit nos. (1) & (2) (Ex. means Description of articles contained in parcels)

13.    पान क्रं 24 वर दाखल गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना क्‍लेम फॉर्म भाग-1, 2 व 3 मध्‍ये  सर्पदंश/विंचू दंश या प्रकरणात रासायनिक विश्‍लेषण अहवाल (वैद्यकीय उपचारा पूर्वीच निधन झाल्‍याने पोस्‍टमार्टम झाले नसल्‍यास या अहवालातून सुट मात्र वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्‍यकेंद्र अधिका-या कडून प्रतिस्‍वाक्षरीत असणे आवश्‍यक) असे नमुद आहे. आमचे समोरील प्रकरणात शवविच्‍छेदन करण्‍यात आलेले असून रासायनिक विश्‍लेषण अहवाल सुध्‍दा दाखल आहे.

14.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत  दिनांक-05.06.2018 रोजी तक्रारकर्तीचे नावे दिलेले पत्र पान क्रं 17 वर दाखल आहे, त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे कारण नमुद केलेले आहे-  व्‍हीसेरा रिपोर्ट नुसार मयत व्‍यक्‍तीच्‍या शरीरामध्‍ये विष सापडले नाही या आधारावर विमा दावा रद्य करीत आहोत. सदर पत्राची प्रत जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांना सुध्‍दा दिली असल्‍याचे दिसून येते.

15.    या संदर्भात हे मंच आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी पारीत केलेल्‍या पुढील निवाडयावर आपली भिस्‍त ठेवत आहे- III (2005) CPJ 224 Appeal No. 764 of 2002, Decided on-16/02/2005 “Laxman Manikrao Gawahane & Others-Versus-United India Insurance Company Ltd. & Others”

      मंचा तर्फे आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी पारीत केलेल्‍या सदर निवाडयाचे वाचन करण्‍यात आले, त्‍यामध्‍ये आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग यांनी असे मत नोंदविले की, जिल्‍हा ग्राहक मंचाने केवळ मृतकाचे व्‍हीसेरा अहवालाचा विचार करुन व्‍हीसेरा अहवाला प्रमाणे मृतकाचे शरिरात सर्पदंशाचे विष आढळून न आल्‍याने तक्रार खारीज केली परंतु सदर ग्राहक मंचाचा निर्णय चुकीचा असल्‍याचे नमुद करुन निवाडयात पुढे असे नमुद केले की, मृतकाचे शरिराचे रासायनिक विश्‍लेषण करताना अनेक कारणांमुळे मृत शरीरात विष आढळून येत नाही. परंतु अशा सर्पदंशाचे प्रकरणात संबधित न्‍यायाधिश यांनी निर्णय देताना अन्‍य शरिर लक्षणांचा सुध्‍दा विचार करायला पाहिजे, ज्‍यामध्‍ये मुख्‍यत्‍वे करुन शवविच्‍छेदन अहवाल आहे. आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग यांचे समोरील प्रकरणात प्राथमिक आरोग्‍य केंद्र नेवासा यांचा मृतक मंगला हिचे उजव्‍या हाताला सर्पदंश केल्‍याचे आढळून आल्‍या बाबत अहवाल दाखल आहे. पोलीसांनी केलेल्‍या इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍या मध्‍ये सुध्‍दा मृतक मंगला हिचे उजव्‍या हातावर सर्पदंश झाल्‍याची खूण असल्‍याचे नमुद केलेले आहे. शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये सुध्‍दा मृतक मंगला हिचा सर्पदंशामुळे मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. अशाप्रकारे  दाखल असलेल्‍या अन्‍य आधारभूत (Supporting documents) दस्‍तऐवजांवरुन  सिध्‍द होते की, मृतक मंगला हिचा सर्पदंशामुळे मृत्‍यू झाल्‍याचा निष्‍कर्ष काढून आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग मुंबई यांनी तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले अपिल मंजूर करुन जिल्‍हा ग्राहक मंच, अहमदनगर यांनी दिलेला निकाल रद्दबातल ठरवून विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला विमा दावा रक्‍कम आणि नुकसान भरपाई तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेशित केले आहे.

16.   हातातील प्रकरणात दिनांक-21/07/2017 रोजी पोलीस स्‍टेशन साकोली तर्फे प्रत्‍यक्ष घटनास्‍थळावर जाऊन दोन पंचा  समक्ष जे मरणान्‍वेषन इतिवृत्‍त तयार करण्‍यात आले,  ते पान कं 34 व 35 वर दाखल आहे, त्‍यामध्‍ये मृतक यशवंत नथ्‍थु रुखमोडे यास कोणत्‍या तरी विषारी सापाने डाव्‍या पायास चावा घेतल्‍याने उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाला असे नमुद केलेले आहे. पान कं 32 वर दाखल पोलीस निरिक्षक, पोलीस स्‍टेशन साकोली यांचे अकस्‍मात मृत्‍यू सुचने मध्‍ये सुध्‍दा दिनांक-20.07.2017 रोजी श्री यशवंत नथ्‍थु रुखमोडे हा  दुपारी 3.00 वाजता शेतात रोवणा रोवण्‍यासाठी मधला धुरा साफ करण्‍याकरीता गेला असता त्‍यास सापाने चावल्‍याने तो लगेच 5.00 वाजता घरी आला व त्‍याने असे सांगितले की, त्‍याचे डाव्‍या पायाच्‍या आंगठयाला सापाने दंश केला. लगेच त्‍याला वैद्यकीय उपचारासाठी  सरकारी दवाखान्‍यात आणले असता दवाखान्‍यात भरती असताना उपचारा दरम्‍यान तो मृत्‍यू पावल्‍याचे नमुद केलेले आहे.

17.    पान क्रं 40 ते 47 वर वैद्यकीय अधिकारी, सरकारी  रुग्‍णालय, साकोली यांनी दिनांक-21.07.2017 रोजी जो शवविच्‍छेदन अहवाल दिलेला आहे तो दाखल आहे,  त्‍यामध्‍ये अक्रं 17 मध्‍ये  पुढील प्रमाणे  नमुद आहे-

Surface wounds and injuries-Their nature, position, dimensions (measured) and directions to be accurately stated-their probable age and causes to be noted- “Bite mark (lt) foot (+)” असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे तसेच शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये व्‍हीसेरा परिक्षणासाठी Bottle No.1-Stomach with its contents piece of large and small intestine with its contents. Bottle No.-2- Pieces of lungs, liver, spleen, heart, brain and kidney नमुने घेतल्‍याचे नमुद केलेले असून पुढे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये Opinion as to the cause probable cause of death-Viscera preserved opinion reserved” असे नमुद केलेले आहे.

18.    यासर्व दस्‍तऐवजी पुराव्‍यां वरुन मृतकाचा मृत्‍यू सर्पदंशाने झाल्‍याची बाब सिध्‍द होते परंतु केवळ व्‍हीसेरा रिपोर्ट नुसार मृतकाचे शरिरात विषाचे अंश आढळून न आल्‍याने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केलेला आहे, जेंव्‍हा की, इतर आधारभूत दस्‍तऐवजा (Supporting documents) वरुन पोलीस पंचनामा आणि शवविच्‍छेदन अहवाल यावरुन सिध्‍द होते की, मृतक याचा मृत्‍यू हा सर्पदंशामुळेच झालेला आहे. त्‍यामुळे आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी उपरोक्‍त नमुद दिलेला न्‍यायनिवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन तिला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते असे ग्राहक मंचाचे मत आहे. 

15.    या संदर्भात तक्रारकर्तीचे वकील श्री क्षिरसागर यांनी खालील मा.वरिष्‍ठ नयायालयाचे निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवली-

(1)      Order of Hon’ble State Commission, Circuit Bench Nagpur in First Appeal No.-FA/07/77-“Smt.Nirupa Vivek Bongirwar-Versus-State of Maharashtra” Order dated-06/09/2013

(02)      III (2005) CPJ 224 “Laxman Manikrao Gawhane-Versus-United   India Insurance Co.”

(03)     I (2016) CPJ 11 (NC) “Dharmsetty Sriniwas Rao-Versus-New   India Assurance Company”

(04)   Order of Hon’ble National Commission in Revision Petition No. 471 of 2006, Order dated-25/05/2011-“National Insurance

          Co.Ltd.-Versus-Shri Madhusudan Das.

      उपरोक्‍त मा.वरिष्‍ठ न्‍यायनिवाडयांचे आम्‍ही काळजीपूर्वक वाचन केले असता सदर निवाडयातील वस्‍तुस्थिती हातातील प्रकरणाशी थोडीफार वेगळी असली तरी त्‍यातील  तत्‍व (Ratio) हातातील प्रकरणाशी जुळते.

19.   उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- तिने सर्वप्रथम विमा दावा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी साकोली, तालुका साकोली जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात दाखल केल्‍याचा दिनांक-13/10/2017 नंतर महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेचे परिपत्रका प्रमाणे विमा कंपनीला विमा दावा निश्‍चीतीसाठी 60 दिवसाची मुदत देऊन म्‍हणजे दिनांक-13/12/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीकडून मिळण्‍यास पात्र आहे. त्‍याचप्रमाणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीलाझालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीकडून मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, तालुका साकोली, जिल्‍हा भंडारा यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

20.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन ग्राहक मंचा व्‍दारे  खालील प्रमाणे तक्रारीत आदेश पारीत करण्‍यात येत आहे-

                                                                                  :: अंतिम आदेश ::

 

(01)  तक्रारकर्तीची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) दिनांक-13/12/2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह तक्रारकर्तीला द्यावी.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष -(3) तालुका कृषी अधिकारी, साकोली, जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.